ArchivesSolid Joys

19 March : सहा मुद्दयात सुवार्तेचा  सारांश

Alethia4India
Alethia4India
19 March : सहा मुद्दयात सुवार्तेचा  सारांश
Loading
/

कारण आपल्यांला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेहि पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. (1 पेत्र 3:18)

इथे सुवार्तेचा सारांश नमूद केला आहे, जो तुम्हांला सुवार्ता समजण्याकरिता, त्याचा आनंद घेण्याकरिता व इतरांना सांगण्याकरिता उपयुक्त ठरील!

  1. देवानें आपल्यांला त्याच्या गौरवाकरिता निर्माण केलें आहे.

“माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या; ज्यांस माझे नाम ठेविले, ज्यांस माझ्या गौरवासाठीं उत्पन्न केलें, निर्माण केलें आणि घडिले त्या सर्वास घेऊन या.” (यशया 43:6-7) देवानें आपल्यां सर्वांना त्याच्या प्रतिमेमध्यें बनवले आहे यासाठीं कीं आपण त्याचें चरित्र व नैतिक सौंदर्य प्रतिबिंबीत करावे.

2. यासाठींच प्रत्येक मनुष्याने देवाच्या गौरवासाठीं जगावे

“म्हणून तुम्हीं खाता, पिता किंवा जे काहीं करता ते सर्व देवाच्या गौरवासाठीं करा” (1 करिंथ 10:31). देवाच्या गौरवाकरिता जगण्याचा मार्ग म्हणजे त्याच्यावर प्रीति करणे (मत्तय 22:37), त्याच्यावर विश्वास ठेवणे ( रोमंकरास पत्र 4:20), त्याचें उपकार मानणे (स्तोत्र 50:23), त्याच्या आज्ञा पाळणे (मत्तय 5:16) आणि त्याला प्रथम स्थान देणे व आपले धन मानणे ( फिलिप्पैकरास पत्र 3:8; मत्तय 10:37). आपण जेव्हां हे करतो तेव्हां आपण देवाचे गौरव प्रतिबिंबीत करतो.

3. तरीही, आपण सर्वांनी पाप केलें आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो.

कारण सर्वांनी पाप केलें आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत (रोमकरांस 3:23). देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाहीं किंवा त्याचें आभार मानले नाहींत….. आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केलीं (रोमकरांस 3:23 1:21–23). आपण कुणीच देवावर जशी करायला पाहिजे तशी प्रीति केलीं नाहीं, विश्वास ठेवला नाहीं, उपकार मानले नाहींत, आज्ञा पाळल्यां नाहींत किंवा त्याला धन मानले नाहीं.

4. त्यामुळेच आपण सर्वजण सार्वकालिक शिक्षेस पात्र आहों

“कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्यां प्रभू येशू ख्रिस्तामध्यें सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकरांस 6:23). ज्यांनी प्रभू येशूची आज्ञा पाळली नाहीं “त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल” (2 थेस्सल 1:9). “ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील” (मत्तय 25:46).

5. तरी, त्याच्या महान दयेनुसार, देवानें त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, याला जगात पापी लोकांसाठीं सार्वकालिक जीवनाचा मार्ग देऊ करण्याकरिता पाठवले.

“देवानें जगावर एवढी प्रीति केलीं कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठीं कीं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16). “आपल्यांबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्यानें आपल्यांला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले” (गलती 3:13). “कारण आपल्यांला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले” (1 पेत्र 3:18).

6. म्हणून सार्वकालिक जीवन ही त्या सर्वांसाठीं एक दान आहे जे येशूवर प्रभू व तारणारा म्हणून विश्वास ठेवतात व त्याला त्यांच्या जीवनातले सर्वोच्च धन मानतात.

“प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” (प्रेषित16:31). “कीं, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्यां मुखाने’ कबूल करशील आणि देवानें त्याला मेलेल्यांतून उठवलें असा ‘आपल्यां अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल” (रोमकरांस 10:9). कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारें तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्यांने हे झाले नाहीं. (इफिस 2:8–9). “मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरता दिले” (गलती 2:20). “इतकेच नाहीं, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठीं कीं, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा” (फिलिप्पै 3:8).

18 March : आपण आशेला घट्ट धरून का ठेवायचे आहे

Alethia4India
Alethia4India
18 March : आपण आशेला घट्ट धरून का ठेवायचे आहे
Loading
/

म्हणून आपल्यां संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारें मध्यें पडला, ह्यासाठीं कीं, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारें चांगले उत्तेजन मिळावे. (इब्री 6 : 17-18)

पौलाचा जीव घेतल्यांशिवाय आम्हीं काहीं खाणार किंवा पिणार नाहीं असा संकल्प  करून दबा धरून बसलेल्यां लोकांचे काय?

देवच्या ठायी विसंगतपणा नाहीं. तो अभिवचनें, शपथा व त्याच्या पुत्राचे रक्त यांद्वारें स्वत:चे सामर्थ्य यासाठीं प्रकट करत नाहीं कीं आपल्यां सुरक्षेची एक बाजू घट्ट धरून, दुसरी बाजू हवेत आधांतरी ठेवावी.

ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने मिळवलेले तारण, हे त्याच्या लोकांना केवळ अर्धवट नाहीं तर संपूर्णपणे वाचवते.

म्हणून आपण हा प्रश्न विचारावयांस उत्तेजित होतो कीं, इब्री 6:18 मध्यें लेखक आपल्यांला, आपल्यां आशेला हस्तगत करण्यास का सांगत आहे? जर आपले हस्तगत करणे येशूच्या रक्ताद्वारें मिळवलेले आहे व त्याची सुरक्षा अपरिवर्तनीय आहे (हाच जुना करार व नवीन करारातील फरक आहे ) – मग देव आपल्यांला का बरे आशा हस्तगत करण्यास सांगतो?

याचे उत्तर आहे :

  • जेव्हां ख्रिस्त मरण पावला तेव्हां त्यानें आपल्यां करिता आशेला हस्तगत करण्याची कृती घडवून आणण्याची सक्षमता मिळवली, ना कीं आपल्यांला त्यातून मुक्त केलें. 
  • जे त्यानें मिळवले ते आपली हस्तगत करण्याची इच्छा रद्द करत नाहीं, जसे कीं आपल्यांला आशेला धरून राहण्याची इच्छाच नाहीं, तर ते आपल्यां इच्छेला सक्षम करते ज्यामुळे आपल्यांला आशेला हस्तगत करण्याची इच्छा निर्माण होते.
  • त्यानें जे मिळवले त्याद्वारें हस्तगत करण्याची आज्ञा रद्द होत नाहीं, तर हस्तगत करण्याच्या आज्ञेची पूर्तता होते.
  • त्यानें जे मिळविले त्याद्वारें उत्तेजनाचा अंत होत नाहीं, तर त्याद्वारें उत्तेजनाचा विजय प्राप्त केला आहे.

तो मरण पावला यासाठींच कीं पौल जे फिलिपै 3:12 मध्यें करतो, आपणहि तेच करावे, “तर ज्यासाठीं ख्रिस्त येशूनें मला आपल्यां कह्यांत घेतले ते मी आपल्यां कह्यांत घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे.” आपण जे पापी जनांस सांगतो कीं देवानें दिलेली आशा हस्तगत करा, ज्याच्यासाठीं केवळ येशूच आपल्यांला सक्षम करू शकतो, तर हा मूर्खपणा नाहीं, तर शुभवर्तमान आहे. यासाठींच मी पूर्ण अंत:करणाने आपणास बोध करतो कीं : जे ख्रिस्ताने तुमच्या करिता हस्तगत केलें आहे, ते तुम्हीं हस्तगत करा, आणि त्याला घट्ट पकडून ठेवा – ती महान कृती तोच तुमच्यात करत आहे.

1 March : आपल्यांला सांत्वन कुठून प्राप्त होते

Alethia4India
Alethia4India
1 March : आपल्यांला सांत्वन कुठून प्राप्त होते
Loading
/

तो ( पिलात ) पुन्हां सरकारवाडयात जाऊन येशूला म्हणाला, “तू कुठला आहेस?” परंतु येशूनें त्याला उत्तर दिले नाहीं. पिलाताने त्याला म्हटलें, ” माझ्याबरोबर तू बोलत नाहींस काय ? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाहीं काय ?” येशूनें उत्तर दिले, ” आपणाला वरुन अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता ; म्हणून ज्यानें मला आपल्यां स्वाधीन केलें त्याचें पाप अधिक आहे. ” – योहान 19 : 9-11.

पिलाताकडें येशूला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार होता, पण त्या गोष्टीचा येशूला धाक वाटली नाहीं.. असे का बरे?

असे नव्हते कीं पिलात खोटे बोलत होता किंवा येशूला वधस्तंभावरखिळण्याचा त्याला अधिकार नव्हता. त्याला तो अधिकार होता.

तर, येशूला त्याच्या अधिकाराचे भय वाटले नाहीं याचे कारण हें कीं त्याचा अधिकार हा दिलेला अधिकार होता, तो अधिकार त्याला “देवाकडून प्राप्त झाला होता.’  येशू म्हणाला कीं, “तुला वरून अधिकार प्राप्त झाला आहे.”  म्हणजेच त्याला अधिकार होता, निश्चितच जास्त प्रमाणात अधिकार होता. 

मग ह्या गोष्टीचा धाक वाटणे योग्य होते ना?  पिलाताला येशूला केवळ मारण्याचा अधिकार नव्हता तर, मारण्याचा तो अधिकार त्याला देवानें देऊ केलेला होता.

येशूला त्याच्या अधिकाराची भीती वाटली नाहीं कारण पिलाताचा येशुवरील अधिकार हा देवाच्या पिलातावरील अधिकाराच्या दुय्यम दर्जाचा होता.  येशूला त्या क्षणी सांत्वन प्राप्त झाले कारण पिलाताची इच्छा ही दुर्बळ नसून, त्याची इच्छा ही मार्गदर्शित होती. येशू हा पिलाताच्या हातात नसून, पिलात येशूच्या पिताच्या हातात होता.

याचा अर्थ आपल्यांला सांत्वन यातून प्राप्त होत नाहीं कीं आपला शत्रू दुर्बळ आहे,  तर आपल्यांला सांत्वन यातून प्राप्त होते कीं “आपल्यां शत्रूच्या बळावर देखील आपल्यां पित्याचा सार्वभौम अधिकार आहे.”

रोमकरास  पत्र 8:35-37, मध्यें हाच मुद्दा नमूद केला आहे, क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकटे किंवा तलवार आपल्यांला ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाहींत, “कारण ज्यानें आपल्यांवर प्रीति केलीं त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो.”

पिलात व येशूच्या इतर शत्रूंनी जे वाईटासाठीं योजले (व आपले शत्रू जे आपल्यां वाइटासाठीं योजतात)  ते सर्व,  देव आपल्यां चांगल्यांसाठीं योजतो (उत्पत्ती 50:20).  येशूचे सर्व शत्रू एकत्र येऊन, त्यांना देवानें दिलेल्यां आधिकारानी, “जे काहीं घडावें म्हणून देवानें स्वहस्ते व देवाचा संकल्पानें पूर्वी योजलें होते ते त्यांनी केलें” (प्रेषित 4:28). त्यांनी पाप केलें, पण त्यांचा पापाद्वारें देवानें तारण घडवून आणिलें.

यासाठींच, आपले शत्रू जे केवळ आपल्यां शरीराचा नाश करू शकतात त्यांचे भय बाळगण्याचे कारण नाहीं (मत्तय 10:28) ते एवढेच करू शकतात म्हणून नाहीं तर (लुक 12:4), ते जे काहीं करतात ते आपल्यां दक्ष पिताच्या हाताखाली करतात.

पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात कीं नाहीं? तरी त्यांच्यापैकीं एकींचाही देवाला विसर पडत नाहीं. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्हीं अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. (लूक 12:6-7)

पिलाताकडें अधिकार होता. हेरोदाकडें अधिकार होता. सैनिकांकडें अधिकार होता. सैतानाकडें अधिकार आहे. पण त्यांचा अधिकार स्वायत्त/स्वतंत्र नाहीं. त्या सर्वांचा अधिकार हा त्यांना देण्यांत आलेला अधिकार आहे, पण सर्व अधिकार देवाच्या  इच्छेच्या अधीन आहे, दुसऱ्या दर्जावर आहे. भय बाळगू नका. तुम्हीं तुमच्या सार्वभौम पित्यासाठीं मौल्यवान आहात. ज्या चिमण्यांचा देवाला विसर पडत नाहीं, तुम्हीं त्या चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.  

28 फेब्रुवारी : शेवटी आणि पूर्णपणे नीतिमान ठरलेलें

Alethia4India
Alethia4India
28 फेब्रुवारी : शेवटी आणि पूर्णपणे नीतिमान ठरलेलें
Loading
/

देवाच्या निवडलेल्यां लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे. (रोम 8:33)

पौल येथें असेहि म्हणू शकला असता, “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील?” आणि मग त्यानें उत्तर दिले असते, “कोणीही नाही! आम्हीं नीतिमान ठरलो आहोत.” ते खरे आहे. पण त्यानें जे म्हटलें त्याचा तो शेवट नाही. त्याऐवजी त्याचे उत्तर आहे, “देवच नीतिमान ठरवणारा आहे.”

जोर कृतीवर नव्हे तर कृती करणाऱ्यावर आहे.

का? कारण न्यायालये आणि कायदे यांच्या जगात ही भाषा जिथून येते, त्यानुसार एखाद्या न्यायाधीशाद्वारें करण्यांत आलेली निर्दोष सुटका वरिष्ठ न्यायाधीशाद्वारे रद्द केलीं जाऊ शकते.

जर स्थानिक न्यायाधीश तुम्हीं दोषी असतांना, तुम्हाला दोषमुक्त करतो, पण जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला तुमच्याविरूद्ध आरोप लावण्याचा अधिकार असेल, तर मग काय? जर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश तुम्हीं दोषी असतांना, तुम्हाला दोषमुक्त करतो, पण जर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश तुमच्याविरूद्ध आरोप लावू शकत असेल, तर मग काय?

मुद्दा हा आहे : देवाच्यावर, कुठलेही उच्च किंवा सर्वोच्च न्यायालय नाही. जर देवच तुम्हाला दोषमुक्त करणारा असेल – तुम्हाला त्याच्या दृष्टीत नीतिमान घोषित करीत असेल – तर कोणीही तुमच्या विरुद्ध नवी याचिका दाखल करू शकत नाही; कोणीही तांत्रिकतेत दोष असल्याचा दावा करू शकत नाही; कोणीही फिर्याद करू शकत नाही; कोणीही तुमच्याविरुद्ध अन्य दोषारोप आणू शकत नाही. देवाचा निर्णय अंतिम आणि परिपूर्ण आहे.

जे कोणी येशूवर विश्वास ठेवतात, आणि ख्रिस्ताशी एकरूप होतात, आणि स्वतःला निवडलेल्यांसोबत दाखवितात, त्यांनी हे ऐका : तुम्हाला नीतिमान ठरविणारा देव आहे. मानवी न्यायाधीश नाही. मोठा संदेष्टा नाही. स्वर्गातून येणारा आद्यदूतहि नाही. पण जगाचा निर्माता देव, आणि सर्व वस्तूंचा स्वामी आणि विश्वाचा आणि त्यातील प्रत्येक अणूरेणूंचा आणि व्यक्तीचा नियंता, देवच तो आहे जो तुम्हाला नीतिमान ठरवितो. मुद्दा हा आहे : भयंकर दुःख सहनातही अढळ सुरक्षितता. जर देव आमच्या पक्षास आहे, तर कोणीही आमच्याविरुद्ध यशस्वी दोषारोप घेऊन येऊ शकत नाही. जर देवानें आमच्यासाठीं त्याचा पुत्र दिला, तर तो जे काही चांगले आहे ते सर्व आमच्यासाठीं देईल. जर आम्हांला नीतिमान ठरविणारा देव आहे, तर आमच्याविरुद्ध कुठलाही दोषारोप टिकू शकत नाही.

27 फेब्रुवारी : पुनरुत्थानाचे मूलगामी परिणाम

Alethia4India
Alethia4India
27 फेब्रुवारी : पुनरुत्थानाचे मूलगामी परिणाम
Loading
/

आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. (1 करिंथ 15:19)

पौल त्याच्या दर तास अनुभवीत असलेल्या संकटावरून, आणि रोजच्या मरणावरून, आणि वन्यपशूंसोबत त्याच्या लढ्यावरून हा निष्कर्ष काढतो कीं जर त्याला मरणातून जिवंत करण्यात आले नाही, तर येशूच्या अनुसरण करण्यात ज्या जीवनाची त्यानें निवड केलीं आहे ती मूर्खपणाची आणि दयनीय ठरेल.

जर मृत्यू सर्व गोष्टींचा शेवट असता, तर तो म्हणतो, “चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे” (1 करिंथ 15:32). याचा अर्थ हा नाही कीं : जर पुनरुत्थान नसेल तर आपण सर्व खादाड आणि दारूडे बनू या. दारूडे सुद्धा दयनीय असतात – मग पुनरुत्थान असो अथवा नसो. त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे : जर पुनरुत्थान नाही, तर पृथ्वीवरील सुखांचा जास्तीत जास्त उपभोग घेण्यासाठीं मध्यमवर्गीय संयमाचा काय अर्थ.

पण पौल या गोष्टीची निवड करीत नाही. तो क्लेशाची निवड करतो, कारण तो आज्ञापालनाची निवड करतो. दमिश्काच्या मार्गावर ख्रिस्तासोबत झालेंल्या त्याच्या भेटीनंतर हनन्या पौलाकडे प्रभू येशूकडून हे शब्द घेऊन आला, “त्याला माझ्या नावासाठीं किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन” (प्रेषितांची कृत्ये 9:16). पौलाने त्याच्या पाचारणाचा भाग म्हणून या दुःखाचा स्वीकार केला.

पौल हे कसे करू शकला? ह्या मूलभूत आणि दुःखदायक आज्ञापालनाचा उगम काय होता? याचे उत्तर 1 करिंथ 15:20 मध्ये दिलेले आहे : “तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे.” दुसऱ्या शब्दांत, ख्रिस्त उठविला गेला, आणि मी त्याच्यासोबत उठविला जाईन. म्हणून, येशूसाठीं सहन केलेले कोणतेही दुःख व्यर्थ नाही (1 करिंथ 15:58).

पुनरुत्थानाच्या आशेने पौल ज्याप्रकारे जगत होता त्यात मूलभूत बदल घडवून आणला. या सत्यानें त्याला भौतिकतावाद आणि उपभोक्तावादापासून स्वतंत्र केले. या सत्यानें त्याला सुखसोई आणि सुखविलासावाचून जगण्याचे सामर्थ्य दिले ज्याविषयी अनेक लोकांस वाटते कीं या जीवनात त्यांस ते प्राप्त झालें पाहिजे. उदाहरणार्थ, जरी त्याला लग्न करण्याचा हक्क होता (1 करिंथ 9:5), तरीही त्यानें त्या सुखाचा त्याग केला कारण त्याला अतिशय दुःख सहन करावयास पाचारण करण्यात आले होते.

येशूनें म्हटलें कीं याच प्रकारे पुनरुत्थानाच्या आशेने आमच्या वर्तनात बदल घडवून आणला पाहिजे. उदाहरणार्थ, त्यानें आम्हास सांगितले कीं आम्हीं अशा लोकांना आपल्या घरी आमंत्रित करावे जे या जीवनात आमची परतफेड करू शकत नाहीत. हे करण्यासाठीं आम्हीं कसे प्रेरित झालें पाहिजे? “नीतिमानाच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल” (लूक 14:14).

पुनरुत्थानाच्या आशेने त्यांस आकार मिळतो कीं नाही हे पाहण्यासाठीं आपल्या सांप्रत जीवनाकडे निक्षून पाहण्याचे हे एक मूलभूत पाचारण आहे. आपण या जगातील लाभाच्या आधारे निर्णय घेतो का, किंवा पुढील जीवनाच्या लाभावर? पुनरुत्थान असेल तरच आम्हीं प्रेमाखातर धोका पत्करतो का हे शहाणपणाचे म्हणून समजाविता येऊ शकते?

पुनरुत्थानाचे मूलभूत परिणाम व्हावेत म्हणून आयुष्यभरासाठीं आपले पुनर्समर्पण करण्यात देव आमची मदत करो.

26 फेब्रुवारी : जेव्हां देव 100 टक्के आमच्या पक्षाचा बनतो

Alethia4India
Alethia4India
26 फेब्रुवारी : जेव्हां देव 100 टक्के आमच्या पक्षाचा बनतो
Loading
/

त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. (इफिस 2:3)

देवाचा सर्व क्रोध, सर्व दंडाज्ञा ज्यांस आम्हीं पात्र आहोत, त्या सर्व येशूवर ओतण्यात आल्या. सिद्ध नीतिमत्वासाठीं देवाच्या सर्व मागण्या ख्रिस्ताद्वारे पूर्ण करण्यात आल्या. ज्या क्षणी आपण (कृपेद्वारे!) हा खजिना पाहतो, आणि त्याचा या प्रकारे स्वीकार करतो, त्या क्षणी त्याचा मृत्यू हा आपला मृत्यू आणि त्याची दंडाज्ञा ही आपली दंडाज्ञा आणि त्याचे नीतिमत्व हे आपले नीतिमत्व असें गणले जाते आणि त्या क्षणी देव अपरिवर्तनीयपणे 100 टक्के आपल्या पक्षाचा बनतो.

याने हा प्रश्न अनुत्तरित राहतो कीं, ”पवित्र शास्त्र हे शिकवीत नाही का कीं अनंतकाळात देवानें निवडीमध्ये आमच्यावर आपली कृपा प्रकट केलीं?“

दुसऱ्या शब्दांत, विचारशील लोक विचारतील, “देव केवळ विश्वास आणि ख्रिस्तासोबत ऐक्य व नीतिमान ठरविल्या जाण्याच्या क्षणी 100टक्के आपल्या पक्षाचा बनतो का? जगाच्या स्थापनेच्या आधी निवडीच्या कार्यात तो 100 टक्के आपल्या पक्षाचा बनला नव्हता का?“ इफिस 1:4-5 मध्ये पौल म्हणतो, “त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्यानें (देवानें) जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्यानें आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.”

मग देव अनंतकाळापासूनच 100 टक्के निवडलेल्यांच्या पक्षाचा बनत नाही का? उत्तर “100 टक्के”च्या अर्थावर आधारित आहे.

“100 टक्के” या संज्ञेद्वारे, मी पवित्रशास्त्राच्या कित्येक अनुच्छेदात आढळणारे बायबलचे सत्य राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. उदाहरणार्थ, इफिस 2:3 मध्ये पौल म्हणतो कीं ख्रिस्ती विश्वासणारे ख्रिस्त येशूमध्ये जिवंत करण्यापूर्वी “क्रोधाची प्रजा” होते : त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.

पौल म्हणतो कीं, आपल्या नव्या जन्मापूर्वी – म्हणजे आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत करण्यापूर्वी – आपल्यावर देवाचा क्रोध होता. निवडलेले क्रोधाच्या अधीन होते. जेव्हां देवानें आम्हांला ख्रिस्त येशूठायी जिवंत केले आणि ख्रिस्ताचे सत्य आणि सौंदर्य पाहण्यासाठीं आम्हांला जागृत केले तेव्हां हे बदलून गेले यासाठीं कीं आम्हीं त्याला आमच्यासाठीं मृत्यू पावलेला म्हणून आणि ज्याचे नीतिमत्व आमच्या येशूबरोबरच्या ऐक्यामुळे गणले गेले आहे अशा व्यक्तीच्या रूपात ग्रहण करावे. आमच्यासोबत असे घडण्यापूर्वी आम्हीं देवाच्या क्रोधाच्या अधीन होतो. मग, ख्रिस्तामधील विश्वासामुळे आणि त्याच्याशी एकजुट झाल्या कारणास्तव, देवाचा सर्व क्रोध दूर झाला आणि त्या अर्थाने, तो 100टक्के आपल्या पक्षाचा झाला.

म्हणून, या सत्यामध्ये आनंदित व्हा कीं देव तुमचा सांभाळ करेल. तो तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवील कारण ख्रिस्ताठायी तो तुमच्यासाठीं 100 टक्के आहे. आणि म्हणूनच, शेवटपर्यंत पोहोचणे हे देवाला आपल्यासाठीं 100 टक्के बनवत नाही. तो तुमच्यासाठीं आधीच 100 टक्के आहे या तथ्याचा तो परिणाम आहे.

25 फेब्रुवारी : तू परमप्रिय आहेस

Alethia4India
Alethia4India
25 फेब्रुवारी : तू परमप्रिय आहेस
Loading
/

त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेलें असताही त्यानें आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेलें आहे (इफिस 2:3-5).

गब्रीएल स्वर्गदूताने तुम्हाला असे म्हणतांना आवडणार नाही का कीं, “तू परमप्रिय आहेस?”

दानीएलासोबत हे तीनदा घडले.

  • “तुझ्या प्रार्थनांना आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परमप्रिय आहेस.” (दानीएल 9:23)
  • “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” (दानीएल 10:11)
  • तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” (दानीएल 10:19)

मी हे कबूल करतो कीं दरवर्षी जेव्हां मी बायबल वाचतो आणि ही वचने पाहतो, तेव्हां मी ती घेऊन स्वतःस लागू करू इच्छितो. मला देवाला हे म्हणतांना ऐकावेसे वाटते कीं, “तू परमप्रिय आहेस.”

खरे म्हणजे, मी हे ऐकतो. आणि तुम्हीं देखील ते ऐकू शकता. जर तुमच्याठायी येशूवर विश्वास असेल, तर देव स्वतः त्याच्या वचनात तुम्हाला म्हणतो – जे देवाचा दूत म्हणतो त्यापेक्षा अधिक निश्चित आहे – “तू परमप्रिय आहेस.”

इफिस 2:3-5,8 मध्ये असे लिहिलेले आहे : आम्हीं ”इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेलें असताही त्यानें आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, …कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेलें आहे.”

हेच एकमेव ठिकाण आहे जेथे पौल “अपरंपार प्रेम” या अद्भुत वाक्यांशाचा उपयोग करतो. आणि ते देवदूताच्या वाणीपेक्षा उत्तम आहे. जर तुम्हीं येशूकडे सत्य म्हणून पाहिले आहे आणि त्याला तुमचा श्रेष्ठ खजिना म्हणून स्वीकारले आहे, अर्थात जर तुम्हीं ”जिवंत” असाल, तर तुम्हीं परमप्रिय आहात. विश्वाच्या निर्माणकर्त्याने तुम्हांवर अपरंपार प्रीती केलीं. याचा विचार करा! परमप्रिय बंधुजन!

24 फेब्रुवारी : देव अंतःकरण उघडतो

Alethia4India
Alethia4India
24 फेब्रुवारी : देव अंतःकरण उघडतो
Loading
/

तेथें लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे उघडलें कीं, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.(प्रेषितांची कृत्ये 16:14)

ज्यां ज्यां ठिकाणी पौलाने सुवार्ता गाजविली तेथें काहींनी विश्वास ठेवला आणि काहींनी नाही. आम्हीं हे कसे समजावे कीं अपराध आणि पातकांत मृत असलेल्या काही लोकांनी विश्वास ठेवला आणि काहींनी नाही (इफिस 2:1,5)?

काहींनी विश्वास का ठेवला नाही  याचे उत्तर हे आहे कीं “त्यांनी त्याचा अव्हेर केला” (प्रेषितांची कृत्ये 13:46) कारण सुवार्तेच्या गोष्टीं त्यांना “मूर्खपणाच्या वाटतात” आणि त्यांना “त्या समजू शकणार नाहीत” (1 करिंथ 2:14). देहस्वभाव “हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही” (रोम 8:7).

प्रत्येक जण जो सुवार्ता ऐकतो आणि त्याचा अव्हेर करतो “तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकींस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही” (योहान 3:20). त्यांची “बुद्धी अंधकारमय झाली आहे… त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन” राहते (इफिस 4:18). हे सदोष अज्ञान आहे. सत्य तर प्रकट आहे, पण ते “अनीतिने सत्य दाबून ठेवतात” (रोम 1:18).

पण मग, जरी सर्व जण अंतःकरणाच्या या बंडखोर कठीणपणाच्या दशेत आहेत, व आपल्या अपराधांत मेलेले आहेत तरी काही लोक विश्वास का ठेवतात? प्रेषितांच्या कृत्यांचे पुस्तक कमीत कमी तीन वेगळ्या पद्धतीने याचे उत्तर देते. एक हे आहे कीं त्यांना विश्वास ठेवण्यासाठीं नेमण्यात आले आहे. जेव्हां पौलाने अंत्युखियातील पिसिदिया येथें सुवार्ता गाजविली, तेव्हां परराष्ट्रीय आंनदीत झालें आणि “जितके सार्वकालिक जीवनासाठीं नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला” (प्रेषितांचे कृत्ये 13:48).

काही लोक विश्वास का ठेवतात याचे आणखी एक उत्तर असें कीं देवानें त्यांना पश्चातापबुद्धी दिली. जेव्हां यरूशलेमातील पवित्र जनांनी हे ऐकले कीं यहूदीच नव्हे तर परराष्ट्रीयदेखील सुवार्तेस प्रतिसाद देत होते, तेव्हां ते म्हणाले, “देवानें परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चातापबुद्धी दिली आहे” (प्रेषितांचे कृत्ये 11:18).

परंतु व्यक्ती सुवार्तेवर विश्वास का ठेवतो या प्रश्नाचे प्रेषितांच्या कृत्यामधील सर्वात स्पष्ट उत्तर हे आहे कीं देव अंतःकरण उघडतो. लुदिया याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. तिने का विश्वास ठेवला? प्रेषितांची कृत्ये 16:14 म्हणते, “तिचे अंतःकरण प्रभूने असे उघडलें कीं पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.”

जर तुम्हीं येशूवर विश्वासणारे असाल, तर या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडल्या आहेत : तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठीं नेमण्यात आले होते; तुम्हाला पश्चातापबुद्धी देण्यात आली होती; आणि देवानें तुमचे अंतःकरण उघडले होते. तुमचे उर्वरित जीवन तुम्हीं विश्वासणारे आहात या चमत्काराप्रत अद्भुत कृतज्ञतेने ओतप्रोत असले पाहिजे.

23 फेब्रुवारी : असामान्य धोक्याची घटका

Alethia4India
Alethia4India
23 फेब्रुवारी : असामान्य धोक्याची घटका
Loading
/

ख्रिस्ताच्या नावामुळें तुमची निंदा होत असल्यास तुम्हीं धन्य आहां; कारण गौरवाचा आत्मा म्हणजें ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहें.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो. (1 पेत्र 4:14)

आज जगातील अनेक ख्रिस्ती लोकांस ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे येणाऱ्या जीवघेण्या धोक्याची जाणीव नाही. आम्हांला छळमुक्त जीवन जगण्याची सवय झालेंली आहे. असे वाटते कीं सर्वकाही असेच असले पाहिजे.

म्हणून, परिस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते या धोक्याला आमची पहिली प्रतिक्रिया बहुधा संतापाची असते. पण तो संताप या गोष्टीचे चिन्ह असू शकतो कीं आम्हीं प्रवासी व परदेशवासी आहोत ही जाणीवच आम्हीं गमावून बसलो आहोत (“प्रियजनहो, जे तुम्हीं ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात…” 1 पेत्र 2:11).

कदाचित आम्हीं या जगात फारच मुळावलेले आहोत. आम्हांला ख्रिस्तासाठीं स्वर्गीय घराची आठवण येत नाही जशी पौलाला येत असे : “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत” (फिलिप्पै 3:20).

आमच्यापैकीं अनेकांस आठवण करून देण्याची गरज आहे, “प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठीं जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झालें असे वाटून त्याचे नवल मानू नका.” (1 पेत्र 4:12). हे विचित्र नाही.

तुम्हीं कधी विचार केला आहे कीं शेवटच्या परीक्षेच्या घटकेत तुमचे काय होईल? बंदूकधार्याने तुमच्यावर नजर ठेवली आहे आणि तो तुम्हाला विचारतो, ”तू ख्रिस्ती आहेस का?“ तुम्हाला ही आशा देण्यासाठीं एक कठोर शब्द आहे कीं तुम्हीं विचार करता त्यापेक्षा उत्तम करू शकता.

पेत्र म्हणतो, “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्हीं धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो” (1 पेत्र 4:14). पेत्राकडून हे प्रोत्साहन म्हणते कीं असामान्य धमकींच्या घटकेत (अपमान असो व मृत्यू) “गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा आमच्यावर येऊन राहतो.” याचा अर्थ हा नाही का कीं आपण ख्रिस्ती असल्यामुळे जे संकटसमयी दुःख सोसतांत देव त्यांना विशेष मदत पुरवितो?

माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही कीं तो आमच्या इतर क्लेशांत तो गैरहजर राहतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ केवळ हा आहे कीं पेत्र कल्पनेपलीकडे जाऊन असें म्हणतो कीं जे “ख्रिस्ताच्या नावामुळे” दुःख सोसतात त्यांना आपणांवर “गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा” “येऊन राहण्याचा” विशेष अनुभव येईल. प्रार्थना करा कीं जेव्हां परीक्षा येतात तेव्हां तुम्हीं देखील हेंच अनुभवाने जाणून घ्यावें. त्या क्षणी धैर्याची साधनसामुग्री असेल जी इतर प्रसंगी आमच्याजवळ नसते. धैर्य धरा.

22 फेब्रुवारी : त्याच्या पूर्णतेचा आनंद घेणें

Alethia4India
Alethia4India
22 फेब्रुवारी : त्याच्या पूर्णतेचा आनंद घेणें
Loading
/

“त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.” (योहान 1:16)

मागच्या रविवारी उपासना सभेच्या लगेच पूर्वी, प्रार्थना करणाऱ्या संताची लहान टोळी प्रार्थनेत आपल्या लोकांच्या विश्वासासाठीं, आणि दुहरे शहरांतील मंडळ्यांसाठीं, आणि राष्ट्रांसाठीं लढण्याकरिता परिश्रम करीत होती. एका क्षणी एका व्यक्तीने योहान 1:14,16 चे शब्द घेऊन प्रार्थना केलीं :

शब्द देही झाला व त्यानें आम्हांमध्ये वस्ती केलीं, आणि आम्हीं त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.

तो क्षण माझ्यासाठीं जणूकाही एपिफनी अर्थात देवाच्या प्रकटीकरणाचा क्षण होता.  देवानें त्या क्षणी – त्याच्या पूर्णतेतून  “पूर्णता” या शब्दाने पूर्णता वाहून न्यावी असे केले जे माझ्यावरील त्याच्या प्रभावासाठीं असामान्य गोष्ट होती. त्या शब्दाचा खरोखर जो अर्थ आहे त्याचा काही अंश मला जाणावला – ख्रिस्ताची पूर्णता.

मला त्यां शब्दांची काही चमत्कृति जाणवली, होय, मला खरोखर त्याच्या पूर्णतेतून कृपेवर कृपा मिळाली आहे. आणि त्या क्षणी मी कृपेवर कृपा प्राप्त करीत होतो. त्याचवेळी मला जाणवले कीं सर्व दुपार त्याच्या चरणावर बसून – किंवा माझे पवित्र शास्त्र वाचत राहण्यावाचून – दुसरी कुठलीच गोष्ट इतकीं मधूर नाही आणि मला त्याची परिपूर्णता ओसंडून वाहतांना जाणवली.

ह्या परिपूर्णतेचा मजवर इतका प्रभाव का पडला – आणि या क्षणापर्यंत तिचा मजवर असामान्य परिणाम का घडत आहे? त्याची कांही कारणें अशी कीं…

  • ज्याच्या परिपूर्णतेद्वारे मी कृपेने चिंब भिजत आहे तो आहे शब्द जो देवासोबत होता आणि तो शब्द देव होता (योहान 1:1-2), म्हणून त्याची परिपूर्णता देवाची परिपूर्णता आहे – दैवीय पूर्णता, अमर्याद पूर्णता;
  • हा शब्द देही झाला, आणि म्हणून आम्हांपैकीं एक होता, आणि त्याच्या परिपूर्णतेने आमचा पाठपुरावा करीत होता – ही पूर्णता सुगम आहे;
  • जेव्हां हा शब्द मानव रूपात प्रगट झाला, तेव्हां त्याचे गौरव दिसून आले – त्याची पूर्णता गौरवी आहे;
  • हा शब्द “पित्यापासून एकुलता एक पुत्र” होता (योहान 1:14) यासाठीं कीं दैवीय पूर्णता केवळ देवाकडूनच नव्हे, तर देवाद्वारे मजपर्यंत पोहोचविली जावी – देवानें त्याची पूर्णता पूरविण्यासाठीं देवदूतास पाठविले नाही तर त्याच्या एकुलत्या एका पुत्रास पाठविले;
  • पुत्राची पूर्णता कृपेची परिपूर्णता आहे – मी ह्या परिपूर्णतेत बुडणार नाही पण या परिपूर्णतेद्वारे सर्व प्रकारे आशीर्वादित  होणार आहे;
  • ही पूर्णता केवळ कृपेची परिपूर्णता नाही, तर सत्याची परिपूर्णता देखील आहे – सत्याकडे दुर्लक्ष करून खुशामत करण्यासाठीं मला ही कृपा देण्यात येत नाही; तर ही कृपा खडकासारख्या मजबूत वास्तविकतेत मुळावलेली आहे.

तर मग, ख्रिस्ताच्या परिपूर्णतेद्वारे मला आश्चर्य वाटेल आणि मी आनंदाने परिपूर्ण होईन यात काही आश्चर्य आहे का!