गमावण्याचे दु:ख आणि स्वर्गाची आशा
“आपण कुठल्या मरणाला ‘चांगले मरण’ म्हणाल?”
माझ्या कपाळावर आठ्या आल्या. मुलाखतकर्ता आणि मी मागील नव्वद मिनिटे मृत्यू सेवेमधील गुंतागुंतीबाबत चर्चा करण्यात घालवली. ह्यामध्ये आम्ही जीवंत ठेवण्याच्या उपाययोजना, हॉस्पीस (आजारी, अपंगासाठी असलेला आश्रम), आणि अडव्हान्स डिरेक्टिव्ह (एखादी व्यक्ती वैद्यकिय निर्णय घेण्यास असक्षम असेल तर वैद्यकिय उपचार प्राप्त करण्याबाबत त्या व्यक्तीच्या इच्छांचा अधिकृत दस्तऐवज) ह्या विषयांबाबत चर्चा केली. ह्या नाजुक विषयांमधून मी फार विश्वासाने मार्ग काढत गेले, परंतु ह्या प्रश्नाने मी इतकी अस्वस्थ झाले की मी निशब्दावस्थेत गेले. मी शेवटी म्हणाले, “मी त्या वाक्यांशाचा तिरस्कार करते.”
तिने विस्मयाने तिच्या भुवया उंचावल्या. “खरेच? का?”
ती माझ्या उत्तराची वाट बघत असताना, माझ्या मनामध्ये असंख्य चेहरे आणि आवाजांनी गर्दी केली. मी सुजलेले डोळे आणि अश्रुंनी डागाळलेले गाल बघितले. मृत्यु यातनांनी जमिनीवर गळून पडणारे प्रिय लोक माझ्या हातांना धरण्याचा प्रयत्न करत असलेले मला जाणवले. मरणार्यांनी त्यांचा शेवटचा श्वास सोडल्यावर उभे ठाकणार्या प्रश्नांची मला आठवण झाली. अशांत समुद्राच्या लाटांच्या खळखळाटाप्रमाणे धक्का लागून दु:ख करणार्यांचे रडणे मला वारंवार ऐकू येत होते.
मी म्हणाले, “मरण कधीच चांगले नसते.” त्या आठवणींनी माझी पकड घेतली, आणि माझा आवाज खालावला. “दु:ख त्याच्या मागासलेपणाची साक्ष देते. आणि आम्ही देवाच्या निर्मिती व्यवस्थेला परत फिरवण्यास निर्देश देत रडत असतो. त्याने आम्हाला कुठल्यातरी वेगळ्या गोष्टीसाठी रचलेले आहे.”
मरण कधी चांगले असू शकते का?
पाश्चिमात्य देशांमध्ये मरणाबाबत सरकत्या दृष्टिकोनांच्या प्रकाशात “चांगले मरण” हे वाजवी किंवा अगदी नैसर्गिक वाटू शकते. 2021 मध्ये कॅनडा देशात, दहा हजार लोक वैद्यकिय साहाय्याने मरण पावले (MAiD – Medical Assistance in Dying). ह्यामध्ये डॉक्टर लोक प्राणघातक औषध देऊन सुलभ मरण प्रदान करतात किंवा त्याला वैद्य साहाय्यित आत्महत्या (औषधाच्या साह्याने दिलेले मरण – administering a lethal dose of medication) सुद्धा म्हणता येते. टोकाच्या आजाराऐवजी मानसिक आजार असणार्यांना असे मरण मरू देण्यास कॅनडाचा कायदा लवकरच परवानगी देऊ शकतो. दुसर्या शब्दांत, जे लोक अन्यथा स्वास्थ्यपूर्ण आहेत परंतु नैराश्यासारख्या मानसिक आजाराने त्रस्त आहेत, ते आपले स्वत:चे जीवन संपविण्याकरिता वैद्यकिय मदत घेऊ शकतात. युनायटेड स्टेट्स मध्ये स्वेच्छा मरणाची अधिकृतता राज्यामागून राज्यांमध्ये दर वर्षी वाढत जात आहे.
असले प्रवाह, मरण हे पतनाचा भयंकर परिणाम असण्याऐवजी यातनांपासून पळण्याचा वाजवी मार्ग आहे, अशा सतत प्रचलित होणार्या दृष्टिकोणाचे इशारे देतात. ह्या विचारसरणीनुसार मरण जर वेदनांपासून सुटका पुरवत असेल तर ते “चांगले” असू शकते. त्यात भर म्हणजे, ही चळवळ अशा संस्कृतीचे परावर्तन करते जी स्वयंनिर्णयाला सर्वोच्च उत्तम मानते; म्हणजे आम्ही देवाऐवजी स्वत:साठी जगतो असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रिय मित्रा, तुम्ही जेव्हा अशा कल्पनांना सामोरे जाता, तेव्हा लक्षात ठेवा की पवित्र शास्त्र मरणाला साजरा करण्याचा एक काळ नव्हे, तर शेवटचा शत्रू म्हणून संबोधते (1 करिंथ. 15:26). मरण हे आम्हा सर्वांनाच येते, आणि देव त्याद्वारे सुद्धा त्याच्यावर प्रीती करणार्यांकरिता सर्वकाही कल्याणकारक करू शकतो आणि करतो (रोम.8:28), परंतु मरण स्वत: दुसरे काही नसून आपल्या पापांचा भयंकर मोबदला आहे, आणि आम्हाला त्यापासून तारणाची नितांत आवश्यकता आहे अशा लबाड्यांना बळी पडू नका. (रोम. 6:23). लक्षात ठेवा की “सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो” (2 करिंथ.11:14).
पवित्र शास्त्र विपूलतेने स्पष्ट करते की आम्ही मरणासाठी कधीच नव्हतो. आणि आम्हाला विसर पडू नये म्हणून, सी. एस लुईस ह्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ पेन नुसार (The Problem of Pain) दुःखाचा अनुभव आपल्याला आठवण करून देण्यासाठी मेगाफोनप्रमाणे ओरडतो.
आता आम्ही कण्हतो
मी स्वत:हून निवडेन त्यापैक्षा अधिक वारंवार देवाने मला मरणाची वास्तविकता आणि दु:ख ह्यांना सामोरे आणलेले आहे. आघात चिकित्सक ह्या नात्याने मी अचानक आणि दीर्घकालीन, शांततेत आणि आघाती मृत्यू बघितलेले आहेत. ही हानी अनेकप्रकारे माझ्या स्मृतीवर मुद्रित झालेली आहे, ह्या शोकांतिका आणि दु:ख जणूकाही ज्वलंत लोखंडाने माझ्या मनावर शिक्कामोर्तब केले आहेत.
जेव्हा मी एका आईच्या तरुण मुलाला कार अपघातात झालेल्या इजांपासून वाचवू शकलो नाही तेव्हा त्या आईचे, “तुम्ही माझ्या बाळाला वाचवायला पाहिजे होते!” असे ओरडून म्हणणे मी विसरू शकत नाही. मला दुसरी एक आई आठवते, ती दवाखान्याच्या बिछान्यावर तिची मुलगी तिचा शेवटचा श्वास घेत असताना तिला जवळ धरण्यासाठी गेली तेव्हा तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, ते तिच्या हुंदक्यांमध्ये दबून जात होते. मला एक पत्नी आठवते जिने आपल्या मुठी घट्ट आवळून आकाशाकडे बघून मोठ्याने टाहो फोडला, एक बाप जो जमिनीवर पडून मोठ्याने ओरडला, अनेक कुटुंब जे आपल्या प्रिय लोकांचे हात धरून नमत्या आणि दबक्या आवाजात रडत होते आणि मॉनिटरवरील जीवनरेखा घटत गेली. त्यानंतर, ते खोलीमधून असे बाहेर पडतात जणूकाही ते स्वप्नात अडखळत चालत आहेत, त्यांचे डोळे लाल झालेले असतात, त्यांची मने कुठेतरी दूर अविश्वासात गेलेली असतात.
मरण पावणार्यांच्या बिछान्याजवळ घालवलेल्या त्या सर्व क्षणांमध्ये मला एकही जगणारा व्यक्ती असा आठवत नाही ज्याच्यावर दु:खाने मात केली नसेल. अगदी ज्यांचे मरण अपेक्षित असते ते दीर्घ टोकाच्या आजाराचे विध्वंस सहन केलेले वृद्ध लोक, त्यांचेही जाणे व्रण सोडून जाते. अशी कुटुंब ज्यांनी आपल्या प्रिय लोकांच्या ओढवलेल्या मरणाला स्वीकृती घोषित केली ते नंतर संघर्ष करतात, त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या अचानक अनुपस्थितीमुळे ते स्पष्ट बघू शकत नाहीत. त्यांच्या हृदयाचा भाग जणूकाही अचानक काढून घेतल्यासारखे ते होते.
मरण मागे काय सोडते
मरणाच्या काही आठवड्यांनंतर, प्रिय लोक येऊन माझ्याकडे ह्याचे आश्चर्य व्यक्त करतात की दु:खाचा त्यांच्यावर किती परिणाम झालेला आहे आणि दु:ख किती खोलवर गेलेले आहे. प्रिय व्यक्तींच्या सवयी, तिचे इमोजींकरिता असणारे प्रेम, त्याची सकाळी बरोबर आठ वाजता फोन करण्याची सवय, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या दिवसावर जणू आक्रमण करतात आणि त्यांच्या जखमा नव्याने उघडतात. ते श्वास घेण्यास सुद्धा संघर्ष करतात.
मरण हे सर्व करते. अगदी अतिशय कनवाळू परिस्थितीमध्ये, म्हणजे जेथे व्यक्तीच्या मरण्याबाबत आपण तयार असतो, मरण यातना सोडून जाते. जरी मरण शांततेने झाले, तरी मागे राहणार्यांची हृदये दु:खाने दाटून येतात.
दु:खाची वास्तविकता, स्वर्गाच्या ह्या बाजूला आम्ही एखाद्याला निरोप दिल्यानंतर होणार्या आंतरिक यातना, याचा इशारा देतात की आम्ही वेगळ्या जगासाठी, निराळ्या भवितव्यासाठी बनविलेले होतो. आम्ही मरणासाठीही नव्हे आणि दु:खासाठी सुद्धा नव्हे तर देवासाठी घडविलेले आहोत, तो निर्माणकर्ता देव ज्याने आम्हाला त्याच्या सार्वकालिक स्वरूपात बनविले जेणेकरून आम्ही त्याच्या चैतन्यमयी निर्मितिचे कारभारी व्हावे, फलदृप व्हावे, आणि बहुगुणित व्हावे (उत्पत्ती 1:22, 27). त्याच्याशिवाय, संपूर्ण निर्मिती कन्हते (रोम.8:22). त्याच्याशिवाय, आमच्या पापाने आम्हाला ज्या भग्नतेमध्ये बुडवलेले आहे त्याकडे बघून आमचा आत्मा दचकतो आणि सुटकेसाठी ओरड करतो.
दु:खाचा मनुष्य
कृपेद्वारे, देवाने अशी सुटका पुरविलेली आहे ज्या करिता आमचा आत्मा तहानलेला आहे. (स्तोत्र 42:1-2). त्याने आमचे तारण आश्चर्यकारकरीत्या, भव्यरीत्या, आणि लक्षणीयरीत्या, “क्लेशांनी व्यापलेल्या आणि व्याधींशी परिचित असलेल्या पुरुषाद्वारे” पूर्ण केले (यशया 53:3).
आम्हाला भयंकररीत्या छळणार्या दु:खाचे ओझे आमचा तारणारा जाणतो. गेथशेमाने बागेमध्ये आमच्याऐवजी देवाचा चुराडा करणारा क्रोध सोसण्याची वाट बघत असताना, येशू “मरणप्राय, आणि अति खिन्न झाला” (मत्तय 26:38), आणि “मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता” (लूक 22:44). आम्ही जेव्हा रडून विलाप करतो, आणि आमची हृदये भग्न होतात, आमची आशा आमच्या तारणार्याच्या कार्यातून उफाळून येते, तो तारणारा वेदना व अश्रुंकरिता सहानुभुती देतो (इब्री 4:15). त्याने आमच्याकरिता आपल्या जिवाचे स्वेच्छेने बलिदान दिले, जेणेकरून मरणाच्या अतीव दु:खाच्या बंधनातून आम्हाला सोडवावे (योहान 10:18).
आम्ही रडतो आणि दु:ख करतो कारण जग हे पतित आहे, “तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले” (इफिस. 2:4-5). ह्या जगातल्या यातना, आणि आमची पाप व मरणाला असलेली गुलामी, ह्यासाठीच येशू आला. वधस्तंभाद्वारे त्याने जगाला जिंकले आहे (योहान 16:33). जो मोबदला आम्ही एकदा अपेक्षिला ते मरण त्याच्या पुनरुत्थानाद्वारे, “विजयात गिळले गेले आहे” (1 करिंथ. 15:54). आम्ही “जिवंत आशेकरिता नव्याने जन्मलेले आहोत” (1 पेत्र 1:3).
आता रडू नका
मरणाची भयंकरता आणि दु:ख आम्ही एदेनेतून, दु:खहीन जगापासून बाहेर घालवलेले आहोत ह्याकडे निर्देश करते. ख्रिस्ताद्वारे ज्या जगाची आम्ही इच्छा करतो, म्हणजे शोकांतिका आणि पीडा मुक्त जग, असे जग जेथे मरण कोणाचीच कांती बिघडवू शकत नाही आणि अश्रु कोणाचेच गाल ओले करत नाही, ते जग काही आदर्श किंवा पोरकट दिवास्वप्न नव्हे, तर एक अभिवचन, एक शास्वती आहे, “अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन” आहे (1 पेत्र 1:4).
ख्रिस्ताशिवाय, आमची “जखम असाध्य आहे,” आणि आमचा “घाय भारी आहे” (यिर्मया 30:12). आणि तरीही ख्रिस्ताच्या जखमांद्वारे, त्याने आमच्याऐवजी “मृत्यूछायेच्या दरीतून चालत असताना” (स्तोत्र 23:4) प्राप्त केलेल्या जखमांनी आम्ही निरोगी झालो आहोत (1 पेत्र 2:24). जरी आता आम्ही कन्हतो, तरी ख्रिस्त सर्व गोष्टी नव्या करतो (प्रकटी. 21:5). जेव्हा आम्ही ज्या जगासाठी निर्मिले गेलो त्या जगात त्याच्याशी एक होऊ, त्या नवीन आकाश व नवीन पृथ्वी मध्ये, तो आमच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रु पुसून टाकील. मरण म्हणजे ती निराशाजनक हृदयाला संतापजनक सावली, तिचे अस्तित्वच राहणार नाही. यातना आणि दु:ख सुकलेल्या गवताप्रमाणे नाश पावेल.
आणि आम्ही “परमेश्वराच्या घरात चिरकाल राहू” (स्तोत्र 23:6).
लेख
कॅथरीन बटलर
__________________________________________________________________________________________________