एकमेकांची काळजी घेण्याचे खरे आव्हान

“अहो, तुम्ही गाडी बाजूला थांबवा!” त्या स्त्रीने मागच्या सीटवरून विनंती केली. “माझे खूप डोके दुखत आहे.”

 माझा मुलगा जोर-जोराने रडत होता, म्हणून तिचे डोके दुखत होते.

पाच मिनिटांपूर्वी काय घडले हे आपण पाहूया, जेव्हा मी पहिल्यांदा त्या महिलेच्या सदनिकेच्या (अपार्टमेंटच्या) बाहेर रडत असेलल्या मुलाला सांभाळत बसलो होतो. माझ्या एका वर्षाच्या मुलाला गाडीत बसायला अजिबात आवडत नाही, पण मंडळीपर्यंतचा प्रवास छोटा असतो (बहुतेक वेळा). पण आज सकाळी आम्ही थोडासा वळसा घेतला आणि त्याला ते कळून चुकले. आम्ही ती महिला आणि तिचा मुलगा बाहेर निघण्याची वाट पाहत असता, त्याच्या तक्रारींचे हळूहळू  रडण्यात रूपांतरण झाले.

ती एकटीच त्या मुलाचा सांभाळ करत होती, आणि तो तिचा माध्यमिक शाळेत (हायस्कूलला ) शिकणारा मुलगा होता. त्यांनी आमच्या देशात आश्रय घेतला असून ते आमच्या देशात, संस्कृतीत, भाषेत, आणि (नंतर मला कळले) वाहतूक नियमांमध्ये नवीन आहेत. तसेच त्यांच्याजवळ अमेरिकेचा वाहन परवाना  नाही, पण त्यांच्याजवळ मंडळी आहे—आमची मंडळी. काही महिन्यांपूर्वी, त्यांनी मंडळीसमोर प्रतिज्ञा घेऊन सभासदत्व स्वीकारले आणि तेव्हापासून इतर सदस्य प्रत्येक रविवारी त्यांच्या येण्या-जाण्याची सोय गाडीने करू लागले.

म्हणून ते माझ्या गाडीत होते आणि आम्ही सगळे एकत्र बाळाच्या कर्कश रडण्याचा आवाज ऐकत होतो. दोन अनोळखी लोक, ज्यांचा रंग आई-वडिलांच्या रंगापेक्षा खूप गडद होता, ते गाडीत बसले आणि बाळाचा आवाज आता अंतिम सीमेवर पोहोचला होता. मी मागच्या सीटवर बिस्किटे आणि खेळणी फेकत होतो, आणि गाडी चालवत असताना एवढेच मला शक्य होते.

मग तिला एक कल्पना सुचली: “त्याला तुमच्या मांडीवर घ्या! त्याला घ्या —”

तिचे वाक्य संपायच्या आधीच तिचा मुलगा विरोध करून समजावत म्हणाला, “असे येथे चालत नाही.” मी जोर-जोरात मान हलवली, अगदी कृतज्ञतेने, तो बोलत असताना, माझा स्वतःचा आवाज थरथर कापत होता आणि  मला क्षमा करा असे म्हणत होता.“ठीक आहे, आमच्या देशात,” ती म्हणाली, “पोलीस तुम्हाला अडवतील. त्यांना असे वाटेल की, तुम्ही हे बाळ चोरले आहे.”

एकमेकांमध्ये हरवलेले

आपण (आणि आपले रडणारे बाळ) ह्यांना आधीच चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या लोकांना मंडळीमध्ये नेणे अधिक सोपे आहे. ज्याप्रमाणे समविचारी लोकांना आपल्या घरात आमंत्रित करणे सोपे आहे, ज्यांना आपण समजू शकतो केवळ त्यांचेच सांत्वन करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे, आणि जे मित्र आपल्याला जवळचे वाटतात केवळ त्यांनाच क्षमा करणे अधिक सोपे आहे. परंतु हे सर्व पवित्र शास्त्रातील ‘एकमेक’ विषयक आज्ञांच्या तुलनेत खूपच अपुरे आहे.

नव्या करारामध्ये, पन्नासहून अधिक वेळा आपण “एकमेकांशी” कसे वागावे या विषयी वाचतो. आपण एकमेकांशी कोणत्या प्रकारे वागले पाहिजे हे विशिष्ट मार्गाद्वारे वाचतो. आपली नजर या आज्ञावरून फिरते— सर्व तथाकथितानुसार “एकमेकांना” —आपले विचार दोन गोष्टी लवकर आत्मसात करतात: आपल्याला काय  आज्ञापिले आहे, ते आपण समजतो (क्रियापदानुसार), आणि आपल्याला समजते की, जे आपल्याला आज्ञापिले आहे (कर्त्यानुसार. आपल्या हे माहीत आहे

“एकमेकांवर प्रीती करावी” (रोम.12:10),

“एकमेकांचे स्वागत करावे” (रोम. 15:7),

“एकमेकांना क्षमा करावी” (इफिस. 4:32),

“एकमेकांना सांत्वन द्यावे” (2 करिंथ 13:11,

“एकमेकांची सेवा करावी” (गलती. 5:13),

“एकमेकांना उभे करावे” (1 थेस्स. 5:11).

पण नकळत आपण या आज्ञांच्या शेवटच्या कोण या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे का? देव आपल्याला कोणाला प्रोत्साहन द्यायला, प्रेम करायला, स्वागत करायला, क्षमा करायला, धीर द्यायला, सेवा करायला, उभे करायला सांगतो आहे, याचा आपण विचार केला आहे का? जेव्हा आपण देवाला “एकमेकांना” म्हणजे कोण, हे सांगू देत नाही, तेव्हा आपण स्वतःच ती निवड करू लागतो. आणि आपण निवडलेले लोक बहुतेक वेळा आपल्याला आवडणारेच असतात. आणि जे लोक आपल्याला आवडतात, ते बऱ्याचदा आपल्यासारखेच असतात.

परतु आपण ज्यांना निवडतो, त्यांनाच लागू करताना खरोखर एकमेकांच्या शब्दांचे पालन करतो का? जर आपण एकमेकांच्या मार्गात कधीच गडबड करीत नाही, तर आपण त्यांचे पालन करीत आहोत किंवा आपण फक्त आपले सगळे प्रेम आपल्या आवडत्या लोकांवर खर्च केले आहे? त्या गोंधळलेल्या गाडी प्रवासापलीकडे, मला असा एकही प्रसंग आठवत नाही जेव्हा एकमेकांशी वागणे खरोखर कठीण होते. कधीच माझे प्रयत्न इतक्या गैरसमजुतींना आणि रडण्याला सामोरे गेले नव्हते. मी विचार करू लागलो: एकमेकांशी खरोखर  कोण आहेत — जसे आपण त्यांचा विचार करतो तसे नव्हे, तर जसे देवाचे वचन आपल्याला त्यांचे वर्णन करते तसे?

१. ते (जागतिक) मंडळीचा भाग आहेत.

नव्या करारातील पत्रांमध्ये “एकमेकांशी” वागण्याच्या अनेक आज्ञा दिल्या आहेत. यामध्ये “एकमेकांशी” हा शब्द ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी वापरला जातो. पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्राचा विचार करा, तेथे हा शब्द पाच वेळा येतो. “सर्व बंधू तुम्हाला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा” (1 करिंथ.16:20) — म्हणजे विशिष्ट प्रेमभावना दाखवून — असे सांगण्यापूर्वी तो स्पष्ट करतो की तो कुणाशी बोलतो आहे: देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून: (1करिंथ 1:2).

ही आज्ञा ख्रिस्ती लोकांना, म्हणजे “ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या” लोकांना, कुणालाही हव्या त्या व्यक्तींसाठी लागू करायला सांगितलेली नाही. त्याऐवजी, पौल ख्रिस्ती लोकांना  “एकत्रित विश्वासू” म्हणून त्याच्या शब्दांकडे लक्ष द्यायला सांगतो. आणि येथे तो फक्त जवळ राहणाऱ्या विश्वासू लोकांचा विचार करत नाही. तो म्हणतो, “सर्वत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा जयघोष करणाऱ्या सर्व लोकांसोबत.”

याचा अर्थ तो माझ्याशी, तुमच्याशी, आणि भारतातील कोलकात्याच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याशी बोलतो आहे. जर कधी आपण तिघे भेटलो नाही, तर आपण एकमेकांशी विश्वासी म्हणून एकत्र, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा एकत्र जयघोष  करणारे म्हणून एकमेकांना वंदन करायला हवे, जरी आपल्यामध्ये अनेक मैलांचे अंतर असले तरी. आपले परस्पर प्रेम हे वैयक्तिक आवडीवर नाही, तर ख्रिस्तामध्ये देवासमोर आपल्या स्थानावर आधारित आहे. एक दिवस तो आनंदाने आपले स्वागत करेल, म्हणेल, “शाब्बास, चांगला आणि विश्वासू सेवक” (मत्तय 25:21). पृथ्वीवरील हे प्रेमळ स्वागत हे स्वर्गातील उघड्या बाहूंचे स्वागत दर्शविते.

नक्कीच, आपण यातील अनेक आज्ञा ख्रिस्तावर विश्वास नसणाऱ्या लोकांसाठीही लागू करायला हव्यात. “कोणीही कुणाला वाईटाचे उत्तर वाईटाने देऊ नये,” असे 1 थेस्स.5:15 सांगते, “तर नेहमी एकमेकांशी आणि सर्वांशी भले करण्याचा प्रयत्न करा.” त्याच वेळी, आपण एकमेकांवर विशेष प्रेम करतो, तेव्हा आपण बाहेर पाहणाऱ्या जगावरही प्रेम करतो. जेव्हा आपण मंडळीमधील लोकांची स्पष्टपणे काळजी घेतो, तेव्हा आपण मंडळी बाहेरील लोकांना देवाची एक झलक दाखवतो. “विश्वासू सहनागरिक आणि देवाच्या घराण्याचे सदस्य” होण्याचा अर्थ काय आहे, हे एकमेकांच्या आज्ञा एक प्रभावी दृष्टिकोन देतात (इफिस.2:19).

2. ते आपल्या (स्थानिक) मंडळीचा एक भाग आहेत.

‘एकमेकांना’ हा शब्द सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र बांधतो आणि आपल्याला स्थानिक मंडळीमध्ये रुजवतो. माझ्यासोबत 1 करिंथ मधील दुसऱ्या एका उतार्‍यात पाहूया: “जेव्हा तुम्ही एकत्र जेवायला (प्रभू भोजनाच्या सोहळ्यासाठी) एकत्र व्हाल, तेव्हा एकमेकांची वाट पाहा” (11:33). मला वाटते, तुम्ही आणि मी (आणि विशेषतः आपली कोलकात्यातील बहीण) प्रभूभोजनासाठी एकाच रांगेत उभे राहत नाही. मग आपण काय करतो?

आपण ही आज्ञा — खरेतर, प्रत्येकांनी एकमेकांनी! — विशेषतः आपल्या स्थानिक मंडळीकडे लागू करावी.  जेथे आपले सहविश्वासणारे दर आठवड्याला (किंवा दररोजही) आपल्या सोबत असतात. म्हणूनच पौल त्याचे पत्र अशा शब्दांनी सुरू करतो: देवाची मंडळी जी करिंथमध्ये आहे, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून : (1करिंथ 1:2)

जरी आपण सातही खंडांवर असलेल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसोबत “एकत्र विश्वासू” आहोत, तरी आपण “[ येथे तुमच्या मंडळीचे नाव लिहा] मधील देवाच्या मंडळीचा” एक विलक्षण भाग आहोत. याच ठिकाणी, आपल्या स्थानिक विश्वासणाऱ्या मंडळीत,आपण एकमेकांच्या शेजारी गाड्या उभ्या करतो, मंडळीमध्ये जाताना एकमेकांशी बोलतो, एकमेकांच्या शेजारी उभे राहून स्तुती करतो, प्रार्थनेत एकमेकांच्या जवळ झुकतो, आणि देवाचे वचन एकत्र ऐकतो. मग आपण शांततेत हातात भाकर आणि द्राक्षारस धरून “एकमेकांची वाट पाहतो.”

आणि हे फक्त प्रभूच्या दिवसापुरतेच मर्यादित नाही. देवाने मंडळीच्या आठवड्याला एकमेकांसाठी नियमित वेळ देण्यासाठी संधींनी भरून टाकले आहे. या संधी केवळ मंडळीच्या इमारती पुरत्याच मर्यादित नाहीत, तर देवाने विशिष्ट सदस्यांना विशिष्ट परिसरात ठेवले आहे, जेणेकरून आपण एकमेकांसाठी आपली दारे उघडू शकू. आपण बऱ्याचदा स्थानिक मंडळीच्या “उपासनेच्या शैली” बद्दल बोलतो. पण बाहेरून पाहणाऱ्या लोकांनी आपल्या जीवन शैलीबद्दल असे म्हणावे, “एक गोष्ट निश्चित आहे: हे लोक कधीही एकत्र जमण्यास दुर्लक्ष करत नाहीत” (इब्री. 10:25).

3. ते आपल्या मंडळीच्या प्रत्येक घटकाचे एक सदस्य आहेत.

जेव्हा आपण “एकमेकांना” विश्वासणाऱ्यांमधील संबंध म्हणून, आणि विशेषतः आपल्या स्थानिक मंडळी मधील भाग म्हणून समजतो, तरीही आपण आज्ञा पालन करताना अनेक वेळा चुका करतो. आपल्याला दर रविवार नंतर, सेवा संपल्यानंतर, कोणाचे तरी आकर्षण होते? आणि आणि  आठवड्यांच्या इतर दिवसांत, साधारणपणे, कोणाकडे आकर्षित होऊ शकते? जर आपले उत्तर फक्त आपल्या प्रिय मंडळी मधील मित्र असेल, तर आपण “एकमेकांच्या” शिकवणीचे मुख्य तत्त्व अजूनही ऐकले नाही: प्रेमात भिन्नता असू शकते.

पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आज्ञा ही त्या एका शब्दाचे प्रतिबिंब आहे; येशू त्या प्रत्येक पानांमागे धडधडत आहे. या व्यक्ती शिवाय, एकमेकांच्या शिकवणांना उद्दिष्ट आणि सामर्थ्य नाही. त्याने एकमेकांची शिकवण कोणावर लादली आहे? त्याच्यासारख्या लोकांवर, ज्याला तो आरामदायक समजतो? आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, उत्तर आहे, मी.  ते तुम्ही आहात. एका शब्दात, हे पापी लोक आहेत. हे बंडखोर, अपात्र पुरुष आणि स्त्रिया आहेत. हे पडलेले मानव आहेत, ज्यांच्याशी देवाचा अत्यंत उंचावर असलेला पुत्र फार काही समानता ठेवत नव्हता — म्हणजे तो, जोपर्यंत तो आपल्यापैकी एक होण्याचा निर्णय घेत नाही, मग तो आपल्यापैकी एक असा होतो:

जरी तो देवाच्या स्वरूपाचा होता, [त्याने] देवाशी समानता ही समजून घेण्यासारखी गोष्ट मानली नाही, तर मनुष्याच्या रूपात जन्म घेऊन सेवकाचे रूप धारण करून स्वतःला रिक्त केले.(फिलिप्पै. 2:6-7).

या माणसासाठी “एकमेकांना” हा शब्द कोणाला लागू पडतो? त्याच्यासारखे लोक आधीपासूनच नाहीत, तर ज्या लोकांसारखे त्याने बनणे पसंत केले आहे. त्याला आधीच आवडणारी माणसे नव्हेत, तर ज्या लोकांवर त्याने “मरणापर्यंत, अगदी वधस्तंभावरील मृत्यूपर्यंत” प्रेम करण्यास वचनबद्ध केले (फिलिप्पै. 2:8 )आता तो आपल्याला आज्ञा देतो, “जसे मी तुझ्यावर प्रेम केले आहे, तसेच तुम्हीही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे” (योहान 13:34).

हे काही साधे काम नाही, आपण जशी स्वत:वर प्रीती करतो त्याप्रमाणे बंधू- भगिनींवर प्रीती करणे, विश्वासी लोकांना समजून घेणे कधी कधी कठीण होईल, कधी कधी आवडणे देखील कठीण होईल. पण हीच प्रीती  जे ख्रिस्ताने आपल्याला दाखवले आहे, आणि तीच प्रीती आपल्याला इतरांसाठी देखील तेच करायला शक्ती देते. आणि या प्रीतीमुळे आपल्यामधील स्वार्थीपणाचा आणि नैसर्गिक प्रवृत्तीचा नाश होऊ शकेल, आणि त्याला आनंद देणार्‍या गोष्टींमध्ये आपण आपली प्राधान्ये घालू शकू: एकमेकांबद्दल त्याचे ठाम, विस्तृत प्रीती दर्शविणे.

लेखक  

टॅनर स्वान्सन

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *