ArchivesSolid Joys

13 फेब्रुवारी : परिपूर्ण असें नगर

Alethia4India
Alethia4India
13 फेब्रुवारी : परिपूर्ण असें नगर
Loading
/

त्यानें त्यांच्यासाठीं नगर तयार केलें आहे. (इब्री 11:16)

तिथें कोणतेहि प्रदूषण नाहीं, किंवा भित्तिचित्र नाहीं, वा कचरा नाहीं, रंगाचे पापुद्रे काढणें नाहीं किंवा निकामी वस्तूंची खोली नाहीं, वाळलेलें गवत किंवा तुटलेल्या बाटल्या नाहींत, चवाठ्यांवर तापलेल्या चर्चा नाहींत, सर्वांसमक्ष तोंडावर फटकारणें नाहीं, घरगुती भांडणे किंवा हिंसा नाहीं, रात्र-प्रहरी धोके नाहीं, जाळपोळ नाहीं किंवा खोटे बोलणे किंवा चोरी करणे किंवा जीवें मारणे नाहीं, वा तोडफोड नाहीं आणि कुरूपता तर नाहींच. 

देवाचे हें नगर परिपूर्ण असें असेल, कारण देव स्वतः तिथें आपली वस्ती करील. तो त्यां नगरांत वावरील, संभाषण करील आणि त्याचा प्रत्येक कानाकोपरा स्वतःच्या उपस्थितीने भरून टाकील. जे काही चांगले व मनोरम व पवित्र व अनुकूल व सत्य व हर्षाने भरलेले आहे ते सर्व तिथें असेल, कारण देव स्वतः तिथें आपली वस्ती करील.

तिथें परिपूर्ण न्याय केला जाईल आणि ज्यांनी या जगात ख्रिस्ताची आज्ञापालन करून जें जें दु:ख भोगले त्यां प्रत्येक दु:खाचे हजारपट प्रतिफळ दिलें जाईल. आणि ते कधीहि क्षय पावणार नाहीं. किंबहुना, अनंतकाळ जसजसा वाढत जाणाऱ्या आनंदासह सार्वकालिकतेंत विस्तारत जातो, तसतसा त्या प्रतिफळाचा उजळपणा अधिकच तेजस्वी होईल.

जेव्हां तुम्हीं ह्या नगराची पृथ्वीवरील इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक उत्कंठा धरतां, तेव्हां तुम्हीं देवाचा आदर करता, जो इब्री 11:10 नुसार, त्यां नगराचा योजक व उभारणारा आहे. आणि देवाचा आदर केला जातो तेव्हां तो प्रसन्न होतो व आपणाला तुमचा देव म्हणवून घ्यायला त्याला तुमची लाज वाटत नाहीं.

12 फेब्रुवारी : लिंकन व देवाची कृपा-योजना

Alethia4India
Alethia4India
12 फेब्रुवारी : लिंकन व देवाची कृपा-योजना
Loading
/

अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत (रोमकरांस  11:33)

अब्राहम लिंकन, ज्यांचा जन्म 1809 साली आजच्याच दिवशी झाला होता, तें त्यांच्या चाळीशीत धर्माबाबत संशयी व तर कधी कधी धर्माचा उपहास करणारे असें देखील होते. पण कश्याप्रकारे ते वैयक्तिकरित्या स्वतःवर व देशावर आलेले संकट यामुळें देवापासुन दूर  जाण्याऐवजी देवा जवळ आले हे पाहणे लक्षवेधी आहे. 

1862 साली जेव्हां लिंकन 53 वर्षाचे होते तेव्हां त्यांचा मुलगा विली याचे निधन झालें, त्या “दु:खातून बाहेर पडण्यासाठीं त्यांची पत्नी न्यू एज या गूढवादी शिक्षणाकडे वळाली”, तर लिंकन हे न्यूयॉर्क एव्हेन्यू, प्रेस्ब्यटेरियन चर्च वॉशिंग्टन येथील पाळक फिनेयास गर्ली यांचा शिक्षणाकडे वळाले.

आणि जसा कीं श्रीमान गरले उल्लेख करतांत, अनेक वैयक्तिक चर्चां नंतर लिंकन यांचा “ख्रिस्तामध्यें नवा जन्म झाला.” लिंकन यांनी अनेक वेळा उघड केलें कीं, “ख्रिस्ताला सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही, या भावनेने मी अनेक वेळा माझ्या गुडघ्यांवर येऊन प्रार्थना केलीं.”

त्याच बरोबर, जखमी व मरण पावलेले सैनिक यांची यातना त्यांना रोज व्यथित करीत असें. वॉशिंग्टन येथें जखमी सैनिकांसाठीं पन्नास दवाखाने होते व कॅपीटॉलच्या इमारतीमध्ये जखमींसाठीं दोन हजार बेड उपलब्ध केले गेले होते.

या तात्पुरत्या स्वरुपाच्या दवाखान्यामध्ये रोज पन्नास सैनिकांचा मृत्यू होत असे. या सर्व गोष्टींमुळे लिंकन देवाच्या कृपेच्या अधिक जवळ येत गेलें. “ज्याने हे जग निर्माण केले, त्यावर आज देखील त्याचीच सत्ता आहे, यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपण कांहीच करूं शकत नाहीं.

त्यांचा हत्येच्या एक महिना अगोदर, आपल्या दुसर्‍या कार्यकालाच्या भाषणाच्या वेळी त्यांनी गृहयुद्‌ध व देवाची कृपायोजना यांतील परस्पर संबंधावर आपलं सर्वात प्रसिद्ध वक्तव्य केलं. देव हा संयुक्त किंवा संघ राज्याच्या बाजूने नाही हे त्यांचे उदद्गार खूप उल्लेखणीय आहेत . देवाच्या स्वताच्या योजना असतात व तो दोन्ही बाजू कडील पापासाठीं कुठलीहि सबब (काही केले तरी अद्दल घडणार नाही अशी स्थिती) मानत नाही.

               आम्हीं  एकनिष्ठेने आशा करतो – आम्हीं तत्परतेने प्रार्थना करतो –कीं हे युद्धाचे मोठे अरिष्ट लवकरच संपुष्टात यावें.

तरी सुद्धा, देवाची इच्छा असेल कीं ते सुरू रहावे, दासांनी दोनशे वर्ष कष्ट करून मिळवलेल्या संपतीचा पूर्ण -हास झाला तरी, जो पर्येंत चाबकाच्या फट्कयांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची परतफेड तलवारीने होत नाही तो पर्येंत जरी युद्धं सुरू राहिले तरी देखील, आणि तीन हजार वर्षापूर्वी जसें नमूद केले होते, तें आजहि ओरड करून सांगितले गेलें पाहिजें कीं, “देवाचे सर्व न्याय योग्य व नीतिमान आहेत, हेच सत्य आहे.”

मी तुम्हां सर्वांकरिता, ज्यांनी काही तरी गमावले आहे, जे अतोनात दु:खात आहेत व जे वेदनेत आहेत, अशी प्रार्थना करितो,  कीं जशी लिंकन यांना आली तशी तुम्हाला देखील या गोष्टीची प्रचिती यावी, कीं आपण हताश होऊन सर्व दोष नियतीवर न देता, देवाचे अगाध ज्ञान व त्याच्या कृपा-योजनांवर आपण गाढ भरवंसा ठेवावा.

11 फेब्रुवारी : श्रेष्ठ दासत्व

Alethia4India
Alethia4India
11 फेब्रुवारी : श्रेष्ठ दासत्व
Loading
/

कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झालें, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झालें तो ख्रिस्ताचा दास आहे. (1 करिंथकरांस 7:22)

पौलानें “प्रभू” चा पर्यायी शब्द “धनी”  आणि “ख्रिस्त” चा पर्यायी शब्द मशीहा उपयोगात आणला असतां तर माझ्यामते ते अधिक बरें झालें असतें.

पौल आम्हांला गुलामगिरीतून मोकळे केलें जाण्याच्या कृतीचा परस्पर संबंध येशू बरोंबर ह्या अर्थानें जोडतो कीं तो आमचा धनी आहे  (“गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य”). आणि तो आपल्या नव्या दासत्वाचा (“ख्रिस्ताचा दास”)  परस्पर संबंध येशू बरोंबर ह्या अर्थानें जोडतो कीं तो आमचा मशीहा आहे. ही गोष्ट जरा विलक्षण वाटते कारण मशीहा जेव्हां आला तो ते आपल्या लोकांना त्यांना कैद करणाऱ्यांपासून सोडविण्यांस आला होता; आणि धनी आपल्या दासांवर प्रभूत्व करतांत.

तो असे का म्हणतो? तो मशीहाचा संबंध (मुक्तीऐवजी) गुलामगिरीला आणि मुक्तीचा संबंध (गुलामीऐवजी) धन्याला का जोडतो?

प्रस्ताव : या पर्यायाचे आपल्या नव्या स्वातंत्र्यावर दोन परिणाम, आणि आपल्या नव्या दासत्वावर दोन परिणाम झालें आहेत.

एकीकडे, जेव्हां तो आम्हांला “गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य” असें म्हणतो, तेव्हां तो आपल्या नव्या स्वातंत्र्याची खात्री देतो त्यांच वेळीं तिला मर्यादितहि करतो :

1. त्याचे प्रभुत्व इतर सर्व प्रभूंवर आहे (म्हणजे तो प्रभूंचा प्रभू आहे); त्यामुळे आम्हांला मोकळे केलें जाणें हें निर्विवाद आहे — म्हणजे पूर्णपणे सुरक्षित.

2. परंतु, जरी आपण इतर सर्व प्रभूंपासून स्वतंत्र केलें गेलों असलों, तरी आपण त्याच्यापासून स्वतंत्र नाही. आपले स्वातंत्र्य कृपेनें मर्यादित आहे. येशू आपला धनी आहे.

तर दुसरीकडे, जेव्हां तो आम्हांला “ख्रिस्ताचा दास” म्हणतो, तेव्हां तो आपल्या ह्या नव्या गुलामगिरीला विसावा देणारी व गोड असें नवे स्वरूप देतो :

1. मशीहा आपल्या लोकांना त्यांना बंदिस्त करणाऱ्याच्या बंधनांतून सोडवून विसाव्याच्या मोकळ्या ठिकाणी आणण्यासाठीं त्यांना आपल्या ताब्यात घेतो. “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार” (यशया 9:7).

2. मग तो त्यांना अत्यंत गोड असा आनंद देण्यासाठीं त्यांना स्वतःचे लोक बनवतो. “पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन” (स्तोत्र 81:16). आणि तो खडक तर ख्रिस्त, म्हणजे मशीहा आहे.

म्हणून, प्रिय ख्रिस्ती बंधुजनहो, यांत आनंद करा: “ज्याला प्रभूमध्ये पाचारण झालें, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे” धनी. “तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झालें तो ख्रिस्ताचा दास आहे” –मशीहा जो दासत्वाला विसावा देणारी व गोड अशी गोष्ट बनवितो.

10 फेब्रुवारी : तारणदायी विश्वास सहज समाधानी होत नाही

Alethia4India
Alethia4India
10 फेब्रुवारी : तारणदायी विश्वास सहज समाधानी होत नाही
Loading
/

ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. (इब्री 11:15-16)

विश्वास हा देवानें प्रतिज्ञा केलेल्या भविष्याकडे पाहतो आणि त्याची “उत्कंठा” धरतो. “पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात.” यावर क्षणभर विचार करा.

असे बरेच लोक आहेत जे तारणदायी विश्वासाचे स्वरूप बदलून त्याचे कार्यकारी महत्व कमी करतांत, म्हणजे ते त्याची अशी व्याख्या करतांत कीं विश्वास हा जणू मनुष्याच्या स्वतंत्र इच्छेनें घेतलेला निर्णय आहे, ज्यांमध्यें तो कशाची उत्कंठा करतो किंवा कशाचा शोध घेतो यांत कांहीच बदल घडून येत नाहीं. परंतु बायबलमध्यें दिलेल्या महान विश्वासाचा अध्याय, इब्री 11, यांत असलेल्या या वचनाचा मुख्य मुद्दा हा आहे कीं विश्वासाने जगणे आणि मरणे याचा अर्थ नव्या उत्कंठा धरणे आणि नव्या तृप्तींचा शोध घेणे असा होतो.

वचन 14 म्हणते कीं प्राचीन काळातील पवित्र लोक (ज्यांची इब्री 11 मध्ये त्यांच्या विश्वासाबद्दल प्रशंसा केलीं जात आहे)   स्वतःच्या अशा देशाचा शोध करित होते जे ह्या जगापेक्षा वेगळे आहे. आणि वचन 16 म्हणते कीं ते वर्तमान पृथ्वीवरील जीवन जे कांही देऊं करते त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीची उत्कंठा करित होते : “ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात.”

त्यांना देवानें इतके घट्ट पकडले होते कीं, देवावांचून त्यांना इतर कोणत्याहि गोष्टींत समाधान नव्हते.

तर मग, खरा तारणदायी विश्वास हा आहे: देवाची अभिवचने दुरून पाहणे, आणि आपण जी मूल्ये धरतो त्यांत बदल घडवून आणणे जेणेकरुन आपण जगाने जे काही देऊं केले आहे त्यापेक्षा अधिक देवाच्या अभिवचनांची उत्कंठा धरतो आणि त्यांचा शोध घेतो आणि त्यांवर विश्वास ठेवतो.

9 फेब्रुवारी : धन, यौन-क्रीडा आणि सामर्थ्य,यांपेक्षाउत्तम

Alethia4India
Alethia4India
9 फेब्रुवारी : धन, यौन-क्रीडा आणि सामर्थ्य,यांपेक्षाउत्तम
Loading
/

म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. (इब्री 10:35)

आपण देवाचे श्रेष्ठत्व ह्या जगाने आपल्याला जें काही देऊ केलें आहे त्यापेक्षा मोठे प्रतिफळ मानावें. जर आपण देवाचे श्रेष्ठत्व मोठे प्रतिफळ मानले नाही तर मग आपणहि नाश होत असलेल्यां लोकांसारखे ह्या जगावर प्रीति करणारे व त्यांच्यासारखे जीवन जगणारे ठरू.

म्हणून, हें जग ज्यां गोष्टींकडे वेड्यासारखे धावते त्यां गोष्टी विचारात घ्या आणि तुलनेने देव किती चांगला आणि स्थिर आहे यावर विचार करा. धन किंवा यौन-क्रीडा किंवा कोणतेहि सामर्थ्य घ्या आणि मृत्यूच्या संबंधात त्यांवर विचार करा. मृत्यू या सर्वांना गिळून टाकील. जर तुम्हीं त्यासाठीं जगत आहां, तर तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आणि जे थोडके मिळेल तेहि तुम्हीं गमावाल.

पण देवाचे धन कल्पनेपलीकडे उत्तम आहे आणि ते टिकून राहते. ते मृत्यूलाहि पार करते. हे पैशापेक्षा उत्तम आहे कारण देव सर्व पैशाचा स्वामी आहे आणि तो आपला पिता आहे. आम्हीं त्याचे वारस आहोत. “सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्हीं ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे” (1 करिंथकरांस 3:22-23). अहाहा!

हे यौन-क्रीडेपेक्षा उत्तम आहे. येशूनें कधीही लैंगिक संबंध ठेवले नाहीत, आणि तो मनुष्यांमध्यें सर्वात सिद्ध आणि पूर्ण मानव होता. यौन-क्रीडा ही छाया आहे — एक प्रतिमा — एका मोठ्या सत्याची, नातेसंबंधाची आणि आनंदाची छाया जिच्या तुलनेंत सर्वात रोमांचक यौन-क्रीडा देखील जांभई दिल्यासारखी वाटेल.

देवाचे प्रतिफळ अधिकार किंवा सामर्थ्य यांपेक्षा उत्तम आहे. सर्वसमर्थ देवाची संतती व्हावे यांपेक्षा कोणतीही मानवी-शक्ती मोठी नाही. “आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हांला ठाऊक आहे ना?” (1 करिंथकरांस 6:3). “मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन ” (प्रकटीकरण 3:21).

या विषयावर आपण आणखी पुष्कळ बोलूं शकतो, कारण हा विषय वाढतच जाईल. जग आपल्याला जे काही देऊं पाहते, देव अधिक श्रेष्ठ आणि सनातन आहे.

कोणतीहि तुलना नाही. देव विजयी होतो – प्रत्येक वेळी. तर प्रश्न हा आहे: तो आमच्या जवळ आहे का? काय आपण या मती गुंग जगाच्या थडग्यांतून जागे होऊन बाहेर निघून जे खरोखर वास्तविक, असीम मौल्यवान आणि सार्वकालिक आहे त्याकडे पाहणार आणि त्यावर विश्वास ठेवणार आणि त्यांत आनंद मानणार आणि त्यावर प्रीति करणार का?

8 फेब्रुवारी : तुम्हीं देव नाहीं याचा तुम्हांला आनंद वाटतो का?

Alethia4India
Alethia4India
8 फेब्रुवारी : तुम्हीं देव नाहीं याचा तुम्हांला आनंद वाटतो का?
Loading
/

अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा; परमेश्वराचा गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा! (स्तोत्र 96:7)

जेव्हां स्तोत्रकर्ता “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणा” असें म्हणतो तेव्हां तो येथें त्याला आलेल्या अनुभवाचे किमान कांही प्रमाणांत वर्णन करित आहे. आपण “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणतो” तेव्हां आपण नेमके काय करत असतो?

प्रथम, देवाच्या कृपेने, आपण देवाकडे चित्त लावतो आणि तो किती सामर्थ्यवान आहे हे पाहतो. आम्हीं त्याच्या सामर्थ्यकडे निरखून पाहतो. मग आम्हीं त्याचे सामर्थ्य किती महान आहे ह्याविषयी साक्ष देतो. आम्हीं त्याचे महत्व लक्षात घेऊन जसे कौतुक केले पाहिजे तसे ते करतो.

त्याचे सामर्थ्य अद्भूत असल्याची आपल्याला जाणीव होते. पण ती अद्भुत गोष्ट ज्यांमुळें आपण इतके आश्चर्यचकित होतों कीं आपल्या तोंडून “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणा” असें शब्द उसळून निघतांत- – ती गोष्ट म्हणजे ही कीं आपल्याला विशेषकरून याचा आनंद होतो कीं ही सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमची नाही.

तो अति सामर्थ्यवान आहे आणि आपण दुर्बळ आहों या वस्तुस्थितीत आम्हीं स्वतःला सामर्थ्यवान समजतो. हे सत्य अशाप्रकारे आहे हे आपल्याला आवडते. देवाच्या सामर्थ्याचा आपल्याला हेवा वाटत नाहीं. आम्हीं त्याच्या सामर्थ्याचा लोभ करित नाहीं. सर्व सामर्थ्य त्याचे आहे यांत आम्हीं आनंदाने भारावून जातो.

आपले संपूर्ण व्यक्तित्वमत्व, म्हणजे जे कांही मी आहे ते सर्व, स्वतःतून बाहेर निघून त्याच सामर्थ्याकडे निरखून पाहण्यात आनंदित होते – जणू काही आपण आपल्या बाजूच्या धावपट्टीवर धावत असलेल्या धावपटूचा विजयोत्सव साजरा करतो ज्याने आपल्याला शर्यतीत पराभूत केले होते आणि आपण आपल्या पराभवावर दांत खात बसण्याऐवजी त्याच्या सामर्थ्याचे कौतुक करण्यात आपला सर्वात मोठा आनंद मानतो.

जेव्हां आपली अंतःकरणे स्वतःच्या शक्तीवर अभिमान बाळगण्याऐवजी किंवा स्वतःची प्रौढी मिरविण्याऐवजी देवाच्या सामर्थ्याचे वाखाणे करण्यासाठीं स्वतःहून फुटून पडतात तेव्हां आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन काय आहे तें समजते. आपल्याला  एका अद्भुत सत्याचा शोध लागतो: आपण देव नाहीं हे सत्य अत्यंत समाधान देणारे आहे, म्हणून देव बनण्याच्या सर्व व्यर्थ कल्पना किंवा इच्छा यांचा आम्हीं त्याग करतो.

देवाच्या सामर्थ्यावर चिंतन केल्यांमुळें आपल्यामध्ये एक अशी जाणीव निर्माण होते कीं देवानें हें विश्व पुढील हेतूनें निर्माण केलें आहे: ह्यासाठीं कीं, आपल्याला आपण देव नाहीं, तर देवाचे देवपण – म्हणजे देवाचे सामर्थ्य- याचे कौतुक करण्याचा अत्यंत समाधानकारक आनंद घेता यावा. ह्या सर्वसमर्थाचे वाखाणे हाच सर्व गोष्टींचा अंतिम व पूर्णानंद देणारा शेवट (निष्कर्ष) आहे याची अनुकूल जाणीव आपल्या अंत:करणांत कायम स्थिरावते.

कोणतेहि सामर्थ्य आपल्यापासून आलें आहे अशी फुशारकी मारण्याचा क्षुल्लकहि मोह झाल्यांस आपण थरथरतो. यापासून आपले रक्षण करण्यासाठीं देवानें आपल्याला दुर्बल असें भांडे बनविले आहे: “ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने कीं, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे” (2 करिंथ 4:7).

अहाहा, काय ही प्रीति, कीं देव त्याच्या सामर्थ्याचे वाखाण करण्याचा जो सार्वकालिक शिखर आहे त्या जागी आपण आपल्या स्वतःचा अभिमान बाळगण्याचा व्यर्थ प्रयत्न करूं नये म्हणून आपले संरक्षण करतो! देव असण्या ऐवजी देवाकडे पाहणे यापेक्षा मोठा आनंद नाहीं!

7 फेब्रुवारी : शेवटच्या घटकेचेपुनरुज्जीवन

Alethia4India
Alethia4India
7 फेब्रुवारी : शेवटच्या घटकेचेपुनरुज्जीवन
Loading
/

“अहों येशू, आपण आपल्यां राजाधिकारानें याल तेव्हां माझी आठवण करा.” (लूक 23:42)

आपल्या आशेला जिवे मारणाऱ्या सर्वात मोठ्या शत्रुंपैकीं एक म्हणजे ही निराशा कीं आपण स्वतःला बदलण्यासाठीं इतके दिवस प्रयत्न केलें, तरी यशस्वी होऊं शकलों नाहीं.

तुम्हीं मागे वळून पाहता आणि विचार करतां : माझ्यां यां सर्व धावपळीचा काय उपयोग? जीवनाच्या शेवटल्या घटकेला जरी माझे पुनरुज्जीवन झालें, तरी नवी उत्पत्ती म्हणून नव्यां मार्गाने जीवन जगण्यासाठीं माझ्याकडे इतका अल्प काळ असेल कीं इतक्या वर्षांच्या अपयशाच्या तुलनेत यां अल्पकालिक नव्या जीवनाचा फारसा फरक पडणार नाही.

एकेकाळचा दरोडेखोर (म्हणजे येशूच्या बाजूला वधस्तंभावरील चोर) त्याच्या आत्म-परिवर्तनानंतर पुढील कांही तास जगला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तो बदलला होता. तो त्यां वधस्तंभावर असतांना त्यानें एक नवी वृत्ती व पश्चातापांस शोभेल असें नवें सत्कृत्य म्हणून एक नवा मनुष्य म्हणून जगला (आता तो ख्रिस्ताची निंदा करित नव्हता). पण त्याचे 99.99% आयुष्य वाया गेले. नव्यां जीवनाचे ते शेवटचे दोन तास महत्त्वाचे होते का?

होय, त्यांचं प्रचंड महत्त्व होते. एकेकाळी दरोडेखोर असलेल्या ह्या लुटारूला, आपणां सर्वांप्रमाणेच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट व्हावें लागेल ह्यासाठीं कीं त्यानें आपल्या जीवनांत केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा. “कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट झालें पाहिजे, ह्यासाठीं कीं, प्रत्येकाला, त्यानें देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो” (2 करिंथ 5:10). त्या दिवशी त्याचे जीवन त्याच्या नवीन जन्माची आणि ख्रिस्तासोबतच्या त्याच्या एकतेची साक्ष कशी देईल? ख्रिस्तामध्ये त्याचे जीवन नवे झालें होते याची खात्री कशी केलीं जाईल?

शेवटचे तास तो वृत्तांत कथन करतील. हा मनुष्य नवा होता. त्याचा विश्वास खरा होता. तो खऱ्या अर्थाने ख्रिस्ताशी एकरूप झाला आहे. तो ख्रिस्ताचे नीतिमत्व असा झाला आहे. त्याच्या पापांची क्षमा झालीं आहे.

शेवटचा न्याय होईल त्यांवेळी त्याच्या तारणाची ती शेवटची घटका ह्यांच गोष्टीची साक्ष देईल. तो बदलला आहे! आणि त्याचा बदल महत्त्वाचा ठरला. देवाच्या कृपेच्या सामर्थ्याची आणि त्याच्या विश्वासाची आणि ख्रिस्तासोबतच्या त्याच्या एकात्मतेची ती एक सुंदर साक्ष होती आणि कायम असणार.

आता आपण बदललेल्या जीवनाच्या आपल्यां मूळ संघर्षाकडे परत येऊ. मी असे म्हणत नाही कीं जे विश्वासणारे परिवर्तनाच्या बाबंतीत संघर्ष करतांत तें त्यां दरोडेखोरा प्रमाणें तारलेलें नाहींत. मी फक्त असे म्हणत आहे कीं जीवनाच्या शेवटच्या वर्षांचे व शेवटच्या तासांचे महत्त्व आहे.

जर आपण आपल्या जीवनाच्या शेवटच्या अगदी एक टक्के शिल्लक असलेल्या घटकेतहि, आपण आपल्या पापी प्रवृत्तीवर किंवा अधर्मावर विजय मिळविला जें आपल्या व्यक्तिमत्त्वात खोलवर होते किंवा दीर्घकाळापासून होते, तर ही गोष्ट वर्तमान समयी आम्हांवर झालेंल्या कृपेच्या सामर्थ्याची एक सुंदर साक्ष ठरेल; आणि ख्रिस्तावर आपण विश्वास ठेविला आहे आणि त्याच्याबरोबर एकरूप झालो आहोंत ही वास्तविकता शेवटचा न्याय केला जाईल त्यावेळी साक्षीदार ठरेल.

ह्यास्तव, तुम्हीं जे संघर्ष करित आहां तें तुम्हीं धीर धरा. विनंत्या करित रहा, शोध करित रहा, दार ठोकत रहा. ख्रिस्ताकडे पाहत असा. अगदी शेवटच्या घटकेंत दरोडेखोरांचे तारण करून जर देवाला गौरव मिळत असेल, तर तुम्हीं जे वर्षानुवर्षे पुनरुज्जीवन मिळविण्यासाठीं झटत होता ते देण्यासाठीं तो आत्तापर्यंत का थांबून होता ह्यामागे निश्चितच त्याचे कांही हेतू आहेत.

6 फेब्रुवारी : येथें निंदा, तेथें प्रतिफळ

Alethia4India
Alethia4India
6 फेब्रुवारी : येथें निंदा, तेथें प्रतिफळ
Loading
/

जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. (स्तोत्र 1:3)

स्तोत्र 1:3 मधील हे अभिवचन कशा प्रकारे ख्रिस्ताकडे इशारा करते?

अभिवचन असें म्हणते, जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” नीतिमान लोक जे काही हाती घेतांत ते सर्व सिद्धीस जाते. हा अति भाबडेपणा आहे, कीं निर्विवाद सत्य?

आपल्याला ह्या जीवनांत दुष्टांची नक्कीच भरभराट होतांना दिसून येते कीं. “जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस!” (स्तोत्र 37:7). “….. दुराचारी संपन्न झालें आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे” (मलाकी 3:15).

तर नीतिमानांना मात्र ह्या जीवनात पुष्कळ संकटांतून जावें लागते आणि त्यांच्या चांगुलपणाचे प्रतिफळ त्यांच्याशी गैरवर्तन करून दिले जाते. “जर आम्हीं आपल्या देवाचे नाव विसरलो असतो….., तर देवानें हे शोधून काढले नसते काय?  तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे; कापायच्या मेंढरांसारखे आम्हांला गणतात” (स्तोत्र 44:20-22). स्वतः स्तोत्रकर्त्यांना याची जाणीव होती. आम्हीं एखाद्या अशा गोष्टी विरोधांत आरडाओरडा करित नाहींये ज्या विषयीं त्यांना पूर्वीपासून कल्पना नव्हती.

यास्तव, जेव्हां स्तोत्रकर्ता म्हणतो, “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते,” तो त्याचा अति भाबडेपणा नाही. तर ज्यां गोष्टी त्याला ह्या जीवनांत अंधुक दिसून येतांत त्याद्वारे तो मृत्यूनंतरच्या जीवनाकडे इशारा करतो, जिथे आपण केलेल्या सर्व गोष्टींचे खरे प्रतिफळ – म्हणजे खरी समृद्धी प्रकट केलीं जाईल.

पौलाची विचारसरणी हींच होती.

प्रथम, तो मृत्यूवर ख्रिस्ताच्या विजयाचे स्तुतीगान करतो. “अरे मरणा, तुझी नांगी कोठे?’ . . जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो” (1 करिंथ 15:55, 57).

मग, तो असा अर्थ काढतो कीं, या विजयामुळेच, विश्वासनाऱ्यानी केलेले प्रत्येक श्रम सिद्धीस जाईल. “म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्हीं जाणून आहात” (1 करिंथ 15:58). जेव्हां एखादी गोष्ट व्यर्थ जात नाहीं, म्हणजेच ती सिद्धीस जाते.

ज्यां अर्थी ख्रिस्त आमचा प्रतिस्थापक म्हणून मरण पावला म्हणून, त्यां अर्थी त्यानें या गोष्टीची खात्री दिली कीं शेवटी प्रत्येक सत्कृत्य सिद्धीस जाईल. “प्रत्येक जण…… जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल” (इफिस 6:8). “जेव्हां लोक तुमची निंदा करतील तेव्हां तुम्हीं धन्य. . . . आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे” (मॅथ्यू 5:11-12). येथें निंदा केलीं. स्वर्गांत प्रतिफळ मिळेल.

जुन्या करारात जी गोष्ट अति भाबळेपणाची वाटते (“जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते”) ती ख्रिस्ताच्या कार्याकडे आणि पुनरुत्थानाच्या निर्विवाद सत्याकडे इशारा करते. कॅथरीना फॉन श्लेगेलच्या त्या महान भजनातील शब्दांप्रमाणे, “हें माझ्या जीवा, शांत बैस, हें माझ्या जीवा शांत बैस: तु तुझ्या येशूकडून भरून पावशील / तो सर्व आपल्या पूर्णत्वांतून देतो.”

5 फेब्रुवारी : सेवेचा मुख्य हेतू

Alethia4India
Alethia4India
5 फेब्रुवारी : सेवेचा मुख्य हेतू
Loading
/

परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकीं’ आपण नाहीं; तर जिवाच्या तारणासाठीं ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकीं’ आहों. (इब्रीलोकांस 10:39)

प्रेमाची तत्कालीन किंमत काय आहे त्यांकडें पाहूं नका आणि देवानें जीं अढळ अशी श्रेष्ठ अभिवचनें दिलीं त्यांवर विश्वास ठेवण्यापासून माघार घेऊं नका. जर तुम्हीं माघार घेणारें झालांत, तर तुम्हीं केवळ अभिवचनांनाच मुकणार नाहीं तर तुमचा नाशहि होईल.

आपण माघार घेतो कीं विश्वासांत टिकून राहतो हा जीवन-मरणाचा विषय आहे. आपण जें गमावतो तें केवळ असें कांही प्रतिफळ नाहीं जें तारणाबरोंबर अतिरिक्त दिलें जातें. इब्री 10:39 म्हणते, “ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकीं’ आपण नाहीं.” हा सर्वकाळासाठीं केला जाणारा शेवटचा न्याय आहे.

म्हणून, आम्हीं एकमेकांना बजावून सांगतो: माघार घेऊं नका. ह्या जगावर प्रीति करूं नका. इतका मोठा धोका नाहीं असा विचारहि करूं नका. आपल्या अंत:करणांत देवाच्या अभिवचनांना पापाच्या अभिवचनांपेक्षा मोठी गोष्ट न मानल्यांस जे भयंकर परिणाम भोगावें लागतील त्याची भीती बाळगा. इब्री लोकांस 3:13-14 म्हणते, “जोपर्यंत “आज” म्हटलेंला वेळ आहे तोपर्यंत तुम्हीं एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा कीं, पापाच्या फसवणुकींने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहों.”

परंतु मुख्यतः आपण अभिवचनांचे मोल काय आहे यावर अधिक लक्ष केंद्रित करणें आणि ख्रिस्तानें आपल्यासाठीं विकत घेतलेलें प्रतिफळ किती मोठे आहे त्याचे मोल इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक समजणे व एकमेकांना देखील तसा बोध करणें अगत्याचे आहे. इब्री 10:35 काय सांगते हें आपण एकमेकांना सांगितलें पाहिजे: “म्हणून आपलें धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे.” आणि मग तें प्रतिफळ किती मोठे आहे हें आपण  एकमेकांना दाखवून दिलें पाहिजे.  

उपदेशाची प्रमुख विषयवस्तु हींच आहे, आणि मंडळी लहान असों वां मोठी, सर्व प्रकारच्या सेवेचा मुख्य हेतू हांच आहे: ख्रिस्तानें जे विकत घेतलें आहे त्याचे प्रतिफळ किती मोठे हे त्या लोकांना जें त्या प्रतिफळाला जगापेक्षा अधिक महत्त्व देतील, दाखवून देणें. लोकांनी ते पाहावें आणि त्याची चव घ्यावी म्हणून त्यांची मदत करणें, ह्यासाठीं कीं त्यांना जी शांती मिळेल त्याद्वारे आणि त्यांच्या अंतःकरणातून उपकारस्तुतीचा जो यज्ञ सादर केला जाईल त्याद्वारे देवाचे श्रेष्ठत्व प्रकाशमान व्हावें.

4 फेब्रुवारी : दुःखाचे पाच उपयुक्त उद्देश

Alethia4India
Alethia4India
4 फेब्रुवारी : दुःखाचे पाच उपयुक्त उद्देश
Loading
/

मी पीडित होण्यापूर्वी भटकत असें, पण आतां मी तुझें वचन पाळत आहे. (स्तोत्र 119:67)

हें वचन प्रकट करते कीं देव आपल्याला दुःख देतो ते हेतूनें कीं आपण त्याचे वचन पाळण्यांस शिकावे. हा हेतू कसा सिद्धीस जातो? दुःख आपल्याला देवाचे वचन शिकण्यास आणि त्याचे पालन करण्यास कसे उपयुक्त ठरते?

आम्हांवर होत असलेल्यां या महान दयेचे असंख्य अनुभव असल्या कारणानें या प्रश्नांची असंख्य उत्तरे आहेत. परंतु खाली पाच उत्तरं आहेत:

1. दु:ख आमच्यांत असलेली जीवनाविषयीची चंचल वृत्ती किंवा मानसिकता दूर करते आणि आपल्याला जीवनाविषयी अधिक गंभीर बनवते, म्हणजे आपल्या मनाचा कल देवाचे वचन जितके गंभीर आहे तितका त्यां गांभीर्याशी अधिक सुसंगत बनतो. आणि हें लक्ष्यांत ठेवा: देवाच्या पुस्तकात एकही पान चंचल वृत्तीचे नाहीं.

2. दु:ख आपले सर्व जगिक आधार काढून टाकते व आपण देवावर अधिक आणि अधिक विसंबून राहावे यासाठीं भाग पाडते, ज्यामुळें आपण त्याच्या वचनाशी समरूप व्हावें हा त्याचा उद्देश सिद्धींस जातो. कारण आपण देवावर आशा ठेवणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे असावे हांच त्याच्या वचनाचा उद्देश आहे. “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणांस शिक्षण मिळण्याकरितां लिहिलें यासाठीं कीं शास्त्रापासून मिळणार्‍या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावीं” (रोमकरांस 15:4). “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्हीं विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत” (योहान 20:31).

3. दु:ख आपल्याला हाताशेवत पवित्र शास्त्रांत शोध घ्यावयांस अधिक उत्कंठीत करते कारण आपण दु:खाला जीवनाशी जुळलेली किरकोळ गोष्टीं मानण्याऐवजी त्याचे समाधान शोधतो. “तुम्हीं मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हां मी तुम्हांला पावेन” (यिर्मया 29:13).

4. दु:ख आपल्याला ख्रिस्ताच्या दु:खाचे सहभागी बनविते, ज्यामुळें आपण त्याच्याशी अधिक घनिष्ठ सहभागी ठेवतो आणि या जगाची नश्वरता त्याच्या दृष्टिने अधिक सहजपणें पाहू शकतो. पौलाच्या मनाची उत्कंठा हीं होती कीं त्यानें “तो (ख्रिस्त) व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन ओळख करून घ्यावी” (फिलिप्पैकरांस 3:10).

5. दु:ख फसव्या आणि विचलित करणाऱ्या देहाच्या वासनांना जिवे मारते व आपल्याला अधिकाधिक आध्यात्मिक मार्गनुसारी बनविते व आपल्याला देवाचे आध्यात्मिक वचन ग्रहण करणारें असें लोक बनवते. “ख्रिस्तानें देहाने दुःख सोसले तसेच तुम्हींही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे” (1 पेत्र 4:1). दुःखामध्यें पापाला जिवे मारण्याची शक्ती असते. आणि आपण जितके शुद्ध होत जातो तितकेच आपण देवाला अधिक स्पष्टपणे पाहण्यांस समर्थ होत जातो (मत्तय 5:8).

दु:खाद्वारें देव आम्हांला जें शिक्षण देऊं पाहतो त्याचा आपण द्वेष करूं नये अशी पवित्र आत्मा आम्हांस कृपा पुरवो.