ArchivesSolid Joys

9 July : येशूनें ज्यां सहा प्रकारे खिन्नतेस लढा दिला

Alethia4India
Alethia4India
9 July : येशूनें ज्यां सहा प्रकारे खिन्नतेस लढा दिला
Loading
/

मग त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. (मत्तय 26:37)

ज्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलें त्याच्या आदल्या रात्री येशूचा अंतरात्मा ज्यां अति कष्टांत होता त्याचे पवित्र शास्त्र आम्हांला एक अद्भुत ओझरते दर्शन देते. येशूनें ज्या प्रकारे औदासिन्य अथवा खिन्नतेविरुद्ध आपला गंभीर लढा दिला तो पहा आणि त्याद्वारे शिका.

1. त्यानें त्याच्यासोबत राहण्यासाठीं काहीं जवळच्या मित्रांची निवड केलीं. “त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले” (मत्तय 26:37).

2. त्यानें आपलें अंतःकरण त्यांच्यापुढे मोकळे केलें. त्यानें त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्हीं येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा” (मत्तय 26:38).

3. त्यानें या लढ्यात त्यांस मध्यस्थीची आणि सहभागी होण्याची विनंती केलीं. “त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले” (मत्तय 26:38).

4. त्यानें प्रार्थनेत पित्यासमोर आपलें अंतःकरण ओतले. “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो” (मत्तय 26:39).

5. त्यानें देवाच्या सार्वभौम बुद्धीत आपल्या अंतःकरणास विसावा दिला. “तथापि माझ्या इच्छेप्रमाणें नको तर तुझ्या इच्छेप्रमाणें होवो” (मत्तय 26:39).

6. वधस्तंभाच्या दुसऱ्या बाजूला त्याची वाट पाहत असलेल्या गौरवी भविष्यातील कृपेवर त्यानें आपलें डोळे लावले. “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडें बसला आहे” (इब्री 12:2).

जेव्हा तुमच्या भविष्यास भेडसावणारी अशी काहीं गोष्ट तुमच्या जीवनात घडते, तेव्हा हे लक्षात ठेवा: तुमच्या अंतःकरणातील स्फोटकाचे पहिले आघात-तंरग, जसे येशूनें गेथशेमाने येथे अनुभवले, पाप नाहीं. खरा धोका त्याच्या अधीन होणें आहे. त्यास बळी पडणें पाप आहे. कुठलाही आत्मिक लढा न देणें. आणि त्या पापमय शरणागतीचे मूळ आहे अविश्वास – भविष्यातील कृपेत विश्वासासाठीं लढा देण्यात अपयश. येशूमध्यें देव आपल्यासाठीं जे अभिवचन देतो त्यास जोपासण्यात अपयश.

गेथशेमानेमध्यें येशू आपल्याला दुसरा मार्ग दाखवतो. तो वेदनारहित नाहीं, आणि उदासीन नाहीं. त्याचे अनुसरण करा. तुमचे विश्वासू आत्मिक मित्र शोधून काढा. आपलें अंतःकरण त्यांच्यापुढे मोकळे करा. त्यांना विनंती करा कीं त्यांनी तुमच्यासोबत जागे राहावे आणि प्रार्थना करावी. तुमचे अंतःकरण पित्यापुढे ओता. देवाच्या सार्वभौम बुद्धीत विसावा घ्या. आणि देवाच्या मौल्यवान आणि आलिशान अभिवचनांत तुमच्यापुढे जो आनंद ठेवण्यात आला आहे त्यावर तुमचे डोळे लावा.

8 July : तारणदायी विश्वास एकमेकांना क्षमा करण्यांत आनंदी होतो

Alethia4India
Alethia4India
8 July : तारणदायी विश्वास एकमेकांना क्षमा करण्यांत आनंदी होतो
Loading
/

आणि तुम्हीं एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायीं तुम्हांला क्षमा केलीं आहे तशी तुम्हींहि एकमेकांना क्षमा करा. (इफिस 4:32)

तारणदायी विश्वास केवळ हा विश्वास धरणें नाहीं कीं तुम्हांला क्षमा करण्यात आली आहे. तारणदायी विश्वास पापाच्या भयावहतेकडें पाहतो, आणि मग देवाच्या पवित्रतेकडें पाहतो, आणि आत्मिकरित्या हे समजतो कीं देवाची क्षमा अवर्णनीयरित्या किती गौरवी, किती रमणीय आहे. आपण केवळ ती ग्रहण करीत नाहीं; तर आपण तिची वाखाणणी देखील करतो. अशा थोर, क्षमा करणाऱ्या देवासोबत आमच्या नवीन मैत्रीने आम्हीं संतुष्ट आहोत.

देवाच्या क्षमेत विश्वासाचा अर्थ केवळ हा समज नाहीं कीं आम्हीं त्या परिस्थितीतून बचावलो आहोत. त्याचा अर्थ ह्या सत्याचा आस्वाद घेणें म्हणजें क्षमा करणारा देव हा विश्वातील सर्वात मूल्यवान सत्य आहे. तारणदायी विश्वास देवानें क्षमा केलीं आहे याची कदर करतो, आणि तेथून क्षमा करणाऱ्या देवाची कदर करतो – आणि येशूमध्यें आमच्यासाठीं तो जे काहीं आहे. ह्या अनुभवाचा आम्हीं क्षमा करणारे लोक बनावे यावर एक मोठा प्रभाव पडतो.

आमची क्षमा विकत घेण्याचे मोठे कार्य भूतकाळात घडून आलें आहे – ख्रिस्ताचा वधस्तंभ. मागे वळून पाहण्याद्वारे, आपण त्या कृपेविषयी शिकतो ज्यात आम्हीं सदैव स्थिर राहणार आहोत (रोम 5:2). आम्हास हे कळते कीं, आमच्यावर आता प्रीति करण्यात आली आहे आणि आमचा स्वीकार करण्यात आला आहे, आणि हे सदैव तसेच असेल. आम्हास हे कळते कीं जिवंत देव क्षमा करणारा देव आहे.

परंतु आमच्या क्षमेचा अनुभव करण्याचे मोठे कार्य भविष्यात सदाकाळ सुरू राहते. क्षमा करणाऱ्या थोर परमेश्वरासोबत आमचे आनंदमय सहभागित्व सदाकाळ टिकते. म्हणून, क्षमेसाठीं स्वातंत्र्य, जे क्षमा करणाऱ्या देवासोबतच्या या सर्व समाधानी सहभागित्वातून प्रवाहित होते, जोपर्यंत आम्हीं आहोत तोपर्यंत ते टिकून राहते.

मला हे कळून आलें आहे कीं जर तुमच्या विश्वासाचा अर्थ फक्त हा आहे कीं तुम्हीं वधस्तंभाकडें मागे फिरून पाहिले आहे आणि असा निष्कर्ष काढला आहे कीं तुम्हीं परिस्थितीतून बाहेर पडला आहात, तर कटुत्व बाळगत राहणें शक्य आहे. म्हणूनच खरा विश्वास काय आहे या विषयी सखोल शोध घेणें मला भाग पडले आहे – फक्त हा दिलासा नाहीं कीं मी बचावलो आहे, पण येशूमध्यें देव माझ्यासाठीं जो काहीं आहे त्या सर्वासोबत हे गंभीर समाधान देखील. हा विश्वास फक्त हे पाहण्यासाठीं मागे पाहत नाहीं कीं आम्हीं तारले गेले आहोत, पण अशा परमेश्वराकडें पाहण्यासाठीं व त्याचा आस्वाद घेण्यासाठीं मागे पाहतो जो आम्हांला त्याच्या सोबतच्या सहभागित्वात अंतहीन समेटाचे उद्याचे भविष्य प्रदान करतो. अशा क्षमा करणाऱ्या देवासोबत समाधानकारक सहभागित्व आम्हीं क्षमा करणारे लोक व्हावे या दृष्टीनें महत्वाचे आहे.

7 July : जेव्हा कोणी ख्रिस्ती बांधवतुम्हांला दुखावतो

Alethia4India
Alethia4India
7 July : जेव्हा कोणी ख्रिस्ती बांधवतुम्हांला दुखावतो
Loading
/

त्यानें स्वत: तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठीं कीं, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठीं जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्हीं निरोगी झाला आहात.’ (1 पेत्र 2:24)

पश्चाताप करणाऱ्या ख्रिस्ती बंधुभगिनींविरुद्ध आपल्या मनांत कटुत्व न बाळगण्याचे मूलतत्त्व काय आहे?

आमच्याविरुद्ध घडलेल्या भयंकर अपराधामुळें आमचा नैतिक संताप फक्त या कारणास्तव नाहींसा होत नाहीं कीं अपराध करणारा किंवा दुखविणारा ख्रिस्ती आहे. वस्तुत:, आम्हांला आणखीच विश्वासघात झाल्यासारखे वाटू लागते. आणि त्या अपराधामुळें झालेंलें दु:ख आणि वाईट वर्तणूक यांच्या तुलनेत एक साधारण, “मला खेद आहे” किंवा “I’m sorry” असे वाक्य बहुधा अतिशय अयोग्य किंवा अपुरेच वाटते.

पण या बाबतीत आपण सोबतच्या ख्रिस्ती व्यक्तींशी व्यवहार करीत आहोत आणि आमचा अपराध करणाऱ्याविरुद्ध देवाच्या क्रोधाचे अभिवचन लागू होत नाहीं, याचे कारण “ख्रिस्त येशूमध्यें असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच” (रोम 8:1). “कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपलें तारण व्हावे म्हणून देवानें आपल्याला नेमले आहे” (1 थेस्सल 5:9). असे वाटते कीं त्यांचा त्यातून बचाव होणार आहे!

आम्हांला न्याय मिळेल ही स्वत:ला खात्री करून देण्यासाठीं आम्हीं कोठे वळणार आहोत? कीं ख्रिस्ती विश्वास म्हणजें गंभीर पापांकडें वाकोल्या दाखविणें नाहीं?

उत्तर हे आहे कीं आम्हीं ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडें पाहतो. खरे विश्वासणारे आमच्याविरुद्ध जे काहीं अपराध करतांत त्यांचा सूड येशूच्या मृत्यूमध्यें घेण्यात आला होता. हे सरळ परंतु ह्या आश्चर्यकारक तथ्यामध्यें सूचित करण्यात आलें होते कीं देवाच्या सर्व लोकांची सर्व पापे येशूवर लादण्यात आली. “आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले” (यशया 53:6; 1 पेत्र 2:24).

ख्रिस्ताचे दु:खसहन ही खरी शिक्षा होती आणि तुम्हांला कधी तुमच्या सोबतच्या ख्रिस्ती व्यक्तीद्वारे मिळालेल्या प्रत्येक दुखण्यावर देवाची भरपार्इ आहे. म्हणून, ख्रिस्ती विश्वास पापाला कमी लेखत नाहीं. तो आमच्या दु:खात अपमान जोडत नाहीं.

या उलट, हे सत्य आमच्या विरुद्ध केलेंल्या अपराधांना गांभिर्याने घेते, कीं त्यांचा उपाय करण्यासाठीं देवानें दु:ख सहन करण्यासाठीं आपला स्वत:चा पुत्र दिला, आमच्याविरुद्ध कोणी केलेंल्या अपराधासाठीं आम्हीं त्यांस जे दु:ख देऊ शकतो त्यापेक्षा त्याला अधिक दु:ख देण्यात आलें. जर आपण आपल्यासोबतच्या विश्वासणाऱ्याविरुद्ध मनांत कटुत्व धरून राहतो, तर खरे म्हणजें आपण असे म्हणत असतो कीं ख्रिस्ताचा वधस्तंभ देवाच्या लोकांच्या पापांची पुरेशी भरपार्इ नव्हती. हा ख्रिस्ताचा आणि त्याच्या वधस्तंभाचा अपमान आहे , आणि देवाचे मुल म्हणून तो अपमान तुम्हीं करावा अशी तुम्हीं कल्पनाहीं करू शकत नाहीं.

6 July : ख्रिस्तानें कटुत्वावर कसा विजय मिळविला

Alethia4India
Alethia4India
6 July : ख्रिस्तानें कटुत्वावर कसा विजय मिळविला
Loading
/

त्याची निंदा होत असता त्यानें उलट निंदा केलीं नाहीं; दुःख भोगत असता त्यानें धमकावले नाहीं; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडें स्वतःला सोपवून दिलें. (1 पेत्र 2:23)

येशूच्या विरोधात जे पाप करण्यात आलें त्यापेक्षा अधिक गंभीरपणें कोणाविरुद्धही पाप करण्यात आलें नाहीं. त्याच्या विरुद्ध शत्रूत्वाचा जो प्रत्येक कण व्यक्त केला गेला त्यांस तो पूर्णपणें अपात्र होता.

आज पर्यन्त या जगांत असा कोणीही होऊन गेला नाहीं ज्याने येशूपेक्षा जास्त आदरास पात्र असे जीवन जगले असेल; आणि त्याच्यापेक्षा जास्त अपमान आणखी कोणाचाही झाला नाहीं.

जर कोणाला संतप्त आणि कटू होण्याचा आणि सूड घेण्याचा अधिकार असेल तर तो म्हणजें येशू होता. ज्यांचे अस्तित्व त्यानें राखून ठेवले होते त्या दुष्टांनी त्याच्या तोंडावर थुंकले तेव्हा त्यानें स्वतःवर कसा संयम ठेवला? पहिले पेत्र 2:23 याचे उत्तर देते: “त्याची निंदा होत असता त्यानें उलट निंदा केलीं नाहीं; दुःख भोगत असता त्यानें धमकावले नाहीं; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडें स्वतःला सोपवून दिलें.”

या वचनाचा अर्थ असा आहे कीं देवाच्या न्यायत्वपूर्ण न्यायाच्या भावी कृपेवर येशूचा विश्वास होता. त्यानें भोगलेल्या सर्व अपमानांचा सूड घेण्याची त्याला गरज नव्हती, कारण त्यानें तो विषय देवाकडें सोपविला होता. त्यानें आपला सूड देवाच्या हातांत सोडून दिला आणि उलट त्यानें आपल्या शत्रूंसाठीं प्रार्थना केलीं: “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतांत हे त्यांना समजत नाहीं” (लूक 23:34).

पेत्र आपल्याला येशूच्या विश्वासाचे हे ओझरते दर्शन देतो यासाठीं कीं आपण स्वतः असे जीवन कसे जगावे हे आम्हांला शिकता यावें. तो म्हणाला, “कारण ह्याचकरता (धैर्याने कठोर वागणूक सहन करण्यासाठीं) तुम्हांला पाचारण करण्यात आलें आहे… कारण ख्रिस्तानेंही तुमच्यासाठीं दुःख भोगले आणि तेणेंकरून तुम्हीं त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्यानें तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे” (1 पेत्र 2:21).

देव जो उत्तम न्यायाधीश, त्यानें जे करण्याचे अभिवचन दिलें होते त्यावरील विश्वासाने जर ख्रिस्तानें कटुत्वावर आणि सूडावर विजय मिळविला, तर वाईट वागणूक मिळाल्याबद्दल कुरकुर करण्याचा आपल्याला त्याच्यापेक्षा फारच कमी अधिकार आहे, त्यामुळें आपण हे किती जास्त सहन केलें पाहिजे?

5 July : तुमचा सूड परमेश्वराच्या हाती द्या

Alethia4India
Alethia4India
5 July : तुमचा सूड परमेश्वराच्या हाती द्या
Loading
/

प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे कीं, “सूड घेणें माझ्याकडें आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो. (रोम 12:19)

कटुत्व आणि सूड या बाबतीत आमच्या प्रवृत्तीवर विजय मिळविण्याविषयी इतके महत्वपूर्ण अभिवचन का दिलें गेले आहे? त्याचे कारण हे कीं हे अभिवचन आमच्यात संताप उत्पन्न करणाऱ्या सर्वात प्रबळ आवेगापैकीं एकाचे समाधान देते – असा आवेग जो पूर्णपणें चुकींचा नाहीं.

अनेक बाबतीत, आमच्यावर खरोखर अन्याय झालेंला असतो. म्हणून, न्याय मिळाला पाहिजे ही भावना काहीं पूर्णपणें चुकींची नाहीं. पण असे वाटणें कीं आपण स्वतः सूड घेतला पाहिजे आणि जोवर तसे होत नाहीं तोवर आमच्या मनात कटुत्व पाळून ठेवणें हे चुकींचे आहे. ही एक घातक चूक ठरेल.

माझ्या सेमिनरीच्या दिवसांत, नोएल आणि मी जोडप्यांसाठीं असलेल्या एका लहान गटात होतो, आणि तो गट अतिशय सखोल वैयक्तिक पातळीवर चर्चा करू लागला. एके सायंकाळी आम्हीं क्षमा आणि राग यावर चर्चा करीत असतांना तिथें असलेल्यां तरूण पत्नींपैकीं एकींने म्हटले कीं ती लहान मुलगी असतांना तिच्या आईने तिच्याशी जे काहीं केलें होते त्याविषयी ती तिला क्षमा करू शकणार नाहीं आणि करणारहि नाहीं.

आम्हीं क्षमा न करणाऱ्या स्वभावाशी संबंधित बायबलमधील काहीं आज्ञांविषयी आणि ताकिदींविषयी चर्चा केलीं. 

  • आणि तुम्हीं एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायीं तुम्हांला क्षमा केलीं आहे तशी तुम्हींही एकमेकांना क्षमा करा. (इफिस 4:32)
  • परंतु जर तुम्हीं लोकांना क्षमा केलीं नाहीं तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाहीं. (मत्तय 6:15)

पण ती मान्य करण्यांस तयार नव्हती. म्हणून मी तिला ताकींद दिली कीं जर तिने अक्षम्य कटुतेची भावना राखून ठेवली तर तिचा प्राण धोक्यात आहे. पण आपण आईला क्षमा करणार नाहीं असा तिचा अट्टाहास होता.

सूड आणि कटुत्वाच्या अशा घातक भावनेवर मात करण्यास सहाय्य पुरविण्यासाठीं आम्हांला देवाच्या न्यायदंडाच्या कृपेचे रोम 12 मध्यें येथे अभिवचन देण्यात आलेंलें आहे.

येथें पौलाने असा युक्तिवाद मांडला कीं आपण खात्री धरू शकतो कीं सर्वप्रकारच्या अन्यायाची परतफेड देवच करील आणि आपण ती बाब त्याच्या हातांत सोडू शकतो कारण सूड घेणें हे देवाचे काम आहे. आमच्यांत असलेली सूड घेण्याची इच्छा सोडून द्यावी म्हणून आम्हांला प्रेरणा देण्याकरिता तो आपल्याला एक अभिवचन देतो: “मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो.”

जे अभिवचन आम्हांला क्षमा न करणाऱ्या, कटु, सूड घेणाऱ्या स्वभावापासून मुक्त करते ते अभिवचन म्हणजें हे कीं देव आमचा हिशोब पूर्ण करील. तो आमच्यापेक्षा अधिक न्यायपूर्ण पद्धतीने आणि दयेने आणि संपूर्णपणें तो हिशोब करील. तो सर्व पापास शिक्षा देतो. कोणीही कुठल्याही अपराधातून वाचू शकत नाहीं. तो एक तर पश्चाताप करणाऱ्या व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीं वधस्तंभावर ख्रिस्तामध्यें त्यास शिक्षा देतो, किंवा जे लोक तसे करीत नाहींत त्यांस नरकामध्यें शिक्षा देतो. म्हणून आपण मागे फिरून देवानें त्याचे परिपूर्ण कार्य करावे म्हणून त्याला जागा देऊ शकतो.

4 July : माझें समाधान केव्हा होईल?

Alethia4India
Alethia4India
4 July : माझें समाधान केव्हा होईल?
Loading
/

“मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठीं कीं, जी प्रीति तू माझ्यावर केलींस ती त्यांच्यामध्यें असावी आणि मी त्यांच्यामध्यें असावे.” (योहान 17:26)

कल्पना करा कीं जे अत्यंत आनंददायक आहे त्याचा आनंद घ्यावयांस तुम्हीं समर्थ आहा, आणि तो ही असा आनंद जो अमर्याद आहे, आणि ज्याचे बळ व भावनावेग वाढत जातो.

हा आमचा वर्तमान अनुभव नाहीं. या जगात तीन गोष्टी अशा आहेंत ज्यां आमच्या संपूर्ण समाधानाच्या मार्गात अडखळण आणतांत.

1. आपल्या अंतःकरणाच्या सखोल अभिलाषा पूर्ण करण्यासाठीं या जगातील कुठल्याही गोष्टीचे वैयक्तिक मोल पुरेसे नाहीं.

2. सर्वात्तम खजिन्याचा जास्तीत जास्त आस्वाद घेण्याचे बळ आमच्यात नाहीं.

3. येथील गोष्टींचा आमचा आनंद येथेच समाप्त होतो. काहींही टिकून राहत नाहीं.

जर योहान योहान 17:26 मध्यें येशूचे ध्येय खरे ठरले, तर हे सर्व बदलून जाईल. तो आमच्यासाठीं पित्याजवळ प्रार्थना करतो, “मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठीं कीं, जी प्रीति तू माझ्यावर केलींस ती त्यांच्यामध्यें असावी आणि मी त्यांच्यामध्यें असावे.” देव पुत्रावर तशा पद्धतीने प्रीति करीत नाहीं जशी तो पाप्यांवर प्रीति करतो. तो पुत्रावर प्रीति करतो कारण पुत्र प्रीतिस अतिशय पात्र आहे. अर्थात, तो पुत्रावर प्रीति करतो कारण पुत्र अमर्यादितरित्या सुंदर आहे. म्हणजें याचा अर्थ हा कीं ही प्रीति पूर्णपणें प्रसन्नतादायक आहे. येशू प्रार्थना करतो कीं देवाला पुत्रामध्यें ही जी प्रसन्नता वाटते तीच प्रसन्नता आम्हांला पुत्रामध्यें वाटावी.

जर पुत्रामध्यें पित्याची प्रसन्नता आमची प्रसन्नता ठरते, तर आमच्या प्रसन्नतेचा विषय, जो येशू आहे, त्याचे वैयक्तिक मूल्य अपार ठरेल. तो कधीही कंटाळवाणा किंवा निराशाजनक अथवा हताशाजनक होणार नाहीं. परमेश्वराच्या पुत्राशिवाय दुसऱ्या कुठल्याही मोठ्या संपत्तीची कल्पना करता येणें शक्य नाहीं.

पण येशू ज्या गोष्टीसाठीं प्रार्थना करतो त्यामध्यें हे जोडा; अर्थात, या अक्षय संपत्तीचा आस्वाद घेण्याची आमची क्षमता – आमचे बळ, आमचा आवेश – मानवी दुर्बळतेमुळें मर्यादित ठरणार नाहीं. आपण देवाच्या पुत्राचा त्याच्या सर्वसमर्थ पित्याच्या आनंदासह उपभोग घेऊ.

त्याच्या पुत्रामध्यें पित्याचा आनंद आमच्याठायीं असेल आणि तो आमचा आनंद ठरेल. आणि याचा अंत कधीही होणार नाहीं, कारण पित्याचा कधीही अंत होत नाहीं, पुत्राचाही नाहीं. एकमेकांसाठीं त्यांची प्रीति त्यांच्या प्रीत्यर्थ आमची प्रीति ठरेल, आणि म्हणून त्यांच्यावर असलेल्या आमच्या प्रीतिचा कधीही अंत होणार नाहीं.

3 July : सुवार्ता : देव आनंदी झाला आहे

Alethia4India
Alethia4India
3 July : सुवार्ता : देव आनंदी झाला आहे
Loading
/

धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता… (1 तीमथ्य 1:11)

1 तीमथ्यमधील हा एक सुंदर वाक्प्रचार आहे, जो पवित्र शास्त्राच्या काहीं शब्दांच्या अतिशय परिचित पृष्ठभागाखाली लपलेला आहे. पण तो शोधून काढल्यानंतर, तो असा वाटतो: “आनंदी देवाच्या गौरवाची सुवार्ता.” मूळांत, “धन्यवादित” या शब्दाचा अर्थ “प्रशंसा प्राप्त” असा नाहीं, तर “आनंदी” असा आहे.

देवाच्या गौरवाचा एक मोठा भाग त्याचा आनंद आहे.

देवाला असीम आनंद होऊं शकत नाहीं आणि तरीही तो पूर्णतः गौरवी असू शकतो ही गोष्ट प्रेषित पौलाला अकल्पनीय होती. अमर्यादपणें गौरवशाली असणें म्हणजें अमर्यादपणें आनंदी असणें. त्यानें “धन्यवादित देवाचा गौरव” या वाक्प्रचाराचा उपयोग केला कारण तो ज्यां प्रकारे आनंदी आहे तसा आनंदी असणें ही देवासाठीं गौरवशाली गोष्ट आहे.

देवाचे गौरव बहुतांशी या तथ्यात समाविष्ट आहे कीं तो आमच्या कल्पनेपलीकडें आनंदी आहे. जसे अठराव्या शतकातील महान सुवार्तिक, जोनाथन एडवर्ड्स यांनी म्हटले, “देवाच्या परिपूर्णतेचा भाग जो तो कळवितो तो आहे त्याचा आनंद. या आनंदात स्वतःमध्यें आनंद अनुभव करणें आणि आनंद साजरा करणें समाविष्ट आहे; जीवितांचा आनंद सुद्धा असाच असतो.”

आणि हा सुवार्तेचा मुख्य भाग आहे, पौल म्हणतो: “धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता.” ही सुवार्ता किंवा आनंदाची बातमी आहे कीं देव गौरवीरित्या आनंदी आहे. कोणीही उदासवाण्या, दुःखी देवासोबत अनंतकाळ घालवू इच्छिणार नाहीं.

जर देव दुःखी असेल, तर सुवार्तेचे हे ध्येय – देवासोबत सदाकाळ राहणें – आनंदी ध्येय नाहीं, आणि याचा अर्थ असा आहे कीं ती सुवार्ता मुळीच असणार नाहीं. पण, वस्तुतः, येशू आम्हांला आनंदी देवासोबत अनंतकाळ घालवण्यास पाचारण करतो जेव्हा तो म्हणतो, “तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो” (मत्तय 25:23).

येशूनें योहान 15:11 मध्यें म्हटले, “माझा आनंद तुमच्यामध्यें असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” येशू बोलला, आणि जगला, आणि मरण पावला यासाठीं कीं त्याचा आनंद – देवाचा आनंद – आमच्याठायीं असावा आणि आमचा आनंद परिपूर्ण व्हावा. म्हणून, सुवार्ता ही “धन्यवादित (आनंदी) देवाच्या गौरवाची सुवार्ता” आहे.

2 July : तुम्हांला देवाची किती चांगल्याप्रकारे ओळख आहे?

Alethia4India
Alethia4India
2 July : तुम्हांला देवाची किती चांगल्याप्रकारे ओळख आहे?
Loading
/

“पाहा, देव थोर आहे, तो आम्हांला अगम्य आहे; त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे.” (ईयोब 36:26)

देवाला अतिशय चांगल्याप्रकारे जाणणें किंवा ओळखणें अशक्य आहे.

तो अस्तित्वात असलेला सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहे. आणि याचे कारण हे कीं त्यानें इतर सर्वांना घडविले, आणि त्यांना जर कुठले महत्व असेल तर ते त्याच्यामुळें आहे.

इतर जिवांस जे बळ अथवा बुद्धी अथवा कौशल्य अथवा सौंदर्य मिळाले आहे ते सर्व त्याच्याकडून येते. उत्तमतेच्या प्रत्येक पातळीवर, तो तुम्हीं ओळखत असलेल्या किंवा ज्याच्याविषयी तुम्हीं ऐकलें आहे अशा सर्वोत्तम व्यक्तीपेक्षा अमर्यादपणें श्रेष्ठ आहे.

अनंत, अपरंपार असल्याने, त्याच्यांत असलेली चित्तवेधकता अमर्याद आहे. म्हणून देव कंटाळवाणा असणें अशक्य आहे. अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण आणि चित्तवेधक कृत्यांचे त्याचे सतत प्रदर्शन स्फोटक आहे.

प्रत्येक उत्तम आनंदाचा उगम म्हणून, तो स्वतःमध्यें पूर्णपणें आणि कायमचा प्रसन्न राहतो. जर आपण त्याला तशाप्रकारे ओळखत नाहीं, तर आपण एकतर मृत आहोत, अथवा आंधळे आहोत किंवा निद्रेत चालत आहोत.

म्हणून या जगात परमेश्वरास जाणून घेण्यासाठीं किती कमी कष्ट केलें जातांत ही बाब म्हणजें धक्कादायकच.

हे जणू काहीं असे आहे कीं देशाचे राष्ट्रपती तुमच्यासोबत महिनाभर राहाण्यासाठीं आलें आणि तुम्हीं दररोज येता जाता त्यांना फक्त सलाम म्हणतां. किंवा जणूकाहीं तुम्हीं प्रकाशाच्या गतीने काहीं तास सूर्य आणि सौरमंडलाभोवती उडत होता, आणि खिडकींतून बाहेर पाहण्याऐवजी तुम्हीं कंप्यूटर गेम खेळत बसला. किंवा जणूकाहीं तुम्हांला सर्वोत्कृष्ट अभिनेते, गायक, क्रीडापटू, संशोधक आणि विद्वान लोकांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पाहण्यासाठीं आमंत्रित करण्यात आलें होते, परंतु तुम्हीं जाण्यास नकार दिला, यासाठीं कीं तुम्हांला टीव्ही वरील तुमच्या आवडत्या मालिकेचा शेवटचा भाग पाहता यावा.

आपण एकत्र मिळून प्रार्थना करू या कीं आपला अमर्यादितरित्या थोर परमेश्वर त्याला आम्हास शक्य तितके पूर्णपणें पाहता यावें आणि त्याला आणखी जाणून घेण्यासाठीं त्याचा शोध घ्यावा म्हणून त्यानेंच आमचे अंतःकरण वळवावे, आणि आमचे डोळे उघडावे.

1 July : तुमचे चांगले करण्यात देवाचा आनंद

Alethia4India
Alethia4India
1 July : तुमचे चांगले करण्यात देवाचा आनंद
Loading
/

हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. (लूक 12:32)

येशू बाजूला बसून लढा न देता आम्हांला अविश्वासांत सोडून देणार नाहीं. तो वचनरुपी शस्त्र हाती घेतो आणि जे विश्वास ठेवण्यास संघर्ष करतांत त्या सर्वांसाठीं ते तो आपल्या सामर्थ्याने बोलतो.

देव तशाप्रकारचा देव नाहीं जो खरोखर आमच्यासाठीं चांगला बनू इच्छितो ही भिती घालवून देणें हा त्याचा उद्देश्य आहे – म्हणजें ही भीती कीं तो खरोखर उदार आणि सहाय्यक आणि दयाळू आणि कोमल नाहीं, तर मुळांत आमच्यावर चिडलेला आहे – त्याची मनःस्थिती चांगली नाहीं आणि तो क्रोधाविष्ठ आहे.

कधी कधी, जरी आम्हीं आपल्या मनात हा विश्वास ठेवतो कीं देव आमच्यासाठीं चांगला आहे, तरीही आम्हांला आमच्या अंतःकरणात असे वाटू शकते कीं त्याचा चांगलुपणा बळजबरीने आहे किंवा चांगुलपणा दाखविण्यासाठीं त्याला भाग पाडण्यात आलें आहे, कदाचित एखाद्या न्यायाधिशाप्रमाणें ज्याला न्यायालयाच्या कार्यवाहीच्या कुठल्या तरी तांत्रिकतेविषयी सांगून एखादा चतुर वकींल युक्तीने कोपऱ्यांत नेतो, जेणेंकरून त्याला एखाद्या कैदाविरुद्ध असलेले आरोप खारीज करावे लागतांत ज्याला खरे पाहता त्यानें तुरुंगवास द्यावयास हवा होता.

पण परमेश्वराविषयी आम्हांला असे वाटता कामा नये म्हणून येशूला कळकळीने आमचे सहाय्य करायची आहे. तो लूक 12:32 मध्यें आपल्याला राज्य देण्यात त्याला जो पराकोटीचा आनंद होतो तो दाखविण्याद्वारे आपल्यासाठीं देवाच्या आत्म्याचे अवर्णनीय मूल्य आणि उत्कृष्टतेचे वर्णन करण्याचा तो प्रयत्न करत आहे.

“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” ह्या अद्भुत वाक्यातील प्रत्येक लहान शब्दाचा हेतू ती भिती काढून घेण्यास आपली मदत करणें आहे ज्याविषयी येशूला माहीत आहे कीं आपण त्याविषयी संघर्ष करित आहोंत, म्हणजें ही भीती कीं देव त्याचे लाभ आपल्याला देण्याच्या बाबतींत जळफळो; कीं त्याला भाग पडते म्हणून तो चांगल्या गोष्टी करतो आणि हे त्याच्या स्वभावानुसार नाहीं; कीं आतल्या आत तो रागावलेला आहे आणि आपल्या रागाला वाट करून देणें त्याला आवडते.

लूक 12:32 हे वाक्य देवाच्या स्वभावाविषयी आहे. ते अशाप्रकारच्या अंतःकरणाचे वर्णन आहे जे देवाजवळ आहे. देवाला कोणती गोष्ट आनंदित करते, त्याला काय करणें आवडते आणि त्याला काय करण्यात आनंद वाटतो याविषयी हे वाक्य आहे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. “हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक 12:32)

2  May : देवानें त्याच्या प्रीतिचे प्रमाण दिलें

Alethia4India
Alethia4India
2  May : देवानें त्याच्या प्रीतिचे प्रमाण दिलें
Loading
/

परंतु देव आपल्यावरच्या स्वत:च्या प्रीतिचे प्रमाण हे देतो कीं, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठीं मरण पावला. ( रोम 5:8 )

ह्या वचनाकडे लक्ष्य द्या, ह्या मध्यें “प्रमाण देतो” हे वर्तमान काळात आहे आणि ख्रिस्त मरण पावला हे भूतकाळात आहे. “देव आपल्यावरच्या स्वत:च्या प्रीतिचे प्रमाण हे देतो  कीं, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठीं मरण पावला.” ( रोम 5:8 )

वर्तमान काळ असें सुचवते कीं प्रमाण देणे हे एक सुरू असलेले कार्य आहे, जे आज देखील चालू आहे. आणि ते उद्या देखील सुरू राहणार.

 भूतकाळ “मरण पावला” असें दर्शवते कीं ख्रिस्ताचे मरण एकदाच झालें, आणि पुन्हा ते घडणार नाहीं. “कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजें नीतिमान पुरुषाने अनीतीमान लोकांकरीता, एकदाच मरण सोसले. ” (1 पेत्र 3:18)

मग पौलाने वर्तमान काळ (प्रमाण देतो) याचा वापर का केला ? मी अशी अपेक्षा केलीं असती कीं पौल असें म्हणेल कीं , “देवानें  आपल्यावरच्या स्वत:च्या प्रीतिचे प्रमाण हे दिलें (भूतकाळ), कीं आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठीं मरण पावला.” ख्रिस्ताचे मरण जेव्हां झालें, त्यावेळी ते देवाच्या प्रीतिचे दर्शक नव्हते का ? आणि त्याचे प्रमाण भूतकाळात दिलें गेले ना?

मला वाटते त्याचे उत्तर आधीच्या काही वचनात दिलें आहे. पौलाने नुकताच असें म्हंटले आहे कीं, “संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते ; आणि आशा लाजवत नाहीं.” ( रोम 5:3-5)

दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास, देवाचा आपल्याला सर्व गोष्टींतून घेऊन जाण्याचा उद्देश आशा देणे हा आहे. सर्व क्लेशामधून जात असताना देखील आपण आशावादी रहावे अशी त्याची उत्कंठा आहे.

पण आपण आशावादी कसे राहू शकतो ?

याचे उत्तर पौल पुढच्या वाक्यांत देतो, “कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारें आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे” (रोम 5:5). आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे. याचा अर्थ, (आपल्या तारणाच्यावेळी) आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव भूतकाळातच झाला आहे, आणि तो आज देखील होत आहे.

देवानें आपल्यावरील त्याच्या प्रीतिचे प्रमाण देण्याकरिता त्याचा पुत्र देऊ केला, जो आपल्या पापां करिता एकदाच मरण पावला (रोम 5:8). पण त्याला हे देखील ठाऊक आहे कीं, ह्या भूतकाळातील प्रीतिचा अनुभव आपल्याला वर्तमान वस्तुस्थिती (आज आणि उद्या) मध्यें देखील यायला हवा, जर आपल्यामध्यें धीर, शील आणि आशा हवी असेल तर. यासाठींच, त्यानें याचे प्रमाण केवळ क्रुसावरच दिलें नाहीं तर, तर तो आज देखीत त्याचा आत्म्या द्वारें आपल्या अंतकरणात याचे प्रमाण देत आहे. तो हे आपल्या अंतकरणाचे नेत्र उघडून करत आहे, ज्याच्या द्वारें आपण त्याच्या  कृसाचा गौरव आणि तो देत असलेली खात्री कीं ख्रिस्त येशू मध्यें आपल्याला देवाच्या प्रीति पासून काहीच विभक्त करू शकत नाहीं याचा आस्वाद घेऊ शकू आणि ते पाहू शकू.