ArchivesSolid Joys

2 June : अब्राहामाचे वंशज कोण?

Alethia4India
Alethia4India
2 June : अब्राहामाचे वंशज कोण?
Loading
/

“तुझ्या द्वारें पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ती 12:3)

जे तुम्हीं ख्रिस्तामध्यें आशा ठेवता आणि आज्ञाधारकपणें त्याला अनुसरता, ते तुम्हीं अब्राहामाचे वंशज आहात आणि त्याच्या कराराच्या अभिवचनांचे वारस आहात.

उत्पत्ती 17:4, मध्यें देव अब्राहामाला म्हणाला, ‘“पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील.” पण उत्पत्तीच्या पुस्तकांतून हे स्पष्ट होते कीं अब्राहाम हा पृथ्वीवरील सर्व कुळांचा जनक झाला तो ते शारीरिकरित्या किंवा राजकींयरित्या नाहीं. म्हणूनच देवाच्या ह्या अभिवचनाचा अर्थ असा असण्याची शक्यता आहे कीं, अनेक राष्ट्रे, जरी ते देहानुसार अब्राहामाच्या रक्ताचे नसलें तरी ते कोणत्या तरी प्रकारे त्याचे पुत्र म्हणून आशीर्वादीत होतील.

उत्पत्ती 12:3 मध्यें देव जे अब्राहामाला बोलला, “तुझ्या द्वारें पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील” तेव्हां हांच त्याचा अर्थ होता यांत काहींच शंका नाहीं. सुरुवातीपासूनच देवाचा मानस होता कीं येशू ख्रिस्ताचा जन्म अब्राहामाच्या वंशात व्हावा आणि जे सर्व ख्रिस्तामध्यें विश्वास ठेवतात त्यांनी अब्राहामाला दिलेल्यां आशीर्वादांचे वारस व्हावे. गलती 3:29 मध्यें पौल म्हणतो, ‘आणि तुम्हीं जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहां.’

4,000 हजार वर्षापूर्वी जेव्हां देव अब्राहामाला बोलला, ‘“पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील” तेव्हां देवानें त्या द्वारें आपल्यांकरिता मार्ग मोकळा केला, आपण परराष्ट्रीय असलो तरी आपण अब्राहामाची संतान बनू शकतो आणि देवाच्या अभिवचनांचे वारस बनू शकू. आपल्यांला इतकेच करायचे आहे कीं आपल्यांला अब्राहामा सारखाच विश्वास ठेवायचा आहे- म्हणजें देवाच्या अभिवचनांवर भाव ठेवायचा आहे, तो इतका कीं, जर या आज्ञाधारकपणात आपल्यांला प्रिय असणार्‍या गोष्टी देखील बलिदान करण्याची तयारी ठेवावी लागेल जसे अब्राहामानें इसाकाला.

आपण अब्राहामाच्या अभिवचनांचे वारीस कोणतेही कर्म केल्यां द्वारें होऊ शकत नाहीं, तर देव स्वतः आपल्यां करिता कार्य करतो या गोष्टीची खात्री ठेवून आपण वारीस होऊ शकतो. “[ अब्राहाम ] परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; ‘आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.’ ( रोम 4:20-21). यामुळेंच अब्राहाम देवाची आज्ञा पाळू शकला जरी आज्ञापालन व्यर्थ वाटत असलें तरी. देव अशक्य ते शक्य करूं शकतो यावर त्यानें भरवसा ठेवला – जसे कीं त्याच्या मुलाला मरणातून पुन्हा जीवंत करणें.

देवाच्या अभिवचनांमध्यें विश्वास ठेवणें – किंवा आज आपण म्हणू शकतो कीं, ख्रिस्तावर विश्वास ठेवणें, जो देवाच्या अभिवचनाची पूर्तता आहे – त्याच्यावर विश्वास ठेवणें हा अब्राहामाची संतान  होण्याचा मार्ग आहे; आज्ञापालन या गोष्टीचा पुरावा आहे कीं आपला विश्वास हा खरा आहे ( उत्पत्ती 22:12-19). म्हणून येशू योहान 8:39 मध्यें म्हणतो, “जर तुम्हीं अब्राहामाची मुलें आहात तर अब्राहामाची कृत्ये करा.”

अब्राहामाची संतान ही सर्व राष्ट्रातील ती लोकं आहेत ज्यांनी त्यांची आशा येशू ख्रिस्तामध्यें ठेवली आहे, आणि त्यामुळें जशी अब्राहामानें मोरीया पर्वतावर आशा ठेवली, त्याप्रमाणें त्यांचा सर्वात मोलवान जगीक ठेवा देखील त्यांच्या आज्ञाधारकतेला रोखू शकत नाहीं.

जे तुम्हीं येशू ख्रिस्तामध्यें आशा ठेवता आणि विश्वासाचे आज्ञापालन करून त्याला अनुसरता, ते तुम्हीं अब्राहामाचे वंशज आहात आणि त्याच्या कराराच्या अभिवचनाचे वारस आहात.

1 June : देवाच्या कृपेला उंचवणारा विश्वास

Alethia4India
Alethia4India
1 June : देवाच्या कृपेला उंचवणारा विश्वास
Loading
/

मी देवाची कृपा व्यर्थ करत नाहीं. (गलती 2:22)

मी लहानपणी समुद्रकिनारी असताना एका मोठ्या लाटेमुळें पाय सटकून पडलो, तेव्हां मला वाटलें कीं मी क्षणातच समुद्रात ओढला जाणार आहे.

ती खूप भीतीदायक गोष्ट होती. मी माझा तोल सावरू लागलो आणि पाहू लागलो कीं उभे कसे राहता येईल. पण लाटेचा जोर इतका शक्तिशाली होता कीं मी पोहू देखील शकत नव्हतो, आणि मी माझें पाय जमिनीवर ठेवू शकत नव्हतो. शिवाय, मी चांगला पोहू पण शकत नव्हतो.

मी भीतीच्या त्या अवस्थेंत असतांना मला एकच विचार आला : कोणी माझी मदत करील का? पण पाण्याच्या आतून मी कुणाला हाक पण मारू शकत नव्हतो.

जेव्हां माझ्या वडिलांनी माझ्या हाताला मजबुतीनें पकडलें, तो माझ्या जीवनातला सर्वात मधुर क्षण होता. मी त्यांच्या ताकती पुढे स्वता:ला पूर्णपणें आत्म-समर्पण केलें. मला उचलून धरण्याची त्यांची जी इच्छा होती तिचा मी आनंद घेऊ लागलो. मी त्यांचा प्रतिकार केला नाहीं.

माझ्या मनात हा विचार आला नाहीं कीं मी असें दाखवावे कीं स्थिति इतकीं पण वाईट नव्हती, आणि माझ्या वडीलांच्या हाताला मी पण माझी ताकत लावावी. मला इतकेच वाटत होते कीं, होय! मला तुमची गरज आहे! मी तुमचा आभारी आहे ! मला तुमचे सामर्थ्य आवडलें! मला तुमचा पुढाकार आवडला! मला तुमची पकड आवडली! तुम्हीं महान आहां!

आत्म-समर्पणाच्या त्या प्रीतिमध्यें कोणी आढ्यता मिरवू शकत नाहीं. आत्म-समर्पणाच्या त्या प्रीतिला मी “विश्वास” असें मानतो. आणि पाण्यात बुडत असताना मला ज्या साहाय्याची गरज होती, म्हणजें माझें वडील, ते देवाच्या भावी कृपेची प्रचिती होते, व हेच साहाय्य मला हवे होते. हाच तो विश्वास आहे जो कृपेला उंचवितो.

ख्रिस्ती जीवन कसे जगायचे याचा जेव्हां आपण विचार करतो तेव्हां ह्या विचाराला प्रथम स्थान दिलें गेलें पाहिजे कीं : मी देवाच्या कृपेला व्यर्थ न ठरवता तिला कसे उंचावू शकतो? याचे उत्तर पौल गलती 2:20:21 मध्यें देतो. “मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेंला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असें नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझें जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगानें आहे; त्यानें माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिलें. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाहीं.”

त्याचे जीवन देवाची कृपा व्यर्थ करणारे का नव्हते? कारण तो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवणारे जीवन जगत होता. विश्वास सर्व लक्ष कृपेकडें निर्देशित करतो, ना कीं ती व्यर्थ करतो. 

31 May : देवाची सेवा करण्याचा लाभ

Alethia4India
Alethia4India
31 May : देवाची सेवा करण्याचा लाभ
Loading
/

“माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा ह्यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील” (2 इतिहास 12:8).

देवाची सेवा करणे इतर कोणाची सेवा करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

आपण हे समजून घ्यावें – आणि त्याचा आनंद घ्यावा- याविषयीं देव खूप आवेशी आहे. उदाहरणार्थ, तो आपल्याला आज्ञा देतो, “हर्षाने परमेश्वराची सेवा करा!” (स्तोत्र 100:2). ह्या हर्षामागे एक कारण आहे. ते प्रे. कृत्ये 17:25 मध्यें दिलेले आहे. “माणसांच्या हातून परमेश्वराची सेवा घडावी असेही नाहीं; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.”

आपण आनंदाने त्याची सेवा करतो कारण त्याच्या गरजा पूर्ण करण्याचा भार आपल्यावर नाहीं. त्याला काही गरजा नाहींत. म्हणून, त्याची सेवा करणे म्हणजें त्याच्या गरजा पूर्ण करणे असा त्या सेवेचा अर्थ नाहीं. उलट आपण अशा सेवेत आनंद साजरा करतो ज्यात तो आपल्या गरजा पुरवितो. देवाची सेवा करण्याचा अर्थ आपल्याला जे करायचे आहे ते करण्यासाठीं देवाकडून कृपा प्राप्त करणे असा होय.

हे आम्हास समजावे याविषयीं देव किती ईर्ष्यावान किंवा आवेशी आहे आणि त्यांत त्याचे किती गौरव होते हे दाखवण्यासाठीं, 2 इतिहास 12 मध्यें एक गोष्ट आहे. शलमोनाचा मुलगा, रहबाम ज्याने दहा कुळांच्या बंडानंतर दक्षिणेकडील राज्यावर राज्य केलें, त्यानें परमेश्वराची सेवा न करण्याचा निर्णय घेतला आणि इतर देवतांची व इतर राज्यांची सेवा केलीं.

न्यायनिवाडा म्हणून, देवानें शिशकला 1200 रथ व 60,000 स्वार घेऊन रहबामाविरुद्ध पाठविले (2 इतिहास 12:2-3).

देवानें आपल्या दयेनुसार शमाया संदेष्ट्याला रहबामाकडे हा संदेश घेऊन पाठवले:  “परमेश्वर म्हणतो, ‘तुम्हीं मला सोडले म्हणून मीही तुम्हांला सोडून तुम्हांला शिशकाच्या हाती दिलें आहे” (2 इतिहास 12:5). त्या संदेशाचा हर्षयुक्त परिणाम असा झाला कीं रहबाम आणि त्याचे सरदार हे दीन झालें व पश्चात्ताप करून म्हणू लागले कीं, “परमेश्वर न्यायी आहे” (2 इतिहास 12:6).

ते दीन झालें आहेत असें परमेश्वराने पाहिले तेव्हां त्यानें म्हटले, “ते दीन झालें आहेत म्हणून मी त्यांचा नाश करणार नाहीं; मी लवकरच त्यांचा बचाव करीन; माझ्या क्रोधाचा वर्षाव शिशकाच्या हस्ते मी यरुशलेमेवर करणार नाहीं” (2 इतिहास 12:7).पण त्यांस ताडन म्हणून तो म्हणतो, “माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा ह्यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील” (2 इतिहास 12:8).

विषयाचा हेतू स्पष्ट आहे: शत्रूची सेवा करणे आणि देवाची सेवा करणे यात खूप फरक आहे. कसा? देवाची सेवा करणे म्हणजें प्राप्त करणे आणि आशीर्वाद आणि आनंद आणि लाभ आहे. शिशकाची सेवा करणे थकविणारे आणि रिक्त करणारे आणि कष्ट देणारे आहे. देव हा देणारा आहे. शीशक हा हिसकावून घेणारा आहे.

म्हणूनच मी हे मोठ्या आवेशाने सांगतो कीं रविवारची सकाळची उपासना आणि दैनंदिन आज्ञापालनाची उपासना हे मूलतः देवाला जाचक देणे नाहीं, परंतु देवाकडून आनंदाने प्राप्त करणे आहे. हीच खरी सेवा आहे ज्याची देव आम्हांकडून मागणी करतो. तुम्हीं जे काही करता त्यात, देणारा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा.

30 May : आढ्यता बाळगण्यासाठीं काही

Alethia4India
Alethia4India
30 May : आढ्यता बाळगण्यासाठीं काही
Loading
/

कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारें तुमचे तारण झालेंले आहे आणि हे तुमच्यां हातून झालें असें नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालें नाहीं. (इफिस 2:8-9).

नवीन करार ही खात्री करण्यासाठीं कीं आपण त्या गोष्टीविषयीं बढाई मारू नये जी केवळ कृपेनेच प्राप्त होते, विश्वास आणि कृपा यांतील परस्पर संबंध दाखवितो.

सर्वात सुपरिचित उदाहरणांपैकीं एक म्हणजें इफिस 2:8. कृपेनेच विश्वासाच्या द्वारें. या दोन तत्वांमध्यें कृपेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारा परस्पर संबंध आहे. कृपेनेच विश्वासाच्या द्वारें.  

विश्वास आमच्यांत घडलेली बौद्धिक कृति आहे ज्याद्वारें आपण आपल्या स्वतःच्या अपुरेपणापासून परमेश्वराच्या मोफत आणि सर्वसंपन्न प्रयोजनाकडे वळते. अपात्र लोकांवर कृपा करण्याच्या परमेश्वराच्या स्वातंत्र्यावर विश्वास आपले लक्ष केंद्रित करतो. तो देवाच्या विपुलतेवर अवलंबून राहतो.

म्हणून विश्वास, स्वतःच्या व्याख्येनुसार, आढ्यता बाळगणे ठेचून टाकतो आणि कृपेस अनुकूल अशी सांगड घालतो. जेथेकोठे विश्वास पाहतो, तो प्रत्येक प्रशंसनीय कृत्यामागे कृपाच पाहतो. म्हणून विश्वास आढ्यता बाळगूशकत नाहीं, तर केवळ प्रभूमध्यें,जो कृपेचा कर्ता आहे, आढ्यता बाळगतो.

म्हणून पौल, तारण हे कृपेने विश्वासाच्या द्वारें आहे असें म्हटल्यानंतर पुढे म्हणतो, “आणि हे तुमच्यां हातून झालें असें नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालें नाहीं” (इफिस 2:8,9). विश्वास मानवी चांगुलपणा किंवा लायकीं किंवा बुद्धीचा अभिमान बाळगू शकत नाहीं, कारण विश्वास देवाच्या विनामूल्य, सर्व-संपन्न कृपेवर केंद्रित असतो. जो काही चांगुलपणा विश्वास पाहतो, तो त्याकडे कृपेचे फळ म्हणूनच पाहतो.

जेव्हां विश्वास आपले “ज्ञान म्हणजें नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेंली मुक्ती” यांकडे पाहते तेव्हां तो म्हणतो, “जो अभिमान बाळगतो, त्यानें परमेश्वराविषयी तो बाळगावा” (1 करिंथ. 1:30-31).

29 May : देव नियम शास्त्रांत प्रकट स्वतःच्या इच्छेविरुद्ध जातो तेव्हां

Alethia4India
Alethia4India
29 May : देव नियम शास्त्रांत प्रकट स्वतःच्या इच्छेविरुद्ध जातो तेव्हां
Loading
/

“तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” (1 शमुवेल 2:25)

एली याजक जेव्हां त्याच्या मुलांना त्यांच्या पापांसाठीं हटकत असें तेव्हां ते त्याच्या आज्ञेचे पालन करीत नसत. आमच्या जीवनांसाठीं ह्या वचनाचे तीन अर्थ आहेत.

1) फार काळपर्यंत आणि अतिशय गंभीरपणे पाप करणे शक्य आहे कीं स्वतः परमेश्वरहि पश्चात्तापबुद्धी देणार नाहीं.

म्हणूनच पौलाने म्हटले कीं आपण प्रार्थना आणि शिक्षण देण्याचे सर्व कार्य पार पाडल्यानंतर, “कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठीं पश्चात्तापबुद्धी देईल,” – “त्यांस पश्चातापबुद्धी देईलच” असें नाहीं (2 तीमथ्य 2:25). जेव्हां आपण पापाचे जीवन जगत असतो तेव्हां पश्चातापासाठीं “फार उशीर” झालेंला असू शकतो. इब्री 12:17 मध्यें जसे एसावाबद्दल म्हटले आहे, “त्यानें जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चात्तापाची संधी त्याला मिळाली नाहीं.” त्याचा त्याग करण्यात आला, तो पश्चाताप करू शकला नाहीं.

याचा अर्थ हा नाहीं कीं जे लोक संपूर्ण आयुष्यभर पाप केल्यानंतर खरोखर पश्चात्ताप करतात त्यांचे तारण होऊ शकत नाहीं. ते नक्कीच तारण पावू शकतात आणि पावतील! देव अत्यंत दयाळू आहे. वधस्तंभावरील चोराची आठवण करा. येशू ने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” (लूक 23:43).

2) कधी कधी देव पाप करणाऱ्या व्यक्तीस योग्य ते करू देत नाहीं.

“तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” त्यांच्या पित्याचा शब्द ऐकणे म्हणजें जे योग्य ते त्यांना करावयांस पाहिजे होते. पण ते तसें करेनात. का? “कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” 

त्यांनी त्यांच्या पित्याची आज्ञा पाळली नाहीं या मागे कारण हे होते कीं त्यांच्या बाबतींत देवाचे हेतू निराळे होते,  आणि त्यानें त्यांना पाप आणि मृत्यूसाठीं सोडून दिलें होते. यावरून असें दिसून येते कीं असें समय आहेत जेव्हां देवाची पूर्वनियोजित योजना ही देवाच्या नियमशास्त्रांत प्रकट झालेंल्या इच्छेपेक्षा वेगळी असते.

3) कधीकधी देवाची प्रकट इच्छा पूर्ण व्हावी यासाठीं आपल्या प्रार्थना केल्या जात नाहींत कारण देवानें आपल्या पवित्र आणि बुद्धीसम्मत हेतूंसाठीं काहीतरी वेगळे ठरवलेले असते.

मला असें वाटते कीं त्याच्या मुलांचे परिवर्तन व्हावें म्हणून एलीने प्रार्थना केलीं. आणि नक्कीच, त्याला अशाच प्रकारे प्रार्थना करणे अगत्याचे होते. पण देवानें हे योजिले होते कीं तो हफनी आणि फिनहास यांनी आज्ञा पाळू नये, तर मारले जावे.

जेव्हां असें काहीतरी घडते (जे आपल्याला सामान्यतः ती वेळ येईपर्यंत ठाऊक नसते) कीं जेव्हां एकींकडे आपण परिवर्तनासाठीं परमेश्वराचा धावा करत असतो, तेव्हां परमेश्वराचे उत्तर असें नसते:  “मी तुजवर प्रीति करीत नाहीं.” त्याऐवजी उत्तर असें असते : “या पापावर विजय न मिळविण्यामागे आणि पश्चात्ताप न करण्यामागे माझे बुद्धियुक्त आणि पवित्र हेतू आहेत. तुला हे सर्व हेतू आता दिसत नाहींत. मजवर विश्वास ठेव. मी काय करत आहे हे मला माहीत आहे. मी तुजवर प्रीति करतो.”

28 May : धीराचे प्रतिफळ

Alethia4India
Alethia4India
28 May : धीराचे प्रतिफळ
Loading
/

“तुम्हीं माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवानें ते चांगल्यासाठींच योजले होते.” (उत्पत्ति 50:20)

उत्पत्ती 37-50 मधील योसेफाची गोष्ट आम्हीं देवाच्या सार्वभौम, भविष्यातील कृपेवर विश्वास का ठेवला पाहिजे याविषयी एक मोठा धडा आहे.

योसेफाला त्याच्या भावांनी गुलाम म्हणून विकले, ज्यामुळें त्याच्या धीराची मोठी परीक्षा घेण्यांत आली असावी. पण त्याला मिसर देशात पोटीफरच्या घरात चांगली नोकरी दिली गेली. मग, जेव्हां तो आज्ञापालनाच्या अनियोजित स्थानी सरळपणाने वागत असतो, तेव्हां पोटीफरची पत्नी त्याच्या प्रामाणिकपणाविषयी खोटे बोलते आणि त्याला तुरुंगात टाकण्यात येते – त्याच्या धीराची दुसरी मोठी परीक्षा.

पण पुन्हा परिस्थिती सुधारते आणि बंदिशाळेचा अधिकारी त्याला जबाबदारी आणि आदर देतो. पण जेव्हां त्याला वाटते कीं त्याला ज्याच्या स्वप्नाचा त्यानें अर्थ सांगितला होता त्या फारोच्या प्यालेदारामुळें मुक्ती मिळणार आहे, तो प्यालेदार त्याला आणखी दोन वर्षे विसरून जातो. त्याच्या धीराची आणखी एक दुःखद परीक्षा.

शेवटी, या सर्व वळणांचा आणि विलंबांचा अर्थ स्पष्ट होतो. योसेफाला मिसर देशचा नेता म्हणून तयार केलें जाते, फारोनंतर त्याचे दुसरे स्थान आहे. ज्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकले होते त्यांना तो उपासमारीपासून वाचवतो. बऱ्याच काळपासून दुरावलेल्या या भावांना योसेफ म्हणतो, “देवानें मला तुमच्यांपुढे ह्यासाठीं पाठवले कीं तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा…तुम्हीं माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवानें ते चांगल्यासाठींच योजले होते” (उत्पत्ति 45:7;50:20).

या प्रदीर्घ वर्षांच्या निर्वासन आणि गैरवर्तनाच्या काळात योसेफाच्या धीराची गुरुकिल्ली कोणती असावी? उत्तर आहे: देवाच्या सार्वभौम, भावी कृपेवर विश्वास – अनियोजित जागा आणि अनियोजित गतीस कल्पनीय सुखद अंतात बदलणाऱ्या देवाच्या सार्वभौम, भावी कृपेवर विश्वास. हीच आपल्या धीराची गुरुकिल्ली आहे. जेव्हां आपल्या जीवनांत सर्वात विचित्र आणि सर्वात दुःखद वळण येतांत, तेव्हां देव आपल्यासाठीं कार्य करत आहे असा विश्वास तुम्हीं ठेवता का?

27 May : अस्सल विरूद्ध नकली विश्वास

Alethia4India
Alethia4India
27 May : अस्सल विरूद्ध नकली विश्वास
Loading
/

“त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसऱ्यांदा दिसेल.” (इब्री 9:28)

आपल्या सर्वांसमोर जो प्रश्न आहे तो हा: ख्रिस्ताने ज्यांची पापे वाहून नेली त्या “पुष्कळ” लोकांमध्यें आपला समावेश आहे का? आणि तो दुसऱ्यांदा दिसेल  त्यां वेळी आपण तारले जाऊ का?

इब्री 9:28 चे उत्तर आहे, “होय,” जर आपण “त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.” आपण जाणू शकतो कीं आपली पापे वाहून नेण्यात आली आहेत आणि न्यायनिवाडा होईल त्यां दिवशी आपण सुरक्षित असू, जर आपण ख्रिस्तावर अशाप्रकारे विश्वास ठेवतो कीं तो विश्वास आम्हास त्याच्या आगमनासाठीं उत्सुक करतो.

एक नकली, बनावटी विश्वास आहे जो ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा दावा करतो, परंतु केवळ अग्नि विमा धोरण आहे. नकली विश्वास नरकापासून बचाव करण्यासाठीं “विश्वास ठेवतो.” त्याला ख्रिस्तासाठीं खरी इच्छा नसते. खरे म्हणजें, तो न आल्यास त्याला आवडेल, यासाठीं कीं आपल्याला या जगाच्या सुखांचा होईल तितका आस्वाद घेता यावा. यावरून दिसते कीं ते हृदय ख्रिस्तासोबत नाहीं, जगासोबत आहे.

तर, आपल्यासाठीं मुद्दा हा आहे कीं आपण ख्रिस्ताच्या आगमनाची उत्कंठेने वाट पाहत आहोत का? कीं जगासोबत आपले प्रेमसंबंध सुरू असताना त्यानें आमच्यापासून दूर राहावे असें आम्हास वाटते? हाच प्रश्न आहे जो विश्वासाच्या खरेपणाची पारख करतो.

“आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट” पाहत असतांना आपण करिंथकरांसारखे बनावे (1 करिंथ 1:7) आणि फिलिप्पैकरांसारखे ज्यांचे ”नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत“ (फिलिप्पै 3:20).

आमच्यासाठीं हा मुद्दा आहे. त्याचे प्रगट होणे आपल्याला आवडते का? किंवा आपले जगावर प्रेम आहे आणि आम्हीं आशा करतो कीं त्याचे प्रगट होणे आपल्या योजनांमध्यें अडखळण आणणार नाहीं? या प्रश्नावर अनंतकाळ अवलंबून आहे.

26 May : धीराने वाट पाहण्यासाठीं बळ

Alethia4India
Alethia4India
26 May : धीराने वाट पाहण्यासाठीं बळ
Loading
/

“सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्हीं सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे.” (कलस्सै 1:11).

“समर्थ व्हावे” हा योग्य शब्द आहे. प्रेषित पौलाने कलस्सै येथील मंडळीसाठीं प्रार्थना केलीं, कीं “सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्हीं सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. (कलस्सै 1:11). धीर हा आंतरिक सामर्थ्याचा पुरावा आहे.

उतावळे लोक दुर्बळ असतात, आणि म्हणून ते बाहेरील मदतीवर अवलंबून असतात – जसे कीं वेळापत्रके जी योग्य असतात पण त्यांच्या नाजूक हृदयाला आधार देणारी परिस्थिती. त्यांच्या शपथांचा आणि धोक्यांचा आणि त्यांच्या योजनांस आड येणाऱ्या गुन्हेगारांच्या कठोर टीकांचा भडीमार दुर्बळ वाटत नाहीं. पण तो गलबला हे सर्व दुर्बलतेचे आवरण आहे. धीरासाठीं अति विशाल आंतरिक बळाची गरज भासते.

खिस्ती व्यक्तीच्या बाबतींत, हे सामर्थ्य त्याला देवाकडून प्राप्त होते. म्हणूनच पौल कलस्सैकरांसाठीं प्रार्थना करत आहे. तो देवाकडे विनंती करत आहे कीं खिस्ती जीवनासाठीं आवश्यक असलेल्या धीर व सहनशीलतेसाठीं त्यानें त्यांना सामर्थ्य द्यावे. पण जेव्हां तो म्हणतो कीं धीराचे सामर्थ्य हे “(देवाच्या) गौरवाच्या पराक्रमानुसार” आहे, तेव्हां त्याच्या बोलण्याचा अर्थ केवळ हा नाहीं कीं ख्रिस्ती व्यक्तीला धीर देण्यासाठीं दैवीय सामर्थ्याची गरज लागते.  त्याच्या बोलण्याचा अर्थ असा कीं या “गौरवाच्या पराक्रमात” विश्वास ते माध्यम आहे ज्याद्वारें धीराचे सामर्थ्य येते.

धीर खरे तर पवित्र आत्म्याचे फळ होय (गलती 5:22), परंतु पवित्र आत्मा (त्याच्या सर्व फळांसह) “विश्वासाने ऐकण्याद्वारें” (गलती 3:5) सामर्थ्य देतो. म्हणून पौल प्रार्थना करत आहे कीं परमेश्वर देव आपल्याला धीरास सामर्थ्य देणाऱ्या “गौरवाच्या पराक्रमाशी” जोडेल. आणि तो जोड म्हणजें विश्वास.

25 May : अडथळ्याच्या मार्गात देवाची योजना

Alethia4India
Alethia4India
25 May : अडथळ्याच्या मार्गात देवाची योजना
Loading
/

“आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्हीं कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारें देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.” (कलस्सै 3:17)

तुम्हीं कधी असा विचार केला आहे का कीं तुम्हीं जे गमावले आणि ज्याची तुम्हाला अतिशय गरज आहे ते तुम्हीं चुकींच्या जागी शोधत आहात? तो कोठे आहे हे त्याला नक्की माहित आहे, आणि तरीही तो तुम्हाला चुकींच्या जागी पाहू देत आहे.

एकदा मला माझ्या डिझायरिंग गॉड नावाच्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीसाठीं एक अवतरण हवे होते. मला माहित होते कीं मी ते रिचर्ड वर्मब्रँड यांच्या पुस्तकात वाचले होते. मला वाटले कीं ते त्यांच्या रीचिंग टूवर्ड्स द हाईट्स नावाच्या भक्ती पुस्तकात होते. मला ते समोरच्या पानांच्या उजव्या बाजूला दिसत होते. पण मला ते सापडले नाहीं.

मी पहातच होतो, कीं माझे लक्ष ३० नोव्हेंबरच्या त्याच्या भक्तीपाठावर खिळले. ते वाचत असतांना मी म्हटले, “म्हणूनच देवानें मला “चुकींच्या” ठिकाणी माझे अवतरण शोधू दिलें.” येथे एक गोष्ट होती जी उत्तमरित्या स्पष्ट करते कीं आपण येशूच्या नावात जे काही करतो ते कधीही वाया जात नाहीं – काहीही नाहीं, चुकींच्या ठिकाणी अवतरण शोधत नाहीं. मी जे वाचले ते असें आहे:

मंदबुद्धी मुलांच्या घरात, कॅथरीनचे वीस वर्षे पालनपोषण करण्यात आले. ती आरंभापासूनच मानसिकदृष्ट्या अपंग, होते, आणि ती कधीही एक शब्दही बोलली नव्हती, तर फक्त वनस्पतिवत् होती. ती एकतर शांतपणे भिंतींकडे पाहत असें किंवा गोंधळलेल्या हालचाली करीत असें. तिचे जीवन म्हणजें खाणे, पिणे, झोपणे. तिच्या सभोवताली जे काही घडत असें त्यात ती भाग घेत नसल्यासारखे दिसत होते. तिचा एक पाय कापावा लागला. कर्मचाऱ्यांनी कॅथरीनला  शुभेच्छा दिल्या आणि आशा केलीं कीं प्रभु लवकरच तिला स्वतःजवळ घेऊन जाईल.

एक दिवस डॉक्टरांनी संचालकास लवकर या म्हणून बोलावले. कॅथरीन मरणाच्या लागास होती. दोघांनी खोलीत प्रवेश केला, त्यांना त्यांच्या काना-डोळ्यांवर विश्वासच बसेना. कॅथरीन ख्रिस्ती गीते गात होती जी तिने ऐकली होती आणि शिकली होती, जे मृत्यूशय्येस लागू होते. तिने पुन्हा पुन्हा जर्मन गाणे म्हटले, “आत्म्याला त्याची पितृभूमी, विश्रांती कोठे लाभते?” रूपांतरित चेहऱ्याने तिने अर्धा तास गाणे गायले, मग ती शांतपणे निघून गेली. (बेस्ट इज स्टिल टू कम, वुपरटल: सोन अँड शिल्डमधून उद्धृत)

ख्रिस्ताच्या नावाने जे काही केलें जाते ते खरोखरच वाया जाते का?

मला ज्याची गरज आहे असा माझा हताश, व्यर्थ शोध वाया गेला नाहीं. या अपंग मुलीचे गाणे व्यर्थ गेले नाहीं. आणि तुमचा वेदनादायक, अनियोजित वळसा व्यर्थ जाणार नाहीं – जर तुम्हीं परमेश्वराकडे त्याच्या अनपेक्षित कामासाठीं पाहत असाल आणि सर्वकाही त्याच्या नावाने करत असाल तर (कलस्सै 3:17).

24 May : तुमच्यांतारणाच्या खात्रीचा खडक

Alethia4India
Alethia4India
24 May : तुमच्यांतारणाच्या खात्रीचा खडक
Loading
/

“कारण आत्म्याच्या द्वारें होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवानें तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठीं निवडले आहे.” (2 थेस्सल 2:13)

पवित्र शास्त्र आपण काहीही बरे किंवा वाईट करण्यापूर्वी (रोम. 9:11) पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताठायी आपली निवड केलीं जाण्याविषयी बोलते – म्हणजें देवानें आम्हांला निवडले (इफिस 1:4). त्यामुळें, आमची निवड खऱ्या अर्थाने कोणत्याही अटीविरहित आहे. आमचा विश्वास किंवा आमची आज्ञाधारकता याचा आधार नाहीं. हि निवड मुक्त आणि आम्हीं पात्र नसतांना करण्यांत आलेली आहे.

दुसरीकडे, पवित्र शास्त्रातील डझनभर शास्त्रलेख आपल्या अंतिम तारणाविषयी बोलतात (सार्वकालिक जीवनासाठीं भूतकाळात झालेंल्या आपल्या निवडीच्या विपरीत) ज्याची अट आहे परिवर्तित हृदय आणि जीवन. म्हणून, प्रश्न उठतो, सार्वकालिक जीवन वतन म्हणून मिळण्यासाठीं आवश्यक असलेल्या विश्वासात आणि पावित्र्यात मी टिकून राहीन याची खात्री मला कशी प्राप्त होईल?

उत्तर हे आहे कीं ती खात्री आमची झालेंली निवड यांत मुळावलेली आहे. 2 पेत्र 1:10 यात म्हटले आहे, “ज्या संदेष्ट्यांनी तुमच्यांवर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला.” देवाची निवड हा मला तारण्याच्या देवाच्या वचनबद्धतेचा पाया आहे, आणि म्हणून त्याच्या निवडीच्या कृपेने जे सुरू झालें आहे ते पवित्र करणाऱ्या कृपेद्वारें तो मजमध्यें कार्य करील.

नव्या कराराचा हा अर्थ आहे. येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण नव्या कराराचा सुरक्षित लाभार्थी आहे, कारण येशूनें लूक 22:20 मध्यें म्हटले आहे, ”हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यांसाठीं ओतले जात आहे.“ म्हणजें, माझ्या रक्ताद्वारें जे माझे आहेत त्या सर्वांसाठीं मी नवा करार प्राप्त करतो. 

नव्या करारात देव केवळ आज्ञापालनाची आज्ञा देत नाहीं, तर आज्ञापालन घडवून आणतो. “तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील” (अनुवाद 30:6).  “मी तुमच्यां ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्हीं माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असें मी करीन” (यहेजकेल 36:27; तुलना 11:20). ही नवीन कराराची अभिवचने आहेत.

निवड ही त्याच्या लोकांसाठीं हे करण्याची परमेश्वराची सार्वकालिक वचनबद्धता होय. म्हणून, निवड ही हमी देते कीं ज्यांस परमेश्वर विश्वासाने नीतिमान ठरवितो, त्यांचे तो अवश्य गौरवहि करील” (रोम 8:30). याचा अर्थ हा कीं तो आपल्यामध्यें गौरवीकरणासाठीं घालून दिलेंल्या सर्व अटी पूर्ण करण्यासाठीं अचूकपणे कार्य करेल.

आमची झालेंली निवड तारणाच्या या खात्रीचा अंतिम पाया आहे कारण देव तारण देण्यासाठीं वचनबद्ध आहे म्हणून, तारणासाठीं जे काही उपलब्ध आहे ते सर्व सक्षम करण्यासाठीं देव वचनबद्ध आहे.