संपूर्ण पवित्र शास्त्र वाचून पूर्ण करण्यास जेवढा वेळ लागतो, तितक्या वेळेत तुम्ही वेस्टमिनिस्टर Westminster कबुली जवळपास सत्तर वेळेस वाचून पूर्ण करू शकता.

ह्या बद्दल विचार करा. वेस्टमिनिस्टर सत्तर वेळेसे वाचून पूर्ण करणे. जवळपास चार शतकांपूर्वी, जगातील 120 सर्वोत्तम इंग्लिश पाळक आणि ईश्वरविज्ञानकारांनी तीन वर्ष परिश्रम करून पवित्र शास्त्राचे प्रमुख ईश्वरविज्ञानात्मक आणि नैतिक शिक्षण सादर केले. त्या 12,000 शिक्षित शब्दांना पाच ते सहा डझन वेळा सातत्याने आपण वाचून काढल्यास आपल्या जीवनभरासाठी ते काय चांगले करू शकेल?   

अशा शब्दांमध्ये मांडले तर दैनंदिन पवित्र शास्त्र वाचन हे अपूरे वाटायला लागेल. पवित्र शास्त्रातील वंशावळ्या, सांप्रदायिक नियम, गूढ सूत्रे, आणि लहान संदेष्ट्यांचे एकदा वाचन करण्यापेक्षा वेस्टमिनिस्टरच्या सत्तर वाचनांमध्ये आपला वेळ योग्य घालविला जाईल का? 

आशा आहे की तुम्ही “नाही” असे उत्तर द्याल, परंतु अशाप्रकारे मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, तुम्ही आपल्या मतांगिकार व कबुल्यांचे फायदे आणि धोके ह्यांचा विचार कराल.

मतांगिकारांचे विस्मय व धोके

अशा प्रकारच्या मतांगिकारांची उपयुक्तता ही त्यांच्या निश्चित संक्षिप्ततेमध्ये सामावलेली आहे, ते 12,000 शब्द असलेले विस्तृत वेस्टमिनिस्टर असो की 200 शब्दांचे लघू नायशिया Nicea असो. मतांगिकार आणि कबुली हे अद्भुत, साहाय्यभूत, आणि बोधपूर्ण सारांश असू शकतात! वेस्टमिनिस्टरचे संपूर्ण लेखन हे जवळपास एक तासाच्या वाजवी वेळेत वाचून पूर्ण होऊ शकते. ते संपूर्ण पवित्र शास्त्राच्या तुलनेत 1% पेक्षा थोडेसे जास्त आहे, आणि ते सर्वांगीण दृष्ट्या पवित्र शास्त्राच्या शिकवणींचे उत्तम संश्लेषण आहे.

धर्मसुधारणेच्या एक पीढी नंतर (1560 पासून 1640 पर्यंत) सुरू झालेल्या नव्वद वर्षांच्या काळामध्ये तयार झालेल्या टिकाऊ सुधारणांची उजळणी करणे हे लक्षणीय आहे :

1561: बेल्जिक कबूली (Belgic Confession)
1563: हायडेलबर्ग प्रश्नोत्तरी (Heidelberg Catechism)
1619: डॉर्टचे कॅनन (Canons of Dort)
1648: वेस्टमिनिस्टरचा मानदंड (Westminster Standards)

वेस्टमिनिस्टरचे काही अनुयायी आज तुम्हाला सांगतील की सुधारणेचे कार्य महान परंतु मर्यादित होते, आणि 1648 पर्यंत ते आवश्यकरीत्या पूर्ण झालेले होते. त्यांचे असे म्हणणे आहे की वेस्टमिनिस्टरच्या आगमनामुळे मंडळीचे सिद्धान्त, आराधना, आणि प्रशासन शेवटी सुधारले गेले. प्रकल्प पूर्ण झाला होता; परंतु मागील चार शतकांनी भरपूर झीजण्याची जोखीम आणली परंतु सुधारणेमध्ये काही वास्तविक व्यवहार आणले नाहीत.

धर्मसुधारणेच्या गटातील इतर काही वेगळा विचार करतात, आणि ह्या भिन्न अंत:प्रेरणा ह्या धर्मसुधारणेच्या ईश्वरविज्ञानाच्या अतिवादातीत मोजक्या लॅटीन सुभाषितांवर नेहमी आदळल्या आहेत : सेंपर रिफॉर्मांडा semper reformanda, “सदैव सुधारत असलेले.”

मूळ आणि संदर्भ

ह्या वाक्यांशासारखी सर्वात जुनी नोंद डच धर्मसुधारक पाळक जोडोकस व्हॅन लोडेन्स्टीन (1620–1677) ह्यांच्या 1674 मधील भक्तीपर पुस्तकामध्ये आहे. त्यांनी “धर्मोधारित” आणि “धर्मसुधारणा होत असलेले” ह्यांना समोरासमोर आणले. औपचारिक सैद्धान्तिक सुधारणेकरिता विनंती करण्यासाठी नव्हे तर जे स्वत:ला धर्मसुधारित वाचक म्हणतात त्यांच्या अंत:करणांची सुधारणा करण्याकरिता. त्याची चिंता धर्मशिल आणि भक्तीपर होती, आणि रॉबर्ट गॉडफ्रे लिहितात त्याप्रमाणे ह्या “चिंता इंग्लिश अतिशुद्धवाद्यां (English Puritans) सारख्याच होत्या.”

केवीन डीयंग हे संदर्भाचा विचार करण्याच्या आवश्यकतेवर जोर देतात : “व्हॅन लोडेन्स्टीन यांच्या वाक्यांशाची समग्रता बघणे महत्वाचे आहे : इक्लेसिया रिफॉर्माता, सेम्पर रिफॉर्मांडा सेकुंदूम व्हर्बे डेई (Ecclesia Reformata, Semper Reformanda, Secundum Verbi Dei) (‘मंडळीची धर्मसुधारणा झालेली आहे आणि तिची देवाच्या वचनानुसार सतत धर्मसुधारणा[होत राहण्याची गरज आहे] होत राहते’).” ह्या ठिकाणची दुहेरी पुष्टी लक्षात घ्या, मंडळी ही दोन्ही (1) “धर्मसुधारणा झालेली” आहे आणि त्याचप्रमाणे (2) “धर्मसुधारणा होत असलेली आहे.” ह्यामधील दोन निष्क्रिय क्रियापदांचा शेवट त्यामधील देवाचे वचन ह्या कृतीच्या मानदंडाने होतो. डीयंग, गॉडफ्रे, आणि इतर अगदी योग्यरीत्या जोर देऊन सांगतात की, मंडळी ही काळाच्या ओघाने “धर्मसुधारित होत” नाही तर देवाच्या प्राचीन लिखित वचनाच्या नियमाने म्हणजे “पवित्र शास्त्रानुसार” धर्मसुधारित होत आहे.

सेम्पर रिफॉर्मांडा Semper reformanda हे सोला स्क्रिप्चरा (Sola Scriptura) म्हणजे केवळ पवित्र शास्त्र ह्याचा उपसिद्धान्त ह्या नात्याने केवळ उजळणी करण्याच्या हेतूने उजळणी करण्यास, किंवा समकालीन अविश्वासाच्या नमुन्यांशी सम्मिलित होण्यास पाचारण नाही. त्याऐवजी, ते आमच्या वैयक्तिक आणि मंडळीत्मक बिघाडाचे, पापाच्या विकृतीमध्ये आमचा क्रमश: र्‍हास होण्याचे, आणि पवित्र शास्त्राच्या सिद्धान्त आणि नैतिकतेपासून भटण्याच्या प्रवृत्तिचे स्मरण करून देणे आहे. आमचे ताजे प्रयत्न आणि उर्जेशिवाय, आणि पवित्र शास्त्राच्या उगमजलातून आम्ही स्वत: पिल्याशिवाय, मंडळीचे जीवन आणि सिद्धान्त लवकरच लोप पावतील आणि त्यांची झीज होईल.

आम्ही कशामध्ये सुधारणा करत नाही

येथे धर्मसुधारणेच्या दिवशी, आपण “सतत धर्मसुधारणा होत असलेले” ह्याच्या आवेगाचे स्मरण करत असताना, आम्ही कशाची सुधारणा करत नाही ह्याचे आम्ही नव्याने स्पष्टीकरण देतो : सत्य सिद्धान्ताचा गाभा आम्ही सुधारत नाही.

दोन सहस्त्रकांपासून ख्रिस्ताचा अंतिम शब्द असा आहे की पवित्र शास्त्र हे पूर्ण, वस्तुनिष्ठ, आणि निश्चित आहे.  पवित्र शास्त्राच्या बाह्यात्कारी शब्दामध्ये पात्म बेटापासून बदल झालेला नाही आणि त्यात कुठलीच भर सुद्धा घालण्यात आलेली नाही. निश्चितच, केवळ व्यक्तींनी नव्हे, तर ख्रिस्ती समाज, आणि सामान्येकरून मंडळी ही वाढलेली आहे आणि त्यांनी ह्या शतकांमध्ये देवाचे वचन समजण्यामध्ये, त्याचे स्पष्टोच्चारण करण्यामध्ये, आणि त्याचे लागूकरण करण्यामध्ये सुधारणा केलेली आहे. लिखित वचनासोबत, पवित्र आत्मा हा त्याच्या लोकांमध्ये प्राचीन वचन चांगल्यारीतीने समजण्यास आणि समर्पक करण्यास असक्रीय, दूर, किंवा निष्प्रभ नाही. परंतु पवित्र शास्त्र स्वत: जे शिकवते, आणि ह्याप्रमाणे सत्य सिद्धान्ताचा गाभा हा बदललेला नाही आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची किंवा त्याला अद्ययावत करण्याची गरज नाही.

आपण कुठल्या संभ्रमात राहू नये म्हणून, सेम्पर रिफॉर्मांडा (Semper Reformanda) हे आमच्या सिद्धान्ताचा ह्या पीढीमध्ये शून्यापासून पुनर्विचार करण्याकरिता अधिकार देणे नाही. 

आम्ही कशामध्ये सुधारणा करत राहतो

सतत चालू असलेल्या पद्धतीने मग आम्ही नेमके कशात सुधारणा करू पाहतो? किंवा आम्ही मंडळी ह्या नात्याने कुठल्या प्रकारे “सतत सुधारत” आहोत?

सारांशात, आम्ही आमचा गाभा ज्या कुठल्या प्रकारे मोठ्या किंवा लहान प्रकारात चुकीचा स्वीकारला, व्यक्त केला, किंवा लागू केला त्यामध्ये सुधारणा करू इच्छितो. परंतु आमची सामान्यत: विश्वासू असणारी परंपरा ही चुकविरहित किंवा संतुलनरहित नाही असे आम्ही गृहीत धरू नये. त्याऐवजी प्रश्न असा आहे की योग्यवेळी आम्ही त्या खरोखर ओळखून त्यात सुधारणा केली पाहिजे.

“पवित्र शास्त्रोक्ततावादाच्या जवळ असण्याचे समर्थन” ह्या अविस्मरणीय निबंधामध्ये, धर्मसुधारक ईश्वरविज्ञानकार जॉन फ्रेम हा त्याच्या ईश्वरविज्ञानाचे अध्यापक महान जॉन मुरे ह्यांचे अवतरण ह्याप्रकारे वापरतो :

विशिष्ट कालावधीमध्ये कितीही महत्वाची प्रगती साधलेली असो आणि विशिष्ट मनुष्यांनी कितीही महान भर घातलेली असो, ईश्वरविज्ञानात्मक रचना ही कधी निश्चित अंतिमता गाठते असे आम्ही गृहीत धरू शकत नाही. तेथे एका बाजूला, कुंठित परंपरावादाचा धोका असतो आणि आम्ही त्याबाबत जागरूक असले पाहिजे, तर दुसर्‍या बाजूला, आमच्या ऐतिहासिक तथ्यांना फेटाळण्याचाही धोका असतो त्याहीबाबत आम्ही जागरूक असले पाहिजे.

मुरे हा मजसारख्या आणि त्याच्या स्वत:सारख्या आमच्या ईश्वरविज्ञानाच्या परंपरेची प्रशंसा करून जोपासणा करणार्‍या धर्मसुधारकांना ही चेतावणी देतो :

जेव्हा एखादी पीढी तिच्या ईश्वरविज्ञानात्मक वारशावर अवलंबून राहण्यात तृप्त आहे आणि ईश्वरी प्रकटीकरणाची श्रीमंती समजून घेण्यास नकार देते, तेव्हा र्‍हास सुरू झालेला आहे आणि पुढील पीढीच्या पदरी पाखंड पडणार हे निश्चित आहे.

हे धर्मसुधारक परंपरेमधील दीर्घकालीन बिघाड रेषेवर बोट ठेवते. मुरे सारखे काही, स्वत:करिता ईश्वरी प्रकटीकरणाच्या श्रीमंतीला समजून घेण्याबाबत रोमांचित असतात; इतरांकरिता हा विचार अस्वस्थ करणारा आहे. खोलवर, ते पवित्र शास्त्र एकदा वाचण्याऐवजी वेस्टमिनिस्टरचे सत्तर वेळा वाचन करतील का? सेम्पर रिफॉर्मांडाची (Semper Reformanda) संकल्पना ह्या तणावावर जोर देते.

फ्रेम त्याच्या निबंधामध्ये, सोला स्क्रिप्चरा sola Scriptura म्हणजे केवळ पवित्र शास्त्र (आणि त्यासोबत, सेम्पर रिफॉर्मांडा (Semper Reformanda) बाबत योग्य दृष्टिकोण आम्हाला केवळ “स्वत:करिता ईश्वरी प्रकटीकरणाची श्रीमंती शोधावयास प्रवृत्त करते” एवढेच नाही तर, योग्य कालवधीमध्ये “पवित्र शास्त्राने प्रोत्साहित सर्जनशिलतेकडे” आम्हाला नेते, ते म्हणजे, “कुंठित परंपरावाद नाही, तर मूळ आणि प्रभावी ईश्वरविज्ञानात्मक विचाराची समृद्धी आहे” हे सांगतात. आता मात्र कठोरपंथी लोकांना घाम सुटायला लागतो.

पवित्र शास्त्राला व्यवहारात अंतिम शब्द मानणे (म्हणजे पवित्र शास्त्र आणि त्याबाबतचा आमच्या विश्वासाचा दावा हे दोन्ही) “आम्हाला संस्कृतीचे टिकात्मक मुल्यमापन करण्याचे प्रभावी साधने पुरवतात,” फ्रेम पुढे म्हणतात की, आम्हाला आणि गतकाळात ज्यांनी त्याला अंतिम शब्द मानले त्यांना ते, “धर्मनिरपेक्षता आणि परंपरावादापासून सुरक्षित ठेवते.” म्हणजे, आमच्या भोवतीचा समाज जस जसा सरकतो तसे नवीन चुका करण्यापासून आम्ही राखले जाऊ, आणि आम्ही नव्याने हे बघू शकू की कसे आम्ही स्पष्ट चुका आणि लहान अभिव्यक्तींमध्ये आमच्या “सतत सुधारणा होत असलेल्या” कार्यामध्ये सुधारणा करू शकू.

आम्ही स्वत:ची सुधारणा करतो

आता आमचे “सतत सुधारणा होत असणे” ह्यामध्ये सिद्धान्ताचा गाभा समविष्ट होत नाही, परंतु त्यामध्ये आम्ही आमच्या पीढीला सिद्धान्त कसे शिकवतो आणि कसे व्यक्त करतो हे सामावलेले असू शकते. आणि त्रिकालबाधित गाभा नव्या समकालीन मार्गांमध्ये मांडण्यात आपली उर्जा घातली तर आमची स्वत:ची समज (आणि आमच्या श्रोत्यांची) सखोल होईल आणि ज्या श्रोत्यांना जुने सादरीकरण अस्पष्ट आणि दुर्गम वाटत होते ते ऐकण्यास ते उत्सुक होतील. ज्या कालावधींमध्ये आम्ही त्रिकालाबाधित सत्य बोलतो, ते बदलतात, आणि म्हणून, आम्ही जर विश्वासू आहोत, तर आमच्या पसंतिच्या अभिव्यक्ती आणि रचना यांची कालावधीसोबत पुनरावृत्ती होईल. आणि तेव्हासुद्धा, सैद्धान्तिक रचनांमध्ये आम्ही संरक्षणात्मक शक्ती लागू करतो. कारण, बदलामध्ये नवीन चुकीची जोखीम आहे. आणि म्हणून, आम्ही निष्काळजीपणे नवीन भाषा वापरत नाही, किंवा वेळेआधी तसे करत नाही.

आणि शेवटी जे आम्ही सुधारत असतो त्याचे मूळ आम्हा स्वत:वर केंद्रित आहे, आणि विशिष्टरीत्या लोडेन्स्टीनच्या मूळ चिंतेनुसार ते आमचे हृदय आहे. गॉडफ्रे म्हणतात, “धर्माच्या ज्या भागाला सतत सुधारणेची गरज आहे ते म्हणजे आमचे मानवी हृदय आहे.” आम्ही आमचे स्वत:चे आणि सार्वजनिक व पीढीत्मक पाप आणि चुकांचा शोध घेऊन बोध करण्याचा ध्यास घेतो. आम्ही देवाच्या वचनानुसार स्वत:ला सुधारतो. “सतत सुधारणा होत असणे” ह्याच्या केंद्रस्थानी, “आपण,” “आम्ही,” “स्वत:” असतो. आणि विशेषत: आमची हृदये केंद्रस्थानी असतात.

350 वर्षांपूर्वी होता तसाच आज सेम्पर रिफॉर्मांडा ज्या प्रश्नावर जोर देतो तो असा आहे : तुमचे अंत:करण कसे आहे? तुम्ही औपचारिक धर्म, त्याच्या अचूक ऐतिहासिक सिद्धान्त आणि बाह्यात्कारी पालन ह्यांनी तुम्ही तृप्त आहात का? दृष्य देवभिरूपणाच्या अंतर्गत सामर्थ्याला नकारत असता तुम्ही त्याशी शांती केली आहे का (2 तीमथ्य. 3:5)? तुमचे ख्रिस्तीत्व हे अंत:करणाचा धर्म आहे का? तुमचा नव्याने जन्म झाला आहे का, की तुम्ही केवळ बाप्तिस्मा झालेले आहात? तुम्ही येशूवर आणि त्याच्यामध्ये देव स्वत:ला आमच्याकरिता जसा व्यक्त करतो त्यावर प्रीती करून आनंदी आहात का?

पवित्र शास्त्रामध्ये शोधा

जेव्हा धर्मसुधारणा पूर्ण झाली होती तेव्हा तुमचे चमत्कारी तारीख किंवा वर्षांचा शोध घेणे व्यर्थ होईल. आम्हामध्ये ते काम आजही सुरू आहे. म्हणून मग आम्ही “मतांगिकारांऐवजी पवित्र शास्त्र” असा दावा करू का?

जर “मतांगिकारांचा नकार” म्हणजे पवित्र शास्त्राच्या वर आमचा अंतिम अधिकार, आमचे मानक ठरविण्याचे मानक, किंवा दुसरा एखादा दस्तऐवज ह्यांना मान्यता देणे असेल तर मग निश्चितच “मतांगिकारांचा नकार.” आमच्याकरिता पवित्र शास्त्रच अंतिम शब्द आहे.

परंतु “मतांगिकारांचा नकार” ह्याचा अर्थ ख्रिस्ती सिद्धान्तांची व विश्वासांची सारांशात्मक अभिव्यक्ती ह्याप्रती निष्काळजीपणा असेल तर मग, नाही, ते बालीशपणाचे होईल. विश्वासू रचनांद्वारे आम्हाला खूप फायदा झालेला असून आम्ही त्यावर प्रीती करतो. आणि डिझायरींग गॉडची Desiring God पुष्टी कबुल करते त्याप्रमाणे, ह्या पुष्टीकरिता आम्ही अचूक असण्याचा दावा करत नाही आणि आम्ही पवित्र शास्त्रामधून सुधारणुकीस तयार आहोत. आणि तरीही आम्हाला दिसतात तसे ह्या सत्यांना आम्ही घट्ट धरून ठेवतो आणि इतरांनाही पवित्र शास्त्रात शोधून त्या गोष्टी तशाच आहेत हे बघण्यास आमंत्रण देतो.

संभाषणे आणि वादविवाद होत असताना आम्ही एक दुसर्‍याकडून शिकू शकतो, आणि आपल्या मर्यादांची पुनर्रचना करून शकतो, आणि गतकाळात असहमत असणार्‍या गटांना जवळीकतेच्या सहभागितेमध्ये सामावून घेऊ शकतो. (15:4)

आमच्या कबुलीकरिता असलेल्या प्रेमासहित आम्ही आनंदाने पवित्र शास्त्रालाच महत्व देतो, त्याच्यातील अध्याय आणि वचनांची अवतरणे वापरतो, आणि बिरूया येथील लोकांची परंपरा लक्षात घेऊन तीच सारांशात वेस्टमिनिस्टरचे ईश्वरविज्ञान असे मान्य करतो : “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले” (प्रेषित. 17:11). धर्मसुधारणेच्या दिवसाने, दैनंदिन पवित्र शास्त्र शोधण्याच्या उत्सुकतेच्या संदर्भामध्ये आमच्या कबुलीचे आजीवन सातत्यपूर्ण अध्ययन, हे प्रेरित करण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकेल.

लेख

डेव्हीड मॅथिस

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *