ArchivesSolid Joys

29 March : देवाची प्रीति त्याच्या पुत्रावर जितकीं निश्चित आहे

Alethia4India
Alethia4India
29 March : देवाची प्रीति त्याच्या पुत्रावर जितकीं निश्चित आहे
Loading
/

ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला सर्वकाहीं कसे देणार नाहीं? (रोम 8:32)

देव प्रत्येक दुःखाचे विध्वंसक सामर्थ्य निशस्त्र करतो. तुम्हीं यावर विश्वास केला पाहिजे, नाहींतर ह्या आधुनिक जीवनातील तनाव आणि परीक्षांमध्यें तुम्हीं ख्रिस्ती म्हणून कधीहि उत्कर्ष पावणार नाहीं किंवा कदाचित टिकून राहणार नाहीं.

खूप वेदना आहेत, खूप अडचणी आणि निराशा आहेत, अनेक वादविवाद आणि तनाव आहेत. सर्वशक्तिमान देव प्रत्येक अडचण, प्रत्येक निराशा, प्रत्येक वाद, प्रत्येक तणाव आणि प्रत्येक वेदना घेऊन त्याचें विध्वंसक सामर्थ्य काढून टाकत आहे आणि देवामधील माझ्या आनंदाच्या वाढीसाठीं कार्य करीत आहे यावर माझा विश्वास नसेल तर मी कोठे जावें हे मला माहित नाहीं.

1 करिंथ 3:21-23 मधील पौलाचे अद्भुत शब्द ऐका, “पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाहीं तुमचे आहे; आणि तुम्हीं ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.” जग आपले आहे. जीवन आपले आहे. मृत्यू आपला आहे, ज्याचा अर्थ मी असा घेतो : देव त्याच्या निवडलेल्यां लोकांच्या वतीने असे सर्वोच्च राज्य करतो कीं आज्ञापालन आणि सेवेच्या जीवनकाळात आपल्यांला ज्यां ज्यां संकटाना तोंड द्यावे लागते त्यां सर्वांचा देवाच्या सामर्थ्यवान हाताने पराभव करून त्यांस अधीन केलें जाईल आणि त्यांना आपल्यां पवित्रतेचा सेवक आणि देवामध्यें आपला सार्वकालिक आनंद होईल.

जर देव आमच्यासाठीं असेल, आणि जर देव हा देव असेल, तर हे खरे आहे कीं आमच्याविरुद्ध काहींही यशस्वी होऊ शकणार नाहीं. ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला अचूकपणे आणि विनामूल्य सर्वकाहीं कसे देणार नाहीं  – सर्व काहीं – जग, जीवन, मरण आणि स्वतः परमेश्वर.

रोम 8:32 हा एक मौल्यवान मित्र आहे. देवाच्या भावी कृपेचे अभिवचन अतिशय प्रबळ आहे. पण सर्वांत महत्वाचा म्हणजे पाया आहेः मी त्याला स्वर्गाचा तर्क म्हटलेंले आहे. येथे तो मोर्चा आहे ज्यावर उभें राहून आपण सर्व अडचणींविरुद्ध लढा देऊं शकतो. देवानें स्वतःच्या पुत्राला राखून ठेवले नाहीं! म्हणून! म्हणून! स्वर्गाचा तर्क! म्हणून, ख्रिस्ताने जे विकत घेण्यासाठीं मरण पत्करले ते सर्व – सर्व गोष्टी, सर्व चांगले आणि सर्व वाईट हे आपल्यां कल्यांणासाठीं कार्य करण्याकरिता तो आणखी प्रयत्न करणार नाहीं का!

त्यानें आपल्यां पुत्रावर जितकीं प्रीति केलीं तितकेच हे निश्चित आहे!

28 March : जेव्हां सर्व तुम्हांला सोडून जातात

Alethia4India
Alethia4India
28 March : जेव्हां सर्व तुम्हांला सोडून जातात
Loading
/

माझ्या पहिल्यां जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते; ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्यानें मला शक्ती दिली; आणि त्यानें मला सिंहाच्या जबड्यातूनमुक्त केलें. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्यां स्वर्गीय राज्यात घेण्यासाठीं तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (2 तीमथ्य 4:16-18)

आज सकाळी मी या उदात्त आणि कष्टदायक शब्दांवर रेंगाळत होतो. पौल रोममध्यें तुरुंगात होता. आतापर्यंत आम्हीं जाणतो कीं, त्याला कधीही सोडण्यात आले नाहीं. त्याच्या शेवटच्या पत्राचा अशाप्रकारे अंत होतो.

विचार करा आणि विस्मित व्हा!

त्याला सोडून देण्यात आले आहे : “माझ्या बाजूस कोणी नव्हता.” तो एक वयोवृद्ध माणूस आहे. एकनिष्ठ सेवक. विदेशी नगरात, घरापासून दूर. शत्रूंनी घेरलेला. मृत्यूचा त्याला धोका आहे. का? उत्तर : यासाठीं कीं त्यानें आमच्या निराश झालेल्यां, भयभीत, अथवा एकाकीं जीवासाठीं तो हे बहुमूल्य वाक्य लिहावे, “तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला!

अहाहा, मला ही वचनें किती प्रिय वाटतात! जेव्हां तुमचे जवळचे मित्र तुम्हांला सोडून जातात, तेव्हां तुम्हीं देवाचा धावा करता काय? मग, तुमच्या जीवनातील लोक खरोखर तुमचे देव आहेत का? किंवा तुम्हांस या उदात्त सत्यामध्यें धाडस प्राप्त होते का : “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय 28:20) – मग तुम्हांला कोणीही का सोडेना? तुम्हीं देवाच्या या कठोर शपथेने तुमच्या अंतःकरणास बळ देता का? “मी तुला सोडून जाणार नाहीं व तुला टाकणार नाहीं” (इब्री 13:5)?

मग आपण म्हणू या, “तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला!”

प्रश्न : 2 तीमथ्य 4:18 मध्यें कोणत्या गोष्टीची भिती होती? उत्तर : पौल प्रभूचे स्वर्गीय राज्य प्राप्त करू शकणार नाहीं! पण ही भिती असतांनाहीं पौल ओरडतो, “प्रभू… मला सुरक्षितपणे त्याच्या स्वर्गीय राज्यात आणील.”

प्रश्न : गमावण्याची भिती घालण्यात आलेले स्वर्गीय राज्य पौल कसे प्राप्त करणार होता? उत्तर : “दुष्कृत्ये.” “प्रभू मला प्रत्येक दुष्कृत्यापासून  वाचविल आणि मला सुरक्षितपणे त्याच्या स्वर्गीय राज्यात आणील.”

प्रश्न : एखादे दुष्कृत्य (दुष्ट योजना) पौलाच्या स्वर्गीय राज्य प्राप्त करण्यास कसे भिती घालू शकत होते? उत्तर : त्याला आज्ञाभंगास भाग पाडून ख्रिस्ताप्रत निष्ठा सोडून देण्याच्या मोहांत घालण्याद्वारें.

प्रश्न : हा मोह “सिंहाचा जबडा “ होता का ज्यातून त्याला सोडविण्यात आले होते? उत्तर : होय. “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा” (1 पेत्र 5:8-9).

प्रश्न : मग पौल या सैतानी मोहास बळी न पडता विश्वास आणि आज्ञाधारकतेने शेवटपर्यंत धीर धरून राहिला याचे गौरव कोणाला प्राप्त होते? उत्तर : “त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे” (1 पेत्र 5:10). “त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन” (2 तीमथ्य 4:18).

प्रश्न : का? खंबीरपणे उभा राहणारा पौल नव्हता का? उत्तर : “प्रभू माझ्या बाजूला उभा राहिला आणि त्यानें मला सामर्थ्य दिले!”

27 March : पुनरुत्थानाचे 10 परिणाम

Alethia4India
Alethia4India
27 March : पुनरुत्थानाचे 10 परिणाम
Loading
/

“आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्हीं अजून आपल्यां पापांतच आहात.” (1 करिंथकरांस 15:17)

येशूच्या पुनरुत्थानाविषयीं येथे दहा आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्यांविषयी आपण ख्रिस्ताचे ऋणी असायला पाहिजे :

1) एक असा तारणकर्ता ज्याला पुन्हा कधीही मरण येणार नाहीं. “आपल्यांला ठाऊक आहे कीं, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाहीं; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाहीं” (रोमकरांस 6:9).

2) पश्चात्ताप. “ज्या येशूला तुम्हीं खांबावर टांगून मारले त्याला आपल्यां पूर्वजांच्या देवानें उठवले. त्यानें इस्राएलाला पश्‍चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवानें त्याला आपल्यां उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले” (प्रेषित 5:30-31).

3) नवा जन्म. “जिवंत आशा प्राप्त होण्यासाठीं आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठीं, त्यानें आपल्यां महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारें आपल्यांला पुन्हा जन्म दिला” (1 पेत्र 1:3).

4) पापाची क्षमा. “आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्हीं अजून आपल्यां पापांतच आहात” (1 करिंथ 15:17).

5) पवित्र आत्मा. “त्या येशूला देवानें उठवले ह्याविषयी आम्हीं सर्व साक्षी आहोंत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडें बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्हीं जे पाहता व ऐकता त्याचा त्यानें वर्षाव केला आहे” (प्रेषित 2:32-33).

6) निवडलेल्यांसाठीं दंडाज्ञा नाहीं. “तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाहीं, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडें आहे आणि जो आपल्यांसाठीं मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे” (रोमकरांस 8:34).

7) आम्हांबरोंबर येशूची वैयक्तिक सहभागिता आणि संरक्षण. “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” (मत्तय 28:20).

8) येणाऱ्या न्यायनिवाड्याचा पुरावा. “ [देवानें] असा एक दिवस नेमला आहे कीं, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्यां मनुष्याच्या द्वारें जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्यानें त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे” (प्रेषित 17:31).

9) देवाच्या भावी क्रोधापासून तारण. “[आम्हीं] त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट [पाहतो]…………त्या पुत्राला म्हणजे येशूला देवानें मेलेल्यांतून उठवले व तो आपल्यांला भावी क्रोधापासून सोडवणार आहे” (1 थेस्सलनी 1:10; रोमकरांस 5:9).

10) मरणातून आमचे स्वतःचे पुनरुत्थान. “हे आम्हांला ठाऊक आहे कीं, ज्यानें प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील व तुमच्याबरोबर सादर करील” (2 करिंथ 4:14; रोमकरांस  6:4; 8:11; 1 करिंथ 6:14; 15:20).

26 March : देवाच्या वचनात कसे रमावे

Alethia4India
Alethia4India
26 March : देवाच्या वचनात कसे रमावे
Loading
/

तुझी वचनें माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. (स्तोत्र 119:103)

ख्रिस्ती विश्वासाला कधीही मागणी आणि संकल्प आणि इच्छाशक्तीच्या विषयांपर्यंत मर्यादित करू नका. आपल्यांला काय आवडते, आपण कोणत्या गोष्टीत रमतो,  आपल्यांला काय रूचकर वाटते हा विषय महत्वाचा आहे.

येशू जगात आला त्यावेळी मानवजात ज्यांना जे जे आवडत असे त्यानुसार विभागलेली होती. “निवाडा हाच आहे कीं, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती” (योहान 3:19). नीतिमान आणि दुष्ट ते ज्या गोष्टींत रमतात त्यानुसार विभागलेले आहेत – येशूच्या मुखांत देवाचे प्रकटीकरण, कीं जगाच्या रहाटीप्रमाणे.

म्हणून एखाद्याला प्रश्न पडू शकतो : मी देवाच्या वचनात कसा रमू शकतो? माझे उत्तर दुहेरी आहे :

1) तुमच्या अंतःकरणाच्या जीभेवर नवीन स्वादग्रंथींसाठीं प्रार्थना करा;

2) देवानें त्याच्या लोकांसाठीं जी जी अद्भुत अभिवचनें दिलींत त्यांवर मनन करा.

हाच स्तोत्रकर्ता ज्यानें म्हटलें, “तुझी वचनें माझ्या जिभेला किती मधुर लागतात!” (स्तोत्र 119:103), त्यानें यापूर्वी म्हटलें, “तुझ्या नियमांपासून बहकणाऱ्या सर्वांचा तू धिक्कार करतोस” (स्तोत्र 119:18). त्यानें ही प्रार्थना केलीं, कारण गौरव पाहण्यासाठीं आत्मिक डोळे प्राप्त करणे, किंवा हृदयाच्या जीभेवर पवित्र स्वादग्रंथी असणे, ही देवाची देणगी आहे. स्वाभाविकवृत्तीने कोणीही मनुष्य भूकेला होत नाहीं, आणि देवाची व त्याच्या बुद्धीची आवड धरीत नाहीं.

पण जेव्हां तुम्हीं प्रार्थना करून चुकला, म्हणजे खरोखर तुम्हीं प्रार्थना करीत असतांना, त्याच्या लोकांसाठीं दिलेल्यां देवाच्या अभिवचनांचा लाभांवर आणि आता आणि सदाकाळ सर्वशक्तितान परमेश्वर तुमचा सहायक म्हणून आहे या आनंदाच्या गोष्टीवर मनन करा. स्तोत्र 1:3-4 म्हणते कीं जो पुरुष देवाच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्यां हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहींत, अशा झाडासारखा आहे; आणि जे काहीं तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहींत, ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुसासारखे आहेत.”

कोणाला असे पुस्तक वाचणे आवडणार नाहीं किंवा त्यांत रमणार नाहीं, ज्याचे वाचन त्याला निरूपयोगी भूसापासून बदलून लबानोनचा विशाल केदार वृक्षाप्रमाणे बनविल, किंवा टेक्ससच्या धूळीची वाटी बदलून हवाईची फलबाग बनविल? आपल्यां अंतःकरणात कोणालाही भूसा असावे असा वाटत नाहीं – मूळ नसलेला, वजन नसलेला, निरूपयोगी. आम्हीं सर्व जण वास्तविकतेच्या खोल पाण्याच्या प्रवाहातून बळ प्राप्त करू इच्छितो आणि फळ देणारे असे उपयोगी लोक बनू इच्छितो.

वास्तविकतेचा तो पाण्याचा प्रवाह देवाचे वचन आहे, आणि सर्वथोर संत त्याद्वारें थोर बनलेले आहेत.

25 March : सर्वकाळासाठीं तृप्त

Alethia4India
Alethia4India
25 March : सर्वकाळासाठीं तृप्त
Loading
/

मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडें येतो त्याला कधीही भूक लागणार नाहीं आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाहीं.” (योहान 6:35)

हे वचन या वस्तुस्थितीकडें अंगुलीनिर्देश करते कीं येशूमध्यें विश्वास करणे येशू जे काहीं आहे त्यामधून खाणे आणि पीणे होय. ते असे म्हणणे आहे कीं आमच्या आत्म्याची तहाण येशूनें तृप्त होते, म्हणजे यापुठे मला आणखी तहाण लागत नाहीं.

तृप्तीच्या ज्या शोधांत आम्हीं  होतो तो त्याचा शेवट आहे. त्या पलीकडें काहींही नाहीं, आणि काहींही उत्तम नाहीं.

जेव्हां आम्हीं येशूवर तसा विश्वास ठेवतो जसा योहानाचा हेतू होता, तेव्हां येशूचे सान्निध्य आणि अभिवचन इतके संतुष्टिदायक बनते कीं पापाचे भुरळ पाडणारे सुख आमच्यावर प्रभूत्व करू शकत नाहीं (पहा रोम. 6:14). याच कारणामुळे ख्रिस्तामधील असा विश्वास पापाचे सामर्थ्य रद्द करतो आणि आज्ञाधारकपणास समर्थ बनवितो.

योहान 4:14 याच दिशेकडें अंगुलीनिर्देश करते: “परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाहीं; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्यें सार्वकालिक जीवनासाठीं उपळत्या पाण्याचा झरा होईल.” योहान 6:35 नुसार, या ठिकाणी तारणदायी विश्वासाचे साम्य विषयी पाणी पिण्याबारोबर करण्यांत आलें आहे जे आत्म्याची खोल तहान तृप्त करते, आणि तृप्ती जणू ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यासारखी सुपीक बनते.

योहान 7:37-38 देखील यांचविषयीं आहे: “येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्यानें माझ्याकडें यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्यांप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”

विश्वासाद्वारें, ख्रिस्त आमच्याठायी संतोषकारक जीवनाचा एक अक्षय झरा बनतो जो सदाकाळ टिकतो आणि आम्हास स्वर्गात घेऊन जातो, आणि वाटेत आम्हांला इतर समाधानांच्या पातकीं भ्रमांपासून सोडवितो. हे तो आमच्याकडें त्याचा आत्मा पाठवून करतो (योहान 7:38-39).

24 March सेवाकार्य आणि मनुष्याची भिती

Alethia4India
Alethia4India
24 March सेवाकार्य आणि मनुष्याची भिती
Loading
/

त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. (यिर्मया 1:8)

प्रभूची सेवा करण्यात एक मोठे अडखळण, विशेषेकरून तरुणांमध्यें, म्हणजे नाकारले जाण्याची आणि विरोधाची भीती आहे.

ज्याप्रकारे आपण वागतो किंवा बोलतो हे काहीं लोकांना कसे आवडणार नाहीं याविषयी सर्व प्रकारचे विचार मनात प्रवेश करतात. लोक असहमत होऊ शकतात किंवा अडखळू शकतात. माझ्याकडून एखादी चूक होऊ शकते आणि त्यामुळे माझी टीका केलीं जाऊ शकते.

मनुष्याची भीती ही सेवाकार्यात एक मोठे अडखळण आहे.

म्हणून देव म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला सोडवीन. देवाचे सान्निध्य आणि स्वीकृती मनुष्यांच्या सर्व प्रशंसापेक्षा अधिक मूल्यवान आहे. आणि देव म्हणतो कीं, तुमच्या सर्व संकटांत आणि संकटांतून मी तुम्हांला सोडवीन. शेवटी तुम्हीं विजयी व्हाल. तुम्हीं महाविजयी व्हाल.

आणि हेच अभिवचन आज ख्रिस्त येशूमध्यें आम्हा सर्वांना देण्यात आले आहेः

  • त्यानें (देवानें) स्वतः म्हटलें आहे, “मी तुला सोडून जाणार नाहीं व तुला टाकणार नाहीं.” म्हणून आपण धैर्याने म्हणतो “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाहीं; मनुष्य माझे काय करणार?” (इब्री 13:5–6).
  • “देव आपल्यांला अनुकूल असल्यांस आपल्यांला प्रतिकूल कोण?” (रोमकरांस 8:31).

म्हणून देव तरुण यिर्मयाला म्हणाला, आणि देव आज तरुणांना म्हणतो ज्यांना तो त्याची सेवा करण्यासाठीं पाचारण करीत आहे – आणि आमच्यापैकीं सर्वांनाच “मी बाळ आहे असे म्हणू नकोस“ किंवा मी खूप म्हातारा आहे, किंवा मी आणखी काहीं आहे (यिर्मया 1:7). का?

  • कारण तुमचे जीवन देवाच्या अढळ, सार्वभौम हेतूंमध्यें मुळावलेले आहे. तुम्हांला निवडले गेले आहे आणि वेगळे करण्यात आले आहे
  • तुमच्या स्वतःचा नव्हे तर देवाचा अधिकार तुमच्या सेवेमागे आणि तुमच्या बोलण्यामागे आहे.
  • आणि कारण तुमच्या सर्व परीक्षांत तुम्हास सोडविण्यासाठीं स्वतः देव तुमच्यासोबत असेल.

23 March अज्ञान अभक्तीची हमी देते

Alethia4India
Alethia4India
23 March अज्ञान अभक्तीची हमी देते
Loading
/

ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें त्याच्या ओळखीच्या द्वारें, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्यां सर्व गोष्टी आपल्यांला दिल्यां आहेत. (2 पेत्र 1:3)

पवित्र शास्त्र ज्यां सामर्थ्याचे श्रेय ज्ञानाला देते ते पाहून मी चकित होतो.

परत एकदा वाचा 2 पेत्र 1:3 : ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें त्याच्या (देवाच्या) ओळखीच्या द्वारें, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्यां सर्व गोष्टी आपल्यांला दिल्यां आहेत.

अक्षरशः, जीवन जगण्यासाठीं आणि भक्तीमान होण्यासाठीं देवाकडून जे सामर्थ्य उपलब्ध आहे ते सर्व ज्ञानाद्वारें उपलब्ध आहे! अद्भुत! शास्त्रवचनांतील सिद्धांत आणि शिकवणीवर आपण किती जोर द्यायला पाहिजे! हा साधारण विषय नाहीं, हा जीवन व सुभक्तीचा गंभीर विषय आहे.

विषय हा नाहीं कीं ज्ञानामुळे सुभक्तीमानतेची हमी प्राप्त होते. तसे नाहीं. पण असे दिसून येते कीं अज्ञान अभक्तीची हमी देते. कारण, पेत्र म्हणतो, सात्त्विकतेकडें नेणारे ईश्वरी सामर्थ्य देवाच्या ओळखीच्या द्वारें  म्हणजेच ज्ञानाद्वारें  दिले जाते.

येथे तीन अर्थ, एक ताकींद, व एक उत्तेजन आहे.

1. वाचा! वाचा! वाचा! पण ईश्वरविज्ञानाच्या बाह्य फेणावर आपला वेळ वाया न घालविण्याविषयी सावध असा. “ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें” त्याच्याविषयी समृद्ध सिद्धांत विषयक पुस्तके वाचा.

2. मनन करा! मनन करा! शांतचित्त व्हां. तुम्हीं बायबल वाचता तेव्हां त्याच्या अर्थ काय, याविषयी विचार करण्यात वेळ घालवा. प्रश्न विचारा. मनन नमूद करण्यासाठीं जवळ एक दैनंदिनी ठेवा. पेचांत टाकणाऱ्या गोष्टींद्वारें स्वतःचे मन नम्रपणे विव्हळ होऊ द्या. सत्याच्या वृक्षावरील वरवर पाहता दिसणाऱ्या दोन परस्पर विरोधी शाखांचे एकत्रित करणारे मूळ पाहण्याचा प्रयत्न करण्याद्वारें सखोल अंतर्दृष्टी प्राप्त होते.

3. चर्चा करा. चर्चा करा. एका लहान गटाचा भाग बना जो सत्याची उत्कटपणे पर्वा करतो. असा गट नाहीं ज्याला फक्त बोलून समस्या उत्पन्न करणे आवडते. पण असा गट ज्याचा असा विश्वास आहे कीं बायबलच्या प्रश्नांची उत्तरे  बायबल मध्येंच आहेत आणि ती शोधून काढता येतात.

ताकींद : “ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे” (होशे 4:6).“मी त्यांच्याविषयी साक्ष देतो कीं, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाहीं” (रोमकरांस10:2). म्हणून अज्ञानाच्या घातक परिणामांविषयी सावध असा.

उत्तेजन : “चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू” (होशे 6:3).

22 March : सैतानाचे कँडीचे दुकान

Alethia4India
Alethia4India
22 March : सैतानाचे कँडीचे दुकान
Loading
/

म्हणून आपल्यांसाठीं ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हींही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्यानें देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे. (1 पेत्र 4:1)

प्राथमिक दृष्ट्या हे वचन आपल्यांला पेचांत टाकते. ख्रिस्ताला पापापासून निवृत्त व्हावें लागले का?  नाहीं! “त्यानें पाप केलें नाहीं” (1 पेत्र 2:22).

मग अचानक उमजते. जेव्हां आम्हीं स्वतःला या विचाराचे मनोवृत्तिरूपी शस्त्र धारणकरतो कीं ख्रिस्ताने आमच्यासाठीं दुःख सहन केलें, तेव्हां आम्हांला कळून येते कीं आम्हीं त्याच्यासोबत मेलो. “त्यानें स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठीं कीं, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठीं जगावे.” जेव्हां आम्हीं त्याच्यासोबत मरतो, तेव्हां आम्हीं पापापासून निवृत्त होतो.

हे अगदी रोमकरांस 6 प्रमाणें आहे : हे आपल्यांला ठाऊक आहे कीं, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यांतील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे….. तसे तुम्हींही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारें स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना” (रोमकरांस 6:6–7, 11).

पेत्र म्हणतो, “तुम्हींही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा!”

पौल म्हणतो, “स्वत:स पापाला मेलेले असे माना!”

पापाविरूद्ध आमचे जे युद्ध आहे त्यासाठीं आमचे शस्त्र म्हणजे हीच ‘मनोवृत्ति’– ‘असेच मानने.’

जेव्हां सैतानाच्या परीक्षा येतात – वासनेची, चोरी करण्याची, खोटे बोलण्याची, लोभ धरण्याची, हेवा करण्याची, सूड घेण्याची, अपमान करण्याची, घाबरुन जाण्याची – तेव्हां हेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा: जेव्हां प्रभूने मला पापापासून मुक्त करण्यासाठीं दुःख सहन केलें आणि तो मेला, तेव्हां मीहि पापास मेलो!

जेव्हां सैतान तुम्हांला म्हणतो, तू वासनेच्या सुखाचा नकार का करतोस? जी भानगड तू खोटे बोलून टाळू शकतोस त्या भानगडीत का पडतो? तू धाडस करून त्या हानिरहित सुखविलासाचा आनंद का घेत नाहीं? तुला जी दुखापद झाली त्याबद्दल सूड घेऊन न्याय मिळविण्याचा प्रयत्न का करित नाहींस?

त्याला असे उत्तर द्या : देवाच्या पुत्राने मला पाप करण्यापासून सोडविण्यासाठीं दुःख सहन केलें (खरोखर दुःख सोसले!). त्यानें मला आणखी कष्टी बनविण्यासाठीं दुःख सोसले असें मी मानत नाहीं. म्हणून, जे विकत घेण्यासाठीं तो मेला ते पापाच्या सुखापेक्षा अधिक मौल्यवान असले पाहिजे. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणून माझा तो दुर्बळपणा ज्यामुळे मी तुझ्या परीक्षेला बळी पडत असें तो आता कोमजून ठार झाला आहे. हे सैताना, चालता हो! तुझ्या कॅन्डीच्या दुकानाजवळून जातांना आता माझ्या तोंडाला पाणी सुटत नाहीं.

21 March : देवाचे सर्वोत्तम अभिवचन

Alethia4India
Alethia4India
21 March : देवाचे सर्वोत्तम अभिवचन
Loading
/

ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला सर्वकाहीं कसे देणार नाहीं? (रोम 8:32)

देवाच्या भविष्यातील कृपेचे सर्वात दूरगामी अभिवचन रोम 8:32 मध्यें आढळून येते. माझ्यासाठीं हे पवित्रशास्त्रातील सर्वात मौल्यवान वचन आहे. काहीं अंशी याचे कारण हे आहे कीं त्यात दिलेलें अभिवचन इतके सर्वसमावेशक आहे कीं ते माझ्या जीवनाच्या आणि सेवेच्या प्रत्येक वळणावर खरोखर माझ्या मदतीसाठीं तत्पर उभे असते. माझ्या जीवनात अशी परिस्थिती कधीही राहिलेली नाहीं आणि पुढेहि असणार नाहीं जेथे हे अभिवचन अप्रासंगिक ठरले किंवा ठरेल.

स्वतःहून हे सर्व-समावेशक अभिवचन कदाचित या वचनास सर्वात मौल्यवान ठरविणार नाहीं. स्तोत्र 84:11 सारखी इतर दूरगामी वचनें आहेत : “जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यांवाचून तो राहणार नाहीं.” आणि 1 करिंथ 3:21-23 : ”म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाहीं तुमचे आहे; पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाहीं तुमचे आहे; आणि तुम्हीं ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.“ या अभिवचनांचा ठळक दिसून येणारा भरमसाटपणा आणि विस्तार याविषयी अतिरेकपणे बोलणे कठीण आहे.

पण जे वास्तव रोमकरांस 8:32 ला या उच्च दर्जांत मांडते तो एक असा तर्क आहे जो या अभिवचनास महत्व देतो आणि त्यास इतका मजबूत व अटळ ठरवितो जितका कीं देवाच्या अतिशय प्रशंसनीय पुत्रासाठीं देवाची प्रीति.

रोम 8:32 मध्यें एक पाया आणि आश्वासन आहे जे इतके मजबूत आहे आणि इतके खंबीर आहे आणि इतके सुरक्षित आहे कीं हे अभिवचन कधी तोडले जाईल याची मुळीच शक्यता नाहीं. याच कारणस्तव मोठ्या संकटाच्या समयी ते सदैव-उपस्थित बळ ठरते. इतर कोणतीही गोष्ट मोडकळीस येते, इतर कोणतीही गोष्ट निराश करते, इतर कोणतीही गोष्ट अपयशी ठरते, पण भविष्यातील कृपेचे हे सर्व समावेशक अभिवचन कधीही अपयशी ठरू शकत नाहीं. 

“ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो…” हाच तो पाया आहे. स्वर्गाचा तर्क म्हणतो कीं जर हे खरे असेल, तर मग देव त्या लोकांस ज्यांस त्यानें आपला पुत्र दिला, निश्चितच सर्वकाहीं देईल!

20 March : येशू ह्या क्षणासाठींच मरण पावला

Alethia4India
Alethia4India
20 March : येशू ह्या क्षणासाठींच मरण पावला
Loading
/

मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि मी जगतो असे नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्राच्या विश्वासाच्या योगाने आहे, त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरिता दिले.” (गलतीकरास पत्र 2:20)

आज सकाळी 4:59 वाजता जेव्हां अलार्म वाजला, माझ्या मनात क्षणार्धात एक विचार आला, मला मरणाची वास्तविकता आणि पूर्णतः पवित्र देवासमोर उभे राहण्याचा विचार आला, जिथे माझ्या जीवनाशिवाय प्रशंसनीय माझ्याकडें काहींच नाहीं.

या गोष्टीचे भय केवळ एका वास्तविकतेच्या प्रकाशाने नाहींसे झाले : येशू ख्रिस्त याच क्षणासाठीं मरण पावला.

मग तो विचार निघून गेला.

याचा तत्काळ अर्थ मी अश्याप्रकारे घेतला : एखाद्याचे तारण होते तेव्हां जे होते त्याचें हे सार आहे. अश्या प्रकारेच येशू हा खरा आहे याचा शोध लागतो. अश्याच प्रकारे एखादा व्यक्ति ख्रिस्ताची प्रीति त्याच्या अंतकरणांत जतन करून ठेवतो. अचानक, पाहिल्यांदाच त्यांना विचार येतो आणि दोष-भावनेसह देवाला भेटायचे निर्विवाद सत्य, ते त्यांच्या हृदयाच्या नेत्राने पाहू व समजू शकतात.

त्या दृष्टांताचा दणका अंत:करणाला छिन्नभिन्न करणारा आहे. यामुळे आपल्यांला जाणीव होते कीं आपली एकमेव आशा केवळ एक मध्यस्थच आहे. आपण जर स्वतःच्या बळावर एकटे उभे राहतो, तेहि स्वतःची वाखाणी किंवा कौतुक करण्यासारखे आपल्यांत काहींही नसतांना, आहे ते केवळ पापी जीवन, तर आपण पूर्णपणे हरवलेलो आहोंत. जर या देवाच्या सान्निध्यात अनंतकाळाची काहीं आशा असेल, तर आपल्यांला एका उद्धारकर्त्याची, आपले स्थानापन्न म्हणून उभा राहानार्याची, तारणकर्त्याची गरज लागेल.

ह्या भयानक अडचणीच्या वेळी, ख्रिस्ताच्या सुवार्तेवांचून कोणतीच गोष्ट प्रकाशमान वाटत नाहीं- “त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरिता दिले” (गलती 2:20). एका क्षणार्धात तो तिथें प्रकट होण्यापूर्वी, मला न्यायाच्या वेळेचा सर्व गिळंकृत करणारा अंधकार आणि त्याची भयानकता दिसून आली- हा ईश्वरविज्ञानी निष्कर्ष नाहीं, एक तर्कशुद्ध निष्कर्ष नाहीं, किंवा एक विचार नाहीं, पण अंत:करणाच्या नजरेतून पाहिलेली एक झलक, एक भावना आणि खात्री आहे.

आपला देव हा भस्म करणारा अग्नि आहे. तो दुष्टता सहन करणार नाहीं. आपण पूर्णपणे हरवलेले आहों. माझे अपराध इतके मोठे, इतके खरे होते कीं क्षणार्धात मला जाणवले कीं यासाठीं मी कोणतीच सबब पण देऊ शकत नाहीं. सर्व काहीं अचानक, गुंतागुंतीचे आणि आशाहीन वाटू लागले.

अशा क्षणी, केवळ येशूच महत्वाचा आहे. हे ख्रिस्ता! हे ख्रिस्ता! ही उपकाराची लाट माझ्या हृदयात समावेल का? तू जो देवाचे दान, हीच माझी तातडीची आणि एकमेव गरज!