जे माझे सासरे बनले त्यांना मी त्यांच्या सुंदर आणि देवभिरू मुलीला डेटींग करू लागलो तेव्हापासून ओळखायला सुरुवात केली. ते त्यांच्या अर्ध्या आयुष्यापूर्वी आणि माझ्या दोन तृतियांश आयुष्यापूर्वी होते. त्यांचे मुल्यमापन करण्यास मला जास्त वेळ लागला नाही. ग्लेन हे अतिशय पारदर्शक प्रामाणिक पुरुष होते.

त्यांची प्रतिष्ठा त्यांच्यापुढे जात असे. आमच्या मंडळीमध्ये त्यांना येशूवर, पत्नीवर आणि आपल्या दोन मुलींवर प्रीती करणारे म्हणून ओळखले जात असे. ते लोकांचे आदर्श होते आणि पुढारी ह्या नात्याने लोक त्यांचा सन्मान करत असत.  

पण जेव्हा त्याच्या सुंदर, देवभिरू मुलीने मला त्यांच्या सान्निध्यात आणले, तेव्हा ते नेमके कसे होते हे मला कळलं : ते त्यांच्या प्रतिष्ठेच्या पलिकडे होते. आणि आता चाळीस वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की या माणसाबद्दलचा माझा आदर वाढलेलाच आहे.

जर मला माझ्या सासर्‍याच्या चारित्र्याचा सारांश एका शब्दात मांडायचा असेल तर (जो प्रत्यक्षात त्याला न्याय देत नाही), मी विश्वासू हा शब्द निवडेन. ग्लेन एक विश्वासू माणूस आहे, ज्याचा अर्थ असा आहे की ते त्यांच्या शब्दाला जागणारे आहेत. ज्याचा अर्थ असाही होतो की ते या पतित जगात एक दुर्मिळ माणूस आहेत.

सोन्यासारखा दुर्मिळ

शहाणा, आत्म्याने प्रेरित लेखक जेव्हा हे शब्द लिहितो तेव्हा तो अगदी अचूक होता:

दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो? (नीतिसूत्रे 20:6)

लेखक अशा प्रकारच्या माणसाचा उल्लेख करत आहे जो आपल्या बोलण्यात आणि त्याच्या कामात एकंदरीत सुसंगतता दाखवतो, तो कशावर विश्वास ठेवतो  आणि तो कसा वागतो या दरम्यान, तो काय वचन देतो आणि काय करतो या दरम्यान.

प्रत्येक माणसाला स्वत:बद्दल विचार करण्याची हीच इच्छा असते — किंवा किमान इतरांनी तरी त्याचा विचार करावा असे त्याला वाटते. परंतु सत्य हे आहे की, बरेच पुरुष मूलतः आणि सातत्याने विश्वासू नसतात.

पण माझे सासरे त्या अपवादात्मक माणसांपैकी एक आहेत. सोन्यासारखे ते दुर्मिळ आहेत. खरेतर, त्यांच्यातील विश्वासूपण हे दुर्मिळ प्रकारचे आहे, अशा प्रकारचे जे सर्वसाधारण कृपेच्या विविधतेच्या पलिकडे आहे. त्यांचा विश्वासूपणा हा येशू, त्यांचा प्रभू याच्याशी त्यांचे विश्वासाने एकरूप होण्याचा अलौकिक परिणाम आहे. त्यांचे विश्वासूपण हे पवित्र आत्म्याचे फळ आहे (गलती 5:22).

आणि अशा माणसाच्या सान्निध्यात राहून मला मिळालेला एक मोठा फायदा म्हणजे आयुष्यभराच्या विश्वासूपणानंतर हे फळ कसे दिसते हे पाहणे.

गृहीत धरले जाण्याची देणगी

असेच एक फळ म्हणजे माझे सासरे असे माणूस आहेत ज्यांना तुम्ही गृहीत धरू शकता. आदरापेक्षा ते अपमानास्पद वाटू नये म्हणून मला काय म्हणायचे आहे ते असे आहे: ग्लेन एक असा माणूस आहे ज्यांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवू शकता. त्यांच्या शब्दाला जागणारा ह्यामध्ये मी हे स्पष्ट केल्याप्रमाणे,

पवित्रशास्त्रात, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वर्णन “विश्वासू” म्हणून केले जाते, तेव्हा त्या व्यक्तीचा किती विश्वास आहे याचा उल्लेख जवळजवळ कधीच केला जात नाही, तर त्या व्यक्तीवर इतरांचा किती विश्वास असू शकतो — तो जे वचन देतो ते पूर्ण करण्यासाठी इतर लोक त्याच्यावर किती विश्वास ठेवू शकतात ह्यावर जोर आहे. एक विश्वासू व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या विश्वासाचा आदर करते, तो जोपासते, टिकवते आणि त्याचे रक्षण करते. (12)

“आपली विश्वासार्हता गृहीत धरण्यास सक्षम असण्याच्या देणगीपेक्षा माणूस आपल्याला देऊ शकतो अशा केवळ थोडक्याच देणग्या आहेत.”

आपली विश्वासार्हता गृहीत धरण्यास सक्षम असण्याच्या देणगीपेक्षा माणूस आपल्याला देऊ शकतो अशा केवळ थोडक्याच देणग्या आहेत. प्रीती अधिक मौल्यवान आहे असे म्हणण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो, परंतु तळाशी विश्वासार्हता ही प्रीतीची अंगभूत अभिव्यक्ती आहे (1 करिंथ. 13:7–8 बघा). ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाचा आदर करणे, जोपासणे, टिकवणे आणि त्यांचे रक्षण करणे ही व्यक्तीची प्रीती आहे. ही देवासारखी प्रीती आहे, कारण पवित्र शास्त्र देवाचे वर्णन त्याच्या लोकांप्रती “वात्सल्यमय व सत्यपूर्ण” असे वारंवार करते (स्तोत्र 25:10).

माझ्या सासऱ्यांनी आपल्या पत्नीला, त्यांच्या मुलींना, त्यांच्या विस्तारित कुटुंबातील आम्हाला, त्यांचे मित्र, त्यांचे मंडळीतील सदस्य, त्यांचे शेजारी, त्यांच्या व्यावसायिक जीवनात त्यांनी ज्यांच्यासाठी काम केले ते लोक आणि त्यांच्याबरोबर काम केलेल्या असंख्य लोकांना दिलेली ही देणगी आहे: त्यांची विश्वासार्हता गृहीत धरण्याची देणगी.

त्याची किंमत कोण लावू शकेल?

एक विश्वासू माणूस काय बांधतो

माझ्या सासऱ्यांनी आपले व्यावसायिक जीवन बांधकामात व्यतीत केले, हे जवळजवळ काव्यमय आहे, कारण त्यांनी आपल्या विश्वासार्ह चारित्र्याने जे बांधले आहे ते त्यांनी आपल्या कुशल हातांनी बांधले आहे तसे मजबूत, टिकाऊ आणि सुंदर आहे.

त्यांच्या विवाहात मला ते दिसते. आपल्या तारुण्यातील सुंदर, देवभिरू पत्नीवर त्यांचे अढळ प्रेम आणि निष्ठा ५७ वर्षांपासून आहे (आणि सुरूच आहे). ग्लेनने देवासमोर तिला दिलेल्या अभिवचनांवर लोईस उभी राहू शकलेली आहे. त्यांचा विश्वासूपणा कोसळेल ह्या भितीविना ती उभी राहू शकलेली आहे.

मला ते त्यांच्या कुटुंबात दिसते. प्रत्येक वडील आणि आजोबांप्रमाणे त्यांनाही पॉप संस्कृती आणि नवीन तंत्रज्ञानाचे धडे देण्याची गरज आहे असे म्हणून चिडवले जाण्याचा आणि त्रास दिले जाण्याचा वाटा मिळतो. पण त्यांना आपल्या मुली, जावई आणि नातवंडांचा प्रेमळ आदर आहे, कारण ते सर्व त्यांच्या दृढ प्रेमाचे आणि विश्वासूपणाचे लाभार्थी आहेत. त्या सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. हे कदाचित सर्वात स्पष्टपणे तेव्हा दिसून येते जेव्हा त्यांच्यापैकी कोणी तरी काही दोष किंवा पाप त्यांच्या लक्षात आणून देतो; ते असे करतात कारण त्यांना माहीत आहे की ते स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.

मी हे मंडळीमध्ये पाहतो जिथे ते चाळीस वर्षांहून अधिक काळ विश्वासू, सहभागी सदस्य आहेत. येशूवर, पत्नीवर, त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या मंडळीवर मनापासून प्रीती करणारा माणूस म्हणून ते अजूनही ओळखले जातात आणि पुढारी म्हणून त्यांचा आजही आदर केला जातो, जरी ते काय करतात याबद्दल नाही तर ते कोण आहेत ह्याबद्दल. पुढारी आणि सामान्य लोक त्यांच्याकडे पाहतात कारण ते खरोखरच त्यांची काळजी घेतात, त्यांचे ऐकतात, त्यांची सेवा करतात, त्यांना प्रोत्साहन देतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात — दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, ते त्यांना आपले दृढ प्रेम आणि विश्वासूपणा देतात. त्यामुळे त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे.

मी हे त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये पाहतो – पूर्वीचे शेजारी असे मला म्हणावे लागेल. मागच्या वर्षी मी आणि माझी बायको, ग्लेन आणि लोईस ज्या घरात 44 वर्षे राहात होत ते विकत घेऊन त्यात राहायला गेलो, शेजार्‍यांनी त्यांना निरोप देण्यासाठी योजलेल्या पिकनिकमध्ये आम्हाला सहभागी व्हायला मिळालं. आणि  तुम्ही त्या कथा ऐकावयास हव्या होत्या. मी ऐकत असताना मला जाणवले की हे लोक ग्लेनला शेजारचा पाळकच मानत होते. ते सर्वांना ओळखत होतेच, पण त्यांना ते वैयक्तिकरीत्या ओळखत होते. त्या प्रत्येकात त्यांनी विशेष रस घेतला होता; ते गरजेच्या प्रसंगी त्यांच्या मदतीला आले होते; जेव्हा ते दु:खात होते तेव्हा त्यांनी त्यांचे ऐकून घेतले, आपला सल्ला दिला आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. आताही ते घरी आल्यावर त्यांचे पूर्वीचे शेजारी त्यांना अभिवादन करायला येतात. हे खूप काही बोलते, नाही का?

माझ्या सासर्‍यांनी त्यांच्या आयुष्यात आपल्या हातांनी अनेक प्रभावी गोष्टी बांधल्या. पण माझ्या अंदाजानुसार – आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, देवाच्या अंदाजानुसार — त्यांनी बांधलेल्या सर्वात प्रभावी गोष्टी म्हणजे त्यांच्या दृढ प्रीती आणि विश्वासूपणाद्वारे बांधलेले प्रीती आणि विश्वासाचे नाते.

देवाला प्रदर्शनात ठेवणे

एक कुशल बांधकाम करणारे म्हणून, माझ्या सासऱ्यांना इतरांपेक्षा चांगले माहीत आहे की वास्तूला आधार देणारा पाया किती महत्त्वाचा आहे. म्हणून, ग्लेनच्या जीवनाचा खंबीर आधार, असा खडक ज्यावर त्यांच्या जीवनातील इतर सर्व काही बांधलेले आहे, तो देव आणि त्याचे ख्रिस्तामध्ये देव त्यांच्यासाठी जे सर्व होऊ इच्छितो ते आहेत, असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा ती काही लहान बाब नाही.

पण देवाच्या गौरवावर प्रीती करणारा माणूस म्हणून ग्लेनला या रूपकाचा गैरसमज होऊ द्यायला आवडणार नाही. जॉन पाइपर म्हणतात त्याप्रमाणे,

पाया हा अदृश्य असतो आणि घराच्या दैनंदिन जीवनात त्याचा क्वचितच विचार केला जातो. त्यांना गृहीत धरले जाते. त्यांना शांतपणे गृहीत धरले जाते. परंतु देव केवळ आपल्या जीवनाच्या भिंतींखाली विशाल, शांत, अदृश्य पाया बनू इच्छित नाही; माथ्यावर सजलेला दृश्य शिर्ष खडक आणि सर्वांना पाहण्यासाठी घर भरून टाकणाऱ्या वैभवाची चमक होण्याचीही त्याची इच्छा असते.

म्हणूनच, नुकतेच आम्ही नाश्ता करण्यासाठी भेटलो तेव्हा ग्लेन ने वर्षानुवर्षे वारंवार मला सांगितले, तसे यावेळी मात्र अश्रूपूर्ण नेत्रांनी सांगितले, “मला फक्त देवाला व्यक्त करायचे आहे.” ही एका अपवादात्मक माणसाच्या हृदयाची ओरड आहे आहे, असा माणूस ज्याने अनुभवाद्वारे देवाची दृढ प्रीती आणि विश्वासार्हता ओळखली आहे, आणि ह्या आशेने तो इतरांना अशा प्रकारची प्रीती देण्याशिवाय राहू शकत नाही की, ज्याद्वारे त्यांना सुद्धा समजेल की कुठल्या झर्‍यातून ते उगम पावले आहे.

आणि ग्लेनने देवाला शब्दात आणि कृतीत व्यक्त केले आहे. देव हा केवळ ग्लेनच्या जीवनाचा भक्कम पायाच राहिलेला नाही; देव त्याच्या जीवनाच्या संपूर्ण इमारतीत प्रत्येक स्तरावर दिसला आहे.

आयुष्यभराचा सन्मान

प्रेषित पौल आपल्याला सांगतो की “ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या…ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा” (रोम. 13:7). म्हणून, या विश्वासू माणसाला मी जो आदर आणि सन्मान दिला पाहिजे तो देणे योग्यच आहे. हे अपार कृतज्ञतेचे अपार आणि आनंददायी ऋण आहे.

पण ग्लेनकडे सन्मान आणि आदर यापेक्षाही अधिक चांगला मोबदला येत आहे. आणि ते ज्यावर ग्लेन खूप प्रीती करतो आणि ज्याला इतक्या सुंदरपणे प्रदर्शित करतो त्या देवाच्या मुखातून येत आहे. देव आपल्या सर्व विश्वासू मुलांना देईल अशी ती आदर आणि सन्मानाची अफाट संपत्ती आहे, आणि आपल्यापैकी कोणीही एकमेकांकडून घेतलेली सर्व थकित कर्जे फेडण्यापेक्षा हे अधिक असेल: शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो (मत्तय 25:21).

लेख

जॉन ब्लुम

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *