मी देवाच्या गौरवाबद्दल गात मोठा झालो. आता मला कधी कधी प्रश्न पडतो की ते शब्द उच्चारताना माझ्या डोक्यात आणि हृदयात काय सुरू होते.
मंडळीमध्ये आम्ही गुरू स्वरात उत्साहाने गात असू : “टू गॉड बी द ग्लोरी, ग्रेट थिंग्स ही हॅज डन. To God be the glory, great things he has done.” (म्हणजे देवाला गौरव असो, त्याने महत्कृत्ये केली आहेत.) आणि आपण फार प्रार्थनापूर्वकरीत्या गात असू ते गीत आठवा, “फादर, वी लव्ह यू, वी वर्शिप यू अँड अडोर यू. ग्लोरिफाय दाय नेम इन ऑल दी अर्थ. Father, we love you, we worship and adore you. Glorify thy name in all the earth.” (म्हणजे पित्या आम्ही तुझ्यावर प्रीती करतो, आम्ही तुझी आराधना करतो आणि तुझी प्रशंसा करतो, तू संपूर्ण सृष्टीमध्ये आपल्या नावाचे गौरव करून घे.)
ख्रिस्ती घरात आणि विश्वासू मंडळीमध्ये वाढण्याचा हा अवर्णनीय मौल्यवान, परंतु आव्हानात्मक वारसा आहे – ही भेट मी कुठल्याच गोष्टीकरिता बदलून घेणार नाही. सध्याच्या युगात देवाच्या अनेक महान देणग्या धोक्यासह येतात. लहानपणापासून असे (शब्दश:) गौरव गाताना एक धोका असा आहे की “देवाचे गौरव” ह्या सारखी अनमोल वाक्ये निव्वळ धार्मिक घोषणा आणि मंडळीच्या पोकळ गप्पा बनू शकतात – आपल्या आधीच्या पिढ्यांमधील इतरांना, आश्चर्याने आणि आनंदाने अशी भाषा स्वीकारण्यास प्रवृत्त करणार्या या सामग्रीला रिकामी आणि अपरिपक्व मनाने घेणे.
मी जवळजवळ 20 वर्षांचा होतो तेव्हा देवाने माझे डोळे त्याच्या गौरवाच्या अर्थाकडे उघडले (पूर्णपणे नाही तर नवीन मार्गाने): म्हणजे त्याच्या निर्मितीत गौरवाची केंद्रियता आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याचा पुरवठा, आणि ख्रिस्तामध्ये त्याच्या नावाचा गौरव करण्यासाठी दररोज आपले समर्पण करण्याचा आपल्याला प्राप्त होणारा विशेषाधिकार आणि आनंद.
जेव्हा तुम्ही प्रार्थना करता
लूक 11:1 मध्ये आम्हाला सांगतो की, येशूची प्रार्थना पाहिल्यानंतर, एका शिष्याने त्याला म्हटले, “प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.” या क्षणाचे महत्व तुमच्याकरिता कमी होऊ देऊ नका. शिष्यांनी त्याला प्रार्थना करताना पाहिले आणि ऐकले आहे. त्यांनी त्याचे जीवन, मानव म्हणून त्याची प्रकट सामान्यता आणि तरीही जवळजवळ परलौकिक वाटणारी त्याची आश्चर्यकारक पवित्रता पाहिली आहे. “प्रार्थना कशी करावी” याविषयी येशूने दिलेले मार्गदर्शन स्वीकारण्याची विनंती शिष्यांच्या कानांना अतिउत्कृष्ट अशी कल्पना वाटली असावी. हो! आम्ही त्याला लवकर का विचारले नाही? तो काय म्हणेल? आश्चर्यकारक पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देण्याच्या त्याच्या पद्धतीचा अवलंब माहीत असल्यामुळे कदाचित काहींनी काही अनपेक्षित उत्तरासाठी स्वत:ला तयार केले असेल – आणि मग पुन्हा त्यांना आश्चर्य वाटले असणार कारण यावेळी त्याने इतक्या ताबडतोब आणि थेट उत्तर दिले.
उशीर न करता किंवा वैचारिक भटकंतीविना किंवा कुठलेही अस्वीकरण जाहीर न करता त्याने तोंड उघडून नुसते उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल : “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा. . .” (लूक 11:2).
मत्तय 6 मध्ये आणखी एक उदाहरण सादर आहे जेव्हा येशूने ह्याच आवश्यक प्रार्थनेचा नमुना दिला होता, परंतु तेव्हा त्याच्या प्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनाच्या संदर्भात त्याने तो दिला. इथेही त्याच्या परिचयात तेवढाच अप्रतिम सरळपणा आणि तात्कालिकता होती: “ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. . .” (मत्तय 6:9).
अनन्य पहिली याचना
कोणतीही विनंती किंवा याचना करण्यापूर्वी, येशू आपल्या प्रथम वाक्याने त्यांना आश्चर्यचकित करतो: “हे आमच्या स्वर्गातील पित्या.” “माझ्या पित्या” असे म्हणून नाही तर “आमच्या पित्या” असे म्हणून तो खरोखरच आमच्यासाठी प्रार्थनेचा नमुना सादर करीत आहे. आणि हे करताना तो दोन विरुद्ध वाटणाऱ्या वास्तवांना एकत्र आणतो : स्वर्गात असलेल्या पित्याच्या वैभव आणि सामर्थ्याबरोबरच पिता म्हणून देवाची जवळीक आणि कोमलता. येणार्या सहा विनंत्यांची अपेक्षा आपण येथे पाहू शकतो (मत्तय 6:9–13) — स्वर्गामध्ये, पहिल्या तीन विनवण्यांची भव्यता (वचन 9–10), आणि पित्यामध्ये, शेवटच्या तीन बाबींची दया (वचन 11–13). येशूच्या लक्षणीय बोलण्यामध्ये तीन वर तीनची रचना दिसून येते.
तरीही, जॉन पायपर ह्यांनी निरीक्षण केल्याप्रमाणे, “पहिल्या याचिकेत काहीतरी अनोखे आहे.” येथे केवळ अस्सल तीन-तीनच नव्हे, तर एक-पाचची रचना सुद्धा दिसते.
येशूने प्रथम काय मागितले
पुन्हा, शिष्यांबरोबर, किंवा डोंगरावरील प्रवचनादरम्यान, त्याच्या अनुयायांसमवेत त्या अनमोल क्षणाची कल्पना करा : येशू प्रथम काय प्रार्थना करेल? हाच त्याच्या प्रार्थनेचा आदर्श नमुना आहे. तो स्वत: अशाच प्रकारे प्रार्थना करतो आणि जेव्हा आपण त्याला प्रार्थना करण्यास शिकवण्याची विनंती करतो तेव्हा आपण अशीच प्रार्थना केली पाहिजे असे तो म्हणतो! कुठल्याही एखाद्या प्रार्थनेत नव्हे, तर आम्ही कशी प्रार्थना करावी हे शिकण्यासाठी आणि अनुसरण्यासाठी जी कुठली प्रार्थना येशू प्रथम करेल, ती काय असेल?
तुझे नाव पवित्र मानले जावो
जुन्या इंग्रजी भाषेतील शब्दांपेक्षा दैनंदिन आधुनिक शब्दांमध्ये सरळ मांडणी केली असता, “पित्या, तुझे नाव पवित्र बनविले जावो.” जरी इंग्रजीपेक्षा ग्रीकमध्ये अधिक वैशिष्ट्यपूर्ण असली तरी ही एक विचित्र रचना आहे : व्याकरणाच्या दृष्टीने कर्मणी प्रयोगात वापरलेली तृतिय पुरुषातील आज्ञा. म्हणजे “पित्या, तुझे नाव पवित्र कर,” असे म्हणण्याऐवजी, येशू म्हणतो, “पित्या, तुझे नाव पवित्र केले जाऊ दे.” देवाच्या नावासाठी इतरांनी कृती करावी म्हणून देवाकडे केलेली ही विनंती आहे.
तर, या पहिल्या याचिकेत दोन कृती करणार्यांचा समावेश आहे: केवळ स्पष्ट (स्वतः देव) च नव्हे तर अंतर्निहित (असंख्य माणसे जे त्यांच्या मनात, हृदयात, मुखाने आणि जीवनात “त्याला पवित्र मानतील” किंवा “त्याला पवित्र करतील”).
त्याचे पवित्र नाव
मग पवित्र या शब्दाचे काय? आपण त्याबद्दल कसा विचार करू शकतो आणि त्याचा देवाच्या गौरवाशी संबंध आहे की नाही?
पवित्रता, हे बरेचदा सारांशित केले असता, देवाच्या वेगळेपणाशी किंवा इतरत्वाशी संबंधित आहे. तो आपल्या सृष्टीपासून आणि लोकांपासून वेगळा आहे, अगदी पापविरहित आहे, आणि पापाच्या दृष्टिकोणातून वेगळा आहे. देव म्हणून तो आपल्या जगासाठी आणि वंशासाठी सामान्य नाही, तर पवित्र आहे. तो केवळ विशेष आणि वेगळाच नाही, तर इतर आहे- निर्माणकर्ता म्हणून त्याच्या सृष्टीपासून आणि प्राण्यांपासून इतर, आणि देव म्हणून पापीलोकांपासून इतर आहे. एका अर्थाने, पवित्र हे निर्माणकर्त्या देवाच्या या अद्वितीय इतरत्वाचे आणि त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात विशेष वेगळेपणाचे विशेषण आहे.
“पवित्र म्हणजे केवळ ‘वेगळे’ नव्हे, तर ‘चांगले’. आपला देव केवळ आपल्यापेक्षा वेगळा नाही, तर त्याकरिता आपण त्याची प्रशंसा करतो.”
परंतु सावध राहा, पवित्रता म्हणजे सृष्टी, प्राणी आणि पाप यांच्यापासून केवळ वेगळेपण नाही. पवित्र म्हणजे इतर आणि चांगले. आपला देव केवळ आपल्यापेक्षा वेगळा नाही, तर त्याकरिता आपण त्याची प्रशंसा करतो. तो वेगळा आणि अद्भुत आहे.
मग, त्याची पवित्रता त्याच्या गौरवाशी अशा रीतीने संबंधित आहे, की त्याची पवित्रता म्हणजे तो आपल्यापासून तितकाच वेगळा आणि चांगला आहे आणि त्याचे गौरव म्हणजे त्याच्या आंतरिक मूल्याची आणि अमर्याद मूल्याची दृश्य आणि श्रवणीय जाणीव आहे. याचा अर्थ असा की येशूप्रमाणे देवाचे नाव पवित्र व्हावे म्हणून प्रार्थना करणे म्हणजे थोडक्यात त्याचा गौरव व्हावा म्हणून प्रार्थना करणे होय. “पित्या, तुझे गौरव होवो! तुझे नाव पवित्र केले जावो! माझ्या स्वतःच्या नजरेत आणि सर्व राष्ट्रांच्या नजरेत, तुझ्या दैवी वेगळेपणाबद्दल आणि अमर्याद श्रेष्ठतेबद्दल तुझे दर्शन व्हावे, कौतुक आणि स्तुती व्हावी.”
पवित्र कसे बनवले?
ही याचना येशूच्या तोंडातून, त्याच्या आदर्श प्रार्थनेच्या नमुन्यातील केवळ पहिली आहे एवढेच नाही आणि त्यामध्ये एक प्रकारचे प्राधान्य आणि महत्त्व गृहीत धरलेले आहे, परंतु ती एका महत्त्वपूर्ण अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण देखील आहे. पायपर पुढे म्हणतात,
या याचिकेत, आपण मानवी अंतःकरणाची एक विशिष्ट व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया ऐकतो जी देव आपल्याकडून देण्याची अपेक्षा करतो – सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या नावाला पवित्र मानणे, आदर करणे, सन्मान देणे, प्रतिष्ठीत मानणे, प्रशंसा करणे, कौतुक करणे, मूल्य देणे, त्याची कदर करणे. इतर पाच विनंत्यांपैकी कोणतीही विनंती आपल्याला हृदयाच्या विशिष्ट मानवी प्रतिसादासाठी प्रार्थना करण्यास सांगत नाही.
आपल्या स्वर्गीय पित्याचे नाव पवित्र असावे ही येशूची आणि आमची प्रार्थना प्रामुख्याने वरच्या आकाशात, किंवा खाली डोंगर आणि महासागरांमध्ये किंवा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये दिसणाऱ्या त्याच्या गौरवाचा संदर्भ देत नाही. त्याऐवजी, मुख्य संदर्भ मानव आहे – विचार, भावना, इच्छा असणारे मानव. त्याचे नाव पवित्र केले जाणे, त्याचे गौरव होणे हे मानवी मनात, हृदयात, मुखात आणि जीवनात प्रार्थना करणाऱ्यापासून सुरुवात होऊन सर्व पृथ्वीवर, पर्वत आणि महासागरांमध्ये, आकाशाखाली राहणाऱ्या सर्वांपर्यंत पसरावे.
म्हणून, ही पहिली विनंती पित्याच्या गौरवासाठी आणि आपण त्याच्या गौरवाचे साधन बनण्यासाठी आहे – स्वर्गातील आपल्या पित्याला त्याच्याबद्दलच्या आपल्या विचारांमध्ये आणि त्याच्याबद्दलच्या आपल्या भावनांमध्ये प्रथम पवित्र केले जावे. जेणेकरून आपण त्याला खऱ्या अर्थाने ओळखावे आणि त्याचा योग्य आनंद घ्यावा. आपल्या सत्याच्या मानसिक आकलनात आणि त्याच्या सौंदर्याच्या आणि मूल्याच्या भावनिक स्वीकारात त्याला पवित्र मानावे. आपण त्याचे कौतुक करावे, त्याच्यामध्ये आनंद करावा, त्याची कदर करावी, त्याचे मूल्य मानावे, त्याची प्रशंसा करावी, त्याची आराधना करावी.
“तुझे गौरव होवो,” आणि “तुझे नाव पवित्र मानले जावो” ही भाषा जुनी न होऊ देता, आणि येशू आपल्याला चेतावनी देतो त्याप्रमाणे पोकळ वाक्यांचा केवळ ढिगारा न होऊ देता, आम्ही आमच्या प्रभूचे आयुष्यभर व्यवहारिक अनुसरण कसे करावे ह्याचे उदाहरण त्याच्या आदर्श प्रार्थनेच्या नमुन्याच्या सुरुवातीलाच आमच्या समोर मांडलेले आहे (मत्तय 6:7).
ते कधीच जुने होऊ नये
आमच्या दैनंदिन प्रार्थना ताज्या आणि वास्तविक ठेवण्याचा आणि विशेषत: “आधी अशी प्रार्थना करा” ह्या उदाहरणानुसार दैवी नाम पवित्र मानण्याचा मार्ग म्हणजे आम्हाला उपलब्ध पवित्र शास्त्रोक्त आणि आधुनिक भाषेचा महान विस्तृत आणि सखोल ठेवा, ह्याचे देवाचे वस्तुनिष्ठ मूल्य आणि गौरव आणि त्याचप्रमाणे त्याला सन्मान देणारा आमचा व्यक्तिनिष्ठ प्रतिसाद ह्याकरिता उपयोग करणे.
“‘गौरव’ या शब्दाच्या आम्ही केलेल्या पुनरुच्चारांपेक्षा त्याचे गौरव कितीतरी पटीने मौल्यवान आहे.”
म्हणून, आम्ही त्याच्या गौरवासाठी आमच्या भाषेची विस्तृतता सेवेत आणतो : त्याचा सन्मान, त्याची स्तुती, त्याचे नाव, त्याची कीर्ती, त्याचे वैभव, तेजस्वीता, प्रभुत्व, शक्ती, सामर्थ्य आणि सौंदर्य. उत्पत्तीपासून स्तोत्रांपर्यंत, शुभवर्तमानांपासून प्रकटीकरणापर्यंत आणि देवाच्या निर्मित जगाच्या आणि उद्धारक कृपेच्या आपल्या स्वतःच्या अनुभवात आपण शब्द आणि संकल्पनांकरिता शोध घेतो आणि विस्तारतो. त्याचे गौरव म्हणजे त्याच्या बाह्य-प्रवाही पवित्रतेचे चमकते तेज हे ‘गौरव’ या शब्दाच्या आम्ही केलेल्या पुनरुच्चारांपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे.
त्यामुळे त्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न करताना त्याच्यातील आपल्या आनंदासाठी आपण भाषेची सखोलता सेवेत आणतो : आपण त्याची प्रशंसा करतो, त्याच्याबाबत आश्चर्य व्यक्त करतो, त्याच्या दरार्यापुढे उभे होतो, त्याच्यामध्ये आनंद घेतो, त्याचा आनंद घेतो, त्याची कदर करतो, त्याचे कौतुक करतो, त्याचा आदर करतो, त्याची प्रतिष्ठा मानतो, आणि अगदी त्याच्या नावाला पवित्र मानतो. देवाच्या नावाच्या पवित्र मानल्या जाण्याबाबत, जशी प्रार्थना येशूने प्रथम करण्यास सांगितले होते त्याशी जसजसे आपले अंतःकरण आणि विनंत्या जुळतील तसतसे आपल्या उर्वरित प्रार्थना (भौतिक आणि आध्यात्मिक वस्तूंसाठी) त्यांच्या योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात येऊ लागतील. त्याचे नाव पवित्र व्हावे, त्याचा व त्याच्या पुत्राचा गौरव व्हावा आणि आपण प्रार्थना करत असताना त्याची सुरुवात आपल्यात व्हावी, ह्याकडे देव निश्चित लक्ष देतो.
लेख
डेव्हिड मॅथिस