चुका ह्या कशाप्रकारे वर चढून जाण्याच्या पायऱ्या बनतात

एक तरुण म्हणून, मी असं समजून चालत होतो की नेतृत्व करणे म्हणजे जबाबदारी पार पाडणे, ओझे उचलणे आणि कठीण निर्णय घेणे. तरी, मला हे माहीत नव्हते की, नेतृत्व करण्याचा अर्थ बरेचदा अपयशाला सामोरे जाणे सुद्धा होतो.

मी असे म्हणतो तेव्हा माझ्या मनात, मोठ्या प्रमाणात होणारे आणि धक्कादायक असे अपयश नाही, जसे की, असे अपयश जे एखाद्या व्यक्तीला पाळकीय सेवेसाठी अपात्र ठरवते. नाही! तर माझ्या विचारात प्रामुख्याने त्या सामान्य चुका किंवा अडखळणे आहेत – बरेचदा पापपूर्ण, किंवा पापरहित अशी- जी सावध असलेल्या पुढाऱ्याला देखील बऱ्याचअंशी खाली पाडतात आणि त्याला लज्जास्पद स्थितीत नेऊन सोडतात, ज्यां केल्यानंतर त्याला वाटते की आपण काहीतरी वेगळे केले असते किंवा वेगळे काहीतरी बोलले असते तर किती बरे झाले असते.

माझ्या मनात, ते उपदेश आहेत ज्यांचे अपेक्षित फळ मिळत नाही आणि ऐकणाऱ्यांवर देखील काहीच परिणाम होत नाही. असे शास्त्र अभ्यास आहेत जे निरस असतात आणि ज्यांत चर्चेसाठी कोणीही भाग घेत नाही. असे विनोद आहेत जे सार्वजनिकरित्या मूर्खपणाने सांगितले जातात; असे सार्वजनिक निर्णय आहेत जे घाई-गडबडीने घेतले जातात. अशी सेवा जी नव्याने सुरु होऊन पुढे जाते, मग लटपटते, मग अडखळते, मग लयास जाते. असे घेतले गेलेले निर्णय आहेत ज्यांविषयी तुम्ही परत विचार केला तर कळून येते की ते चुकीचे होते. असे तरुण ख्रिस्ती आहेत ज्यांना इतर कोठून तरी अधिक सहाय्य मिळते.

नेतृत्व करण्यास पाऊल टाकणे म्हणजे चुका, पश्चात्ताप आणि अनेक लहान पण वेदनादायक अपयशांच्या दिशेने पाऊल टाकणे होय. आणि नेतृत्व करण्यात टिकून राहणे म्हणजे, जे मी सुद्धा शिकत आहे, त्या चुका सुधारून योग्य ती प्रगती करणेत्यांचा स्वीकार करणे, त्यांच्याकडून शिकणे आणि ख्रिस्तामध्ये स्थिर होऊन नेतृत्व करत राहाणे.

पुढारी हे अपयशी होतात

अर्थात, प्रत्येक पतित पावलेला मनुष्य हा काही प्रमाणात अपयशाशी परिचित असतोच. अगदी गर्भावस्थेपासून ह्या चुका आपल्या मागोमाग येतात; वर्णाक्षरांना शिकत असतांना आपण त्यासोबत पश्चात्ताप करणे देखील शिकतो. परंतु किमान दोन कारणांमुळे नेतृत्वाच्या सेवेत येणारे अपयश हे सर्वांना उघडपणे दिसून येते.

प्रथम हे की, नेतृत्वाची सेवा आम्ही आधीच करत असलेल्या चुकांसाठी एक सार्वजनिक व्यासपीठ प्रदान करते. निश्चितच मोशेने मिद्यानमध्ये कुटुंबाची वाढ करतांना, दावीदाने आपल्या वडिलांच्या मेंढरांच्या कळपांना राखतांना आणि पेत्राने ज्या वेळेस तो गालील समुद्रात मासेमारी करत होता, चुका केल्यात. पण त्यांच्या चुका जवळजवळ वैयक्तिक पातळीवर होत्या – तलावात फेकल्यावर जे खडे पाण्याच्या पृष्ठभागाला लागून वर उडतात, त्यांपासून तयार झालेल्या लहरी ह्या थोडक्या आणि कमी वेळेसाठी असतात. म्हणजे, अल्प चुकांचे परिणामही कमी प्रमाणात किंवा मर्यादित असू शकतात.

पण त्यानंतर मोशे एका राष्ट्राची स्थापना करत होता, दावीद एका प्रजेचा मेंढपाळ झाला,  आणि पेत्र माणसे पकडणारा बनला. आणि अचानक, त्यांचे वैयक्तिक अपयश हे सार्वजनिक झाले आणि त्यांना मोठ्या चौकशींना सामोरे जावे लागले. अशा प्रकारच्या उघडे पाडणाऱ्या त्रासदायक अनुभवातून जाण्यासाठी आपल्याला प्रचंड अशा नेतृत्वाच्या सेवेची गरज नाही. आपण बंद पडद्यामागे एकदा अपयशी ठरलो; आता आपण व्यासपीठावर उभे आहोत.

आणि मग दुसरे हे की, नेतृत्वाच्या सेवेत आपल्यावर अपयशासाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रसंग येतात. कुटुंबामध्ये, मेंढ्यांच्या कळपामध्ये, मासे पकडण्यामध्ये, अपयशाचे हे प्रसंग होतेच, परंतु ते मर्यादित स्वरूपाचे होते. ज्यावेळेस नेतृत्वाच्या सेवेने मोशे आणि दावीद आणि पेत्राला त्या जगातून बाहेर काढले, त्यावेळेस ज्या जगात ते होते त्यांत जेव्हा त्यांना यश आणि अधिकार यांचे एक ओझरते दर्शन झाले, तेव्हा त्यांच्या अपयशांच्या प्रसंगांमध्ये वाढ झाली.

नेतृत्वाचे मर्म हे की त्यांत सार्वजनिक पुढाकार घेणे आणि धोके पत्करणे हे समाविष्ट असते. पुढारी नवनवीन उपक्रम राबवतात; देवाच्या कृपेने, नवीन वास्तवांना अस्तित्वात आणण्यासाठी ते ध्येय बनवतात; ते लोकांना अशा मार्गांचे अनुसरण करण्यास सांगतात ज्यांवर आजपर्यंत कोणीही चाललेला नाही. आणि काहीवेळा, अगदी कुशल पुढाऱ्यांचेही प्रयत्न फोल ठरतात आणि पत्करलेले धोके त्यांना तोंडावर पाडतात.

दोन सर्वसामान्य मार्ग

काही अपयश आणि चुका नांगी मारतात. तर काही डझनभर जखमा देतात. आणि मग, कालांतराने, जश्या-जश्या चुका आणखीनच वाढत जातात, तसतसे आपल्याला वाटायला लागते की आपण पश्चातापाच्या एका लहान डोंगरासमोर उभे आहोतएक असा डोंगर, जो आपल्या क्षमतेपेक्षा अवघड असा वाटतो. या टप्प्यावर, एखाद्या पुढाऱ्याला दोन मार्ग मोहात पाडू शकतात.

पहिला मोह म्हणजे नेतृत्वात असलेल्या अपयशाच्या असुरक्षतेपासून किंवा हळवेपणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण स्वतःला घट्ट करून भावनिक किंवा मानसिक आघात झालेले असे दाखवतो (म्हणजे पडक्या महालात अडकला अरुण). आता आपल्यावर होणाऱ्या टीका आपल्यापर्यंत पोहचू शकणार नाही. आता अपयश यापुढे आपल्याला घायाळ करणार नाही कारण आपण त्याच्या अनुभवाला नाकारतो. आणि मग हळुवारपणे, किशाचा एकेकाळचा नम्र मुलगा शौल, कठोर आणि वर चढलेला, अपयशाच्या डंकापासून सुरक्षितआणि देवाच्या कृपेपासून दूर, असा गर्विष्ठ राजा बनतो.

दुसरा आणि कदाचित सर्वसामान्य मोह म्हणजे पळ काढणे. खंदकात जाऊन लपून बसा. पळून जा. पेत्राचे अनुसरण करून परत गालीलाकडे जा, मासेमारीच्या बोटीकडे परत जा, अशा गुप्तस्थळी परत जा जेथे कोणीही पाहत नाही आणि मलाच माहित असते की मी काय करत आहे (योहा. २१:३). किंवा वैकल्पिकरित्या, “नेतृत्व” करत राहा, परंतु खूप प्रयत्न करणे थांबवा. धोके पत्करणे अजिबात सोडा आणि टेकड्या पार करणे टाळा. सुरक्षित ठिकाणावरून नेतृत्व करा.

“अपयशाने डंक मारलेला प्रत्येक पुढारी जर पायउतार होत गेला तर मग मंडळीसाठी पुढारी उरणार नाही.”

आता, नेतृत्वाच्या कर्तव्यापासून पायउतार होणे हे नेहमीच चुकीचे नसते. कदाचित, काही विशेष स्वरूपाच्या त्रासदायक अपयशाच्या पार्श्वभूमीवर—किंवा बऱ्याच वेळेपासून पडलेल्या चुकीच्या पावलांमुळेआम्हाला खरोखरच काही काळासाठी पायउतार होणे हे गरजेचे असते आणि ख्रिस्ताच्या शांतचित्त सहवासात आपली ओळख पुन्हा शोधली पाहिजे. किंवा मग कदाचित खूप प्रार्थना आणि सल्ला मसलत करून आम्ही पायउतार केलेल्या नियमित नेतृत्वाकडे परत जाऊ नये. काही प्रकरणांमध्ये असे करणे ठीक राहील. ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव पुष्कळ आहेत, त्यापैकी काही मूठभर हे पाळक/पुढारी आहेत, जे सर्व आवश्यक आहेत (१ करिंथ. १२:२२).

तरीसुद्धा, अपयशाने डंक केलेला प्रत्येक पुढारी जर पायउतार होत गेला तर मग मंडळीसाठी पुढारी उरणार नाही. मग, काहीही करून आपल्याला दुसऱ्या मार्गाची आवश्यकता आहे, असा मार्ग ज्यात चुका ह्या पुष्कळ पायऱ्या प्रमाणे आहेत ज्यावर, आपला प्रभु कालांतराने आपल्याला अधिक विश्वासू आणि फलदायी नेतृत्व करण्यास चढण्यास सहाय्य करतो. पुढारी चुका कसे करतात केवळ हेच नव्हे तर त्या चुकांना सुधारून पुढारी कसे घडतात हे पाहण्यासाठी आपल्याला कृपेची आवश्यकता आहे.

प्रत्येक अपयश ही एक पायरी आहे

देवाने त्याच्या दयाळूपणाने, त्याच्या शास्त्राला अशा पुढाऱ्यांच्या वृत्तांताने भरून ठेवले आहे की जे अपशस्वी झालेत परंतु ते तिथेच थांबले नाहीत, जे पतन पावलेत पण नाश पावले नाहीत. होय, आपण शौल, यहूदा आणि देमास ह्यासारख्या पुरुषांबद्दल वाचतो, ज्यांच्या अपयशामुळे ते नाश पावलेत. परंतु आपण मोशे आणि दावीद, पेत्र आणि इतर शिष्यांबद्दल देखील वाचतो, ज्यांची एक पुढारी म्हणून आलेली परिपक्वता ही अपयशापासून बनलेल्या शिडीसारखी होती.

“पुढारी चुका कसे करतात केवळ हेच नव्हे तर त्या चुकांना सुधारून पुढारी कसे घडतात हे पाहण्यासाठी आपल्याला कृपेची आवश्यकता आहे”

विशेषकरून पेत्राचे उदाहरण पाहणे उपयुक्त होईल. आपण ज्या विशिष्ट प्रकारच्या पुढाऱ्यांच्या अपयशावर विचार केला आहे, त्यांच्या तुलनेत पेत्राचे तीनदा पतन होणे हे एक मोठे अपयश असू शकते, परंतु त्याचा किस्सा आपल्याला आपल्या स्वतःच्या अपयशांपासून, मग ते कितीही मोठे किंवा लहान असो, विविध प्रकारे पाऊल पुढे कसे टाकावे हे सांगतो.

मान्य करणे

उत्तम शुक्रवारच्या पाहाटे पेत्राने स्वतःविषयी पाहिल्या नव्हत्या अश्या आणखी गोष्टी उघड झाल्या. आदल्या रात्री, त्याने शपथ घेतली होती की यापूर्वी त्याने येशूला नाकारावे तो मरणे पसंत करेल; मग एक, दोन, तीन: “मी त्याला ओळखत नाही.” (लूक २२:५७). कोंबडा आरवला. येशूने त्याच्याकडे पाहिले. आणि त्या तापट क्षणी पेत्राने स्वतःला पाहिले की तो कोण आहे.

तथापि, अशा वेदनादायक वस्तूस्थितीपासून पळ काढण्याऐवजी, त्याने ती मान्य केली. सर्वप्रथम, “तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.” (लूक २२:६०). मग तो त्याच्या मित्रांकडे परतला (लूक २४:१०-१२). आणि मग शेवटी, पहाटे गालील समुद्राच्या किनाऱ्यावर, त्याने कुठलाही तर्क दिला नाही, त्याने स्वतःला बरोबर ठरवले नाही, कोणतीही सबब दिली नाही (योहान २१:१-१७). अपयशाने उत्तम शुक्रवारी पेत्राला काबीज केले होते—आणि इथे, त्याच्या दयाळू प्रभुसमोर उभे राहून, पेत्राने आपले अपयश मान्य केले.

अर्थातच, बहुतेक प्रसंगी आपल्या अपयशाला पापापेक्षा आपला दुर्बळपणाच अधिक जबाबदार असतो. कदाचित आपले अपयश आपला दोष नाही तर आपली अपरिपक्वता, आपले अज्ञान, काही विशिष्ट क्षेत्रात असलेली आपली अक्षमता दाखवून देते. काहीही असो, ही प्रक्रिया नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वाचे असे पैलू उघडकीस आणते ज्यांकडे आपल्याला लक्ष लावणे अत्यावश्यक असते. म्हणूनच, आपल्या अपयाशांचा स्वीकार करणे हा आजही नम्रता आणि शहाणपणाचा मार्ग आहे. त्यांचा स्वीकार करा. त्यांशी सहमत व्हा. ज्यावेळेस इतर आपल्या अवतीभवती एखाद्या जबाबदार व्यक्तीचा शोध घेतात, तेव्हा आपण आपला हात वर केला आहे हे त्यांना दिसू द्या.

अशा वेदनादायक स्वीकारोक्तीसाठी लागणारे बळ, मोठ्या प्रमाणात, या विश्वासातून येते की अपयश हे देवाच्या सार्वभौम संकल्पाप्रमाणे आपल्या कल्याणासाठीच आहे. अपयशावांचून, पेत्र हा आत्मविश्वासी आणि स्वत: ची फसवणूक करत राहिला असता; तीच अवस्था आपलीही होईल. म्हणूनच, येशू आपल्या सार्वभौमत्वामध्ये, कधीकधी आपल्या लोकांना अपयशाच्या चाळणीतून जाऊ देतो (लूक २२:३१-३२). मात्र, तो त्यांना तिथेच सोडून देत नाही.

धडा शिकणे

पेत्राप्रमाणे जर आपणही हा डंक अनुभवला आणि त्यापासून पळून जाण्यास नकार दिला, तर अपयशाच्या पलीकडे आपल्याला एक भविष्य दिसून येईल. आपल्याला असेही आढळून येईल की अपयश हे अशा लोकांना, जे थांबून त्यांना सामोरे जातात आणि त्यांना सांगतात की आम्हाला शिकवा, हजारो धडे शिकवतात.

बऱ्याचदा, अपयशाद्वारे मिळणारा धडा शिकण्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी मी वर्तमान क्षणातील वेदनांना येवू देतो. असे अपयश मला आज ही दुःख देते. मला त्याची आज लाज वाटते. माझ्या चुकांना आज कबूल करण्याऐवजी मी स्वतःला सांत्वन देईल किंवा दुसरीकडे लक्ष लावील. पण असे करून मी हे विसरतो की, अशा अपयशाच्या वेळी बऱ्याचदा परमेश्वराच्या मनात उद्याचा येणारा दिवस असतो.

येशूने पेत्राला सांगितले,  “आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर” (लूक २२:३२). येशूला माहीत होते की जेव्हा पेत्र पुन्हा वळेल, तेव्हां तो रिक्त होईल आणि बरा होईल, आणि तो एक वेगळाच पेत्र होईल. त्या काळोखमय अंगणाबाहेर पेत्राचा आत्मविश्वास हा अनेक कडवट अश्रूंप्रमाणे ओघळून बाहेर आला. आणि पेत्राचे येशूवर असलेले प्रेम हे त्या गालीलाच्या समुद्र किनाऱ्यावर चमत्कारिकरित्या पकडलेल्या मासोळ्याप्रमाने वाढले. वर्तमान अपयशाने उद्याच्या पेत्राला ख्रिस्तामध्ये खूप भक्कम, खूप सावध, आणि स्वतः विषयी दक्ष असा प्रेषित बनवले. आणि हे फक्त यामुळेच की तो केवळ अपयशापासून शिकला.

आपल्या अपयशांशी रेंगाळत बसल्याने बरेचदा कलंकितपणाची भावना किंवा दोषभावना ताजी होऊन आपल्याला केवळ झपाटते. पण जर आपण त्या प्रसंगाकडे एकटेच आणि उघडपणे परतण्याऐवजी, आपल्या क्षमाशील प्रभूसोबत परतलो तर? आणि आपल्या अपयशांचा आढावा घेण्यास आपण त्याला उद्याच्या दृष्टीकोनातून जर मदत करण्यास सांगितले तर? तर आपल्याला असे आढळून येऊ शकते की चुका ह्या नम्र बनवतात, चुका ह्या परिपक्व बनवतात, पश्चाताप हा बुद्धिमान बनवतो, आत्म-अपुरेपणा हा ख्रिस्त-परिपूर्णता बनतो आणि अपयश विश्वासार्ह पायऱ्या बनतात.

नेतृत्व करत राहा

आपल्या चुका मान्य केल्यामुळे आणि त्यांच्याकडून आपण काय बनू शकतो हे शिकून घेतल्यामुळे, आपण कदाचित कल्पना करू शकतो की येशू आपल्याला तळापासून वर उचलतो, आपल्या डोळ्यांत पाहतो, आणि एक प्रश्न विचारतो व त्याचबरोबर एक पाचारणही देतो.

तो पेत्राला विचारतो, “तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” (योहान २१:१५–१७). अपयशाच्या आधी, पेत्राची प्रीती ही खरी पण उथळ होती; आता, जेव्हा त्याचा पुनरुत्थित झालेला तारणारा त्याला पुन: स्थापित करतो, तेव्हा त्याची प्रीती ही खरी आणि प्रगाढ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अपयश आपल्यासाठी ही असेच करू शकते—येशूच्या प्रेमाला सिद्धांतातून वास्तवात घेऊन जाणे, येशूवरील आपल्या प्रीतीला कमकुवततेपासून बळकटपणाकडे घेऊन जाणे.

म्हणून पेत्राला विचारलेला हा प्रश्न पेत्राला आणि आपल्यालाही, पुढील गोष्टीवर गांभीर्याने विचार करण्यांस प्रवृत्त करतो :  जर नेतृत्व हे प्रामुख्याने आपल्याबद्दल —आपल्या प्रशंसेसाठी, आपल्या सत्यापणाविषयी असेल—तर अपयश एकतर आपल्याला पळवून लावेल किंवा आपल्या अंतःकरणाला साखळदंडाने बांधून टाकेल. पण मग जर नेतृत्व सरतेशेवटी येशूविषयी—त्याच्या उपासनेसाठी, त्याच्या मौल्याविषयी असेल—तर आपण त्याच्याखातर स्वतःला पुन्हा असुरक्षित बनवू शकतो. होय, आम्ही अपयशी ठरलो आहोत. होय, आपण पुन्हा अपयशी होऊ शकतो आणि पतन पावल्याच्या वेदना पुन्हा आपल्याला जाणवतील. पण असे असताही आपण त्याच्यावर प्रीती करतो. आणि ही प्रीती ही अपयशाद्वारे घडविले जाण्यासाठी धोका पत्करू शकते.

शेवटी, आपल्याला हा प्रश्न विचारल्यानंतर, आता तो जे पाचरण आम्हीं खूप पूर्वी ऐकून त्याच्या मागे चालू लागतो होतो, त्याच पाचारणाला आपण पुन्हा प्रतिसाद द्यावा म्हणून तो आम्हाला बोलवतो आणि म्हणतो : “तू माझ्या मागे ये” (योहान २१:१९). येणाऱ्या पुढच्या उपदेशाची तयारी करा. पुढच्या होणाऱ्या मंडळीच्या बैठकीचे नियोजन करा. पुढील होणाऱ्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करा. आणि कृपेच्या चमत्काराने, नेतृत्व करत रहा.

लेख

स्कॉट हबर्ड

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *