अलीकडेच, आमच्या एका प्रिय कुटुंबासोबत आम्ही राहत असताना, त्यांचा गर्भपात झाला. जिचा गर्भपात झाला होता तिचे पहिले तीन महिने हे नुकतेच पूर्ण झाले होते. ज्या सहाव्या बाळाला, जो दुसरा मुलगा होता, ज्यावर त्यांचे मनापासून प्रेम होते, ते बघू शकले नाही. या दुःखामुळे त्या कुटुंबाने बराच काळ शोक केला.

आता, गर्भपाताच्या गुप्त आणि सामान्य दु:खाबद्दल किंवा ज्यावेळेस मी त्या संपूर्ण  कुटुंबाला आपल्या गमावलेल्या बाळाबद्दल होणाऱ्या दु:खाला पाहात होतो, त्यावेळेस मी काय शिकलो, याबद्दल मी खूप काही बोलू शकतो (आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात ही अशाच एका दु:खातून आम्हाला जावे लागले होते). पण अशा वेळेस ज्या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम झाला ती होती त्या दु:खी कुटुंबासोबत असलेली मंडळीची सहभागिता आणि प्रेम. त्या आठवड्यात आम्ही त्यांच्यासोबत असल्याने, आम्हाला इतरांपेक्षा अधिक जवळून हे सर्व पाहता आले.

एखाद्या गोष्टीविषयी ओढ निर्माण होण्यासाठी आणि चांगल्या रीतीने ऐकण्याविषयी आपले कान हे प्रथम येतात. मग लवकर पोहोचण्यासाठी आणि एखादे काम करण्यासाठी आपले पाय पण फारसे मागे राहात नाही. आणि त्यानंतर फुले आणि मुलांसाठी स्टारबक्सचे पेय आणि डोनट्स घेत आणि आपल्या कुटुंबाला कवेत घेण्यासाठी आपले हात. मग आपल्या आवडीच्या स्वादिष्ट भोजनासाठी आपले नाक, मग नेहमीपेक्षा कमी तसेच हिम्मत आणि आशा देणाऱ्या अर्थभरित शब्दांसह आपले तोंड, आणि इतर बाकीच्या गोष्टीवर नजर ठेवण्यास अश्रूंनी भरलेले आपले डोळे येतात.

दुःखाचे शेकडो मार्ग

आम्ही अनुभवलेल्या त्या खऱ्या प्रेमाने त्या असामान्य असलेल्या मंडळीमधील सखोल एकात्मता उघड केली, परंतु त्या प्रेमाचे प्रदर्शन हे एकसारखेच होते. काही जण दुःख कळताच त्वरित धावून आले; काही दुसऱ्या दिवशी आले; काही एका आठवड्या नंतर आले. काही फक्त काही मिनिटांसाठी थांबले; काही लोक हे बराच काळ तिथे राहिले. कुटुंबाला आधार मिळावा म्हणून काहींनी पत्रे लिहिली. काहींनी जेवणाची व्यवस्था केली; काहींनी चहा-पाण्याची व्यवस्था केली. त्यापैकी बहुतेकांनी त्यांच्याबरोबर विलाप केला.

हे सर्व असाधारण आणि हृदयद्रावक पण त्याच बरोबर सुंदर कसे होते, याचे वर्णन करणे कठीण आहे. अशा प्रकारच्या दु:खदायी परिस्थितीत एकमेकांसोबत कसे उभे राहावे आणि एकमेकांना कसे सांभाळावे हे ती संपूर्ण  मंडळीने जाणले होते. तर मग हे अनोखे आणि जगावेगळे प्रेम कुठून येते? ते अशाच अनोख्या आणि निस्वार्थी लोकांकडून येते.

माझ्या कुटुंबाने अनुभवलेल्या प्रेमापेक्षा प्रेषित पौलाने एका निराळ्या प्रेमाचा अनुभव घेतला. तो करिंथ येथील मंडळीला लिहितो,

बंधूंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो; ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. (2 करिंथ 8:1-2)

हा प्रेषित येरुशलेममधील भयंकर संकटात सापडलेल्या मंडळीच्या अत्यंत गरजा भागवण्यासाठी करिंथ येथील विश्वासणाऱ्यांना आवाहन करत आहे. तो त्यांना दु:ख भोगत असलेल्यांसाठी, जरी ते आठशे मैलावर असले तरी, मदत करण्यासाठी आवाहन करत आहे. त्यांच्या औदार्याला प्रेरित करण्यासाठी, संकटात पडलेल्या मंडळीसाठी देव काय करू शकतो हे तो त्यांना समजावून सांगत होता.

अनपेक्षित मदत आणि औदार्य

मासेदोनियातील मंडळी ही जगाच्या रीतीनुसार सुस्थितीत नव्हती. त्यांचे कष्ट व वेदना ह्यांमुळे ते दु:खी होते. आणि हे दु:ख फक्त हलक्या स्वरूपाचे नव्हते, तर पौल म्हणतो, तर ते अत्यंत बिकट  असे दु:ख होते—असे दु:ख ज्याचा आघात खोलवर होतो, ज्याची दाहकता तीव्र असते आणि जे दीर्घकाळ टिकते. आणि अशा या भयंकर दु:खात आणखी भयावह आणि अस्वस्थ करणारी गोष्ट होती, त्यांच्याकडे असलेली पैशांची कमतरता. ही काही सामान्य दरिद्रता नव्हती; ती अत्यंत बिकट  अशी दरिद्रता होती, त्यांच्यापैकी काहींनी खोलवर गेलेल्या डोळ्यांनी ही अशा करता की उद्याचा येणारा दिवस हा कदाचित वेगळा राहील, आपल्या भुकेल्या मुलांना अंथरुणावर झोपवले असेल. तुम्ही त्यांच्या आई-वडिलांनी अश्रू गाळत आणि भुकेमुळे झालेल्या पोटदुखीमुळे केलेली विनंती, “प्रभु, आमची रोजची भाकर आज आम्हास दे,” ऐकू शकता काय? तरीही, संकटाच्या अशा वादळात आणि टंचाईग्रस्त स्थितीत, आपल्याला एक पुढे आलेला हात, अंधारावर मात करणारा एक तेजस्वी उजेड, एकविपुल  औदार्यसंपदा दिसून येते. आणि त्या पुढे आलेल्या हाताच्या समवेत आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे  अशा स्थितीतही असलेले एक स्मित हास्य—एक असंभव असे स्मित हास्य, खरच! एक आत्यंतिक आनंद.  ऐहिक धन-संपत्ती नसलेल्या लोकांना इतरांसाठी धनवान होण्याचा मार्ग हा देवाबरोबर मिळाला होता. जे लोक स्वतःच्या गरजांच्या ओझ्याखाली दबलेले होते त्यांकडे इतर लोकांच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे होते.

जर असे हे अत्यंत पीडित आणि गंभीर गरजू लोक दुःखाप्रत अशी वाटचाल करू शकतात, तर थोडक्या रीतीने पीडित आणि क्वचित भुकेल्यांविषयी काय? अश्या प्रकारची अप्रत्यक्षित मदत आणि औदार्य कशामुळे उत्तेजित होते, आपण याला कसे प्राप्त करू आणि अनुभवू शकतो? यापूर्वी की आपण आपला हात आखूड करावा, सर्वप्रथम आपण देवाकडे पाहावे.

देवाकडे वाटचाल करणारे

जे लोक दुःखमय परिस्थिती आल्यावर ही त्या दुःखातून जातात—अगदी घोर पीडेतून, अगदी दारिद्र्यातही, आणि जरी सर्व लोकांना असे वाटते की हे लोक स्वार्थी आहेत—हे ते लोक आहेत जे देवाच्या दिशेने वाटचाल करण्यास तयार असतात. पौल पुढे म्हणतो,

कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी; आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले. (2 करिंथ 8:3 5)

मासेदोनियातील संत हे फक्त ईच्छेनुरूप मदत करायलाच तयार नव्हते, तर त्यासाठी ते इतरांकडे ही मदतीसाठी हाथ फैलावत होते. त्यांनी त्यागवृत्तीचा हा जो संतोष आणि आनंद चाखला होता (प्रेषितांची कृत्ये 20:35 पहा) त्याला संघर्ष केल्याशिवाय ते सोडणारे नव्हते. या स्थितीत ते कसे पोहचलेत? अशा प्रकारच्या आनंददायक निस्वार्थीपणाकडे त्यांना कोणता मार्ग घेऊन आला? “तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले.” त्यांनी त्यांच्या शक्तीपलीकडेही, अपेक्षेपेक्षा अधिक दिले, कारण त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले होते.

“एक उदार असलेले असामान्य जीवन हे नेहमीच देवाच्या दिशेने असामान्य वाटचाल करणारे असते.”

त्यांनी अधिक चांगल्या, अधिक सूखदायक परिस्थितीच्या आशेवर भरोसा ठेवला नाही. अनिश्चित असलेल्या संपत्तीचा मोह त्यांना झाला नाही. नाही! त्याचे मन हे देवावर जडलेले होते. आणि देवावर जडलेले मन हे संपत्ती, गरिबी, जोखीम, त्याग  आणि सुरक्षा या शब्दांचा अर्थ वेगळ्या प्रकारे लावायला शिकते. ज्या अर्थी त्यांनी त्यांच्या ऐहिक संपत्तीचा त्याग केला होता, त्या अर्थी जी संपत्ती नव्हती त्याविषयी ते अडखळले (1 तीमथ्य 6:18-19). एक उदार असलेले असामान्य जीवन हे नेहमीच देवाच्या दिशेने असामान्य वाटचाल करणारे असते.

विपुलता आणि गरज ह्यांची एकता

तथापि, विश्वसनीय ख्रिस्ती धर्म हा फक्त देव आणि मनुष्य असा नसतो, तर प्रथम देव आणि त्या नंतर  मनुष्य असा असतो. “तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि  देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले.” देवाचा आनंद घेण्याच्या मधुरपणाने मासेदोनियातील लोकांना त्यांच्या सभोवतालच्या दु:खात आणि कमतरतेत (या प्रकरणात, येरुशलेम येथील मंडळीसाठी) धैर्याने पुढे पाऊल टाकण्यास प्रवृत्त केले.

आपल्यापैकी काही लोकांना देवापासून सुरुवात करण्याविषयीची आठवण करून द्यावी लागते. तर काहींना फक्त देवाच्या सहवासातच राहण्याच्या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि गरजांकडे लक्ष पुरविण्यासाठी नियमितपणे आणि व्यावहारिक स्वरूपाने प्रोत्साहित करणे आवश्यक असते. देव विपुलता आणि गरजा ह्यांना मंडळीमध्ये कश्याप्रकारे एकत्र आणतो, याकडे लक्ष द्या:

दुसर्‍यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही. तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी, आणि पुढे त्यांच्या वैपुल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. “ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही,” असे शास्त्रात लिहिले आहे.” (2 करिंथ 8:13-15)

देवाने खऱ्या असलेल्या विपुलतेला आणि खऱ्या गरजांना जगात कुठेही असणाऱ्या मंडळीमध्ये—तुमच्या मंडळीमध्ये—एकत्रित केले आहे. गरजांप्रमाणेच, विपुलता ही विविध प्रकारांमध्ये, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या लोकांकडे येते. काही वेळेस, तुम्ही खासकरून गरजवंत असता आणि काही वेळेस तुमच्या गरजा या पुरविल्या जातात. ज्या प्रकारे इतरांना गरज भासत नाही त्यावेळेस तुम्हास गरज भासते आणि ज्यावेळेस इतरांकडे अभाव असतो तुम्ही श्रीमंत असता. आणि असे हे एकीकरण अधिक मोठ्या प्रेमाची छाया आहे, जेव्हा अमर्याद विपुलतेच्या देवाला आपल्याला खरोखर श्रीमंत बनवण्याची गरज भासली: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.” (2 करिंथ. 8:9).

पौल म्हणतो, स्थानिक मंडळीमधील हे प्रेम ओसाड प्रदेशात देवाच्या लोकांना जगवणाऱ्या मान्नासारखे—ज्याला देव आकाशातून पडण्याऐवजी, आता ख्रिस्ताच्या देहाद्वारे, स्थानिक मंडळीद्वारे—विशेषकरून, तुमच्या-आमच्याद्वारे देतो, असले पाहिजे.

प्रत्येक चांगल्या कामासाठी

पौल ज्या प्रकारच्या उदारतेला मनात बाळगून आहे ती फक्त आर्थिक नाही. खरं तर, मंडळीमध्ये असणारी ही उदारता बहुतांशी आर्थिक स्वरूपाचीच नसते. ती निश्चितपणे मौल्यवान आहे, परंतु बऱ्याचअर्थी डॉलर्स आणि रुपयांप्रमाणे नाही. मंडळीसाठी असणाऱ्या ओझ्याविषयी प्रेषितांचा कल बघा:

हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी  सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे. (2 करिंथ 9:6-8)

“तुम्ही कोणीही असले, आणि तुमच्याकडे किती ही असले तरी देव तुम्हाला इतरांना देण्यासाठी, विशेषत: गरजूंना पुरेल इतके देतो.”

प्रत्येकचांगल्या कामासाठीम्हणजे फक्त येरुशलेमेस वितरीत केलेले पैसेच नव्हे, तर घरगुती अन्न पुरवणे, प्रोत्साहनपर पत्रे पाठवणे आणि अनपेक्षित फोन कॉल्स करणे, काळजी करणारे विचार व्यक्त करणे, दुःखाच्या स्थितीत भेट घेणे हे होय. तुम्ही कोणीही असले, आणि तुमच्याकडे कितीही असले तरी देव तुम्हाला इतरांना देण्यासाठी, विशेषत: गरजूंना पुरेल इतके देतो. म्हणून जे दुःखाच्या स्थितीत आहेत त्याच्या निवारणासाठी मार्ग शोधा. कोणीतरी त्यांच्याकडे लक्ष देईल असे गृहीत धरून चालू नका. असा समज करू नका की कोणीतरी अन्न पुरवेल. असाही समज करू नका की ते खूप साऱ्या संदेशांमुळे आणि भेटींमुळे भारावून गेले असतील. जेव्हा परीक्षा येते—म्हणजे आजारपण येते, नोकरी जाते, विवाह संपुष्टात येतो, प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो—तेव्हा हे समजून घ्या की, देव तुमच्याद्वारे अशा स्थितीतून जाणाऱ्या लोकांच्या अनेक गरजांपैकी एक पूर्ण करण्याची योजना आखत आहे.

लेखक

मार्शल सेगल

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *