संगोपनाच्या पद्धतीत तीन सूक्ष्म, परंतु महत्त्वाचे बदल
माझी पत्नी ज्युलिया आणि मला आई-वडील म्हणून 19 ते 8 वयोगटातील पाच मुलांनिशी जवळजवळ दोन दशके उलटली आहेत. ह्यात जेव्हा तुम्ही आणखी दोन कुत्री, दोन मांजरी आणि एक “अलेक्सा” ह्यांचा समावेश करता, तेव्हा स्वयंपाकघर अनेकदा प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना आहार देत असल्यासारखे किंवा एखाद्ये नाईट क्लब असल्यासारखे वाटते. असे असले तरीही, व्यस्त आणि बऱ्याचदा हल्लकल्लोळाने भरलेल्या ह्या ठिकाणी ज्याला आम्ही घर म्हणतो, मी आणि ज्युलियाने एक अंतर्निहित शांतीचा प्रवाह अनुभवला आणि गठवला आहे.
अनेक वर्षांपूर्वी आम्हाला हे कळून आले की, आपल्या मुलांना भावी विश्वासयोग्यतेसाठी तयार करण्यांस जे काही करता येईल ते करणे योग्य आणि शहाणपणाचे असले तरी, ते पुढे काय बनतील हे शेवटी आपल्या नियंत्रणात नसते. ज्या प्रकारच्या घरगुती वातावरणात त्यांचे पालन-पोषण केले जाते, त्यासाठी आपण जबाबदार असतो, ते प्रौढ झाल्यावर काय बनतील याबाबत नाही. पुढे काय होईल ह्याविषयी असलेले अनिश्चित परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी वर्तमान स्थितीत देवाने आम्हाला पालक म्हणून दिलेल्या पाचारणावर लक्ष केंद्रित करून आम्हाला मोठे समाधान मिळाले आहे.
जवळपास पंधरा वर्षे झाली असली तरी, ह्या नव्या दृष्टीकोनामुळे आमच्या गृहजीवनाविषयी असलेल्या विचारसरणीत कश्या प्रकारे बदल झाला हे मला ठळकपणे आठवते. लवकरच आमची चर्चा आपली लेकरे कोणकोणत्या गोष्टीं करत नाहीत (म्हणजे ते काय साध्य करत नव्हते किंवा कसे वागत नव्हते ज्यावर आम्ही सहसा अधिक जोर देत असतो) याकडून वळून ती पालक म्हणून आम्ही काय केले पाहिजे, यावर केंद्रींत झाली. सांगण्यास हे विचित्र वाटेल, परंतु आमच्या पालकत्वाविषयीचे विचार हे शेवटी पालकपणावरच केंद्रित होऊ लागले!
आमच्या विचारांमध्ये झालेल्या ह्या परिवर्तानाबरोबरच, ह्या नवीन दृष्टिकोनामुळे आमच्या पालकत्वाच्या पद्धतीमध्ये लक्षणीय बदल झाला. आमच्या घराचे वातावरण कसे आहे याचे प्रामाणिक मूल्यमापन केल्यानंतर, आम्हाला स्पष्टपणे कळून आले की आम्हाला ह्याविषयी भरपूर सुधारणा करायची होती. आम्ही अशा शास्त्रवचनांची कापणी केली जी एकतर पालकत्व किंवा कुटुंबाशी सुसंगत होती आणि मग आम्हाला नीतिसूत्रे 22:6 मिळाले:
मुलाने ज्या मार्गात चालावे त्यात त्याला प्रशिक्षित कर, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. (मूळ शाब्दिक भाषांतर)
तीन सूक्ष्म, परंतु महत्त्वाचे बदल
जरी हे वचन आम्हाला परिचित होते, तरी वस्तुस्थिती ही अधिक वेगळी होती. खरं तर, पालक म्हणून जर ह्या वचनाचा अनुवाद करावा लागला असता तर ते असे झाले असते, “ज्या मार्गाने मुलाने जाऊ नये त्याविषयी त्याला सांगा, आणि वृद्धपणीही तो त्याचे पालन करेल.” तुम्हाला हे माहित आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक उत्तम मार्ग आणि एक चांगली बातमी आहे: जी आंतरिक शांती आता आम्ही अनुभवत आहोत ती आमच्या पालकत्वाच्या पद्धतीमध्ये जे तीन बदल घडून आले त्यांशी थेट निगडीत आहे, जे खालील प्रमाणे आहेत:
- प्रशिक्षित करा, नुसते सांगू नका.
- ज्या मार्गात चालावे, ना की ज्या मार्गात चालू नये.
- वृद्धपणीही, तरुणपणीच नाही
हे सांगणे महत्वाचे आहे की, मूळ इब्री भाषेमध्ये ह्या वचनाला समजण्यास थोडा कठीणपणा असला तरी, हे तीन बदल फक्त ह्या वचनापुरतेच मर्यादित नाहीत. दीर्घकालीन परिणामाच्या दृष्टिकोनातून, आपल्या मुलांनी ज्या मार्गात चालावे त्या मार्गाचे त्यांना शिक्षण देण्याच्या आवाहनाचा पालकांनी निःसंकोचपणे स्वीकार केला पाहिजे, कारण ह्या बायबलमधील प्रस्थापित संकल्पना आहेत ज्यांना ह्या वचनाच्या पलीकडे ही व्यापक असा पाठिंबा आहे. आम्हाला नीतिसूत्रे 22:6 योग्य वाटले, कारण ते या तीन सुज्ञपणाच्या बदलांना सुंदर आणि संक्षिप्तपणे दृष्टीपथात आणते.
प्रशिक्षित करा, नुसते सांगू नका
आमच्या पालकत्वाच्या पद्धतीत पहिला बदल म्हणजे केवळ मार्ग दाखवणारे वर्णक म्हणून नव्हे तर त्या मार्गात कसे चालावे याचे प्रशिक्षक म्हणून आमची भूमिका स्वीकारणे हा होता. आम्हाला आमची फक्त वक्ते म्हणून सांगून दाखवण्याची वृत्ती, की “मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे”, किंवा “मला तुम्हाला तेच ते किती वेळा सांगावे लागेल”, ह्या वाक्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आली.
“पालकत्वाच्या पद्धतीत पहिला बदल हा प्रशिक्षक म्हणून आमची भूमिका स्वीकारणे होता, केवळ सांगून दाखवणारे हा नव्हता.”
तसं सांगायचं तर, हे खरे आहे की आम्ही त्यांना वारंवार ह्याच गोष्टी सांगितल्या होत्या. जो बदल झाला तो म्हणजे अश्या परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याच्या आमच्या पद्धतीमध्ये. फक्त सांगून दाखवणारे वर्णक म्हणून, एक काळ असा होता की ज्यामध्ये ते आमचे ऐकत नसल्यामुळे आमची चिडचिड व्हायची, परंतु प्रशिक्षक म्हणून त्यांच्या मनांना आणि हृदयांना चालना देण्यासाठी आम्ही सर्जनशील मार्ग शोधायला शिकलो. आम्हाला असे आढळले की ज्या गोष्टींना आम्ही लगेचच आज्ञाभंग किंवा उदासीनता असे नाव दिले होते त्यापैकी बहुतेक (सर्वच नाही, परंतु निश्चितपणे बहुतेक) गोष्टीं ह्या फक्त सांगून दाखवणारे वर्णक म्हणून आमच्या थोड्या अधिक प्रयत्नांच्या मोठ्या दुष्परिणामामुळे होत्या.
ख्रिस्ती पालक ह्या नात्याने, प्रशिक्षण देण्याचा हा दृष्टीकोन आमच्यासाठी जरी नवीन होता, तरी, या पद्धतीचा आदर्श येशूचे जीवन आणि सेवा यांद्वारे ठोसपणे स्थापित करण्यांत आलेला होता. उदाहरणार्थ, येशूने कसे आपल्या शिष्यांस प्रार्थना करण्यांस शिकविले, ह्याचा विचार करा. त्याने त्यांना फक्त “प्रार्थना करा” एवढेच सांगितले नाही आणि नंतर त्यांनी प्रार्थना केली नाही म्हणून वारंवार त्यांचा मानभंग केला नाही. त्याऐवजी, एक प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रार्थनेचे आदर्शमय जीवन त्याने प्रस्तुत केले (मार्क 1:35); लूक 5:6), आपण प्रार्थना का करतो हे त्यांना शिकविले (मत्तय 7:7-11 ; मार्क 9:29), त्यांनी प्रार्थना कशी करावी हे दाखवून दिले (लूक 11:2-4), आणि नंतर त्यांनी तसेच करत राहावे ह्याकडे देखील लक्ष दिले (लूक 18:1). जर आपण आपल्या ह्या फक्त सांगून दाखवण्याच्या मनस्थितीला बदलून तिला अशा प्रकारच्या प्रशिक्षण-पद्धतीचे स्वरूप दिले तर आपल्या कुटुंबावर ह्याचा काय परिणाम होईल याची कल्पना करा.
ह्या एका परिवर्तनाचा परिणाम म्हणून, आम्ही प्रामुख्याने आमच्या मुलांप्रती त्यांच्या वर्तणुकीला प्रतिक्रिया देण्याचे थांबवून त्यांच्याशी संभाषण करण्यास सुरवात केली. एवढेच नाही तर, मुलांना ज्या गोष्टींविषयी आम्ही अद्याप शिकविले नव्हते त्याविषयी आपण त्यांना शिस्त लावू नये असा निर्णय आम्ही घेतला. आम्ही मान्य करतो की, ह्या निर्णयाचा परिणाम काही वेळा सार्वजनिक ठिकाणी अडचणीत टाकणाऱ्या (लाजिरवाणे) प्रसंगाना सामोरे जावे लागले, जेव्हा आम्ही आमच्या लहान मुलांचे विचित्र वागणे पाहून एकमेकांकडे डोळे टवकारून जणू असे म्हणायचो की, “आम्ही त्यांना ह्याविषयी घरी कसे शिकवले नाही!” ज्यावेळेस आम्ही प्रशिक्षण देण्याकडे लक्ष वळविले, त्यावेळेस आमच्या मुलांसाठी ह्यामध्ये अंतर्निहित असणारा संदेश, की तुमच्या परिपक्वतेच्या वाढीच्या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठी आहोत, अगदी सुस्पष्ट होता.
ज्या मार्गात चालावे, ना की ज्या मार्गात चालू नये
लहान मूल बालपणापासून ज्या पहिल्या शब्दाला बोलायला शिकते त्यापैकी एक म्हणजे नाही हा शब्द, आणि ह्याविषयी आश्चर्य वाटायला नको. दुर्दैवाने, अनेक कुटुंबामध्ये मुलांनी काय करू नये हे आई-वडील त्यांना वारंवार सांगत असतात. अनेक प्रसंगी, मी प्रौढ मुलांच्या वडिलांसोबत त्यांच्या मुलांच्या निर्णयांवर अश्रू ढाळतांना आणि हे बोलताना ऐकले की, “मला हेच समजत नाही; बघितले आहे; आम्हीं संगोपन करतांना त्यांनी ‘काय करू नये’ हे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते.” दुर्दैवाने, प्रेषित पौलाच्या मते, आपल्या मुलांना केवळ करू नका अश्या प्रकारे शिक्षण देत त्यांचे संगोपन करणे हे त्यांच्या चांगल्या भवितव्याविषयी योग्य ठरणार नाही (कलस्सै 2:21-23).
मुलाने (मूल्ये, बुद्धिमत्ता, किंवा वर्तन यांच्या दृष्टीने) ज्या मार्गात चालावे त्यात त्याला प्रशिक्षित कर, हे ध्येय शब्दाविद्येच्या पलीकडे आहे. हा पालकत्वाचा असा मार्ग आहे जो आपल्या स्वर्गीय पित्याचे अंत:करण प्रतिबिंबित करतो, एक असे अंत:करण ज्याचा माग एदेन बागेपर्यंत घेतला जाऊ शकतो. जशी की आज एक प्रचलित धारणा आहे, देवाचे प्राथमिक शब्द, “त्या झाडाचे फळ खाऊ नका” हे नव्हते. तर ह्यापूर्वी की देवाने त्यांना ‘नाही’ हा गंभीर शब्द दिला, त्याने प्रथम ह्या शब्दापेक्षा ही मोठा शब्द होय दिला: “तू बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा.” (उत्पत्ती 2:16). आपला स्वर्गीय पिता आपण कोणत्या मार्गाने जावे हे स्पष्ट करतो जेणेकरुन जेव्हा तो नाही म्हणतो (ज्यास तो म्हणतोच), तेव्हा आपण हा विश्वास बाळगू शकतो की हे आपल्याला जीवनापासून वंचित करण्यासाठी नाही तर आपल्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी आहे.
एका सकारात्मक ध्येयावर संकल्पपूर्वक अश्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्याच्या सूक्ष्म बदलामुळे आम्हाला एक मोठे कौटुंबिक ‘होय’ ओळखता आले : “द ब्रॅडनर फॅमिली क्रीड (The Bradner Family Creed)”. आमच्या ह्या मतांगीकाराने (जो शेवटी दिलेला आहे) सात मूल्यांवर प्रकाश टाकला आहे ज्यांविषयी आम्ही एक कुटुंब म्हणून पाठपुरावा करण्यास वचनबद्ध झालो. ह्या मतांगीकाराला प्रस्थापित आणि लागू करून, ह्या मतांगीकारानुसार असणाऱ्या कुटुंबाचा आदर्श, शिक्षण आणि आनंद साजरा करण्याच्या मार्गांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आम्ही आमची भूमिका समजत सतत शोध घेत राहिलो. सोळा वर्षांनंतर, आम्ही पुष्टी करू शकतो की मुलांना सतत नाही म्हणण्यापेक्षा तुमच्या उर्जेचा आणि प्रयत्नाचा आनंद हा कुटुंबासाठी होय सांगण्यात अधिक आहे.
वृद्धपणीही, तरुणपणीच नाही
वचन 6 च्या शेवटच्या भागात अंतिम बदल दिसून येतो: “म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” आमच्या मुलांची प्रौढ म्हणून कल्पना केल्याने आम्हाला आमच्या पालकत्वाविषयीचा दीर्घकालीनपणा समजण्यास मदत झाली. वर्तमान समयाशी झुंज नकळतपणे जिंकण्यापेक्षा युद्ध हरण्याच्या धोक्यापासून हे आपल्याला सुरक्षा प्रदान करते. आम्हाला आपले पालकत्व आता अशा प्रकारे निभावायचे आहे की ज्यावेळेस आमच्या मुलांना आमच्याशी संवाद साधण्याची गरज वाटत नाही अशा वेळीही त्यांनी आमच्याशी संलग्न व्हावे.
“आम्हाला आपले पालकत्व अशा प्रकारे निभावायचे आहे की ज्यावेळेस आमच्या मुलांना आमच्याशी संवाद साधण्याची गरज वाटत नाही अशा वेळीही त्यांनी आमच्याशी संलग्न व्हावे.”
हे ध्येय आणि अपेक्षित परिणाम यांसाठी दशकांचा काळ लागू शकतो, परंतु ह्याची सुरवात मात्र आपली मुले आता लहान असतानाच होते. एक असे वातावरण निर्माण करण्यासाठी की जेथें त्यांना वारंवार परत यायला आवडेल, आम्हाला ते त्यांचा स्वतःचा स्वतंत्र संसार थाटेपर्यंत वाट बघत बसायचे नव्हते. आमच्यातील ह्या उत्कंठेने त्यांच्याबरोबर आमच्या संवाद शैलीला आकार दिला—विशेष करून अशा गोष्टींच्या बाबतीत ज्या त्यांनी अधिक अगर कमी लक्ष्य देऊन ऐकल्या पाहिजेत असे आम्हाला वाटायचे. जर आमच्या मुलांनी आम्हांला, “मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे . . .” असे बोलतांना ऐकून घ्यायचे होते, तर आमची अशी आशा असायची की त्यांनी ते काहीतरी अश्या रीतीने समजावे, “. . . मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि तुझा पालक होण्याचा मला एक बहुमान वाटतो?” हे असे शब्द आहेत ज्यांना आपण सर्वाधिक ऐकू इच्छितो.
हे वाचल्यावर काहीजण असा निष्कर्ष काढतील की आम्ही पालकाचे नाही तर यारी-दोस्तीचे संबंध जोपासले आहेत. नाही, आम्ही आमच्या सुधारणूक करण्याच्या आणि उपदेश करण्याच्या अधिकाराकडे आणि जबाबदारीकडे दुर्लक्ष केलेले नाही. आम्ही आयुष्यभरासाठी संकल्पपूर्वक अशा प्रकारच्या सेवेसाठी स्वतःला स्थान देण्याचे ध्येय ठेवत आहोत. अश्या ह्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला हेनरी ड्रमंड ह्यांनी चांगल्या रीतीने स्पष्ट केले आहे: “तुम्हाला असे कळून येईल की जे लोक तुमच्यावर अधिकार दाखवतात तेच लोक तुमच्यावर विश्वास देखील दाखवतात.”
ह्या दीर्घकालीन कर्तव्याच्या अंमलबजावणीत, ज्या गोष्टींना त्यांनी कमी लक्ष्य देऊन ऐकायचे होते त्यालाही आकार मिळाला. जरी एक अशी तापट प्रतिक्रिया की, “एक घराणे म्हणून आम्ही जे मानतो/जे विचार करतो/जसे वागतो ह्याला तुमची अशी वागणूक शोभत नाही” काही मिनिटे वाचवू शकते, परंतु असे करणे हे दीर्घकाळासाठी पालकत्वाला हानी पोहचवते. ज्या मुलांना—त्यांच्याशी जाणीवपूर्वक संभाषण न करता—फक्त विचार कसा करावा आणि कशावर विश्वास ठेवावा, असे नेहमी सांगितले जाते शेवटी ते अश्या विषयांमध्ये रस घेणे थांबवतात. ह्या उलट ख्रिस्ती पालक म्हणून योग्य ते शिकवण्याचा विशेषाधिकार असला तरी, ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण त्या अधिकाराचा उपयोग मूर्खासारखा केला पाहिजे ज्याला, “समंजसपणात संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे ते प्रकट करण्यातच त्याला संतोष वाटतो.” (नीती. 18:2).
“तुला असे का वाटते ह्या बद्दल मला आणखी ऐकायला आवडेल” अशा प्रतिक्रियेच्या परिणामासाठी थोडा काळ लागू शकतो, परंतु भावी वर्षांमध्ये ते खूप मोठे फळ उत्पन्न करेल. मला खात्री आहे की आमची प्रौढ मुले आज आमच्या विचारांना आणि दृष्टीकोनाला अधिक महत्त्व ह्या कारणासाठी देतात कारण की त्यांचे पालन-पोषण अशा घरात झालेले आहे जिथे त्यांच्या विचारांना महत्त्व देण्यात आले होते.
आमची सर्वोत्तम गुंतवणूक
मागे वळून पाहताना, पालकत्वाच्या पद्धतीत ह्या तीन परिवर्तनाच्या परिणामांचे मोजमाप करणे हे जवळजवळ अशक्य आहे, परंतु ते खूप व्यापक आहेत. पालकत्व करणे कठीण कार्य आहे, आणि त्याचप्रमाणे बालक होणे हे देखील कठीण आहे. आज आपली मुलं मोठी होऊन काय बनतील ह्याची चिंता न करता, त्यांच्यासाठी परमेश्वराचा मान राखण्यासाठी आणि जीवनदायी वातावरण निर्माण करण्यासाठी आपली सर्वोत्तम ऊर्जा आताच देऊ करूया. बऱ्याच वेळा दृष्टीकोनातील अत्यंत परिवर्तनशील, चिरस्थायी परिणाम हे काही सूक्ष्म परंतु महत्त्वपूर्ण बदलांचे परिणाम असतात.
ब्रॅडनर-रचित कौटुंबिक मतांगीकार (The Bradner Family Creed : रचना. 2006)
आम्ही देवाचा सन्मान करतो.
प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे.
आम्ही खूप आभारी आहोत.
आम्ही “निरर्थक शब्द” बोलत नाही.
मी तुम्हाला मदत करू शकतो का?
आम्ही आपले सर्वस्व देऊ.
आम्ही आनंद करतो!
लेखक
मॅट ब्रॅडनर