रॉबर्ट मरे मकेन ह्यांचा असंभाव्य प्रभाव
2013 च्या एका ढगाळ दिवशी, मी डंडी, स्कॉटलंड येथील सेंट पिटर्स फ्री चर्च च्या प्रांगणामध्ये उभा राहून रॉबर्ट मरे मकेन ह्यांच्या कबरीवरील खडकाकडे बघत होतो. तसे करत असताना, माझ्यातील भावना उफाळून मला 24 वर्ष मागे आणि 3,700 मैल पश्चिमेला घेऊन त्या क्षणावर पोहचल्या जेथे मी ह्या तरुण देवभिरू मानसाला प्रथमच भेटलो होतो आणि त्याचे शरीर माझ्या पायांखाली आता पुरलेले होते.
मी 23 वर्षांचा असताना एका तात्पुरत्या पुस्तकालयात तो क्षण होता. मी आणि माझ्या पत्नीने ज्या मंडळीत जाण्यास सुरुवात केली होती, त्या मंडळीने एक पाळकांची परिषद भरवली होती आणि ती संपल्यावर आम्हा स्थानिक लोकांकरिता त्यांनी पुस्तकांचे मेज सोडले होते जेणेकरून उरलेल्या साहित्यामधून आम्हास काहीतरी घेण्याची संधी मिळावी.
मी त्या पुस्तकांवर नजर फिरवत असता, माझे लक्ष रॉबर्ट मरे मकेन असे शिर्षक असलेल्या लहान हिरवट पुस्तकाकडे गेले. हे एकोणिसाव्या शतकातील एका स्कॉटिश पाळकाने लिहिले होते ज्यांच्याबद्दल मी कधीही ऐकले नव्हते (अँड्र्यू बोनार) आणि त्याने एकोणिसाव्या शतकातील एका दुसऱ्या स्कॉटिश पाळकाच्या जीवनाचा वृत्तांत लिहिला होता त्यांच्या बदल ही मी कधीही ऐकले नव्हते. स्कॉटीश ख्रिस्ती इतिहास तर सोडाच पण मला स्कॉटीश इतिहासाबद्दलही जवळपास काहीच माहीत नव्हते, म्हणून ते पुस्तक विकत घेण्यास मला कशाने प्रेरणा मिळाली आठवत नाही. परंतु मी ते घेतले.
आणि मी अत्यंत आनंदी आहे की मी ते घेतले. कारण त्या पुस्तकाच्या पानांमध्ये भेटलेल्या तरुण व्यक्तीने माझ्या जीवनाला असा आकार दिला जसा इतरही काहींनी दिलेला आहे. मी माझ्या पहिल्या कुत्र्यालाही त्याचेच नाव दिले होते.
अविस्मरणीय मरण
रॉबर्ट मरे मकेन चा जन्म मे 21, 1813 रोजी झाला होता. परंतु वैद्यकशास्त्रात आता झालेली प्रगती आधी, जी आम्ही गृहीत धरतो, जगलेल्या लोकांप्रमाणे, मकेन ह्या जगामध्ये जास्त काळासाठी नव्हता. ते विषमज्वराच्या आजाराने मार्च 25, 1843 ला त्यांच्या तिसाव्या वाढदिवसापर्यंत पोहचण्याआधीच मरण पावले.
ज्या दिवशी त्यांचा देह त्यांनी साडे सहा वर्ष पाळकपण केलेल्या सेंट पिटर्स चर्चच्या प्रांगणामध्ये दफन करण्यात आला, त्या दिवशी सात हजार लोक त्यांच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी, त्यांना झालेल्या मोठ्या नुकसानाचे दु:ख व्यक्त करण्याकरिता आणि त्यांच्याद्वारे देवाच्या प्राप्त कृपेकरिता आभार मानण्याकरिता आले होते. त्यावरून मकेन हे कशा प्रकारचे पुरुष होते ह्याबाबत खूप काही दिसते.
देव अनेकदा मरणाचा उपयोग त्याच्या लोकांना त्यांच्या मार्गांपासून थांबवून जीवन आणि मरण काय आहे ह्याबाबत कसा गंभीर विचार करायला लावतो हे लक्षणीय आहे. खरेतर त्याने मकेनसोबत बारा वर्षे आधी नेमके तेच केले.
जीवन बदलणारे मरण
मकेन अठरा वर्षाचा असताना एडिनबर्ग विद्यापिठामध्ये श्रेष्ठ साहित्याचा तल्लख विद्यार्थी होता, आणि त्या काळातील मजेचा पूर्ण उपभोग घेत होता. मंडळीत उपस्थित राहणारा अशी त्याची वाढ केली गेली असल्यामुळे, मकेन स्वत:ला ख्रिस्ती समजत असे, परंतु तो एकोणिसाव्या शतकातील स्कॉटीश “बायबल बेल्ट” दर्जाचा ख्रिस्ती होता. तो ख्रिस्तावर विश्वास व्यक्त करत असे, परंतु त्याचे अंत:करण त्याच्या बौद्धिक व्यासंगाच्या ऐहिक आनंदात आणि सक्रिय सामाजिक जीवनात सुख पावत असे. आणि मरणाने त्याचा गळा आवळेपर्यंत ते तसे होते.
1831 च्या उन्हाळ्यामध्ये त्याचा मोठा भाऊ डेव्हीड हा नैराश्याला बळी पडला आणि त्यामुळे तो शरीराने आणि आत्म्याने गळून गेला. त्याचे शरीर ह्या कसोटीत टिकून राहू शकले नाही, परंतु देवाच्या कृपेने त्याचा आत्मा मात्र टिकला. मरणा पूर्वीच्या दिवसांमध्ये डेव्हीडला येशूच्या प्रायश्चित्ताच्या मरणामध्ये अत्यंत शांती प्राप्त झाली आणि त्याचे मुख आंतरिक तेजाने झळकत असे.
रॉबर्ट त्याच्या भावाला गमावण्याच्या दु:खाने आणि त्यासोबतच त्याच्या भावाच्या आध्यात्मिक परिवर्तनाने ग्रासला गेला. आणि देवाने ह्या भयंकर घटनेचा उपयोग रॉबर्टचे आध्यात्मिक परिवर्तन साधण्यासाठी केला.
डेव्हीडच्या मृत्युनंतरच्या हिवाळ्यात, रॉबर्टने एडिनबर्ग विद्यापिठाच्या ईश्वरविज्ञान शाखेत प्रवेश घेतला, पुढील अनेक महिन्यांमध्ये तो सुद्धा जिवंत आशेमध्ये नवा जन्म पावला. तेथे त्याने महान सुवार्तिक पाळक विद्वान थॉमस चॅलमर्स ह्यांच्या व इतरांच्या हाताखाली शिकला आणि अनेक देवभिरू तरूणांसोबत त्याने दीर्घ मैत्री केली. अँड्र्यू बोनार हे कदाचित त्याचे जिवलग मित्र असावेत.
पुढील काही वर्षांमध्ये, रॉबर्टने कृपेमध्ये भयंकर वाढ अनुभवली आणि पवित्र शास्त्र, वैयक्तिक पवित्रता, आणि सुवार्ताप्रसार ह्याकरिता असा ज्वलंत आवेग विकसित केला की त्याद्वारे त्याच्या उर्वरित छोट्याशा जीवनाची ओळख बनली. परंतु हे वर्णन कितीही खरे असले, तरी नंतरच्या बारा वर्षांपेक्षाही कमी कालावधीमध्ये त्याच्या अंत्यविधीला सात हजार लोक का आले, आणि त्याच्या मरणाच्या दिडशे वर्षांनतर, मी त्याच्या जीवनाचा छोटा वृत्तांत वाचल्यावर 34 वर्षांनी मी अजूनही त्याच्याबद्दल का बोलत आहे ह्याचे स्पष्टीकरण मिळत नाही.
तो येशूच्या सहवासात होता
सत्य असे आहे की, मकेनच्या जीवनाचे सामर्थ्य एका लघू आत्मचरित्रात्मक रेखाटनाने आणि काही अवतरणांनी मांडणे माझ्यासाठी अशक्य आहे. अर्थात त्याने काही फार सुंदर आणि अविस्मरणीय ओळी लिहिलेल्या आहेत. तुम्ही त्यातील काही अवतरीत केलेल्या ऐकल्या असतील, जसे की त्याच्या पत्रांमधून घेतलेला हा उतारा :
प्रभू येशूबद्दल खूप शिका. आपल्या स्वत:कडे बघण्याच्या प्रत्येक वेळेच्या बदल्यात ख्रिस्ताकडे दहा वेळेस बघा. तो सर्वांग सुंदर आहे. त्याचे वैभव अमर्याद असूनही, तो इतका नम्र आणि कृपाळू आहे, हे सर्व पाप्यांकरिता, अगदी त्यातील प्रमुख पाप्याकरिता सुद्धा! देवाच्या स्मितामध्ये जास्त जगा. त्याच्या किरणांमध्ये पडून राहा. मेमॉयर अँड रिमेन्स ऑफ राबर्ट मरे मकेन, 293(Memoir and Remains of Robert Murray M’Cheyne, 293)
ह्या शब्दांमधून जरी आम्हाला त्याच्या महान आत्म्याची छोटीशी झलक मिळते, तरी ह्या अवतरणाचे खरे सामर्थ्य ते ज्या आत्म्याकडून आले त्याला ओळखण्याद्वारे लक्षात येते, तो खरेच जसा जगला त्यामध्ये त्याचा पुरावा आहे. मकेनचा माझ्यावरील प्रचंड प्रभाव त्याने काय म्हटले ह्याद्वारे नव्हता, तर तो जे होता, म्हणजे वास्तविक पवित्र मनुष्य, त्याद्वारे आहे.
असले वर्णन हे आकर्षक वाटण्याऐवजी कटू वाटत असेल तर त्याचे कारण कदाचित आपणाकडे पवित्रतेशी जुळलेल्या चुकीच्या समजांमुळे असू शकेल, जसे की ढोंगी, “तुझ्यापेक्षा जास्त पवित्र” एकाकी, आणि ही खरी ख्रिस्ती पवित्रता नाही. जॉन पायपर म्हणतात, “मानवी पवित्रता ही दुसरे तिसरे काही नसून देवाने भरलेले जीवन आहे.”
आणि मकेन नेमके तेच होता : देवाने भरलेला पुरुष, देवाने मंत्रमुग्ध झालेला पुरुष. त्याच्याविषयी मला आकर्षक वाटणारी बाब म्हणजे तो येशूद्वारे किती आकर्षिलेला होता. तो पेटलेला होता परंतु केवळ उत्साहाने नाही. त्याचे अंत:करण दैवी प्रीतीने पेटलेले होते, अशा प्रकारे पेटलेले जे केवळ एखादी व्यक्ती जेव्हा अशा पवित्र अग्नीजवळ असून पेटते, जी जळते तर खरे पण भस्म करत नाही.
आम्ही क्षमावादी युक्तिवाद आणि ग्रांथिक टिका ह्यावर अनेक दशके वादविवाद करू शकतो. आम्ही अंत नसणार्या प्रश्नांबद्दल संशय व्यक्त करून त्याबाबत संघर्ष करू शकतो. परंतु ज्या व्यक्तीला खरी गोष्ट सापडलेली आहे त्या व्यक्तीला आपण नेहमी काही मिनिटातच ओळखू शकतो.
तेच मकेनला फार अनिवार्य बनविते. तो असा पुरुष होता ज्याचा सामना जगाच्या प्रकाशासोबत झाला होता, आणि त्याच्या अवतीभोवतीच्या सर्वांवर, म्हणजे शिक्षित आणि पंडितांपासून तर एडिनबर्गच्या गरीब वस्तीतल्या लोकांपर्यंत आणि डंडीच्या कामकरी निवासी लोकांपर्यंत तो जीवनाचा प्रकाश परावर्तित करत असे, जेथे त्याने अल्पावधीसाठी पाळकपण केले. “तो पेटलेला आणि प्रकाश देणारा दिवा होता,” आणि त्याचे लोक “त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष [करू शकले]” (योहान 5:35) कारण त्यांनी ओळखले की हा तरुण पुरुष “येशूच्या सहवासात होता” (प्रेषित 4:13).
अविस्मरणीय जीवन
आणि त्यामुळेच मार्च 1843 मध्ये हजारो लोक सेंट पिटर्स चर्चच्या प्रांगणाकडे ओढले गेले, आणि त्यामुळेच मी 170 वर्षांनंतर त्याच्याकडे ओढला गेलो : ह्या तरुण पुरुषाचे जीवन स्मरणात ठेवणे मौल्यवान आहे.
जे त्याला ओळखत होते, त्यांची कृतज्ञता खोल दु:खाने भरलेली होती कारण अंधकारमय जगामध्ये पेटलेला आणि प्रकाश देणारा दिवा गमावणे हे फार मोठे नुकसान आहे. अनेकांना त्या दिवशी काय वाटले हे त्याचा जिवलग मित्र अँड्र्यु बोनारने टिपले आणि तो म्हणाला, “माझ्या जीवनात मला असे कधीच वाटलेले नाही : हा माझ्यासाठी, त्याच्या लोकांसाठी, आणि स्कॉटलंडमधील ख्रिस्ताच्या मंडळीसाठी मोठा धक्का आहे.” आणि तरीसुद्धा सर्व जण बघण्याची आशा करतात अशा त्या दिव्यामधील प्रकाशाची झलक बघू शकणे हे महान आणि, कृपामय प्राप्ती आहे.
आणि त्याच प्रिय मित्राचे आभार कारण त्याने मकेनचे जीवन आणि त्याचे काही काही साहित्य जे त्याने मागे सोडले ते प्रकाशित केले. आम्हाला सांगण्यात आलेले नाही अशा हजारोंना त्याच्या नंतरच्या पिढ्यांमध्ये हा महान आणि कृपामयी प्राप्तीचा अनुभव येऊ शकलेला आहे. काय मोठी ही देणगी! ह्या पुस्तकाबाबत चार्ल्स स्पर्जन म्हणाले,
हा सर्वात उत्तम आणि लाभदायक अशा प्रकाशित ग्रंथांपैकी एक आहे. अशा मनुष्याचे जीवनचरित्र हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती आणि विशेषत: प्रत्येक शुभवर्तमान गाजविणार्या उपदेशकाच्या हाती असले पाहिजे. (बोनार, रॉबर्ट मरे मकेन Bonar, Robert Murray M’Cheyne) मी काही स्पर्जन नाही, परंतु मी तुम्हाला एवढे सांगू शकतो की ज्या मनुष्याला मी त्या हिरवट पुस्तकामध्ये 34 वर्षांपूर्वी भेटलो त्याला ओळखणे आणि आठवणीत ठेवणे हे मौल्यवान आहे. मला माहीत नाही की तुम्ही तुमच्या कुत्र्याचे नाव त्याच्या नावावर ठेवाल की नाही, परंतु मी तुमच्याकडून अशी अपेक्षा करतो की तुम्ही ते पुस्तक एके दिवशी उघडून रॉबर्ट मरे मकेनला ज्या जळणार्या प्रकाशाने भरले त्याची झलक बघाल.
लेख
जॉन ब्लुम