आध्यात्मिक अंधकारात देवाला कसे बघावे

काही वर्षांआधी, मी एका मित्रासोबत सायंकाळचे भोजन करत होतो. तो गंभीर आध्यात्मिक अंधकाराचा काळ अनुभवत होता. तो संशयामुळे संघर्ष करत होता. त्याने विश्वास गमावलेला नव्हता पण त्याचा तणाव त्याला जाणवत होता. अंतर्यामी, त्याला सत्याचे विसंगत दावे वाटणार्‍या गोष्टीशी तो संघर्ष करत होता. बाह्यात्कारी, तो जगामधील पराकोटीची भग्नता आणि दु:ख ह्याशी झगडत होता. त्यापैकी काही त्याच्या कुटुंबामध्ये अचानकरीत्या आलेले होते.

मी व माझा मित्र बर्‍याच अंशी सारखे आहोत. आम्ही दोघेही जीवनाला फार गांभीर्याने घेतो. माहिती, निरीक्षणे आणि अनुभवांवर अंतर्यामी असलेल्या सारख्या सत्य शोधकाद्वारे प्रक्रिया करतो, त्यावर आमच्यातील संशय निरीक्षकाची देखरेख असते. आम्हा दोघांमध्येही विषण्णवादी अंश आहे आणि आम्ही दोघेही हौशी संगितकार असल्यामुळे आम्ही अशा कवींच्या रचनांकडे ओढले जातो जे वास्तवाबाबत गुंतागुंतीचा दृष्टिकोण परावर्तित करतात आणि त्याचे शब्दांकन करतात.

म्हणून, माझ्या मित्राने त्याच्या संघर्षाचे वर्णन केल्यावर, त्याने मला अशा एका कवीच्या काही पंक्ती वाचून दाखविल्या, जो कधीकाळी ख्रिस्ती होता पण त्याने त्याचा विश्वास गमावलेला होता. ते काव्य विलापगिताच्या पुस्तकाप्रमाणे, कवीने जसे बघितले तसे जीवनाचे कच्चे आणि प्रामाणिक वर्णन होते, परंतु त्यामध्ये देवाचे अस्तित्व आणि तो आणेल असा सर्वोच्च न्याय आणि उद्धार ह्याबाबत काही आशा नव्हती. माझ्या मित्राने कबुल केले की ते काव्य अंधकारमय आहे, परंतु त्या वेळी ते त्याला आम्ही मंडळीमध्ये सोबत गायलेल्या शुभवर्तमानपूर्ण गीतांपेक्षा वास्तविकतेचे अस्सल वर्णन करणारे वाटले.

त्याला माहीत होते की, काही वर्षांपूर्वी, मी सुद्धा माझ्या आध्यात्मिक अंधकारमय कालावधीमध्ये ह्या प्रश्नांबाबत संघर्ष केलेला होता, आणि त्याला आता माझे विचार जाणून घ्यायचे होते. आणि माझ्या मनांत पहिली गोष्ट आली ती म्हणजे स्विचफूट (Switchfoot) ह्यांच्या एका जुन्या गीताची शिर्षक ओळ : सावली सुर्यप्रकाशाचा पुरावा देते “The Shadow Proves the Sunshine.” त्या शब्दांनी आम्ही आध्यात्मिक प्रकाश आणि अंधकार ह्याबाबत फलदाई चर्चेला सुरुवात करू शकलो.

प्रकाश आणि अंधकार काय आहेत?

उपहारगृहाच्या एका कक्षामध्ये आपण बसलेले आहात आणि मी तुम्हाला पुढील प्रश्न विचारले अशी कल्पना करा. प्रत्येक प्रश्नानंतर आपण थोडा वेळ थांबून पुढील वाचन करण्याआधी उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

भौतिक जगामध्ये प्रकाश, म्हणजे सूर्य, किंवा अग्नी, किंवा बल्बद्वारे उत्सर्जित ती बाब काय आहे? 

तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला असेल, तर माझा अंदाज असा आहे की तुम्हाला उत्तर देणे अपेक्षेपेक्षा जास्त कठीण जरी वाटले असेल, तरी तुम्ही एक किंवा अधिक अशी वर्णने प्रकाशाबद्दल देऊ शकले असाल.

तुम्ही तुमच्या मागील उत्तरामध्ये अंधाकाराचा उल्लेख केला असेल, तर आता अंधाराच्या कुठल्याही संदर्भाशिवाय प्रकाश काय आहे, ह्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्ही प्रयत्न केला असेल, तर माझा अंदाज असा आहे की, कदाचित आपणास ते अधिक आव्हानात्मक वाटले असेल, परंतु तुमचे उत्तर प्रामुख्याने सारखेच असेल.

आता, प्रकाशाच्या कुठल्याही संदर्भाशिवाय मला अंधकाराचे वर्णन करून दाखवा. परंतु तुम्हाला “अंधकार हा अंधकारमय असतो” ह्यापेक्षा जास्त बोलावे लागेल; तुम्हाला अंधकाराचे वर्णन प्रकाशाच्या कुठल्याही विरोधाभासाशिवाय करायचे आहे.

तुम्ही ते करू शकलात का? तुम्ही अंधकाराची परिभाषा प्रकाशाचा संदर्भ न देता किंवा प्रकाशाचा तर्क न लावता अर्थपूर्णरीत्या करू शकता का? तुम्ही ती करू शकत असाल तर कृपया आपली परिभाषा माझ्यासोबत वाटा, कारण मला असे वाटते ते अशक्य आहे. त्याचे कारण असे आहे.

आम्हाला डोळे का आहेत?

जगामध्ये आपण जो प्रकाश अनुभवतो तो, विद्युतचुंबकिय उत्सर्जन आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये, प्रकाश ही एक बाब आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये, अंधकार ही एक बाब नाही, ती दुसर्‍या बाबीची अनुपस्थिती आहे. अंधकाराची परिभाषा प्रकाशाचा संदर्भ न घेता करण्याचा प्रयत्न करणे हे शुण्यवततेची परिभाषा कुठल्याही बाबीच्या संदर्भाशिवाय करण्यासारखे आहे. शुन्यवतता हे असणार्‍या बाबीला नकारणे आहे. कुठल्यातरी बाबी शिवाय शुन्यवततेची संज्ञा अर्थहीन आहे. मला असे वाटते अंधकाराबाबतही तेच खरे आहे; ते प्रकाशाचा नकार आहे. प्रकाशाशिवाय अंधकार ही संज्ञा पूर्णत: अर्थहीन आहे.

प्रकाश अस्तित्वात आहे हे सत्य आम्हाला डोळे असण्याचे कारण आहे. आम्ही प्रकाश नसलेल्या सृष्टीमध्ये जगत असतो तर आम्हाला डोळे नसते. जरी जगामधील लक्षावधी लोक त्यांच्या बघण्याची क्षमता काही कारणांस्तव अक्षम झालेली असताना सुद्धा जगतात आणि वाढतात, तरी ते केवळ जे लोक बघू शकतात त्यांच्या मदतीमुळे तसे करू शकतात.

जे डोळ्यांबद्दल खरे आहे तेच आमच्या शारीरिक आकलन क्षमतांबद्दलही खरे आहे. आम्हाला ते असण्याचे कारण हे आहे की ज्या वास्तविकतेमध्ये आम्ही राहतो तिला ते आवश्यक आहे.

आता, आम्ही आमच्या डोक्यांमध्येच आणि तत्वज्ञानात्मक विचारांमध्ये खूप राहिल्यास आम्हाला खरे वास्तव काय आहे हे कसे समजेल, संशयात्मक अहंमात्रवाद आणि फ्रेंच तत्वज्ञानी डेस्कारेट्स च्या प्रत्येक बाबीबद्दलच्या संशयामध्ये अडकून पडणे शक्य आहे, आणि ते आम्हाला अतिशय अंधकारमय ठिकाणांवर घेऊन जाईल. कारण आमच्या वैयक्तिक तर्काचे सामर्थ्य शोधू शकेल ह्यापेक्षा वास्तव हे अधिक गुंतागुंतिचे आणि बहुमतीय आहे. आमची शारीरिक ज्ञानेंद्रिये आम्हाला ज्ञान देतात त्याचा एक मार्ग असा आहे : आमच्या आकलन क्षमतांचे अस्तित्व आम्हाला शारीरिक वास्तवाच्या स्वभावाची साक्ष देते. आम्हाला डोळे असण्याचे कारण हे आहे की प्रकाशाचे अस्तित्व आहे.

आम्हाला आध्यात्मिक डोळे का आहेत?

हे सर्व मला स्विचफूटच्या गीतामधील ओळीकडे घेऊन जाते : सावली सूर्यप्रकाशाचा पुरावा देते “The shadow proves the sunshine.” शारीरिक आकलनाव्यतिरिक्त आम्हाला आध्यात्मिक आकलन सुद्धा आहे. आणि आम्हाला शारीरिक आकलन असण्याच्या कारणांस्तवच आम्हाला आध्यात्मिक आकलन आहे : कारण ज्या वास्तविकतेत आम्ही राहतो तिला ते आवश्यक आहे. आम्हाला त्यांची गरज नसती तर ते आम्हाला नसते.

आध्यात्मिक अंधकाराला अंधकारमय म्हणावे हे आम्हाला समजते तरी कसे? आणि जेव्हा आम्हाला वास्तवाचे आणि आमच्या स्वत:चे अस्तित्व अंधकारमय आणि अनिष्टमय असल्याचे आकलन होते, तेव्हा आम्ही त्याचे वर्णन अंधकारमय असे का करतो आणि ते आम्हाला अनिष्टमय का वाटते? ते आम्हाला निराश करून, आम्हाला चिंताक्रांत आणि भ्यालेले का करते? मला असे वाटते की जरी आमच्या तर्काचे सामर्थ्य सर्व गोष्टींचा अर्थ लावू शकत नाही, तरी आमचे आध्यात्मिक आकलन, ज्याला पौल “अंतश्‍चक्षू” (इफिस. 1:18) म्हणतो, ते आम्हाला सांगतात की आध्यात्मिक प्रकाश अस्तित्वात आहे.

अंधकार ही बाब नाही; ती कुठल्यातरी बाबीची अनुपस्थिती आहे. आम्हाला अंधकार काय आहे हे माहीत आहे कारण आम्हाला प्रकाश काय आहे हे माहीत आहे. दुसर्‍या हाती, प्रकाश मात्र आपल्या अस्तित्वाकरिता अंधकारावर अवलंबून नाही. म्हणूनच प्रेषित योहान म्हणाला, “तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही” (योहान 1:5). काहीतरी सूर्यप्रकाशाला अडवू शकते आणि त्याची सावली आमच्या अवतीभोवतीचा परिसर मंद करू शकतो, परंतु ते अडखळण सूर्याला विझवू शकत नाही.

सावली काय सिद्ध करते?

मी त्या संध्याकाळी माझ्या मित्राला सांगितल्याप्रमाणे, हे वास्तव सर्व कठीण प्रश्नांचे उत्तर देत नाही आणि प्रत्येक संशयाला संबोधत नाही. क्षमावादी ह्या नात्याने, हे विशिष्टरीत्या ख्रिस्ती सुद्धा नाही. परंतु माझा असा विश्वास आहे की हे सर्वोच्च वास्तवाकडे निर्देश करणारे आहे, आणि विशेषत: जे स्वत:ला अंधकारातून चालत असलेले असे बघतात त्यांच्यासाठी ते अमुल्य आहे.

सूर्य असल्यामुळे आम्हाला डोळे आहेत. मग आम्हाला आध्यात्मिक प्रकाशाची ओढ असलेले आध्यात्मिक “डोळे” का आहेत? जेव्हा आम्ही मृत्युच्छायेच्या दरीतून जात असतो, तेव्हा आम्ही छाया कशी ओळखू शकतो? आम्ही जर असे म्हणालो, “अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो” (स्तोत्र 139:11), तरी आम्ही रात्रीपासून दिवस कसा वेगळा करू शकतो?

माझा असा विश्वास आहे की, आमच्या आध्यात्मिक अंधकाराचा अनुभव हा आध्यात्मिक प्रकाशाच्या अस्तित्वाची साक्ष देतो म्हणून ते आहे. सावली स्वत: सूर्यप्रकाशाचा पुरावा देते. आणि ते जर खरे आहे, आपण जर सावल्या आणि ते उभे करतात त्या प्रश्नांऐवजी सूर्य शोधतो, तर आम्हाला जगाचा प्रकाश, जीवनाचा प्रकाश सापडेल (योहान 8:12). ह्याद्वारे मला आणि माझ्या मित्राला आमच्या अंधकारमय काळामध्ये मदत झालेली आहे. कादाचित आपल्या किंवा आपण प्रीती करत असलेल्या व्यक्तीच्या जीवनात आवश्यक असलेला प्रकाश ह्यामुळे पडेल.

लेख

जॉन ब्लुम

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *