लेखक

अँड्र्यू डेव्हिस

सन 1982 साली ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर काही आठवड्यांमध्येच , मी माझ्या महाविद्यालयीन काळातच पवित्रशास्त्र पाठांतर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता मला पवित्र शास्त्र पाठांतर करत असताना आता मला चाळीसहून अधिक वर्षे झाली आहेत. मला प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, हे माझ्या आयुष्यातील सर्वांत फायदेशीर आध्यात्मिक शिस्तीपैकी एक ठरले आहे.

दररोज पवित्रशास्त्र पाठांतर केल्यामुळे माझे मन देवाच्या परिपूर्ण वचनांच्या तेजस्वी सत्यांवर व तपशीलांवर केंद्रित राहते, जग, शरीर, व सैतान मला जे अशुद्धतेत अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यापासून माझे मन दूर राहते. या सरावामुळे मला भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत, त्यामुळे मी नेहमीच ख्रिस्तातील माझ्या बंधू-भगिनींना पवित्रशास्त्र पाठांतर करण्याचा सल्ला देतो. जवळजवळ प्रत्येकजण याचा आशीर्वाद जाणतो व पवित्रशास्त्र पाठांतर करू इच्छितो. तरीदेखील, अनेकजण याच्या सरावाला  सुरुवात करण्यासाठी किंवा ती चालू ठेवण्यासाठी बहुतेक वेळा कारणे सांगतात, आणि ते ही कारणे मान्य करतात. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये रूपांतर होण्यासाठी आत्मा आपल्याला ज्या कार्यासाठी प्रवृत्त करतो, त्यावर सैतान नेहमीच आघात करतो. आणि जर ते कार्य सैतानाच्या काळ्या साम्राज्यासाठी अधिक धोकादायक असेल, तर त्याचा प्रतिकार अधिक प्रखर होतो.

तर, पवित्रशास्त्र पाठांतरासाठी तुम्ही कोणती कारणे सांगितली आहेत? मी काही वेळा स्वतःही अनुभवलेली आणि इतरांकडून ऐकलेली काही कारणे येथे नमूद करतो. त्यानंतर, मी तुम्हाला  त्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करण्याचा प्रयत्न करीन. माझी इच्छा आहे की, पवित्रशास्त्र पाठांतराच्या या सुंदर कार्यासाठी, तुम्ही सैतानाच्या बळकटींवर विजय मिळविण्यासाठी धर्माचा शस्त्रसाठा तयार कराल. परिणामी, तुम्ही प्रत्येक बंडखोर विचारांना ख्रिस्ताच्या आज्ञेसाठी कैद कराल (2 करिंथ 10: 3-5).

1.माझी स्मरणशक्ती फारशी चांगली नाही.

मानवी मेंदू हा देवाने निर्माण केलेल्या सर्वात जटिल आणि आश्चर्यकारक भौतिक निर्मितींपैकी एक आहे. त्यात अॅमेझॉनच्या जंगलामध्ये जेवढी पाने आहेत, तितकाच मानवी मेंदू ही गुंतागुंतीचा आहे.

या अद्भुत निर्मितीचा एक भाग म्हणजे आपली स्मरणशक्ती — भूतकाळ आठवून वर्तमान काळ उत्तम रीतीने जगण्याची क्षमता यात आहे. जर तुम्ही हा लेख वाचू शकत असाल आणि समजू शकत असाल, तर तुम्हाला पवित्र शास्त्र पाठांतर करण्यासाठी पुरेशी चांगली स्मरणशक्ती आहे. कदाचित तुमची स्मरणशक्ती जागतिक स्तरावरील नसावी (किंवा तुमच्या काही मित्रांइतकी चांगली नसावी), परंतु ती तुमच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगली आहे.

जरा विचार करा, तुम्ही कितीतरी गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत: तुमच्या पालकांनी तुम्हाला शिकवलेली विशाल शब्दसंपत्ती, डोक्यात अडकलेल्या असंख्य गाण्यांचे शब्द (जरी ती गाणी तुम्हाला आवडत नसली तरी), लोकांची नावे, त्यांचे वाढदिवस, राजधानीची शहरे, रस्त्यांची नावे, आणि बरेच काही. जर तुमच्या मनाने हे सगळे दशकांपर्यंत लक्षात ठेवू शकले असेल, तर त्यात देवाचे वचन साठवण्याची क्षमता आणि ताकद आहे. ह्या व्यतिरिक्त, तुमच्या मेंदूच्या क्षमतेच्या पलीकडे, ख्रिस्त तुमचे मन उघडू शकतो, जेणेकरून तुम्ही त्याचे  वचन अधिक समजू आणि लक्षात ठेऊ शकाल. प्रभूचा विचार करा की म्हणजे तो तुमच्यासाठी हे करीन! याशिवाय, जसे तुम्ही या शिस्तीमध्ये गुंतवणूक कराल, तशी तुमची स्मरणशक्ती अधिक सुधारेल. तुम्ही सध्या कुठेही असाल, जर तुम्ही प्रयत्न केले तर एका वर्षानंतर तुम्ही नक्कीच अधिक चांगले असाल.

2. “शिस्त पद्धती विकसित होण्याकरिता वेळ लागेल”

देवाने आपल्यावर जबाबदारी म्हणून वेळ सोपवला आहे. “परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण उल्हास व आनंद करू” (स्तोत्र. 118:24). मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते (स्तोत्र. 119:16). न्यायाच्या दिवशी, आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यावा लागेल. त्यामुळे “पवित्रशास्त्र पाठांतरासाठी खूप वेळ लागेल” असे म्हणणे, याचा अर्थ फक्त आपल्या चुकीच्या प्राथमिकता दर्शवतो. आपण आपले जीवन किंवा वेळापत्रक योग्य प्रकारे नियोजित केलेले नाही — म्हणजेच, खरोखर महत्त्वाच्या गोष्टींच्या भोवती केंद्रित केलेले नाही.

आपण अनेकदा म्हणतो की, आपण खूप व्यस्त आहोत, परंतु आपण ज्या गोष्टींमध्ये गुंतण्याचा निर्णय घेतला आहे, त्या आपण करत आहोत. जरी आपल्यावर नियंत्रणाबाहेरील परिस्थितींमुळे (उदाहरणार्थ, कुटुंबासाठी आर्थिक साहाय्य म्हणून अनेक नोकऱ्या करणे) यात आपण व्यस्त असलो, तरीसुद्धा आपल्याला थांबून देवाने सांगितलेल्या गोष्टी स्मरणात ठेवण्यासाठी वेळ मिळतोच. याशिवाय, जेव्हा पवित्र शास्त्र आपल्याला आपल्या प्राथमिकता बदलायला प्रवृत्त करते, तेव्हा आपण अधिक वेळ, ऊर्जा आणि संसाधने देवाच्या गौरवासाठी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवायला तयार होतो. पवित्र शास्त्रामधील सत्यात आपले मन बुडवणे याच महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. पवित्रशास्त्र पाठांतर हे ब्लू-चीप स्टॉक (उच्च गुणवत्ता, स्थिर उत्पन्न आणि कमी जोखम असलेल्या कंपन्यांचे स्टॉक) प्रमाणे आहे, जे आपल्याला या जीवनात आणि सार्वकालिक जीवनातही भरभरून लाभ देते.

3. मी आधी प्रयत्न केला होता, पण ते शक्य झाले नाही.”

मी मान्य करतो की, पवित्रशास्त्र पाठांतर करणे कठीण आहे आणि तुम्ही या आधी अनेक वेळा (कदाचित अनेक प्रयत्न) केले असतील. पण अनेक वर्षांपासून मी सांगत आलो आहे की, पवित्रशास्त्र पाठांतराचा मुख्य शत्रू म्हणजे हार मानणे. येशूने आपल्या शिष्यांना नेहमी प्रार्थना करण्यास आणि धीर न सोडण्यास प्रवृत्त करण्यासाठी विधवेचा संदर्भ देणारा दाखला सांगितला आहे (लूक 18:1). मी देखील पवित्र शास्त्र पाठांतराबाबत अशाच चिकाटीने पुढे जाण्याचा आग्रह करतो.

या पवित्र वचनांतील शब्द हे तुमच्यासाठी निष्फळ नाहीत; ते तुमचे जीवन आहेत (अनुवाद 32:47). “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या वचनाने जगेल” (मत्तय 4:4). जर तुम्ही हार मानली नाही, तर ही साधना तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी तुमच्या आत्म्याचे पोषण नक्कीच करेल.

4. “मी दररोज पवित्र शास्त्र वाचतो, तर मी ते कशाला स्मरणात ठेवू?

हा एक पूरक प्रश्न आहे; मी पवित्र शास्त्र पाठांतराला दररोज पवित्रशास्त्र स्मरणात ठेवण्याचा पर्याय म्हणून पाहत नाही, तर ते एक योग्य साधन म्हणून मानतो. पवित्र शास्त्राच्या पुस्तकांचे हळूहळू पाठांतर करण्यासोबत, मी दरवर्षी संपूर्ण पवित्र शास्त्र वाचतो. या दोन सवयी एकत्र ज्ञानाच्या रुंदी आणि खोलीत वाढ करतात. पवित्र शास्त्र पाठांतराच्या जोडीला जे समाविष्ट होते, ते म्हणजे विशिष्ट उताऱ्यांवर गहन ध्यान आणि ते शुद्धपणे आठवण्याची क्षमता — प्रलोभन, प्रचार, सल्ला देणे, शिकवण, प्रार्थना आणि इतर महत्वाच्या क्षणांमध्ये. जिथे नियमित पवित्रशास्त्र वाचन आपल्या मनाच्या एकूण दृश्य रचनेला आकार देते, तिथे पाठांतर नेमकपणाने आणि समृद्धतेने त्या विचारांना जोपासते.

5. कदाचित मी गर्विष्ठ होईल.”

काही काळापूर्वी, मी स्वतःबद्दल एक दु:खद शोध घेतला: मी आधीच गर्व धरण केल्याची संभावना आहे. कदाचित, तुम्ही देखील स्वतःबद्दल अशाच प्रकारचा शोध घेतला असेल. प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक कृतीत थोडा गर्व असतो. पवित्र आत्म्याचे सामर्थ्यपूर्ण कार्यच आपल्याला ख्रिस्तामध्ये खरे नम्र बनवू शकते — आणि पवित्र आत्मा काम कसा करतो? तो देवाच्या वचनांचा वापर करतो. यात शंका नाही की, जर आपण पवित्र शास्त्राचे चांगले पाठांतर केले, तर आपल्याला त्याबद्दल गर्व करण्याचा मोह होईल. या मोहाचा प्रतिकार करण्यासाठी, मी काही महत्त्वाचे वचन पाठांतर करण्याचा सल्ला देतो, जे अशा पापी गर्वावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात, उदाहरणार्थ, याकोब. 4:6, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” माझ्या प्रिय मित्रा, मी देवाचा आभारी आहे की, त्याने तुम्हाला या अद्भुत शिस्तीचा विचार करण्यास प्रवृत्त केले. त्याचे फायदे अनंत आहेत, पण मी त्याऐवजी अडथळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सैतान ज्या अडचणी तुमच्यासमोर आणणार आहे, त्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि त्यामध्ये चिकाटी ठेवली, तर मी वचन देतो की देव तुमच्या कठोर परिश्रमांना त्याच्या गौरवासाठी, त्यात तुमच्या आनंदासाठी आणि इतरांच्या आत्म्यांसाठी आशीर्वाद देईल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *