कठीण दिवसांमध्ये आज्ञापालन करणे

काही संतांकरिता आध्यात्मिक अंधकाराचे काही काळ इतके गडद आणि दीर्घ काळचे असू शकतात की आज्ञापालनाचे सर्वसाधारण नमुने अपरिणामकारक वाटू लागतात.

आम्ही मोहपाशांविरुद्ध आठवडेच्या आठवडे, महिने किंवा अनेक वर्ष वाचन केलेले असेल, प्रार्थना केलेली असेल आणि संघर्ष केलेला असेल. आणि आता, कदाचित असे वाटत असेल की ह्याचा काय फायदा. फारच थोडा बदल होतो, मग कशाला वाचायचे? जेव्हा देव शांत आहे असे वाटते तेव्हा प्रार्थना कशाला करायची? एकाकी अंधकारमय परिस्थितीत कोणीच बघत नसताना आणि कोणीच काळजी सुद्धा करत नसताना कशाला आज्ञापालन करायचे? दीर्घकाळापासून दिवस सूर्यहीन आहेत; मग जणूकाही आकाश लवकरच फार तेजस्वी होणार आहे अशा आशेने का जगावे?

देवाच्या सर्वच लोकांना अशा काळाचा परिचय नसतो. परंतु ज्यांना आहे आणि ज्यांना होणार आहे, त्यांना देवाने मित्रहीन असे सोडलेले नाही. ह्या अंधकारमय परिस्थितीमध्ये, एक बंधू आपल्यासमोर चालतो, त्याचे दिवस आमच्याहीपेक्षा अंधकारमय असतात, परंतु त्याचे आज्ञापालन आमच्या मार्गाकरिता प्रकाश आहे.

त्याची गोष्ट उत्तम शुक्रवारी, अंधार्‍या शुक्रवारी, मृत शुक्रवारी घडते. काही काळाकरिता त्याने त्याची आशा उंच उडू दिली, त्याने धैर्याने असा विश्वास ठेवला की येशूमध्ये त्याने त्याच्या स्वत:च्या मशीहाचा चेहरा बघितला आहे. परंतु मग शुक्रवार आला, आणि त्याने त्याचा चेहरा धूसर होत असताना बघितला; त्याने त्याच्या प्रभूला वधस्तंभावर शक्तिहीन असे बघितले. आणि कुठल्यातरी कारणास्तव तो पळून गेला नाही. तो पडला नाही. तो निराशेत बुडून गेला नाही.

त्याऐवजी, “अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले” (मार्क 15:43). तीन खिळे आणि भाल्याने त्याच्या सूर्याला वधले होते. आणि कुठल्याही मार्गदर्शक प्रकाशाविना, योसेफाने आज्ञापालन केले.

योसेफाचे विलक्षण आज्ञापालन

येशूच्या पुरल्या जाण्याच्या वृत्तांतामध्ये आम्हाला विलक्षण आज्ञापालन दिसते.

प्रथम, योसेफ हा काही बारा शिष्यांपैकी एक नाही, ज्याला आपण अशा क्षणी बघण्याची अपेक्षा करू. आता पर्यंत खरेतर, तो येशूचे अनुसरण “गुप्तपणे” करत होता  (योहान 19:38). तो “न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य” होता (मार्क 15:43), योसेफ हा उच्च ठिकाणातील शिष्य होता, ज्याने आपली निष्ठा बहुतांशी शांत ठेवलेली होती. आणि तरीही, उत्तम शुक्रवारी, जेव्हा त्याची निष्ठा त्याच्यासाठी काही चांगले करू शकत नव्हती, तेव्हा तो बोलतो. 

दुसरे, येशूला पुरणे हे योसेफाला फार महाग पडू शकले असते. आर्थिकदृष्ट्या, त्याने स्वत: तागाचे वस्त्र विकत आणले आणि त्याने नेमकेच खोदलेल्या कबरीत येशूला ठेवले — निसंशयपणे त्याच्या मनात इतर उद्देश होते (मार्क 15:46; मत्तय 27:57). विधित्मकरीत्या, मृत शरीराला हाताळणे त्याला अशुद्ध करत होते. आणि सामाजिकरीत्या, त्याने रक्त आणि घामाला स्पर्श करण्याची अप्रतिष्ठा स्वीकारली, दुसर्‍याच्या मृत शरीराखाली आपले शरीर वाकवणे स्वीकारले, जणूकाही तो एखादा गुलाम किंवा रोमी शिपाई होता.

तिसरे, आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे, येशूचे श्वासहीन शरीर वाहून नेत असताना इतर शिष्यांसोबत आपल्याही आशा वधस्तंभावर खिळल्या गेल्या आहेत असे वाटण्याची सर्व कारणे त्याच्याकडे होती. पुनरुत्थान येणार आहे असा त्याचा विश्वास होता असा संशय बाळण्याचे आमच्याकडे एकही कारण नाही. त्या बंद खोलीमध्ये आशाहीनतेने एकत्र जमलेल्या अकरा शिष्यांप्रमाणेच त्यालाही तो कबरेवरचा धोंडा कायम तसाच राहणार आहे असे वाटले.

निश्चितच, योसेफाची कृती सुंदर होती, परंतु सर्वदृष्टीकोणातून ती आशाहीन अशी सुंदर होती. दुष्काळात एखाद्या शेतकर्‍याने कधीच उगवण्याची अपेक्षा न करता पेरलेल्या दाण्याप्रमाने ते सुंदर होते. एखादा एकटाच उरलेला सैनिक युद्धामध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे ते सुंदर होते.

आणि तरीही, कदाचित असे असून सुद्धा योसेफाजवळ एक अजून तारा चमकत होता. आणि कदाचित त्यामध्ये आम्हालाही जीवन देण्यास प्रकाश आहे.

आकाशातील शेवटचा तारा

आणि त्या अंधकारामध्ये, लांबून अंधूक असा किरण दिसतो. योसेफ हा “देवाच्या राज्याची प्रतीक्षा करत होता” असे आपणास लूक सांगतो (लूक 23:51). तो शुक्रवारी सकाळी प्रतीक्षा करत होता; आणि शुक्रवारी संध्याकाळी सुद्धा राज्याच्या मृत राजाला हाती घेऊन तो प्रतीक्षा करत होता. कुठल्या प्रकाशाने त्याची ही प्रतीक्षा कायम होती?

कदाचित योसेफाला आठवले असेल कसा त्याचा बाप अब्राहाम ह्याने विश्वास ठेवला “आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला” (रोम. 4:18). आणि कदाचित, अब्राहामाप्रमाणे त्याने त्याच्या इसहाकाला कबरेत नेले, कुठल्यातरी अंधुक स्तरावर असा विचार केला की, “मेलेल्यांतून देखील उठवण्यास देव समर्थ आहे” (इब्री 11:19).

“देवाचे राज्य हे बहुतांशी अनपेक्षित आणि विलक्षण आज्ञापालनामध्ये वाढते.”

कदाचित देवाने अंधकारमय प्रभातींना सूर्याला जणूकाही कबरीतून उठवून कसे प्रकाशित केले ह्याची त्याने आठवण केली असेल. कदाचित त्याने अंधूकरीत्या असा विचार केला असेल की हा लाजराला उठवणारा स्वत:लाही कसातरी उठवेल. कदाचित त्याने येशूबद्दल अशा आशेची सावली धरून ठेवली होती की येशू हाच ख्रिस्त आहे आणि तो ख्रिस्त सदासर्वकाळ मेलेलाच राहू शकत नाही. परूशांना येशूने असे म्हटलेले आठवले, “तीन दिवसांनंतर मी उठेन” (मत्तय 27:63); कदाचित योसेफाला देखील ते आठवले असेल. कदाचित तो ते विसरू शकला नाही.

काहीही असो, येशू गेल्यानंतरही योसेफाच्या फुप्फुसाने काही अंतीम श्वास धरून ठेवले होते. म्हणून, त्याने एका जड पावलापुढे दुसरे पाऊल टाकले. त्याने निराशा नकारली, त्याने त्याच्या भावना नकारल्या, त्याने संभावना नकारल्या आणि ज्याचे अनुसरण त्याने केले होते त्याला तो धरून राहीला. तो उत्तम शुक्रवारच्या संपूर्ण अंधकाराखाली चालला, जगाच्या मरणार्‍या आशेखाली दबलेला माणूस ह्या नात्याने चालला. त्याने जीवहीन राजाला वाहून नेले, त्याला काळजीपूर्वकरीत्या पुरले, आणि कसेतरी करून त्याचे राज्य येईल असा विश्वास ठेवला.

तुम्हाला असली आशा माहीत आहे का, जी तुम्हाला अंधकारमय प्रभाती भेटते आणि धोंड्याप्रमाणे अंधकार दूर सारते? आकाशातील शेवटल्या तार्‍याच्या प्रकाशात राज्य बघण्यास आपण शिकला आहात का? जर नाही, तर तुम्ही योसेफाच्या पावलांवर पाऊल ठेऊन, आशा मरण पावलेली आहे असे वाटत असताना सुद्धा आज्ञापालन करून चालाल का?

प्रतीक्षा करत राहण्यासाठी धैर्य

आम्ही कदाचित अशी कल्पना करत असू की योसेफासारखा अनुभव कबरीच्या ह्या बाजूला अस्त पावलेला आहे. ख्रिस्त जिवंत असताना आशा कधी मेलेली वाटू शकते का? निश्चितच, योसेफ अनन्य परिस्थितीमध्ये चालला. अशा भयंकर परिस्थितीशी युद्ध करून विश्वास ठेवणे हे योसेफाशिवाय आतापर्यंत कोणी केलेले नाही. आमच्यापैकी कोणीच प्रभूचे मृत शरीर आपल्या हाती धरलेले नाही.

पुनरुत्थानदिवस आमच्या मागे असताना सुद्धा आम्हाला किती संभ्रमित, निष्फळ, अंधकारमय, आणि आशाहीन वाटू शकते ह्याबाबत आम्ही जागृत असलो पाहिजे.  येशू अंधकारमय आणि थंड दिवसांबद्दल बोलला (मत्तय 24:12). पेत्राने दु:ख आणि पौलाने कण्हण्याबद्दल लिहिलेले आहे (1 पेत्र 1:6; रोम. 8:22–25). कधी कधी, महान प्रेषितही वाकलेला दिसतो, निराश, चिंतातूर, आणि “संभ्रमित” (2 करिंथ. 4:8). पुनरुत्थान दिवसानंतर, आमची आशा जिवंत आहे आणि राज्य करते, परंतु आम्ही त्याला नेहमी बघत नाही. काही रात्री इकडे फार गडद वाटतात.

तेजस्वी आकाशाखाली चालावे, आशेने भरलेले हात असावेत, आमचा विश्वास जवळपास दृष्य असल्यासारखा असावा, असे आम्हास वाटेल. ते दिवस निश्चित येतात, आणि काय अद्भूत देणगी ते दिवस असतात. राज्य अपेक्षिणे तेव्हा फार सोपे वाटते. आणि राजाचे आज्ञापालनही सोपे वाटते.

परंतु आमच्यापैकी अनेकांना योसेफासारखे बघू न शकणार्‍या राज्याची अपेक्षा केल्याप्रमाणे वाटेल. आमच्या भावना आम्हाला सांगतील की जशी येशूची कबर सदासर्वकाळसाठी बंद झालेली आहे असे वाटले तसे राज्य मेलेले आहे. परंतु जशी योसेफाची गोष्ट आम्हाला आठवण करून देते की देवाचे राज्य हे बहुतांशी अनपेक्षित आणि विलक्षण आज्ञापालनामध्ये वाढते. मोहरीच्या दाण्यामधून झाड अदृश्यरीत्या वाढत राहते. गोळ्यामध्ये खमीर शांततेने पसरत जाते. आणि आमच्या आज्ञापालनाच्या मध्यरात्री कबरीचा अंधकार अशा क्षणाची वाट बघत असते जेव्हा आमची फुप्फुसे आशेने पुन्हा भरतील. तर मग, योसेफासोबत धैर्य बाळगा. प्रार्थना करत राहा, वाट बघत राहा, ज्या राज्याला तुम्ही बघू शकत नाही त्याची प्रतीक्षा करत राहा. आपल्या दुर्बळ हृदयाला भिंतीवरील पहारेकर्‍याप्रमाणे सकाळची मागणी करणार्‍या व अपेक्षा करणार्‍यासारखे प्रस्थापित करा. अंधकारामध्ये आपल्या प्रभूचे आज्ञापालन करा, आणि तो सकाळ आणणार आहे असा विश्वास बाळगण्याचे धाडस करा.

लेख

स्कॉट हबर्ड

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *