पवित्र शास्त्र: हरवलेल्या ध्यानाची एक कला
“मला आज काही केल्यासारखे जाणवतच नाही.”
आपण कितीदा हा सबब अगदी सहजपणे वापरला आहे? आपल्यापैकी बरेच जण आळशी हृदयाचे बळी म्हणून स्वतःला पटकन बघू शकतात.
आता, एका आळशी हृदयाशी शांतता साधणे ही एक अतिशय विचित्र गोष्ट आहे, तरीही आजकाल हे एक सामान्य गृहीतक बनले आहे आणि सहसा त्यावर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. आपल्या न्याहारीच्या वेळी टोस्टवर शेंगदाणा लोणी हवे आहे की नाही याबद्दल बोलत असल्यास ही फार मोठी गोष्ट असू शकत नाही. पण जेव्हा हे देवाकडे दुर्लक्ष करण्यासाठी, त्याच्या वचनात, प्रार्थनेत किंवा ख्रिस्ती सहभागीतेत सहभागी होण्यासाठी कारण म्हणून वापरले जाते, तेव्हा त्याचा फार मोठा परिणाम होतो.
विशेषतः हा सबब त्याच्या वचनात प्रभूचे वचन ऐकून दिवसाची सुरुवात करण्याच्या आत्मिक आरोग्याच्या सवयींना बाधा आणतो. कारण आपण आपले मन मार्गदर्शित न करता आणि त्याला बदलण्याचे ठरविण्याऐवजी, स्वतःच्या अस्थिर मनाच्या अधिपत्याखाली वागण्याची सवय आपण आपल्याला लावून घेतली आहे. ज्यामुळे आपल्यातील काही ख्रिस्ती दुर्बल आणि अशक्त झाले आहेत.
तुमचे आपुलकीचे प्रेम
आपल्या सखोल आध्यात्मिक आणि अंतर्दृष्टिपूर्ण पुस्तकात, Prayer: Experiencing Awe and Intimacy with God (2014) / प्रेयर: एक्सपिरीयन्स ऑ अँड इंटीमेसी विथ गॉड (2014) मध्ये, दिवंगत टिम केलर आपल्याला थोर इंग्रजी धर्मशास्त्रज्ञ जॉन ओवेन (1616-1683) यांचे एक असे रूप दाखवतात जे आधुनिक गृहितकांपासून अगदीच भिन्न आहे. केलरच्या मते, ओवेन यांनी “मला आज काही केल्यासारखे जाणवतच नाही.” हा सबब पटकन मान्य केला नसता. खरेतर, त्यांनी त्याला प्रबळ उत्तर दिले असते—आणि त्यामधून आपण खूप काही शिकू शकलो असतो.
ओवेन यांनी किमान एवढे ठामपणे विचारले असते की, खरोखर आपल्या सुरुवातीच्या काळात उद्भवणाऱ्याभावनांना काही महत्त्व आहे का? अगदी खात्रीने सांगतो, त्यांनी कधीच देवाच्या वचनाकडे (किंवा प्रार्थनेत, मंडळीमध्ये) दुर्लक्ष करण्यास आणि फक्त आपल्या मनाच्या आध्यात्मिकतेच्या इच्छांनुसार वागण्यासाठी कोणालाही प्रोत्साहन दिले नसते. त्याऐवजी, केलर यांच्या सारांशानुसार, त्यांनी सांगितले असते, “पर्यंत तुम्ही आनंदाच्या शिखरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ध्यान करा.” आपल्या हृदयात उद्भवणाऱ्या छिन्न-विच्छिन्न विचारांनी हिम्मत हरवून जाऊ नका तर त्या विचारांवर ताबा मिळवून त्यांना आणि योग्य दिशेने निर्देशित करा. पवित्र शास्त्र उघडा आणि आपले संपूर्ण लक्ष देवाकडे लावा, जो सर्वश्रेष्ठ आहे आणि अध्ययन करून, आपले मन येशूवर केंद्रित करा, जोपर्यंत आपले आळशी मन आपल्याला हवे तसे प्रतिसाद देत नाही.
आजच्या नवीन पिढीला “तुमच्या हृदयाचे अनुसरण करा” असा सल्ला दिला जातो, आणि यामुळे कालांतराने आपल्या अंतर्गत इच्छा आणि त्यांच्या अस्थिरतेवर आधारित बाह्य गोष्टींमुळे, वस्तुनिष्ठ जगाला नव्याने आकार देण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
आपण ख्रिस्ती लोकदेखील ह्या बाबींना विशिष्ट मार्गाने “जोडलो गेलेलो” आहोत असे सांगून ह्या विचारांचे मनोमन समर्थन करतात? खरोखर, देवाने आपल्याला काही मार्गांनी जोडले आहे. नक्कीच, देवाने आपल्याला काही विशिष्ट पद्धतीने बनवले आहे. परंतु आपण अनेक वेळा त्या गोष्टींवर हार मानतो ज्या आपण खरोखर बदलू शकतो; पण जग आपल्याला ह्यात मदत करत नाही. आपला समाज आपण ज्या ठिकाणी प्रबळ आहोत (जसे की बायोलॉजिकल सेक्स/जैविक लिंगभेदता) त्या ठिकाणी लवचिकतेचा भास करू लागला आहे आणि ज्या ठिकाणी आपण खरोखरच लवचिक आहोत (इच्छा आणि आनंद) त्या ठिकाणी दृढ जोडणी केली गेली आहे, असे नाटक करून भासवत आहे.
ह्यापूर्वी न्युरोप्लास्टिसिटीबद्दल कधीही बोलले गेलेले नव्हते. पण आधीपासूनच , ओवेनला ‘इच्छा व आनंदातील लवचिकता’ या संकल्पने विषयीचे ज्ञान होते—म्हणजेच तुमच्या इच्छा व आनंद हे काही कायमचे नसतात. ते निखळ आहेत. आपण त्यांना पुन्हा आकार देऊ शकतो आणि पुनर्रचनाही करू शकतो. एखाद्या क्षणात तुम्हाला काहीतरी जाणवावे यासाठी तुम्ही लगेच तुमची इच्छा बदलू शकणार नाही, परंतु काळानुसार तुम्ही तुमच्या हृदयाला आकार देऊ शकता. अहो, तुम्ही करू शकता. तुमच्या चांगल्या-वाईट इच्छांना स्थिरता नाही. काळाच्या ओघात विस्तारलेले, असंख्य निर्णयांचे मिश्रण म्हणून, ते आश्चर्यकारकपणे (आणि न विसरता) निवडले जातात.
आपल्या हृदयाची पुनर्रचना करा
प्रार्थना या पुस्तकाच्या दहाव्या अध्यायात, केलरने ओवेनच्या पूर्व-आधुनिक अंतर्दृष्टीला आपली टिप्पणी जोडली. जेणेकरून ध्यानधारणेद्वारे आपल्या प्रार्थनेसह देवाच्या वचनाने विवाहाविषयी अत्यंत आवश्यक दृष्टीकोन मिळेल. आपल्या मनाची निर्मिती आणि सुधारणा करण्याचा हा दृष्टीकोन आहे,जो आज वाचकांना आव्हान देईल, हे अनेकांना निराश करेल, परंतु काहींना नक्कीच प्रेरणा देईल.
सर्वसाधारणपणे, आपण आपल्या मनाचा आणि त्यात उद्भवणार्या विचारांचा खूप साधेपणाने विचार करतो. आम्ही असे म्हणतो की, आम्ही शरीराला प्रशिक्षित करू शकतो. खरं तर, आपण नेहमीच शरीराला प्रशिक्षण देत आहात, मग ते चांगले असो किंवा वाईट आणि बहुतेकजण हे मान्य करतील की आपण मनाला प्रशिक्षित करू शकतो —“मन एक स्नायू आहे”. आपण ते एखाद्या विशिष्ट वस्तूवर स्थापित करू शकतो आणि ते तेथे स्थिर ठेवण्यास शिकू शकतो, त्यासाठी सराव करावा लागेल. देवाच्या वचनाशी आपल्याला जसे जोडले पाहिजे तसे सहभागी होण्यासाठी असे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे आणि त्या अनुषंघाने काही कौशल्ये विकसित करणे देखील गरजेचे आहे.
आणि त्याहीपेक्षा वादग्रस्त, आपण आपल्या अंतःकरणाला केवळ पापी भावना टाळण्यासाठी नव्हे तर मनोरंजन करण्यासाठी धार्मिक भावनांमध्ये देखील प्रशिक्षित करू शकतो. केलरने ओवेनचा सारांश सांगितल्याप्रमाणे आपल्यासमोर पवित्र शास्त्र उघडे ठेवून तुम्ही “आनंदाच्या ठिकाणी मनन करणे ” हे शिकू शकता.
ध्यानाचे तीन टप्पे
काही सुजाण ख्रिस्ती नियमितपणे त्यांच्या पवित्र शास्त्राचे वाचन करण्याचा प्रयत्न करतात; पण त्यांना त्यांना त्यामध्ये विलक्षण अनुभव येत नाही, (जर काही असेल तर), आणि मग काहीजण लहान, उथळ प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. सी.एस. लुईस प्रमाणे ओवेन देखील म्हणतील, आपण खूपच सहजपणे समाधान मान्य करत आहोत — म्हणजे, जर तुम्हाला काही समाधान मिळाले असेल तरच. याउलट, ओवेन आपल्याला याकोबासारखे याबोक नदीच्या काठावर जोपर्यंत प्रकाश दिसत नाही तोपर्यंत झुंजावे, असे सुचवतो. आपल्या आळशी आत्म्यासोबत झुंजावे. त्याला मार्गदर्शित करावे. त्याला फिरवावे. त्याच्याशी झुंजावे जोपर्यंत तो त्याचे कार्य करत नाही, आणि मग ते देवाच्या शब्दाच्या आश्चर्यांसह आणि भयांबद्दल योग्य भावनांना अनुभूती देतो. देवाच्या शब्दाच्या म्हणजे देवाला असे म्हणा, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही,” आणि देवाने निर्माण केलेल्या आनंदाला प्राप्त करण्यासाठी आपल्या हृदयाला अनुशासित करा.
आता, ध्यानाच्या या हरवलेल्या कलेला पुनःप्राप्त करण्यासाठी काही स्पष्टीकरण आवश्यक आहेत. ओवेन यांनी अभ्यास, ध्यान आणि प्रार्थना यांच्यात फरक केला. ध्यान म्हणजे देवाचे वचन (वाचन आणि अभ्यासातून) प्राप्त करणे होय आणि त्याला (प्रार्थनेत) प्रतिसाद देणे तो ह्यामधील सेतू आहे.
ओवेन म्हणतात, ध्यानधारणा हे वचनाच्या अभ्यासापासून वेगळे आहे, ज्यामध्ये आपले मुख्य उद्दीष्ट सत्य शिकणे किंवा ते इतरांना जाहीर करणे आहे; आणि त्याचप्रमाणे प्रार्थनेतूनही, ज्यात देव स्वत: तात्कालिक वस्तू आहे. पण ध्यानधारणा… म्हणजे आपल्या स्वतःच्या हृदयाला आणि मनाला प्रेम, आनंद, आणि [नम्रता] यांनी प्रभावित करणे आहे. ते अंतःकरणावर आणि मनावर प्रभाव पाडणारा आहे. (quoted in Keller, Prayer, 152/ क्वोटेड इन केलर, प्रेयर, 152)
ध्यान — हे अध्ययन आणि प्रार्थनेपासून जरी वेगळे असले तरी त्यांच्यासोबत संबंधित असलेल्या गोष्टींना अनुक्रमे तीन टप्प्यांमध्ये विभाजित करता येईल.
1) आपले मन स्थिर करा
पवित्र शास्त्राच्या वाचनाने प्रारंभ करा आणि पुन्हा-पुन्हा चिंतन करा—तुम्ही जितके हळूहळू वाचाल तितके चांगले आणि जेव्हा त्या भागाचे म्हणणे व अर्थ समजून घेण्याच्या संदर्भात काही ज्ञानात अंतर येते, तेव्हा थोडा अभ्यास करावा “सत्य जाणून घ्या” किंवा योग्य प्रकारे मजकूर समजून घ्या. नवशिक्यांना अधिक प्रश्न पडतील, तेव्हा त्यांनी वारंवार थांबून अभ्यास करावा की फक्त वाचन सुरू ठेवावे आणि मार्गक्रमण करत जावे, ही कला त्यांना आत्मसात करावी लागेल. पण मुख्य मुद्दा म्हणजे ध्यानाची सुरुवात देवाच्या शब्दांमध्ये पूर्णपणे तल्लीन होण्यातून होते.
मनाला रिक्त करण्याचा प्रयत्न ही पूर्वेकडील देशांत ध्यानाची एक पद्धत आहे. पवित्र शास्त्राच्या ध्यानासाठी त्याच्या पुत्रात आणि पवित्रशास्त्रात, देवाच्या आत्म-प्रकटीकरणाच्या सत्यतेने मन भरणे आवश्यक आहे. आम्ही फक्त लगेच ध्यान करायला बसत नाही—हे जाणूनबुजून करतो असेही नाही. आपण पवित्र शास्त्रामधून सुरुवात करतो आणि देव आणि त्याच्या पुत्राविषयीचे आपले विचार त्याच्या वचनाच्या मजकुराद्वारे निश्चित करतो.
2) आपले हृदय आकुंचित करा
विचारांना स्थिर करणे हे कठीण असते, परंतु हृदय आकुंचन करणे ही संकल्पना अनेकांसाठी अवघड वाटते. कारण हे करता येत नाही म्हणून नव्हे, तर आपण सामाजिकदृष्ट्या याची शक्यता असूच शकत नाही, असे मानण्यास तयार झालो आहोत. म्हणूनच येथे, ओवेन (आणि केलर) हे थोडेसे प्रभावी व आश्चर्यकारक वाटतात. पण ओवेन आपल्याला सल्ला देतात की, देवाच्या वचनांवर आपले मन स्थिर केल्यानंतर “आध्यात्मिक विचारांत तग धरून राहा जोपर्यंत तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही” (Works of John Owen, volume 7, 393/ वर्क्स ऑफ जॉन ओवेन, व्हॉल्यूम 7, 393). त्याच्या शब्दांचा अनुभव येईपर्यंत ध्यान करा. जोपर्यंत तुम्हाला त्याच्याविषयी अधिक जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत स्वतःला शिकवा. पाहा! हे देवाचे शब्द देवाच्या गौरवाची घोषणा करते का? त्याच्याविषयी आदर बाळगा. काय सुवार्ता पाप्यांना धोक्याचा इशारा देते का? भीतीयुक्त आदर वाटू द्या. सुवार्ता चांगली बातमी जाहीरपणे सांगते का? तर आनंद माना.
एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी, काही कालावधीसाठी ध्यान करणे हे ध्येय नाही, तर आनंदाच्या क्षणापर्यंत ध्यान करणे, “आपल्या ताजेतवानेपण” कायम टिकून राहावे हे ध्येय समोर ठेवा. प्रेषित पेत्र वर्तमानाबद्दल बोलतो, केवळ भविष्याबद्दलच नाही—ख्रिस्ती लोक आता अनुभवत असलेल्या आनंदाबद्दल, या युगात, केवळ येणार् या युगातच नाही — जेव्हा तो म्हणतो, “त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.” (1 पेत्र 1:8). अवर्णनीय, गौरवशाली आनंद आता देखील उपलब्ध आहे, आणि देवाच्या स्वतःच्या शब्दावर आपले मन स्थिर करून आणि आपण ध्यान करून त्याच्याकडून एक स्मित हास्य आणि तसेच आपल्या आत्म्याला काही वास्तविक आनंदाच्या उबदार स्पर्शाने तृप्त करण्याच्या कोणत्याही अन्य उत्तम साधनाद्वारे हा आनंद मिळू शकत नाही.
ज्यांना असे वाटते की हे अशक्यप्राय आहे, त्यांच्यासाठी ओवेन आशा देतात: “[या] कर्तव्यात सातत्य ठेवण्यासाठी क्षमता देईल. जे प्रामाणिकपणे त्याच्या कामगिरीचे पालन करतात, ते प्रकाश, शहाणपण आणि अनुभवात वाढ करतील जोपर्यंत ते मोठ्या यशाने त्याचे व्यवस्थापन करण्यास सक्षम होत नाहीत.” मग केलर स्तोत्रसंहिता 1ह्याचा आधार घेऊन म्हणतो, “जशी झाडे एका रात्रीत वाढत नाहीत तशीच ध्यान ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. जेथे झाड त्याच्या मुळांना पाण्याच्या स्त्रोताकडे खोलवर वाढवते. परिणामी, आपण त्यास चिकटून राहणे गरजेचे आहे. आपण ‘दिवस-रात्र’ नियमितपणे, स्थिरतेने ध्यान केले पाहिजे” (161-162).
प्रश्न केवळ आपल्या पापामुळेच नव्हे तर आपल्या मानवतावादी विचारसरणीमुळे देखील निर्माण होतात. ओवेन याला आपल्या प्रमाणेच, कदाचित त्यापेक्षा अधिक चांगले समजत होते. आमच्या आक्षेपाचा अंदाज घेऊन केलर लिहितात,
ओवेन एकदम वास्तववादी आहे. तो कबूल करतो की कधी-कधी, आपण काहीही केले तरी आपण केवळ एकाग्र होऊ शकत नाही, किंवा आपल्याला असे आढळते की आपले विचार मोठे आणि प्रभावित होत नाहीत, उलट आपल्याला कंटाळा, कठोर झाल्यासारखे आणि विचलित असे वाटते. ओवेन म्हणतो, अशा परिस्थितीत फक्त देवाकडे वळा आणि मदतीसाठी. थोडक्यात तीव्र आवाहन करा. कधी कधी तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळेत एवढेच कराल, हे कधी-कधी मदतीसाठी चिडखोर मनाला एकाग्र करण्याचे आणि हृदय मऊ करण्याचे काम करते (Prayer 161/प्रेयर161).
अधूनमधून वास्तववाद आणि दररोजच्या नकारात्मकतेच्या नमुन्यामध्ये मोठा फरक आहे. आळशी नवशिक्या आणि त्याउलट शहाणे ज्येष्ठ यामध्ये खूपच फरक आहे, ज्याने ध्यानाच्या हरवलेल्या कलेचा अभ्यास केला आहे आणि “कधी-कधी” कोरडेपणा आणि विचलन असूनही नियमितता साधली आहे.
3) आपल्या देवाचा आनंद घ्या
अंतिम टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या आनंदाला (किंवा आर्जवाला) व्यक्त करतो, त्याला मोकळीक देतो. या सत्यासाठी योग्य भावना निर्माण झालेल्या आगीला आम्ही फुंकर घालतो. हे ध्यानाचे शिखरबिंदू आहेत—ख्रिस्तामध्ये देवाचा आनंद लुटणे—ज्यामुळे आपले आत्मे “प्रतिसादात्मक उत्तराने” भरतात. केलर टिप्पणी करतो की, आपण “शब्द ऐकतो, अभ्यास करतो, विचार करतो, त्यावर चिंतन करतो, आणि शास्त्राचा विचार करतो जोपर्यंत आपले हृदय व मनात एक प्रतिसादात्मक उत्तर निर्माण होत नाही” (55, emphasis added/ 55 एंफसिस अॅडेड) — जे आपल्याला प्रार्थनेत घेऊन जाते. केलर यांच्या मते,
प्रार्थनेपूर्वी ध्यान करणे म्हणजे विचार करणे, नंतर हृदय आकुंचीत करणे आणि शेवटी, देवाच्या उपस्थितीचा आनंद घेणे किंवा अनुपस्थिती कबुली देऊन त्याच्या दयेची व मदतीची विनंती करणे यात असते. ध्यान म्हणजे एखाद्या सत्याचा विचार करणे आणि मग त्या सत्याचा विचार आतवर रुजवणे, मग त्याच्या कल्पना “महान” आणि “गोड” वाटू लागतात, प्रभाव टाकतात, आणि देवाची वास्तविकताआपल्या हृदयावर जाणवते (162).
आणि या “देवाच्या हृदयावर जाणवण्याने,” त्याच्या शब्दांवर ध्यान केल्याने, आपल्या प्रार्थनेतील प्रतिसादाला प्रेरणा मिळते.
देवाच्या शब्दांत तल्लीन झाल्याशिवाय, आपली प्रार्थना केवळ मर्यादित आणि उथळच नाही तर वास्तविकतेपासून तुटलेली असू शकते. आपण खऱ्या देवाला प्रतिसाद देत नसून, आपल्याला वाटते त्या देवाला आणि आपले जीवन कसे असावे, त्याला प्रतिसाद देत आहोत. खरोखर, जर आपल्याला आपल्याच मनावर सोडले तर आपले हृदय अशा देवाची कल्पना करण्याकडे वळते, जो अस्तित्वात नाही… प्रार्थनेशिवाय उत्तर देणार्या पवित्र शास्त्राच्या देवाऐवजी आपण फक्त स्वतःशीच बोलत राहू (62).
म्हणून, आपल्या प्रार्थनेला देवाच्या वचनाच्या सेवनाने प्रेरित केले जावे आणि जोडले जावे अशी आमची इच्छा आहे. “जर आपण स्वतःच्या आंतरिक गरजा आणि मानसशास्त्रानुसार प्रार्थनेची सुरुवात केली असती तर आपण पवित्र शास्त्रामधील प्रार्थनेची पूर्ण श्रेणी कधीच तयार करू शकलो नसतो. पवित्र शास्त्रात प्रकट केल्याप्रमाणे देव कोण आहे त्यानुसार आपण प्रार्थनेत प्रतिसाद देत असलो तरच ते निर्माण होऊ शकते” (60).
केवळ सत्यच नाही तर येशू
केलरने या आशीर्वादमय दहाव्या अध्यायाचा शेवट येशूला आपल्या ध्यानाचा मुख्य केंद्रबिंदू मानून केला आहे. स्तोत्र १ मधील आनंदी मनुष्याप्रमाणे देव-मनुष्याने देवाच्या वचनात आनंद तर घेतलाच, पण तो स्वत: “ज्याच्याकडे सर्व शास्त्रवचने निर्देश करतो” (163). ख्रिस्ती म्हणून आपण त्याच्याबरोबर आणि त्याच्यावर चिंतन करायला शिकतो.
आपल्या वाचन, पुनर्वाचन, अभ्यास आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना आपण केवळ सत्यच नव्हे, तर सत्यालाच जाणून घेत राहतो आणि त्याचा आनंद घेत राहतो. ख्रिस्ती लोकांसाठी, आपल्या ध्यानाचा अंतिम केंद्रबिंदू वैयक्तिक आहे आणि येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वात पूर्णपणे मानवी आणि पूर्णपणे दिव्य आहे.
लेखक
डेव्हिड मॅथिस