ख्रिस्तसादृश्य कुटुंब संस्कृती रुजवणे
लेकरं शोषतात. जगात कसे वागायचे हे ते केवळ त्यांना इतरांनी काय शिकवले ह्यातूनच नव्हे तर ते ज्या प्रकारच्या संस्कृती आणि वातावरणात राहतात, विशेषत: त्यांचे घर, ह्यातूनही शिकतात. एक जुनी जाहिरात, “जेवढे शिकवले जाते त्यापेक्षा जास्त शिकले जाते” ही ह्याठिकाणी चपखल लागू होते. देवाच्या रचनेनुसार लेकरं नकळत मूल्यांचे शोषण करतात.
उदाहरणार्थ, लेकरं त्यांची मातृभाषा त्यांच्यासमोर कोणीतरी उच्चारांचा तक्ता घेऊन उभे राहिल्यामुळे शिकत नाहीत. ते त्यांची मातृभाषा दररोज ऐकण्यामुळे शिकतात. ते आत्मजागृतीशिवाय ती आत्मसात करतात. जशी भाषा तसेच मूल्यांचेही आहे. लेकरं सतत शोषण करत राहतात. म्हणून तुमच्या घराच्या चार भिंतींमध्ये काय घडते त्याचा तुमचे लेकरं काय बनणार आहेत ह्यावर प्रमाणाबाहेर परिणाम होतो.
तर मग, ख्रिस्ती पालक अशी ख्रिस्तसादृश्य संस्कृती कशी घडवू शकतील की ज्यामध्ये त्यांची लेकरं पोहू शकतील?
तटस्थता ओळखणे
कुटुंब संस्कृती पाच मिनिटांमध्ये प्रस्थापित होत नाही. कुटुंब संस्कृती ही पालकांचे देवाबरोबर, एकमेकांबरोबर, लेकरांबरोबर आणि जगाबरोबर असलेल्या नात्याची गोळाबेरीज आहे. आपण काय बोलता आणि कसे बोलता, आपण काय करता आणि कसे करता, आपण कशावर प्रीती करता आणि कशी करता, आपण कशाचा तिरस्कार करता आणि कसा करता ह्याबाबत जीवनाच्या प्रत्येक पैलूचा कुटुंबसंस्थेवर परिणाम होतो. कुटुंब संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रमुख घटना समाविष्ट आहेत, त्याचप्रमाणे अगदी सुक्ष्म वाटणार्या आणि ज्याकडे कोणाचे लक्ष नाही अशा वाटणार्या गोष्टी सुद्धा समाविष्ट आहेत, जसे की आपण पथदिव्यावर थांबलेले असताना काय बडबडता.
“कुठलेही कुटुंब ख्रिस्ती संस्कृतीचे नाटक करू शकत नाही, निदान दीर्घ काळ तरी नाही.”
कुठलेही कुटुंब ख्रिस्ती संस्कृतीचे नाटक करू शकत नाही, निदान दीर्घ काळ तरी नाही. जर पौल देवाचे चारित्र्य, त्याचे गुणधर्म आणि त्याच्या अद्भुत कृती ह्यांनी उत्साहीत होत नसतील, तर त्यांची तटस्थता ही त्यांच्या लेकरांमध्ये आदर जागृत करणार नाही. तटस्थता ही पुनरुत्पादनाजोगी आहे. जर आकाश मला देवाचा महिमा वर्णित नसेल (स्तोत्र 19:1), तर मग मी माझ्या लेकरांना आकाश वर्णन करत असलेला महिमा बघण्यास मदत करू शकणार नाही.
देवाच्या गौरवासाठी खरा उत्साह हा पोकळ आस्था नाही. लेकरांमध्ये पाखंडीपणा ओळखण्याची क्षमता असते. देह आत्म्याचे करत असलेले सोंग त्यांनी तुमच्या तोंडावरील मुलामा गळून जात असलेला बघेपर्यंतच टिकते. म्हणून, जेव्हा ख्रिस्ती संस्कृती प्रस्थापित करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा पहिली पायरी ही आहे की तुम्ही स्वत: येशूच्या सर्वोच्चतेने संपूर्णत: भरलेले असावे. येशू लक्ष्याकडे निर्देश देणारा नाही तर स्वत: लक्ष्य आहे.
आदर आदराला जन्म देतो
सर्व गोष्टीच्या वर असणार्या ख्रिस्ताचे सौंदर्य बघण्याबाबत आपल्या लेकरांशी किंवा कोणाशीही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करताना जागृत असा. संस्कृतीची प्रस्थापना करण्यात युक्तिवाद जरी आवश्यक असले तरी, ते पुरेसे नाहीत. तुम्ही आंधळ्या मानसाशी सूर्यास्ताच्या वेळी रंगबेरंगी ढग बघण्याबाबत युक्तिवाद करू शकत नाही. म्हणून, आपल्या लेकरांना आपण कोणी मागणी न करता आणि कोणी जबरदस्ती न करता केलेली आराधना नियोजित उपासना सभेच्या क्षणांमध्ये आणि दैनंदिन जीवनाच्या अनियोजित क्षणांमध्येसुद्धा बघू द्या. तुम्ही केवळ कौटुंबिक भक्ती आणि मंडळीची उपासना ह्या वेळीच पवित्र शास्त्राचा विचार करता आणि देवाशी संभाषण करता असा संशय त्यांच्या मनांत येऊ देऊ नका.
येशूने तुम्हाला धरलेले आहे का? येशूने तुम्हाला सखोलरीत्या प्रभावित केले आहे का? जेव्हा तुम्ही कलस्सै. 1:16–18 वाचता तेव्हा तुमचा आदर उफाळून येतो का?
कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्वकाही त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे; तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे; तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे.
जी ख्रिस्ती संस्कृती आम्हाला पाहिजे ती भक्तीच्या वेळांपेक्षा निष्ठेबाबत आहे. एखाद्या गोष्टीचे महत्त्व समजाऊन सांगणे आणि त्याचे महत्त्व आपल्या जीवनाद्वारे जगून दाखवणे ह्यामध्ये फार मोठा फरक आहे, महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देण्याकरिता लहान सहान बाबी थांबवणे.
ख्रिस्तसादृश्य संस्कृती निर्माण करणे
मला अशी एकही व्यक्ती ठाऊक नाही जिने ख्रिस्ती लेकरं निर्माण करण्याकरिता खातरीलायक यादी तयार केलेली आहे. परंतु परिवर्तित अंत:करणे ह्या याद्यांचा उपयोग स्वनिदान किंवा स्मरण म्हणून करू शकतात. आपण आपल्या घरामध्ये ख्रिस्ती संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करत असताना, खालील सल्ले तुम्हाला तुम्ही कसे करत आहात हे बघण्यास मदत करण्याकरिता आरशासारखी मदत करतील. आपण ह्या सल्यांवर मार्ग आणि शब्द अशा दोन गटांमध्ये विचार करू.
मार्ग
माध्यमांचा देव कुटुंबामध्ये सातत्यपूर्णरीत्या पाळल्या गेलेल्या सवयींचा उपयोग मूल्ये आणि ओळख उंचावण्याकरिता आणि बळकट करण्याकरिता करतो. “आमचे कुटुंब अशाप्रकारे कार्य करते.” पुढील गोष्टींबाबत विचार करा.
आपल्या लेकरांकडून आपण जे अपेक्षिता त्याचा कित्ता व्हा : ख्रिस्ती सौजन्य, परिश्रम, वक्तशिरपणा आणि असे ख्रिस्तसादृश्य चारित्र्याचे गुणधर्म जे पवित्र आत्म्याने भरलेल्या पालकांमध्ये फुलतात. तुम्ही कधीच चुकत नाही असे दर्शवू नका, आपली पापे आणि चुका कबूल करा. “माझे चुकले,” असे मोठ्याने म्हणा, आणि मनांत न ठेवता एकमेकांची क्षमा मागा.
ख्रिस्ती संस्कृतीमध्ये, पालक लोक आनंदाने त्याग करतात आणि आपल्या लेकरांना आज्ञापालन शिकवत असताना स्वत:स मोठ्या पदावर बसविण्याची मागणी करत नाहीत. ते असे म्हणू शकतात, “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा” (1 करिंथ. 11:1).
सौम्य स्पर्श करा. सौम्य आणि सहज केलेले स्पर्श आपले प्रेम आणि स्वीकारणियता व्यक्त करतात, लेकरं जर शरीर कडक करतात किंवा स्वत:ला दूर ओढतात, तर मग ते काटेरीपण अशी संबंधात्मक जखम व्यक्त करतात जिला आरोग्याची गरज आहे.
सुव्यवस्थित व्हा. सुव्यवस्था कुटुंबातील प्रत्येकाला साहाय्य करेल, परंतु अव्यवस्थित राहणीमान आणि कालगणना ही संभ्रमितपणाला जन्म घालेल. आपल्या निर्णयांना सुव्यवस्थित करण्यापासून सुरुवात करा, आणि मग तेथून सर्वकाही विभागायला सुरुवात करा. सुव्यवस्थित पुस्तकांचे कपाट, कपडे नीट नेटकी ठेवण्याची व्यवस्था, फ्रिजवर लावलेली करावयाच्या गोष्टींची स्मरण यादी यामुळे कुटुंबातील सर्वांना एक चमू म्हणून काम करण्यास मदत होईल.
निसर्गाने लेकरांना शासन केलेले असताना तुम्ही अधिक शासन करू नका. जेव्हा आपला मुलगा त्याच्या सायकलवर विदूषकासारख्या कवायती करत असताना पडला आणि त्याचा गुडघा चांगला घासला गेलेला आहे, तेव्हा तुम्हाला त्याला अधिक शासन करण्याची गरज नाही. देवाने प्रस्थापिलेल्या सृष्टीने त्याला नैसर्गिकरीत्या दुरुस्तीचे लागूकरण केलेले आहे.
“जी ख्रिस्ती संस्कृती आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत ती भक्तीच्या वेळांपेक्षा निष्ठेबाबतची गोष्ट आहे.”
त्यासोबत, आपल्या लेकराला भिती घालू नका. तुम्ही पालक आहात. आपल्या पालकांनी आपल्याला जगाचा प्रभारी म्हणून सोडलेले आहे असे त्याच्या लक्षात येणे हा अतिशय भयप्रद अनुभव असू शकतो. आपण आपला देवाने दिलेला पालकांचा अधिकार वापरला तर तुम्ही आज ना उद्या आपल्या लेकरांच्या स्वत:च्या नियमांबद्दल त्यांना दुखावणार आहात. आपण त्यांना दुखावणे (देवभिरू शिस्तीचा अटळ परिणाम) आणि त्यांना जखमी करणे (अतिरिक्त किंवा समयोचित नसलेल्या शिस्तीचा उपयोग) ह्यातील फरक समजून घ्या. आपल्या कुटुंबावर योग्य प्रीती करण्याकरिता आपल्या देवावर कुटुंबापेक्षा अधिक प्रीती करा.
शब्द
आम्ही काय बोलतो ते निश्चितच महत्त्वाचे आहे आणि आपण ते कसे बोलतो हे त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या आवाजाचा स्वर किंवा आपले हावभाव हे जीवन देणारे किंवा घातक असू शकतात.
जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. (नीतिसूत्रे 18:21)
जेव्हा आपली लेकरं अवतीभोवती असताना बोलण्याचा प्रसंग येतो तेव्हा आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवा. तुम्ही बोलताना तणावपूर्ण, चिडचिडे, सतत गार्हाणे करणारे असे वाटता की तुम्ही आनंदी, आभारयुक्त आणि सन्माननीय असे वाटता? लेकरांच्या मुखातून पालकांनी जे बोलायला नको होते ते निघते. आपल्या आवाजाचा स्वत: कौटुंबिक संस्कृतीकरिता फार महत्त्वाचा आहे. गार्हाणे करण्याला पारितोषिक देऊ नका नाहीतर तुम्हाला ते अधिक मिळेल. टोमणे मारण्याबाबत जागृत असा, कारण ते आपल्या घराला आणि घरातील लेकरांच्या जीवनात विष कालवू शकते.
प्रशंसनीय गोष्टींची प्रशंसा करा, विशेषत: जेव्हा तुम्ही ते तुमच्या लेकरांच्या वृत्तीमध्ये बघता तेव्हा ख्रिस्तसादृश्य चारित्र्यापेक्षा शारीरिकरीत्या दिसणे आणि क्षमतांवर अधिक जोर देऊ नका.
जास्तीत जास्त वेळी आभार माना; लेकरांना, इतरांना आणि देवाला आभार मानतो असे म्हणा. आपल्या लेकरांना आणि जोडिदाराला दिलेल्या अभिवचनांना पाळा.
प्रार्थना. आपल्या लेकरांसाठी आणि लेकरांसोबत प्रार्थना करणे ही त्यांना दिलेली निशब्द सेवा आहे. तुम्ही त्यांच्यासोबत येशूबद्दल बोलण्याआधी येशूसोबत त्यांच्याबाबत बोला आणि ह्या दोन्ही बाबी दररोज करा.
गीत गा. गीतं गाण्याचा आपल्या घराच्या स्वरावर अद्भुत परिणाम होतो आणि देवभिरू काव्य पंक्ती स्मरणात ठेवण्याचा दीर्घकाळ फायदा वेगळा सांगायला नको. तुम्ही अनपेक्षित वेळांना गाऊ शकता, भांडी धुतांना किंवा गाडी चालवताना, तुम्ही एकत्र येऊन असे गीत गाण्याचा प्रयत्न करू शकता जे आपण तयार करू इच्छित असलेल्या संस्कृतीला साहाय्य करेल. आपण ह्या सर्व शब्दांचा आणि मार्गांचा ख्रिस्तसादृश्य कुटुंबाकरिता दृष्टांतामध्ये सारांश करू शकतो का? आपले सर्व व्यवहार व संभाषणामध्ये असे जगा की जेव्हा तुमच्या लेकरांना ते एखाद्या खर्या ख्रिस्ती व्यक्तीला ओळखता का असे विचारल्यास ते लगेच तुमचा विचार करू शकतील.
लेख
सॅम कार्बट्री