तरुणांसाठी एक मार्गदर्शन
लेखक
स्कॉट हबर्ड
काही जण याला “सौंदर्य पूर्वग्रह” असे म्हणतात तर इतर काहीजण “लुकिझम म्हणजे रूपद्वेष” हा शब्द वापरणे पसंत करतात. खरोखरच, दोन्ही प्रकारे, गेल्या काही दशकांतील अनेक अभ्यास एका ठोस मुद्द्यावर भर देतातः अनेक वेळी सुंदर असण्याचा फायदा मिळतो.
जितके आपण शारीरिकदृष्ट्या अधिक आकर्षक असाल, तितके आपल्याला मुलाखती आणि नोकरीच्या संधी अधिक प्रमाणात मिळतील, वेतनवाढ मिळेल आणि कर्जाची मंजुरी मिळण्याची शक्यता जास्त असते, जरी आपल्यासह इतर देखील तितकेच पात्र असले तरीही. एका अवचेतन पातळीवर (जेथे पूर्वग्रह दडलेला असतो) तेथे आपण सुंदरतेकडे आकर्षित होतो. आपण गोऱ्या रंगाला पसंती देतो. आपण सुंदर व देखण्यांना प्राधान्य देऊन पक्षपात करतो —केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर इतर अनेक प्रकारे दिसून येते.
पण हे सांगण्यासाठी आम्हाला अभ्यासाची खरंच गरज नव्हती, नाही का? प्राचीन काळापासून बुद्धिमान लोकांनी आपल्याला सावध केले होते की, आपला बाह्यरूपावर आणि देखणेपणावर मोहित होऊन अडकून जाण्याचा स्वभाव आहे. आपण गोर्या त्वचेला प्राधान्य देतो, पण खर्या गाभ्याला दुर्लक्षित करतो. हा धोका पुरुषांसाठी, विशेषतः तरुण पुरुषांसाठी, अधिक तीव्र असू शकतो, मग ते अविवाहित असोत किंवा विवाहित. आम्ही तरुण पुरुष दृष्टिवादी प्राणी आहोत, आणि आमच्यापैकी बरेच जण अजूनही शिकत आहेत की, आकर्षण किती फसवे असू शकते आणि सौंदर्य किती व्यर्थ असू शकते (नीतिसूत्रे 31:10). शहाणपण माणसाच्या दृष्टिकोनात खोली आणते, पण शहाणपण येण्यास वेळही घेते.
ह्याच प्रक्रियेला गती देण्यासाठी नीतिसूत्रांचे पुस्तक तरुणांच्या मदतीला धाऊन येते आणि एक धाडसी पाऊल उचलते. त्यात म्हटले आहे की, “तारतम्य नसलेली सुंदर स्त्री” (नीतिसूत्रे 11:22). बाहेरून गोरी, आतून मूर्ख, अशी स्त्री अनेक लोकांच्या नजरा खेचते—आणि बहुतेक नजरांना वरवरच खिळवून ठेवते. ती चांदीसारखी चमकते, सोन्यासारखी झळाळते.
पण आता, नीतिसूत्रे म्हणते, एक पाऊल मागे सरकून नीट पाहा. हे लक्षात घ्या की तिचे सौंदर्य काहीतरी मोठ्या गोष्टीचा भाग आहे: “डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.”
सोन्याच्या अंगठ्या आणि भयाण डुक्कर
जर अशा प्रतिमेने आपल्याला धक्का दिला असेल तर ते अधिकच उत्तम ठरेल. कारण ह्याचा उद्देश तोच आहे. डुकराच्या नाकातील अंगठी आपल्याला वेगळ्या दृष्टीकोनातून त्रास देईल असे मानले जाते. आपण सामान्यत: मूर्ख सौंदर्याला “थोडे निराशाजनक” म्हणू शकतो, डेरेक किडनर इतके पुढे जाऊन म्हणतात की, “पवित्रशास्त्र तिच्याकडे एक विक्षिप्त विकृती म्हणून पाहते” (नीतिसूत्रे, 88). जोपर्यंत शारीरिक सौंदर्य अंतर्गत मूर्खपणावर पडदा घालतो, तोपर्यंत ते डुकराच्या नाकातील सोन्याच्या दागिन्यासारखेच आहे—एक सुळे असलेल्या जनावरावरीलसोने, किंवा डुकराच्या नाकातील अलंकार असे आहे.
ही प्रतिमा काही अंशी आपल्याला आश्चर्यचकित करते, कारण एक भाग असा आहे की देवाने आपल्याला बाह्य सौंदर्य पाहण्यास आणि त्याची प्रशंसा करण्यास खरंच प्रवृत्त केले आहे, तसे सौंदर्यवान असणे हे काही वाईट नाही. देवाने जेव्हा एक भव्य जग निर्माण केले, तेव्हा मानवी आकर्षण हे सृष्टीतील सौंदर्य, समरसता आणि संतुलनाच्या तत्त्वांना स्पर्श करणारे असते, जे आपल्याला सहजपणे दिसून येते. सौंदर्याचा उल्लेख करण्यास पवित्र शास्त्र अजिबात संकोच करत नाही— “राहेल रूपवती आणि दिसण्यास सुंदर होती” (उत्पत्ती 29:17), किंवा अबीगईल “समजूतदार आणि सुंदर होती” (1 शमूवेल 25:3), किंवा “दावीद गव्हाळ रंगाचा होता, त्याचे डोळे सुंदर होते, आणि तो देखणा होता” असे नमूद केले आहे (1 शमुवेल 16:12). यामध्ये सुंदरता आणि आणखी बरेच काही, त्यांच्या निर्मात्याच्या गौरवाने चमकतात, ह्या बाबीला ऑगस्टीनने “सर्व गोष्टींचे सौंदर्य” असे संबोधले होते (कबुलीजबाब, 3.6.10/ Confessions.6.10; संदर्भ: स्तोत्र 27:4; यशया 33:17).
देवाच्या आदर्श रचनेत, बाह्य सौंदर्य हे अंतर्गत प्रतिष्ठेचे प्रतिबिंब आहे — आणि आजच्या काळातही बर्याच वेळा सौंदर्य अशाच प्रकारे कार्य करते. पण ह्या पतीत जगात,जेथे “डोळ्यांची वासना” अनेकदा आपल्या दृष्टीकोनावर राज्य करते. (1 योहान 2:16), आणि जेथे बाह्य वैभव बर्याच वेळा देवविरोधी अंतःकरणलपवते, तेथे पवित्रशास्त्र आपल्याला दृष्टीवर लवकर विश्वास ठेवू नये असा इशारा देते. काही तेजस्वी सौंदर्य दिशाभूल करते; काही सोन्याच्या अंगठ्या डुकराच्या नाकात लटकलेल्या असतात आणि पर्यायाने काही खोल सौंदर्य वरवरच्या दृष्टीच्या पुरुषांपासून लपलेले असते. एक शहाणी आई नीतिसूत्रांमध्ये सांगते,
सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे,
परंतु परमेश्वराचे भय बाळगणार्या स्त्रीची प्रशंसा होते. (नीतिसूत्रे 31:30).
हे वचन तरुणांसाठी शहाणपणाचा खजिना आहे. येथे अविवाहित पुरुष शिकतात की, त्यांनी कोणत्या प्रकारच्या स्त्रीचा पाठपुरावा करावा (आणि कोणत्या स्त्रीपासून डोळे फिरवावेत) — आणि विवाहित पुरुष आपल्या पत्नीकडे शहाणपणाच्याखोलीने पाहण्यास शिकतील.
निरर्थक आणि फसवणारे सौंदर्य
वरवर पाहता, नीतिसूत्रे 31:30 थोडे गोंधळात टाकणारे वाटते “सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे,” — बाह्य आकर्षणाविरुद्धचा हा निष्कर्ष व्यापक वाटतो. परंतु पवित्र शास्त्र इतरत्र बाह्य सौंदर्याची प्रशंसा करते (जसे आपण पाहिले आहे), आणि नीतिसूत्रांमध्येही तरुणाला त्याच्या “सुंदर” पत्नीमध्ये आनंद मानायला सांगते (नीतिसूत्रे 5:19). नीतिसूत्रे 31:30 मध्ये सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे,” अशा शब्दांत वर्णन केले आहे. तर मग कोणत्या प्रकारचे सौंदर्य भुलवणारे असते आणि आपण कोणत्या प्रकारच्या सौंदर्याचा आनंद घ्यावा? कोणत्या प्रकारचे सौंदर्य व्यर्थ आहे आणि आपण कोणत्या प्रकारच्या सौंदर्याचे कौतुक केले पाहिजे?
सर्वप्रथम, नीतिसूत्रे आपल्याला सावध करते की, कोणतेही सौंदर्य किंवा जे परमेश्वराचा आदर करत नाही, त्याच्यापासून दूर राहावे. जर एखाद्या स्त्रीचे सौंदर्य हे ख्रिस्ताच्या अधीन नसेल, आणि तिचे सौंदर्य शांतपणे देवावर अभिमान बाळगत नसेल, तर तिचे सर्वोत्तम सौंदर्य पोकळ ठरते. ते डोळे वरच्या बाजूला नव्हे तर खाली ओढतात. ज्या देवाने त्यांना ते देऊ केले आहे, त्याच देवाचा ते विश्वासघात करतात.
विशेष बाब म्हणजे, जेव्हा देव भक्तीचा अभाव असतो, तेव्हा सौंदर्य फसवे बनते, हा शब्द बर्याचदा तोंडी खोटेपणा प्रकट करते. ह्या संदर्भात हे खोटेपण ऐकण्यापेक्षा दिसण्यातून प्रकट होते. असे लोक जे केवळ बाह्य सौंदर्याचा पाठलाग करतात, ते देवाकडे जाण्याऐवजी देवापासून दूर नेणार्या गोष्टीकडे कसलीही पर्वा न करता, भ्रमाच्या खोट्या विळख्यात अडकतात. तसेच देव भीतीशिवाय सौंदर्य हे ‘व्यर्थ’ ठरते. उपदेशकाच्या पुस्तकात हा शब्द वेगवान वाऱ्यासारखा झपाट्याने येतो, ते यावर जोर देतो की सौंदर्याचे व्यर्थपण हे त्याच्या अल्पकाळ टिकण्यात आहे. “सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे.” (यशया 40:6); आज आहे, उद्या नाही; आज गुळगुळीत, उद्या सुरकुटलेले; आज सोनेरी तर उद्या करडे. जे सौंदर्यासाठी धडपड करतात, पण त्या सौंदर्याच्या देवावर प्रेम करत नाहीत, ते वाऱ्याला अडवण्याचा प्रयत्न करतात.
दुसरे म्हणजे, जरी नीतिसूत्रे 31:30 आकर्षण आणि सौंदर्याचा विरोध परमेश्वराचा आदर करणाऱ्या स्त्रीशी करत असले, तरी अशा स्त्रीमध्ये देवभीरू पुरुषासाठी आकर्षणाची कमतरता कधीच नसते. केवळ देवभीरू तरुण पुरुषाने त्याच्या पत्नीत आकर्षण शोधायचे आहे असेही नाही (नीतिसूत्रे 5:19), तर नीतिसूत्रे 31मधील स्त्रीत देखील एक प्रकारचे तेज आहे. “बल आणि प्रताप हे तिचे वस्त्र आहेत,” असे आपण वाचतो (नीतिसूत्रे 31:25). ज्यामध्ये “प्रताप” हा शब्द बर्याच वेळा ‘तेज’ ह्या उद्देशाने देखील वापरला जातो (स्तोत्र 21:5; यशया 2:10; 35:2).
देवभीरू स्त्रीचे आकर्षण आणि सौंदर्य, मात्र, ऐहिक नजरेने अपेक्षित सौंदर्यापेक्षा वेगळे असते. जेथे विवेकशून्य सौंदर्य स्वतःला दाखवण्यासाठी सजते, तेथे देवभीरू सौंदर्य हे एक शांत तेज असते, ते एक गुप्त गौरवाच्या रूपात जे लगेचच नजरेत येत नाही. पण जशी आपली नजर देवासारखी होते, तशी आपण या पतित युगाच्या झळाळणाऱ्या सौंदर्याकडे पाठ फिरवतो आणि त्या सौंदर्याचे मोल करतो जे कधीही सुरकुटत नाही, वाळत नाही किंवा करडे होत नाही.
आत्म्याच्या खोलीतील सौंदर्य
जर मूर्ख पुरुष केवळ बाह्य रूपावर आपली नजर लावतात, तर शहाणपणाचा मार्ग स्त्रीच्या त्वचेपलीकडे, तिच्या आत्म्यापर्यंत पाहण्यातून सुरू होतो. ह्याच आत्म्यामध्ये, “सदगुणी” स्त्रीचे खरे श्रेष्ठत्व दडलेले आहे (नीतिसूत्रे 31:10). हा एक असा दागिना आहे, जो वयोमानाने गंजत नाही, एक असा मुकुट आहे जो कोणीही चोरू शकत नाही.
अर्थातच, आत्म्याचे सौंदर्य पाहण्यासाठी वेळ आणि लक्ष लागते; ते गोऱ्या त्वचेइतकी चमकत नाही. पण जे पुरुष धीराने पाहतात, त्यांच्यासाठी हे सौंदर्य चमकतेच. नीतिसूत्रे 31 मधील स्त्री सुंदर आहे, पण तिचे सौंदर्य तिच्या दिसण्यातून नाही, तर तिच्या कृतीतून दिसून पडते. डुकराच्या नाकात सोन्याची अंगठी असलेली स्त्री बाह्य रूपावर खूप मेहनत करते, या प्रक्रियेतून जात असताना तिची नखे पूर्णपणे खराब होणार असली तरीही त्या परिपूर्ण नखांची आहुती देते. (वचने 13,16). ती देवाचे कौशल्य तिच्या घरासाठी आणि बाजारपेठेसाठी लागू करते (वचन 18, 21, 24). ती गरिबांना भेटवस्तू आणि मुलांना शहाणपण देते (वचन 20, 26). ती परमेश्वराचा आदर करते (वचन 30).
कदाचित, अबीगईलप्रमाणेच तीही परमेश्वराला घाबरते आणि डोळ्यांना आकर्षित करते (1 शमूवेल 25:3), किंवा कदाचित तिचे बाह्य सौंदर्य रूप सौम्यमय असेल. दोन्ही प्रकारे, जेव्हा एखादा देवभीरू पुरुष तिच्याकडे पाहतो, तेव्हा त्याला एक तेजस्वी सौंदर्य दिसते, जे विहिरीसारखे खोल आहे आणि भूमिगत नदीसारखे सामर्थ्यवान आहे. सोन्याच्या अंगठीची चमक शोधत मूर्ख पुरुष तिच्या जवळून झटपट पुढे निघून जातात, (आणि डुक्कर पाहत नाहीत). पण ज्या पुरुषाला ती पाहण्याची नजर आहे, त्याच्यासाठी ती स्त्री एका ‘सुंदर हरिणी, एका गोजिरवाण्या पाडसासारखी आहे’ (नीतिसूत्रे 5:19).
ह्याचा अर्थ असा होत नाही की, प्रत्येक देवभीरू पुरुषाने प्रत्येक देवभीरू स्त्री कडे प्रणयभावाने पाहावे. पवित्रता आपल्याला बाह्य सौंदर्याबाबत आंधळे करत नाही, आणि शारीरिक सौंदर्य आकर्षणात महत्त्वाचे (जरी गुंतागुंतीचे) स्थान घेते. पण जर आपण ख्रिस्ताचे आहोत, तर आपल्याला माहीत आहे की, जेथे इतरांना सौंदर्य दिसत नाही, तेथे सौंदर्य शोधल्याने कसे वाटते. ‘त्याचे रूप आणि सौंदर्य असे काही नव्हते की, आम्ही त्याची इच्छा धरा’ (यशया 53:2), पण अरे, तो किती सुंदर होता! (यशया 52:7), जर आपण ख्रिस्ताच्या अनपेक्षित गौरवाने मोहित झालो आहोत, तर केवळ वरवर पाहण्याइतके उथळ कसे राहू शकतो?
खूप अधिक सुंदरता आत आहे आणि आश्चर्यकारकपणे, जे ह्या सौंदर्याचे दर्शन घेतात, त्यांना हे सौंदर्य इतर सगळ्या गोष्टींवरही प्रकाश टाकताना दिसते.
त्वचेमध्ये उमटलेलं रूपांतर
देवभीरू पती आपल्या देवभीरू पत्नीला जितका ओळखतो, तितकेच तिचे बाह्य रूप स्थिर राहत नाही आणि तिचे आंतरिक सौंदर्यही केवळ आतचराहत नाही, ह्याची त्याला जाणीव होते. कालांतराने तिच्या आत्म्याचे वैभव कंदीलाच्या प्रकाशाप्रमाणे तिच्या त्वचेच्या फटींमधून झिरपते आणि मग तिचे अंतर्गत व बाह्य सौंदर्य एकत्र येऊन निखळपणे खेळू लागतात.
नीतिसूत्रे आपल्याला असेच अपेक्षित करायला शिकवते, तर पित्याचा आपल्या तरुणपणीच्या पत्नीबाबत दिलेला आदेश दुसर्या रीतीने अधिक योग्य समजवता येईल का? —‘तुझ्या झर्याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो (नीतिसूत्रे 5:18–19)? जेव्हा तुमच्या तारुण्यातील पत्नी तरुण राहणार नाही तेव्हा तिचे हृदय तिचे सौंदर्य जपेल, आणि तिचा देह तिच्या हृदयाचे प्रतिबिंब असेल. विवाहाच्या अनेक दशकांनंतरही, तिचे करडे केस ही तिच्या जुन्या सौंदर्याची राख नसून, तिच्या डोक्यावरचा ‘गौरवाचा मुकुट’ असतात (नीतिसूत्रे 16:31), विशेषतः त्या पतीसाठी ज्याने तिला राणी मानले आहे. तिचा आत्मा तिच्या त्वचेला तेजोमय ठेवण्याचे काम करते.
हा सतर्क, संयमी दृष्टिकोन — स्त्रीच्या अंतःकरणात डोकावून, त्या खोलीतून खजिना उचलून वर आणण्याची नजर — हे इतर काही नसून परमेश्वराच्या दृष्टिकोनाचाच एक भाग आहे. ‘परमेश्वर मानवासारखा पाहत नाही’ (1 शमुवेल 16:7). ‘मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.’ हेच त्याचे समाधान आहे; ‘सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी. त्याला ती प्रिय आहे (1पेत्र 3:4). आणि आम्ही पुरुष—पती, पिता, भाऊ, आणि पुत्र—युगभर सौंदर्याची खरी कथा सांगण्याचे विशेषाधिकार उपभोगतो, तेही अशा काळात जेव्हा जगात फक्त त्वचेलाच महत्त्व दिले जात आहे.
हे जग स्त्रियांना खरे सौंदर्य हे बाह्य रूपावरच अवलंबून आहे, हा सौंदर्याबद्दल एक खोटा संदेश सांगते. आपल्या पत्नी, मुली, बहिणी, आणि माता हे सर्वजण अनेक मार्गांनी हे ऐकतात आणि त्यांना सोन्याच्या अंगठीसारखे होण्यासाठी प्रोत्साहित करतात व ती कोणाच्या अंगठ्यात असेल ह्याची पर्वा न करण्यासाठीही सांगितले जाते. आणि आम्ही पुरुष ह्या खोट्या गोष्टींना मान्यता देऊ शकतो, किंवा त्या नाकारू शकतो.
आम्ही सुंदरतेला झुकते माप देऊ शकतो. एखाद्या स्त्रीचे तिचे रूप आमच्या अपेक्षित प्रकाराशी जुळत नाही म्हणून आम्ही तिच्यासोबत लग्न करणे नाकारू शकतो ( ह्या प्रक्रियेत आपल्या इच्छांना अपरिवर्तनीय मानून). आपल्या पत्नीच्या बदलत्या स्वरूपाबद्दल आपण सूक्ष्म नाराजी व्यक्त करू शकतो किंवा आम्ही नीतिसूत्रे 31 मधील पतीसारखे उभे राहू शकतो आणि आकर्षणाचे किंवा केवळ बाह्य सौंदर्याचे नव्हे, तर ‘परमेश्वराचा आदर करणाऱ्या स्त्रीची’ स्तुती करू शकतो (नीतिसूत्रे 31:30).
तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको. (मत्तय 13:43)—आणि तिचा देह तिच्या ख्रिस्तासारख्या तेजस्वी हृदयाशी पूर्णपणे जुळेल.