पित्यांसाठी एक वचनीय दृष्टीकोन
बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. (इफि. 6:4)
“आपल्या मुलांना चिडीस आणू नका”—पित्यांना दिलेल्या या नकारात्मक आज्ञेनंतर— ई.एस.व्ही पवित्र शास्त्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे, पौल सकारात्मक ख्रिस्ती पालकत्वाच्या दृष्टीकोन घेऊन, “शिस्त आणि शिक्षण”, या दोन मुख्य शब्दांवर प्रकाश टाकतो. या शब्दांसाठी वापरले गेलेले मूळ ग्रीक शब्द नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत आणि त्यांची भाषांतरेही विविध प्रकारे केली गेली आहेत. या शब्दांना आपण प्रशिक्षण आणि सल्ला ह्या अर्थाने आणखी चांगल्या रीतीने समजू शकतो—ज्यामुळे आमच्या पालकत्वाच्या व्यावहारिक उपयोगाला आणि स्पष्टतेला समजायला मदत मिळू शकते.
ह्या दोन्ही ही संकल्पनांपैकी पहिली संकल्पना ही, “शिस्त” किंवा “प्रशिक्षण” (पायडाया) (paideia) आहे, जी व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. ही संकल्पना मुख्यत्वेकरून बालपणापासून ते प्रौढपणापर्यंतच्या संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेशी आणि मुलाला प्रौढत्वासाठी प्रशिक्षित करण्यासाठी लागणाऱ्या वर्षासाठी उद्दिष्ट, आरंभ, सामर्थ्य आणि पाठबळ या सर्वांचा यात समावेश आहे. म्हणजेच, ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, जसे ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण, परंतु यात त्याहूनही अधिक गोष्टी पणाला लागलेल्या असतात.
शरीर आणि आत्मा—ह्यांच्या प्रशिक्षणासाठी आपण फक्त शाळेतील मर्यादित प्रशिक्षणावर नव्हे तर संपूर्ण आयुष्यभराचे प्रशिक्षण म्हणून विचार करू शकतो. एस. एम. बॉ सांगतात की, ग्रीक संस्कृतीत युवकांना विविध विषयांमध्ये आणि शाखांमध्ये प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी “पायडाया” ( paideia) ह्या शब्दाची समृद्ध सांस्कृतिक संलग्नता आहे (इफिसियन पृष्ठ, 509–10). अशा प्रकारच्या पितृत्वाच्या प्रशिक्षणात फक्त शब्दच नाही तर उदाहरण आणि अनुकरण ह्यांचाही समावेश होतो.
परिपक्वतेच्या दिशेने प्रशिक्षण देणे
जीवनासाठी असेच सर्वसमावेशक प्रशिक्षण हे मोशेला मिळाले जेव्हा त्याला “मिसर देशाच्या लोकांच्या सर्व विद्यांचे” शिक्षण दिले गेले, ज्यामुळे कालांतराने “तो भाषणात व कृतीत पराक्रमी” झाला (प्रेषितांची कृत्ये 7:22). पौलाला ही तार्स या नगरात “गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा” होत असतांना वर्षानुवर्षे हेच “शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले” (प्रेषितांची कृत्ये 22:3). निरोगी प्रौढत्वासाठी विस्तारपूर्वक तयारी म्हणून संपूर्ण जीवनभराचे हे प्रशिक्षण, ज्यात आपल्या मुलांना न केवळ बाह्य व्यक्तित्व आणि वर्तणूक या दोहोंचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या अंतकरणात ठासवत व्यक्तींमत्वाची निर्मिती करत पुनर्रचना करणे हे ही असते, हे ख्रिस्ती पालक म्हणून आपल्यासाठी पाचारण आहे.
“सरतेशेवटी, मानवी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात परिपक्वता ही आपोआप येत नाही, तर प्रशिक्षणाद्वारे येते.”
ज्या प्रकारे येशूने त्याच्या शिष्यांना त्यांच्यासोबत असतांनाच्या काळात प्रशिक्षणाबाबत सांगितले (मत्तय 13:52; लूक 6:40), त्याच प्रकारे आपण ही आपल्या लेकरांना ख्रिस्ती परिपक्वतेचे शिष्य बनवले पाहिजे. कारण, मानवी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात परिपक्वता ही आपोआप येत नाही, तर प्रशिक्षणाद्वारे येते (इब्री. 5:14). शिष्यत्व काहीतरी करते; ते शिष्याला बदलून टाकते—आणि कालांतराने आणखी अधिक. आणि असे प्रशिक्षण हे सहसा सोपे नसते, परंतु यात आपल्यासाठी असलेल्या फळासाठी सातत्याने टिकून राहण्यासाठी अस्वस्थतेच्या, अगदी वेदनेच्या क्षणांमध्येही टिकून राहणे आवश्यक असते (इब्री 12:11).
उदाहरणार्थ, कार्यनिती ही स्वयंचलित नसते; आपण आपल्या मुलांना काम करायला शिकवलेच पाहिजे. तसेच पवित्रता ही नैसर्गिकरित्या येत नाही, परंतु देवाची कृपा ख्रिस्तामध्ये आपल्याला, आणि आपल्याद्वारे आपल्या लेकरांना, “अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे” (तीत 2:12) म्हणून प्रशिक्षण देते.
योग्य प्रशिक्षण देण्यासाठी योग्य रीतीने सुसज्ज असणे
आपण नीतीसुत्राच्या पुस्तकात बालसंवर्धन करणाऱ्या त्या प्रसिद्ध वचनांचे लौकिक स्वरूप नाकारण्यास खूप घाई करू शकतो आणि खरोखर प्रशिक्षणामध्ये काय-काय समाविष्ट असते आणि त्यांवर विचार न करता दुर्लक्ष करू शकतो. “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतिसूत्रे. 22:6). देहाच्या आणि कोमल आत्म्याच्या—प्रशिक्षणासाठी आधुनिक पालकांना माहित असलेल्या गोष्टीपेक्षाही आणखी बरेच काही असू शकते.
म्हणून आपल्या देवाने हे सुनिश्चित केले आहे की आपल्या मुलांच्या प्रशिक्षणाच्या या भरपूर वर्षांसाठी पालक या नात्याने आपल्याला भरपूर प्रमाणात पुरवठा केला जावा आणि संपूर्ण संसाधने मिळावीत: त्याने आपल्याला त्याचे पवित्रशास्त्र दिले आहे. आपल्या पालकत्वाच्या प्रशिक्षणाचा केंद्रबिंदू हा आपला स्वतःचा जीवनानुभव आणि आत्मसात केलेली बुद्धी (तसेच ज्या रीतीने ती मौल्यवान आहेत) नाही, तर पवित्रशास्त्र आहे, “परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (2 तीमथ्य 3:16-17).
या प्रशिक्षणात ज्या गोष्टींचा समावेश आहे, ज्यांत आपण ध्येयासाठी शिस्त आणि शेवट म्हणून शिक्षा यातील फरक चांगल्याप्रकारे लक्षात घेतो 1 करिं. 11:32; 2 करिं. 6:9; 1 तीमथ्य 1:20; 2 तीमथ्य 2:25; प्रकटी. 3:19, यांना आपण नीट निरखून शिस्त (इब्री. 12:3-11) असे म्हणू शकतो, यात काही शंका नाही. तरीही पालकत्वाच्या प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया ही केवळ प्रतिसादात्मक आणि केवळ बौद्धिक नाही तर सर्वसमावेशक रचनात्मक, आणि समग्र आहे.
विशिष्ट शाब्दिक प्रशिक्षण
यानंतर दुसरी संकल्पना आहे जिचे भाषांतर केले गेले आहे ती आहे, “शिक्षण”—किंवा कदाचित “सल्ला-मसलत” (नूथेसिया) (nouthesia)—ही अधिक विशिष्ट आहे आणि प्रशिक्षणाच्या विस्तृत श्रेणीत हीचा समावेश केला गेला आहे.
या दुसऱ्या संकल्पनेमध्ये, उच्चार ढंग हा तोंडी आहे आणि विशेषतः पालक म्हणून आपल्या शब्दांच्या भूमिकेच्या तुलनेतल कमी प्रभावी आहे. आता आपण दूरदर्शी शिक्षणाच्या प्रात्यक्षिकांच्या पलीकडे सुधारात्मक वाक्शैलीकडे शेवट म्हणून नाही, तर मुलाच्या दीर्घकालीन कल्याणाचे साधन म्हणून वळतो. हा शब्द सल्ला, जरी ह्यात “बोध” किंवा “चेतावणी” हा अर्थ नसला तरी, आज आपण ह्या अर्थाने उपयोगात आणतो. आणि पालकांचा सल्ला हा सामान्यतः त्यावेळेच्या प्रशिक्षणाच्या वर्षांपलीकडे टिकतो. पालकत्व हे तेव्हा संपत नाही जेव्हा आपली मुले घराबाहेर पडतात. पालकांचे हे प्रशिक्षण, त्या वेळी, मूलतः पूर्ण होऊन गेलेले असू शकते, परंतु पालकांचा सल्ला हा ज्याची आपल्याला आशा असते, दीर्घकाळ टिकतो.
नवीन करारातील अशा सल्ल्यामध्ये अनेक वस्तूस्थितींचा समावेश आहे, मग तो आजच्या ख्रिस्ती लोकांसाठी जुन्या करारातील उदाहरणाचा (“ह्या गोष्टी उदाहरणादाखल…लिहिल्या आहेत”, (1 करिंथ 10:11) देत असलेला अधिक सकारात्मक सल्ला असो किंवा “तट पाडणार्या माणसाला” (तीत 3:10) आपण देत असलेली नकारात्मक चेतावणी असो. एकंदरीत, एका बापाचे हृदय हे कसे आहे—जे क्रोधास मंद आणि आशीर्वाद देण्यास तत्पर असते—ज्यातून अशा चेतावण्या आणि ताकीद दिल्या जातात, हे जर आपण लक्षात ठेवतो तर चांगले करतो.
तर मग, दैवी सल्ल्यासह येणाऱ्या किमान पाच वास्तवांचा विचार करा.
बापाच्या सल्ल्याचे मित्र
बापाच्या सल्ल्याचा पहिला मित्र म्हणजे आपले अश्रू होत. मिलेताच्या समुद्रकिनाऱ्यावर, जेव्हा पौल इफिस येथील वडिलांना निरोप देत होता तेव्हा तो त्यांना आठवण करून देतो की, “म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ” (प्रेषित 20:31). त्याचा हा प्रेषितीय सल्ला सूडबुद्धीने नव्हे, तर अश्रूं गाळत दिला गेला होता. तो क्रोधाने किंवा अंतःकरणाला त्यांच्यापासून दूर करून टीकात्मकपणे बोलला नाही, परंतु त्यांच्या भल्यासाठी सुधारणा करणाऱ्या प्रेममय शब्दांनी तो बोलला.
आणि ह्याशी संबंधित दुसरा म्हणजे, एक चांगले हृदय. तो रोम येथील लोकांना सांगतो की त्याला खात्री आहे की ते “एकमेकांना बोध करायला समर्थ आहेत,” कारण की, “बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले” आहात (रोम 15:14). अशा सल्ला देणाऱ्या अंतःकरणात ज्ञान आणि चांगुलपणा या दोन्हींची परिपूर्णता सहअस्तित्वात असते. आपल्या मुलांना आपल्या अशा इतक्या चांगल्या अंतःकरणापासून सल्ल्याची आणि चेतावण्यांची गरज आहे.
तिसरा आहे, पित्याचे प्रेम. जेव्हा पौलाने कठोर शब्द लिहिले, जसे त्याने करिंथ येथील मंडळीसाठी लिहिले, तेव्हा त्याने ते, “तुम्हाला लाजवण्यासाठी…नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी” लिहिले. याचे कारण जे तो देतो ते आहे त्याचे त्यांच्यासाठी असलेले बापाचे हृदय: “कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत” (1 करिंथ. 4:14-15). सामान्य सल्ले आणि बोध ह्यांचे एक स्थान असू शकते; पण आपल्या मुलांना बापाच्या विलक्षण प्रेमातून वाहणाऱ्या सुधारात्मक शब्दांची विशेष गरज आहे.
चौथा आहे, सुशिक्षणआणि ज्ञान. कलस्सैच्या पत्रात दोनदा “सर्वांना घोषणा” करणे आणि “एकमेकांना बोध” करणे (म्हणजे, ख्रिस्ती सल्ला) याबद्दल सांगितले आहे, जे शिकवणुकीसह आणि “सर्व सुज्ञतेशी” जोडलेले आहे:
ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक माणसाने परिपूर्ण झालेले असे आम्हांला सादर करता यावे म्हणून आम्ही सर्वांना ख्रिस्ताची घोषणा करतो, प्रत्येक माणसाला सावध करतो . . . ख्रिस्ताचा संदेश त्याच्या समृद्धीसह तुमच्या अंतःकरणामध्ये राहो. परस्परांस सर्व सुज्ञतेने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, भक्तिगीते व आध्यात्मिक गायने कृतज्ञतेने गा. (कलस्सै 1:28; 3:16).
पालक म्हणून, आपण आपल्या पालकत्वाचे ध्येय (ख्रिस्ती परिपक्वता), आपल्या पाचारणाचे आवश्यक साधन (ख्रिस्ताचे वचन) आणि स्तोत्रे (आनंदाचा श्रवणीय ध्वनी) आणि कृतज्ञता यांच्याशी असलेला परस्पर संबंध हा देखील पाहू शकतो. स्तोत्रे गाणारे, कृतज्ञ वडील हे चांगले सल्लागार तयार करतात, जे सुधारणूक करतात आणि आशा देतात.
आणि शेवटचा,बंधू म्हणून चेतावणी. 2 थेस्स. 3:15 मध्ये, पौलाने तट पडणाऱ्याकडे दुर्लक्ष करण्याची तुलना बंधूच्या चेतावणी देण्याऱ्या सल्ल्याशी केली आहे. आणि 1 थेस्स. 5:12-14 मध्ये, हा चेतावणीचा सल्ला पुन्हा मंडळीच्या प्रेमळ पित्यांची—म्हणजे, तिचे पाळक-वडील (वचन 12)—आणि जे मंडळीच्या सन्मानास पात्र आहेत (वचन 13), एक प्रकारची वाक्शैली आहे. अशी चेतावणी ही मंडळीला प्रोत्साहन, मदत आणि धीर देत असते (वचन 14).
पितासमान काळजी घेणारे ख्रिस्ती बनवणे
पौलाच्या पालकत्वाच्या संगोपनाविषयीच्या एक-वचनीय दृष्टिकोनाचा शेवट तो एका अंतिम वाक्यासह करतो, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. पितृत्वाचे आपले प्रशिक्षण आणि सल्लामसलतीच्या आमच्या प्रयत्नाकडे, आम्ही दुर्लक्ष करण्याचे धाडस करता कामा नये. खरे तर ही शेवटची टीप सर्वात महत्त्वाची आहे. आपल्या प्रशिक्षणाची सर्व वर्षे, आणि आपल्या सल्ल्याचे सर्व कठीण आणि मौल्यवान शब्द, “प्रभूच्या” अंतिम स्पर्शाविना अनंतकाळाच्या दृष्टीने व्यर्थ ठरतील.
“ख्रिस्ती पालकत्वाचा उद्देश हा प्रत्येक क्षेत्रात, आपल्या मुलांना ख्रिस्ताला शिकवणे हे आहे.”
ख्रिस्ती पालकत्वाची उद्दिष्टे ही सक्षम, वरवर पाहता ठीक दिसणाऱ्या प्रौढत्वापेक्षा खूप अधिक आहेत. ख्रिस्ती पालकत्वाचे उद्दिष्ट हे, प्रत्येक गोष्टीत, आपल्या मुलांना ख्रिस्त शिकवणे हे आहे. त्यांनी ‘ख्रिस्ताविषयी शिकवण मिळावी’ अशी आमची इच्छा असते. जे इफिस. 4:20-21 मध्ये पौलाने मंडळीला ज्या प्रकारे इशारा दिला आहे त्याच्याशी जुळते आहे: “तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही! तुम्ही तर त्याच्याविषयी निश्चितपणे ऐकले व त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला शिक्षण मिळाले.”
ख्रिस्तामध्ये असलेले आपले संपूर्ण पालकत्व हे आपल्या लेकरांना ख्रिस्त शिकवण्याच्या कार्याने व्यापून जावे अशी आमची इच्छा आहे. इफिसकरांस पत्र 6:4विषयी चार्ल्स हॉज म्हणतात, “शिक्षणाची ही संपूर्ण प्रक्रिया केवळ धार्मिकच नव्हे, तर ख्रिस्ती असली पाहिजे”(इफिसीयंस पृष्ठ, 204). आपल्या पालकत्वाचे प्रशिक्षण हे ख्रिस्तामध्ये प्रशिक्षण घेणे आहे. आणि आपला पालक म्हणून सल्ला, मग तो प्रोत्साहक किंवा सुधारात्मक असो, हा ख्रिस्तामध्ये असावा. आपले संपूर्ण ख्रिस्ती पालकत्व हे त्याच्यात, त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी आहे.जेव्हा आपण आपल्या प्रभूच्या प्रशिक्षणात आणि सल्ल्यात आपल्या मुलांचे संगोपन करतो, तेव्हा आपण त्याला जाणून घेणे आणि त्याचा आनंद घेणे यालाच आपल्या प्रयत्नांचे मुख्य केंद्रबिंदू बनवतो. जेव्हा आपण हे करू, आपल्या मुलांच्या सखोल आणि सार्वकालिक आनंदासाठी आपण त्याच्यासाठी त्याच्या हातातील साधने आणि त्याच्या वचनांचे प्रदर्शक बनून जाऊ.
लेखक
डेव्हिड मॅथिस