अलिकडील बेसबॉलच्या एका क्षणाबाबत अतिउत्साहित होऊन, मी एक व्हिडिओ बघितला. त्यामध्ये बेसबॉलच्या सर्वात मोठ्या स्टार खेळाडूंपैकी एक म्हणजे शोहेई ओहतानी हा असामान्य शक्ती लाऊन कसे होम रन्स काढतो ह्याबाबत स्पष्टीकरण दिलेले होते. मी सर्व सुक्ष्म बाबी सांगून तुम्हाला कंटाळा आणणार नाही. परंतु उत्तर हे, त्याचा पुढचा पाय योग्य स्थळी ठेवणे आणि त्याची अचूक वेळ साधने ह्यामध्ये सामावलेले आहे, त्यामुळे त्याला त्याच्या कंबरेखालील भागाला जोर्याने गोलाकार झटका मारून, प्रचंड शक्ती निर्माण करता येते आणि चेंडू सरळ सिमापार पोहचतो.
ओहतानी एक बेसबॉल खेळाडू ह्या नात्याने क्षणार्धात ती कृती करून चेंडू फटकावण्याबाबत प्रसिद्ध आहे, त्याबाबत विचार केल्यास ते फारच कुतुहलास्पद आहे. ह्यामागे त्याने बेसबॉलच्या प्लेटवर, आणि त्या आधी दिलेला वेळ आणि त्याचे अनुसरण हे कारणीभूत आहे. तसेच त्याने चेंडू फटकावल्यावर त्याच्या बॅटची गती आणि त्याचा खेळ संपल्यावर त्याचे मानसिक आणि शारीरिकरीत्या थंड होणे ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. आता ह्या कृतीची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे तयारी, अंमलबजावणी, अनुसरण ह्या बाबींना कौशल्य, एकाग्रता आणि परिश्रमाची साथ आवश्यक आहे.
दर रविवारी उपदेश करणारा पाळक ह्या नात्याने, मला जवळपास त्यासारखेच वाटते : माझे बहुतांश कार्य हे मी पुलपिटामागे उभे राहण्या आधी आणि नंतर होते.
कर्तव्याच्या जागी उभे असलेले पाळक
माझ्या सेवेच्या सुरुवातीला मंडळीच्या एका सभासदाने मला फार गंभीरपणे म्हटले, पाळक होणे हे फार चांगले असले पाहिजे! कारण मला आठवड्यातून केवळ अर्धा तासच काम करावे लागत होते. निश्चितच, उपदेशाबद्दल ती विचारसरणी ही असा विचार करण्यासारखे आहे की शोहेई ओहतानी दिवसातून मोजक्या वेळा फेरफटका मारतो, होईल तितक्या जोर्याने त्याची बॅट फिरवतो, आणि ह्या त्रासाकरिता लक्षावधी डॉलर्स खिशात घालतो. चांगला फटका मारण्याप्रमाणेच, चांगला उपदेश करण्याकरता भरपूर परिश्रम आवश्यक आहेत, त्यामध्ये तयारी आणि अनुसरण सामावलेले आहे. धंदेवाईक बेसबॉल खेळाडूंप्रमाणे उपदेशकांना मात्र करोडो डॉलर्सचा करार दिला जात नाही! मात्र त्यांचे पारितोषिक कितीतरी महान आहे : त्यांचा चेंडू सिमापार होणे नव्हे, परंतु देवाचे वचन मानवी हृदयामध्ये खोलवर रुजवले जाते आणि त्यांचे जीवन सार्वकालिकतेकरिता परिवर्तित होते.
उपदेश करण्याचे परिश्रमी काम देवाच्या सार्वभौम सामर्थ्यामध्ये आणि त्याखाली होते. जीवनाच्या इतर अनेक कृतींप्रमाणेच, उपदेशांमध्ये सुद्धा आम्ही काहीतरी करतो आणि देव सर्वकाही करतो. “लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते” (नीतिसूत्रे 21:31). माझा उपदेशांचा वीर त्याच्या उपदेशाच्या आधी प्रार्थना करत असे की उपदेशकाने दिलेल्या संदेशापेक्षा चांगला संदेश मंडळीने ऐकावा; तो पुलपिटावर त्याने मेहनतीने केलेल्या तयारीचे फळ आणत असे (त्याने लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज केला), आणि त्याने जे सादर केले आहे त्यावर अफाट सुधारणा होण्याकरिता तो देवावर अवलंबून राहत असे (विजयाचे श्रेय त्याच्या देवाला जात असे). उपदेशाकरिता परिश्रम करण्याचे पाचारण देवावरील अविश्वासामधून प्रवाहित होत नाही, तर त्याचे वचन गाजविण्याकरिता देवाने उपदेशकाला दिलेल्या अद्भुत जबाबदारीच्या पूर्ण समजेमधून प्रवाहित होते.
मग, उपदेश करण्याकरिता नेमके कुठले परिश्रम करणे आवश्यक आहेत?
उपदेश करण्याचे परिश्रमी कार्य
2 तीमथ्य 2:15 मध्ये पौल तीमथ्याला विनंती करतो, “तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर.” महत्वपूर्णरीत्या, पौल तीमथ्याला प्रेषितीय शुभवर्तमानाला योग्यरीत्या हाताळण्याकरिता (“सत्याचे वचन”) मानवाला नव्हे तर खुद्द देवाला हिशेबदार मानतो (स्वत:ला देवाला सादर कर). तीमथ्य देवापेक्षा कमी असलेल्या कोणाला हिशेबदार नसल्यामुळे त्याने त्याचे “सर्वोत्कृष्ट केले” पाहिजे, म्हणजे असे वचन जे उत्साहपूर्ण उत्सुकता आणि प्रखर प्रयत्न व्यक्त करतात.
आठवड्याचे आठवडे, आम्ही पाळक ह्या नात्याने संदेशांची तयारी करत असताना, अनेक बाबी आमचा उत्साह, उत्सुकता आणि प्रखर प्रयत्नांना घटवू शकतात. आम्ही शारीरिकरीत्या थकलेले, भावनिकरीत्या शिणलेले, किंवा वैयक्तिकरीत्या दुखावलेले असू शकतो. आम्ही मोहपाषांनी आकर्षित झालेले, छंदांद्वारे विचलित झालेले, किंवा महत्वाच्या कामांनी भारावून गेलेले असू शकतो. कधी कधी आम्ही पळवाटा शोधण्यास, सहजतेने घेण्यास, पन्नास टक्केच प्रयत्न करण्यास मोहित होऊ शकतो. म्हणून पौलाचे ऐकणे आमच्यासाठी चांगले आहे, “होईल तितके कर,” “उत्साहपूर्ण अस,” “प्रखर प्रयत्न करून काम कर.” आम्ही देवाच्या वचनाला गाजविण्याची तयारी करत असताना आम्ही देवासमोर उभे राहतो.
आम्ही अगोदरच उत्सुकतेने आणि उत्साहीपणे जर कार्य करत नसू, तर मग तसे करण्यास आपण कसे सुरुवात करू शकतो? कदाचित आम्ही तो सुट्टीचा न घालवलेला वेळ शेवटी आराम करण्याकरिता वापरून सुरुवात करू शकतो. कदाचित आमच्या आठवड्याच्या वेळापत्रकाची पुनर्रचना करून आम्ही जेव्हा सर्वात जास्त ताजेतवाने आणि जागृत असतो तो वेळ उपदेश तयार करण्याच्या सर्जनशील कामामध्ये लावू शकतो. कदाचित आम्ही आमच्या निरुत्साही, आणि विचलित प्रयत्नांबाबत अशा ख्रिस्ती बंधूंना कबूली देऊ शकतो जे आम्हाला आध्यात्मिकरीत्या प्रोत्साहन देऊ शकतील. दोन-तीन समविचारी पाळक लोक शोधून त्यांच्यासोबत एकत्र येऊन, शास्त्रभागाचा अभ्यास करून आठवड्याचा उपदेश तयार करण्याबाबत तुम्हाला काय वाटते?
काही आठवड्यांमध्ये, आमचे तयारीचे परिश्रम त्वरित आणि स्पष्ट परिणाम देतात. आमची उपदेशाची रूपरेषा तिजोरिच्या आकड्यांप्रमाणे चपखल बसते, शास्त्रभागामधून ताज्या अंत:प्रेरणा उफाळून येतात, आणि असे वाटते की उपदेश स्वत:च स्वत:ला लिहून काढत आहे की काय. आणि मग इतर आठवड्यांमध्ये, आमचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न बंद पडलेल्या कारला वाहनपथावर ढकलल्यासारखे वाटतात, तीन तासांचे कष्टाचे काम करून अगदी क्षुल्लक परिच्छेद तयार होतो. माझ्या अनुभवानुसार, कोणता शास्त्रभाग एखाद्या फुलासारखा उमलेल आणि कुठला हट्टीपणाने विरोध करेल हे आधी कधीच स्पष्ट होत नसते. वेदनादायी आणि सुखद उपदेश तयार करण्याचे आठवडे हे दोन्ही देवाची देणगी आहेत. आम्हाला दोन्हींची गरज आहे. ह्या कार्यात भरडले जाण्याने अनुभवास येणारा अशक्तपणा आम्हाला देवावर अवलंबून राहण्यास साहाय्य करतो. त्या आशीर्वादित आठवड्यांमध्ये आम्हाला जे साहाय्य अनुभवास येते ते आम्हाला देवाच्या दयेने ताजेतवाने करते.
उपदेशाची तयारी करण्याचे परिश्रमी कार्य हे शास्त्रभाग समजणे आणि त्याचे स्पष्टीकरण देण्यापुरतेच मर्यादित नाही. त्यामध्ये आम्ही ज्या शास्त्रभागावर उपदेश करतो त्याचे गौरव अनुभवणे समाविष्ट आहे. कवी-पाळक जॉर्ज हर्बर्ट उपदेशकांना असा सल्ला देत असत की “तुमचे सर्व शब्द आणि वाक्ये तुमच्या तोंडात येण्यापूर्वी, हृदयात बुडवून मुरवलेले असू द्या,” जेणेकरून श्रोत्याला हे स्पष्टपणे लक्षात येईल की त्यांचा प्रत्येक शब्द “हृदयात बुडवलेला” होता (द कंप्लीट इंग्लिश वर्क्स The Complete English Works, 205). हृदयात बुडवलेल्या शब्दांना भरपूर प्रार्थनापूर्वक बुडवणे आणि मुरवण्याची गरज असते. जे उपदेशक त्यांचे सर्वोत्कृष्ट करतात ते पवित्र शास्त्राला मन आणि हृदय दोन्हींशी जोडतात.
उपदेशामागील कठोर परिश्रम
आम्ही देवाचे वचन देवाच्या लोकांना गाजविण्यास उभे राहत असताना आम्हाला शारीरिकरीत्या खर्ची पडावे लागेल, जॉर्ज व्हिटफिल्ड म्हणतात त्या प्रमाणे कदाचित “पुलपिटावर चांगल्या कष्टाचा घाम गाळणे”अनुभवावे लागेल. (George Whitefield, 505). आम्हाला आध्यात्मिकरीत्या खर्ची पडावे लागेल. लक्षात घ्या, उपदेशकांनी देवाचे वचन गाजवलेले सैतानाला आवडत नाही आणि म्हणून तो आम्हावर वारंवार संशय, भय, काळजी, आणि असुरक्षिततेचे हल्ले करतो.
आम्हाला भावनिकरीत्या सुद्धा खर्ची पडावे लागेल. कळकळीने चेतावणी देणे, सौम्यतेने आणि प्रेमळपणाने सांत्वन करणे, भटकणार्यांना आमच्या हृदयापासून उपदेश करणे, काही जण आमच्यावर टिका करतील, काही आमच्याकडे दुर्लक्ष करतील.
आम्हाला बौद्धिकरीत्या सुद्धा खर्ची पडावे लागेल. सामान्य आणि विशेष बाबींमधून पुढे जात राहणे, म्हणजे देवाच्या वचनाचे लागूकरण असे करणे की ते गाईल सुद्धा आणि दंश सुद्धा करेल, जखमी सुद्धा करेल आणि बरे सुद्धा करेल. परिक्षण आणि लागूकरण करत पुढे जावे लागेल, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये खोलवर जाणे आणि आवरण घालणे करावे लागेल, सर्जनशीलतेने आणि बांधणीत्मक विचार करावा लागेल, बाह्यात्कारी विस्तृत संस्कृतीशी जुळणे आणि आंतरिकरीत्या मानवी हृदयांची तळमळ, संभ्रम, आणि वैगुण्यांशी जुळणे.
आमचे उपदेश करणे सुरू असताना आम्हाला खोकलण्याचा आवाज, लेकरांचे रडणे, गुदमरणार्या जांभळ्या, झाकलेले डोळे, कुजबुजणारी संभाषणे, जवळून जाणार्या सायरनचे आवाज, कोड्यात्मक नजरा, खणखणणारे फोन्सचे आवाज, आणि कंटाळलेले अविर्भाव अनुभवण्यास येतील. जेव्हा एखादा उशिरा येणारा चालत येऊन पहिल्या बाकावरील रिकाम्या जागेकडे चालत जातो आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळतात, तेव्हाही आम्ही उपदेश करतच राहतो. जेव्हा लोक घड्याळाकडे कटाक्ष टाकतात, आम्ही उपदेश करतच राहतो. कधी कधी देवाच्या आत्म्याची उपस्थिती आणि सामर्थ्य व्यक्त होईल. इतर वेळी, आमचा शब्द दुर्बळ आणि लटपटणारा वाटेल. कधी कधी आमचे स्वत:चे विचार भरकटतील. कधी कधी आमची स्वत:ची अंत:करणे काळजी करतील. तरी आम्ही कळकळीणे आणि उत्साहाने देवाचे वचन योग्यरीत्या हाताळत, स्वत:ला देवाला सादर करत उपदेश करतच राहू.
अनुसरणाचे परिश्रमी कार्य
आम्हा उपदेशकांना असा विश्वास बाळगण्याचा मोह होतो की, उपदेश करून झाला म्हणजे सगळे संपले. शेवटी, पुढचा रविवार येत आहे, आणि आम्हाला दुसर्या उपदेशाची तयारी करायची असते! परंतु वास्तविकतेत, यशस्वी उपदेशाचे बहुतांश परिश्रमी कार्य हे कदाचित उपदेश देऊन झाल्यावर होऊ शकेल. देव आम्हाला विविध प्रकारच्या उपदेश पश्चात कार्याकरिता पाचारण करतो.
प्रथम, आम्हाला त्वरित हृदयाचे काम असते. आमची प्रवृत्ती आणि आत्मविश्वासाच्या स्तरावर अवलंबून, आणि आताच सादर केलेल्या उपदेशाबद्दल आम्हाला कसे वाटते ह्यासहित, आम्ही पुलपिटावरून उतरल्याबरोबर गर्व किंवा निराशेप्रत मोहित होऊ शकतो. आपल्या उपदेशानंतरचे प्राथमिक क्षण आमचे कार्य देवाला सुपूर्द करण्याची संधी आहे. ती वेळ आम्हाला उपदेशाची तयारी करण्यासाठी आणि तो सादर करण्यास देवाने सबळ केले म्हणून त्याचे आभार मानण्याकरिता आहे, तसेच आमचे तोंडी अडखळणे आणि गडबडण्यासाठी त्याची कृपा प्राप्त करण्याची वेळ आहे, आणि आमच्या मनांमधून आणि स्मरणातून श्रोत्यांबाबत जे काही साहाय्यभुत नव्हते आणि खरे नव्हते ते सर्व पुसून टाकण्याची ती वेळ आहे, आणि जे सर्व चांगले झाले त्याकरिता देवाला श्रेय देण्याची ती वेळ आहे.
दुसरे, आमचे सुरू राहणारे पाळकीय कार्य आहे. हे परिश्रम आमचा उपदेश संपल्याबरोबर पुढील आठवडाभर सुरू राहते, ज्यांनी आमचे ऐकले त्यांचे आता ऐकायचे असते. ह्या सुरू राहणार्या पाळकीय कार्यामध्ये उपासना सभेनंतर प्राप्त होणारा “छान उपदेश होता, पाळकसाहेब!” असल्या शुभेच्छांची सौम्य चौकशी सुद्धा सामावलेली आहे (नेमके काय साहाय्यभुत होते? काय अस्पष्ट होते? उपदेशाद्वारे अनुत्तरित प्रश्न उभे राहिले का?). टिकांना नम्रतेने चाळून मंडळीची सेवा अधिक परिणामकारकरीत्या कशी करता येईल हे ओळखावे लागेल. आणि निश्चितच अनुअवधानाच्या प्रत्येक संधीप्रती जागरूक राहावे लागेल. रविवारी दुपारच्या जेवणाच्या वेळी आमच्या कुटुंबाशी आम्ही बोलू शकतो का? मंडळीच्या लहान गटांना लागूकरणात्मक प्रश्नसंच आम्ही पुरवू शकतो का? आम्ही प्रार्थनांद्वारे आमच्या उपदेशाचे सत्य श्रोत्याच्या हृदयात देवाने अधिक खोलवर न्यावे अशी विनंती करून, सर्वोत्तमरीत्या कसे पोचवू शकतो?
तिसरे, आम्हाला दीर्घकालीन हृदयाचे काम आहे. हे आमच्या वैयक्तिक पवित्रीकरणासाठी आणि उपदेशाच्या प्रामाणिकतेसाठी फार महत्वाचे आहे. आम्ही जरी देवाचे वचन पूर्णत: पाळत नसलो तरी आम्ही ते देवाच्या लोकांना गाजविण्यासाठी त्यांच्यासमोर उभे राहतो. परंतु आम्ही जर सतत पश्चाताप करून वाढत असू तर मग आम्ही ढोंगी नाही, म्हणजे जर आम्ही प्रत्येक उपदेश स्वत:ला सुद्धा देत असू तर. उपदेश — तयारी, अंमलबजावणी, आणि अनुसरण — हे कठोर परिश्रम आहे. त्याचे बहुतांश कार्य आमच्या मंडळीला दिसत नाही. परंतु ते अत्यंत महत्वाचे आहे, आणि आम्हाला देवाचे अद्भुत अभिवचन आहे की आमच्या नम्रतेने केलेल्या प्रयत्नांना तो त्याचे स्वत:चे बनवेल.
लेख
स्टीफन वीटमर