समलिंगी दत्तकपणाची शोकांतिका
त्याला बालवाडी संपल्यावर घरी जाण्याची इच्छा नाही. त्या तासांमध्ये तो स्त्रीची संगोपन करणारी काळजी अनुभवतो, म्हणजे तो मातृत्वाचा स्पर्श जो लहान मुलाच्या मानवी गरजांची परिपूर्ती करतो. जेव्हा घरी जाण्याची वेळ येते तेव्हा तो रडतो. त्याला जेव्हा दोन मानसांच्या घरात परत जायची वेळ येते तेव्हा तो जन्मल्यावर जी दुय्यम भाषा अस्खलित बोलत असे त्या मातृभाषेत बोलण्यास अडखळतो. “विवाहित” माणसे इतर माणसांसोबत उघडरीत्या स्वैराचारी वागतात. एक माणूस दुसर्या माणसापेक्षा जास्त बायकी असल्याचा आव आणतो, परंतु हे बायकीपण (मुलाला हे अनुभवाने माहीत आहे) हे गौरवी स्त्रीत्वाचा असभ्य आणि क्रूर पर्याय आहे.
तो अशा माणसांमध्ये अडकलेला आहे जे “स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले” (रोम. 1:27). ह्या माणसांनी ते प्रतिफळ त्यांच्यापूर्ते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी त्या मुलाला सरळ दवाखान्यातून उचलून वासनांनी युक्त, क्रोधाचा शिक्का असलेल्या घरामध्ये देवाचा व त्याच्या रचनेचा तिरस्कार करणार्या दोन माणसांमध्ये राहण्यास आणले.
हा लहान मुलगा त्याची ख्रिस्ती काकू जेव्हा केव्हा येते तेव्हा तिला बिलगून राहतो, ती आम्हाला सांगते की तिची घर सोडून जाण्याची वेळ आली म्हणजे तो रडतो. ते घर सतत मनुष्यांच्या गुणधर्मांनी, भ्रष्ट इच्छा, आणि पितृत्व व मातृत्वाची निकृष्ट दर्जाची नक्कल यांनी भरलेले आहे. त्या मुलाला त्याच्यावर ख्रिस्ती संस्कार घालण्याच्या प्रयत्नांव्यरितिक्त खरे आणि खोटे ह्यामधील फरक स्पष्ट ओळखतो. त्याला सत्य गोष्टीने घट्ट धरणे, सांत्वन करणे, मिठी मारणे आणि त्या बाहूंच्या संरक्षणामध्ये सुरक्षित वाटणे काय आहे हे माहीत आहे.
ज्या माणसांनी त्याला दत्तक घेतले आहे ते आता कुठल्याही दिवशी दुसर्या एकाला दत्तक घेण्याची वाट बघत आहेत.
ह्या जगासोबत काय चुकलेले आहे?
ह्या गोष्टीने आम्हाला राग यायला पाहिजे, आमचे हृदय फाटले पाहिजे, आणि आमचे गुडघे प्रार्थनेकरिता टेकले पाहिजे. ह्या जगासोबत काय चुकलेले आहे?
पौल आम्हाला रोम. 1:18-32 मध्ये ह्याचे उत्तर देतो : मानवजात त्याच्या निर्माणकर्त्याशी युद्ध करत आहे. प्रत्येक पीढीजवळ पिता आणि पुत्राला, “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ” असे (स्तोत्र 2:3), किंवा फारो सोबत, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकावे?” असे म्हणण्याचे मार्ग आहेत (निर्गम 5:2). रोम. 1 आम्हाला निकडीच्या वेळेच्या संदर्भाकरिता पार्श्वभूमीमध्ये घेऊन जाते.
येथे आम्ही शिकतो की पतित मानव हा एक लहान भित्रा प्राणी असून, सर्वसमर्थाशी डोळे भिडवण्याचे धाडस करू शकत नाही, म्हणून तो देवाबाबतचे सत्य दाबून ठेऊन आनंदाने घाणीमध्ये राहण्याचे निवडतो (रोम.1:18). हे सत्य दाबून टाकण्याचे एक लोकप्रिय माध्यम म्हणजे नास्तिकवाद आहे. “मूढ आपल्या मनात म्हणतो, ‘देव नाही’” — आणि तो तसा करतो कारण “ते दुष्ट आहेत” आणि “अमंगळ कर्मे करतात” (स्तोत्र. 14:1). आणि ही कृत्ये मुखवटे घालत नाहीत आणि विलग्नवासात जात नाहीत. मनुष्य देवाला नकारतो जेणेकरून तो समलिंगभोग करू शकेल. हा बंडांच्या अनेक मार्गांपैकी एक आहे, आणि मग त्याच्या विकृतीमध्ये लेकरांना दत्तक घेतो.
परंतु ह्या जगाची थोरवी देशोधडीला लागलेल्या मनवाला सबबीहीन असे ठेवते (रोम. 1:19–20). तो, अगदी तो स्वत:, सर्वोत्कृष्ट कृतीमध्ये राहतो — देवाच्या “अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत” (रोम. 1:20). महान कलाकार सर्वत्र दिसावे म्हणून आपली सही कलाकृतीवर करतो. मनुष्य त्याच्या कलपनेपेक्षाही विस्तृत अशा अंतरिक्षामध्ये कधीही शोध लावू न शकणार्या उंची व खोली मध्ये थरथरतो. मानवाचा मेंदू (कृपेविना देवाशी वैर करतो, रोम. 8:7–8) संगणकाला मागे टाकतो. त्याच्या पेशींमध्ये गोंधळात टाकणारी गुंतागुंत आहे. आणि तरीसुद्धा त्याचे पापाकरिता असणारे प्रेम आधुनिक मनुष्याला औदासिन्याने स्वत:स नास्तिक म्हणावयास लावते. त्याचा धर्म म्हणतो की सर्वकाही मूळ शून्यातून, महान मी नाही ह्यातून आले. सुज्ञ असण्याचा दावा करत असतो, तो मूर्ख झाला आहे.
जुन्या घड्याळ निर्मात्याची उपमा निसर्गाचे केवळ निसर्गाने स्पष्टीकरण देण्याच्या मूर्खपणावर प्रकाश टाकते. जर नास्तिकाला जंगलामध्ये आयफोन सापडला तर तो नेहमी असाच निष्कर्ष लावेल की कोणीतरी तो तेथे सोडला असावा. तो कोणीतरी तयार केलेला आहे. संधीने त्याला आकार दिला नाही. त्याबाबत कालावधी श्रेय घेऊ शकत नाही. अॅपल चा आयफोन असला तरी तो काही झाडावरून पडला नाही. तरी तो जगतो आणि हालचाल करतो आणि त्याचे अस्तित्व अशा गुंतागुंतीच्या विस्तृत जगामध्ये आहे जे आयफोनला पथ्वीपासून वर असणार्या आकाशापर्यंत उंच करते आणि तरीही तो म्हणतो की हे सर्व व्यक्तिनिरपेक्ष, बुद्धीहीन शक्तींपासून आले. त्यांच्याकडे कसलीही सबब नाही.
पापाद्वारे कत्तल करण्यासाठी पुष्ट केलेले
पुनरुज्जीवन न झालेली लैंगिक व्यवसाय करणारी माणसे देवाला बघत नाहीत कारण त्यांना देव नको आहे. त्यांना शक्य असेल तर ते त्याला झाडावर पुन्हा खिळतील. “निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती” (योहान 3:19). अपराधी म्हणून आपणास सर्व बघणारा देव न्यायाधीश म्हणून नको, आणि मानव हा देव नाही आणि तो चांगलाही नाही असे सांगणार्या देवाला नैसर्गिक मनुष्य चिडवतो. आमच्या शरीरांसोबत आम्ही काय करावे हे आम्हाला सांगणारा देव कोण? आमच्या बाळांसोबत काय करायचे हे आम्हाला सांगणारा देव कोण? विवाह काय आहे हे आम्हाला सांगणारा देव कोण? तो आहे तरी कोण!
म्हणून आदामाचे पुत्र देवाला नकारतात. ते देवाचा सन्मान त्याला देत नाहीत, किंवा त्याच्या चांगुलपणासाठी आणि करुणेसाठी ते त्याचे आभार मानत नाहीत (रोम. 1:21). त्याऐवजी, ते सर्वशक्तिमान देवाचा अपमान करतात आणि उपकारकर्त्या देवाच्या हातांवर थुंकतात. एखादा वेडा मनुष्य त्याला चंद्र आवडत नाही म्हणून आपलेच दात उपटून आकाशाकडे भिरकावतो तसे हे आहे. मानसे त्यांच्या बंडामध्ये स्वत:लाच हानी पोहचवतात. ते त्यांच्या विचारसरणीमध्ये निरुपयोगी बनतात, आणि त्यांची मूर्ख हृदये अंधकारमय झालेली आहेत (रोम. 1:21). देवाला नकारले म्हणजे तुम्ही तर्क, सुबुद्धता, चांगुलपण, सौंदर्य, आणि जीवन ह्यांचाही नकार करता. व्यक्ती आध्यात्मिक नबुखद्नेस्सर बनते. तो तलावाकाठी असणार्या घरात राहत असो, विलासी कार चालवत असो, किंवा त्याचे देवाचा तिरस्कार करणारे मित्र त्याला कितीही आकर्षक मानत असो. त्याची नखे पक्ष्यांच्या नखांप्रमाणे वाढतात, तो ओणवून गवत खाऊ लागतो.
त्याचे देवाशी युद्ध आहे आणि देवाचे त्याच्याशी युद्ध आहे. तो देवाच्या नेमकेच तापत असणार्या क्रोधाखाली आहे (रोम. 1:18). त्याने प्रतिमांशी देवाची अदलाबदल केली आहे, आणि आता देव त्याला पापिष्टपणाच्या आत्महत्येच्या स्वाधीन करून टाकतो: आपल्या मनाच्या वासनांना, अशुद्धतेच्या, स्वत:च्या शरीरांचा अवमान करण्याला स्वाधीन करतो (रोम. 1:24). तो मूर्तिंपूढे झुकतो आणि देवाच्या सत्याचा व्यभिचार करतो, म्हणून देव त्याला गवताळ पृष्टभागावर आणून त्याची कत्तल करण्यासाठी त्याला पुष्ट करतो.
लहान लेकरांचा रक्तपात
देवाने ह्या दोन माणसांना “माणसांसोबत निर्लज्ज कृत्ये” करण्यास दुर्वासनांच्या स्वाधीन केले आहे (रोम. 1:27). आणि मग देवाने नैसर्गिकरीत्या असण्यास जे प्रतिबंधित केले आहे ते दत्तक घेण्यास ते कटकारस्थान करतात. आणि मग भांतिमय शक्ती त्यांना लेकरांना त्यांच्या “घरांमध्ये” ठेवायला लावतात जेणेकरून देवासोबतच्या चकमकित ते एकप्रकारच्या स्फोटक गोळ्याने उडवले जातील.
आणि देवाचा न्याय असे करतो: गांधील माशीच्या घरट्यावर मारल्याप्रमाणे, तो मनुष्याचे डावी उजवीकडून दंश करणे उत्तेजित करतो.
आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनीती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्मकल्पक, मातापितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते.(रोम. 1:28–31)
हे “देवाचा द्वेश करणारे” कोणाचा हेवा करतात? कोणाला फसवतात? कोणाची निंदा करतात? कोणाचा खून करतात? स्वत:चा, इतरांचा, आणि कधी कधी लेकरांचा.
देवाविरुद्ध बंड हे वणवा बनते. दुष्टता ही स्वत:पुरती राहण्यात कधीच समाधानी नसते, ते योग्य अधिकार्याविरुद्ध बंड करते. ते शय्यासोबती शोधतात. ते चिथावतात आणि सक्तीची मागणी करतात. ते रांगत विशिष्ट प्रमाणात वाढत जाते, शाळांच्या यंत्रणा हाती घेते आणि लेकरांना दत्तक घेते. ते ज्यांना अधिक माहीत आहे त्यांची नियुक्ती करते : “जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात; इतकेच केवळ नव्हे तर त्या करणार्यांना संमतीही देतात” (रोम. 1:32). ह्या प्रकारच्या लोकांना माहीत असते की असल्या पातकांसाठी देवाची प्राणदंडाची शिक्षा आहे, परंतु प्रीती करायला लावते त्याप्रमाणे त्यांना पश्चाताप करायला लावण्याऐवजी ते त्यांच्या धैर्य आणि “अधिकृततेविषयी” त्यांना प्रोत्साहन देतात.
येणार्या क्रोधापासून पळा
देवाची वास्तविकता ही लवचीक नाही. त्याचा नियम परिपूर्ण आहे; त्याचे नियम सत्य आणि संपूर्णत: नीतिमान आहेत. पृथ्वीचा न्यायाधीश योग्यच करेल, आणि ज्यांनी त्याच्या करुणेचा तिरस्कार केला, त्याच्या प्रीती, लैंगिकता, आणि विवाहाच्या रचनेचा तिरस्कार केला, त्याच्या तारणाच्या दिवसाचा तिरस्कार केला, आणि त्याच्या वधस्तंभावर मरण पावलेल्या पुत्राचा सुद्धा तिरस्कार केला, त्यांच्यासाठी ही दहशत आहे.
प्रिय वाचकहो, आजच तारणाचा दिवस आहे, येशू राजाचा शोध घ्या. त्याला शरण येणारे सर्व आशीर्वादित आहेत. त्याने तुमचा स्वीकार करण्याकरिता त्याच्या स्वत:च्या रक्ताने मार्ग बनविला आहे. तुम्ही पराकोटीचे पापी आहात का? तुम्ही खून केला आहे का, खोटे सिद्धान्त शिकवले आहेत का, देवाला अमंगळ अशा एकत्रीकरणामध्ये लेकरांना दत्तक घेतले आहे का? तुमचे दुष्ट जीवन हे देवाला त्याचे खोली मोजता न येणारी दया आणि ख्रिस्ताच्या त्यागाचे सार्वकालिक सामर्थ्य तुमच्या तारणासाठी व्यक्त करण्याची संधी आहे. मंडळ्यांचा दहशतवादी, देवाबत दुर्भाषण करणारा, आणि ख्रिस्ती लोकांचा खून करणार्याने लिहिले आहे,
ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. (1 तीमथ्य. 1:15–16)
करुणेच्या ह्या महान उदाहरणाकडे तुमचे स्वत:चे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास देण्याकरिता बघा. पराकोटीच्या अपराधांकरिता विपूल क्षमा. जे येतात सर्वांसाठी भरपूर करुणा आहे.
परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा; दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. (यशया 55:6–7)
येशू ख्रिस्ताजवळ पश्चाताप करणार्यासाठी कृपेचे सिंहासन आहे आणि पश्चाताप न करणार्यांसाठी दहशतीचे आसन आहे. ह्या जगासोबत काय चुकलेले आहे? मानसाचे पाप. ह्या जगाबरोबर एकमात्र योग्य बाब काय आहे? येशू ख्रिस्त – त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे तारणाचे कार्य आणि त्याच्या तारलेल्या पापी लोकांची मंडळी. तो अंधारात चमकतो, आणि तरीही अंधाराने त्याला पराभूत केलेले नाही.
लेख
ग्रेग मॉर्स