पवित्र शास्त्रोक्त भाषांचे पाळकीय मूल्य

संक्षेप: आजच्या अशा दिवसांमध्ये जेथे सुवार्ताप्रसारकीय ईश्वरविज्ञान विद्यालये मूळ भाषा आवश्यक करत नाहीत, आणि पाळकीय सेवेचे सर्व तणाव असताना, विद्यार्थी आणि पाळक लोक कदाचित असा विचार करत असतील की त्यांनी ग्रीक आणि हिब्रू भाषा शिकण्याचे (आणि त्याचे ज्ञान कायम ठेवण्याचे) कष्ट घ्यावेत का. तथापि, अनेक प्रभावशाली आणि आध्यात्मिकरीत्या शक्तीशाली ख्रिस्ती पुढार्‍यांनी काही कारणांस्तव पवित्र शास्त्रोक्त भाषांना फार मूल्य दिलेले आहे. भाषांतरांऐवजी, हिब्रू आणि ग्रीक भाषांमधील लिखिते देवाचे अचूक वचन सादर करतात हे त्यांना माहीत होते. त्यांना हे सुद्धा माहीत होते की विश्वासू आणि ताजे शिक्षण मूळ हस्तलिखितांच्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि त्यांना हे माहीत होते की, पवित्र शास्त्रोक्त भाषा शिकण्यास जरी कठीण असल्या तरी शेवटी फार वेळ आणि प्रयत्न वाचवतात.

आमच्या पाळक व ख्रिस्ती पुढार्‍यांसाठी सुरू असणार्‍या लेख मालिकेकरिता, आम्ही रॉबर्ट प्लमर, कॉलीन आणि एव्हलीन आईकमन ह्या सदर्न बॅप्टिस्ट थियॉलॉजिकल सेमिनरीच्या पवित्र शास्त्रोक्त अभ्यासाच्या अध्यापकांना ग्रीक आणि हिब्रू भाषा शिकण्याची कारणं देण्यास सांगितली.

अलिकडील सत्र सुरू होण्याच्या वेळी माझ्या सोशल मिडियावर एक लेख प्रकाशित झाला. एका प्रमुख ईश्वरविज्ञान विद्यालयाच्या अध्यक्षाने लेख लिहिला होता, “ईश्वरविज्ञान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी (आणि पाळकांनी) पवित्र शास्त्रोक्त भाषा शिकणे हा वेळेचा अपव्यय आहे का? इज इट ए वेस्ट ऑफ टाईम फॉर सेमिनरी स्टुडेंट्स (अँड पास्टर्स) टू लर्न दी बिब्लिकल लॅन्ग्वेजेस? त्यांनी दिलेला प्रतिसाद नव्हे तर त्यांनी प्रथम हा प्रश्न विचारावा ह्या वास्तविकतेनेच मी त्रस्त झालो.  

आम्ही ईश्वरविज्ञान विद्यालयाच्या अध्यक्षांनी, “ईश्वरविज्ञान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रमबद्ध ईश्वरविज्ञान शिकणे हा वेळेचा अपव्यय आहे का?” किंवा “ईश्वरविज्ञान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपदेश करायला शिकणे हा वेळेचा अपव्यय आहे का?” ह्यावर लेख लिहिलेला बघतो का. ईश्वरविज्ञान विद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये पवित्र शास्त्रोक्त भाषा समाविष्ट केल्यामुळे कुठल्या कारणास्तव त्यांना जाहीर क्षमा मागावी लागू शकते?

आम्हाला येथे कुठल्याही कारणाने आणलेले असो, सत्य हे आहे की अनेक लोक सेवकिय प्रशिक्षणाकरिता पवित्र शास्त्रोक्त भाषांच्या मूल्याबाबत प्रश्न विचारतात. आणि मी असे ठामपणे सांगतो की पवित्र शास्त्रोक्त भाषा ह्या संपूर्णत: आवश्यक आहेत. खाली मी मूळ भाषा ह्या सेवकिय प्रशिक्षणाकरिता का आवश्यक आहेत ह्याची तीन कारणे देणार आहे, आणि त्यानंतर आमच्या दिवसांमध्ये त्याला असणारी तीन आव्हाने काय आहेत ह्यावर विचार मांडणार आहे.

तर मग, पवित्र शास्त्रोक्त भाषा का अत्यावश्यक आहेत?

1. कारण आम्ही देवाच्या वचनाला मूल्य देतो

इंग्रजी पवित्र शास्त्र हे देवाचे अचूक वचन आहे अशी पुष्टी करण्यास मला संकोच वाटत नाही. दैनंदिन भाषेमध्ये, कुठल्याही अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही. तथापि, आम्ही कबूल केले पाहिजे की इंग्रजी भाषांतरांमध्ये भिन्नता आहे. 1 योहान 1:1 मध्ये, दी नेट बायबल the NET Bible च्या भाषांतरकारांनी अंतिम पाच ग्रीक शब्द (पेरी टोऊ लोगोऊ टेस झोएस peri tou logou tēs zōēs) कंसामध्ये अशी सूचना देऊन मांडलेली आहेत : “(जीवनाच्या शब्दाविषयी).” त्याच भाषांतरामध्ये “शब्द word” मोठ्या लिपित लिहिलेला नाही, आणि हे दर्शविलेले आहे की योहान हा शुभवर्तमानाला “जीवनाचा शब्द” असे संबोधत आहे. दुसर्‍या हाती, न्यु लिव्हिंग ट्रान्सलेशन ह्या पाच ग्रीक शब्दांतून (पेरी टोऊ लोगोऊ टेस झोएस peri tou logou tēs zōēs) नवीन वाक्य तयार करतात आणि “शब्द Word,” मोठ्या लिपित लिहितात त्यामुळे, “तो जीवनाचा शब्द आहे He is the Word of life” असे वाक्य तयार होते.

मग 1 योहान 1:1 येशूला मानवरूपात आलेला शब्द Logos असे संबोधत आहे, किंवा मंडळीद्वारे स्वीकारलेले शुभवर्तमान असे संबोधत आहे? आता एखादी व्यक्ती असा युक्तिवाद करेल की योहान दी नेट बायबल the NET Bible आणि दी न्यु लिव्हिंग ट्रान्सलेशन the New Living Translation ह्या दोहोंचा सारांश मांडण्याकरिता काही अंशी अस्पष्टता जोपासत आहे. परंतु इंग्रजी भाषांतरांमध्ये असल्याप्रकारची अस्पष्टता समाविष्ट केलेली नाही. ते वेगळ्या आणि भिन्न अर्थविवरणावर पोहचतात. आम्हावर असा निष्कर्ष काढण्याचा जोर वाढतो की कमी कमी एक भाषांतर चुकीचे किंवा सदोष आहे.

अंती आम्ही अशी पुष्टी करत नाही की पवित्र शास्त्रातील विशिष्ट इंग्रजी शब्द हे पवित्र आत्म्याच्या श्वासाने आलेली आहेत. तथापि, आम्ही त्यामागे असलेल्या ग्रीक व हिब्रू भाषांबद्दल मात्र तशी पुष्टी करतो. पवित्र शास्त्राची अचूकता ह्यावरील शिकागो विधानामधील लेख क्रं.10 हा प्रेषितांनी आणि संदेष्ट्यांनी लिहिलेले ग्रीक आणि हिब्रू शब्द अचूक आणि संपूर्णत: विश्वासार्ह असल्याची पुष्टी करतो.

ए. टी. रॉबर्टसन (1863–1934) हे नवीन कराराचे प्रसिद्ध विद्वान खालील विधान करताना निसंशय उत्प्रेरक होते,

खरा नवीन करार हा ग्रीक नवीन करार आहे. इंग्रजी नवीन करार हा केवळ त्याचे भाषांतर आहे, तो मूळ नवा करार नाही. नवीन करार अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेला आहे ही चांगली बाब आहे. तो आधिच्या ग्रीक बोलीभाषांऐवजी कोईने ग्रीक ह्या त्याकाळच्या वैश्विक भाषेमध्ये लिहिलेला होता ह्या वास्तविकतेमुळे ते इतर आधुनिक भाषांमध्ये आणणे सोपे जाते. परंतु असे बरेच आहे जे भाषांतरित केले जाऊ शकत नाही. बोलीभाषेतील वैचारिक वळणे, आणि त्याच्या सुक्ष्म छटा ह्या भाषांतरित केल्या जाऊ शकत नाहीत. स्ट्रॉबेरीचा ताजेपणा हा कुठल्याच अर्कामध्ये टिकवून ठेवला जाऊ शकत नाही.  

आधुनिक इंग्रजी पवित्र शास्त्र हे नियमित उजळणितून जातात. त्यातील शब्दरचना बदलते. जरी भाषांतरे अचूक असली तरी त्यांचे वाचन अचूकरीत्या व्हावे म्हणून त्यात बदल केले गेले पाहिजे, ही निर्विवाद कबुलीच नाही का?

देवाने पवित्र शास्त्राच्या मूळ हिब्रू, ग्रीक, आणि अरॅमिक शब्दांना प्रेरित केले, आणि पवित्र शास्त्र हे जर आमच्या जीवन आणि सेवांकरिता सर्वोच्च अधिकारी आहे, तर मग जेव्हा मतभेद होतात तेव्हा आम्ही शेवटी त्या हिब्रू, ग्रीक, आणि अरॅमिक व्याकरणात्मक रचनांकडे वळलो पाहिजे. 1929 मध्ये वेस्टमिनिस्टर थियॉलॉजिकल सेमिनरीमधील त्यांच्या पहिल्या दीक्षांत समारंभामध्ये जे. ग्रेशम मॅचन ह्यांनी असे जाहीर केले,

तुम्ही पवित्र शास्त्र काय सांगते हे सांगू इच्छित असाल, तर तुम्ही पवित्र शास्त्र स्वत:करिता वाचू शकले पाहिजे. आणि पवित्र शास्त्र ज्या भाषांमध्ये लिहिले गेले ती भाषा तुम्हाला आल्याशिवाय तुम्ही पवित्र शास्त्र स्वत:करिता वाचू शकत नाही. देवाने त्याच्या रहस्यमय सुज्ञतेमध्ये आम्हाला त्याचे वचन हिब्रू आणि ग्रीक भाषांमध्ये दिले. म्हणून आम्हाला जर पवित्र शास्त्र समजून घ्यायचे असेल, तर आम्ही हिब्रू आणि ग्रीक भाषेच्या अभ्यासाकडे गेलो पाहिजे.

आम्ही आमचा ख्रिस्ती विश्वास आणि व्यवहारांचा अंतिम अधिकारी म्हणून देवाने श्वास घातलेले, अचूक अशा देवाच्या वचनाला मूल्य देत असल्यामुळे, सेवकीय विद्यार्थी हे मूळ भाषांचे विद्यार्थी असले पाहिजे.

2. कारण आम्ही विश्वासू आणि ताज्या शिक्षणाला मूल्य देतो

दी डेली डोस ऑफ ग्रीक The Daily Dose of Greek म्हणजे ग्रीकचा दैनंदिन आहार ह्या माझ्या ऑनलाईन शिक्षण सेवेमध्ये मला अनेक भिन्न पार्श्वभूमिच्या ख्रिस्ती लोकांचे इमेल प्राप्त होतात. काही काळ आधी, मला एका मेथॉडिस्ट सेवकाचे शोक व्यक्त करणारे इमेल आले. त्यांनी लिहिले होते की मेथॉडिस्ट मधील त्यांचे काही सहपाळक संदेशांची तयारी ग्रीक नवीन करारामधून तर करत नव्हतेच पण काहीतर इतरांचे संदेश स्वत:चे म्हणून सादर करत होते (म्हणजे ते संदेशाची आजिबात तयारी करतच नव्हते!). ह्या मेथॉडिस्ट पाळकाने मला सांगितले की त्याचे संदेश ताजे, मूळ, आणि लक्षवेधक असण्यामागे त्यांनी आठवडाभर ग्रीक नवीन करार आणि हिब्रू जुना करार ह्यामधून केलेली तयारी आहे.

यिर्मया 23:29 मध्ये देव म्हणतो, “माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय?”. तुम्ही देवाच्या वचनाच्या विलक्षण भट्टीत प्रवेश करून ताजे, समयोचीत, आणि विश्वासू संदेश मिळविण्यास अपयशी व्हाल, हे अशक्य आहे.

जेव्हा लोक तुमच्या घरी भोजनास येतात, तेव्हा तुम्ही कालचे उरलेले जेवण गरम करून त्यांना वाढता का? किंवा त्याहीपेक्षा वाईट, तुम्ही शेजार्‍यांकडे जाऊन त्यांचे उरलेले अन्न मागून आणता का? कदाचित तुम्ही ते ताजे करण्यासाठी जराशी चीज त्यावर शिंपडता? जॉन पायपर आम्हाला चेतावनी देतात, “शिळे अन्न आमच्या लोकांचा विश्वास आणि पवित्रता ह्यांचे संगोपन करून ते अधिक मुळावलेले करू शकणार नाही…पाळकासाठी ग्रीक आणि हिब्रू भाषेमध्ये देवाचा खजीना खोदण्यापेक्षा अधिक महत्वाचे आणि सखोलपणे व्यवहारिक काय असू शकेल?  

क्लॅश ऑफ व्हिजन्स Clash of Visions ह्या पुस्तकामध्ये रॉबर्ट यारबोरोव्ह मार्टीन लूथर ह्यांच्या रोम. 6 वरील हस्तलिखित टिपणांचा शोध घेतात. तसे करताना हे अगदी स्पष्ट होते की मार्टीन लूथर ह्यांनी नीतिमत्वा संबंधीच्या कल्पना कुठल्यातरी पॉडकास्टवर ऐकून किंवा ग्रेग अ‍ॅलिसन ह्यांच्या हिस्टॉरिकल थिऑलॉजी   Historical Theology ह्या पुस्तकात एखादा शब्द शोधून प्राप्त केलेली नाही. त्यांनी मूळ भाषांमधून शास्त्राचा अभ्यास केला असता रोमकरांस पत्र आणि स्तोत्रसंहितेतून देवाचे पाप्यांना नीतिमत्व हे एक देणगी म्हणून प्रदान करणे त्यांना समजले. लूथर ह्या अनुभवाबद्दल स्वत: बोलतात :

उपदेशक जरी मूळ भाषांच्या ज्ञानाशिवाय विश्वास आणि शुभवर्तमान गाजवू शकतात, तरी त्यांचे उपदेश हे दुर्बळ आणि अपरिणामकारक राहतील. परंतु जेव्हा मूळ भाषांमधून अभ्यास केला जातो, तेव्हा वचन गाजवणे हे ताजे आणि सामर्थ्यशाली असेल. पवित्र शास्त्राचा शोध घेतला जाईल, आणि सततच्या नवीन शब्द आणि कृत्यांद्वारे विश्वास हा संजिवित होईल.

3. आम्हाला मर्यादित वेळ असल्यामुळे

हा तिसरा मुद्दा प्राथमिकत: विरोधाभासात्मक वाटेल. आम्हाला जर वेळ मर्यादित आहे तर मग आम्ही इंग्रजी भाषांतरे आणि उपदेशात्मक मदतींचा उपयोग करू नये का?

एका दाखल्याचा विचार करा: जर तुम्हाला लाकूड कापायचे असेल, तर थांबून आधी कुऱ्हाड धारदार करणे हा वेळेचा अपव्यय आहे का? ए. टी. रॉबर्टसन हे असे निरीक्षण करतात, “जर ईश्वरविज्ञानाचे शिक्षण ख्रिस्तासाठी तुमची शक्ती वाढवते, तर ती भर घालणारी शक्ती प्राप्त करणे हे तुमचे कर्तव्य नव्हे का?…शाळेला जाण्याद्वारे तुम्ही वेळ गमावत आहात असे कधीच म्हणू नका. तुम्ही ते साठवून ठेवत आहात, भविष्यासाठी विकत घेऊन साठऊन ठेवत आहात. शक्ती साठवून ठेवण्यात घालवलेला वेळ वाया जात नाही.”

मी पवित्र शास्त्राचे भाग वर्गांमध्ये शिकवत असताना, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अशा अनेक प्रश्नांनी चकित होतो ज्याबाबत भाष्यग्रंथांमध्ये काहीही लिहिलेले नाही. अगदी चांगले भाष्यकारही निर्णायक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, “ही भाष्यग्रंथ लिहिणारी माणसे तुमच्यासारखी सदोष आणि अदूरदर्शी व्यक्ती आहेत, हे तुम्हाला कळत नाही का? कदाचित तुम्ही मांडत असलेली अंत:प्रेरणा भाष्यकाराच्या लक्षात आली नसेल, किंवा कदाचित तुम्ही जे विचारत आहात तसाच प्रश्न त्याला पडला असावा, पण उत्तर माहीत नसल्याने त्यांनी आपल्या लिखाणात ही बाब पूर्णपणे टाळली. पवित्र शास्त्राचा प्रेरित भाग तुमच्यापुरताच अभ्यासण्याने मध्यवर्ती प्रश्न आणि त्याची उत्तरे देणारी माहिती आपणास सातत्याने उपलब्ध आहे का.” त्यामुळे, स्कॉट हॅफेमन यांनी एकदा नमूद केले होते, “दुय्यम साहित्यात दहा तास घालविण्यापेक्षा शास्त्रभागामध्ये [मूळ भाषांमधील] घालवलेला एक तास हा जास्त मौल्यवान आहे.”

भाष्यग्रंथ हे पवित्र शास्त्राचा अर्थ व लागूकरणे ह्याबाबतच्या संघर्षामध्ये फार साहाय्यभूत ठरू शकतात ह्यात संशय नाही. आणि मर्यादित असलेल्या वेळेमध्ये, पाळकांना ते उपदेश करित असलेल्या शास्त्रभागावर उपलब्ध भाष्यग्रंथाचा उपयोग करून घेऊन ते समजून घेण्याची इच्छा आहे. तथापि, सर्वोत्कृष्ट भाष्यग्रंथ नेहमी हिब्रू आणि ग्रीक शास्त्रभागांचा उपयोग करतात, आणि पवित्र शास्त्राच्या भाषांच्या कार्यकारी ज्ञानाशिवाय सेवक हे सर्वात साहाय्यभूत साधनांपासून राखले जातात.

माझी आजी नातवंडांना सांगायची की माझे वडील लहान असताना वाचायला शिकत होते, तेव्हा जर त्यांना एखादा शब्द माहीत नसेल किंवा उच्चारता येत नसेल तर, ते फक्त ”आगबोट” म्हणायचे आणि वाचत राहायचे. मी रोमकरांस पत्रावरील जॉन हार्वी यांचा अतिशय साहाय्यभूत तांत्रिक असा भाष्यग्रंथ काढला. आणि ग्रीक व्याकरणाचे ज्ञान नसताना ते वाचन कसे असू शकेल ह्याची कल्पना केली. कदाचित ते प्रत्येक ग्रीक किंवा व्याकरणात्मक शब्दाऐवजी “आगबोट” शब्द वापरण्यासारखे असेल. आता त्यांच्या भाष्यातील रोम. 3:21 वरील एका उतार्‍याचा विचार करा :

अगबोट आगबोट ही आगबोट असू शकेल, परंतु ती आगबोट असण्याची शक्यता जास्त आहे, सुधारित आगबोट आगबोट. चालू वर्तमानकाळ आगबोट आहे. आगबोट + आगबोट हे आगबोटीची साधी आगबोट दर्शविते. आगबोटीसोबत आगबोट ही आगबोट आहे. “नियम आणि संदेष्टे” हे पौलाच्या लिखानात इतर कुठेही आढळत नाहीत. ह्या संज्ञेच्या यहूदी पार्श्वभूमीकरिता लाँगनेकर बघा. “संदेष्टे” हे त्यांच्या लिखानाकरिता आगबोट आहे.

ग्रीक आणि हिब्रू भाषेत अप्रशिक्षित असलेल्या सेवकाला सर्वोत्तम संसाधने वाचण्यासाठी आणि समजून घेण्यामध्ये फार तोटा होतो. फिलिप मेलँक्थॉन एकदा म्हणाले की पवित्र शास्त्राच्या भाषांशिवाय ईश्वरविज्ञानकार ह्या नात्याने आम्ही “निशब्द व्यक्ती” असू. आम्ही त्यात भर घालून असे म्हणू शकतो की पवित्र शास्त्राच्या भाषांशिवाय आम्ही बहिरे आणि आंधळे आणि मंडळीच्या सर्वोत्कृष्ट विद्वान व शिक्षकांच्या अंत:प्रेरणांद्वारे काहीही लाभ न होणारे असे ईश्वरविज्ञानकार असू.

एका शैक्षणिक सत्रामध्ये ग्रीक शब्दव्यवस्था आणि विवरण ह्या विषयाच्या अंतिम परीक्षेमध्ये परीक्षकाचे काम संपवल्यावर मला एक महिला विद्यार्थी भेटली. ती मला म्हणाली, “बघा, डॉ. प्लमर, मी कधीच ग्रीक विद्वान होणार नाही, परंतु ग्रीकचे दोन शैक्षणिक सत्र संपल्यावर मला असे वाटते की मी भाष्यग्रंथामधील परिपक्व आणि अपरिपक्व ह्या दोन्ही युक्तिवादपद्धती ओळखू शकेन.” आणि त्याला मी म्हणेन, “शाब्बास, भल्या व विश्वासू विद्यार्थ्या.”

वेळ मर्यादित आहे. ग्रीक आणि हिब्रू भाषेचे कार्यकारी ज्ञान सेवकाला सरळ शास्त्रभागाशी आणि सर्वोत्तम संसाधनाशी जोडून त्याचा वेळ वाचवते.

पुढील पिढीच्या सेवकांना पवित्र शास्त्राच्या भाषा शिकविण्यामध्ये येणार्‍या तीन विशिष्ट आव्हानांकडे आता आपण वळू.

अव्हान 1: वाईट कित्ते

खिन्नतेची बाब आहे की, अनेक विद्यार्थी, पाळक, आणि अध्यापक हे ग्रीक आणि हिब्रू भाषेचा अयोग्य उपयोग करणार्‍या उपदेशक आणि शिक्षकांचे ऐकण्याद्वारे त्या भाषांच्या मूल्याप्रती उदासीन झाले आहेत. माझे एक सहकारी, टीम ब्युघर यांनी चार्ल्स स्पर्जनचे विधान सांगून माझ्याशी सहमती व्यक्त केली : “आमच्या प्रभूचे वधस्तंभीकरण त्यावर लावलेल्या लॅटीन, ग्रीक, आणि हिब्रू भाषेतील फलकाखाली झाले. तेव्हा पासून, अनेक मंडळ्या दर आठवड्यात त्यांच्या पाळकांद्वारे त्या भाषांमध्ये वधस्तंभावर खिळल्या जातात.”

आपण सर्वचजण चुकीच्या व्याकरणात्मक प्रतिक्रियांचे म्हणजे, दोषी व्युत्पत्ती, चुकीच्या शब्दार्थांचे हस्तांतरण, आणि ह्या प्रकारचे अनेक उदाहरणं देऊ शकू. असल्या दोषी अर्थविवरणांचे सखोल अन्वेषण करण्यास आपल्याजवळ भरपूर वेळ नाही, परंतु जर पवित्र शास्त्राच्या भाषांचा योग्यरीत्या वापर होत असलेले लोकांनी पाहिले नसेल तर मग ते त्याच्या मूल्याबद्दल प्रश्न का विचारतात हे आपण समजू शकतो.

मी माझ्या विद्यार्थ्यांना नियमित विनंती करत असतो की त्यांच्या संदेशांमध्ये ग्रीक आणि हिब्रूचा संदर्भ दुर्मिळ असावा. एक सामान्य नियम म्हणून, ग्रीक ही एखाद्या अंतर्वस्त्राप्रमाणे आहे : तिने आधार दिला पाहिजे परंतु ती अदृश्य असली पाहिजे.

उदाहरणार्थ 1 योहान 1:5 मध्ये आपण वाचतो, हो थेऑस फोस एस्तिन काई स्कोतिया एन ऑटो ओऊक एस्तिन औडेमिया ho theos phōs estin kai skotia en autō ouk estin oudemia. “देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही.” आता ग्रीकचे वरवरचे वाचन देखील दुहेरी नकारात्मक शब्द लक्षात घेते, म्हणजे ओऊक ouk आणि औडेमिया oudemia ह्या दोन्हींचा उपयोग केलेला आहे. आपण त्याचे तात्पुरते भाषांतर असे करू शकू, “देव प्रकाश आहे आणि कुठलाच अंधकार त्याच्यामध्ये नाही.” माझ्या मते, पाळकांनी ह्या दोन नकारात्मक शब्दांची व्याकरणात्मक समिक्षा कोईने ग्रीक मध्ये देणे किंवा ह्या दोन शब्दांचा उल्लेख करणे देखील चुकीचे होईल. ह्यामधील पुष्टीच्या सामर्थ्याने उपदेशकाच्या आवेगाला व्यापावे, जेणेकरून तो असे काहीतरी म्हणेल, “देव प्रकाश आहे — तो संपूर्णत: पवित्र आहे — त्याच्यामध्ये अंधकाराचा किंवा पापाचा अगदी सुक्ष्म अंश सुद्धा नाही!”

एक उपदेशक ह्या नात्याने, शास्त्रभागाच्या वास्तविक पुष्टी आणि रचनेचा आधार घेऊन बोलणे हे अद्भुत आहे. अन्यथा, तुमची अवस्था त्या पाळकासारखी होईल ज्याची संदेशाची टिपणे सापडली आणि त्यामध्ये कडेला असे शब्द लिहिलेले होते, “हा दुर्बळ मुद्दा आहे, येथे मोठ्याने ओरडा.”

आव्हान 2: चित्त विचलित करणार्‍या बाबी आणि आळशीपणा

चित्त विचलित करणार्‍या बाबी आणि आळशीपण ह्या आधुनिक समस्या आहेत असा कदाचित आपण विचार करू, परंतु जवळपास शंभर वर्षांपूर्वी ए. टी. रॉबर्ट्स ह्यांनी लिहिले, “उपदेशक ग्रीक नवीन कराराचे ज्ञान संपादत नाहीत आणि कार्यकारी ज्ञान बाळगत नाहीत ह्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचा निष्काळजीपणा आणि अनेकांबाबत अगदी आळशीपणा सुद्धा आहे.”

दर आठवड्याला ईश्वरविज्ञान विद्यालयाचे अध्यापक किंवा पाळक हे सरासरी किती तास सोशल मिडिया, नेटफ्लिक्स, खेळ, किंवा बातम्यांवर घालवतात? कदाचित आम्ही असे म्हणू की आम्हाला अभ्यास करण्यास अधिक वेळ मिळाला असता तर बरे झाले असते, आमच्या पवित्र शास्त्राच्या भाषांच्या ज्ञानाची उजळणी करण्यास अधिक वेळ मिळाला असता तर बरे झाले असते, परंतु आम्ही प्रत्यक्षात जे करतो त्याद्वारे आमची काय करण्याची इच्छा आहे ते व्यक्त होते.

आम्ही असे दुर्बळ जीव आहोत जे तंत्रज्ञान आणि मनोरंजनाच्या सहज आहारी जातात. आपण जर अज्ञान आणि असक्रियतेच्या नव्या युगाला बळी पडणार नसू, तर आम्हाला आत्म्याने सबळ केलेल्या सवई आणि शिस्त आवश्यक आहे. ह्या समस्येला व्यवहार्य उपाय पुरविण्याकरिता बेन मार्केल आणि मी एक पुस्तक लिहिले आहे, ग्रीक फॉर लाईफ : स्ट्रॅटेजिझ फॉर लर्निंग, रिटेनिंग, अँड रिव्हायव्हिंग न्यू टेस्टामेंट ग्रीक (बेकर, 2017) Greek for Life: Strategies for Learning, Retaining, and Reviving New Testament Greek (Baker, 2017). आणि त्यालाच जोड म्हणून अ‍ॅडम हॉवेल हे प्रमुख लेखक असलेले हिब्रू साठी सुद्धा पुस्तक आहे : हिब्रू फॉर लाईफ (बेकर, 2020) Hebrew for Life (Baker, 2020).

आव्हान 3: विस्तृत पसरलेला भाषा कौशल्याचा क्षय

ज्या अध्यापक आणि पाळकांची विद्यार्थी प्रशंसा करतात त्यांनी ग्रीक आणि हिब्रू शिकलेली नसेल किंवा त्यांचे कौशल्य जोपासले नसेल तर पवित्र शास्त्राच्या भाषांबद्दल बोधाला प्राधान्य देणे कठीण होऊन जाते.

मला स्पष्टपणे बोलायचे झाल्यास, मला खातरी आहे की हा लेख वाचणार्‍यांपैकी अनेकजण एकतर पवित्र शास्त्राच्या भाषा न शिकल्याबद्दल पस्तावा करत आहेत, नाहीतर त्यांची कौशल्ये तरी गंभीररीत्या लोप पावू देण्याबाबत पस्तावा करत आहेत. कदाचित, तुम्ही तुमचे डोळे एका क्षणाकरिता मिटले, आणि तुम्ही भाषेच्या शुष्क अस्थींच्या दरीकडे बघत आहात, आणि तुम्हाला असा आवाज ऐकू येतो, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?”

मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्या सजीव होतील. मी असे अनेकजण बघतितले ज्यांनी त्यांच्या ग्रीक भाषेचे ज्ञान यशस्वीरीत्या पुनर्प्राप्त केले. ते कधीच सोपे नव्हते. जगाच्या इतिहासाच्या अशा अतुल्य क्षणामध्ये आम्ही राहतो, जेथे मूळ भाषेमध्ये पवित्र शास्त्र वाचण्यास शिकणे, त्याचे पुनरुज्जीवन करणे, किंवा त्यात प्रगती करणे आतापेक्षा सोपे नव्हते.

माझ्या एका सहकारी राहून गेलेल्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगू द्या, डॉ. बिल कटरर. बिल हे डालस थियॉलाजिकल सेमिनरी मधून पदविधर झाले आणि त्यांना ग्रीक मध्ये जबरदस्त पाया लाभला, परंतु त्यांनी काळाच्या ओघात त्यांच्या कौशल्यांना क्षय पावू दिले. 2010 सालाच्या जवळपास एक दाक्षिणात्य ईश्वरविज्ञान विद्यालय ऑनलाईन विद्यार्थ्यांना पोस्टाने DVDs पाठवत असे. बिलने त्याचे दोन संच स्वत:करिता मागवले आणि दोन मास्टर्स स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी विद्यालयात जाऊन याकोबाच्या पत्राचे ग्रीक अर्थविवरण ह्या वर्गात शिक्षण घेतले.

2013 मध्ये मोटारसायकल प्रवासात बिल अचानक मरण पावले. ते त्वरित देवाच्या उपस्थितीत पोहचविल्या गेल्याची मला कल्पना करायला आवडेल, आणि मला माहीत आहे की त्यांना तेथे त्या स्वर्गिय गितामध्ये सहभागी होण्यास काहीच अडचण गेली नसणार, हागियोस हागियोस हागियोस कायरिओस हो थेऑस हो पँटोक्रॅटॉर हो एन काई हो ऑन काई हो एरखोमेनॉस:  hagios hagios hagios kyrios ho theos ho pantokratōr ho ēn kai ho ōn kai ho erchomenos: “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’ व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव!” (प्रकटी 4:8).

‘प्रशिक्षण वर्गाच्या दारामध्ये’

1900 च्या सुरुवातीच्या काळात, जगामधील अतिशय सन्मानितांपैकी एक असे ग्रीकचे व्याकरणकार होते जेम्स होप मोल्टन (1863–1917). मोल्टनची पवित्र शास्त्र आणि त्याला प्रेरित करणार्‍या देवाप्रती अशी भक्ती होती की ते भारतात मिशनरी बनून आले. काही काळ मिशनरी सेवा केल्यानंतर एप्रिल 1917 मध्ये पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात ते त्याच्या मायदेशी ग्रेट ब्रिटनकडे प्रवास करत होते, जर्मन पानबुडीने त्यांच्या तारवाला उडवले. मोल्टन जीवन नौकेवर बराच काळ जिवंत राहिले परंतु नंतर मरण पावले आणि समुद्रात पुरले गेले.

फेब्रुवारी 21, 1917 ला त्यांच्या मरणाच्या काही आठवडे आधी मोल्टनने बँगलोर मध्ये एक कविता लिहिली होती ती मी तुमच्यासमोर मांडतो. तिचे शिर्षक होते, “प्रशिक्षण वर्गाच्या दारात,” ही एक काव्यात्मक प्रार्थना आहे.

प्रभू, तुझे वचन अशा दिशेला द्वार उघडते,

जेथे शिक्षक तुझ्यासोबत भोजनाचा आस्वाद घेण्याकरिता ह्या क्षणी मला आमंत्रण देत आहे;

जेथे पुस्तक उघडले जाते आणि देव मानवी लिखितांमध्ये सखोल विचार करतो, आणि मृत भाषा माझ्यासाठी जिवंत होतात.

कामाचे ओझे फार आहे, कर्तव्य पालनाचे पाचारण फार मोठे आहे,

माझ्यावर अतिशय मोठे ओझे लादलेले आहे!

ओह, माझ्या शब्दांनी तुझ्या शब्दांवर पडून जर संदेश बिघडवला, आणि लोकांनी जर तुझे ऐकले नाही!

बोलण्यासाठी मला तुझा आवाज दे, ऐकण्यासाठी तुझे कान दे,

तुझे रहस्य समजण्याकरिता मला तुझे मन दे;

जेणेकरून माझे हृदय स्पंदेल, आणि माझे डोळे चकाकतील, तू मला दाखविलेल्या अद्भुतांनी ते वेष्टीलेले असेल.

लेख

रॉब प्लमर

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *