पाळक वर्गासाठी पवित्रशास्त्राचा वापर करण्याचे चार मार्ग
संपूर्ण पवित्र शास्त्र हे देवाच्या श्वासाने निर्माण झाले आहे. . .
आजकाल मोठ्या प्रमाणावर 2 तीमथ्य 3:16 या पवित्रशास्त्रामधील या प्रसिद्ध वचनाबद्दल चर्चा केली जाते, (आणि तसे व्हायलाही हवे). अलीकडच्या काही दशकांत (पासा ग्राफे थिओप्न्यूस्टो/ (pasa graphē theopneustos) या तीन ग्रीक शब्दांच्या शास्त्रीय आकलनाचे अनेक पारंपरिक अर्थ समजावून देणारे उत्कृष्ट लेखन प्रकाशित झाले आहे. देवाच्या प्रेरणेने किंवा देवाच्या श्वासातून निर्माण झालेल्या पवित्र शास्त्राचे स्वरूप हे स्वीकारणीय, ग्रहणीय आणि बचाव करण्यासारखे आहे— याप्रमाणे आपण उर्वरित वचन भाग वाचतो. आपण यावर चर्चा करतो व गृहीतके मांडतो, पण यामधील दुसरा पैलू आपल्याला त्याच्या व्यावहारिक महत्त्वाकडे घेऊन जातो:
प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण यांकरता उपयोगी आहे. . .
पौल लिहितो की, पवित्रशास्त्र हाती घ्या आणि त्याचा उपयोग करा. ते फायदेशीर आहे, म्हणजेच मौल्यवान, लाभदायक, आणि फलदायी (ग्रीक शब्द ओफेलिमॉस/ ōphelimos) आपण असे म्हणू शकतो की ते दुप्पट उपयुक्त आहे — ते केवळ शिकवल्या जाणाऱ्यांसाठी, खंडन, सुधारणा आणि प्रशिक्षण घेत असलेल्या लोकांसाठीच नव्हे, तर त्याचे शिक्षण देणाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे. पौलाने याच हेतूसाठी हे वचन सांगितले आहे: “. . . यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा” (2 तीमथ्य3:17). पवित्र शास्त्र केवळ लोकांसाठीच लाभदायक ठरत नाही; तर ते शिक्षकांनाही प्रशिक्षित करते. ख्रिस्ती पाळकांनी देवाच्या वचनाचा उपयोग न करता, देवाच्या लोकांना वचनाची घोषणा करण्याचे धाडस करू नये — ज्या उद्देशाने देवाने त्या वचनाचा वापर [त्याचा गैरवापर करू नये] केला आहे त्याप्रमाणे.
या चौघांची मांडणी योग्य आहे का?
प्राचीनकाळी पत्रलेखन हा एक अत्यंत महागडा आणि त्यावर अधिक वेळ खर्च करावा लागत असे. (त्याचीबरोबरी आपण आजच्या काळातील जलद रीतीने लिहिली जाणारी इलेक्ट्रॉनिकपत्रे व निष्काळजीपणे लिहिलेल्या लिखाणाशी करू शकत नाही). पौलासारखे कुशल कारागीर खोलवर विचारपूर्वक योजना करून या पत्राचे नियोजन करायचे आणि नंतर ते मसुदा तयार करायचे, त्यातील चुकांची तपासणी करीत असे व ते पुन्हा-पुन्हा संपादित करीत असे, जोपर्यंत त्यांचे शब्द योग्य रीतीने रोमन लोकांपर्यंत पोहोचत नसत.
म्हणून, जेव्हा एखादा प्रेषित 2 तीमथ्य 3:16 च्या शेवटच्या भागाचा क्रम सांगतो: तो असा — “दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण”— तेव्हा त्याचा एक अनुक्रम ठरवतो. त्याने या सूचीचे विचारपूर्वक नियोजन केले, त्याची मांडणी केली, मसुदा तयार केला, ते वारंवार तपासून घेतले आणि त्याला अंतिम रूप दिले. “नवीन करारातील धार्मिक शब्दकोश” असे म्हणते की, “ही सूची निश्चितपणे एक नियोजित अनुक्रम आहे.” या अनुक्रमाचा वेगळा अर्थ लावण्याच्या धोक्यापासून सावध राहून, आपण पौलाने दिलेल्या या विशिष्ट शब्दांची निवड कशी केली आणि त्यांना या प्रकारे का मांडले, याचे कारण शोधू शकतो.
तर, मग चला, आपण या नियोजित अनुक्रमावर चर्चा करू, जो पवित्र शास्त्राच्या स्थानिक मंडळीमध्ये पाळकांच्या उपयोगासाठी आहे. आणि या विशिष्टउपक्रमांमुळे एक पाळक-शिक्षक म्हणून आमची निवड आणि सराव कसा स्पष्ट होतो, ते तपासून पाहूया?
सर्वात पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे: शिकवणे
पौलाने शिक्षणापासून” सुरुवात केली, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
शिक्षण घेणे व देणे हे स्थानिक मंडळीमधील जेष्ठ-पाळक ज्येष्ठ-पाळकवर्गांचे मध्यवर्ती काम आहे. मरणावर विजय मिळवलेल्या ख्रिस्ताने आपल्याला पाळक आणि शिक्षक दिले आहेत (इफिस.4:11), देवाचे वचन प्रचार करणारे नेते (इब्री लोकांस पत्र. 13:7), व आपल्यावर नेमलेले अधिकारी, केवळ अधिकार गाजवत नाहीत तर मुख्यत: जमलेल्या मंडळीला शिकवण्यातून आपले अधिकार उपयोगात आणतात (1 तीमथ्य. 2:12). चांगला-पाळकवर्ग “देवाचे वचन शिकवण्यात आणि प्रसार करण्यामध्ये परिश्रम” घेतात (1 तीमथ्य 5:17). त्यांच्या शिकवण्याचा केंद्रबिंदू हा त्यांच्या स्वतःचा शहाणपणा आणि त्यांच्या जीवनाच्या कल्पनांवर आधारित नाही, तर देवाच्या वचनाद्वारे आत्म्यांचे पोषण करणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे.
म्हणून, पौल 17 व्या वचनानंतर एक दीर्घ श्वास घेतो आणि एक लांब अर्थमय प्रस्तावनेनंतर म्हणतो, “प्रभूचे वचन जाहीर करा”), आणि असा प्रचार करणारा मेंढपाळ स्थानिक मंडळीच्या जीवनात स्पष्टपणे देवाच्या वचनाच्या शिकवणीशी निगडित आहे:
तेव्हा वचनाची घोषणा कर आणि सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखवून द्या, निषेध करा व बोध करा. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, … (2 तीमथ्य 4:2-3).
आपण ख्रिस्ती उपदेश व शिक्षणयाच्या अगोदरच सिद्ध केलेल्या स्वरूपाकडे दुर्लक्ष करता कामा नये: चुका घडून येण्यापूर्वीच योग्य शिकवण देणे हे सुरू झाले पाहिजे. देवाचे वचन सांगणे आणि शास्त्र शिकवणे हे नियमितपणे केले जाणारे पाळकीय सेवाकार्य आहे. आपण देवाच्या लोकांना आत्मिक अन्न चारतो. त्याचे शास्त्रपाठ म्हणजे हिरवी कुरणे आणि शांत पाणी आहे, जिथे चांगले मेंढपाळ आपल्या कळपाला नेतात. यात येते विश्वासू, अंतःकरणपूर्वक सांगितलेली शिकवण आणि उपदेश — जसे की दररोजचे अन्न व पाणी; नंतर येते कळपाचे रक्षण, जेव्हा विविध प्रकारचे धोके समोर उद्भवतात.
2 तीमथ्य 3:16 मधील नामांच्या मालिकेने पवित्र शास्त्राच्या वापराचे पाळकीय सेवेसाठी चार वेगवेगळे पैलू दर्शवले आहेत, तेव्हा त्यात दुसऱ्या कोणत्याही क्रिया प्रथम येतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. शिकवणे हे पाळकांचे पहिले आणि महत्त्वाचे काम आहे, आणि त्याचे प्रथम येणे आपल्याला या शिक्षणातील मुद्देसूदपणा ओळखायला मदत करतो — प्रथमत: शिकवणे हा तर्कशुद्ध अनुक्रम आहे, त्यानंतर खंडन करणे, सुधारणा करणे, आणि शेवटी प्रशिक्षित करणे.
पुढील: आपल्या चुकांना प्रकाश झोतात आणणे
खंडन करणे हा पुढील महत्त्वाचा टप्पा आहे, तो नकारात्मक आणि प्रतिसादात्मक असून शिक्षणाच्या सकारात्मक आणि पुढाकार घेतलेल्या प्रयत्नांना पूरक ठरतो. पाळक त्यांच्या लोकांना कितीही उत्तम प्रकारे शिकवत असले, तरीही मंडळीमध्ये चुका आणि फसवणुकी उद्भवतातच. या चुका अनेकदा जगातील प्रचलित चुका (किंवा त्या चुकांवरच्या मारक-प्रतिक्रिया) यांच्याशी संबंधित असतात, ज्यांना मंडळीमध्ये कधी-कधी सहानुभूती मिळते.
ख्रिस्ती या नात्याने आपल्यामध्ये पापाचे स्वरूप आहे, जे आपल्यातून स्वतःच चुकांना निर्माण करते. प्रत्येक मंडळी आणि प्रत्येक ख्रिस्ती यांना त्यांच्या विश्वासामुळे, आचरणात निर्दोष आणि दोषपूर्ण अशा दोन्ही प्रकारच्या चुकांमुळे त्रास होऊ शकतो, आणि अशा चुकांना उघड करणे आणि त्यांना प्रकाश झोतात आणणे अत्यंत आवश्यक असते.
या शिकवणीसह जुळवून घेत असताना, गॉर्डन फी म्हणतात की खंडन करणे हे “पाळकीय कार्याचा दुसरा भाग आहे; [पाळक] शास्त्राचा उपयोग करून खोट्या शिक्षकांच्या आणि त्यांच्या शिकवणीतील चुका उघड करतो” (1 आणि 2 तीमथ्य, तीतास पत्र, 13/ 1 & 2 Timothy,Titus,1 ). वचनाच्या माध्यमातून चुकांना उजेडात आणणे हे या दुसऱ्या टप्प्याचे मुख्य कार्य आहे (योहान 3:20; इफिस. 5:11, 13). प्रभावीपणे केलेला उपदेश, शिक्षण चुकांना उघड करतात, पण अशाप्रकारे चुका या कार्याचा केंद्रबिंदू होत नाहीत.
शिक्षण हे भाल्याच्या टोकांप्रमाणे आहे — आणि पुढे सरसावलेला भाला सत्याला असत्यापासून (आणि अर्धसत्यांपासून) वेगळे करतो. हा भाला अप्रकाशित कोपऱ्यांवरदेखील प्रकाश टाकतो, अंधारलेली मने उजळवतो आणि शंकांनी भरलेल्या अंत:करणाला जागृत करतो.
पाळक केवळ प्रचार करून लोकांना पवित्र शास्त्राच्या शिकवणीद्वारे प्रकाशात आणत नाही; तर आमच्यातील आणि आमच्या जीवनशैलीतील उरलेले अंधाराचे कोपरेही उघड करतात. परंतु, अशा चुकांना उघड करताना, संघर्षात्मक किंवा कठोर होण्याची काही एक गरज वाटत नाही. याउलट, पाळकाने दिलेली सक्त ताकीद या पेक्षा (नवीन करारामध्ये केलेल्या जोरदार टीकेपेक्षा) खंडन करणे अधिक सुलभ वाटते. प्रेषित पौल म्हणतो की, तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर तुम्ही मला माझ्या प्रिय मुलांप्रमाणे आहात, म्हणून तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो (1करिंथ. 4:14).
जर कोणी एखाद्याला सक्त ताकीद द्याल तर त्याने त्याला वैरी समजू नये, तर त्याला आपला भाऊ समजून त्याची कानउघाडणी करा (2 थेस्स.3:15); एकमेकांत वैर निर्माण करण्याऐवजी (एकमेकांसोबत हात मिळवणी करून शिक्षण द्यावे, कल.1:28; 3:16). तर मग शहाणे मेंढपाळ, कळपाचे वडील आणि भाऊ या नात्याने आपल्या शिकवणुकीतून आशेने, संयमाने आणि ख्रिस्ती कृपेने चुका उघड करा. खंडन करण्याचे काम करणे म्हणजे पाप करण्यासाठी स्वतःवरील नियंत्रण सोडून देण्यासाठी किंवा शिक्षकाच्या चातुर्याला वाखाणण्यासाठी दिलेला परवाना नाही. खंडन करण्याचा एकमेव उद्देश सत्य आणि प्रेमाने मार्ग दाखवणे आहे, स्वतःला श्रेष्ठ ठरवणे नव्हे.
चांगले पाळक प्रेमाने सहजरीत्या या चुकांना उघड करतात — ते परिस्थितीनुसार सौम्य किंवा कठोरपणे वागतात. (तीत. 1:13 ;2:14). कारण आपल्याकडे एक स्पष्ट, वस्तुनिष्ठ, आणि निश्चित सत्याचा निकष आहे. एका असीम गडद आणि अस्पष्टतेच्या जगात, आपण काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याचा दावा कसा करू शकतो? कारण आमच्याकडे शास्त्र आहे, आणि आम्ही तेच शिकवतो. आपल्या स्वतःच्या क्षमतांवर नव्हे, तर देवाच्या लिहिलेल्या वचनावर आमचा भर आहे. रॉबर्ट यार्बरो यांचे असे म्हणणे आहे, “एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी कोणत्याही पाळकाने कोणत्या आधारावर उभे राहावे? हे एक शास्त्रच आहे, जे त्या वचनाच्या सेवकांना मार्गदर्शन आणि दैवी अधिकार ही आवश्यक भूमिका पार पाडण्यासाठी प्रदान करते,” (द लेटर्स टू तीमथ्य अँड तीतास,687 /The Letters to Timothy and Titus, 687). पाळकांच्या सेवा शास्त्राच्या सत्यावर आधारित असल्यामुळे, त्यांच्या हातात एक विश्वासयोग्य साधन आहे, ज्याच्या आधारे ते चुका ओळखून लोकांना योग्य मार्ग दाखवू शकतात.
योग्य मार्ग दाखवणे
तर आता, आपण पुढील अनुक्रमाकडे वळू या. समजा देवाचे वचन शिकवले जात आहे, आणि या प्रक्रियेत चुका उघड झाल्या आहेत — तर आता पुढे काय करावे? तेव्हा त्यानंतर येते सुधारणेची प्रक्रिया.
सुधारणा हा शब्द ग्रीक (एपानोर्थोसिस/epanorthōsis) या कल्पनात्मक कृतीतून क्रियेकडे जातो, चुकीच्या शिकवणी उघड करण्यापासून ते देवभक्तीच्या जीवनाचा मार्ग दाखवण्यापर्यंत आणि आशेचा मार्ग स्पष्ट करण्यापर्यंत. सुधारणा ही निरोगी होण्याचा, पुन:स्थापना करण्यासाठी सुधारणेसाठी मार्ग आखते, अंधारातून सुटण्यासाठीचा प्रकाशाचा मार्ग दाखवते. यार्बरोच्यामते, “पाळक केवळ खंडन करीत नाहीत: तर ते पुन:स्थापना करतात आणि सुधारणात्मक दिशेने मार्गदर्शन करतात.” फिलिप टाउनर म्हणतात की, सुधारणा म्हणजे “खंडनाच्या नंतरची क्रिया” होय.
इब्री लोकांस पत्र 12:13 मध्ये हाच मूळ शब्द वापरून (ओर्थ-म्हणजे सरळ) असे मांडण्यात आले आहे: “आपल्या पायासाठी सरळ मार्ग तयार करा, जेणेकरून जे लंगडे आहे ते सांध्यातून बाहेर काढले जाऊ नये तर बरे होईल.” सुधारणा म्हणजे तुटलेले हाड पुन्हा योग्य जागी जोडणे होय, जेणेकरून ते योग्यरित्या बरे होऊ शकेल. मुळात खंडन करणे हा सुधारणेचा जोडीदार आहे ज्यात “वर्तणूक, नैतिक बाजूवर भर दिला जातो.” (खंडनामुळे चुका उजेडात येतात, तर सुधारणा पापी लोकांना पुन:स्थापना करण्याच्या दिशेने मार्ग दाखवते. जेव्हा चुका उघडकीस येतात — तेव्हा आपल्याला लक्षात येते की, अरे नाही, मी चुकलो आहे! — हीच सुधारणेची पुढची पायरी आहे.
अशी सुधारणा प्रक्रियात्मक आणि व्यावहारिक वाटू शकते, ती ख्रिस्तामधील देवाच्या कृपेचा संपूर्ण आणि योग्य उपयोग होय — ती ख्रिस्तामध्ये आणि त्याच्या कार्यात आपल्याबाहेर, तसेच आपल्यामध्ये वसणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे आहे. देवाचे वचन आपल्या उघड झालेल्या पापांसाठी क्षमा जाहीर करते आणि आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी बोलावते, जे आत्म्याच्या सामर्थ्याने शक्य होते. देवाच्या वचनाच्या संपूर्ण शिक्षणाद्वारे पाप्यांना दया स्वीकारण्यासाठी आणि कृपेमध्ये उभे राहून चालण्याची शिकवण दिली जाते.
शेवटी: त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रशिक्षण द्या
या चारही टप्प्यांमधील शेवटचा आणि उपदेशात्मक अनुक्रमाचा योग्य निष्कर्ष म्हणजे प्रशिक्षण — जुन्या आणि नवीन करारात (ग्रीक भाषेत पेडिया/Paideia) ही एक व्यावहारिक संकल्पना आहे, ती फक्त शाब्दिकरित्या मर्यादित नाही तर ही “सुधारणेच्या सकारात्मक बाजूशी संबंधित आहे” प्रशिक्षण म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणाची तयारी करणे होय, ज्यामध्ये “देवाच्या स्वतःच्या स्वभावाचे (त्याचे ‘धार्मिकतेचे’) प्रतिबिंब दाखवणारी कृत्ये आणि सवयी विकसित केल्या जातात, जेणेकरून त्या त्याच्या लोकांशी असलेल्या नात्यांमध्ये प्रकट होतील”(यार्बरो,688 / Yarbrough, 688).
येशूने आपल्या शिष्यांना, त्याच्याबरोबरच्या काळात प्रशिक्षण देऊन सांगितले (मत्तय 13:52; लूक 6:40). म्हणून आपल्या लोकांनी ख्रिस्ती परिपक्वतेकडे मार्गदर्शन करण्याचा उद्देश आहे. आणि मानवी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात परिपक्वता आपोआप येत नाही, तर जाणीवपूर्वक प्रशिक्षित केल्यानेच येते (इब्री लोकांस पत्र 5:14). खरे पाहिले तर शिस्त काय करते, ती शिष्याला बदलते. ती आत्म्याला आणि त्याच्या विचारांना आकार देऊन पुन्हा प्रवाहात आणण्याचे काम करते — आणि कालांतराने यात प्रचंड बदल घडवून आणते. अशा प्रकारचे प्रशिक्षण सहसा सोपे नसते, परंतु आपल्यासमोर ठेवलेल्या बक्षिसाच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी अस्वस्थतेच्या क्षणांमध्ये, अगदी वेदनांमध्येही टिकून राहणे आवश्यक असते (इब्री लोकांस पत्र 12:11).
त्याच प्रमाणे, प्रशिक्षणामध्ये ज्या गोष्टीला आपण कदाचित अधिक संकुचितपणे शिस्त म्हणू शकतो आणि शिस्तीला आपण साधन म्हणून व शिक्षेला शेवट म्हणून ओळखतो (इब्री लोकांस पत्र 12:3-11). त्याचा समावेश आहे यात काही एक शंका नाही (1करिंथ.11:32). पाळकीय प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया सर्वसमावेशक आणि रचनात्मक आहे, केवळ प्रतिसादात्मक नाही तर समग्र धार्मिक प्रशिक्षण आहे, ती केवळ बौद्धिक तत्वांवर आधारित नाही.
धार्मिकतेचे हे प्रशिक्षण — धार्मिक जीवन जगणे, ख्रिस्ती जीवनशैली —या शिकवणीपासून सुरू होते, परंतु केवळ आपल्या शब्दांनी संपत नाही. आपल्या लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी, आम्ही पाळकांनी लोकांमध्ये असणे आवश्यक आहे आणि आपल्यात आपले लोक असणे आवश्यक आहे (1 पेत्र 5:1-2). पवित्र शास्त्रानुसार कसे जगावे आणि नंतर आपल्या दैनंदिन जीवनात ख्रिस्ती वर्तनाचे प्रतिरूप कसे असावे, हे आम्ही पाळकीय संघ म्हणून एकत्रितपणे मंडळीला शिकवतो (1 पेत्र 5:3; तीत 2:7).
संपूर्ण कळपाची काळजी घेत असताना — शिकवण देणे, सल्ला देणे आणि उदाहरणाद्वारे — “आम्ही विश्वासू पुरूषांना [मूलभूत सत्य] सोपवतो, जे इतरांनाही ते शिकवू शकतील” (2 तीमथ्य 2:2). म्हणजेच, आम्ही भविष्यातील पुढाऱ्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छितो, व्यावसायिक आणि अव्यावसायिक, जे आमच्या कामात सामील होतील आणि तेच ते काम करतील अशी आम्हाला आशा आहे. आपण गेल्यानंतरही बर्याच काळासाठी जे देवाच्या वचनाचा चांगल्याप्रकारे वापर करून धार्मिकतेचे शिक्षण देतील, खंडन करतील, सुधारणेसाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी अशा लोकांना उभे करण्यासाठी आपण मेहनत करतो.
लेखक
डेव्हिड मॅथिस