ख्रिस्ती परंपरेतील वाचकासाठी एक अभिजात मार्गदर्शक
काही पुस्तके अशी असतात, ज्यांना लोकांचे लक्ष वेधून घेण्याची आणि अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने विकली जाण्याची एक अजब व अनपेक्षित क्षमता असते. द व्हॅली ऑफ व्हिजन: ए कलेक्शन ऑफ प्युरिटन प्रेयर्स अँड डिव्होशन्स/ The Valley of Vision: A Reader’s Guide to a Christian Classic.ह्या पुस्तकाबद्दल असेच काहीसे घडले आहे. छपाई झाल्यापासून जवळपास पन्नास वर्षांत, या लहानशा पुस्तकाची मागणी सतत वाढतच गेली आहे आणि ती अनेकदा अशा ठिकाणांहून झाली आहे, जेथे कोणी कल्पनाही केली नव्हती. “प्युरिटन” हा शब्द अनेकदा नकारात्मक अर्थाने घेतला जातो—काही ख्रिस्ती लोकांमध्ये त्याचे असेच काहीसे स्वरूप पाहायला मिळते. असे असतानाही या प्युरिटन प्रार्थनांच्या संकलनाने मंडळीच्या विविध स्तरांवर इतकी वर्षे लोकांना कशी आशीर्वादित केले आहे, हा प्रश्न विचारण्याजोगा आहे?
प्युरिटन विचारांची पुनर्मांडणी
या प्रश्नाचे उत्तर बॅनर ऑफ ट्रुथ या संस्थेच्या उदयाशी काही प्रमाणात संबंधित आहे. युद्धोत्तर काळात ब्रिटनमध्ये, विशेषतः डॉ. मार्टिन लॉइड-जोन्स आणि जे. आय. पॅकर यांसारख्या व्यक्तींच्या प्रभावामुळे, अनेकांनी प्युरिटन आणि त्यांच्या लेखनाचा नव्याने शोध घेतला. पॅकर यांनी याला कधीकाळी “प्राचीन, अधिक सखोल, संपन्न आणि परिपक्व ख्रिस्ती धर्म” असे वर्णन केले होते.
सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये प्युरिटन हे ख्रिस्ती चळवळीचे वारसदार होते. त्यांनी कॅल्विन, ल्यूथर आणि झ्विंगली यांसारख्या व्यक्तींच्या धर्मशास्त्रीय परंपरेचा सांभाळ केला आणि त्यावर आधारित पुढे काम केले. त्याचबरोबर त्यांनी मंडळीच्या इतिहासातील, त्या अत्यंत महत्त्वाच्या काळात दिसून आलेल्या समृद्ध भक्तीपरंपरेलाही पुढे नेले — ही भक्ती परंपरा पौलाने तीतास म्हटल्याप्रमाणे, “विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत ह्याला:” (तीत. 1:1,BSI/ Titus:1:1) अशा विश्वासातून जन्माला आली होती.
प्युरिटन हे मुख्यतः शिक्षक व पाळक होते. त्यांनी त्यांच्या मंडळ्यांना केवळ शिक्षित आणि माहितीपूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही तर त्यांच्या जीवनाला देवाच्या वचनाने आणि आत्म्याने रूपांतरित करणे हे त्यांचे ध्येय होते. ते संपूर्णपणे पवित्र शास्त्राप्रमाणे आचरण करणारे लोक होते, आणि त्यांच्या सेवाकाळाचा प्रभाव त्यांच्या मंडळ्यांवर स्पष्टपणे दिसून येत होता. त्यांनी विपुल लेखन केले, आणि त्यांच्या लेखनामध्ये बहुतांश वेळा त्यांच्या व्यासपीठावरून दर आठवड्याला शिकवलेल्या व प्रचारलेल्या गोष्टींचाच समावेश होता. या सेवेमुळे पवित्र शास्त्रामधील महान सत्यांचे त्यांच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात लागू करण्यास परिणामकारक उपयोग झाला.
मग, जॉर्ज व्हाईटफिल्डसारख्या उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांवर त्यांचा प्रभाव पडला आणि पर्यायाने देवाने त्यांच्या स्वतःच्या काळात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. तथापि, एकोणिसाव्या शतकात सुवार्तिक/इव्हँजेलिकल भक्ती लोप पावू लागली आणि उदारमतवादी धर्मशास्त्राच्या उदयामुळे, प्युरिटन लोकांचा प्रभाव कमी होऊ लागला — मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्या लिखाणाचा पुन्हा शोध लागला आणि त्यांचा प्रभाव पुन्हा वाढू लागला.
त्या आश्चर्यकारक परिस्थितीत, नवीन पिढीचे काही प्रचारक या जुन्या पुस्तकांमुळे शिकू लागले. इयान मरे हे त्या तरुणांपैकी एक होते, आणि त्यांच्या काही मित्रांसोबत त्यांनी प्युरिटन शिकवणीबद्दल नव्याने रस निर्माण केला.
अभिजात लेखणाची मुळे
याच मातीत द व्हॅली ऑफ व्हिजन/ The Valley of Vision या पुस्तकाने आपली मुळे रुजवली. त्या काळात मरे यांच्या संपर्कातून आणि द बॅनर ऑफ ट्रुथ/ The Banner of Truth या संस्थेच्या सुरुवातीच्या कामाद्वारे, त्यांचा परिचय आर्थर बेनेट यांच्याशी झाला, जे एक एपिस्कोपेलियन/ Episcopalian पाळक होते. (आर्थर बेनेट यांनी जोनाथन एडवर्ड्स यांचे जवळचे मित्र होते आणि त्यांनी अठराव्या शतकात) न्यू जर्सी येथील डेलावेअर इंडियन्स/ Delaware Indians in New Jersey लोकांमध्ये मिशनरी असलेल्या डेव्हिड ब्रेनरड यांच्या जीवन व कार्यावर लेखन केले होते. मरे यांनी प्युरिटन प्रार्थनांचे काही लेख बेनेट ह्यांना पाठवले, जेणेकरून ह्या लेखातील प्रार्थना त्यांना उपयुक्त ठरतील. तसेच काही प्रार्थना संपादित करून मंडळ्यांसाठी प्रकाशित कराव्यात असेही सुचवले.
या संवादाचा परिणाम असा झाला की, या जुन्या प्रार्थनांचे फक्त पुनःप्रकाशन करण्याचे काम नव्हे, तर त्या प्रार्थनांचा उपयोग करून एका नव्या पिढीतील ख्रिस्ती लोकांसाठी सोपे व अधिक उपयोगी पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न झाला. मरे यांच्या मते, त्यांनी या प्युरिटन प्रार्थनांचा उपयोग “आधुनिक स्वरूपाच्या पुस्तकासाठी करण्याचे ठरवले होते, विचार, याचना, आणि कधीकधी भाषा देखील बदलून, आजच्या प्रार्थना संस्कृतीसाठी अधिक नैसर्गिक बनवले.” त्यांना केवळ भूतकाळावर आधारित अभिलेख तयार करायचे नव्हते, तर “आजच्या युगातील ख्रिस्ती लोकांसाठी देवाशी संवाद साधण्याच्या व त्यांच्याच भक्तिपूर्ण जीवनाला सहाय्यक होईल, असे पुस्तक तयार करण्याचे ध्येय” ठेवले होते (1975 च्या आवृत्तीच्या प्रस्तावनेप्रमाणे).
देवाच्या कृपेने, बेनेट यांच्या हर्टफर्डशायर/ Hertfordshire येथील परगण्यात, त्यांच्या आधी रेव्ह. ई. बिक्रस्टेथ हे तेथे पाळक होते, जे एक प्रतिभावान आंग्लिकन/Aglican कवी व भक्तिगीतकार, सुवार्तिक होते. बिक्रस्टेथ यांनी स्पष्टपणे बेनेट यांच्या कार्यावर आणि त्यांच्या भक्तिपूर्ण संकलनावर प्रभाव टाकला.
प्रत्येक काळासाठी प्रार्थना
या प्रार्थनांच्या संग्रहाचे सौंदर्य खूप प्रकारांनी दिसते. कारण या प्रार्थना ती ख्रिस्ती जीवनाच्या सगळ्या टप्प्यांना स्पर्श करतात — दुःखापासून आनंदापर्यंत. या प्रार्थनांमध्ये मनातील खोल इच्छा, अडचणी आणि देवाबद्दलचा मोठा आदर दाखवला आहे. त्याचबरोबर, आपल्या गरजा, इच्छा आणि चुका यांचाही साधेपणाने उल्लेख केला आहे.
या सगळ्या प्रार्थनांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते — आपल्याकडे खूप पापं आणि चुका असल्या, ज्या आपण कधी मुद्दाम करतो आणि कधी विसरून करतो, तरीही येशू ख्रिस्तामध्ये असलेली देवाची कृपा आपल्या दोषांवर भारी आहे. आणि पवित्र आत्मा आपल्याला आपल्या कमकुवतपणात मदत करण्यास समर्थ आहे.
या प्रार्थना विषयानुसार लावल्या आहेत. त्यांची सुरुवात पवित्र त्रैक्याच्या स्वीकाराने होते—जे एक शाश्वत देव,जो तीन व्यक्तींमध्ये व्यक्त झाला आहे. यानंतरच्या प्रार्थना देवाच्या त्रैक्याच्या गौरवाचा आस्वाद घेतात आणि ख्रिस्तामध्ये देवाशी असलेल्या आपल्यातील एकता आणि सहभागीतेतून मिळणाऱ्या लाभांचा आनंद उत्सव साजरा करतात. त्यानंतरच्या प्रार्थना आपल्या उद्धाराचे स्वरूप —त्याचे आधार आणि फायदे — आणि कृपेमध्ये वाढत असताना देवाशी असलेल्या सहभागीतेवर लक्ष केंद्रित करतात.
यात प्रार्थनांचा एक संपूर्ण विभाग आपल्या दैनंदिन पश्चात्तापाच्या गरजेला समर्पित आहे, जे खऱ्या आत्मपरिवर्तनाचे लक्षण आहे. त्याशिवाय, इतर विभागांमध्ये आपल्यातील आध्यात्मिक गरजांसाठी प्रार्थना आणि आपण अनुभवत असलेल्या विविध विशेषाधिकारांसाठी प्रार्थना आहेत: प्रार्थनेतून आपल्याला देवाशी सरळ प्रवेश कसा साधावा, त्याच्या लेकरांसाठी देवाने दिलेली भरभरून भेटवस्तू (ज्यांना आपण अनेकदा कमी लेखतो), आणि ख्रिस्ताचे शिष्य म्हणून असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या ह्याची ओळख होते. आणखी एक विभाग सेवा कार्यासंबंधित प्रार्थनांचा आहे, ज्या प्रार्थना प्रत्येक ख्रिस्ती स्वतःच्या पाळकासाठी करू शकतो. शेवटचा विभाग आपल्याला दररोजच्या जीवनातील आव्हाने आणि संघर्षांवर स्वर्गीय दृष्टिकोनातून विचार करण्यास मदत करतो. खरोखरच, हे लहानसे पुस्तक “जीवनाच्या प्रत्येक काळासाठी प्रार्थना” करण्यास प्रवृत्त करते.
देवाबद्दल जागृत व्हा
आपण ह्या आधुनिक युगात आहोत— या समृद्ध भक्तिपूर्ण साधनांचा संग्रह तयार होऊन पन्नास वर्षे झाली आहेत—आपण या प्रार्थना वैयक्तिक प्रार्थनांमध्ये किंवा सार्वजनिक प्रार्थनांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांची शैली आणि सूर आपल्याला जुनाट वाटू शकतो. तरीसुद्धा, या पहिल्या प्रभावामुळे आपल्याला या प्रार्थनांपासून दुरावू नये.
त्यांच्या शैली, सूर, आणि आशयामुळे आपण आपल्या बहुधा विचारशून्य सवयींमधून बाहेर येतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. विशेषतः जेव्हा आपण त्यांच्या स्तुती आणि विनंत्यांच्या स्वराचा आणि आशयाचा विचार करतो, तेव्हा आपल्याला जाणवते की, त्या देवाच्या गौरव, पवित्रता आणि सौंदर्याबद्दलची खोल आदरभावना व्यक्त करतात— जी आपल्या काळात अनेकदा अनुपस्थित असते. या अर्थाने, मंडळीच्या इतिहासातील वेगळ्या युगातील प्रार्थनांचा हा संग्रह देवाशी असलेल्या गूढ सहभागीतेचे आणि त्याच्या गौरव व गुणांची जाणीव करून देणारा आरसा आहे, जे आपल्या काळातील अनेक मंडळीमध्ये अभावाने आढळते. द व्हॅली ऑफ व्हिजन/ The Valley of Vision आपल्यासाठीही तेच बनू शकते, जे ते अनेकांसाठी बनले आहे: देवाबद्दलच्या आपल्या दैनंदिन कृतज्ञतेला आणि प्रत्येक क्षणाला त्याच्यावरील अवलंबितता जोपासण्यासाठी एक प्रतिष्ठित माध्यम ते आहे.
लेखक
मार्क जॉन्सन