ख्रिस्ताचे प्रभुत्व आणि सरकारच्या मर्यादा!

येशू ख्रिस्त, जो ह्या विश्वाचा अद्वितीय उत्पन्नकर्ता, पालनकर्ता आणि शासक आहे, तो ख्रिस्ती धर्माचे शिक्षण, संरक्षण किंवा प्रसार जसेच्या तसे करण्यासाठी एखाद्या नागरी किंवा धर्मनिरपेक्ष सरकारच्या शक्तींवर अवलंबून न राहता ह्या जगात आपले तारणाचे उद्दिष्ट सिद्धीस नेण्याचा संकल्प करतो हे दाखविणे ह्या लेखाचा प्रमुख मुद्दा आहे. ख्रिस्ताच्या अनुयायांनी ख्रिस्ती वक्ता म्हणून कुठलाही विचार किंवा धर्माचार ह्यांच्या अंमलबजावणीसाठी शासकीय शक्तीचाउपयोग ख्रिस्ती धर्माचा भाग म्हणून करू नये.

माझ्या मते,“ख्रिस्ती वक्ता” आणि “ख्रिस्ती धर्म  ह्या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. आपले राज्य किंवा राष्ट्र काही विचारधारा किंवा धर्माचारांचा प्रसार करू शकते, ज्याचे ख्रिस्ती लोग समर्थक असू शकतांत आणि त्यांच्या समर्थनाचे काही ख्रिस्ती धर्मानुकूल स्पष्ट कारणेही असू शकतांत (आणि जे इतर धर्मीयांच्या दृष्टीने वेगळ्या कारणांसाठी मान्य असू शकतात). पण अशा प्रकारे राष्ट्राची ख्रिस्ती धर्माचा प्रचारक किंवा वक्ता म्हणून भूमिका घेणे हे वेगळे आहे. नवा करार ह्याच गोष्टीला विरोध करतो.

देशाचे सरकार ख्रिस्ती विश्वासाचा (आणि इतर विश्वासांचा) सुलभ प्रसार व्हावा (उदा. भाषण स्वातंत्र्य आणि सभा स्वातंत्र्य संरक्षण) असे कायदे योग्यरित्या करू शकते. नवीन करार ह्याचा विरोध करत नाही. तर नवीन करार हा, ख्रिस्ती अनुयायांनी सरकारकडून ख्रिस्ती धर्माचा वक्ता म्हणून ख्रिस्ती सिद्धांत किंवा धर्माचार यांचे शिक्षण देण्याचा कायदा करावा, त्यांचे संरक्षण आणि प्रसार करावा अशी अपेक्षा बाळगणे, ह्या मानसिकतेचा विरोध करतो. ख्रिस्ती हा एक धर्म आहे आणि त्याच्या शिकवणींचा उपयोग तलवारीसारखा केला जाऊ नये.

मंडळीवर नाही तर ख्रिस्ती धर्मावर केंद्रित

हा लेख मुख्यतः मंडळी आणि देश ह्यांच्या परस्पर संबंधांबद्दल नाही. येथे माझी तळमळ कोणत्याही विशिष्ट संस्थेची अभिव्यक्तीची नसून ती ख्रिस्ती धर्माचे वास्तविक स्वरूप आहे. मी हे काही अंशी सांगतो कारण मला माहीत आहे की एखाद्या ख्रिस्ती संप्रदायाची राष्ट्रीय मंडळी म्हणून स्थापना करण्याच्या कुठल्याही संकल्पनेला नाकारण्यासाठी काही लोक माझ्याशी सहमत होतील, परंतु असे असतानाही ते राष्ट्रासाठी ख्रिस्ती धर्माच्या अंमलबजावणीचे समर्थन करतात, जसे की अमेरिकेच्या संविधानात प्रेषितांच्या मतांगीकाराचा समावेश केला जावा. ख्रिस्ती मूलतत्वांचा नागरी कायद्यात रूपांतर करणे म्हणजे ती तलवारीच्या जोरावर अंमलात आणण्यासारखे आहे. हे नवीन कराराच्या शिकवणीच्याविरुद्ध आहे. हे ख्रिस्ताच्या प्रभुत्वाचा अवमान करणे आहे. हे मी मांडणार आहे.

मी हे दाखवणार आहे की ख्रिस्ताच्या प्रभुत्वावर असलेली आपली सर्वोच्च निष्ठाच आहे जी आम्हाला बाध्य करते की, आम्ही ख्रिस्ताला प्रभू म्हणून कबूल न करणाऱ्या व्यक्तींना शिक्षेची धमकी देण्यास किंवा त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यास, नागरी सरकार ह्या देवाने दिलेल्या शक्तीचा उपयोग करत नाही.  नवीन करारात मंडळीसाठी किंवा राष्ट्रासाठी, जे अन्यथा गुन्हेगारीत मोडत नाहीत अशा गैर-ख्रिस्ती विश्वासांविरुद्ध किंवा त्यांच्या धार्मिक विश्वासांच्या उघड चालीरीतींच्या विरोधात सत्ताबळ वापरण्याचा परवाना सापडत नाही.

ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेसाठी राष्ट्राच्या शक्तींवर अवलंबून न राहण्याचा हा मानस तथाकथित धर्मनिरपेक्ष तटस्थतेच्या (जी खरे पाहता अस्तित्वात नाही) तत्वाचा भाग नाही. तर तो देवाच्या वचनाच्या आज्ञाधारकतेत राहणे आणि ख्रिस्ताला उंचविणाऱ्या सोहळा करणे या उद्देशांत मुळावलेली आहे, ज्यानुसार तो आपण (देवाने) ख्रिस्ताच्या द्वितीय आगमना पर्यंत जगावर ऐहिक शस्त्राविना राज्य करावे असा संकल्प करतो.

सरकार काय करते

हा लेख मुख्यत्वे करून ख्रिस्ती लोकांनी सरकारकडून काय अपेक्षा ठेवू नये  ह्याबद्दल आहे. हा लेख सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी  ह्याबद्दल नाही. तो एक वेगळा लेख आहे (ज्याविषयी अनेकांनी आधीच लिहिले आहे). पण जर मला त्या विषयावर एक लेख लिहावा लागला, तर त्याची सुरुवात १ तीम. २:१-२ मधील ह्या वचनांनी होईल:

तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी; राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.

येथे जो नीतीनियम आहे तो म्हणजे असा की, सरकार आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर शांतता आणि न्याय पूरक समाज प्रदान करण्यासाठी करते, जेथे ख्रिस्ती (आणि इतर धर्मीय लोक) कुठल्याही दैहिक विरोधाशिवाय त्यांचा विश्वास अभिव्यक्त करू शकतात. हे वचन असे सांगत नाही की, इतर धर्मांचे सरकारी शक्तीद्वारे कायदेशीरित्या दमन केले जावे. ही नीती शांतता आणि स्थैर्य आणि न्याय आहे, हे नाही की एखाद्या धर्माचे दुसऱ्यापेक्षा अधिक समर्थन किंवा विरोध करावा.

शासकीय पदांवर असलेले ख्रिस्ती लोक

ख्रिस्ती लोक शासकीय नागरी सेवेत वेगवेगळ्या पदांवर काम करू शकतात आणि त्या पंदावर आपली भूमिका पार पडत असतांना ते त्यांच्या स्वतःचा ख्रिस्ती विश्वास आणि शास्त्र आधारित विवेकबुद्धी यांचे मार्गदर्शन घेत एका समाजाच्या कल्याणासाठी सेवा बजाऊ शकतात. हा लेख एकाद्या शासकीय पदावर राहून ख्रिस्ताची सेवा करणाऱ्या ख्रिस्ती लोकांच्या विरोधात नाही; तर ख्रिस्ताच्या अध्यात्मिक राज्याच्या प्रसाराच्या सुस्पष्ट उद्दिष्टासाठी सरकार तलवारीचा उपयोग करू शकते हे गृहीत धरण्याच्या विरोधात आहे.

ख्रिस्ती लोकांनी उघडपणे निश्चित प्रतिपादन केले पाहिजे की ख्रिस्त हा सर्वांचा प्रभू आहे, आणि त्यांचा ख्रिस्ती विश्वास हा त्यांच्या राजकीय विचारसरणीचे प्रकटीकरण देतो. ख्रिस्ती मतांगीकारानुसार तर्कसंगत बुध्दीला पटेल त्याप्रमाणे ते कोणत्या विशिष्ट कायद्यांचे समर्थक आहेत किंवा विरोधक आहेत हे ते आनंदाने जाहीरपणे सांगू शकतात. परंतु याचा अर्थ असा नाही की, ख्रिस्ती धर्माच्या समर्थनार्थ एखादा सरकारी कायदा हा प्रत्यक्ष ख्रिस्ती कायदा म्हणून पारित केला गेला जावा. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यांस, समाजासाठी न्याय्य सामाजिक व्यवस्थेच्या संकल्पनेला आकार देण्यासाठी ख्रिस्ती सैद्धांतिक नीतीचा प्रभावीपणे उपयोग करणे आणि ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती धर्माखातर धोरणे किंवा कायदे प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्र शक्तीचा उपयोग करून घेणे, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

उदाहरणार्थ, ख्रिस्ती लोक पवित्र शास्त्राच्या आधारावर गर्भपात करणाऱ्या कायद्यांचा योग्य रीतीने विरोध करतात. आणि ते ख्रिस्ती विश्वासामुळे गर्भातल्या बाळांच्या जीवनांचे रक्षण करणाऱ्या कायद्यांचा योग्य रीतीने पाठपुरावा करतात. तसेच, ज्याअर्थी अनैतिकता आणि बेकायदेशीपणा एक-समान नाही, ते पु-मैथून प्रथा, बाल अश्लीलता, किंवा अंगविच्छेदन किंवा पुरुष आणि स्त्री लैंगिक अवयव प्रत्यारोपण ह्या विकृत प्रथांचा बेकायदेशीरपणा अनैतिकतेशी कुठल्या स्तरापर्यंत आहे, जर तस काही असेल, तर त्याला कोणत्या प्रमाणात बेकायदेशीर ठरवले जावे, यावर उपाय म्हणून योग्य तो प्रस्ताव सुद्धा देवू शकतात. ख्रिस्ती ह्या नात्याने बायबलसंबंधी सत्य सार्वजनिकपणे घोषित करणे हेच येशूच्या शिष्यांचे कर्तव्य आहे. आपण देवाचे श्रेष्ठत्व आणि त्याच्या मार्गांची घोषणा करतो. सत्य आणि नीतिमत्तेच्या अशा प्रकारच्या समर्थनाचा नवीन करार विरोध करत नाही. तर राष्ट्राच्या कायद्यांचा ख्रिस्ती धर्माचा भाग म्हणून पुरस्कार देण्यासाठी किंवा शिक्षा देण्यासाठी वापर केल्या जाण्याचा विरोध करतो.  

ख्रिस्ताच्या प्रभुत्वावर निष्ठेचे प्रकटीकरण म्हणून ख्रिस्ती लोक उच्च पदापासून ते खालच्या पदापर्यंत राजकीय प्रक्रियेत सामील राहू शकतात, कारण ते “सर्वांचे बरे” करू पाहतात (गल. ६:१० ; १ थेस्स. ५:१५) ह्या आशेने की काही लोकांनी “[त्यांची] चांगली सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे” ( पेत्र २:१२). परंतु ख्रिस्ती विश्वासाचे एक फळ म्हणून सरकारी सेवा करणे हे नागरी सरकारच्या अधिकारांच्या उपयोगाने ख्रिस्ती विश्वासाचे समर्थन करण्यासारखे नाही.    

आता आपण वरील धाडसी प्रयत्नांचे समर्थन करणाऱ्या स्पष्टीकरणात्मक विचारांकडे वळू. ख्रिस्ती धर्माला किंवा कोणत्याही धर्माला पाठिंबा देण्यासाठी सरकाररुपी तलवारीचा वापर न करता ह्या जगात त्याच्या तारणाच्या उद्दिष्टांना साध्य करून घेणे हा ख्रिस्ताचा संकल्प आहे हे स्पष्ट करणाऱ्या आठ मुद्द्यांवर मी लक्ष केंद्रित करेन.

१.   ख्रिस्ताचे राज्य ह्या जगाचे नाही.

तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसर्‍यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले?” पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले; तू काय केलेस?” येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” (योहा. १८:३३-३८)

येशू वचन ३६ मधील शब्द (“माझे राज्य ह्या जगाचे नाही”) पिलातास हे स्पष्ट करण्यासाठी बोलतो की तो ज्या राज्याला (मत्त. ३:२ ; ४:१७ ; ६:१०) ह्या जगात खरोखर आणू इच्छितो ते राज्य पिलात जशी त्याच्या मनात कल्पना करीत होता तशा राज्यासारखे नाही. तो पिलाताला आपल्या बादशाही राज्याचा फरक समजेल अशा रीतीने सांगतो. आणि हा फरक तो हे सांगून स्पष्ट करतो की, त्याचे राज्य, “ह्या जगाचे” नाही (व.३६). हेच शब्द तंतोतंत योहान त्याच्या शुभवर्तमानात तेरा वेळा आणि त्याच्या पत्रांमध्ये दोनदा वापरतो.

योहानासाठी “ह्या [जगाचे किंवा जगामधील]” चा अर्थ दुहेरी आहे. एकीकडे, ते कुठून येईल या कडे संकेत आहे. येशूचे राज्य जगामधून उद्भवत नाही.  याला स्पष्ट करण्यासाठी तो एंटयूथेन (enteuthen) ह्या ग्रीक शब्दाचा उपयोग करतो—त्याचे राज्य “ह्या जगाचे” नाही (व.३६). परंतु अश्या निरीक्षणाचा अर्थ हा निरर्थक होईल जर ह्याचा दुसरा अर्थ नसता  —म्हणजे, की त्याचे राज्य ह्या जगाच्या स्वरूपासारखे  नाही. ख्रिस्ताचे हे राज्य एक असे राज्य आहे  जे —जगाच्या इतर राज्यांसारखे नाही.

आपण हा अर्थ योहान १५:१९ मध्ये पाहू शकतो. येशू शिष्यांना म्हणतो, “तुम्ही जगाचे असता  तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते.” त्याचप्रमाणे, १ योहा. ४:५-६ मध्ये, योहान खोट्या शिक्षकांबद्दल सांगतांना म्हणतो, “ते तर जगाचे आहेत  म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते, आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहोत; जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो; जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही.” ह्या वचनांवरून कोणीही पाहू शकतो की, “जगाचे” असणे म्हणजे जगासारखे असणे —जगाला समजेल आणि मान्य होईल अशा प्रकारे वागणे होय.

मग येशू त्याचे राज्य ह्या जगाच्या राज्यांसारखे कसे नाही ह्याविषयी एक विशिष्ट उदाहरण देतो: “माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती” (व.३६). म्हणून हेनरी अल्फोर्ड स्पष्ट करतात की, ख्रिस्ताचे राज्य “ह्या जगापासून निघालेले, ह्या जगातून उदयास आलेले नाही; —आणि म्हणून ह्या जगाच्या अस्त्र-शास्त्रांद्वारे त्याचे समर्थन केले जावू नये.  अशाच प्रकारे, कॉलिन क्रुस देखील स्पष्ट करतात, “त्याचे राज्य ह्या जगात कार्यरत आहे, आणि ते एक दिवस सामर्थ्यात येईल, परंतु त्याचे सामर्थ्य ह्या जगाचे नाही; तर ते देवाचे आहे.”

“ख्रिस्त आपल्या शत्रूंवर तलवारीने नव्हे, तर सुवार्तेने विजय मिळवतो.”

जेव्हा ख्रिस्त म्हणतो की, जर माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी मारला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, तेव्हा तो दाखवून देतो की त्याचे राज्य तलवारीच्या जोरावर नाही, तर जे रक्त तो ओतणार होता त्याच्या सामर्थ्याने येत आहे. तो त्याच्या शत्रूंवर तलवारीने नव्हे, तर सुवार्तेने विजय मिळवतो. “त्याला [दोष लावणाऱ्याला] त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.” (प्रकटी. १२:११).

ह्यावरून, मी असे म्हणतो की, योहान १८:३६ मधील येशूची ही वचने त्याच्या सर्व शिष्यांसाठी सावधगिरीचा एक इशारा आहेत की त्यांनी ख्रिस्ताच्या तारणदायी राज्याच्या प्रसारासाठी देशाचे सरकार ह्या तलवारीचा ख्रिस्ती प्रतिनिधी वा साधन म्हणून उपयोग करण्याच्या मोहाचा प्रतिकार केला पाहिजे.

२. ख्रिस्ताचे राज्य हे अदृश्य आणि आध्यात्मिक स्वरूपाचे आहे.

त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. (कलस्सै. १:१३-१४)

पौलाच्या पत्रांत,राज्य  ह्या शब्दाचा प्राथमिक वापर भविष्यातील “देवाचे राज्य” ह्या संदर्भात केला गेलेला आहे (१ करिं. ६:९ , १० ; १५:५० ; गल. ५:२१ ; इफि. ५:५ ; २ थेस्स. १:५). परंतु कलस्सै. १:१३ मध्ये, पौल स्पष्ट करतो की यापूर्वी की त्या राज्याची अंतिम परिपूर्ती व्हावी (ज्याला तो “ख्रिस्ताचे आणि देवाचे राज्य” म्हणू शकेल, इफि. ५:५), वर्तमान  स्थितीत एक राज्य अस्तिवात आहे. हे राज्य ख्रिस्त शासित राज्य आहे ज्यामध्ये एक व्यक्ती देवाद्वारे “अंधाराच्या सत्तेतून काठून…. प्रिय पुत्राच्या राज्यात आणून” दिल्या गेलेल्या “मुक्ती” च्याद्वारे प्रवेश करते: “त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून  आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले ” (कलस्सै.  १:१३). दुसऱ्या शब्दांत, हे राज्य अशा लोकांनी व्यापलेले आहे ज्यांना देवाने आपल्या पुत्राच्या सहभागीपणात आणले आहे (१ करिं. १:९). ह्या सहभागीपणात, “मुक्ती म्हणजे पापांची क्षमा” ही प्राप्त झाली आहे (कलस्सै. १:१४).

ख्रिस्ताचे राज्य हे त्या सर्वांवर ख्रिस्ताचे अदृश्य शासन आहे ज्यांना आध्यात्मिकरित्या अंधारातून काढून त्या राज्यात आणले जाते. म्हणून, ह्या राज्यामध्ये प्रवेशाचे माध्यम म्हणून किंवा ह्याच्या विद्यमान वास्तविकतेच्या समर्थनासाठी किंवा अंमलबजावणीसाठी नागरी सरकारकडे पाहण्याचा विचारही केला जाऊ नये.

ख्रिस्ताच्या दोन्ही ही आगमनादरम्यान असणारे हे अदृश्य आणि आध्यात्मिक स्वरूपाचे राज्य योहान १८:३६ मधील येशूच्या वचनांनुसार आहेत, “माझे राज्य ह्या जगाचे नाही,” ज्यावरून येशू हा आशय काढतो, “माझे शिष्य मला मुक्त करण्यासाठी शस्त्रे उचलत नाहीत.” जगाची ही शस्त्रे ही ती ख्रिस्ती माध्यमे नसावीत ज्याद्वारे ह्या जगात ख्रिस्ताच्या राज्याचा प्रसार होईल.

ख्रिस्ताचे उद्धारक राज्य देवाच्या सार्वभौम कृतीद्वारे वाढत जाते, तो लोकांना अंधाराच्या सत्तेतून काढून ख्रिस्ताच्या सत्तेत आणतो. ख्रिस्ताच्या ह्या राज्याचा ख्रिस्ती शिक्षक, रक्षक किंवा प्रसारक म्हणून सरकारी सत्तेचा आधार मिळविल्याने ह्या राज्याचे आध्यात्मिक स्वरूप नक्कीच धुमिळ होते आणि जगात ख्रिस्ताच्या खऱ्या कार्याची चुकीची छाप निर्माण करते.

३. ख्रिस्ताचे अनुयायी या पृथ्वीवर प्रवासी व परदेशवासी आहेत.

पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’ ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता,’ आता तर ‘देवाचे लोक आहात; तुम्हांला दया मिळाली नव्हती,’ आता तर ‘दया मिळाली आहे.’ प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा. (१ पेत्र २:९-१२).

जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’ (१ पेत्र १:१७-१९)

कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत; ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे-आमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. (फिलि.३:१८-२१)

ख्रिस्ताचे लोक हे ते आहेत ज्यांना देवाने “अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले” (१ पेत्र २:९). हा समूह अशा लोकांनी बनलेला आहे ज्यांना “अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या [देवाच्या] प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.” (कलस्सै. १:१३). अशाप्रकारे, ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली असलेल्या राज्यात जे लोक आहेत ते तेच आहेत ज्यांना “निवडलेला वंश . . . एक पवित्र राष्ट्र”  म्हटले जाते (१ पेत्र २:९). हे ते लोग सुद्धा आहेत ज्यांना “प्रवासी व परदेशवासी” असे म्हटले गेले (१ पेत्र २:११). आणि ख्रिस्ताच्या दोन्ही आगमनांमधील त्यांचा काळाला “आपल्या प्रवासाच्या काळात” असे म्हटले गेले (१ पेत्र १:१७). ह्या समूहाच्या लोकांविषयी म्हटले गेले आहे की त्यांचे “नागरिकत्व”. . . स्वर्गात आहे” (फिलि. ३:२०), जी त्यां लोकांच्या विपरीत वैशिष्ट्य आहे ज्यांचे चित्त “जगिक गोष्टींवर लागलेले असते” (फिलि. ३:१९). खाली ख्रिस्ताच्या लोकांचे जगापासून वेगळेपण दाखविणाऱ्या वैशिष्ट्यांची एक उल्लेखनीय यादी आहे:

  • अंधकाराच्या सत्तेतून काढलेले
  • ख्रिस्ताच्या राज्यात आणून ठेवलेले
  • अंधकारातून पाचारण केलेले
  • ख्रिस्ताच्या अद्भुत प्रकाशात बोलाविलेले
  • निवडलेला वंश म्हणून स्थापन केलेले
  • पवित्र राष्ट्र म्हणून स्थापन केलेले
  • स्वर्गात नागरिकत्व असलेले
  • प्रवासी व परदेशवासी असलेले
  • आपल्या प्रवासाच्या काळात जगत असलेले  

ख्रिस्ताच्या लोकांसाठी ख्रिस्ताच्या दोन्ही आगमनांदरम्यान असलेला काळ हा “परदेशवासाचा काळ” आहे. ह्या काळा दरम्यान ते स्वतः “प्रवासी व परदेशवासी” आहेत. म्हणजेच, त्यांचे “नागरिकत्व स्वर्गीय आहे,” प्रथमदर्शनी किंवा प्रामुख्याने किंवा निर्णायकपणे जगिक नाही. हे स्वर्गीय नागरिकत्व त्यांना “पवित्र राष्ट्र” म्हणून बनवते. स्टॅन्डर्ड ग्रीक शब्दकोष उद्धृत केला तर, “आपले निवासस्थान स्वर्गात आहे आणि येथे पृथ्वीवर आपण स्वर्गीय नागरिकांची वसाहत आहोत.” पृथ्वीवर परदेशी असलेली ही वसाहत दोन आध्यात्मिक सत्यानी चिन्हांकित केली गेली आहे: “अद्भुत प्रकाश” आणि ख्रिस्ताचे राज्य.

“सर्व राष्ट्रे आणि वंश आणि कुळे अशा शब्दांत परिभाषित आपले नागरिकत्व हे पृथ्वीवरील नागरिकत्व नाही.”

ख्रिस्ताच्या लोकांचे अशा प्रकारे रोमहर्षक व ठळक वैशिष्ट्यांसह चित्रण त्यांना ह्या युगातील जगिक संस्थागत व्यवस्थेपासून दूर ठेवण्यासाठी केले गेले आहे, कारण जगिक व्यवस्था ख्रिस्ताच्या राज्याची आध्यात्मिक वास्तविकता म्हणून परिभाषित, नियंत्रित करण्याचा किंवा तिला ओळख देण्याचा प्रयत्न करील. जगिक राष्ट्रांवरील निष्ठा कमी करण्यासाठी आणि सर्व राष्ट्रांमधील ख्रिस्ताच्या लोकांप्रती निष्ठा घट्ट करण्यासाठी ही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. सर्व राष्ट्रे आणि वंश आणि कुळे अशा शब्दांत परिभाषित आपले नागरिकत्व हे पृथ्वीवरील नागरिकत्वासारखे (जसे की अमेरिकेतील, किंवा भारतातील वा पृथ्वीवरील इतर कोणत्याही राष्ट्राचे नागरिकत्व) किंवा पृथ्वीवरील जातीयता किंवा वंशासारखे नाही.

ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनापर्यंत, पृथ्वीवरील राष्ट्रांचे अनिश्चित, अस्थिर आणि फुटीर अस्तित्व ख्रिस्ताच्या आणि त्याच्या लोकांच्या अविनाशी राज्याशी सुसंगत होत नाही. त्यांच्यामध्ये आवश्यक असा कुठलाही संबंध नाही. पृथ्वीवरील राष्ट्रे येतात आणि जातात. ख्रिस्ताचे “पवित्र राष्ट्र” असे नाही. एकीकडे, ख्रिस्ताच्या लोकांची परदेशवासी-वास्तविकता आणि दुसरीकडे पृथ्वीवरील कोणत्याही सरकारचे नागरिकत्व ह्यातील मूलगामी भेद असताही, पृथ्वीवरील सरकारच्या शक्तींचा प्रत्यक्ष ख्रिस्ती प्रतिनिधी किंवा साधन म्हणून कार्यरत असण्याचा विचार करणे हे पृथ्वीच्या एकल राष्ट्र-व्यवस्थेच्या पलीकडे असणाऱ्या, किंबहुना बहुराष्ट्रीय स्वरूप असलेल्या ख्रिस्ताच्या “पवित्र राष्ट्रा” बरोबर विसंगत ठरेल. पृथ्वीवरील राष्ट्रात कितीही लोक किंवा नेते हे ख्रिस्ती असले तरीही हे सत्य आहे.

४. ख्रिस्ती लोक आध्यात्मिक शस्त्रे चालवतात, पृथ्वीवरील नाहीत.

मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो, तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो; माझे मागणे असे आहे : आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत असे कित्येक लोक मानतात; असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो; आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत.. (२ करिं. १०:१-६)

ख्रिस्ती लोक ह्या जगात युद्ध करीत आहेत ह्याविषयी प्रश्नच नाही. प्रश्न हा आहे की, ख्रिस्तविरोधी शक्तींशी लढा  देण्यासाठी आणि ख्रिस्ताला उंच करण्यासाठी आपण कोणती शस्त्रे आणि धोरणे वापरली पाहिजेत? पौल मान्य करतो की ख्रिस्ती लोक हे सामान्यपणे भौतिक शरीरें, आणि इतर मानव-गरजा (अन्न, कपडे) आणि सांस्कृतिकदृष्ट्या (भाषा, सामाजिक संरचना इ.) जगातील अगदी गैर-ख्रिस्ती लोकांसारखेच आहेत. जेव्हा तो म्हणतो, “आम्ही देहात चालणारे आहोत” (व.३) तेव्हा त्याचा सांगायचा अर्थ हाच आहे. देह हा शब्द जोपर्यंत पवित्र आत्म्याचे परिवर्तनकारी सामर्थी कार्य घडून येत नाही तोवर केवळ मानवी, केवळ नैसर्गिक गोष्टींना सूचित करतो (पहा, रोम. १:३ ; ४:१ ; ९:३ , ५ ; १ करिं. १:२६ ; गल. ४:२३ , २९). ह्या जगात ख्रिस्ती लोक अविश्वासू लोकांबरोबर वस्ती करतात.

तरीसुद्धा, जेव्हा ख्रिस्ती विश्वासाचा बचाव आणि प्रसार करण्याच्या सुयुद्धाचा प्रश्न येतो तेव्हा पौल एक मर्यादा आखतो. आपण जरी देहात “चालणारे” असलो, तरी आपण “देहस्वभावानुसार युद्ध” [करत नाही] (व.३). किंवा दुसऱ्या प्रकारे सांगायचे तर, “आपल्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत” (व.४). जरी पौल ह्या मजकुरात नागरी सरकारच्या सामर्थ्याबद्दल बोलत नसला तरी, धोरण असे आहे: आम्ही देहाची शस्त्रे वापरून —म्हणजे, नागरी सरकाररुपी तलवार चालवून प्रत्यक्षपणे ख्रिस्त-विरोधी शिकवणीचा पराभव करू पाहत नाही.

परिणामी, हे येशूने जे म्हटले तेच आहे, “माझे राज्य ह्या जगाचे नाही. जर माझे राज्य ह्या जगाचे असते, तर माझे सेवक [तलवारीने] लढले असते” (योहा. १८:३६). म्हणजे, “माझे राज्य दैहिक नाही. माझे राज्य जर दैहिक असते तर माझ्या सेवकांनी दैहिक शस्त्रे वापरली असती.” आपण ख्रिस्ताच्या उद्धारक राज्याच्या वाढीसाठी प्रयत्न करीत असतांना जर आपण आत्म्याच्या  आध्यात्मिक तलवारी ऐवजी देहाच्या  नागरी तलवारीकडे पाहतो, तर आपण ख्रिस्ताची अवज्ञा करतो, आणि ख्रिस्ती धर्माचे जे खरे स्वरूप आहे त्याच्या अगदी विपरीत त्याचा प्रचार-प्रसार करतो.

“ह्या जगात एक मोठे सुयुद्ध करायचे आहे आणि ख्रिस्ती लोकांनी आत्म्याने अभिषिक्त वचनांची शस्त्रे वापरायची आहेत.”

म्हणून पौल म्हणतो की आपल्या युद्धाची शस्त्रे “दैहिक” (सार्किका)  नसून, ती “देवाच्या सामर्थ्याद्वारे” (डूनाटा हा थिओ) आहेत. अर्थातच, तो असे म्हणतो, तेव्हा त्याचा आशय ख्रिस्ती सत्याचा आत्म्याने-अभिषिक्त असा उपदेश आहे, जो “तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून” टाकतो (व.५).

म्हणून, २ करिं. १०:३-५ हा शास्त्रपाठ खऱ्या देवाविरुद्ध उभारलेल्या मतांचा नाश करण्यासाठी नागरी सरकारच्या अधिकारांचा वापर करण्याच्या मोहाच्या विरोधात आहे. उदाहरणार्थ, हा शास्त्रपाठ एखाद्या देव-निन्दकाला शिक्षा देण्यासाठी शासकीय अधिकार अमलात आणण्याच्या मार्गात उभा राहील. ह्या जगात एक मोठे सुयुद्ध करायचे आहे आणि ख्रिस्ती लोकांनी आत्म्याने अभिषिक्त वचनांची शस्त्रे वापरायची आहेत, राष्ट्राची शस्त्रे नव्हे.

५. हे राज्य एका राष्ट्राकडून घेतले गेले आणि मंडळीला दिले गेले.
म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल. (मत्त. २१:४३) पण तुम्ही तर…एकपवित्र राष्ट्र [एथनास हागिओन] आहात…ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. (१ पेत्र २:९). म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये. (१ करिं. ५:११). अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात. (१ करिं. ६:९-११)

ख्रिस्ताच्या येण्याने ह्या जगात देवाच्या दृश्यमान लोकांच्या स्थापनेमध्ये बदल घडून आला. ह्यापुढे देवाचे दृश्य लोक इस्राएलाचे राजकीय आणि वांशिक लोक नाहीत. त्याऐवजी, देवाची उद्धारदाई कृती एक विशिष्ट जनसमूह म्हणून इस्राएलापासून काढून घेण्यात आली आणि मंडळीवर केंद्रित केली गेली आहे.

मत्तय २१:४३ चा अर्थ असा आहे. येशूने द्राक्षमळ्याच्या दृष्टान्ताचा अर्थ इस्राएलाच्या निष्फळपणाचा आणि परिणामी देवाच्या उद्धार करणाऱ्या राज्याला गमावून बसणाऱ्या दृष्टान्ताच्या स्वरूपात केला: “देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल.” हे “राष्ट्र” म्हणजे येशू ख्रिस्ताची मंडळी. रॉबर्ट गंड्री ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, “मंडळीला ‘एक राष्ट्र’ असे म्हटले गेले आहे कारण की ती सर्व राष्ट्रांतील शिष्यांसह, सर्व लोकांना देवाचे नवीन लोक म्हणून एकत्र करून इस्राएल राष्ट्राचे स्थान घेईल.”  म्हणून पेत्र मंडळीला “एक पवित्र राष्ट्र [नास हागिओन] असे म्हणतो. (१ पेत्र २:९)

राज्य इस्राएलाकडून काढून ते मंडळीकडे देण्यात आल्यानंतर त्यांत झालेले बदल बरेच आहेत.

  • मंडळी ही केवळ एका नव्हे तर सर्व राष्ट्रांनी मिळून बनलेली आहे (मत्त. २८:१९-२०; कलस्सै. ३:११ ; रोम. ४:१०-११ ; ९:२४-२५; गलती. ३:२८ ; इफिस. २:११-२२ ; ३ :६ ).
  • सर्व विश्वासणारे याजकगण आहेत (१ पेत्र २:९ ; प्रकटी. १:६ ; ५:१०).
  • ख्रिस्ताच्या परिपूर्ण आणि अंतिम पाप-नाशक यज्ञार्पणामुळे अर्पण विधीची प्रथा समाप्त झाली (इब्री ७:२७ ; ९:१२ ; १०:१०).
  • अन्न विषयक नियमशास्त्रापासून ख्रिस्ती लोकांना स्वातंत्र्य (मार्क ७:१९).
  • देवाचे स्वतःचे लोक म्हणून सुंतेच्या चिन्हाची ह्यापुढे आवश्यकता नाही (गलती. २:३).

आणि उदाहरण म्हणून, पश्चात्ताप न करणारे मूर्तिपूजक, व्यभिचारी आणि समलैंगिकता यांसारख्या पापांसाठी मरण दंडाच्या नागरी शिक्षेच्या ईश्वरशासित आज्ञा आरोपीला मंडळीतून बहिष्कृत करण्याच्या नियमाद्वारे बदलली गेली आहे. ह्या बहिष्काराचे अपेक्षित उद्दिष्ट  पाप केलेल्या व्यक्तीचे पश्चात्ताप करणे आणि त्याला मंडळीत परत घेणे हे आहे आणि म्हणूनच ही प्रक्रिया मंडळीनिमित्त मरण दंडाच्या शिक्षेसाठी सरकारकडे पाहत नाही.

ईश्वरशासित जुन्या कराराच्या इस्राएलाच्या राजवटीत मूर्तिपूजक, व्यभिचारी आणि सक्रिय समलैंगिकांसाठी मरण दंडाच्या शिक्षेची वैधता दर्शविणारी काही वचने पुढीलप्रमाणे आहेत:

तेव्हा योवाश आपल्यावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल.” (शास्ते ६:३१ ; लेवीय २४:१६ ; अनुवाद १७:२-५ देखील पहा)

जो दुसर्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे. (लेवीय २०:१०)

कोणा पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. (लेवीय २०:१३)

ख्रिस्ताच्या नवीन कराराच्या अध्यात्मिक राजवटीत, मूर्तिपूजेला आणखी गंभीर ठरवण्यात आले आहे, परंतु कठोर शिक्षा म्हणून नव्हे, तर पापकर्मांद्वारे उघड होणाऱ्या अंत:करणाच्या लोभी स्थितीला ओळखून. “तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा” (कलस्सै ३:५).

व्यभिचाराच्या गांभीऱ्याला अंत:करणात वावरणाऱ्या कामेच्छेशी जोडून अधिक विक्राळरूप देण्यांत आले आहे. “मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८).

“अनीतीच्या” ह्या पापांत समलैंगिक प्रथेचे सुद्धा वर्गीकरण केले गेले आहे. आणि ह्या तीनही कृत्यांना(मूर्तिपूजा, व्यभिचार, समलैंगिक पाप, इतरां समवेत) एखाद्याला देवाच्या राज्यापासून दूर ठेवण्यासाठी पुरेसे गंभीर मानले गेले आहे:

…..जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे…..ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात (१ करिं. ६:९-११)

ख्रिस्ताच्या नवीन-कराराच्या राजवटीत, देवाचे लोक मूर्तिपूजा, व्यभिचार आणि समलैंगिक वर्तणुकीच्या पापांसाठी सर्वप्रथम पश्चात्ताप करून ती दूर सारतात. जेव्हा हे घडते, तेव्हा पुनर्नवीकारण होते. ही गोष्ट आपण ह्या कृपेने युक्त वचनात पाहतो “तुमच्यापैकी कित्येक तसे होते” (१ करिं. ६:११). परंतु जर हे मूर्तिपूजक, व्यभिचारी आणि सक्रिय समलैंगिक लोक पश्चात्ताप करत नसतील, तर पुढचा मार्ग मंडळीची शिस्त, आणि आवश्यक असल्यास त्यांना मंडळीतून बहिष्कृत करणे आहे.

मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही. जे कोणी हे कर्म केले असेल त्यास तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. . . . तुम्ही अशा मनुष्यास देहाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे; म्हणजे, प्रभूच्या दिवशी त्याच्या आत्म्याचे तारण व्हावे. (१ करिं. ५:१-२ , ५)

मंडळीतून बहिष्कृत करण्याच्या उद्देशामागील कारण एकतर पश्चात्तापामुळे तारणाकडे घेऊन येणे आणि शक्य असल्यास पुनर्स्थापना करणे असायचे (१ करिं. ५:५ ; २ करिं. २:६-१० ; २ थेस्स. ३:१४-१५), किंवा अशा व्यक्तीला शेवटच्या दिवशी ख्रिस्ताच्या सार्वकालिक दंडासाठी सोडून देणे असायचे.

पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय. (प्रकटी. २१:८ ; २ थेस्स. १:८ देखील पहा)

उदाहरणार्थ, खून करणाऱ्यांना, ह्या सांप्रत युगात राष्ट्रांकडून योग्य ती शिक्षा दिली जाते, ही वस्तुस्थिती मी वर मांडलेल्या मुद्द्याशी विसंगत नाही, कारण खून करणाऱ्यांना शिक्षा देताना सरकार ख्रिस्ती विश्वासाला प्रत्यक्षपणे ख्रिस्ती अभिकर्ता (साधन) म्हणून उपयोगात आणत नाही. सरकारची ही कृती ख्रिस्ताच्या त्याच्या मंडळीवरील शासनाचा एक पैलू नाही. जेव्हा शासन खून करणाऱ्यांस शिक्षा करते, तेव्हा ते धार्मिक विश्वासाच्या प्रत्यक्ष प्रचार-प्रसारासाठी —ख्रिस्ती किंवा अन्य प्रकारे—केले जाऊ नये.

येशूने असे कधीच शिकवले नाही की राज्य इस्राएलापासून काढून घेतले गेले आणि ते प्रत्येक राष्ट्राच्या नागरी सरकारला दिले गेले. त्याने सांगितले की ते इस्राएलापासून काढून घेतले गेले आणि मंडळीला दिले गेले (मत्त. २१:४३). आणि ह्या प्रक्रियेत, त्याने एक नवीन मार्ग तयार केला की ज्यात परमेश्वर आता ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत त्याच्या लोकांवर राज्य करतो. त्यामुळे जुन्या करारातील नियम आणि शिक्षेपासून वर्तमान वेळेपर्यंत कुठलाही सरळ संबंध प्रस्थापित केला जाऊ शकत नाही. हे राज्य इस्राएलाबरोबर सातत्य ठेवत नाही. आणि ख्रिस्ताचे लोक —एक नवीन पवित्र राष्ट्र —एका वेगळ्या पद्धतीने “इस्राएल” बनवले गेले आहेत.

६. ‘ख्रिस्ती राष्ट्र’ ख्रिस्ती धर्माचे खरे स्वरूप झाकून टाकते.

अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत. तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी (ह्यांनी) भरलेले आहात. (मत्त. २३:२७-२८)

कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे. (रोम. १४:२३)

ख्रिस्त ढोंगीपणाचा द्वेष करतो. तो त्या लोकांचा धिक्कार करतो जे विश्वासाच्या आंतरिक वास्तविकतेवाचून, धार्मिक परंपरेच्या बाह्य रूपाने अनुकरण करण्याच्या कृतीला ख्रिस्ती धर्माचा उद्देश समजतात. अशा प्रकारची मानसिकता हे समजण्यास चुकते की ढोंगी आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करणारा शेजारी हा समाज-घातक अराजक तत्वापेक्षा कधीही बरा आहे. ख्रिस्ती लोक हा पर्याय घेऊन जीवन जगत नसतात. आपण, “अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल” (मत्त. २३:२६) हे आवर्जून सांगण्यासाठी जगतो आणि मरतो. “सर्व. . .ढोंग. . .दूर ठेवा” (१ पेत्र २:१). जगातील शासनकर्ते जेव्हा मानवाकडून इतर मानवांना होणाऱ्या उपद्रवावर आळा घालतांत तेव्हा ते योग्यच आहे. पण हा ख्रिस्ती संदेश नाही किंवा ख्रिस्ती विश्वासाचा प्रचार-प्रसार करण्याचे धोरण नाही.

जेव्हा राष्ट्र बाह्य स्वरूपाच्या धार्मिकतेला ख्रिस्ताच्या नावाने आणि “ख्रिस्ती” मार्गाची अभिव्यक्ती म्हणून प्रोत्साहन देते, तेव्हा ते ख्रिस्ती धर्माचे खरे स्वरूप झाकून टाकते आणि ख्रिस्ताच्या कारणास हानी पोहोचवते. हे असे भासवते की अश्या प्रकारचे नीतिशास्त्र हे “ख्रिस्ती” आहे, जेथें खरे पाहता यातील विश्वासासाठी मुलभूत तत्वे आणि ख्रिस्तासाठी प्रेम गहाळ असतात (ह्याशिवाय ख्रिस्ती नीतिशास्त्र यथार्थ नाही, रोम. १४:२३). ह्याचा अर्थ असा होतो की ख्रिस्ती लोकांनी, एक दिखावटी सांस्कृतिक ख्रिस्ती धर्म  विकसित करण्याऐवजी, जो काही बाह्य वाईट गोष्टींवर आवर घालतो, परंतु त्याचबरोबर लाखो लोकांना ह्या खोट्या आश्वासनाकडे घेऊन जातो की ते देवाच्या मर्जीतील लोक आहेत, पण ते नाहीत, त्यावर कसा आळा घालावा याचे मार्ग शोधले पाहिजेत.

७. सरकार रूपी तलवार सत्य धर्माच्या स्थापनेसाठी नाही.

प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील. कारण चांगल्या कामात अधिकार्‍यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधिकार्‍यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल. कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तलवार धरीत नाही कारण तो वाईट करणार्‍यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे. म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे. ह्या कारणास्तव तुम्ही कर ही देता कारण ह्याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत. म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान. (रोम. १३:१-७)

प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभू करता, आज्ञाधारक राहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा. जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत. कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला गप्प करावे. तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या. (१ पेत्र २:१३-१७)

नवीन कराराच्या अंतर्गत ख्रिस्त आपल्या लोकांवर कशाप्रकारे एका नव्या पद्धतीने राज्य करतो त्या सर्व गोष्टींचा  निष्कर्ष पाहता, आपण ह्या शास्त्रखंडाचा असा तर्क काढणे की प्रत्यक्ष स्वरूपात ख्रिस्ती सेवेच्या स्थापनेसाठी किंवा ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी नागरी सरकार रुपी तलवारीचा (शक्तीचा) (रोम. १३:४) उपयोग हा देवाचा हेतू आहे, अनाधिकृत ठरेल.

सरकारे “वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी आणि चांगले काम करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी” आहे (१ पेत्र २:१४; ची तुलना. रोम. १३:३-४ संगती करा) अश्या प्रकारच्या वचनांना घेऊन हा निष्कर्ष काढणे की “चांगला” हा शब्द ख्रिस्ती विश्वासाच्या उघडपणे प्रदर्शित धार्मिक अभिव्यक्तींना सूचित करतो आणि “वाईट” हा शब्द गैर-ख्रिस्ती लोकांच्या उघडपणे प्रदर्शित विधर्मी अभिव्यक्तींना सूचित करतो, अनाधिकृत आहे. दुसऱ्या शब्दात, खालील तर्कपद्धतींचा पूर्वग्रह म्हणून उपयोग अशास्त्रीय आहे:

तर्क १: नागरी सरकार हे चांगल्याला पुरस्कार आणि वाईटाला शिक्षा देते. 

तर्क २: ख्रिस्ती विश्वासाची उघडपणे प्रदर्शित धार्मिक अभिव्यक्ती चांगली आहेत आणि गैर-ख्रिस्ती असण्याची उघडपणे प्रदर्शित विधर्मी अभिव्यक्ती वाईट आहे.

निष्कर्ष: म्हणून, नागरी सरकारने आपले ख्रिस्ती कर्तव्य ख्रिस्ताच्या निमित्ताने स्वीकारावे आणि त्या कृत्याना पुरस्कृत करावे कारण की ते ख्रिस्ती धर्म व्यक्त करतात आणि त्या कृत्याना शिक्षा करावी जे तसे करत नाही.

ही तर्कपद्धती शास्त्रशुद्ध नाही. हा निष्कर्ष शास्त्र-आधारित तर्कानुसार नाही. हे अजिबात स्पष्ट होत नाही की तर्क १ मधील चांगले आणि वाईट लोक हे तर्क मधीलच चांगले आणि वाईट लोक आहेत, आणि हे देखील स्पष्ट होत नाही की पुरस्कार आणि शिक्षा ही ख्रिस्ती धर्माचा पाठिंबा म्हणून दिली जावी.

मागील सहा क्रमवार भागांमध्ये आपण पाहिले की अशी अनेक कारणे आहेत की रोमकरांस १३ आणि १ पेत्र २ वरून असे अनुमान काढू नये की देवाने त्याच्या राज्याला तलवारीच्या बळावर स्थापन करण्यासाठी सरकारांना ख्रिस्ती धर्माचे एक बळ म्हणून नियुक्त केले आहे. त्याच शास्त्र भागांमध्ये असेही निर्देश आहेत की सरकार चांगल्या  गोष्टींची प्रशंसा करतात, ह्याचा अर्थ असा होत नाही की त्या चांगल्या गोष्टी ख्रिस्ती विश्वासाचीच अभिव्यक्ती असल्या पाहिजे. ह्या उलट, रोम. १३:१-७ मध्ये व.३a मधील “चांगले काम” (हो अगाथा एर्गो)  आणि व.३b मधील “चांगले करणे” (हो अगथॉन पोएओ)  बहुधा चांगल्या नागरी कृत्यांचा संदर्भ देतात, ज्यांचा गैर-ख्रिस्ती लोक मोठ्या प्रमाणावर आदर करतात. मी असे म्हणतो त्यामागे काही कारणे आहेत:

  1. या चांगल्या कृत्यांची गैर-ख्रिस्ती शासकांद्वारे (व.३, हेक्सिस एपैनन ) प्रशंसा केली जाते, ज्यांना ख्रिस्ती, आध्यात्मिक वास्तवाची काहीही पर्वा नाही.
  2. त्याचप्रमाणे, १ पेत्र २:१५ मध्ये “चांगले करणे”(अगाथापोयएयोअंटास)  गैर-ख्रिस्ती निर्बुद्ध टीका शांत करण्यासाठी लिहिले गेले आहे, बहुधा ख्रिस्ती विश्वासाबद्दल त्यांच्या आदरासाठी नव्हे  तर त्यांनी केलेल्या चांगल्या नागरी कृतींबद्दल त्यांच्या आदराच्या आवाहनासाठी.
  3. ही चांगली कृत्ये गैर-ख्रिस्ती शासकांच्या (रोम. १३:५ च्या सुरूवातीस “म्हणून” (डीआ) हा शब्द पाहा) अधीन राहण्याच्या फार्मानांचा भाग आहेत, जर ही कृत्ये ख्रिस्ती धर्माची अभिव्यक्ती असतील तर ते त्यांची गय करणार नाही, परंतु केवळ ह्यासाठी करतील की ते त्यांच्या स्वतःच्या गैर-ख्रिस्ती मानकांनुसार फायदेशीर आहेत.
  4. “चांगल्या कामाला” (रोम. १३:३) हा शब्द नियमितपणे गरजू लोकांप्रत दयेच्या व्यावहारिक कार्यांचा संदर्भ आहे (प्रेषित. ९:३६; १ तीमथ्य २:१० ; ५:१०; इ.), ज्यांना अधिकारी, अविश्वासणारे अशाच प्रकारच्या व्यावहारिक मदतीस सक्षम म्हणून मान्यता देतील आणि प्रशंसा करतील.
  5.  वचन 7 च्या (कर, महसूल, भय, सन्मान) तपशीलांमध्ये अधीनता आणि चांगली वर्तणूक दर्शविली गेली आहे, जी गैर-ख्रिस्ती शासकांच्या दृष्टिकोनातून नागरी जबाबदारीची सर्वसाधारण कृती असेल, न कि देवाप्रत ख्रिस्ती आज्ञापालनाची कृती.

ह्या कारणांमुळे, ह्या लेखातील इतर मुद्द्यांना घेऊन असा दावा करणे योग्य नाही की रोम. १३ आणि १ पेत्र २ हे शास्त्रपाठ देवाने ख्रिस्ती धर्माच्या वाढीसाठी नागरी सरकाराला त्याच्या तलवारीचा उपयोग करण्यासाठी नियुक्त केले आहे असे शिक्षण देतांत.

८. ख्रिस्त स्वत: शेवटच्या दिवशी देवनिंदक आणि मूर्तिपूजक यांचा सूड उगवील.

तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. (२ थेस्स. १:६-१०)

कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील; मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील. (२ थेस्स. २:७-८)

मी ह्या भागाला केवळ हे स्पष्ट करण्यासाठी समाविष्ट केले आहे की मूर्तिपूजा आणि देवनिंदा ह्यासाठी ख्रिस्ती न्यायालयीन शिक्षेचा त्याग करणे म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की अशा शिक्षा कधीच दिल्या जाणार नाहीत. त्या एका व्यक्तीद्वारे दिल्या जातील, ज्याच्याकडे तसे करण्याचा योग्य अधिकार आणि बुद्धी आहे, म्हणजे येशू ख्रीस्ताद्वारे, त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी.

गैर-ख्रिस्ती विश्वासांसाठी मुख्य शिक्षा असेल. अशी शिक्षा करण्याचा विशेषाधिकार हा ख्रिस्ताचा आहे. नवीन करारामध्ये मंडळीकडे किंवा राष्ट्रांकडे गैर-ख्रिस्ती विश्वासांविरुद्ध किंवा अशा विश्वासांच्या बाह्य प्रकटीकरणाच्या विरोधात शक्ती वापरण्याचा कोणताही परवाना सापडत नाही, जे इतरांच्या बाबतीत अन्यथा गुन्हे नाहीत.

निष्कर्ष: देवाचे नवीन प्रशासन

येशू हा प्रभू आहे. पूर्वनियोजित गोष्टींचा प्रतिपालक म्हणून, ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टींवर —मग लहानश्या डासापासून ते राष्ट्रांपर्यंत ते तेजोमय मेघनक्षत्र समूहापर्यंत, तो राज्य करतो. त्याच्या उद्धार करणाऱ्या सामर्थ्यात, तो त्याच्या आत्म्याने, त्याच्या पवित्रशास्त्राद्वारे त्याच्या लोकांवर राज्य करतो. जेव्हा मशीहा, देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त ह्या जगात प्रकट झाला, त्यावेळी देवाचे राज्य इस्राएलाकडून काढून घेऊन ते मंडळीला दिले गेले (मत्त. २१:४३). हे हस्तांतरण झालें तेव्हा देवाच्या तारणदायी राज्याचे एक नवीन “प्रशासन” जगात स्थापन केले गेले.

प्रेषित या नात्याने, पौल त्याच्या प्रमुख उद्देशाचा आशय अशा प्रकारे मांडतो:

. . . तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले, आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीकाळापासून जे रहस्य [किंवा प्रशासन,ओइकानामीया ] गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे, हे सर्व लोकांस मी प्रकट करावे. ह्यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. (इफि. ३:८-१०)

देवाच्या राजवटीचे हे नवीन प्रशासन, बायबलसंबंधी विश्वासाची ख्रिस्ती अंमलबजावणी म्हणून नागरी सरकारच्या अधिकारांचा वापर करून देवाच्या ज्ञानाच्या प्रकटीकरणाचा पाठपुरावा करणार नाही. स्वर्गातील आणि पृथ्वीवरील राज्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना, ख्रिस्ताच्या राज्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा सामना करावा लागेल. परंतु ख्रिस्ताच्या राज्याचे विश्वासू लोक नागरी सरकारच्या अधिकारांकडे ख्रिस्ती विश्वासाचे प्रत्यक्ष संरक्षण किंवा समर्थन देण्याकडे लक्ष देत नाही.

ख्रिस्ती धर्मासाठी राष्ट्रीय समर्थनावर विसंबून न राहण्याची ही वचनबद्धता तथाकथित धर्मनिरपेक्ष तटस्थतेच्या समर्थनार्थ नाही. तर ती देवाच्या वचनाच्या आज्ञाधारकतेत राहणे आणि ख्रिस्ताला उंचविणारा सोहळा करणे या उद्देशांत मुळावलेली आहे, ज्यानुसार तो ह्या जगावर जगिक शस्त्र घेऊन नव्हे, तर त्याच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून राज्य करतो.

लेखक

जॉन पायपर

______________________________________________________________________________________________

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *