ArchivesSolid Joys

22 July : स्वतःला उपदेश द्या

Alethia4India
Alethia4India
22 July : स्वतःला उपदेश द्या
Loading
/

हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन. (स्तोत्र 42:11)

आपण निराशावादी दृष्टिकोण व उदासीनता -म्हणजें खिन्न झालेंला जीव-  यांशी लढा द्यायला शिकण्याची गरज आहे. हा लढा भावी कृपेवरील विश्वासाचा लढा आहे. देव आणि त्यानें भविष्याविषयी जें अभिवचन दिलें आहे त्या सत्याचा आपण स्वतःला उपदेश देऊन हा लढा देत असतो.

स्तोत्रकर्ता स्तोत्र 42 मध्यें हेच करतो. स्तोत्रकर्ता त्याच्या खिन्न झालेंल्यां जीवाला उपदेश देतो. तो स्वतःला धमकावतो व  स्वतःशीच वाद घालतो. आणि त्याचा मुख्य युक्तिवाद म्हणजें भविष्यातील कृपा: “देवाची आशा धर! देव भविष्यात तुझ्या निमित्त दर्शन देऊन ज्यां प्रकारे तुझा उद्धार करणार आहे त्यावर विश्वास ठेव. हर्ष-नादाचा दिवस येत आहे. परमेश्वर स्वतः दर्शन देऊन तुला आवश्यक असलेले सर्व सहाय्य पुरवेल. तो सर्वकाळ आम्हांबरोबर राहील असे अभिवचन त्यानें दिलें आहे.”

मार्टिन लॉयड-जोन्स यांना खात्री होती कीं देवाच्या भावी कृपेविषयी स्वतःला सत्याचा उपदेश देण्याविषयीचा हा मुद्दा आध्यात्मिक नैराश्यावर मात करण्यासाठीं अत्यंत निकडीचा आहे. त्यांनी Spiritual Depression नावाचे जे उपयुक्त पुस्तक लिहिलें त्यांत ते पुढीलप्रमाणें असे लिहितांत,

तुमच्या कधी हे लक्षात आलें आहे का कीं तुमच्या जीवनातील दुःख हे मुख्यतः ह्यामुळें आहे कारण तुम्हीं स्वतःशी बोलण्याऐवजी स्वतःचे ऐकत असतां? उदाहरणार्थ, तुम्हीं सकाळी उठल्या उठल्या तुमच्या मनात जें विचार येतांत त्यांवर विचार करा. त्यांचा उगम तुमच्यातून झाला नाहीं, तरी ते तुमच्याशी बोलू लागतांत, ते कालचे अनुत्तरीत प्रश्न परत लक्ष्यांत आणतांत. कुणीतरी तुमच्याशी संवाद साधतोय. . . . तुमचा स्व: तुमच्याशी संवाद साधत आहे. आता स्तोत्र 42 मधील या पुरुषाने जे समाधान काढले ते म्हणजें असे कीं तो त्याच्या स्व:ला त्याच्याशी संवाद साधू देण्याऐवजी तो त्या स्व:शी बोलू लागतो. तो विचारतो “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?” त्याचा जीव त्याला खिन्न करत होता, चिरडत होता. म्हणून तो उठतो, आणि म्हणतो, “ हे माझ्या स्व:, जरा ऐक. मी तुझ्याशी जें बोलतो, तें ऐक.” (20–21)

नैराश्याविरुद्ध असलेला आपला लढा देवाच्या वचनांवर विश्वास ठेवण्याविषयीचा लढा आहे. आणि देवाच्या भावी कृपेवरचा विश्वास त्याचे वचन ऐकण्याने येतो. आणि म्हणून स्वतःला देवाच्या वचनातून उपदेश देणें हे या आध्यात्मिक युद्धाचा जीव कीं प्राण आहे.

21 July : निरुत्साहाचा सामना करण्यासाठींआदर्श

Alethia4India
Alethia4India
21 July : निरुत्साहाचा सामना करण्यासाठींआदर्श
Loading
/

माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे. (स्तोत्र 73:26)

जसा कीं मराठीत हा शास्त्रपाठ आहे, या वचनातील क्रियापद शब्दशः केवळ “खचली” असें आहे, “खचू शकते” असे नाहीं. परमेश्वराने पिडलेला आसाफ नावाचा हा स्तोत्रकर्ता म्हणतो, “माझा देह व माझे हृदय ही खचली आहेंत!” मी खिन्न झालों आहे! मी निराश झालों आहे! पण मग लगेचच तो त्याच्या निराशेविरुद्ध एक व्यापक अशा दृष्टिक्षेपांतून अति जोमानें ऐलान करतो : “तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे.”

स्तोत्रकर्ता नैराश्याने वैतागून खचत नाहीं. तर तो पलटवार करून आपल्या अविश्वासाबरोबर लढा देतो.

थोडक्यात, तो असे म्हणत आहे, “मी स्वतःमध्यें खूप अशक्त आणि असहाय्य असा आहे आणि मी या गोष्टींशी स्पर्धा करू शकत नाहीं. माझा देह मरणासन्न झाला आहे आणि माझे हृदय जवळजवळ मृत झालें आहे. पण या औदासिनपणाचे कारण काहींही असो, मी नमणार नाहीं. मी स्वतःवर नव्हें, तर देवावर विश्वास ठेवीन. तोच माझें सामर्थ्य व माझा वाटा आहे.”

पवित्र शास्त्रांत औदासिनतेंत बुडलेल्या जीवांशी संघर्ष करणाऱ्या पवित्र जनांची बरीच उदाहरणें आहेत. स्तोत्र 19:7 म्हणते, “परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते.” हे या गोष्टीची स्पष्ट कबुली देणें आहे कीं पवित्र जनांच्या जीवाला कधी-कधी पुनरुज्जीवनाची गरज असते. आणि जर असे पुनरुज्जीवन करणें आवश्यक असेल तर एका अर्थाने ते “मृत” असे होते. त्यांना असेच वाटायचे.

दाविद स्तोत्र 23:2-3 मध्यें तेच सांगतो, “तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो” “आपल्या [देवाच्या] मनासारखा मनुष्य” (1 शमुवेल 13:14) असलेला दाविद ह्याच्या जीवाला सुद्धा पुनरुज्जीवनाची गरज होती. त्याचा  जीव तहानेने जणू मृतप्राय झाला होता आणि खचून गेला होता, तरी देव त्याचा जीव संथ पाण्याजवळ घेऊन गेला व त्याला पुन्हा जीवन दिलें.

देवानें या सर्व साक्षी बायबलमध्यें देऊन ठेवल्यात, जेणेंकरून आपण ज्यां ज्यां वेळी नैराश्याने खचतो, आपण त्यांचा उपयोग अविश्वासाशी लढा देण्यांस करावा. आणि आपण अविश्वासाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेऊन लढतो: “देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे.” आम्हीं त्या उपदेशाने स्वतःला उत्तेजन देतो. आणि आम्हीं तो सैतानाच्या तोंडावर मारतो, व त्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो.

20 July : प्रत्येक गरजेसाठीं कृपा

Alethia4India
Alethia4India
20 July : प्रत्येक गरजेसाठीं कृपा
Loading
/

तू माझ्याकडें वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपलें सामर्थ्य दे. (स्तोत्र 86:16)

आपल्यावर भविष्यात कृपा व्हावीं अशी सर्व प्रार्थनावीर स्तोत्रकर्ता खंड न पडू देता विनवणी करत असत. देवानें आपली प्रत्येक गरज पूर्ण करावीं अशी ते वारंवार प्रार्थना करतांत. आपण आपल्या प्रत्येक आणीबाणीच्या परिस्थितीसाठीं भविष्यातील कृपेवर दररोज कसे अवलंबून राहावें याचा ते सर्व मिळून आम्हाल्यासाठीं एक सुंदर कित्ता घालून देत आहेत  .

  • त्यांना मदतीची गरज असते तेव्हा ते कृपेसाठीं धावा करतांत : “हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य कर!” (स्तोत्र 30:10).
  • ते अशक्त असतांत तेव्हां : “तू माझ्याकडें वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपलें सामर्थ्य दे” (स्तोत्र 86:16).
  • त्यांना रोग व आजार यांपासून बरे होण्याची गरज असते तेव्हां : “हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर” (स्तोत्र 6:2).
  • त्यांचे शत्रूं त्यांची पिळवणूक करतांत तेव्हां : “हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्‍या, माझा द्वेष करणार्‍यांपासून मला झालेंली पीडा पाहा” (स्तोत्र 9:13).
  • ते एकाकीं पडलेले असतांत तेव्हां : “माझ्याकडें वळून मला प्रसन्न हो; कारण मी निराश्रित व दीन आहे” (स्तोत्र 25:16).
  • ते शोक करीत असतांत तेव्हां : “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे; माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत” (स्तोत्र 31:9).
  • ते पापांत पडतांत तेव्हां: “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर; माझ्या जिवाला बरे कर; मी तुझ्याविरुद्ध पाप केलें आहे!” (स्तोत्र 41:4).
  • ते राष्ट्रांमध्यें देवाच्या नावाचा गौरव व्हावा म्हणून व्याकूळ होतांत तेव्हां : “देवानें आमच्यावर दया करावी व आम्हांला आशीर्वाद द्यावा. . . ह्यासाठीं कीं, पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेंले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे” (स्तोत्र 67:1-2).

खचितच, प्रार्थना हा विषय पवित्रजनांचा आत्मा आणि भविष्यातील कृपेचे अभिवचन यांच्यातील विश्वासाची मजबूत साखळी आहे, यांत शंका नाहीं. आपण सेवेला प्रार्थनेद्वारे टिकून ठेवावें असे जर देवानें प्रयोजन केलेंलें असेल, तर मग सेवा ही भविष्यातील कृपेवरील विश्वासाने टिकून राहावी असे प्रयोजन केलेंलें असणें स्वाभाविक आहे.

19 July : त्याची वेळ अचूक आहे

Alethia4India
Alethia4India
19 July : त्याची वेळ अचूक आहे
Loading
/

तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठीं कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ (इब्री 4:16)

ह्या मूल्यवान वचनाचे मराठीत असलेले भाषांतर अचूक आणि योग्यच आहे, मुख्यत ‘ऐन वेळी’  हे शब्द. हे शब्द संकेत देतांत कीं जेव्हा आपल्याला ‘ऐन वेळी’  देवाची गरज लागते, तेव्हा लगेच तो आमच्या साहाय्यासाठीं धावून येतो. या वचनाचा शब्दशः मुद्दा आहे ‘ऐन वेळी.’

सर्व सेवा ही भावी सेवा असते – एक क्षण दूर, किंवा एक महिना दूर, किंवा एक वर्ष, किंवा एक दशक दूर. त्या दृष्टिने, आपल्या अपुरेपणावर चिंतन करण्यासाठीं आपल्याकडें पुरेसा वेळ आहे. आणि त्या विचाराने जेव्हा आपल्या मनाचा थरकाप उडतो, आपण प्रार्थनेकडें वळले पाहिजे.

प्रार्थना विश्वासाचेच एक स्वरूप आहे जी आपल्याला आजच उद्याच्या सेवेसाठीं समर्थ बनविणाऱ्या कृपेशी जोडते. वेळ खरोखर महत्वाची आहे.

जर ती कृपा वेळेपूर्वी आली किंवा वेळ निघून गेल्यावर आली तर काय होईल? या संदर्भात अत्यंत मौल्यवान असलेल्या वचनाचे इब्री लोकांस 4:16 चे इंग्रजीचे भाषांतर स्पष्ट नाहीं. ते समजण्यासाठीं आम्हांला अधिक शाब्दिक अभिव्यक्ती आवश्यक आहे. आणि ते अभिवचन म्हणजें केवळ “गरजेच्या वेळी साहाय्यासाठीं ” कृपा मिळते असे नाहीं, तर असे कीं कृपा देवऐन वेळी  देतो.

मुद्दा असा आहे कीं प्रार्थना योग्य वेळी सहाय्यासाठीं भावी कृपेचा शोध घेण्याचा मार्ग आहे. देवाची ही कृपा सदैव “कृपेच्या राजासनाजवळ” ऐन वेळी मिळते. “कृपेचे राजासना” या वाक्यांशाचा अर्थ असा आहे कीं भविष्यातील कृपा विश्वाच्या त्या राजाकडून मिळते जो स्वतःच्या अधिकारयुक्त निर्णयाने ती वेळ ठरवतो (प्रेषितांची कृत्ये 1:7).

त्याची वेळ अचूक आणि पूर्ण आहे, परंतु आपल्या सीमित दृष्टीने ती ऐन वेळी प्रकट होणारी अशी कृपा आहे: “[त्याच्या] दृष्टीने सहस्र वर्षें कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत” (स्तोत्र 90:4). जागतिक स्तरावर, तो राष्ट्रांचा उदय व त्यांच्या पतनाचे समय ठरवितो (प्रेषित 17:26). आणि वैयक्तिक दृष्टीने, “माझे दिवस [त्याच्या]  हाती आहेत” (स्तोत्र 31:15).

आपण भविष्यातील कृपेच्या वेळेबद्दल काळजी करतो तेव्हा आपण “कृपेच्या राजासनावर” जाऊन चिंतन केलेंले बरे. आपल्यासाठीं ती वेळ जर योग्य असेल तर कोणतीही गोष्ट कृपा पाठवण्याच्या देवाच्या योजनेत अडथळा आणू शकत नाहीं. भविष्यातील कृपा नेहमीच ऐन वेळी मिळणारी कृपा आहे.

18 July : आध्यात्मिक कृपादानांत असलेली देवाची कृपा

Alethia4India
Alethia4India
18 July : आध्यात्मिक कृपादानांत असलेली देवाची कृपा
Loading
/

प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणें ते एकमेकांच्या कारणी लावा. (1 पेत्र 4:10)

जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक कृपादानांचा उपयोग करतो तेव्हा आपण कृपेचे कारभारी म्हणून भूमिका पार पाडत असतो – कालच्या कृपेचे कारभारी नव्हे, तर आजच्या कृपेचे, जी आमच्या गरजेच्या प्रत्येक क्षणी आम्हांला दिली जात असते. आणि ही भविष्यातील कृपा म्हणजें “नानाविध कृपा” आहे. ही कृपा नानाविध रंग आणि नानाविध आकार आणि नानाविध स्वरूपांत येत असते. याच एका कारणामुळें मंडळीत असलेली अध्यात्मिक कृपादाने इतकीं नानाविध आहेत. तुम्हांला देवानें जे कृपादान दिलें आहे त्याचे कार्यकारी गुणधर्म देवाच्या गौरवाच्या अशा छटा नानाविध दाखवेल ज्यां छटा देवानें मला दिलेंल्यां कृपादानांतून कधीही दिसून येणार नाहींत. 

ख्रिस्ताच्या मंडळीत जितक्या नानाविध गरजा आहेत तितक्या नानाविध भावी कृपा आहेत – आणि बरेच काहीं. अध्यात्मिक कृपादानांचा उद्देश त्या गरजा पूर्ण करण्यासाठीं देवाची कृपा प्राप्त करणें आणि ती एकमेकांच्या कारणी लावणें हा आहे.

आता एखाद्याला प्रश्न पडेल, “तुम्हीं भावी कृपेचा संदर्भ देण्यासाठीं पेत्राचेच वचन का घेतले? पुरुष एक कारभारी म्हणून आधीच हाताशी असलेला आपला घरगुती प्रपंच सांभाळत नसतो का?”

भावी कृपेचा संदर्भ देण्यासाठीं मी पेत्राचा उल्लेख केला याचे मुख्य कारण हे कीं हा कारभार कसा साध्य होतो यावर पुढील वचन प्रकाश टाकते, आणि त्या वचनाचा संदर्भ त्या भावी कृपेकडें संकेत देतो जी खंड न पडता पुरविली जाते. ते वचन असे म्हणते, “सेवा करणार्‍याने, ती आपण देवानें दिलेंल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.” (1 पेत्र 4:11). मूळ भाषेंत हा शब्दांश “देव पुरवत असलेल्या” आहे, “देवानें पुरवलेल्या” नाहीं. तुम्हीं सेवा करत असताना, तुम्हांला जे करणें अगत्याचे असते ते साध्य करण्यासाठीं देवाच्या सतत पुरवल्या जाणाऱ्या कृपेच्या सामर्थ्याने सेवा करा.

उद्या जेव्हा तुम्हीं ख्रिस्तात असलेल्या एखाद्या बंधूची सेवा करण्यासाठीं तुमचे आध्यात्मिक कृपादान कारणी लावाल तेव्हा तुम्हीं ती सेवा “देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने” कराल — आणि तो पुरवठा आज नाहीं, तर उद्या होईल. “जसे तुमचे दिवस असतील, तसे तुमचे सामर्थ्य असेल” (अनुवाद 33:25 : संपादकाचे भाषांतर).

आपण ज्या सामर्थ्याने सेवा करतो ते “सामर्थ्य” देव आपल्याला दिवसेंदिवस, क्षणाक्षणाला पुरवत असतो. तो असे करतो कारण जो त्या सामर्थ्याचा खंड न पडता पुरवठा करतो त्या अविनाशी देवाचाच त्यामुळें सर्व गौरव होतो. “सेवा करणार्‍याने, ती आपण देवानें दिलेंल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा.”

17 July : ख्रिस्तावर विश्वास जाहीर करण्यासाठीं लागणारे सामर्थ्य

Alethia4India
Alethia4India
17 July : ख्रिस्तावर विश्वास जाहीर करण्यासाठीं लागणारे सामर्थ्य
Loading
/

प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती.. (प्रेषितांची कृत्ये 4:33)

जर उद्या आपल्यावर अशी वेळ आली कीं ज्यामध्यें आपल्याला ख्रिस्ताची साक्ष काहीं बिकट परिस्थितीत द्यावी लागेल, तर अशा स्थितींस हाताळण्यासाठीं आवश्यक गुरुकिल्ली आमची बुद्धिमत्ता नाहीं; गुरुकिल्ली असेल ती आम्हांवर केलीं जाणारी भावी विपुल कृपा.

इतर सर्व सुवार्तीकांच्या तुलनेंत, प्रेषितांना मरणांतून उठलेल्या ख्रिस्ताविषयीं ठोस आणि विश्वासाकडें घेऊन जाणारी साक्ष देण्यासाठीं कोणाच्या मदतीची गरज वाटली नाहीं असे दिसते. ते तीन वर्षे त्याच्यासोबत होते. त्यांनी त्याला मरतांना पाहिले होते. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर पुनरुत्थानाद्वारे जिवंत झालेंलें पाहिले होते. त्यांच्याकडें असलेल्या साक्षीच्या शस्त्र-सामग्रीत त्यांच्याकडें “पुष्कळ अचूक पुरावे” होते (प्रेषितांची कृत्ये 1:3). तुम्हांला असे वाटेल कीं, इतर सर्व सुवार्तीकांच्या तुलनेंत, मंडळी स्थापनेच्या त्या सुरुवातीच्या दिवसांत साक्षी देण्याचे त्यांचे कार्य त्यांनी भूतकाळात जे गौरव पहिले होते, ज्याची आठवण अद्यापही ताजीतवानी होती,  त्या बळावर टिकून राहिलेले असावे.

पण प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपल्याला तसे सांगत नाहीं. विश्वासूपणाने आणि परिणामकारकपणें साक्ष देण्याचे जे सामर्थ्य त्यांना मिळाले ते मुख्यत्वे ह्यामुळें नाहीं कीं त्यांना त्यांच्यावर भूतकाळात झालेंल्या कृपेची आठवण होती; तर ते सामर्थ्य त्यांना त्यांच्यावर असलेल्या “मोठ्या कृपेच्या” नवीन आगमनातून मिळाले होते. “त्या सर्वांवर मोठी कृपा होती.” यामुळेंच प्रेषितांनी जें केलें तें ते करू शकलें, आणि आमच्या साक्षी देण्याच्या कार्यात देखील असेच होत असते.

आम्हीं ख्रिस्ताविषयीची साक्ष देत असतांना तिचे सामर्थ्य वाढवण्यासाठीं देवानें कितीही चिन्हे आणि चमत्कार दाखवले तरी ते जसें स्तेफनाच्या साक्षींच्या वेळी घडून आलें तसेच आमच्याही वेळी येतील. “स्तेफन कृपा1 व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे” (प्रेषितांची कृत्ये 6:8). स्तेफनाला सर्व गोष्टींसाठीं आवश्यक असलेली कृपा ही देवाकडून येत होती – अगदी तो मरत असतांना त्याला जे सहन करावे लागणार होते त्यासाठीं देखील.

भावी काळांत आम्हांवर केलीं जाणारी अद्भुत कृपा आणि सामर्थ्य हेच आहे जे आपल्याला एखाद्या विशेष सेवेच्या वेळी ओढवलेल्या संकटात मदत करू शकेल. हे एक नव्याने प्राप्त झालेंल्या सामर्थ्याचे कार्य असते ज्याद्वारे देव “आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष” देतो (प्रेषित 14:3; इब्री 2:4 देखील पहा). सामर्थ्य देणारी ही अखंड कृपा सत्याच्या अखंड कृपेची साक्ष देते.

16 July : आजच्या कृतींसाठीं लागणारे सामर्थ्य

Alethia4India
Alethia4India
16 July : आजच्या कृतींसाठीं लागणारे सामर्थ्य
Loading
/

भीत व कापत आपलें तारण साधून घ्या; कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे (फिलिप्पैकरांस 2:12-13)

येथे इच्छा करणें व कृती करणें साधून देण्यांत निर्णायक भूमिका करणारा कर्ता स्वतः देव आहे. आपलें तारण साधून घ्या. . . कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं देव स्वतः साधून देतो. आपल्या सत्संकल्पासाठीं देव इच्छा करतो आणि तोच आहे जी ती इच्छेनुकूल कृतीहि साध्य करतो. पण यावर विश्वास करणें म्हणजें ख्रिस्ती विश्वासणारे निष्क्रीय होतांत असा त्याचा अर्थ नाहीं. तर उलट, हे सत्य त्यांना आशावादी आणि सक्रिय कष्टाळू आणि धैर्यवान बनवते.

आम्हीं आपापल्या पाचारणानुसार जी विशिष्ट सेवा करतो त्यांत दररोज आम्हांला कृती करावयाची असते. पौल आपल्याला तीच  कृती साधून घेण्यासाठीं काम करायची आज्ञा देतो. परंतु देवानें पुरवलेल्या सामर्थ्याने ती कशी करावी हे तो आपल्याला सांगतो: त्याच्यावर विश्वास ठेवा! आज इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्याठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं देवच साधून देईल या अभिवचनावर विश्वास ठेवा.

देव, जो क्षणोक्षणी आपल्या कृपेने काम करत असतो, भविष्यात आम्हांवर जी कृपा केलीं जाईल त्याविषयीच्या अभिवचनाचा अनुभव आपल्याला वर्तमान समयी चाखावयांस देतो. आपण आपलें तारण कसे साधून घ्यावे हे जेव्हा पौल आपल्याला स्पष्ट करून सांगतो तेव्हां पौलाचा जोर आम्हांवर भूतकाळात झालेंल्या कृपेविषयी आपण कृतज्ञ असावे यावर नाहीं. मी असे म्हणत आहे याचे शुद्ध कारण म्हणजें हे कीं अनेक ख्रिस्ती लोकांना जेव्हा विचारले जाते कीं आज्ञाधारकपणामागे हेतू काय असावा, तेव्हां आपण असे कृतज्ञतेमुळें करतो असे ते म्हणतील. परंतु पौल जेव्हा आमच्या कृती मागील हेतू आणि सामर्थ्य याबद्दल बोलतो तेव्हा तो यावर जोर देत नाहींये. देवानें जे अद्याप केलेंलें नाहीं ते तो साध्य करून देईल त्यावर विश्वास ठेवण्यावर तो जोर देत आहे, केवळ त्यानें जे केलें आहे त्यावर नाहीं. आपलें तारण साधून घ्या! का? आणि ते कसे? कारण देव प्रत्येक क्षणासाठीं नवी झालेंली कृपा पुरवितो. जेव्हां जेव्हां तुम्हीं इच्छा व कृती करता, तेव्हां तेव्हां ती इच्छा करणें व ती कृती करणें तुम्हांमध्यें तोच साध्य करून देत असतो. येणाऱ्या घटकेसाठीं आणि भावी काळांत येणाऱ्या हजारो वर्षांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीं ह्या सत्यावर विश्वास ठेवा.

भविष्यात जी कृपा केलीं जाईल तिचे सामर्थ्य जिवंत ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे –आपल्या प्रत्येक भावी क्षणी आपल्याठायीं ती कृती साधून द्यावयांस तो सदासर्वदा आम्हांबरोबर असतो. म्हणून जेव्हा पौल त्याच्यावर झालेंल्या देवाच्या कृपेच्या परिणामाचे वर्णन करतो तेव्हा तो म्हणतो, “ख्रिस्तानें माझ्या हातून न घडवलेले काहीं सांगण्याचे धाडस मी करणार नाहीं; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्यानें माझ्या शब्दांनी व कृतींनी, …. जे जे घडवले तेच मी सांगतो” (रोमकरांस 15:18).

यास्तव, ज्याअर्थी ख्रिस्तानें त्याच्या सेवाकार्याद्वारे जे काहीं साध्य केलें ते सोडून इतर काहींही बोलण्याचे त्यानें धाडस केलें नाहीं, आणि तरीही खरेतर ती कर्मे त्यानें केलीं, त्याअर्थी कृपने त्याच्या सेवेद्वारे जे जे साध्य केलें तो केवळ त्याबद्दल सांगतो (1 करिंथकरांस 15:10), म्हणजें याचा अर्थ असा कीं, कृपा जे सामर्थ्य साध्य करते ते ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे.

याचा अर्थ असा कीं पुढील पाच मिनिटांसाठीं आणि पुढील पाच दशकांच्या सेवेसाठीं आपल्याला ज्या सामर्थ्याची गरज आहे ते सामर्थ्य सर्वशक्तिमान ख्रिस्ताची भावी कृपा होय, जो युगानुयुग आम्हांबरोबर आहे – आपल्या सत्संकल्पासाठीं इच्छा करणें व कृती करणें हे साधून देण्यासाठीं सदैव तत्पर.

12 July : विश्वास आमचे दोष, लोभ, आणि भिती दूर घालवितो

Alethia4India
Alethia4India
12 July : विश्वास आमचे दोष, लोभ, आणि भिती दूर घालवितो
Loading
/

ताकींद देण्याचा हेतू हा आहे कीं, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीति व्यक्त व्हावी. (1 तीमथ्य 1:5)

येथें पौलाचा मुख्य हेतू प्रीतिवर जोर देणें आहे. आणि या थोर गाभाऱ्यातून स्वाभाविकपणें उद्भवणाऱ्या गोष्टींपैकीं एक आहे निष्कपट विश्वास. नक्कीच प्रीति ही विश्वासातून उद्भवते याचे कारण हे आहे कीं देवाच्या कृपेवरील विश्वास प्रीतिस अडखळण आणणाऱ्या पापी शक्तींस आमच्या अंतःकरणातून दूर करतो.

जर आम्हांला दोषी असल्यासारखे वाटत असेल, तर आमचा कल आत्मकेंद्रित नैराश्य आणि स्वतःवर कींव वाटणाऱ्या भावनेंत लोळत पडून राहण्याकडें असतो, इतरांच्या गरजांकडें पाहणें किंवा त्यांची काळजी करणें तर दूर राहिले. किंवा आपण आपला दोष लपविण्यासाठीं ढोंग करीत बसतो, आणि म्हणून नात्यांमधील सर्व खरेपणा नष्ट करून बसतो, ज्यामुळें खरे प्रेम अशक्य होते. किंवा आपण आपला स्वतःचा दोष कमी दाखविण्यासाठीं इतर लोकांच्या चुकांबद्दल बोलतो, म्हणजें असे काहीं जी प्रीति कधी करीत नाहीं. म्हणून, जर आम्हीं प्रीति करणार असू, तर आम्हांला दोषाच्या विनाशकारक प्रभावांवर मात करावी लागेल.

भितीचेही असेच आहे. जर आम्हांला भिती वाटत असेल, तर मंडळीत आलेंल्या अनोळखी व्यक्तीजवळ आम्हीं जाणार नाहीं ज्याला कदाचित स्वागत आणि प्रोत्साहनाच्या शब्दाची गरज असू शकते. किंवा पाचारण म्हणून आम्हीं सरहद्दीवरील मिशनचा नाकार करू शकतो, ते फार जोखिमेचे काम वाटते. किंवा आपण अतिरिक्त विम्यासाठीं पैसे वाया घालवत असू, आणि सर्व प्रकारच्या लहान-सहान भयगंडाने घाबरत असू, इतके कीं आम्हीं स्वतःमध्यें गुरफटलेले राहतो आणि इतरांच्या गरजा आम्हांला दिसू शकत नाहींत. या सर्व गोष्टी प्रीतिच्या विपरीत आहेत.

लोभाच्या बाबतीतही हेच खरे आहे. जर आम्हीं लोभी असू, तर आम्हीं चैनविलासावर पैसे खर्च करीत राहणार – तो पैसा जो सुवार्ता प्रसारासाठीं गेला पाहिजे. आम्हीं कुठलाही धोका पत्करत नाहीं, आमची मूल्यवान संपत्ति आणि आर्थिक भविष्य धोक्यात येईल अशी भिती आम्हांला वाटते. आम्हीं लोकांऐवजी ऐहिक वस्तूंवर लक्ष केंद्रिंत करतो, आणि लोकांकडें आमच्या भौतिक लाभासाठीं संसाधने म्हणून पाहतो. यामुळें प्रीतिचा नाश होतो.

पण भविष्यातील कृपेवरील विश्वास दोष आणि भिती आणि लोभ यांस अंतःकरणातून दूर सारून प्रीति उत्पन्न करतो.

विश्वास दोष दूर करतो कारण तो त्या आशेस दृढ धरून ठेवतो कीं ख्रिस्ताचा मृत्यू आता आणि सर्वकाळासाठीं निर्दोषमुक्तता आणि नीतिमत्व प्राप्त करण्यासाठीं पुरेसा आहे (इब्री 10:14).

विश्वास भय घालवून टाकतो कारण तो या अभिवचनावर अवलंबून राहतो, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे,………..मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो” (यशया 41:10).

आणि विश्वास लोभ दूर घालवून टाकतो कारण त्याला ही खात्री असते कीं ख्रिस्त हा त्या सर्व संपत्तीपेक्षा जी हे संपूर्ण जग देऊ करते, मोठा आहे (मत्तय 13:44).

म्हणून जेव्हा पौल म्हणतो, “ताकींद देण्याचा हेतू हा आहे कीं… निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीति व्यक्त व्हावी”, तेव्हा तो प्रीतिस अडखळण आणणाऱ्या सर्व अडखळणांवर मात करणाऱ्या विश्वासाच्या प्रचंड सामर्थ्याविषयी बोलत आहे. जेव्हा आम्हीं विश्वासाचे युद्ध करतो – दोष आणि भिती आणि लोभास मारणाऱ्या देवाच्या अभिवचनांवर विश्वास करण्यासाठींचा लढा – तेव्हा आपण प्रीतिसाठीं लढा देत असतो.

11July : आपण विश्वासाने आत्म्याचा अनुभव घेतो

Alethia4India
Alethia4India
11July : आपण विश्वासाने आत्म्याचा अनुभव घेतो
Loading
/

जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्यें अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो कीं विश्वासपूर्वक ऐकण्याकडून? (गलती 3:5)

प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्यें पवित्र आत्मा वस्ती करून राहतो. प्रेषित पौल म्हणतो, “जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेंला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाहीं” (रोम 8:9). आत्मा तुमच्याकडें पहिल्यांदा तेव्हा आला जेव्हा तुम्हीं रक्ताने विकत घेतलेल्या परमेश्वराच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला. आणि आत्मा याच माध्यमाद्वारे येत राहतो आणि कार्य करत राहतो.

म्हणून पौल गलती 3:5 मध्यें अलंकारिक शब्दांत असे विचारतो, “जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्यें अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो कीं विश्वासपूर्वक ऐकण्याकडून?“ उत्तर आहे: “विश्वासपूर्वक ऐकण्याकडून.”

तर अशाप्रकारे, आत्मा पहिल्यांदा आला, आणि विश्वासपूर्वक ऐकण्याकडून आत्म्याचा पुरवठा होत राहतो. जे काहीं तो आमच्यामध्यें आणि आमच्याद्वारे साध्य करतो ते सर्व तो विश्वासाद्वारे करतो.

जर तुम्हीं माझ्यासारखे असाल, तर तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याने सामर्थ्याने कार्य करावें अशी प्रबळ उत्कंठा  तुम्हांला वेळोवेळी होत असेलच. कदाचित तुम्हीं तुमच्या जीवनात अथवा तुमच्या कुटुंबात किंवा मंडळीत किंवा शहरात देवाच्या आत्म्याच्या वर्षावासाठीं त्याचा धावा करत असाल. अशाप्रकारचा धावा अथवा आक्रोश योग्य आणि चांगला आहे. येशूनें म्हटले, “तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतांत त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक 11:13).

पण देवाच्या विशिष्ट अभिवचनांवर विश्वास करण्याद्वारे विपुलतेने आत्म्याच्या कार्यासाठीं स्वतःस तयार करण्यात मी विफल आहे हे मला माझ्या स्वतःच्या जीवनात बरेचदा आढळून आलें आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ केवळ हे अभिवचन नाहीं कीं आम्हीं मागितल्यावर आत्मा येईल. माझ्या बोलण्याचा अर्थ त्यां सर्व इतर मौल्यवान अभिवचनांकडें संकेत करणें आहे जी प्रत्यक्ष आत्म्याबद्दल नाहींत, पण कदाचित माझ्या भविष्यासाठीं देवाच्या तरतूदीविषयी आहेत – उदाहरणार्थ, “माझा देव तुमची सर्व गरज पुरवील” (फिलिप्पै 4:19). विशिष्ट परिस्थितींसाठीं विशिष्ट अभिवचनांवरील विश्वासाच्या विशिष्ट कृतींद्वारे देवाचा आत्मा सतत आणि सामर्थ्यवान मार्गाने पुरविला जातो. त्यानें जे करण्याचे अभिवचन दिलें आहे ते करण्यासाठीं मी आत्ताच ह्या क्षणी त्याच्यावर विश्वास ठेवतो का?

कित्येक ख्रिस्ती लोकांच्या जीवनात आत्म्याच्या सामर्थ्याचा शोध घेत असतांना त्यांच्या अनुभवांत उणीव याच गोष्टीची असते. “विश्वासपूर्वक ऐकण्याकडून” (गलती 3:5) आत्मा आम्हांला पुरवला जातो – स्वतः आत्माविषयीच्या फक्त एक दोन अभिवचनांवरील विश्वासाद्वारे नाहीं, तर आम्हास ज्या गोष्टीची गरज आहे ती करण्यासाठीं, आणि ती आमच्यासाठीं घडून यावी म्हणून आमच्या भविष्यातील देवाच्या आत्म्याचे समाधान देणारे देवाचे सान्निध्य या सर्व अभिवचनांवरील विश्वासाद्वारे.

10 July : अभिमानास्पद कर्म विरुद्ध विनम्र विश्वास

Alethia4India
Alethia4India
10 July : अभिमानास्पद कर्म विरुद्ध विनम्र विश्वास
Loading
/

त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्हीं तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केलीं नाहींत काय?’ (मत्तय 7:22)

“विश्वासा” मागची मानसिकता आणि “कर्माच्या” मागची मानसिकता यातील फरक विचारात घ्या.

स्वतःच्या बळावर एखादी गोष्ट साध्य केलीं या गर्वाच्या भावनेने कर्माच्या मानसिकतेंचे समाधान प्राप्त होते. तो उभ्या खडकावर चढण्याचा प्रयत्न करेल, किंवा कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या हाती घेईल, किंवा युद्ध क्षेत्रात जीव धोक्यात घालेल, किंवा मॅरेथॉनमध्यें वेदना सहन करील, किंवा कित्येक आठवडे धार्मिक प्रवृत्तीने उपवास करेल – सर्व काहीं स्वतःच्या इच्छेच्या बळाने आणि स्वतःच्या शरीराच्या जोमाने समोर असलेले आव्हान जिंकण्याच्या समाधानासाठीं.

कर्म-केंद्रित मानसिकता विकोपाला जाऊ शकते आणि दुसऱ्याला श्रेय देणें, आत्म्याचा दीनपणा व नैतिकता याविरुद्ध बंड करून स्वतःच्या स्वातंत्र्याविषयीची आणि ‘मीच माझा मार्गदर्शक’ याविषयी आणि स्वतःच्या कामगिरीविषयी आपली प्रीति व्यक्त करू शकते (गलती 5:19-21). पण ही तीच स्व-निर्धारित, आत्मगौरवी कर्म-केंद्रित मानसिकता आहे – मग ते अनैतिक होणें असो किंवा अनैतिक वागणुकींविरुद्ध धर्मयुद्ध करणें असो. यांत सर्वसामान्य कारक म्हणजें स्वदिशानिर्देशन, आत्मनिर्भरता आणि आत्म-गौरव. या सर्वांमध्यें, कर्म-केंद्रित मानसिकतेचे मूलभूत समाधान म्हणजें एक खंबीर, स्वायत्त आणि शक्य असल्यास, विजयी आत्मनिर्भरतेचा आस्वाद.

विश्वासाची मानसिकता पूर्णपणें वेगळीच असते. जेव्हा तो भविष्याकडें पाहतो त्यावेळी त्याची इच्छा बळकट असते. परंतु ज्या गोष्टीची तो इच्छा करतो ती म्हणजें येशूमध्यें परमेश्वर आपल्यासाठीं जे काहीं आहे त्या सर्व गोष्टींना अनुभवाने जाणून घेण्यांत पूर्ण समाधान प्राप्त करण्याची.

जर “कर्म” स्वतःला अडखळणावर विजय मिळविल्याचे समाधान प्राप्त करू पाहते, तर “विश्वास” देवानें अडखळणावर विजय मिळविला या समाधानाचा आस्वाद घेतो. कर्म सक्षम, बलवान आणि चतूर म्हणून गौरवान्वित झाल्याच्या आनंदाची इच्छा धरतो. विश्वास देवाला त्याचे कर्तुत्व आणि बळ आणि बुद्धी आणि कृपेसाठीं गौरवान्वित होतांना पाहण्याची उत्कंठा करतो.

आपल्या धार्मिक स्वरूपात, कर्मे नैतिकतेचे आव्हान स्वीकारतांत, त्याच्या अडखळणांवर मोठ्या कष्टाने विजय मिळवतांत आणि त्याची मान्यता व प्रतिफळ म्हणून देवाकडें आपण विजयी झाल्याचा प्रस्ताव सादर करतांत. विश्वास देखील, नैतिकतेचे आव्हान स्वीकारतो, परंतु केवळ देवाच्या सामर्थ्याचे साधन बनण्याचा एक प्रसंग म्हणून. आणि जेव्हा विजय मिळविला जातो तेव्हा विश्वास आनंद करतो कीं सर्व गौरव आणि उपकारस्तवन देवाचे आहेत.