पवित्रशास्त्रावरील येशूच्या प्रेमातून शिकवण
सारांश: विश्वासू शिष्यत्व म्हणजे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात येशूचे अनुसरण करून त्याचा अधिकार मान्य करणे. यात पवित्रशास्त्राचा आदर कसा करावा, याचाही समावेश आहे. येशूने लोभ आणि विरोधाच्या परिस्थितीत पवित्रशास्त्राचा आधार घेतला. त्याने आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग केला आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तो कोण आहे, त्याने कोणता संदेश दिला आणि त्याने कोणती कामे पूर्ण केली हे पटवून देण्यासाठी, त्याने पवित्रशास्त्राचाच आधार घेतला. पवित्रशास्त्राचे विश्वासूपणे वाचन करणे म्हणजे येशूच्या पावलावर पाऊल ठेवणे आणि त्याने जसा पवित्रशास्त्राचा आदर केला, तसाच आपणही करणे; कारण पवित्रशास्त्र स्पष्टपणे येशूविषयीच भाकीत करते.
आमच्या पाळकवर्गासाठी आणि पुढाऱ्यांसाठी सुरू असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखांच्या मालिकेसाठी, आम्ही सिडनी, ऑस्ट्रेलियातील मूर थिओलॉजिकल कॉलेजचे प्रमुख मार्क डी. थॉम्पसन (डी.फिल, ऑक्सफर्ड विद्यापीठ) ह्यांना विचारले की येशूने पवित्रग्रंथ कसे हाताळले आणि त्याचा दृष्टिकोन ख्रिस्ती ईश्वरीपरीज्ञानाच्या कार्यावर कसा परिणाम करतो.
ख्रिस्ती शिष्य असणे म्हणजे नेमके काय? सर्वात सोप्या भाषेत सांगायचे तर, शिष्य असणे म्हणजे येशू ख्रिस्ताचे अनुसरण करणे होय. ख्रिस्ती शिष्यांना प्रत्येक गोष्टीत आपल्या प्रभूचे अनुसरण करायचे असते, त्याच्या शिकवणुकीतून आणि त्याच्या उदाहरणातून, आपले विचार, भावना आणि वागण्याच्या पद्धती त्याच्याशी एकरूप करायच्या असतात. आपण जगाकडे पाहत असताना येशूला आपल्या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी ठेवणे, त्याचे कार्य आपल्या जीवनाचे प्राधान्य बनवणे, आणि प्रत्येक प्रयत्नात त्याच्या गौरवाला अग्रक्रम देणे, हेच खऱ्या शिष्यत्वाचे लक्षण आहे. ही गोष्ट इतर कोणत्याही शिष्याप्रमाणेच एका ख्रिस्ती ईश्वरीशास्त्रज्ञालाही तितकीच लागू होते.
ख्रिस्ती ईश्वरीपरीज्ञानाची सुरुवात अनेक ठिकाणी होऊ शकते. त्याचा मूलभूत आधार त्रैक्य परमेश्वरातच आहे. फार पूर्वीपासून ईश्वरीपरीज्ञानाची व्याख्या “देवाबद्दलचे ज्ञान आणि देवाच्या संबंधातील सर्व गोष्टी” अशी करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा, आपण परमेश्वराबद्दल जे काही जाणतो, ते त्याने स्वतः प्रकट केल्यामुळेच जाणतो. प्रेषित आणि संदेष्ट्यांद्वारे जे काही सांगितले गेले, ते आपल्याला पवित्रशास्त्रात अधिक स्थिर स्वरूपात पाहावयास मिळते. म्हणूनच, सर्व खरे ईश्वरीपरीज्ञान पवित्रशास्त्रामधून उगम पावते आणि त्याद्वारेच तपासले जाते. त्यामुळे, कोणत्याही ईश्वरीशास्त्रज्ञ विषयावरची चर्चा आपण त्रैक्य परमेश्वराच्या व्यक्तिमत्त्वावर विचार करून किंवा त्या विशिष्ट विषयाबद्दल पवित्रशास्त्र काय सांगते ह्यावर विचार करून सुरू करू शकतो.
परंतु ईश्वरीपरीज्ञानाला ख्रिस्ती ईश्वरीपरीज्ञान बनवणारी विशेष गोष्ट म्हणजे देवाचा देहधारी पुत्र आणि जगाचा तारणहार असलेल्या येशू ख्रिस्ताला दिलेले महत्त्वाचे स्थान होय. त्रैक्य परमेश्वराचे प्रकटीकरण येशूमध्ये केंद्रित होते (योहान 1:18; इब्री 1:1-3; 2 करिंथ 1:20), तोच आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीत निर्भयपणे जाण्यासाठी सक्षम करतो (इफिस. 3:11-12), आणि त्यानेच जुन्या पुष्टी दिली (लुक 24:44), व नवा करार निर्माण करणाऱ्या प्रेरित कार्यासाठी आदेश दिला (मत्तय 28:19-20). येशूने काय शिकवले ह्यावर लक्ष केंद्रित करणे, हीच ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञाने विश्वासू शिष्यत्व प्रदर्शन करण्याची पद्धत आहे.
पवित्रशास्त्राबद्दल येशूचा दृष्टिकोन
धर्मशास्त्राच्या या समजानुसार, जेव्हा आपण पवित्रशास्त्राचे स्वरूप आणि कार्याबद्दल विचार करतो —म्हणजेच “ख्रिस्ती; पवित्रशास्त्राचा सार्वकालिक अधिकार” (जसे एका प्रभावी ग्रंथात म्हटले आहे) —तेव्हा येशूला आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी ठेवणे हे पर्यायी नाही.(1)
शुभवर्तमानांमध्ये त्याच्या जीवनाची आणि शिकवणीची नोंद प्रत्यक्ष साक्षीदारांकडून आलेली आहे. मत्तय आणि योहान ह्यांच्या बाबतीत ती प्रत्यक्ष आहे. तर मार्कच्या बाबतीत अप्रत्यक्ष (जो पेत्राच्या आठवणींवर आधारित आहे, असे सुरुवातीचे पुरावे दर्शवतात) आणि लूक (पौलाचा साथीदार ज्याने मोठ्या संख्येने साक्षीदारांकडून माहिती गोळा केली आणि ते सुसंगतरीत्या कथानकात गुंफली). साक्षीदाराच्या विधानांवर आधारीत अभ्यास असे दाखवतो की सुवार्ता त्या घटनांच्या “जिवंत स्मृतींवर” आधारित लिहिली गेली. परंतू त्यातील दृष्टिकोन व तपशिलातील भिन्नता त्यांच्या सत्येतेला कमकुवत करत नाही तर बळकटी देतात.(2) सुवार्ता म्हणजे येशूने नेमके काय सांगितले आणि काय केले, याबद्दल अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आठवणी आहेत. त्यामुळे, पवित्रशास्त्राच्या अधिकाराबद्दल येशूचा दृष्टिकोन काय होता, हे त्यातून प्रकट होते.(3)
मग, येशूला वारसा हक्काने मिळालेल्या शास्त्रवचनांबद्दल (आपल्या जुन्या करारात) त्याचा दृष्टिकोन काय होता आणि ज्याद्वारे त्याचे प्रेषित युगाच्या शेवटापर्यंत (नवीन करार) सुवार्ता पृथ्वीच्या टोकापर्यंत नेण्याची त्याची आज्ञा पूर्ण करतील त्याबद्दल आपल्याला काय सांगितले जाते?
जुन्या कराराचा अधिकार
सर्वात मूलभूत पातळीवर, येशूला जुन्या करारातील वचने देवाच्या अधिकाराचे वाहक मानत होते, हा अधिकार कोणताही व्यक्ती, संस्था किंवा इतर कोणत्याही लेखनाच्या अधिकारापेक्षा उच्च आहे. हे त्याने रानात सैतानाद्वारे मोहात पडल्यावर (मत्तय ४:१-११), परूशी आणि सदूकी यांनी आव्हान दिल्यावर (मत्तय १९:१-९; २२:१५-४६), आणि आपल्या शिष्यांना शिकवताना (मार्क 9:13; 14:21, 27) जुन्या करारातील वचनांचा जो आधार घेतला, त्यावरून स्पष्ट होते. प्रत्येक वेळी, त्याने उल्लेखिलेले शास्त्रवचन त्या विषयावर निर्णय देण्यासाठी पुरेसे होते. ते निर्णायक होते, कारण त्या विषयावर देव काय म्हणतो हेच ते दर्शवत होते.
मोहावर विजय
रानातील मोह हा एक अभ्यासाचा विषय आहे. येथे आदाम व हव्वा ह्यांनी बागेत अनुभवलेल्या मोहाशी स्पष्ट साम्य आहे (उत्पत्ती 3:1–6). सैतानाने एदेन बागेत वापरलेली युक्ती, त्याने आजही मानवी इतिहासात वापरणे चालू ठेवले आहे. प्रथम तो देवाच्या वचनाच्या स्पष्टतेवर शंका निर्माण करतो (“देवाने खरोखरच असे सांगितले का…?”), मग देवाच्या वचनाच्या सत्यतेवर (“तुम्ही नक्कीच मरणार नाही”) आणि शेवटी देवाच्या स्वभावावर आणि त्याच्या वचनाच्या उद्देशांवर शंका आणतो (“देवाला माहित आहे की, तुम्ही ते खाल्ल्यावर तुमचे डोळे उघडले जातील, आणि तुम्ही देवासारखे व्हाल”).
योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू मोहावर विजय मिळविण्यासाठी रानात प्रवेश करतो. यार्देन नदीतून बाहेर निघताच, पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे (मत्तय 3:17).
या पार्श्वभूमीवर, “तू देवाचा पुत्र आहेस तर…” असे म्हणून, त्याला देवाच्या वचनावर शंका घेण्यास आणि आपल्या अस्तित्वाचा पुरावा वेगळ्या मार्गाने देण्यास प्रवृत्त केले गेले (मत्तय ४:६). येशू देवाच्या वचनानेच उत्तर देतो, जसे अनुवाद ८:३ मध्ये म्हटले आहे: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल” (मत्तय 4:4).
दुसऱ्या मोहात, सैतान देवाच्या वचनाच्या सत्यतेवर प्रहार करतो, जो स्तोत्र 91 मधील आश्वासनावर आहे. येशू अनुवाद 6:16 च्या आधारे त्याला उत्तर देतो: “परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस” (मत्तय 4:7).
तिसरे मोह, म्हणजे सैतानाला नमन करणे, हे तर देवावरच प्रहार आहे, आणि येशू अनुवाद 6:13 मधून त्याला उत्तर देतो: “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.” (मत्तय 4:10). या प्रत्येक टप्प्यावर, येशूचा देवाच्या वचनावरील आणि त्याच्या अधिकारावरील आत्मविश्वास स्पष्टपणे दिसतो.
विरोधकांचे खंडन
परूशी लोकांसोबतच्या संवादात, येशूने अनेकदा “लिहिले आहे” (मार्क 7:6; योहान 6:45; 8:17) किंवा “तुम्ही वाचले नाही का?” (मत्तय 12:3, 5; 19:4; 22:31; मार्क 12:10) असे शब्द वापरून शास्त्राचा उल्लेख करतो. त्याच्या अपेक्षेनुसार, देवाने भविष्यवक्त्यांद्वारे दिलेली वचने तो विषय निकाली काढण्यासाठी पुरेशी असायला हवीत. श्रीमंत माणूस आणि लाजर ह्यांची गोष्टदेखील ह्याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करते (लूक 16:19–31). सत्याच्या पुष्टीसाठी चमत्कारांवर अवलंबून राहण्यात काही एक अर्थ नसतो, कारण कठोर अंत:करणे नेहमीच पुराव्याला नाकारण्याचे मार्ग शोधतात, जसे येशूच्या पुनरुत्थानानंतर रिकाम्या थडग्याच्या बाबतीत केले गेले (मत्तय 28:13). ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. (लूक 16:31). “तुम्ही वाचले नाही का” या प्रश्नात एक प्रकारची तीव्रता आहे. येशूची अपेक्षा आहे की, त्यांनी केवळ शास्त्रवचने वाचू नये तर ते समजून घ्यावीत, त्यावर विश्वास ठेवावा आणि त्यानुसार अनुकरणही करावे.
या प्रश्नात असे गृहीत धरले आहे की, पवित्रशास्त्राचा अर्थ लोकांना समजण्यास सोपा आहे. प्रोटेस्टंट सुधारकांच्या मते, पवित्रशास्त्र सुस्पष्ट आहे. अर्थात, याचा अर्थ असा नाही की जुन्या करारातील प्रत्येक भाग सोपा किंवा सरळ आहे किंवा कोणताही एक मजकूर त्याच्या संदर्भातून बाहेर काढला, तर तो लगेचच समजेल असेही नाही. तरीही, तो समजण्याजोगा आहे. पवित्रशास्त्राच्या एका भागाची दुसऱ्या भागासोबत आणि कठीण भागांची सोप्या भागांसोबत तुलना केल्यास, त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होत जातो.
येशूचे जीवन आणि सेवाकार्य हे जुन्या करारातील वचनांच्या पूर्ततेच्या रूपात पाहणे, हे या आकलनाचे अंतिम आणि सर्वात महत्त्वाचे घटक आहे (जसे इथिओपियन(हबशी) अधिकाऱ्याला प्रेषिताची कृत्ये 8:26–38 मध्ये अनुभवायला मिळाले). पण येशूचा मुद्दा असा आहे की, आपल्याला जे मिळाले आहे ते पुरेसे आहे—सीनाय पर्वतावरून मिळालेले शब्द इस्राएल लोकांसाठी पुरेसे होते (अनुवाद 29:29); ज्यांना फक्त व्यवस्था, भविष्यवाणी, आणि स्तोत्रे होती (आपला जुना करार, लूक 24:44) त्यांनाही ते पुरेसे होते; आणि ज्यांच्याकडे हे सर्व आणि त्याची पूर्तता, सुवार्तेत आणि येशूच्या खास नियुक्त केलेल्या प्रेषितांच्या सेवाकार्यात आहे, त्यांनाही ते पुरेसे आहे (2 तीमथ्य 3:16–17).
येशूद्वारे जुन्या कराराची पूर्तता
हे अत्यंत महत्त्वाचे आहे की, येशूने आपली ओळख, उद्देश, आणि कार्य जुन्या कराराच्या इतिहासात आणि वचनांच्या पार्श्वभूमीवर स्थापण केले आहे. सेवाकार्याच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा तो नासरेथच्या सभास्थानात जातो, तेव्हा तो यशया संदेष्ट्याने परमेश्वराने अभिषिक्त केलेल्या व्यक्तिविषयीचे भाकीत (यशया 61) वाचतो आणि म्हणतो, “आज तुमच्या ऐकण्यामुळे हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे” (लूक 4:21).
त्याच्या स्वतःच्या वर्णनासाठी, तो त्याचा आवडता शब्द “मनुष्याचा पुत्र” असे शब्द वापरतो, जो दानीएल 7 मध्ये “मनुष्याच्या पुत्रासारखा एक” जो देवाच्या न्यायाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार प्राप्त करतो, ह्या दृश्याला स्मरण करून देतो. जरी त्याने स्वतःला “दाविदाचा पुत्र” असे म्हणवून घेतले नाही, तरीही जे त्याला या नावाने संबोधतात, त्यांना तो सकारात्मक प्रतिसाद देतो, आणि तो स्वतः स्तोत्र 110 मध्ये दाविदाच्या राजाशी संबंधित वचनांचा उपयोग करतो (मत्तय 22:42–45). जेव्हा त्याला येरुशलेमात “प्रभूच्या नावाने येणारा राजा” असे म्हणू लागले तेंव्हा परूशी लोक त्यांना गप्प बसवण्यास आग्रह करतात, तेव्हा तो उत्तर देतो, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” (लूक 19:40).
तो धार्मिक नेत्यांच्या कठोर मनोवृत्तीचा तुलना शलमोनाच्या शहाणपणाच्या प्रतिसादाशी (मत्तय 12:42) आणि योनाच्या प्रचाराच्या प्रतिसादाशी (मत्तय 12:41) करतो आणि म्हणतो, “योना पेक्षाही मोठा कोणी येथे आहे…शलमोनापेक्षाही मोठा कोणी एक येथे आहे.”
जेव्हा त्याची वधस्तंभी जाण्याची वेळ जवळ येते, तेव्हा तो मशीहाच्या दु:खांच्या संदर्भातील भविष्यवाण्यांचा उल्लेख अधिक वारंवार करतो (लूक 9:22; 17:25; cf 24:26–27), आणि शेवटच्या रात्री तो “कराराचे रक्त” (मत्तय 26:28; निर्गम 24:8) आणि “नवीन करार” (लूक 22:20; यिर्मया 31:31). थोडक्यात, येशूने स्वतःला जुन्या कराराच्या चौकटीत आणि जुन्या करारातील विविध भविष्यवाण्यांची पूर्तता म्हणून स्पष्टपणे ओळखले.
येशूची विवेचनात्मक पद्धत
येशूला जुन्या कराराच्या गहन संरचना समजल्या: त्याला कराराची चौकट (लूक 22:20), वचन आणि पूर्ततेची गतिशीलता (मत्तय 26:54, 56), आणि अब्राहामाच्या वंशजांवर अशा प्रकारे लक्ष केंद्रित केले, ज्यात सारफथ येथील विधवा आणि सूरियाचा नामानसारख्या बाहेरील लोकांचा समावेश आहे (लूक 4:25–27). डोंगरावरील प्रवचनात, तो नियमशास्त्राचा खरा हेतू प्रकट करतो: केवळ बाह्य पालन नव्हे, तर बदललेले हृदय आणि खरा वैयक्तिक विश्वासूपणा जो शास्त्री आणि परूशी यांच्यापेक्षा धार्मिकतेपेक्षा श्रेष्ठ अशी खरी न्यायशीलता दाखविते (मत्तय 5:17–48).
विशेष म्हणजे, मृतांच्या पुनरुत्थान ह्या प्रश्नावर सदूकींशी वाद घालताना, येशू जळत्या झुडपात मोशेचा परमेश्वराशी झालेल्या भेटीच्या घटनाक्रमाचा संदर्भ देतो. तेथे देवाने जुन्या करारातील महान संदेष्ट्याला सांगितले, “मी तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर देव आहे” (निर्गम 3:6, 15). प्रथमदर्शनी, निर्गम 3 मध्ये मृतांच्या पुनरुत्थानाबद्दल काहीही म्हटलेले नाही (आणि, खरं सांगायचं तर, येशू असेही म्हणत नाही की ते म्हणते). पण जर तुम्ही निर्गम 3 मधील देवाच्या वचनांवर विश्वास ठेवला, तर तुम्हाला ह्या निष्कर्षावर पोहोचावे लागेल की, जीवन थडग्याच्या पलीकडे सुरू राहते, आणि खरोखरच मृतांचा पुनरुत्थान होतो. जर तुम्ही पवित्र शास्त्रातील त्या वचनांना गांभीर्याने घेत असाल तर सदुकी लोकांनी पुनरुत्थानाला नाकारणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. येथे येशूने निर्गम 3 मध्ये शिकवणीचे “योग्य आणि आवश्यक निष्कर्ष” काढले आहेत, जसे की नंतरच्या ईश्वरीशास्त्रज्ञाने स्पष्ट केले. मार्क 12 मध्ये, स्तोत्र 110 वरील चिंतनातून येशू हेच तत्त्व दर्शवितो: “दाविदाने स्वतः त्याला प्रभू म्हटले आहे. मग तो त्याचा पुत्र कसा आहे?” (मार्क 12:37).
येशूने पवित्रशास्त्राचा ज्या प्रकारे उपयोग केला, त्यात वरवरचे काहीही नव्हते, जे त्याच्या सेवेचे सतत वैशिष्ट्य आहे, देवाचे वचन (तो मत्तय 15:6 मध्ये त्याला असेच संबोधतो) त्याला स्वतःच्या ओळखी आणि उद्देशाची समज देत होते आणि त्याच्या पृथ्वीवरील संपूर्ण सेवाकार्यात त्याचे मार्गदर्शन करत होते. अगदी छोट्या-छोट्या तपशीलांपर्यंतही त्याच्या अधिकारावर आणि विश्वासार्हतेवर त्याला पूर्ण आत्मविश्वास होता. जरी त्याने पवित्रशास्त्राच्या सिद्धांतावर ग्रंथ लिहिला नसेल किंवा त्यातील प्रत्येक गुणवैशिष्ट्यांचा खुलासा करणारे प्रवचन दिले नसले, तरीही त्याने प्रेरणा, दोषरहितता, स्पष्टता, मुबलकता, कार्यक्षमता यांसारख्या संज्ञांचा वापर केलेला नाही. तथापि, ज्या प्रकारे तो पवित्रशास्त्राबद्दल बोलला आणि ज्या प्रकारे त्याने त्याचा वापर केला, त्यातून स्पष्ट होते की या सर्व गोष्टींवर त्याचा विश्वास होता.
नवीन कराराचे अधिकार
या सर्वातून नवीन कराराच्या अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो. येशूच्या पृथ्वीवरील सेवाकाळात नवीन करार अस्तित्वात नव्हता, त्यामुळे त्याच्यासोबत संवाद साधण्याजोगा नवीन कराराचा मजकूर नव्हता. तथापि, नवीन करारातील महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेषितांच्या सेवेशी त्याचा संबंध आहे, ज्यांना येशूने सुवार्तेचे मूलभूत दूत म्हणून बोलावले आणि वेगळे केले.
येशूने आपल्या शब्दांचा खजिना प्रेषितांकडे सोपवला. त्याने त्यांची एका विशिष्ट पद्धतीने नेमणूक केली. प्रकटीकरण 21 मध्ये नवीन यरुशलेमच्या महान दृष्टीमध्ये त्यांचे महत्त्व दर्शविते: ज्याप्रमाणे नवीन यरुशलेमचे दरवाजे इस्राएलाच्या बारा वंशांच्या नावांनी कोरलेले आहेत, त्याचप्रमाणे शहराच्या बारा पायांवर “कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे आहेत (प्रकटीकरण 21:12–14).
वरच्या खोलीत, ज्या रात्री त्याला अटक केली जाणार होती, त्या रात्री येशू आपल्या शिष्यांना सत्याचा आत्म्या देण्याचे वचन देतो, जो “तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल” (योहान 14:26),” “तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल” (योहान 16:13), आणि “जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील” (योहान 16:14). स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिल्यानंतर, येशूने त्यांना “जाण्याची आज्ञा दिली. . . तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा” (मत्तय 28:19–20).
प्रेषितांचे अधिकार—ज्यात “अकाली जन्मास आलेल्या” पौलाचाही समावेश होता (1 करिंथ15:8)— तो नवीन करारामागे दडून होता. ते ख्रिस्ताचे राजदूत होते; जिवंत प्रभू येशूने त्यांना नेमले असल्यामुळे, देवाच्या उद्देशात त्यांचे स्थान अत्यंत अद्वितीय होते. जरी सर्व नंतरच्या ख्रिस्ती सेवाकार्याने त्यांचा संदेश उचलला आणि त्यांचे अनुकरण केले, तरीही त्यांची विशेष भूमिका नेहमी विशेष राहील. येशूने त्यांना आपले वचन दिले (योहान 17:14) आणि त्याच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो (योहान 17:20). अशा प्रकारे, येशूचा प्रेषित सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपल्याला नवीन कराराकडे आकार देण्याचे काम आणि मार्गदर्शन करतो.
येशूने जे पाहिले ते पाहणे
ख्रिस्ती विश्वास हा जिवंत परमेश्वरावरील वैयक्तिक विश्वास आहे. ह्याचा अर्थ देवामध्ये आणि त्याने आपल्याला निर्माण करण्यात आणि आपली सुटका करण्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करणे होय. याचाच अर्थ, त्याच्या पुत्राचे अनुसरण करणे, जो आपले पापांचे भीतीदायक संकट आतून, पूर्णपणे आणि कायमचे दूर करण्यासाठी दिला गेला आहे. खरे ख्रिस्ती शिष्यत्व हे वैयक्तिक नात्याशी अगदी खोलवर जोडलेले आहे. येशूचा अनुभव केवळ दूर राहून घेता येत नाही.
दुर्दैवाने, काहींनी या विश्वास आणि प्रेमाचे हे वैयक्तिक नाते पवित्रशास्त्राच्या शिकवणुकीच्या आत्मविश्वासी व नम्र आज्ञापालनाविरूद्ध स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. “आम्ही येशूचे अनुसरण करतो, पवित्रशास्त्राचे नाही,”असे एका माणसाने मूर्खपणे लिहिले.(4)
पण ही एक चुकीची निवड आहे, जिला स्वतः येशूच्या दृष्टिकोनात काहीच स्थान नव्हते. जर आपण येशूला गंभीरपणे घ्यायचे ठरवले, तर आपल्याला पवित्रशास्त्रालाही गंभीरपणे घ्यावे लागेल, कारण त्याने तसे केले! याउलट, जर आपण पवित्रशास्त्राला गांभीर्याने घेतले नाही — आणि आपल्या विचारसरणीत त्याच्या शिकवणीनुसार बदल आणि दिशा स्वीकारली नाही—तर याचा अर्थ आपण येशूला देखील गांभीर्याने घेत नाही. येशू आणि पवित्रशास्त्र हे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकमेकांचे स्पर्धक नाहीत. ज्याने म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे” (योहान 14:6), त्यानेच आपल्या पित्याला असेही म्हटले, “मी त्यांना तुझे वचन दिले आहे…तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे” (योहान 17:14, 17).
पवित्रशास्त्रात येशूला काय दिसले? त्याला त्याच्या लोकांच्या महान कल्याणासाठी आणि आपल्या नावाच्या गौरवासाठी दिलेले देवाचे लिखित वचन दिसले. त्याला असे वचन दिसले जे दांभिक धार्मिकतेला आव्हान देते आणि एका शब्दाने सर्व गोष्टी निर्माण करणाऱ्या देवाच्या सहभागितेत, निष्ठावंत जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला आमंत्रित करते. त्याला असे वचन दिसले जे विश्वास ठेवण्या योग्य आहे, कारण जरी ते मूळतः मनुष्यांनी लिहिले असले, तरी पवित्र आत्म्याच्या कार्यामुळेच ते अस्तित्वात आले. खरोखर ही मोशे, दावीद, यिर्मया यांची वचने आहेत, जे सक्रियपणे आणि सर्जनशीलतेने त्यांच्या लेखनात गुंतलेले आहेत— पण शेवटी, ही देवाचीच देवानेच आपल्यासाठी दिलेली वचने आहेत.
म्हणून, प्रभू येशूच्या इतर सर्व शिष्यांप्रमाणेच ख्रिस्ती ईश्वरीशास्त्रज्ञांनाही त्याच्यात असे उदाहरण सापडते, ते जे काही करतात त्याला आव्हान देते आणि मार्गदर्शन करते. आपल्या शास्त्रविषयक तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी येशूला ठेवल्याने त्याच्या अधिकार कक्षेत असलेल्या पवित्रशास्त्राच्या अधिकाराच्या विरोधात उभे राहण्याची चूक टाळता येते. तसेच, हे पवित्रशास्त्रातील तत्त्वज्ञान आणि ऐतिहासिक तत्त्वज्ञान यांच्यातील योग्य संतुलन राखण्यास मदत करते, कारण “महान तात्त्विक परंपरेचा” पुनरावलोकन करण्याच्या प्रयत्नात सुद्धा, देवाची वचने नेहमी देवाबद्दल बोलणाऱ्यांच्या शब्दांपेक्षा अधिक महत्त्वाची असतात.
शेवटी, हे आपल्याला आठवण करून देतो की, पवित्रशास्त्राशी आपला संबंध वैयक्तिक आणि आत्मीयतेचा आहे, केवळ तात्त्विक किंवा अमूर्त नाही, जरी त्यात आपले मन लागू करणे आवश्यक आहे, तरीही आपण देवाबद्दल योग्य रीतीने बोलू शकत नाही, जणू तो थोडा वेळ खोलीतून बाहेर गेला आहे (जसा माझा एक मित्र म्हणायचा) असे आपण बोलू शकत नाही.
येशूचे अनुसरण करताना, आपल्याला असे आढळते की, आपण यशया संदेष्ट्याने दाखवलेल्या स्थानावर उभे आहोत: “जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो” (यशया 66:2).
लेखक
मार्क.डी.थॉम्पसन