आपण पापासाठी तरतूद कशी करतो

पापाबरोबर आमच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यासाठी, रोमकरांस पत्रात प्रेषित पौल ख्रिस्ती लोकांना एक सोपा पण गहन उपदेश देतो: …. देहाच्या वासनांचा उपभोग घेण्यासाठी तरतूद करू नका. (रोम. १३:१४)

हा उपदेश सूचित करतो की, आपण केवळ पाप करूनच पापपूर्ण देहाच्या वासनांचा उपभोग घेत नाही, तर आपण अशा भोग-विलासासाठी प्रत्यक्षात जागा सुद्धा तयार करू शकतो. ह्याचा अर्थ काय आहे आणि हे कार्य कसे करते?

देहाच्या वासना

सर्वप्रथम ही वस्तुस्थिती समजून घ्या की देह पापाची वासना करतो. गलती. ५:१७ मध्ये, पौल आवर्जून सांगतो की, देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत; अक्षरशः, “देह आत्म्याविरुद्ध वासना करतो.”  देहाच्या एका वासनेला तृप्त करणे म्हणजे, त्या अवस्थेत जाण्यासाठी, जिथे-कुठे वासना तुम्हाला घेऊन जाऊ इच्छिते त्यात तिला साध्य करणे, तिचा उपभोग घेणे आणि तिला तृप्त करणे होय. अशा भोग-विलासाला “देहाची कर्मे” असे म्हणतात, ज्यांची पौल गलती. ५:१९-२१ मध्ये सूची मांडतो:

आता देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही : जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

पौल रोम. १३ मध्ये, त्यांना “अंधकाराची कर्मे” म्हणतो आणि अशाच उदाहरणांची सूची मांडतो:

रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. (रोम १३:१२-१३)

ह्या दोनही सूचींमध्ये, आपण आपल्या लैंगिक जीवनाशी संबंधित पापे (जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा), आपले अन्न, पेय आणि मादक पेय (मद्यपान) यांच्या इच्छेशी संबंधित पापे, तसेच आपल्या सामाजिक जीवनाशी संबंधित (वैर, कलह, तट, मत्सर, भांडण, राग, फुटी) पापे पाहतो. आपल्या जीवनातील ह्या पापांशी आपण सर्व जण परिचित आहोत. परंतु ह्यांच्यासाठी “तरतुद करणे” म्हणजे नेमके काय?

आम्ही तरतूद कशी करतो

“देहाच्या वासनांचा उपभोग घेण्यासाठी तरतूद करणे” याचा अर्थ असा होतो की, आपण शक्यता स्वतःला ‘मोहात पडण्याच्या’ मार्गावर घेऊन जाऊ शकतो. आपण पापी वासनांना जागृत करण्यासाठी, त्यांचा पाठलाग करण्यासाठी आणि त्यांना तृप्त करण्यासाठी प्रसंग उभारू शकतो आणि जागा तयार करू शकतो. मुळात, आपण प्रभूच्या प्रार्थनेला विपरीत स्वरूपात बदलून ती अशा प्रकारे करू शकतो, “मला परीक्षेत आण, यासाठी की मी स्वतःला वाईटाच्या स्वाधीन करू शकेन.”

व्यावहारिक स्तरावर पहायचे ठरले तर, आम्ही परीक्षेच्या वातावरणात राहण्यासाठी गुप्तपणे योजना बनवू शकतो, हे ओळखून (किंवा किमान ह्या आशेने) की परीक्षा येतील आणि आमच्या वासना जागृत होतील, की जेणेकरून आम्ही त्यांना तृप्त करू शकू. तथापि, याबाबत गुप्तपणा ह्या गुणविशेषावर जोर देणे महत्वाचे आहे. जेव्हा आपण देहाच्या वासनांसाठी तरतूद करतो, तेव्हा आपली मने अशा प्रकारे कार्य करतात की आपण आपल्या वागणूकीला तर्कबुद्धीने पटवून सांगून योग्य ठरवतो आणि योग्य त्या सबबी देतो, अगदी स्वतःविषयी सुद्धा. आम्ही देहाच्या वासनांना पूर्ण करण्यासाठी आमची मने ओतून टाकतो आणि मग त्यानुसार आपल्या कुवर्तनाचे समर्थन करण्यासाठी आपल्या मनांचा उपयोगही करतो. देहाची तरतूद करणे, त्याच्या वासनांना तृप्त करणे, ह्याचा अर्थ हाच आहे.

विशेषकरून, आपले तंत्रज्ञान देहवासनेची तरतूद करण्यासाठी आपल्याला कसे सक्षम करते, याचा विचार करा. आम्ही असे ॲप्स वापरणे किंवा संकेतस्थळांना भेट देणे निवडू शकतो, ज्यांविषयी आम्हाला माहित आहे तिथे लैंगिकदृष्ट्या स्पष्ट चित्रणे (जाहिराती किंवा पोस्टद्वारे) पहायला मिळतील. आम्ही उघडपणे अशा चित्रणांचा शोध घेत नसतो. परंतु ते आम्हाला दिसावेत म्हणून तशी जागा आपण तयार करत असतो. त्यांच्याविषयी आमच्या वासनांना जागृत करण्यासाठी तरतूद करत असतो. आपले शरीर आपल्याला पापी उत्सुकतेमुळे तिथे घेऊन जाते, आणि मग नंतर जे घडते त्याविषयी आपले मन सबब देण्याचा प्रयत्न करते: “मी तर फक्त सोशल मीडिया पाहात होतो.”

वासना, ईर्ष्या, मत्सर आणि राग

लैंगिक अनैतिकतेचे हे प्रलोभन ह्या दशेत जरी सहज असले, तरी हीच दशा इतर आकांक्षा आणि वासना यांच्याद्वारे कार्यरत असते. आपण किती वेळा अशा संकेतस्थळांना भेट देउन आणि अशा ॲप्सचा वापर करून देहाच्या वासनांसाठी तरतूद करतो जे नियमितपणे आपला मत्सर आणि ईर्ष्या जागृत करतात? आपल्याला हव्या असलेल्या विलासितेच्या आयुष्याचे चित्रण दाखवणाऱ्या संकेतस्थळांचा वारंवार वापर करून आपण लोभासाठी जागा तयार करतो. “तिचे घर /परिवार/कपडे पहा!” “त्याला मिळालेल्या संध्या/यश/आशीर्वाद पहा!”

परंतु मत्सर जरी नसला, तरी कदाचित राग आणि कलह असू शकतो. आपल्याला माहित असते की तो लेख वाचल्याने, किंवा ती बातमी पाहिल्याने किंवा तो पॉडकास्ट ऐकल्याने निराशा, चिंता, किंवा भीती किंवा राग जागृत होईल. आणि तरीही आपण स्वतःला जागृत ठेवून त्या पापांसाठी तरतूद करतो. आपण अश्या प्रकारच्या माहितीच्या आहारी जाऊन आपल्या मनात त्याच्यावर मनन करून द्वेष आणि कटूता उत्पन्न करण्यासाठी तरतूद करतो (ज्या प्रकारे आपण एका वासनेला कुरवाळतो). आणि मग आपण असे स्पष्टीकरण देऊन ते योग्यही ठरवतो आणि तर्कबुद्धीने पटवून देतो, की “मी फक्त बातम्यांकडे लक्ष देतो. ह्या जगातील चालू-घडामोडींविषयी माहिती ठेवणे हे महत्त्वाचे असते.”

अशा प्रकारच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये, आपण देह वासनेसाठी प्रसंग उभारत आहोत, जागा तयार करत आहोत आणि तरतूद करत आहोत की जेणेकरून त्याद्वारे आपण मोहात आणि पापात पडावे.

जागे व्हा आणि शिष्टाचाराने चाला

सुदैवाने, पौल आपण कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत फक्त हेच सांगत नाही. तर काय करावे हे ही सांगतो.

पहिले म्हणजे, आपण जागे होतो.

समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे…. (रोम. १३:११-१२)

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यांस, आपल्याला पापाकडे नेण्यासाठी आपली मने आणि आपले देह एकत्रितपणे कशी कार्य करतात याविषयी आपल्याला कळून येते. देहासाठी तरतूद करणे हे आपल्याला संवेदनाशून्य आणि मृतप्राय बनवते. आध्यात्मिकरित्या बघितले तर, आपण निद्रिस्त होतो. या अवस्थेत आपण आपल्या सदसदविवेकबुद्धीच्या आणि पवित्र आत्म्याच्या आवाजाला डावलून, आपण कुवासना, तल्लफ, सबबी आणि तार्किकता यांच्या आंधळेपणात आपल्या वासनांचा पाठलाग करतो. म्हणून आपण जागे झाले पाहिजे.

दुसरे म्हणजे, आम्ही वस्त्र बदलतो.

“म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.” (रोम. १३:१२). पुढे पौल आपल्याला “प्रभू येशू ख्रिस्ताला धारण” करण्यास बजावून सांगतो (रोम १३:१४). देहासाठी जागा निर्माण करण्यासाठी आणि नंतर आपल्या इच्छांना योग्य ठरवण्यासाठी आपल्या मनाचा वापर करण्याऐवजी, आपण आपल्या मनाचा वापर स्वतःला पापासाठी मृत आणि ख्रिस्तामध्ये देवाप्रीत्यर्थ जिवंत असे मानण्यासाठी करावा (रोम. ६:११). आपण कोण आहोत याचा विचार आपण ख्रिस्ताच्या कार्याच्या प्रकाशझोतात करतो. जेथे ख्रिस्त आहे, तिथल्या वरील गोष्टींवर आपले मन लावण्याचा हा एक कर्तव्यतत्पर मानसिक प्रयत्न आहे (कलस्सै ३:१-४).

“केवळ पापाला आणि मोहाला टाळणे पुरेसे नाही; तर आपल्या पापाचा नाश करण्यासाठी आपण सक्रियपणे प्रयत्न केले पाहिजेत.”

आणखी हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की वस्त्रे बदलण्याच्या या प्रक्रियेमध्ये काढणे (जुने) आणि घालणे (नवे) या दोन्ही क्रियांचा समावेश असतो. “अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत” ह्यात आपल्यामध्ये जे पृथ्वीवरील अवयव आहे त्यांना जीवे मारणे समाविष्ट असते (कलस्सै ३:५). ह्याचा अर्थ असा होतो की, केवळ पापाला आणि मोहाला टाळणे पुरेसे नाही; तर आपल्या पापाचा नाश करण्यासाठी आपण सक्रियपणे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे, पापी जिज्ञासेला हेतुपुरस्सर मारण्याचा प्रयत्न न करता आपण मुळात तिला आपल्या अंतःकरणात वस्ती न करू देण्यासाठी प्रतिकार करतो. आपण केवळ बचाव करत नाही; तर आक्रमण देखील करतो.

शेवटी, आपण शिष्टाचाराने चालू लागतो. “दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.” (रोम. १३:१३). आपण जागृत आणि सावध आहोत; आपण ख्रिस्ताच्या नितीमत्तेला योग्य रीतीने परिधान केले आहे. आणि आता आपण त्याच्याशी असलेल्या आमच्या संबंधाला साजेल अशा पद्धतीने चालतो.

जे आपण लपवू शकत नाही

साजेल असे शिष्टाचाराने चालणे म्हणजेच हा मुख्य मुद्दा समजून घेणे की, आता दिवस आहे. मृत्यू आणि पापातून मुक्त करून जीवनात आणि नीतिमत्त्वाकडे आणल्यानंतर, आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे आणले गेले आहे. सांगण्याचा अर्थ हा, की आपण उघडपणे दिसतो.

“देहासाठी तरतूद करत असतांना, लबाड गोष्टीं ज्यांवर आपल्याला विश्वास ठेवण्याचा मोह होतो त्यापैकी एक ही की, आपण दृष्टीआड होऊ शकतो.”

देहासाठी तरतूद करत असतांना, लबाड गोष्टीं ज्यांवर आपल्याला विश्वास ठेवण्याचा मोह होतो त्यांपैकी एक ही की, आपण लपू शकतो. आणि जरी इतर लोकांपासून लपणे शक्य असले तरी आपण देवापासून लपू शकत नाही. आम्ही आपल्या सबबी आणि चातुर्य यांद्वारे त्याला कधीही फसवू शकत नाही. आपण आपल्या पापी भूकेला तृप्त करण्यासाठी जागा तयार करतो त्यावेळी तो आपल्याला पाहतो. त्याच्या सर्वज्ञतेसमोर आपली तार्किकता निरर्थक आहे. आपण त्या लहान मुलासारखे आहोत जे रात्री कुठलाही आवाज न करता कपाटातून बिस्किटे चोरण्यासाठी स्वयंपाकघरात जाते, ज्यावेळेस त्याची आई बैठक खोलीतून हे सर्व पाहात असते. ज्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट आहे त्याच्या तेजोमय नजरेसमोर गुपचूपपणाचे आपले हे सर्व प्रयत्न मूर्खपणाचे आहेत. जसे इब्री लोकांस पत्रात म्हटल्याप्रमाणे, “आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्याजवळ आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.” (इब्री ४:१३).

यास्तव, पौलाचे आवाहन सरळ आहे (जरी आज्ञाधारकता कठीण वाटत असली). जागे व्हा. आपले वस्त्र बदला. प्रभु येशू आणि त्याची शस्त्रसामग्री धारण करा. आणि त्यास शोभेल असे चाला. देहाची वासना पूर्ण करण्यासाठी कोणतीही तरतूद करू नका.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *