मैदानी खेळ, कृपा आणि ख्रिस्ती कार्य नैतिकता
आपल्यापैकी बरेच जण शेतकरी नाहीत. आता नाही! आणि तुलनात्मकरीत्या आपल्यापैकी फार कमी लोकांनी युद्धात सैनिक म्हणून काम केले आहे. परंतु कदाचित आपल्यापैकी काहींनी स्पर्धात्मक मैदानी खेळांमध्ये आपले हात आजमावले असतील – ज्या प्रकारासाठी आपण सराव करता आणि केवळ खेळण्यासाठी उपस्थित राहत नाही.
त्यावेळी तुम्हाला याची कल्पना नसेल, पण जर तुम्ही सैनिक, खेळाडू किंवा शेतकरी असाल, तर काही आधुनिक लोकांप्रमाणे तुम्हालाही खरोखर काम कसे करायचे हे शिकण्याचे आव्हान देण्यात आले असेल. म्हणजे तुम्हाला काही तरी वस्तुनिष्ठ, ठोस आव्हान देण्यात आले असेल – लढाईसाठी सराव करा, मैदानामध्ये सराव करा, खेळाच्या दिवसासाठी सराव करा – आणि एकतर तुम्ही मैदानावर यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले, किंवा तुम्ही कंटाळलात, सबबी दिल्या आणि लवकरच हार मानली. आपण एकतर दाखवून दिले असेल की आपल्यात पुढे जात राहणे, अडथळ्यांविरुद्ध संघर्ष करणे, टिकून राहणे आणि ध्येय साध्य करणे हे जमणार नाही; किंवा प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही ते निसंशयपणे साध्य केले.
सैनिक, खेळाडू किंवा शेतकरी म्हणून तुमचा अनुभव कितीही असला, तरी पवित्र शास्त्र आपल्या वैयक्तिक अनुभवांना (किंवा त्याच्या कमतरतेला) भरण्यास, पुरवणी, पुनर्रचना करण्यास किंवा त्यावर मात करण्यास आणि आपल्याला ख्रिस्ती कार्यनैतिकता आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, इतरांच्या भल्यासाठी आणि ख्रिस्ताच्या गौरवासाठी शिकविण्यासाठी तयार आहे. आणि आपल्या कार्यशैलीचा विचार करण्यासाठी पवित्रशास्त्रात लंगर लावण्याच्या उत्कृष्ठ ठिकाणांपैकी एक ठिकाण सैनिक, खेळाडू आणि शेती या अतिशय ठोस आणि वस्तुनिष्ठ व्यवसायांचा उल्लेख करते.
प्रेषितांप्रमाणे
2 तीमथ्य 2:1-7 मध्ये पौलाच्या मनात शिष्य घडविण्याद्वारे सुवार्तेमध्ये प्रगती साधने आहे. त्याने आपल्या शिष्यावर जी सुवार्ता सोपवली होती, त्याबद्दल आता तो तीमथ्याला आज्ञा देतो “इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे” (2 तीमथ्य 2:2). म्हणजे एका क्षणात चार पिढ्या आहे: पौलाने तीमथ्याला आणि त्याने इतर “विश्वासू माणसांना” त्यांनी “इतरांना” शिष्य करणे – आणि याचा अर्थ असा होता की “इतरही” अजून इतरांना शिष्य करतील.
पण सुवार्ताकार्य बहुगुणित होण्याची योजना जितकी सोपी वाटते तितके काम सोपे नाही. त्याला जग, देह आणि सैतान जवळजवळ सतत आणि बरेचदा अत्यंत गैरसोयीच्या वेळी विरोध करतील. पौल स्वत: तुरुंगातून लिहितो. तीमथ्य भिंतीवरील लिखाण वाचू शकतो: जर सुवार्तेसाठी समर्पित अशा प्रयत्नांमुळे पौलाला तुरुंगात जावे लागले, तर तीमथ्याला पकडून तेथे नेण्याला किती काळ लागेल? पण या कामापासून दूर जाण्याऐवजी पौल आपल्या शिष्याला सांगतो की “ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.” आणि मग वचन 4–6:
शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे.
जर कोणी मल्लयुद्ध करतो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालत नाहीत. श्रम करणार्या शेतकर्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.
सर्वप्रथम आणि एकत्रितपणे सैनिक आणि शेतकऱ्यांकडून असणार्या अपेक्षांचा विचार करा; मग आपण खेळाकडे अधिक वळू.
सैनिक आणि शेतकरी ह्यांच्याप्रमाणे
सैनिकी आणि शेती माझ्याकरिता जशी परकीय आहे तशीच तुमच्यासाठी परकीय असली, तरी त्यातील कामाच्या व्यापकतेचे स्वरुप अगदी स्पष्ट आहे.
सैनिक म्हणजे “अधिकाराखाली असणारी माणसं” (मत्तय 8:9; लूक 7:8), जे एकट्याने नव्हे तर इतर सैनिकांबरोबर (तुकड्यांमध्ये किंवा पलटणीत) सेवा देतात. शस्त्र असलेला एकच प्रशिक्षित विर हा तोपर्यंत एक प्रबळ शत्रू असू शकतो – जोपर्यंत शेकडो किंवा हजारो लोकांना एक म्हणून कार्य करत असलेले असे तो आपल्या पुढे उभे ठाकलेले बघतो. सैनिकी करण्याची शक्ती या सामूहिक शक्तीतून येते: सक्षम सेनापतीच्या अधिकाराखाली आणि स्पष्ट मार्गदर्शनाखाली एकत्र प्रशिक्षण घेतलेले, एकत्र काम करण्यासाठी तयार झालेली माणसे. आणि तसे करण्यासाठी – युद्धासाठी सज्ज होण्यासाठी आणि तयार राहण्यासाठी – सैनिकांनी “नागरी कार्यात अडकण्याचा” मोह दूर केला पाहिजे.
सैनिक तो आहे ज्याला सामान्य नागरी जीवनातून बाहेर बोलावले गेले आहे, आणि नवीन तुकडीमध्ये घातले गेले आहे, जेणेकरून तो प्रशिक्षण घेऊन नागरिकांच्या संरक्षणासाठी कृती करण्यास तयार राहील. पौल म्हणतो की, चांगले सैनिक “ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे” हे ध्येय ठेवतात. नागरी जीवनाचे तात्कालिक आवाहन आणि सुखसोयी ते नाकारतात आणि शेवटी क्षुल्लक गोष्टींसाठी आपले ध्येय सोडून देण्यापेक्षा मोठे, अधिक शाश्वत समाधान उपभोगतात.
“परिपक्वता प्रशिक्षणाद्वारे येते, किनार्यावर आराम करण्याने किंवा सुखसुविधांच्या इच्छेमध्ये गुंतण्याद्वारे येत नाही.”
त्याचप्रमाणे शेतीसाठी दूरदृष्टी आणि शारीरिक श्रम या दोन्हींची मेहनत घ्यावी लागते. शेतकरी नियोजन करतात, नांगरून पेरणी करतात, तण वेगळे करतात, पावसाची आणि वाढीची धीराने वाट पाहतात आणि शेवटी हंगाम वेचण्याच्या खडतर कष्टात गुंतलेले असतात. आणि तसे करण्याद्वारे त्यास पात्र असलेले बक्षीस म्हणजे “त्याच्या पिकांचा पहिला वाटा” शेतकरी आपल्या हातात धरून उपभोगतो. शेतकर्यांजवळ आपल्याला शिकवण्यासारखं बरंच काही आहे, केवळ मेहनत, बक्षिसाची अपेक्षा इतकेच नाही, तर संयम सुद्धा: “पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा” (याकोब 5:7–8).
खेळाडूंप्रमाणे
विशेषत: पौलाकडे खेळाद्वारे आपल्याला शिकवण्यासारखे आमच्या प्राथमिक अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. 2 तीमथ्य 2:5 याव्यतिरिक्त, तो खेळाचे चित्र 1 करिंथ. 9:24–27; फिलिप्पै. 3:13–14; 1 तीमथ्य 4:7–8; आणि 2 तीमथ्य 4:7 मधून सुद्धा घेतो. इब्री लोकांस पत्र हे (पौलाने लिहिलेले नसून त्याच्या वर्तुळातील लूकसारखे कोणीतरी लिहिलेले) खेळाडूच्या चित्रांचा आधार घेतात (इब्री 5:13–14; 12:1–2, 11–13). 2 तीमथ्य 2 मधील हा धडा पौलाच्या पत्रांमधील आणि इब्री. मधील खेळाडूच्या चित्राशी सुसंगत आहे.
प्रथम, परिपक्वता प्रशिक्षणाद्वारे येते, किनार्यावर आराम करण्याने किंवा सुखसुविधांच्या इच्छेमध्ये गुंतण्याद्वारे येत नाही. म्हणजे ते स्पर्धेपूर्वीच, शर्यतीच्या दिवशी सहन करण्याची असुविधा येण्यापूर्वीच प्रशिक्षणामध्ये अडथळा ठरते. प्रभावी प्रशिक्षणासाठी असुविधा आवश्यक आहे (इब्री. 12:11). शरीर हे विश्रांतीमुळे नव्हे तर ताण आणि तणावामुळे आणि विशेषत: असुविधेत टिकून राहण्याद्वारे बांधले जाते. शरीर आणि मन हे दोन्ही सातत्याने केलेल्या सरावाने प्रशिक्षित केले जातात (इब्री. 5:14), आणि त्यामुळे परिपक्वता येते. पौल लिहितो आणि म्हणतो की जे आपण परिपक्व आहोत त्यांनी “पुढील गोष्टींकडे लक्ष लावून. . . त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे…धावत राहावे” (फिलिप्पै. 3:13–15). सर्व प्रशिक्षणांमध्ये, मग ते शारीरिक असो वा आध्यात्मिक, काही प्रमाणात कष्ट आणि प्रयत्नांची आवश्यकता असते (1 तीमथ्य 4:7–10).
दुसरे म्हणजे, स्पर्धेतच खेळाडू थकवा, नैराश्य, निराशा आणि वेदना सहन करत असतात. प्रशिक्षणात टिकून राहणे आणि असुविधा सहन करणे शरीराला आणि इच्छेला तयार करते, आणि शर्यतीच्या दिवशी प्रतिकारातून पुढे जाण्यास सक्षम करते. 5 व्या वचनात मात करण्याचा एक विशिष्ट मोह अधोरेखित केलेला आहे : नियमाविरुद्ध वागणे. “जर कोणी मल्लयुद्ध करतो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालत नाहीत.” प्रशिक्षण असो वा स्पर्धा, यशस्वी खेळाडूला हे माहीत असते की त्याच्या व्यक्तिनिष्ठ इच्छा स्पर्धेच्या वस्तुनिष्ठ नियमांपेक्षा महत्त्वाच्या नाहीत. तो शर्यतीपेक्षा किंवा खेळापेक्षा मोठा नाही. तो आपल्या क्षणिक इच्छेनुसार, आपल्या इच्छेनुसार प्रशिक्षण किंवा स्पर्धा करू शकत नाही, परंतु त्याने आत्मसंयम बाळगला पाहिजे. 1 करिंथ. 9:24–27 मध्ये ही पौलाची स्वतःची साक्ष आहे:
शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वार्यावर मुष्टिप्रहार करत नाही; तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसर्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.
तिसरे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नवीन कराराच्या परिच्छेदांमध्ये, असुविधा सहन करण्याची गुरुकिल्ली म्हणजे बक्षीसाकडे लक्ष लावणे हे आहे. प्रशिक्षणात असो वा स्पर्धा असो, पौल आणि इब्री पारितोषिक, मुकुट, आणि बक्षीस यावर भर देतात — एक महत्त्वाचा घटक जो कामाच्या नैतिकतेच्या धड्याला विशेषत: ख्रिस्ती बनवतो. पौल स्पष्टपणे या पुरस्काराचे कौतुक करतो: “असे धावा की तुम्हांला ते मिळेल” (1 करिंथ. 9:24). वाट पाहणारा अविनाशी मुकुट हा लाभांश नव्हे, तर अडथळे आणि प्रतिकाराला सामोरे जाताना आपल्याला पुढे नेण्यासाठी लक्षात ठेवण्याचे आणि स्मरणात राखण्याचे बक्षीस आहे. स्वत: पौलाला, जेव्हा तो त्याच्या “शर्यतीच्या” शेवटी येतो, तेव्हा बक्षिसाकडे लक्ष लावण्याची लाज वाटत नाही (परंतु जाणीवपूर्वकरीत्या लक्ष लावतो) तर त्याच्या अपेक्षेद्वारे, त्याच्या चिकाटीला चालना मिळाली आहे:
जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. (2 तीमथ्य 4:7–8)
पण फक्त पौलच नाही. तो ते कुठून शिकला? येशूसारखे, त्याच्या शिकवणुकीद्वारे, त्याच्या उदाहरणाद्वारे आणि त्याच्या इतर बर्याच बाबींद्वारे बक्षीसाकडे बघण्यास आपल्याला कोणीही शिकवत नाही.
येशूसारखे
आपल्या शिकवणुकीत येशू वारंवार आपले लक्ष “पित्याद्वारे” आणि “स्वर्गात मोठ्या” बक्षिसाकडे वेधतो. मत्तय 5–6 ह्या अध्यायांमध्येच त्याने बक्षिसाचा सुमारे नऊ वेळा स्पष्ट उल्लेख केला आहे (आणि मग तो पुन्हा पुढील वचनांमध्ये सुद्धा करतो 10:41–42; मार्क 9:41 आणि लूक 6:23, 35). कदाचित या साध्या, जवळपास सुखवादी धाग्यामुळेच पौलाला ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा एक पैलू पकडण्यास प्रवृत्त केले असावे “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे” (प्रेषित 20:35).
तरीही येशूच्या शिकवणुकीइतकेच त्याच्या उदाहरणाचे सामर्थ्य स्पष्ट आहे. इब्री अकरावा अध्याय अनेकदा आपले लक्ष येणाऱ्या बक्षिसाकडे वळवतो (10:35; 11:6, 26) आणि मग स्वतः ख्रिस्ताला बक्षिसाकडे लक्ष लावून वेदना सहन करण्याचा आणि टिकून राहण्याचा आदर्श म्हणून सादर करतो:
आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. (इब्री 12:1–2)
“ख्रिस्ताचे परिपूर्ण धैर्य प्रथम येते, जे नंतर आपले अपूर्ण परंतु वाढते प्रयत्न शक्य करते.”
जेव्हा आपण येशूकडे पाहतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे पाहतो ज्याने स्वत: त्याच्या बक्षिसाकडे पाहून सर्वात मोठी वेदना आणि लाज म्हणजे वधस्तंभ सहन केला : कारण त्याच्यासमोर जो आनंद ठेवला गेला होता, तो म्हणजे आपल्या पित्याच्या उजव्या हाताला बसणे. बक्षिसाच्या शोधात त्याने आपली धाव संपवली. आणि त्याचप्रमाणे, आणि त्याच्याकडे पाहत, इब्री लोकांस पत्र आपल्याला सहनशीलतेने आपली शर्यत धावायला, न थकता किंवा दुर्बळ मन न बाळगता, आपले गळणारे हात उचलण्यास आणि आपले कमकुवत गुडघे बळकट करण्यास प्रोत्साहन देते (इब्री. 12:1, 3, 12).
ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणे
पण येशूने आपल्याला केवळ बक्षिसाकडे पाहण्यास शिकवले नाही तर नंतर त्याने जे शिकवले ते आचरणात आणले. आपली धाव संपवून आणि वधस्तंभावरील विजय मिळवून त्याने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आम्हांला स्वत:चे म्हणून सुरक्षित केले. हे लक्षात घ्या: आपण त्याला आपल्या पवित्र धैर्याने कमावत नाही, तर त्याने आपल्याला त्याच्या धैर्याने कमावले. पौलाप्रमाणे आम्ही पुढे जात राहतो, “ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले” (फिलिप्पै. 3:12). अनुक्रम उलटा करू नका. गुलामगिरी किंवा स्वातंत्र्य या क्रमावर लटकलेली आहे. ख्रिस्ताचे परिपूर्ण धैर्य प्रथम येते, जे नंतर आपले अपूर्ण परंतु वाढते प्रयत्न शक्य करते. किंवा, तुम्ही असे म्हणू शकता की, ख्रिस्ताचा पूर्ण स्वीकार प्रथम येतो; मग तो आमच्या कामाच्या नैतिकतेवर कार्य करतो.
म्हणून, एक समान धागा सैनिक, खेळाडू, शेतकरी, स्वतः ख्रिस्त आणि ख्रिस्ती लोकांच्या कामाच्या नैतिकतेला जोडतो: आम्ही आमच्या पाचारणाचे तपशील ओळखून ते स्वत:चे बनवतो; देहाच्या तात्कालिक इच्छांवर मात करण्यासाठी आपण आत्मसंयम बाळगतो; देवाच्या मदतीने, बक्षीसासाठी म्हणजे शेवटी अभिवचन दिलेला मोठा आनंद मिळवण्यासाठी आम्ही असुविधा सहन करतो, जो वर्तमानात प्रवाहित होतो आणि पुढे जात राहण्यासाठी अर्थ आणि सामर्थ्य देतो. आणि हे केवळ मानवी नव्हे तर विशेषतः ख्रिस्ती जे बनवते ते म्हणजे: शून्यता आणि असुरक्षिततेपासून नव्हे तर ख्रिस्त येशूने मला स्वतःचे बनवले आहे हे जाणून आपण आत्म्याच्या परिपूर्णतेने आणि सुरक्षिततेने, आपले सर्व प्रयत्न करतो.
लेख
डेव्हीड मॅथीस