भविष्यात मिळणार्या कृपेद्वारे आमची शर्यत पूर्ण करणे
लेखक
जॉन पाइपर
माझ्या प्रिय वयोवृद्ध ख्रिस्ती बंधूंनो आणि भगिनींनो, वृद्धापकाळात येणाऱ्या भीतींवर मात करून विश्वासाने आणि देवाच्या कृपेवर आधार ठेवून जीवन जगण्यासाठी मी तुमच्यासोबत या प्रवासात सहभागी व्हायचे ठरवले आहे. वाढत्या वयात अनेक प्रकारच्या भीती आपल्याला भेडसावतात. आपण अशा पाच मुख्य भीतींबद्दल बोलणार आहोत.
पण चांगली गोष्ट ही आहे की, प्रत्येक भीतीसाठी देवाच्या वचनात उत्तर आहे. ही उत्तरे विश्वासाने कार्य करतात. जर आपल्याकडे विश्वास असेल, तर आपण त्या उपायांचा उपयोग करून भीतींवर विजय मिळवू शकतो. आणि मग आपण आपल्या आयुष्यातील शेवटचा टप्पा निर्भयपणे, येशूप्रती पूर्ण विश्वास ठेवून पार करू शकतो.
सर्वात आधी, मी “भविष्यातील कृपा” या कल्पनेबद्दल थोडेसे सांगू इच्छितो. मला ख्रिस्ती जीवन हे एक सतत वाहणाऱ्या कृपेच्या प्रवाहासारखे वाटते — देवाची कृपा सतत भविष्यातून आपल्या दिशेने येत असते. आपण त्या कृपेच्या प्रवाहात चालत असतो.
ही कृपा वर्तमानात आपल्याला सामर्थ्य देते आणि भूतकाळात साठून गेलेली कृपा आपल्याला कृतज्ञतेची आठवण करून देते. त्यामुळे, भूतकाळाकडे पाहताना मनात कृतज्ञता, आणि भविष्याकडे पाहताना विश्वास असायला हवा. म्हणूनच मी याला म्हणतो — “भविष्यातील कृपेवरील विश्वास”.
भविष्य म्हणजे पुढचे काही मिनिटे किंवा पुढची कित्येक वर्षे. प्रत्येक क्षणासाठी देव आपल्याला आवश्यक अशी कृपा पुरवत असतो — अगदी उदार आणि विनामूल्य. त्यामुळे पुढच्या पाच मिनिटांत तुम्हाला जे काही करायचे आहे, त्यासाठीदेखील देवाची कृपा तुम्हाला मिळेल, यावर विश्वास ठेवा. ही कृपा थांबत नाही — ती सतत येत असते. आपल्याला फक्त देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे की, तो ही कृपा कायम पुरवेल.
1. एकटे राहण्याची भीती
कदाचित तुम्ही तुमच्या जोडीदाराला गमावले असेल, किंवा तुम्ही आयुष्यभर अविवाहित राहिला असाल. कदाचित अविवाहित जीवन तुमच्यासाठी सोपे गेले असेल, परंतु आता जेव्हा तुम्ही तुमचे सगळे मित्र गमावत आहात, तेव्हा हे एकटे जीवन इतके सोपे वाटत नाही. कदाचित तुम्हाला वाटायला लागेल, येशू म्हणतो, “जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे (मत्तय 28:20). माझ्या मते युगाच्या समाप्तीपर्यंत या वाक्यापेक्षा नेहमी हा शब्द अधिक महत्त्वाचा वाटतो. युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्यासोबत असेन,” असे म्हणणे एक गोष्ट आहे; परंतु येशू म्हणतो, “तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण मी तुमच्यासोबत असेन,” ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे.
जॉन पॅटन हे वानुआतु येथे धर्मप्रचारक होते. एकदा 1,300 आदिवासी त्यांना ठार मारण्याच्या प्रयत्नात होते, तेव्हा ते एका झाडावर जाऊन लपले. खाली त्यांच्या जीवावर उठलेले लोक असताना, ते मत्तय 28:18, 20,मधील वचनाशी बिलगून राहिले, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे … मी नेहमी तुमच्याबरोबर आहे.” त्यानंतर जिवंत राहिल्यावर त्यांनी लिहिले: “माझ्या प्रिय प्रभू आणि तारकाच्या उपस्थितीची आणि सामर्थ्याची जाणीव सतत मला झाली नसती, तर जगातल्या कशानेही मला माझे शुद्ध चित्त हरपण्यापासून आणि दारुणपणे मरण्यापासून वाचवले नसते. त्याचे वचन, ‘पहा, मी नेहमी तुमच्याबरोबर आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत’ माझ्यासाठी इतके वास्तविक झाले, की जर मला येशू स्वतः, स्तेफनाला जसा दिसला होता, तसा खाली पाहताना दिसला असता, तरी मी आश्चर्यचकित झालो नसतो. मला त्याचे सामर्थ्य सतत जाणवत होते… हे खरे आहे, आणि 20 वर्षांनंतरही हे आठवले की, ज्या भयंकर क्षणी माझ्या जीवाला बंदुका, दांडे किंवा भाले यांनी लक्ष्य केले जात होते, त्या वेळी मला माझ्या प्रिय प्रभू येशूच्या चेहऱ्याचा आणि हास्याचा सर्वाधिक जवळचा अनुभव आला.” (जॉन जी. पॅटन, 342/ John.G.Paton,342) तो तुमच्यासोबत असेल याचा कदापि असा अर्थ नाही की, तुमच्या आयुष्यातील लोकांकडे दुर्लक्ष करावे. देवाने आपल्याला मंडळी दिली आहे. तुम्हाला पूर्णपणे एकटे, कोणाचीही काळजी न घेता राहायला लावणे ही ख्रिस्ती समुदायाची अपयशाची निशाणी असेल. आणि आपण हे अपयश दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन देतो: जिथपर्यंत शक्य आहे, आजूबाजूला पाहा आणि कोण एकटे आहेत ते बघा. जिथपर्यंत शक्य आहे, तेवढे इतरांसाठी उपस्थित राहावे.
2. निरुपयोगी होण्याची भीती
मी एक पुरुष आहे, त्यामुळे मी मुख्यतः पुरुषांबद्दल विचार करत आहे. राल्फ विंटर म्हणाले, “अमेरिकेत पुरुष म्हातारपणाने मरत नाहीत. ते निवृत्तीने मरतात.”पुरुषांच्या आत्म्यामध्ये उत्पादनशीलतेची गरज अंतर्भूत आहे. स्त्रियांसाठी हे वेगवेगळ्या प्रकारे खरे आहे, यात शंका नाही, पण सध्या मी पुरुषांविषयी विचार करत आहे. असा पुरुष जो स्वतःच्या उत्पादनक्षमतेची, उपयुक्ततेची आणि साध्य करण्याची भावना गमावतो, तो स्वतःची संपूर्ण ओळख आणि जीवनातील उद्देश गमावण्याच्या धोक्यात असतो.
1992 च्या ऑलिम्पिक्स दरम्यान मी “ऑलिम्पिक आध्यात्मिकता/ Olympic Spirituality”, या विषयावर प्रचार केला, ज्यामध्ये पौलाने धावणे, लढणे, मुष्टियुद्ध आणि कुस्ती याबद्दल वापरलेल्या भाषेशी ऑलिम्पिक खेळांची तुलना केली. दुसऱ्या दिवशी मला सांगण्यात आले की, आमच्या मंडळीमधील एक वयस्क सदस्य एल्सी विरन रुग्णालयात असून, मृत्यूच्या दारात आहे. मी म्हणत होतो, “चला — लढा देऊया.”पण हे लक्षात येताच की, एल्सी कदाचित पुन्हा कधीही अंथरुणातून उठणार नाही, मी स्वतःला विचारले, “एल्सी, जी कदाचित नव्वदच्या पुढे आहे आणि मृत्युच्या पटलावर आहे, ती हे कसे करू शकते?” त्यानंतर मी “एल्सी कसे धावू शकते?” बेथलेहेम स्टार/ Bethlehem Star या शीर्षकाने (आमच्या मंडळीच्या वार्तापत्रामध्ये) एक लेख लिहिला, ज्यामध्ये मी विचारले, “तिची मॅरेथॉन आत्ता कशी दिसत असेल?”
2 तीमथ्य 4:6–7 मधील हे मुख्य वचन आहे, “कारण मला आधीच पेय अर्पण म्हणून ओतले जात आहे” — खरोखर, ती तशीच होती. तिने 62 वर्षे मंडळीची प्रामाणिकपणे सेवा केली होती. तेव्हा पौल म्हणतो, “आणि माझ्या प्रस्थानाचा वेळ आला आहे. मी चांगली लढाई लढलो आहे, मी शर्यत पूर्ण केली आहे, मी विश्वास ठेवला आहे.” पौल शेवटी म्हणतो, “मी विश्वास टिकवून ठेवला आहे,” याचा अर्थ त्याने लढाई लढल्याचे आणि शर्यत पूर्ण केल्याचे त्याचे स्पष्टीकरण दिले.
तर, एल्सीची मॅरेथॉन कशी दिसते? विश्वास ठेवा. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्यावर विसंबून राहा. सैतानाला तुमचा विश्वास उद्ध्वस्त करण्याची ही लढाई जिंकू देऊ नका. म्हणून, विश्वास ठेवणे हे निरुपयोगीपणाची भीती दूर करण्याचा मार्ग आहे. आणि हे किती आश्चर्यकारक आहे की पौल इफिस 6:8 मध्ये म्हणतो, “कारण तुम्हाला माहीत आहे की, प्रत्येक जण मग तो दास किंवा स्वतंत्र असो, जे काही तो चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल.” [तुम्ही आज दुपारी करू शकाल अशी सर्वात छोटी आणि लपलेली चांगली गोष्ट कल्पना करा. कदाचित ती अशी एक साधी गोष्ट असेल, जी कुणालाही कळणार नाही. या युगाच्या शेवटी, प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल. ते उपयोगी आहे. तुम्ही उपयोगी आहात. सर्वात छोटी गोष्टसुद्धा सर्वकाळ महत्त्वाची आहे. किंवा फिलिप्पैकरांस पत्र 1:20-21 यावर मनन करा, “कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे, पण जर देहात जगणे हे काम आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.” आपली पुढची नेमणूक मृत्यू असण्याची शक्यता पौल मानतो. कोणी म्हणेल, “पाळक साहेब, तुम्ही मला सांगत आहात का की मी मरण्यापूर्वी पुढच्या तीन दिवसांत माझी उपयोगिता आहे? मी उपयोगी पडू शकतो का? माझ्या घशात एक नळी आहे.”
आणि त्याचे उत्तर असे आहे की पौलाने सांगितले की ख्रिस्ताला त्याच्या मृत्यूने गौरवित केले जावे हे त्याचे ध्येय होते. पुढील तीन दिवसांत, पुढील तीन दिवसांत, येशूला गौरव देण्याचा — किंवा न देण्याचा, एक मार्ग म्हणजे मरणे. आणि हे करण्याचा मार्ग येथे आहे: पौलाप्रमाणे मृत्यूला जसे लाभ गणले तसेच तुम्ही करा.
3. दु:खाची भीती
दुःख जे देवाच्या उद्देशपूर्ण हातात असते, त्याचे परिणाम या जीवनात आणि मृत्यूनंतरसुद्धा होतात. ते कधीही निरर्थक नसते. ते कधीही आपल्या भल्यासाठी असलेल्या देवाच्या दयाळू योजनेशिवाय नसते. रोम 5:3–5 आपल्याला जीवनात दुःखाचे परिणाम कसे होतात हे स्पष्ट करते:
“आम्ही आमच्या दु:खात आनंद मानतो, कारण आम्हाला माहीत आहे की, दु:ख सहनशीलता निर्माण करते, आणि सहनशीलता गुण निर्माण करते, आणि गुण आशा निर्माण करते, आणि ही आशा निराश करत नाही, कारण पवित्र आत्म्याद्वारे देवाचे प्रेम आमच्या हृदयात ओतले गेले आहे.” दु:ख, संकटे, आणि वेदना या संदर्भात आपली मानसिकता अशी असायला हवी: “हे दुःख माझ्यात, माझ्यासाठी, आणि माझ्या माध्यमातून काहीतरी चांगले करीत आहे. हे मला एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीमध्ये घडवत आहे.” या वचनातून आपल्याला हे शिकायला मिळते.
परंतु जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते आणि ही गोष्ट काही उपयोगाची वाटत नाही, कारण आता माझ्याकडे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी वेळच नाही उरला आहे, तेव्हा काय? माझ्या मृत्यूला फक्त काही तास राहिले आहेत. तुम्ही विचार करू शकता, “मी उद्या माझे व्यक्तिमत्त्व कोणालाही दाखविण्यासाठी जिवंत राहणार नाही. मी संध्याकाळी सहा वाजता मरणार आहे, आणि आता दुपारचे बारा वाजले आहेत. मी ऐकले आहे की दुःख चांगल्यासाठी कसे उपयोगी ठरू शकते, पण मला पुढील सहा तासांचा अर्थ समजत नाही, कारण त्यानंतर मी निघून जाईन.”
या ठिकाणी 2 करिंथकरांस पत्र 4:16–17 वचने मला खूपच प्रिय वाटतात. पाहा, तुम्हाला तेच दिसते का जे मला दिसते: “ आम्ही धैर्य सोडत नाही; परतू परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते.” [पौल हे दुःख आपल्यासाठी “एका अतुलनीय गौरवाचे सार्वकालिक भार” तयार करत आहे, निर्माण करत आहे, निर्माण घडवित आहे. या शेवटच्या तासांचे दुःख माझ्या भल्यासाठी, मृत्यूनंतरच्या जीवनासाठी परिणाम घडवून आणेल.
समजा, मी एखाद्याच्या रुग्णालयातील खाटेजवळ आहे, आणि त्या आजारी व्यक्तीला माहीत आहे की, त्याच्याकडे फार तर एक दिवस शिल्लक आहे. तो म्हणतो, “पाळकसाहेब, खूप वेदना होतात. खूप त्रास होतो. याचा अर्थ काय?” मी उत्तर देतो, “देव तुम्हाला शेवटपर्यंत त्याच्यावर विसंबून राहण्याची कृपा देतो आहे, त्याला शाप न देता, जितके शक्य आहे तितके त्याच्यावर शांत राहून विश्रांती घ्या. येत्या वीस तासांत हे तुमच्या पुढच्या जीवनात तुम्हाला अनुभवायला मिळणाऱ्या गौरवाच्या भारात एक मोठा आणि अमूल्य फरक निर्माण करेल. हे तास निरर्थक नाहीत.”
मला यावर खरोखर विश्वास आहे. हे निरर्थक नाहीत. खरे आहे की, ते तुमचे व्यक्तिमत्त्व येथे चमकवणार नाहीत, कारण तुम्ही आता येथे नसाल. पृथ्वीवर तुमचे व्यक्तिमत्त्व उरणार नाही. पण जेव्हा तुम्ही वर्तमान आणि सार्वकालिक सीमारेषा पार कराल, तेव्हा देव तुम्हाला दाखवेल की हे वीस तास तसे का होते, आणि त्यांनी तुमच्यासाठी काय केले. ही चांगली बातमी आहे.
4. विश्वास ढासळण्याची भीती
विश्वास ढासळण्याचा अर्थ असा आहे, “देवा, मी टिकून राहीन का? मी इतका संघर्ष करत आहे, आणि शंका येतात. माझ्या मनात भयानक विचार येतात.” मी बेथलेहेम बॅप्टिस्ट मंडळीमध्ये पाळक झालो तेव्हा तेथील एका अतिशय विलक्षण स्त्रीचा विचार माझ्या मनात आला. ती एक प्रार्थनायोद्धा होती, आणि कदाचित सर्वांनी तिला मंडळीमधील सर्वांत देवभक्त स्त्री म्हटले असते. ती आता स्वर्गात आहे.
मी रुग्णालयात तिच्या शेवटच्या क्षणी तिच्यासोबत होतो. तिची जीभ जळालेल्या कोळशासारखी काळी पडली होती. मी खोलीत शिरलो, आणि ती थरथरत होती. तिने माझा हात घेतला. ती म्हणाली, “पाळक साहेब, ते येतात, आणि माझ्या खाटेजवळ नाचतात. ते नाचतात, आणि आपले कपडे उतरवतात.” ती भयानक गोष्टी वर्णन करत होती. हे तिच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होते. मृत्यूपूर्वी ती सैतानाच्या त्रासाला बळी पडत होती. एक वृद्ध, देवभक्त विश्वासू मरणाच्या वेळी सैतानाच्या त्रासाला सामोरी जात होती.
अशा भयानक क्षणांमध्ये फिलिप्पै. 3:12 हे माझे आवडते वचन ठरले आहे: “असे नाही की मी हे आधीच मिळवले आहे किंवा आधीच परिपूर्ण आहे, परंतु मी ते माझे स्वतःचे बनविण्याचा आग्रह धरतो, कारण ख्रिस्त येशूने मला स्वतःचे बनवले आहे.” मी येथे आहे: “येशू, मला तू हवा आहेस. धर्मत्याग करून तुम्हाला फेकून द्यायचे नाही तर मला एक विश्वासू म्हणून मृत्यूपर्यंत पोहोचायचे आहे. मला तू हवी आहेस आणि मला ती बनवायची आहे.” आणि तो मला आठवण करून देतो, “तू माझ्यापर्यंत पोहोचण्याचे एकमेव कारण म्हणजे मी तुला पकडले आहे.” आपल्याला येशू हवा आहे याचे एकमेव कारण म्हणजे त्याने आपल्याला निवडले. अन्यथा तुम्ही त्याच्यासाठी एवढ्या उत्कटतेने पोहोचू शकला नसता.
पवित्र शास्त्रामधील एका महान स्तुतीगायनात असे म्हटले आहे,
“आता तो जो तुम्हाला ठेच लागण्यापासून वाचवू शकतो आणि तुम्हाला आपल्या गौरवाच्या उपस्थितीत आनंदाने निर्दोषपणे सादर करू शकतो, त्याला — एकमेव देव, आमच्या तारणकर्त्यास, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, गौरव, ऐश्वर्य, सामर्थ्य आणि अधिकार, सर्व काळापूर्वी, आत्ताही आणि अनंतकाळपर्यंत असो” (यहूदा 24–25. हे वचन या सत्यावर आधारित आहे की तो आपल्याला सांभाळतो. अलीकडील एका स्तुतिगीतात, “ही विल होल्ड मी फास्ट/ he will hold me fast” या गाण्यात, विश्वास ढासळण्याच्या भीतीसाठी एक ताकदवान संदेश आहे: “तो मला घट्ट धरून ठेवेल, कारण माझा तारणहार मला खूप प्रेम करतो. तो मला घट्ट धरून ठेवेल.” मला हे गाणे खूप प्रिय आहे.
५. मृत्यूची भीती
माझ्या आयुष्याची एक छोटीशी घटना मी तुम्हाला सांगतो. मी नेहमी माझ्या एका कुशीवर झोपतो कारण मला पाठीवर झोपल्यास झोप लागत नाही. एकेदिवशी मी पाठीवर झोपून म्हणतो, “अरे, हे तर खूप आरामदायी आहे. खरोखर जर मला अशी झोप लागली असती,” पण मला झोप लागत नाही. म्हणून मी शेवटी एका कुशीवर वळतो , आणि झोपण्याआधी कल्पना करतो की परमेश्वर माझ्याशी बोलत आहे: जॉन पायपर, “कारण आपल्याला क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्या बरोबर जिवंत असावे.” 1 थेस्सली. 5:9-10. जवळजवळ रोज मी जवळपास प्रत्येक रात्री हे वचन म्हणतो, “कसला कोप नाही. कसला रोष नाही! मी जिवंत राहिलो किंवा मरण पावलो तरीही.”
नोयल आणि मी आमच्या नातवंडांजवळ दफन होण्यासाठी जागा घेतल्या आहेत. आम्ही दक्षिण कॅरोलिनामध्ये परत जाणार नाही. आम्ही मिनेसोटामध्ये मरण्यासाठी आलो आहोत. एका टेकाडावर आमची जागा आहे, आणि आम्ही तेथील दगडांची निवड केली आहे, तसेच आमच्या दगडांवर लिहिण्यासाठी पवित्र शास्त्रातील काही वचनांची निवड केली आहे.
1 थेस्सली. 5:9–10 — ही माझ्यासाठी निवडलेली वचने आहेत. माझ्यासाठी, देव माझ्याकडे पाहून हे सांगतोय, “मी तुला कोपासाठी ठरवलेले नाही. तुझ्याबरोबर असा कधीच होणार नाही. कसला कोप नाही. माझ्या मुलाने तुझ्यावर योग्य असलेला कोप स्वतः झेलला आहे. जर मी आज रात्री 3 वाजता तुझा जीव घेतला, तर ती काहीच समस्या नाही, कारण माझ्या मुलाने तुझ्यासाठी मरण पत्करले आहे.” हे वचन मला शांत झोपण्यास मदत करते.
मला माहीत आहे की “तू जागा असो किंवा झोपलेला असो” या संदर्भाचा अर्थ असा आहे की, जर तू येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी जिवंत असशील किंवा मरण पावलेला असशील, तर तुला त्याच्यासोबत राहायचे आहे. परंतु सध्याच्या काळात, झोपताना किंवा जागरणाच्या संदर्भातसुद्धा हे लागू होते.तो म्हणतो, “तू जागा असो किंवा झोपलेला असो(आता जिवंत असो किंवा मृत झालेला असो), तू माझ्यासोबतच जिवंत राहणार आहेस.” मला याची गरज आहे. मी झोपण्याआधी विचार करू शकत नाही, “जर मी मरण पावलो तर काय होईल? जर मी मरण पावलो तर?” तो सांगतो, “ते काहीच समस्या नाही. आम्ही यासाठी आधीच उपाय केला आहे. आम्ही याचा विचार करून ठेवला आहे.”
तो काय करणार नाही?
तो काय करणार नाही?
शेवटी, मी तुम्हाला पवित्र शास्त्रामधील सर्वांत महत्त्वाच्या वचनांपैकी एक वचन सांगतो: “ज्याने स्वतःच्या मुलालाही वाचवले नाही, परंतु आपल्या सर्वांसाठी त्याला दिले, तो त्याच्यासोबत आपल्याला सर्व काही उदारतेने देणार नाही का?” (रोम. 8:32). याचा अर्थ असा आहे की जर देवाने विश्वातील सर्वांत कठीण गोष्ट केली — म्हणजे, त्याच्या मुलाला यातना सहन करण्यासाठी आणि मरण्यासाठी दिले — तर तो तुमच्यासाठी काय करणार नाही? हेच तर्क आहे, आणि देवाने तो स्पष्टपणे सांगितला आहे.तो तुमच्यासाठी सर्व काही करेल. तो आपल्याला “सर्व काही” देईल. हे आपण पाहिलेल्या प्रत्येक वचनावर लागू होते.
आपल्यासाठी ख्रिस्ताला देणे, या गोष्टी देवाच्या वचनांची खात्री देते. म्हणून, ख्रिस्तावर विश्वास ठेवा. सध्या आपल्या सर्वांसाठी हाच मुख्य मुद्दा आहे.
तुमचा ख्रिस्तावर आणि त्याच्या वचनांवर विश्वास आहे का? त्याने आपल्यासाठी विकत घेतलेल्या सर्व वचनांवर तुमचा विश्वास आहे का?
त्याच्या वचनांवर विश्वास ठेवा. त्याच्या नेहमी येत राहणाऱ्या कृपेच्या वचनांवर विश्वास ठेवा. तो नेहमी तेथे असेल. त्याच्यामध्ये आनंदी रहा.
या आनंदातून मुक्त व्हा, स्वतःसाठी नाही, तर सेवेसाठी. त्याच्यामध्ये असलेल्या तुमच्या आनंदामुळे आणि इतरांच्या सेवेमुळे त्याला गौरव द्या.
तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत एकमेकांसाठी प्रार्थना करा. एकमेकांना चांगले मरायला मदत करा आणि तोपर्यंत चांगले जगायला मदत करा.