ArchivesSolid Joys

20 फेब्रुवारी : पुनरुत्थानाद्वारें आश्चर्यचकित

Alethia4India
Alethia4India
20 फेब्रुवारी : पुनरुत्थानाद्वारें आश्चर्यचकित
Loading
/

प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हांला लिहीत आहे; ह्या दोन्हींमध्ये मी तुम्हांला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करत आहे. (2 पेत्र 3:1)

इस्टर जसजसा जवळ येत आहे, तसतसे आपण येशूच्या पुनरुत्थानाचा आपल्यासाठीं जो हेतू होता त्याविषयी कृतज्ञता आणि आनंद आणि कौतुक आणि अचंबा जागृत करूया. आपल्या पतित स्वभावाचा शाप असा आहे कीं जी गोष्ट आपल्याला कधी रोमांचित करायची ती सामान्य बनत जाते. सत्य परिस्थिती बदललेलीं नाही. आम्हीं बदललो आहों. 

बायबलचे अस्तित्व यासाठींच आहे. पेत्र त्याच्या दोन पत्रांविषयीं असें म्हणतो कीं ती “आठवण देऊन” “मन जागृत” करण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहेत.

ह्यास्तव, आठवण देऊन आपण आपली प्रामाणिक मने जागृत करूया.

येशूला मेलेल्यांतून उठवून देवानें काय साध्य केले? येथें बायबलमधून कांही उत्तरे आहेत.

येशूच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे जिवंत आशा प्राप्त होण्यासाठीं आपल्याला पुन्हा जन्म दिला गेला.

1 पेत्र 1:3: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठीं आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठीं, त्यानें आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला .”

येशूच्या पुनरुत्थानामुळे, त्याला आता तो गौरव मिळाला आहे ज्यासाठीं आपल्याला निर्माण केले होते. तो जसा आहे त्याला तसेंच पाहणे हेच आपले अंतिम प्राक्तन (लक्ष्य) आहे.

1 पेत्र 1:21: “देवानेंच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला.”

जॉन 17:5, 24: “तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर. . . . हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे कीं, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथें माझ्याजवळ असावे; ह्यासाठीं कीं, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलींस.” मृतांतून उठलेला प्रभु येशू स्वतः तुमची प्रामाणिक मनें नव्याने खोलवर त्याची उपासना करण्यासाठीं व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यासाठीं व आनंद करण्यासाठीं जागृत करो आणि चेतवो.

19 फेब्रुवारी : जीवें मारणारी थंडी

Alethia4India
Alethia4India
19 फेब्रुवारी : जीवें मारणारी थंडी
Loading
/

तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. (स्तोत्र 147:15)

आज रात्री आमच्या किचनच्या फ्रीझचे तापमान मिनियापोलिसच्या बाहेरील तापमानापेक्षा चाळीस अंश जास्त गरम असेल. उद्याचे उच्च तापमान शून्यापेक्षा (फॅरेनहाइट) पाच अंश खाली असेल. हे प्रभूकडून आहे.

तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो, तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो. तो आपल्या बर्फाचा चुर्‍याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो; तो आपला वारा वाहवतो तेव्हां पाणी वाहू लागते. (स्तोत्र 147:15–18)

ती अशी थंडी आहे जिच्याशी तुम्हीं बालिश खेळ खेळत नाही. ती जीव घेणी थंडी आहे.

मी दक्षिण कॅरोलिनाहून मिनेसोटाला आलो तेव्हां मी स्वतःला थंडीपासून वाचविण्यासाठीं गरम कपडे घातले. परंतु माझी कार नादुरुस्त झाल्यांस मला ज्यां जीवन-रक्षक वस्तूंची गरज पडेल त्यां वस्तु मात्र मीं सोबत घेतल्या  नव्हत्या.

एका रविवारच्या रात्री मी चर्चमधून घरी परततांना अशाच थंडीत माझी गाडी नादुरुस्त झालीं. तेव्हां सेलफोन नव्हतें. गाडीत माझ्याबरोबर माझी पत्नी आणि दोन लहान मुलं होती.

पण तो रस्ता मात्र निर्जन होता. तेव्हां हा रस्ता धोकादायक असल्याचें माझ्या अचानक लक्षात आले.

आणि लवकरच तो रस्ता खूप धोकादायक असा ठरला, कारण त्या रस्त्याने कोणीहि ये-जा करित नव्हते.

मला दूरवर कुंपणातून एक घर दिसलें. शेवटी मी एक बाप आहे. कुटुंबाची काळजी घेणे हे माझं कर्तव्य. मी कुंपणावरून उडी मारून आंत शिरलो आणि धावत त्यां घराकडे गेलो आणि दरवाजा ठोठावला. तिथें राहणारे घरातंच होते. मी कारमध्ये माझी पत्नी आणि दोन लहान मुले असल्याचे त्यांना सांगितलें आणि ते आम्हांला आत घेतील का अशी मी त्यांना विचारणा केलीं. त्यांनी आम्हांला आंत घेतलें.

ही अशी थंडी आहे ज्यांत तुम्हीं धोका पत्करू शकत नाहीं.

हा असा मार्ग आहे ज्याविषयी देव म्हणतो, “मग गरम असो वा थंड, उंच असो वा खोल, तीक्ष्ण असो वा बोथट, किंचाळणारा असो वा शांत, प्रकाशमान असो वा अंधकारमय . . . माझ्याशी खेळू नकोस. मी देव आहे. या सर्व वस्तूं मी बनवल्या आहेत. जसा उन्हाळ्याचा उबदार वारा, आणि सौम्य पाऊस, आणि रात्रीच्या मंद चांदण्या, आणि तलावाचा काठ, आणि शेतातील फुलें आणि हवेतील पक्षी, तसें तीं मजविषयी साक्ष देतांत.

या थंडीतहि आमच्यासाठीं एक अभिवचन आहे. परमेश्वर आम्हांला स्पर्शजन्य त्वचा आणि ऐकणारे कान देऊ करो.

18 फेब्रुवारी : तुम्हीं अमर असतां तेव्हां

Alethia4India
Alethia4India
18 फेब्रुवारी : तुम्हीं अमर असतां तेव्हां
Loading
/

मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्हीं खाणारपिणार नाही.” (प्रेषितांची कृत्ये 23:12)

त्या भुकेल्या लोकांचे काय झालें, ज्यांनी पौलाचा जीव घेईपर्यंत आम्हीं खाणारपिणार नाही अशी शपथ घेतलीं होती?

आपण त्यांच्याविषयीं प्रेषितांची कृत्ये 23:12 मध्ये वाचतो, “मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्हीं खाणारपिणार नाही.” पण तसें झालें नाही. का? कारण अनपेक्षित घटना घडल्या.

  •  तें कट करित असतांना तिथें दबा धरून बसलेल्या एका तरुणाने तें ऐकलें.
  •  हा तरुण पौलाचा भाचा होता.
  • त्यां तरुणाने पौलाचे रक्षण करणाऱ्या रोमन शताधिपतीकडे जाण्याचे धाडस केले.
  •  त्यां शताधिपतीनें त्याचे वृत्त गांभीर्याने घेतले आणि त्याला सरदाराकडे आणले.
  •  सरदाराने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पौलाला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठीं “दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी” तयार केले.

प्रत्येक घटना अत्यंत अशक्य अशी होती. आश्चर्यच. पण असच झालं.

कोणती गोष्ट घातपात करण्यासाठीं दबा धरून बसलेल्यां त्यां भुकेल्या माणसांच्या लक्ष्यांत आलीं नव्हतीं? त्यांनी कट रचण्याआधीच पौलाचे काय झालें याचे आकलन करण्यात ते अपयशी झालें. प्रभूने तुरुंगात पौलाला दर्शन देऊन म्हटलें, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.” (प्रेषितांची कृत्ये 23:11).

ख्रिस्तानें म्हटलें कीं पौल रोम शहरांत जात आहे. आणि तेच होणार होते. ख्रिस्ताच्या अभिवचनाविरुद्ध कोणताही घातपाताचा कट यशस्वी होऊ शकत नाही. रोम नगरांत येईपर्यंत पौल अमर होता. त्याची अंतिम साक्ष देणें बाकीं होते. आणि पौल ती देईल ह्याची खात्री स्वतः ख्रिस्त करणार होता.

तुमचीही अंतिम साक्ष आहे जी देणे तुम्हांला अगत्याचे आहे. आणि जोपर्यंत तुम्हीं ती देत नाही तोपर्यंत तुम्हीं अमर आहां.

17 फेब्रुवारी : देवाचे गोड सत्संकल्प

Alethia4India
Alethia4India
17 फेब्रुवारी : देवाचे गोड सत्संकल्प
Loading
/

तरी ज्या देवानें मला माझ्या मातेच्या उदरांतून जन्मल्यापासून वेगळें केलें व आपल्या कृपेनें बोलावलें…… (गलती 1:15)

पौलाचे आत्म-परिवर्तन, ख्रिस्ताचे सार्वभौमत्व आणि पौलाची पापें या सर्वांचा तुमच्या तारणाशी असलेला संबंध काय आहे यांवर विचार करा.

पौल म्हणाला कीं देवानें “मला…..जन्मल्यापासून वेगळे केले” आणि नंतर, अनेक वर्षांनी, दिमिष्कास जात असतांना, “आपल्या कृपेने बोलावले” (गलती 1:15). याचा अर्थ असा कीं पौलाचा जन्म आणि दिमिष्कास जात असतांना त्याला करण्यांत आलेले पाचरण यां दरम्यान तो पूर्वीच-निवडलेलें, परंतु अद्याप पाचारण न झालेंला, असा देवाचे पात्र होता (प्रेषितांची कृत्ये 9:15; 22:14).

याचा अर्थ असा कीं पौल हा देवाचे निवडलेला पात्र, ज्याला लवकरच ख्रिस्ती सुवार्तिक बनविण्यांत येणार होते, असा मनुष्य म्हणूनच तो ख्रिस्ती लोकांना मारत असे, त्यांना तुरुंगात टाकत असे आणि त्यांची हत्या करत असे.

मग असे झालें कीं, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हां सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकीं मोठा प्रकाश चमकला. तेव्हां मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली?” (प्रेषित 22:6-7)

ही घटना टळणार नव्हती किंवा पौल त्यांतून सुटणार नव्हता. देवानें त्याला मातेच्या उदरातून जन्मल्यापासून यासाठींच निवडून वेगळे केले होते. आणि आता तो त्याच्यावर मात करून त्याला पकडणार होता. ख्रिस्ताची ती वाणी सार्वभौम होती. वाटाघाटी किंवा तरतूद करण्याची कांही शक्यता नव्हती.

‘उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथें सांगण्यात येईल. (प्रेषित 22:10)

दिमिष्कच्या मार्गावर झालेंली घटना ही देवानें पौलाच्या तारणासाठीं केलेल्या अनेक दशकांच्या निरर्थक प्रयत्नांनंतर पौलानें स्वत:च  ख्रिस्ताला शरण जाण्यासाठीं स्वेच्छेने घेतलेला अंतिम व मुक्त निर्णय नव्हता. नाहीं. देवानें त्याला आपल्या ठरविलेल्या काळी (त्याच्या जन्मापूर्वी) आधीच निवडले होते, आणि त्याला तो केव्हां पाचारण करील ती नेमकीं घटका (दिमिष्कच्या मार्गावर) ठरवली होती. देवानें त्याला हाक मारली, आणि त्यां हाकेनें त्याच्या आत्म्यांत शरणागती उत्पन्न केलीं.

याप्रमाणे, पौलाचा जन्म आणि त्याचे पाचारण यादरम्यान देवानें त्याच्याकडून जी कांही पापे होऊं दिलीं ती सर्व त्याच्या योजनेचा भाग होती, कारण देव त्याला या आधी केव्हांच पाचारण करूं शकला असता.

त्या पापांमागे देवाची योजना काय असावी याची आपल्याला कांही कल्पना आहे का? होय, आहे. देवानें ती पापें तुमच्यासाठीं आणि माझ्यासाठीं होऊं दिलीं – म्हणजे त्यां सर्वांसाठीं ज्यांना यात काही शंका आहे कीं त्यांनी ती पापे स्वतःहून कृपेने केलीं असावी. पाहा, पौल कसा त्याच्या पापांचा संबंध तुमच्या आशेबरोंबर जोडतो :

कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो. . . . तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्तानें, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. (1 तीमथ्य 1:13, 16)

अहाहा, अंत:कारणाने कठोर, व कोणतीहि आशा  नसलेल्यां पापी लोकांच्या यां सार्वभौम तारणांत देवाचे सत्संकल्प किती गोड आहेत!

16 फेब्रुवारी : जेव्हां आज्ञापालन अशक्य जाणवते

Alethia4India
Alethia4India
16 फेब्रुवारी : जेव्हां आज्ञापालन अशक्य जाणवते
Loading
/

अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. (इब्री 11:17)

सध्या तुमच्यापैकीं बऱ्याच जणांसाठीं – आणि तुमच्यापैकीं जें इतर कांही आहेंत त्यांच्यासाठींहि ती वेळ येत आहे – आज्ञापालन हे स्वप्न भंग झाल्यासारखे जाणवते. तुम्हाला असे वाटते कीं देवाचे वचन किंवा देवाचा आत्मा तुम्हाला जे करण्यास पाचारण करित आहे ते तुम्हीं केले तर ती गोष्ट तुम्हाला दळभद्र परिस्थितींत आणून ठेवील आणि देव हे सर्व तुम्हांसाठीं कल्याणकारक असे बनवेल  असा कोणताही मार्ग दिसत नाही.

कदाचित तुम्हीं नुकताच देवाकडून आज्ञा किंवा हाक ऐकलेली असूं शकते ती अशी कीं तुम्हीं वैवाहिक स्थितींत राहावे किंवा अविवाहित स्थितींत राहावे, जी नोकरी करित आहां तींत टिकून राहावे, किंवा ती नोकरी सोडावी, बाप्तिस्मा घ्यावा, जिथें तुम्हीं काम करता तिथें ख्रिस्ताची साक्ष द्या, प्रामाणिकपणाच्या मानकांशी तडजोड करण्यास नकार द्या, पाप करित असलेल्या व्यक्तीला त्याचा दोष दाखवा, नवीन व्यवसाय सुरू करा, सुवार्तिक बना. आणि ज्यां क्षणी तुम्हीं तुमच्या संकुचित अंत:करणांत पाहता, तेव्हां  ते साध्य करण्याची शक्यता भयंकर आहे – म्हणजे एकुलता एक पुत्र असा जो इसहाक वारस होऊ शकतो त्याला गमावल्यासारखे हे आहे.

तुम्हीं प्रत्येक मानवी शक्यता लक्ष्यांत घेऊन त्यावर विचार केला आहे, आणि ते कल्याणकारक ठरेल हें अगदी अशक्य दिसतयं.

अब्राहामसाठीं ती जाणीव किंवा भावना कशी होती हें आता तुम्हीं समजू शकता. तो घटनाक्रम तुम्हीं बायबलमध्ये वाचूं शकता.

तुम्हीं इतर सर्व गोष्टींपेक्षा देवाची आणि त्याच्या मार्गाची आणि त्याच्या वचनांची अधिक उत्कंठा धरता का, आणि तुमचा विश्वास आहे का कीं तो आपणाला तुमचा देव म्हणवून घेण्यास कोणतीही लाज न बाळगता तुमच्या विश्वासाचा आणि आज्ञापालनाचा आदर करू शकतो आणि करील, आणि तुमच्या आज्ञाधारकतेच्या मार्गाला जीवन आणि आनंदाचा मार्ग असा प्रकट करण्यासाठीं आपले सर्व शहाणपण आणि सामर्थ्य आणि प्रीती यांचा उपयोग करील?

आज  तुम्हीं ज्या संकटाला सामोरे जात आहांत हे तेच आहे: तुम्हीं त्याची उत्कंठा धरता का? तुम्हीं त्याच्यावर भरवसा ठेवाल का? तुमच्यासाठीं देवाचे वचन हें: देव करूं शकतो व देव समर्थ आहे.

15 फेब्रुवारी : कॅलवरीकडे जाणारे प्रत्येक पाऊल केवळ प्रीती होती

Alethia4India
Alethia4India
15 फेब्रुवारी : कॅलवरीकडे जाणारे प्रत्येक पाऊल केवळ प्रीती होती
Loading
/

ख्रिस्तानें आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे. (1 योहान 3:16)

ख्रिस्त आम्हांसाठीं मेला यांत त्याचे दु:ख जितके हेतुपुरस्सर होते तितकींच आपल्यावरील त्याची प्रीती देखील जाणीवपूर्वक होती. आपलें जीवन देण्यामागे जर तो हेतुपुरस्सर होता तर ते बलिदान आम्हांसाठीं होते. ते त्याचे प्रेम होते.

“येशूनें आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकींयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्यानें शेवटपर्यंत केले” (योहान 13:1).

कॅलवरीकडे जाणाऱ्या मार्गावरील त्याच्या प्रत्येक पावलाचा अर्थ हांच कीं “मीं तुझ्यावर प्रीती केलीं आहे.”

म्हणून, त्यानें आम्हांसाठीं स्वतःचे जीवन दिले यांत ख्रिस्ताची प्रीती अनुभवण्यासाठीं, त्याचे तें मरण कसें पूर्णपणे हेतुपुरस्सर होते हे समजणे सहज जातें.

जेव्हां पेत्राने आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचे डोके उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र केवळ  त्याचा कान छाटू शकला, तेव्हां त्या हिंसक प्रसंगानंतर येशूनें काय म्हटलें ते पहा.

तेव्हां येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय कीं, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झालें तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?” (मत्तय 26:52 54)

हे सांगणे एक गोष्ट आहे कीं जुन्या करारात येशूच्या मृत्यूची तपशीलवार भविष्यवाणी केलीं गेलीं होती, असें म्हणणे एक गोष्ट आहे. पण तें सर्व शास्त्रलेख पूर्ण व्हावेत ह्याची खात्री करून घेण्यासाठीं येशू स्वतः ते सर्व निर्णय अगदी अचूकपणे घेत होता असे म्हणणे पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.

मत्तय 26:54 मध्ये येशू आम्हांला तेच करित असल्याचे सांगत आहे. “मी हे संकट टाळू शकतो. पण असे झालें तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, स्वतःची सुटका करून घेण्यासाठीं मी जे पाऊल उचलू शकलों असतो ते मी उचलत नाहीये, कारण मला शास्त्रलेख ठाऊक आहेत. माझ्या लोकांचे तारण होण्यासाठींजें जें होणे अवश्य आहे हे मला ठाऊक आहे. देवाच्या वचनात माझ्याबद्दल जे भाकींत केले आहे ते सर्व पूर्ण करणे हा माझा निर्णय आहे. स्वकींयांवर मोठी प्रीती करणे— त्यां मार्गावरील प्रत्येक पाऊल उचलणें—  हा माझा निर्णय आहे. आणि त्यांनी ही प्रीती अनुभवाने जाणून घ्यावीं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांनी पूर्णपणे सुरक्षित व स्वतंत्र, वा तसेंच ह्या जगापासून पूर्णपणे वेगळे केलेलें असें लोग व्हावें.

13 फेब्रुवारी : परिपूर्ण असें नगर

Alethia4India
Alethia4India
13 फेब्रुवारी : परिपूर्ण असें नगर
Loading
/

त्यानें त्यांच्यासाठीं नगर तयार केलें आहे. (इब्री 11:16)

तिथें कोणतेहि प्रदूषण नाहीं, किंवा भित्तिचित्र नाहीं, वा कचरा नाहीं, रंगाचे पापुद्रे काढणें नाहीं किंवा निकामी वस्तूंची खोली नाहीं, वाळलेलें गवत किंवा तुटलेल्या बाटल्या नाहींत, चवाठ्यांवर तापलेल्या चर्चा नाहींत, सर्वांसमक्ष तोंडावर फटकारणें नाहीं, घरगुती भांडणे किंवा हिंसा नाहीं, रात्र-प्रहरी धोके नाहीं, जाळपोळ नाहीं किंवा खोटे बोलणे किंवा चोरी करणे किंवा जीवें मारणे नाहीं, वा तोडफोड नाहीं आणि कुरूपता तर नाहींच. 

देवाचे हें नगर परिपूर्ण असें असेल, कारण देव स्वतः तिथें आपली वस्ती करील. तो त्यां नगरांत वावरील, संभाषण करील आणि त्याचा प्रत्येक कानाकोपरा स्वतःच्या उपस्थितीने भरून टाकील. जे काही चांगले व मनोरम व पवित्र व अनुकूल व सत्य व हर्षाने भरलेले आहे ते सर्व तिथें असेल, कारण देव स्वतः तिथें आपली वस्ती करील.

तिथें परिपूर्ण न्याय केला जाईल आणि ज्यांनी या जगात ख्रिस्ताची आज्ञापालन करून जें जें दु:ख भोगले त्यां प्रत्येक दु:खाचे हजारपट प्रतिफळ दिलें जाईल. आणि ते कधीहि क्षय पावणार नाहीं. किंबहुना, अनंतकाळ जसजसा वाढत जाणाऱ्या आनंदासह सार्वकालिकतेंत विस्तारत जातो, तसतसा त्या प्रतिफळाचा उजळपणा अधिकच तेजस्वी होईल.

जेव्हां तुम्हीं ह्या नगराची पृथ्वीवरील इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक उत्कंठा धरतां, तेव्हां तुम्हीं देवाचा आदर करता, जो इब्री 11:10 नुसार, त्यां नगराचा योजक व उभारणारा आहे. आणि देवाचा आदर केला जातो तेव्हां तो प्रसन्न होतो व आपणाला तुमचा देव म्हणवून घ्यायला त्याला तुमची लाज वाटत नाहीं.

12 फेब्रुवारी : लिंकन व देवाची कृपा-योजना

Alethia4India
Alethia4India
12 फेब्रुवारी : लिंकन व देवाची कृपा-योजना
Loading
/

अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत (रोमकरांस  11:33)

अब्राहम लिंकन, ज्यांचा जन्म 1809 साली आजच्याच दिवशी झाला होता, तें त्यांच्या चाळीशीत धर्माबाबत संशयी व तर कधी कधी धर्माचा उपहास करणारे असें देखील होते. पण कश्याप्रकारे ते वैयक्तिकरित्या स्वतःवर व देशावर आलेले संकट यामुळें देवापासुन दूर  जाण्याऐवजी देवा जवळ आले हे पाहणे लक्षवेधी आहे. 

1862 साली जेव्हां लिंकन 53 वर्षाचे होते तेव्हां त्यांचा मुलगा विली याचे निधन झालें, त्या “दु:खातून बाहेर पडण्यासाठीं त्यांची पत्नी न्यू एज या गूढवादी शिक्षणाकडे वळाली”, तर लिंकन हे न्यूयॉर्क एव्हेन्यू, प्रेस्ब्यटेरियन चर्च वॉशिंग्टन येथील पाळक फिनेयास गर्ली यांचा शिक्षणाकडे वळाले.

आणि जसा कीं श्रीमान गरले उल्लेख करतांत, अनेक वैयक्तिक चर्चां नंतर लिंकन यांचा “ख्रिस्तामध्यें नवा जन्म झाला.” लिंकन यांनी अनेक वेळा उघड केलें कीं, “ख्रिस्ताला सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही, या भावनेने मी अनेक वेळा माझ्या गुडघ्यांवर येऊन प्रार्थना केलीं.”

त्याच बरोबर, जखमी व मरण पावलेले सैनिक यांची यातना त्यांना रोज व्यथित करीत असें. वॉशिंग्टन येथें जखमी सैनिकांसाठीं पन्नास दवाखाने होते व कॅपीटॉलच्या इमारतीमध्ये जखमींसाठीं दोन हजार बेड उपलब्ध केले गेले होते.

या तात्पुरत्या स्वरुपाच्या दवाखान्यामध्ये रोज पन्नास सैनिकांचा मृत्यू होत असे. या सर्व गोष्टींमुळे लिंकन देवाच्या कृपेच्या अधिक जवळ येत गेलें. “ज्याने हे जग निर्माण केले, त्यावर आज देखील त्याचीच सत्ता आहे, यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपण कांहीच करूं शकत नाहीं.

त्यांचा हत्येच्या एक महिना अगोदर, आपल्या दुसर्‍या कार्यकालाच्या भाषणाच्या वेळी त्यांनी गृहयुद्‌ध व देवाची कृपायोजना यांतील परस्पर संबंधावर आपलं सर्वात प्रसिद्ध वक्तव्य केलं. देव हा संयुक्त किंवा संघ राज्याच्या बाजूने नाही हे त्यांचे उदद्गार खूप उल्लेखणीय आहेत . देवाच्या स्वताच्या योजना असतात व तो दोन्ही बाजू कडील पापासाठीं कुठलीहि सबब (काही केले तरी अद्दल घडणार नाही अशी स्थिती) मानत नाही.

               आम्हीं  एकनिष्ठेने आशा करतो – आम्हीं तत्परतेने प्रार्थना करतो –कीं हे युद्धाचे मोठे अरिष्ट लवकरच संपुष्टात यावें.

तरी सुद्धा, देवाची इच्छा असेल कीं ते सुरू रहावे, दासांनी दोनशे वर्ष कष्ट करून मिळवलेल्या संपतीचा पूर्ण -हास झाला तरी, जो पर्येंत चाबकाच्या फट्कयांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची परतफेड तलवारीने होत नाही तो पर्येंत जरी युद्धं सुरू राहिले तरी देखील, आणि तीन हजार वर्षापूर्वी जसें नमूद केले होते, तें आजहि ओरड करून सांगितले गेलें पाहिजें कीं, “देवाचे सर्व न्याय योग्य व नीतिमान आहेत, हेच सत्य आहे.”

मी तुम्हां सर्वांकरिता, ज्यांनी काही तरी गमावले आहे, जे अतोनात दु:खात आहेत व जे वेदनेत आहेत, अशी प्रार्थना करितो,  कीं जशी लिंकन यांना आली तशी तुम्हाला देखील या गोष्टीची प्रचिती यावी, कीं आपण हताश होऊन सर्व दोष नियतीवर न देता, देवाचे अगाध ज्ञान व त्याच्या कृपा-योजनांवर आपण गाढ भरवंसा ठेवावा.

11 फेब्रुवारी : श्रेष्ठ दासत्व

Alethia4India
Alethia4India
11 फेब्रुवारी : श्रेष्ठ दासत्व
Loading
/

कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झालें, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झालें तो ख्रिस्ताचा दास आहे. (1 करिंथकरांस 7:22)

पौलानें “प्रभू” चा पर्यायी शब्द “धनी”  आणि “ख्रिस्त” चा पर्यायी शब्द मशीहा उपयोगात आणला असतां तर माझ्यामते ते अधिक बरें झालें असतें.

पौल आम्हांला गुलामगिरीतून मोकळे केलें जाण्याच्या कृतीचा परस्पर संबंध येशू बरोंबर ह्या अर्थानें जोडतो कीं तो आमचा धनी आहे  (“गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य”). आणि तो आपल्या नव्या दासत्वाचा (“ख्रिस्ताचा दास”)  परस्पर संबंध येशू बरोंबर ह्या अर्थानें जोडतो कीं तो आमचा मशीहा आहे. ही गोष्ट जरा विलक्षण वाटते कारण मशीहा जेव्हां आला तो ते आपल्या लोकांना त्यांना कैद करणाऱ्यांपासून सोडविण्यांस आला होता; आणि धनी आपल्या दासांवर प्रभूत्व करतांत.

तो असे का म्हणतो? तो मशीहाचा संबंध (मुक्तीऐवजी) गुलामगिरीला आणि मुक्तीचा संबंध (गुलामीऐवजी) धन्याला का जोडतो?

प्रस्ताव : या पर्यायाचे आपल्या नव्या स्वातंत्र्यावर दोन परिणाम, आणि आपल्या नव्या दासत्वावर दोन परिणाम झालें आहेत.

एकीकडे, जेव्हां तो आम्हांला “गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य” असें म्हणतो, तेव्हां तो आपल्या नव्या स्वातंत्र्याची खात्री देतो त्यांच वेळीं तिला मर्यादितहि करतो :

1. त्याचे प्रभुत्व इतर सर्व प्रभूंवर आहे (म्हणजे तो प्रभूंचा प्रभू आहे); त्यामुळे आम्हांला मोकळे केलें जाणें हें निर्विवाद आहे — म्हणजे पूर्णपणे सुरक्षित.

2. परंतु, जरी आपण इतर सर्व प्रभूंपासून स्वतंत्र केलें गेलों असलों, तरी आपण त्याच्यापासून स्वतंत्र नाही. आपले स्वातंत्र्य कृपेनें मर्यादित आहे. येशू आपला धनी आहे.

तर दुसरीकडे, जेव्हां तो आम्हांला “ख्रिस्ताचा दास” म्हणतो, तेव्हां तो आपल्या ह्या नव्या गुलामगिरीला विसावा देणारी व गोड असें नवे स्वरूप देतो :

1. मशीहा आपल्या लोकांना त्यांना बंदिस्त करणाऱ्याच्या बंधनांतून सोडवून विसाव्याच्या मोकळ्या ठिकाणी आणण्यासाठीं त्यांना आपल्या ताब्यात घेतो. “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार” (यशया 9:7).

2. मग तो त्यांना अत्यंत गोड असा आनंद देण्यासाठीं त्यांना स्वतःचे लोक बनवतो. “पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन” (स्तोत्र 81:16). आणि तो खडक तर ख्रिस्त, म्हणजे मशीहा आहे.

म्हणून, प्रिय ख्रिस्ती बंधुजनहो, यांत आनंद करा: “ज्याला प्रभूमध्ये पाचारण झालें, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे” धनी. “तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झालें तो ख्रिस्ताचा दास आहे” –मशीहा जो दासत्वाला विसावा देणारी व गोड अशी गोष्ट बनवितो.

10 फेब्रुवारी : तारणदायी विश्वास सहज समाधानी होत नाही

Alethia4India
Alethia4India
10 फेब्रुवारी : तारणदायी विश्वास सहज समाधानी होत नाही
Loading
/

ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. (इब्री 11:15-16)

विश्वास हा देवानें प्रतिज्ञा केलेल्या भविष्याकडे पाहतो आणि त्याची “उत्कंठा” धरतो. “पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात.” यावर क्षणभर विचार करा.

असे बरेच लोक आहेत जे तारणदायी विश्वासाचे स्वरूप बदलून त्याचे कार्यकारी महत्व कमी करतांत, म्हणजे ते त्याची अशी व्याख्या करतांत कीं विश्वास हा जणू मनुष्याच्या स्वतंत्र इच्छेनें घेतलेला निर्णय आहे, ज्यांमध्यें तो कशाची उत्कंठा करतो किंवा कशाचा शोध घेतो यांत कांहीच बदल घडून येत नाहीं. परंतु बायबलमध्यें दिलेल्या महान विश्वासाचा अध्याय, इब्री 11, यांत असलेल्या या वचनाचा मुख्य मुद्दा हा आहे कीं विश्वासाने जगणे आणि मरणे याचा अर्थ नव्या उत्कंठा धरणे आणि नव्या तृप्तींचा शोध घेणे असा होतो.

वचन 14 म्हणते कीं प्राचीन काळातील पवित्र लोक (ज्यांची इब्री 11 मध्ये त्यांच्या विश्वासाबद्दल प्रशंसा केलीं जात आहे)   स्वतःच्या अशा देशाचा शोध करित होते जे ह्या जगापेक्षा वेगळे आहे. आणि वचन 16 म्हणते कीं ते वर्तमान पृथ्वीवरील जीवन जे कांही देऊं करते त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीची उत्कंठा करित होते : “ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात.”

त्यांना देवानें इतके घट्ट पकडले होते कीं, देवावांचून त्यांना इतर कोणत्याहि गोष्टींत समाधान नव्हते.

तर मग, खरा तारणदायी विश्वास हा आहे: देवाची अभिवचने दुरून पाहणे, आणि आपण जी मूल्ये धरतो त्यांत बदल घडवून आणणे जेणेकरुन आपण जगाने जे काही देऊं केले आहे त्यापेक्षा अधिक देवाच्या अभिवचनांची उत्कंठा धरतो आणि त्यांचा शोध घेतो आणि त्यांवर विश्वास ठेवतो.