प्युरिटन लोकांकडून प्रार्थना शिकणे
प्युरिटन लोकांनी, (प्युरिटन्स हे एका धार्मिक सुधारणा चळवळीचे सदस्य होते, जी प्युरिटनिझम म्हणून ओळखली जाते त्यांचा उद्देश “चर्च ऑफ इंग्लंड” ला रोमन कॅथोलिक अवशेषांपासून आणि प्रथांपासून शुद्ध करणे हा होता.) त्यांच्या उत्तम काळात, जिवंत देवाशी संवाद साधण्याची कला आत्मसात केली होती, जी सहजपणे प्रार्थनेत रूपांतरित होत असे. ख्रिस्तासारखे चरित्र असलेल्या या पाळकवर्गांनी ख्रिस्ताप्रमाणेच प्रार्थना केल्या, ज्या त्यांच्या लोकांप्रती तारण कर्त्याच्या इच्छा व प्राधान्यांशी जुळून येत होत्या.
प्युरिटन लोकांकडून प्रार्थना शिकताना, आपण केवळ त्यांची नक्कल करणारे बनण्याचा प्रयत्न करत नाही. कारण आपण सतराव्या शतकात राहत नाही; किंवा प्युरिटन लोकांनी जिथून सुरुवात केली होती, तिथेही आपण राहत नाही. आपण त्याच्या शब्दसंपदा किंवा त्यांच्या प्रार्थनेतील लयाची नक्कल करावी हाही आमचा केवळ हेतू नाही. तर यावेळी, आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की, त्यांनी कशा प्रकारे प्रार्थना केली — मग ती व्यासपीठावर असोत की तुरुंगात, त्यांच्या कुटुंबांमध्ये आणि त्यांच्या मंडळीमध्ये. “आम्हाला प्रार्थना करायला शिकवा” असे विचारणे काही मूर्खपणाचे लक्षण ठरत नाही (लूक11:1). जे लोक चांगली प्रार्थना करतात, त्यांचे म्हणणे हे केवळ पोकळ बोल नव्हे तर ते स्वर्गीय उत्साहाने भरलेलले असते.
जेव्हा आपण प्युरिटन आणि त्यांच्या अनुयायांची प्रार्थना ऐकतो, आपण त्यांच्या दरवाज्याजवळ कान लावतो; तेव्हा आपणास काय ऐकू येते? आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो?
बुद्धीने प्रार्थना करा
सर्वप्रथम, आपण त्यांच्या प्रार्थनेत बुद्धिमत्ता ऐकतो, याचा अर्थ असा होत नाही की, त्यांच्या प्रार्थना हे त्यांचे शैक्षणिक कौशल्यांचे प्रदर्शन करणारे किंवा आपण त्यांच्या बोलाने आणि शब्दसंग्रहाने प्रभावित झालो आहोत, माझे म्हणणे असे आहे की, त्यांनी खऱ्या ज्ञानातून प्रार्थना केली.
प्रथम, त्यांच्याकडे देवाचे ज्ञान होते —त्यांच्याकडे देवाचे आणि पित्याचे अनुभवात्मक आणि भावनिक प्रेमळ ज्ञान आहे. तुम्ही कधी देवासोबत चालणारा, त्याच्याशी सहवासाची सवय असणारा, सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे म्हणजे काय हे जाणणारा आणि परिचित मार्गाने तेथे परतणारा कोणी तरी प्रार्थना करणार्याला ऐकले आहे का? मी स्वतः स्तब्ध होऊन बसलो आहे, जसे प्रार्थना करणारा मनुष्य मला हाताला धरून देवाच्या उपस्थितीत घेऊन जातो, अशा अनुभवांची निर्मिती केली जाऊ शकत नाही.
याव्यतिरिक्त, प्युरिटन लोक प्रार्थनेविषयी विचार करताना दाखवलेली बुद्धिमत्ता देखील महत्त्वाची आहे. द वेस्टमिन्स्टर कॅटेकिझम्स/ The Westminster Catechisms मध्ये प्रार्थनेची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात: “प्रार्थना म्हणजे ख्रिस्ताच्या नावाने, देवाच्या इच्छेनुसार गोष्टींसाठी आपली इच्छा देवाला अर्पण करणे, आपल्या पापांची कबुली देणे आणि त्याच्या कृपांचा कृतज्ञतेने स्वीकार करणे.” या व्याख्या नंतरच्या प्रश्नांतून प्रार्थनेचे स्वरूप अधिक खोलवर स्पष्ट केले जाते.
जॉन बन्यान यांनी प्रार्थनेच्या या व्याख्येचा अभ्यास करून एक ग्रंथ लिहिला. त्यामध्ये ते म्हणतात: “प्रार्थना म्हणजे देवाकडे, ख्रिस्तामार्फत, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि साहाय्याने, आपल्या अंतःकरणातील किंवा आत्म्याच्या विचारांची प्रामाणिक, जाणीवपूर्वक, आणि भावनिक अभिव्यक्ती —ज्यासाठी देवाने वचन दिले आहे किंवा त्याच्या वचनानुसार आहे, मंडळीच्या भल्यासाठी, संपूर्ण विश्वासाने आणि त्याच्या इच्छेला समर्पणाने केलेली मागणी.” (प्रेयर,13/ Prayer, 13).
विल्यम गर्नल यांनी प्रार्थनेचे वर्णन करताना म्हटले: “प्रार्थनेला ‘आत्म्याचा देवाकडे ओघ’ म्हटले जाते. आत्मा म्हणजे विहीर, जेथून प्रार्थनेचे पाणी ओतले जाते; परंतु पवित्र आत्मा म्हणजे झरा, जो त्या विहिरीला भरतो आणि ते पाणी बाहेर काढण्यासाठी हाताने मदत करतो. झरा नसता तर विहिरीत पाणीच आलेच नसते, आणि त्या पाण्याला बाहेर काढण्यासाठी कोणी नसेल तर ती विहीर स्वतःहून बाहेर पाणी ओतू शकत नाही.” (द ख्रिश्चन इन कम्प्लीट आर्मर, 467/ The Christian in Complete Armour, 467).
प्युरिटन लोकांनी सार्वजनिक, कौटुंबिक आणि खाजगी प्रार्थनेत फरक केला; वैयक्तिक आणि पाळकीय मध्यस्थीदरम्यान; प्रार्थनेच्या नियमित सवयी, विशेष समयीच्या प्रार्थना आणि प्रार्थनेत अचानक रडणे; कमकुवत, विश्वासू आणि उत्कट प्रार्थना. त्यांनी पूर्वनियोजित प्रार्थना आणि तात्काळ रचलेल्या प्रार्थना यांच्यामधील फरकांवर चर्चा केली. हे त्यांनी गोंधळ निर्माण करण्यासाठी नव्हे, तर प्रार्थनेतून देवाला सन्मान देण्यासाठी केले. म्हणूनच, त्यांनी देवाच्या प्रकटीकरणानुसार खरी प्रार्थना म्हणजे काय, याचा अभ्यास केला—प्रार्थनेतील आत्मा व गाभा समजून घेण्यासाठी त्यांनी हे केले.
भक्तिभावाने आणि आत्मविश्वासाने प्रार्थना करा
प्युरिटन लोकांच्या देवाबद्दलच्या सखोल ज्ञानामुळे त्यांची प्रार्थना भक्तिभावाने भरलेली होती. त्या लोकांना माहीत होते की, ते एका सर्वोच्च आणि पवित्र देवाजवळ जात आहेत. प्रार्थना भवनातील त्या कर वसूल करणाऱ्याप्रमाणे, त्यांना देखील जाणवले की, त्यांच्यासारखा पापी व्यक्ती केवळ बलिदानाच्या रक्ताद्वारेच, सर्वशक्तिमान देवाच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो.
थॉमस कॉबेट यांच्या शब्दांत: “विश्वासणारे जितक्या लवकर देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, तेवढ्याच लवकर देवाच्या गौरवाच्या किरणांचे प्रतिबिंब त्यांच्या आत्म्यावर प्रकाशते, ज्यामुळे त्यांना भय आणि नम्रता वाटते. त्या गौरवाच्या आरशात त्यांना आपली नीचता दिसते.” (गोस्पेल इन्सेंस ,212/ Gospel Incense, 212). हीच खरी नम्रता आहे—एक गाढ जाणीव आहे की, जी नवीन कराराच्या अटींनुसार देवाकडे येणे त्याच्या पवित्रतेची जाणीव कमी होत नाही, तर ती अधिक प्रखर होते (इब्री लोकांस पत्र: 12:22-29). त्यांना समजले की, फक्त येशूच्या रक्तानेच पाप्यांसाठी प्रकाशमय देवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
त्यांच्या भक्तिभावाला आत्मविश्वासाची जोड होती. पवित्र भयाबरोबरच पवित्र स्नेह होता.कारण प्युरिटन लोक ख्रिस्ताद्वारे देवाकडे आले होते, त्यांना “येशूच्या रक्ताने, त्याच्या शरीररूपी पडद्यामधून आपल्यासाठी उघडलेल्या नवीन आणि जिवंत मार्गाने पवित्र ठिकाणी प्रवेश करण्याचा आत्मविश्वास होता.” आणि देवाच्या घरावर अधिपती असलेल्या महान याजकाचा आपल्याला आधार असल्यामुळे, त्यांनी खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने देवाजवळ प्रवेश केला; त्यांच्या अंतःकरणावरून वाईट विवेकबुद्धीचे डाग साफ करण्यात आले होते आणि त्यांच्या शरीराला शुद्ध पाण्याने स्नान घालण्यात आले होते” ( इब्री. 10: 19-22).
ख्रिस्तावर विश्वास ठेवून, त्याच्या प्रीतीत स्वीकारले गेल्याची खात्री बाळगून, प्युरिटन्स त्यांच्या स्वर्गीय पित्याजवळ प्रार्थनेत आले. त्यांनी प्रिय पुत्रांप्रमाणे त्याला हाक मारली — जिव्हाळ्याने आणि अपेक्षांनी भरलेल्या सुरात: “तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.” (इब्री. 4:16). त्यांच्यासाठी, (लूक 11:9-11) मधील वचने ही त्यांच्यासाठी केवळ पोकळ शब्दांचे जाळे नव्हते, तर मोठ्या मागण्यांसह देवाजवळ जाण्यासाठी आधारभूत होती.
ते कृपेच्या सिंहासनाजवळ येण्याची आवड व्यक्त करायचे, त्या दयास्थळाजवळ जिथे देव विश्वासाने येणाऱ्यांवर आपला अनुग्रह दाखवतो व वाटतो. रॉबर्ट ट्रेल यांनी लिहिले आहे: “जोपर्यंत देव कृपा व दया देण्याचा विचार करतो, जोपर्यंत मनुष्य कृपेचा व दयेचा गरजू आहे आणि परमेश्वराकडून ती मागतो व स्वीकारतो (आणि हे आकाश नाहीसे होईपर्यंत ती असेल), तोपर्यंत या कृपेच्या सिंहासनाची सेवा केली जाईल व त्याला गौरव दिले जाईल” (द वर्क्स ऑफ रॉबर्ट ट्रेल,1:14/ The Works of Robert Traill, 1:14).
प्रार्थनेत गाभा असू द्या
प्युरिटन्स जेव्हा कृपेच्या सिंहासनाजवळ आले, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेत गाभा स्पष्टपणे जाणवतो. प्युरिटन्स आणि त्यांच्या आध्यात्मिक वारसांच्या प्रार्थनांचा आशय दाखवणाऱ्या अनेक संग्रहांमध्ये ही खोली दिसून येते (उदाहरणार्थ, द व्हॅली ऑफ व्हीजन, पिअर्सिंग हेव्हन, द पास्टर इन प्रेयर किंवा इंटू हिज प्रेझेन्स/ For Example The Valley of Vision, Piercing Heaven, The Pastor in Prayer, or Into His Presence).
प्युरिटन्सच्या प्रार्थनेसंदर्भात विचार मांडणे एक गोष्ट आहे; त्यांच्याकडून प्रार्थनेविषयी शिकणे व त्यांना शिकवताना व प्रवचन करताना ऐकणे ही दुसरी गोष्ट आहे; पण देवाजवळ त्यांच्या लोकांसाठी विनंती करताना, त्यांच्यासोबत उभे राहणे ही वेगळीच गोष्ट आहे. अशावेळी असे वाटते की, “जर त्यांनी सार्वजनिक प्रार्थनेत देवाशी असा संवाद साधला असेल, तर खाजगी संवादात त्यांचा देवाशी किती गाढ संवाद असला पाहिजे!” ते असे पुरुष होते जे थेट देवाशी जोडलेले होते, शास्त्रातील वचनांची विनंती करत, याकोबा प्रमाणे (उत्पत्ती 32:28) चिकाटीने आणि ख्रिस्ताच्या गुणांनी प्रेरित होऊन नम्रतेने आणि सन्मानाने प्रार्थना करत होते.
जर तुम्ही दानीएलाच्या पुस्तकाच्या 9 अध्यायातील प्रार्थना वाचली, तर तुम्हाला त्यात पूर्वीच्या प्रकटीकरणातून घेतलेल्या धाग्यांनी विणलेली एकसंध प्रार्थना दिसते. प्युरीटन्स देखील हेच करतात. त्यांच्या प्रार्थना म्हणूनच देवाच्या प्राधान्यांना आणि चिंतनांना प्रतिबिंबित करतात. पवित्र शास्त्र-आधारित आशय त्यांच्या विनंत्यांना समृद्धता आणि खोली देतो, आणि त्यांना आत्मविश्वासही देतो. कारण त्यांनी तीच मागणी केली जी देवाने आधीच वचनबद्ध केली आहे.
काही प्युरिटन लोकांनी प्रार्थनेसाठी मदत केली, कधीकधी विश्वासूजणांना त्यांच्या इच्छा आणि गरजा, त्यांची स्तुती आणि त्यांच्या विनवण्यांसाठी योग्य वाहने पुरविण्यासाठी देवाच्या वचनातील पवित्रशास्त्र (किंवा, किमान, “शास्त्रसूचक वाक्ये /बिब्लिन”) माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे (मॅथ्यू हेनरींचे ए मेथड फोर प्रेयर /Matthew Henry’s A Method for Prayer). प्रार्थना करणार्या या अंतःकरणाची फलदायी अभिव्यक्ती म्हणून त्यांना स्तोत्रे आणि पवित्र शास्त्रातील तत्सम भाग आवडले; त्यांनी ख्रिस्त आणि त्याच्या प्रेषितांनी नोंदवलेल्या प्रार्थनांचा शोध घेतला. या शास्त्रोक्त ओळखीमुळे त्यांच्या प्रार्थनेला एकाच वेळी एक वैभवशाली विविधता प्राप्त झाली. (कारण त्यांनी प्रकटीकरणाच्या संपूर्ण क्षेत्रातून आपली फुले निवडली) आणि त्यात त्यांना एक रमणीय साधेपणा आढळला (कारण त्यांनी वापरलेली भाषा— त्याच्या काळात — पृथ्वी आणि सामर्थ्यवान आहे). ते थेट दयेच्या आसनावर जातात आणि देवाचे वचन त्याला परत देतात.
कृपेच्या सिंहासनावर प्युरिटन आपल्याला प्रार्थना करण्यास शिकवू शकतात. जरी आम्ही त्यांच्या काळाशी विसंगत नक्कल करणे टाळले तरीही त्यांनी आम्हाला प्रार्थना काय आहे हे समजावले. त्यांनी आपल्याला जाणीवपूर्वक विचार करायला शिकवले, भक्तीने प्रार्थना करायला शिकवले, आत्मविश्वासाने तिला साधायला शिकवले, आणि देवाशी खोलवर व गंभीर संवाद कसा साधायचा हे शिकवले. मुळात जर तुम्ही एखाद्या प्युरीटनला विचारले असते की, “प्रार्थना कशी करावी?” तर मला वाटते त्यांनी उत्तर दिले असते, “ख्रिस्तामध्ये देवाला जाणून घ्या.” कारण विश्वासाने देवाचे असे दर्शन घेतल्यावर आपण प्रार्थनेसाठी प्रवृत्त होतो. आपल्या प्रार्थनेचा आत्मा आणि सार हे कृपेच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या प्रिय पुत्राद्वारे कृपाळू पवित्र आत्म्याद्वारे सर्वशक्तिमान पित्याकडे येण्यावर अवलंबून असले पाहिजे येथेच खरी प्रार्थना रुजते, आणि येथूनच सर्व खऱ्या भाषण कौशल्याची सुरुवात करतो.
लेखक
जेरेमी वॉकर