चोरी करणार्याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे. (इफिस 4:28)
भौतिक वस्तुं मिळवून समृद्धीत कसे जगायचे याचे तीन विकल्प आहेत : (1) तुम्हीं त्यां भौतिक वस्तुं मिळविण्यासाठीं चोरी करूं शकतां; (2) किंवा तुम्हीं त्यां मिळविण्यासाठीं आपल्या हातांनी काहीं कष्ट करूं शकतां; (3) किंवा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काहीं असावे म्हणून तुम्हीं उद्योग करूं शकतां.
ख्रिस्ती विश्वासाचा अंगीकार करणारे बरेंच लोक दुसऱ्या क्रमांकाचा विकल्प घेऊन आपापलें जीवन जगतांत. आम्हांला चोरी करण्यापेक्षा किंवा उसने पैसे मागत भिकाऱ्याचे जीवन जगण्यापेक्षा स्वतः कष्ट करायला आवडते आणि आपण चोरी केलीं नाहीं व कोणाकडून उसने पैसे घेतलें नाहीं आणि प्रामाणिकपणें दिवसाचा सदुपयोग केला असा विचार करून आपल्याला काहींतरी कर्तव्यतत्पर कृती केल्याची भावना जाणवते. असे वाटणें म्हणजें काही वाईट गोष्ट नाहीं. आपल्या हातांनी काहीं उद्योग करणें हे चोरी करण्यापेक्षा किंवा “उधार कीं ज़िन्दगी” जगण्यापेक्षा कधीही चांगलेच आहे. पण प्रेषित आपल्याला हे असे स्वतःपुरते जीवन जगण्याचे आव्हान करित नाहींये.
मानव संस्कृतीतील जवळजवळ सर्वच बळें आपल्याला वरील तीनपैकीं दोन स्तरावर जीवन जगण्याचे आव्हान करतांत : मिळकतीसाठीं आपल्या हातांनी काहीं उद्योग करा. परंतु बायबल आपल्याला सातत्यानें तिसऱ्या स्तरावर आणून सोडते : गरजवंतांना देण्यास आपल्याजवळ काही असावें म्हणून उद्योग करणें. “सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठीं कीं, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठीं सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे” (2 करिंथ 9:8).
देव आपल्याला सर्व गोष्टींचा विपुल पुरवठा का करतो? यासाठीं कीं आपल्या उपजीविकेसाठीं आपल्याकडे पुरेसे असावें, आणि त्या नंतर उर्वरित सर्व प्रकारच्या चांगल्या कामांसाठीं आपण देण्यांस समर्थ व्हावें, जेणेंकरून आध्यात्मिक आणि शारीरिक दुःख दूर होतील – म्हणजें क्षणिक आणि सार्वकालिक दु:खे. आमच्यासाठीं पुरेसे; इतरांसाठीं विपुल.
मुद्दा हा नाहीं कीं एखादी व्यक्ती किती कमावते. मोठ-मोठे उद्योग आणि भरपूर पगार हे आपल्या काळातील सत्य आहे आणि हे वाईटच आहेत असे नाहीं. वाईट आहे ते हा विचार करून स्वतःची फसवणूक करणें कीं आपल्याला इतका मोठा पगार मिळावा कीं आपण एक आलिशान जीवनशैली जगूं शकूं.
आपण देवाची कृपा इतरांपर्यंत वाहवत न्यावीं म्हणून देवानें आपल्याला त्याच्या कृपेच्या नलिका बनवलें आहे. पण नलिका ह्या सोन्याने मढलेल्यां असाव्यांत असा विचार करणें दुर्दैवच. नाहीं, त्यां सोन्याने मढलेल्यां नसाव्यांत. साधे पीव्हीसी (पॉलीविनाइल क्लोराईड) पाईप पुरे आहेंत. पीव्हीसी पाईप टिकाऊपणा आणि अष्टपैलूपणामुळें इतरांना विपुल पुरवठा करूं शकतात. आणि आनंद देणारा विपुल आशीर्वाद हा आपण कसे देतो ह्यांत आहे (प्रेषित 20:35).