पाळक मंडळीचे पुढारीपण उत्कृष्टपणे कसे करतात

कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; … विश्वास … ह्यांविषयी … कित्ता हो. (1 तीमथ्य 4:12)

कित्ता होण्याबद्दल महान गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्याकरिता कोणाची परवानगी आवश्यक नाही. तुम्हाला देवाची आज्ञा आहे. तुम्हाला ह्याकरिता अंदाजपत्रक तयार करावे लागत नाही. पैशांचा ह्यासोबत काही संबंध नाही. तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही. तुम्ही आता, तरुण असतानाच, तुम्हाला परिपक्व आणि आदरनीय आणि पात्र वाटण्याआधीच तुम्ही सुरुवात करू शकता. 

पाळकांनो, आपण आपल्या मंडळीला एक सामर्थ्यशाली आणि प्रेरणादाई बक्षिस देऊ शकता : आपल्या विश्वासाचा कित्ता प्रस्थापित करा. आणि त्या विश्वासामध्ये आपला सैद्धान्तिक कर्मठपणा आणि वैयक्तिक वास्तविकता दोन्ही सामावलेली आहेत.

जीवनशक्तीमध्ये मुरलेला कर्मठपणा

ज्या मंडळीमध्ये पाळक अनेक वर्ष जुन्या शुभवर्तमानाच्या सत्यांचा सन्मान करतात तेथे उपस्थित राहणे हे संपूर्णत: रोमांचक आहे. आठवडाभर हे जग आम्हाला त्याच्या निराश करणार्‍या वक्रोक्तीने कमी लेखत असते कारण आम्ही अद्ययावत शैली परिधान करत नाही किंवा आमची शरीरे सुंदर नाहीत किंवा अजून काही करून त्याची अपेक्षापूर्ती करत नाही, आम्ही पूर्णत: त्याचे होत नाही आणि आम्ही नेहमी दुय्यम आहोत. परंतु मग आम्ही रविवारी मंडळीमध्ये येतो, आम्हाला निराश वाटत असते, मग गीते आणि शास्त्रभाग आणि संदेश आणि संस्कारविधी आमच्यामध्ये नवीन जीवन फुंकतात. आम्ही मंडळीमधून बाहेर तरंगत येतो, पुन्हा एकदा जिवंत आणि आत्मविश्वासाने पूर्ण असे आम्हाला वाटते. त्या आठवड्यामध्ये आम्हाला जाऊन येशूकरिता जगावेसे वाटते!

आमच्यामध्ये हे नावीन्य प्रवाहित होण्याचे कारण पाळकांनी अद्ययावत लोकप्रिय कल्पनांचे अनुसरण करणे हे नसून, त्यांनी तयारी करत असताना पवित्र शास्त्रामध्ये खोलवर जाऊन शोध घेतला. त्यांना तेथे पुन्हा एकदा अपात्र लोकांसाठी येशू ख्रिस्ताची कृपा आणि गौरव सापडले हे आहे. पाळकाचा कर्मठ विश्वास आम्हाला ख्रिस्तामध्ये पुन्हा आणि पुन्हा आमचे पवित्र शास्त्र आणि आमचे अंत:करण अफाट उघडे ठेऊन पुनरुज्जीवित होण्याकरिता कित्ता सादर करतो.

आणि हे अधिकच उत्तम होत जाते. त्यांच्या ईश्वरविज्ञानात्मक विश्वासाव्यतिरिक्त, त्यांच्या देवासोबत जगण्याने जाणवलेली वास्तविकता, देव अतिशय वैयक्तिक आहे आणि अतिशय सामावलेला आहे ह्याबाबत त्यांच्या अंतर्यामी असणारी जाणीव, तो अंतर्यामिचा विश्वास हा मंडळीला जीवन प्रदान करणारा कित्ता आहे, आणि त्याद्वारे प्रत्येक रविवार नंतर रविवार एका आतुरतेच्या अपेक्षेचा सूर प्रस्थापित केला जातो. पाळकसाहेब, आपला विश्वास कर्मठ परंतु कल्पनात्मक असेल, तर तुमची मंडळी एका दु:खद निरुत्साहात किंवा ताठर गर्वामध्ये गुंडाळली जाईल. आणि तुमच्या देखरेखीमध्ये ही तुमची चूक असेल.

परंतु तुमचा विश्वास कर्मठ आणि जीवनविषयक असा दोन्ही असेल, आमच्या ऐतिहासिक मतांगिकारांमधील पवित्र शास्त्रोक्त ख्रिस्त जर तुमच्यासाठी अस्तित्वात्मक वास्तव असेल, तर तुमची मंडळी जागृत होईल. तुमची मंडळी संवेदनशिलता आणि जागृतता आणि आतुर अपेक्षांनी वाढेल. ह्यापेक्षा चांगले बक्षिस आपण त्यांना काय द्याल?

असुरक्षिततेत पुढारीपण करणे

परंतु हे महागडे बक्षिस आहे. पाळकांचा वैयक्तिक विश्वास असुरक्षिततेपर्यंत प्रामाणिक आहे. कुठलाही पाळक ज्याला विश्वासाची आस्थापूर्वक जाणीव होते तो स्वत:च्या चुका आणि उणिवा कबूल करण्याचे स्वातंत्र्य घेईल, कारण त्याला येशूची स्वयंपूरकता समजते आणि जाणवते. आणि त्याच्यातील पारदर्शकता मंडळीमध्ये असा संदेश पाठवेल, “आपणही येथे सत्य सांगू शकतो. येथे आपण आपल्या समस्या उघड करू शकतो. अपयश आणि भय असणार्‍या लोकांसाठी हे सुरक्षित ठिकाण आहे. प्रभू येथे आहे, आणि तो आम्हा प्रत्येकासाठी पुरेसा आहे.”

ह्या वेगळ्या मोकळेपणाने काही लोक दचकतील. परंतु बहुतांश लोकांना सुटका मिळेल, आणि ते आनंदाने उडी मारतील. पाळकाचा वैयक्तिक विश्वास असा कित्ता प्रस्थापित करतो की पापी लोक लपण्याच्या जागेतून पुढे येऊ शकतात आणि येशूमध्ये, आणि येशूच्या द्वारे शुभवर्तमानानुसार स्वास्थ्य प्राप्त करू शकतात. त्यांना हे नावीन्य मित्र म्हणून एकत्रितरीत्या अनुभवता येते आणि तो सर्वोत्तम मार्ग आहे. अशा रीतीने मंडळीच्या उपासना सभा रटाळ वाटण्याचे थांबते आणि त्यांना संजिवित वाटते.

वैयक्तिक जीवनशक्तीमध्ये मुरलेल्या ईश्वरविज्ञानात्मक कर्मठपणाच्या विश्वासाने एक तरुण पाळक आपल्या मंडळीकरिता प्रेरणादाई कित्ता प्रस्थापित करू शकतो.

आदर्श विश्वासाचे तीन गुणधर्म

आता पुढचे पाऊल उचलू या आणि हा आदर्श विश्वास तीत 2:2 मधून बघू, ह्यामध्ये परिपक्व संताचे वर्णन, “नेमस्त, गंभीर, मर्यादशील” असे केलेले आहे. प्रत्येक तरुण पाळकाला विशेषत: त्याच्या विश्वासामध्ये काय बनण्याची इच्छा आहे हेच ह्या शब्दांमध्ये वर्णन केलेले आहे.

नेमस्त

तरुण पाळकाचा नेमस्त विश्वास प्रथम गोष्टींना प्रथम स्थान देतो, आणि ते अद्ययावत शैलीचे वेड, आणि धर्मांधतेची घृणा करते. दु:खाची बाब आहे की, आपण अगदी ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा अतिशयोक्तीवादाच्या युगामध्ये राहत आहोत. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला विरुद्ध दिशेला बोलावते : “तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो” (फिलिप्पै. 4:5).

काही लोकांना वेडेपणाचा अतिशयोक्तिवाद हवा असतो. त्यांना असे वाटते की त्यांच्या प्रमुख सिद्धान्तामध्ये ठोस पवित्र शास्त्रोक्त पुराव्याची कमतरता आहे. त्यांच्या दुर्बळ युक्तीवादांना खरे करण्यासाठी ते जबरदस्ती करून राजकीय बनतात. आणि धर्मांधता ही स्वभावाने कधीच तृप्त नसते; ती कधीच थांबत नाही. ती स्वत:चे दावे मवाळ करण्याबाबत फार नीतिमान आणि फार असुरक्षित असते. परंतु नेमस्तपणाला प्रत्येक सिद्धान्त कर्मठ विश्वासाच्या संपूर्ण रचनेमध्ये कुठे योग्य बसतो ते समजण्याची परिपक्वता असते. आदर्श विश्वास ईश्वरविज्ञानात्मक प्रमाणशिरतेच्या जाणिवेची वाढ करतो. आणि तरुण पाळक ह्या मार्गामध्ये उत्कृष्टता प्राप्त करू शकतात. (माझा मुलगा गॅवीन हा त्याच्या फाइंडींग दी राईट हिल्स टू डाय ऑन Finding the Right Hills to Die On ह्या उत्कृष्ट पुस्तकामध्ये ही सुज्ञता स्पष्ट करतो.)

गंभीर

पाळकीय सेवा वाढलेल्यांसाठी आरक्षित आहे. ती अशा पितासादृष्य व्यक्तींसाठी आहे जे आपल्या मंडळीच्या कुटुंबाचे नेतृत्व चांगल्यारीतीने करू शकतील. आणि एक तरुण पाळक त्याच्या गंभीर विश्वासाच्या कित्त्याने चमकू शकतो. गंभीर हा तीत 2:2 मधील शब्द गंभीर प्रौढ व्यक्तीमधील आदराला संबोधतो, असा व्यक्ती जो त्याचे ऐकून घेण्याच्या लायकीचा आहे. प्रेषिताने लिहून ठेवल्याप्रमाणे, “आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत” (1 करिंथ. 13:11). त्याने गंभीरपणा धारण केला.

पाळक साहेब, आपण मनोरंजनाच्या व्यवसायामध्ये नाही. तुम्हाला देवाचा गंभीर व्यक्ती होण्यास पाचारण झालेले आहे. अर्थातच, दिखाऊ आणि ताठ नव्हे! स्पर्जन ह्यांनी योग्यरीत्या निर्देशिल्याप्रमाणे, 

ज्या पुरुषाला पुरुषांसोबत बरेच काम करायचे आहे त्याने त्यांच्यावर प्रीती केली पाहिजे, आणि त्यांच्यासोबत त्याला घरच्यासारखे वाटले पाहिजे. जी व्यक्ती मनमिळाऊ नाही तीने उपक्रमी होऊन मेलेल्यांना पुरत राहावे, कारण तो जिवंतांना कधीच प्रभावी करू शकणार नाही. (लेक्चर्स टू माय स्टुडंट्स, “दी मिनिस्टर्स ऑर्डिनरी कॉन्व्हरसेशन,” 169Lectures to My Students, “The Minister’s Ordinary Conversation,” 169)

आपण आपल्या लोकांबद्दल सौम्य उबदारपणा दाखवला पाहिजे का? हो! परंतु निरर्थक, अश्लील किंवा निव्वळ “गोंडस” असे सर्व वर्तन अपरिपक्व, स्वयं कौतुक करणारे, पाळपणासाठी अपात्र आहे. तुम्ही लोकांमध्ये शेवटी त्यांचा सेवक म्हणून नाही तर शेवटी त्यांच्यामध्ये परमेश्वराचा सेवक म्हणून आहात. तुमचा ईश्वरविज्ञनात्मक विश्वास आणि सुवार्तेचे गौरव, तुमचा वैयक्तिक विश्वास आणि देवाच्या उपस्थितीच्या जाणीवेसोबत, तुम्हाला परमेश्वराचा परिपक्व सेवक म्हणून प्रस्थापित करेल.

मर्यादशील

मूळ लिखितांमधून ह्या शब्दाचा अर्थ निश्चित करणे कठीण आहे. ग्रीसच्या प्राचीन विचारवंतांनी त्याला मवाळ, संतुलन, योग्य निर्णय ह्या कल्पनांशी जोडलेले आहे (एफ. ई. पिटर्स, ग्रीक फिलॉसॉफिकल टर्म्स, 179-80 – F.E. Peters, Greek Philosophical Terms, 179–80). नवीन करार त्याला वैयक्तिक सभ्यता, काळजीपूर्वक वर्तन ह्याशी जोडते (1 तीमथ्य 3:2; तीत 1:8; 2:5).

पाळकीय विश्वासाबाबत हा किती चित्तथराराक दृष्टिकोण आहे. येथे आम्ही कुठल्या अंत:प्रेरणा घेऊ शकतो? ह्या प्रकारचा ईश्वरविज्ञानात्मक आणि वैयक्तिक विश्वास हा लहरी किंवा निष्काळजी नाही. तो निष्कर्षांवर उडी घेत नाही किंवा पुरावे ताणत नाही किंवा लोकप्रियतेच्या प्रवाहांमध्ये वाहून जात नाही. ह्या प्रकारचा विश्वास पर्यायांना संपूर्णत: तोलून बघतो, योग्य निर्णयशक्ती प्रदर्शित करतो, आणि पुढे जाण्याचा योग्य मार्ग काय आहे हे ओळखतो. तो मंडळीचे प्रश्न आणि समस्यांचे समाधान कारतो. त्याची परिपक्वता स्पष्टत: विश्वासार्ह आहे.

जो तरुण पाळक चांगला विचार करतो त्याने मंडळी अधिक चांगली चालविण्याची शक्यता आहे, कारण त्याने स्वत:ला कडक शिस्त आणि काळजीपूर्वक विचार मंथनाच्या रस्त्यावर चालविलेले आहे. कोणाच्या पिळवणूकीमुळे त्याला थांबण्याची गरज नाही. त्याचा आदर्श विश्वास प्रेरणादाई आहे.

प्रेरणादाई विश्वासाची गरज

पाळक साहेब, ह्या शोकात्मक अविश्वासाच्या जगाला तुमच्या आदर्श विश्वासाची गरज आहे. आम्ही जे निराश झालेले ख्रिस्ती लोक आहोत आम्हाला तुमच्या आदर्श विश्वासाची आवश्यकता आहे. कृपया आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील ईश्वरविज्ञानात्मकरीत्या मजबूत आणि वैयक्तिकरीत्या चित्तवेधक विश्वासाने आम्हाला धक्का देऊन जागृत करा!    मला होईल तितक्या स्पष्टपणे सांगता करू द्या. आम्हाला तुमची गरज आहे कारण आम्हाला त्याची गरज आहे. आम्हाला प्रेरणा देऊन आमचे पुढारीपण करण्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

लेख

रे ओर्टलंड

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *