ArchivesSolid Joys

30 December : सुसज्जीत आणि सशक्त

Alethia4India
Alethia4India
30 December : सुसज्जीत आणि सशक्त
Loading
/

आतां ज्या शांतीच्या देवानें ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्तानें मेंढरांचा’ महान् ‘मेंढपाळ’ आपला प्रभु येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘वर आणिलें,’ तो देव आपल्या दृष्टीनें जें आवडतें तें आपणांमध्यें येशू ख्रिस्ताच्या द्वारें करो व तो आपल्या इच्छेप्रमाणें करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामांत सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. (इब्री 13:20-21)

ख्रिस्तानें सार्वकालिक कराराचे रक्त सांडले. या यशस्वी मुक्तीद्वारे, त्यानें मृतातून स्वतःच्या पुनरुत्थानाचा आशीर्वाद प्राप्त केला. हे इंग्रजीपेक्षा ग्रीकमध्यें अधिक स्पष्ट आहे: “देवानें… सार्वकालिक कराराच्या रक्ताने . . प्रभु येशूला मरणातून पुन्हा वर आणले.” हा येशू – कराराच्या रक्ताने उठविल्या गेला – आता तो आपला जिवंत प्रभु आणि मेंढपाळ आहे.

आणि या सर्व गोष्टींमुळें, देव दोन गोष्टी करतोः

1. तो आपल्याला सर्व चांगल्या गोष्टींनी सुसज्जीत करतो जेणेंकरून आपण त्याची इच्छा पूर्ण करावी, आणि

2. जे देवाच्या दृष्टीत आनंददायी आहे असे कार्य देव आपल्यामध्यें करतो.

ख्रिस्ताच्या रक्ताने सुरक्षित केलेंला “सार्वकालिक करार” हा नवीन करार आहे. आणि नवीन कराराचे वचन हे आहेः ‘‘मी आपलें धर्मशास्त्र त्याच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन’’ (यिर्मया 31:33). म्हणूनच, या कराराचे रक्त केवळ देवाच्या इच्छेप्रमाणें आपल्याला सुसज्ज करण्यासाठीं सुरक्षीत करीत नाहीं तर ते यशस्वीपणें सुसज्जीत करण्यासाठीं देवाला त्याचे कार्य करण्यास देखील आपल्यामध्यें सुरक्षीत करते.

देवाची इच्छा कृपेचे साधन म्हणून केवळ दगडावर किंवा कागदावर लिहिली जात नाहीं. ती आपल्यामध्यें कार्य करते आणि त्याचा परिणाम असा आहे कीः त्याची अनुभूती आपण अनुभवतो, त्याचा विचार करतो व देवाला अधिक आनंद होईल असे कार्य करतो.

जी साधने तो आम्हांला देतो त्याचा उपयोग करण्याची आज्ञा आपल्याला दिली आहेः ‘‘भीत व कांपत आपलें तारण साधून घ्या.” पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजें आपल्याला असे का सांगितले जातेः ‘‘कारण इच्छा करणें व कृति करणें हीं तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे” (फिलिप्पै 2:12-13).

जर आपण देवाला आनंद देऊ शकलो तर – जर आपण त्याला आनंद मिळेल असे कार्य केलें तर – याचे कारण असे आहे कीं देवाच्या रक्ताने विकत घेतलेली कृपा केवळ सुसज्जतेपासून सर्वशक्तिमान परिवर्तनाकडें वळवली आहे.

29 December : एक भयानक नियती

Alethia4India
Alethia4India
29 December : एक भयानक नियती
Loading
/

. . येशू आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. (1 थेस्सलनी 1:10)

लहानपणी तुम्हीं कधी हरवला अशी एखादी वेळ तुम्हांला आठवते का, किंवा एखादा असा प्रसंग आठवतो का कीं तुम्हीं घसरून पडला किंवा तुम्हीं बुडला असा एखादा प्रसंग आठवतो का? मग अचानक तुमची सुटका झाली. तुमचे ‘‘प्रिय जीवन’’ टिकवून ठेवण्यासाठीं तुम्हांला धरल्या गेलें, तुम्हांला वाचविण्यात आले. तुम्हीं ज्या गोष्टी गमावल्या त्याकरिता तुम्हीं थरथर कापले असाल. परंतु तुम्हीं आनंदी होता. अरे, खूप आनंदी होता आणि आभारी होता आणि आनंदाने थरथर कांपता.

देवाच्या क्रोधापासून माझी सुटका झाल्याबद्दल मला वर्षाच्या शेवटी असेच वाटते. नाताळाच्या दिवशी आम्हीं शेकोटी पेटवत असू. कधी-कधी निखारे इतके गरम असायचे कीं मी ते निखारे आत टाकल्यावर माझा हात थोडा भाजायचा. लगेच मी हात मागे घ्यायचो आणि नरकातल्या पापाविरुद्ध देवाच्या क्रोधाच्या भयंकर विचाराने मी थरथर कापायचो. अरे, ते किती भयानक होते!

नाताळाच्या दुपारी मी एका अशा स्त्रीला भेट दिली जिचे शरीर 87 टक्के जळले होते. ती ऑगस्ट महिन्याासून रुग्णालयात होती. माझे हृदय तिच्यासाठीं तुटत होते. येणार्‍या युगात नवीन शरीरासाठीं देवाच्या वचनातून तिला आशा बाळगणें किती छान होते! परंतु मी केवळ तिच्या या जीवनातील दुःखाचाच विचार करीत नाहीं, तर येशूनें सार्वकालिक वेदनांपासून मला वाचविले त्याचा देखील विचार करितो.

माझ्या सोबत माझ्या अनुभवांचे परिक्षण करा. हा थरथरणारा आनंद वर्ष संपवण्याचा योग्य मार्ग आहे का? पौलाला आनंद झाला कीं “येशू . . . येणार्‍या क्रोधापासून आपली सुटका करतो” (1 थेस्सलनी 1:10). त्यानें ताकीद दिली, ‘‘परंतु जें … सत्याला न मानिता अनीतीला मानितात त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश ही येतील (रोम 2:8). आणि “लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि लोभामुळें, आज्ञा मोडणार्‍या लोकांवर देवाचा कोप होतो’’ (इफिस 5:6).

येथे वर्षाच्या शेवटी, मी बायबलमधून माझा प्रवास पूर्ण करीत आहे आणि शेवटचे पुस्तक, प्रकटीकरण वाचत आहे. ही देवाच्या विजयाची एक गौरवशाली भविष्यवाणी आहे, आणि “जीवनाचे पाणी फुकट” घेणार्‍या सर्वांचा सार्वकालिक आनंद आहे (प्रकटीकरण 22:17). यापुढे अश्रू नाहींत, आणखी वेदना नाहींत, आणखी उदासीनता नाहीं, आणखी दुःख नाहीं, मृत्यू नाहीं, पाप नाहीं (प्रकटीकरण 21:4).

पण अरेरे, पश्चात्ताप न करण्याची आणि येशूची साक्ष न घ्येण्याची भयावहता!  ‘‘येशूची अधिक प्रीती असलेला प्रेषित” (योहान) याने देवाच्या क्रोधाचे वर्णन भयंकर रीतीने केलें आहे. जे देवाच्या प्रीतीचा तिरस्कार करतात ते तोहि ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यांत निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस पितील,’ आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोंकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नि व गंधक ह्यांपासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो; त्यास ‘रात्रंदिवस’ विश्रांति मिळत नाहीं. (प्रकटीकरण 14:10-11).

‘‘ ज्या कोणाचें नांव ‘जीवनाच्या पुस्तकांत लिहिलेलें सांपडलें नाहीं,’ तो अग्नीच्या सरोवरांत टाकिला गेला’’ (प्रकटीकरण 20:15). येशू ‘‘ सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचें ‘कुंड तुडवितो’’ (प्रकटीकरण 19:15). ‘तें द्राक्षकुंड’ नगराबाहेर ‘तुडविलें गेलें;’ त्यांतून रक्त वाहिलें, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांस पोहोंचेल इतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला’’(प्रकटीकरण 14:20). योहानाला झालेंल्या दृष्टांताचा अर्थ काहीही असो, त्याचा एक अर्थ असा आहे कीं अशी एक वास्तविकता आहे जी फार भयंकर आहे, आणि ती सांगणें कठीण आहे.

मी आनंदाने थरथरत आहे कीं मी वाचलो आहे! पण अरेरे, देवाचा पवित्र क्रोध एक भयानक नियती आहे. बंधूंनो, पळून जा. सर्व शक्तीनिशी पळून जा आणि आपण जमेल तितक्या लोकांना वाचवू या! नव्वद नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्यासाठीं स्वर्गात जास्त आनंद आहे (लूक 15:7) यात काही आश्चर्य नाहीं!

28 December : देवाचे गौरव करणेंहे ध्येय आहे

Alethia4India
Alethia4India
28 December : देवाचे गौरव करणेंहे ध्येय आहे
Loading
/

आपण ज्या कृपेमध्यें आहो, त्यांत आपला प्रवेशहि त्याच्या द्वारें विश्वासानें झाला आहें; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगितों. (रोमकरांस 5:2)

देवाचे गौरव पाहणें ही आपली अंतिम आशा आहे.

येशू, स्वतःच्या व्यक्तीत्वात आणि कार्यात, देवाच्या गौरवाचा अवतार आहे आणि अंतिम प्रकटीकरण आहे. योहान 17:24 मध्यें येशू प्रार्थना करतो.

देवाचे गौरव पाहणें आणि त्यात सहभागी होणें ही ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे आपली अंतिम आशा आहे. अशी आशा, जी खरोखरच ज्ञात आहे व मौल्यवान आहे, आणि त्याचा खूप मोठा व निर्णायक प्रभाव आपल्या वर्तमान मूल्यांवर, आपल्या निवडींवर व आपल्या कृत्यांवर आहे. 

देवाचे गौरव जाणून घ्या. देवाच्या गौरवाचा आणि ख्रिस्ताच्या गौरवाचा अभ्यास करा. देवाचे गौरव प्रकट करणार्‍या  जगाच्या गौरवाचा अभ्यास करा, तसेच ख्रिस्ताचे गौरव प्रकट करणार्‍या सुवार्तेच्या गौरवाचा अभ्यास करा.

सर्व गोष्टींमध्यें आणि सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या गौरवाची संपत्ती राखून ठेवा.

आपल्या आत्म्याचा अभ्यास करा. तुम्हांला कोणत्या वैभवाने मोहित केलें आहे ते जाणून घ्या आणि ज्याद्वारे देवाचे गौरव होत नाहीं असे वैभव तुम्हीं का राखून ठेवता ते जाणून घ्या.

1 शमुवेल 5:4 मधील दागोनाच्या मूर्तीपुढील मूर्तिपूजक लोकांप्रमाणें जगाचे वैभव कशाप्रकारे कोसळेल हे जाणून घेण्यासाठीं आपल्या आत्म्याचा अभ्यास करा. देवाच्या गौरवापासून तुमचे लक्ष विचलित करणारे सर्व वैभव जगातील मंदिरांच्या जमीनीवरील करुणाजनक तुकड्यांमध्यें छिन्नभिन्न होईल. जगातील या सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या गौरवाचा ठेवा राखून ठेवा.

27 December : तुमचे ध्येय काय आहे?

Alethia4India
Alethia4India
27 December : तुमचे ध्येय काय आहे?
Loading
/

ह्यास्तव तुम्हीं खातां, पितां किंवा जें कांहिं करितां तें सर्व देवाच्या गौरवासाठीं करा. आणि त्याच्याद्वारें देव जो पिता त्याची उपकारस्तुति करा. (1 करिंथ 10:31; कलस्सै 3:17)

जेव्हां तुम्हीं सकाळी उठून त्या दिवसातील घडामोडींना तोंड देता तेव्हां त्या दिवसाकरिता तुमच्या ज्या आशा आहेत त्याविषयी तुम्हीं स्वतःला काय म्हणता? जेव्हां तुम्हीं जगलेल्या दिवसाकडें सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता, तेव्हां त्या दिवशी काय होण्याची तुमची अपेक्षा होती?

जर तुम्हीं म्हणाल, “मी तशाप्रकारे विचारही करीत नाहीं. मी उठतो आणि मला जे करायचे आहे ते करतो,’’ तर मग तुम्हीं स्वतःला कृपेच्या मूलभूत साधनांपासून आणि मार्गदर्शन, शक्तीसामर्थ्य, फलदायीपणा व आनंद ह्यांच्या स्रोतापासून स्वतःला दूर सारता व त्यापासून आपला संबंध तोडून टाकता. बायबलमध्यें या वचनांना समाविष्ट करून अगदी स्पष्टपणें सांगितले आहे कीं आपल्याकरिता देवाची इच्छा अशी आहे कीं आपण आपल्या दिवसाकडें जाणीवपूर्वक विशेष महत्व देऊन एका उद्देशाने त्याकडें पाहावे.

तुमच्याकरिता देवाची प्रकट इच्छा अशी आहे कीं जेव्हां तुम्हीं सकाळी उठता, तेव्हां तुम्हीं दिवसभर ध्येयरहित राहून त्यात वाहून जाऊ नये व तुमच्या थोडक्या परिस्थितींना तुम्हीं काय करावे हे ठरवू न देता किंवा तुमच्या घडामोडींवर त्यांना हावी होऊ न देता तुम्हीं तुमचे लक्ष्य ध्येयावर टिकवून ठेवावे – म्हणजें तुम्हीं एका विशिष्ट प्रकारच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करावे. मी येथे मुलांबद्दल, किशोरवयीन मुलांबद्दल आणि प्रौढांबद्दल बोलत आहे – अविवाहित, विवाहित, विधवा, माता आणि प्रत्येक व्यवहार करणार्‍या आणि प्रत्येक व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोलत आहे.

ध्येयरहित असणें हे निर्जीवतेसारखे आहे. मागील अंगणातील पिवळी मृत झालेंली पाने इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त फिरू शकतात – कुत्र्यापेक्षा जास्त, मुलांपेक्षा ही जास्त. वारा या मार्गाने वाहत आला कीं ते या मार्गाने जातात. वारा त्या मार्गाने वाहत आला कीं ते त्या मार्गाने जातात. ते कोसळतात, ते उसळतात, ते उडी मारता, ते कुंपणावर दाबा मारतात, परंतु त्यांना कोणतेही ध्येय नसते. ते गतीने भरलेले असतात आणि त्यांचे जीवन रिकामे असते.

देवानें मानवांना स्वतःच्या प्रतिरूपात जीवनाच्या मागील अंगणात उडालेल्या निर्जीव पानांप्रमाणें, ध्येयहीन होण्यासाठीं निर्माण केलें नाहीं. त्यानें आपली निर्मिती उद्देशपूर्ण बनण्यासाठीं केली आहे – जेणेंकरून आपण आपल्या सर्व दिवसांकरिता लक्ष्य ठरवावे व प्रत्येक दिवसाकरिता आपलें ध्येय ठरवावे. आज तुमचे ध्येय काय आहे? नवीन वर्षासाठीं तुमचे ध्येय काय आहे? सुरुवात करण्यासाठीं एक चांगली गोष्ट 1 करिंथ 10:31 मध्यें दिली आहे, ‘‘ ह्यास्तव तुम्हीं खातां, पितां किंवा जें कांहिं करितां तें सर्व देवाच्या गौरवासाठीं करा.’’

26 December : विपत्तीचा खोलवर विचार कसा करावा

Alethia4India
Alethia4India
26 December : विपत्तीचा खोलवर विचार कसा करावा
Loading
/

मृत्युतरंगानी मला वेष्टिले अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केलें…. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे ( 2 शमुवेल 22:5,31)

नैसर्गिक विपत्तीमुळें दहा मुलांचा मृत्यू झाल्यानंतर (ईयोब 1:19), ईयोब म्हणाला, “परमेश्वराने दिलें आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम” (ईयोब 1:21). जे घडले त्यासंबंधी ईयोबाचा जो समज होता त्यासंबंधी पुस्तकाच्या शेवटी, देव-प्रेरित लेखकाने पुष्टी केली. तो म्हणतो कीं ईयोबाच्या भावा आणि बहिणींनी ‘‘परमेश्वराने त्याजवर जी विपत्ती आणिली होती तीविषयी त्याचे समाधान केलें.’’ (ईयोब 42:11).

जगातील आणि आपल्या जीवनातील विपत्तीबद्दल विचार करीत असताना  – 26 डिसेंबर 2004 रोजी हिंद महासागरात घडलेली मोठी विपत्ती ज्यामध्यें  – 1.7 दशलक्ष लोक बेघर झालें, अर्धा दशलक्ष जखमी झालें, आणि 230,000 हून अधिक मारल्या गेलें, या गोष्टी ध्यानात ठेवून आज नवीन वर्षाच्या पहाटे आपल्याकरिता ह्यासंबंधी अनेक महत्वपूर्ण ध्वन्यर्थ धडे आहेत.

धडा: 1. सैतान हा अंतिम नाहीं; देव आहे.

ईयोबाच्या दुःखात सैतानाचा हात होता, परंतु तो हात निर्णायक नव्हता. ईयोबाला त्रास देण्याची परवानगी देवानें सैतानाला दिली होती (ईयोब 1:12; 2:6). परंतु ईयोब आणि ह्या पुस्तकाचा लेखक हे दोघेही देवालाच निर्णायक कारण असे समजतात. जेव्हां सैतान ईयोबाला मोठमोठ्या गळव्यांची पिडा देतो, तेव्हां ईयोब आपल्या बायकोला म्हणतो, “देवापासून सुखच घ्यावे, आणि दुःख घेऊ नये काय?” (ईयोब 2:10), आणि लेखक या सैतानी गळव्यांना “परमेश्वराने आणलेली विपत्ती’’ असे म्हणतो (ईयोब 42:11). तर, सैतान खरोखर आहे. सैतान विपत्ती आणतो. पण सैतान अंतिम किंवा निर्णायक नाहीं. तो ताब्यात ठेवल्या गेला आहे. देवानें निर्णायकपणें परवानगी दिल्याशिवाय तो पुढे जात नाहीं.

धडा: 2.  जरी सैतानाने 2004 च्या नाताळाच्या दुसर्‍या दिवशी हिंद महासागरात त्सुनामी आणली, तेव्हां सैतान हा 200,000 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचे निर्णायक कारण नव्हता, तर देव होता.

ईयोब 38:8 आणि 11 मध्यें देव जेव्हां ईयोबाला अलंकारिकपणें विचारतो, “समुद्र उफळून गर्भााशयातून पडावा असा बाहेर पडला तेव्हां त्यास कवाडे लावून तो कोणी अडविला?… आणि म्हणाला, तू येथवरच ये; यापलीकडें तू येतां कामा नये; येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत”, तेव्हां तो सुनामीवर आपल्या अधिकाराचा दावा करतो. स्तोत्र 89:8-9 म्हणते, “हे सेनाधीश देवा, परमेश्वरा… समुद्राच्या खळबटावर तू अधिकार चालवितो; तो उचंबळतो तेव्हां त्याच्या लाटा तू शांत करितोस.’’ आणि आज येशू तेच नियंत्रण ठेवितो. एकदा त्यानें जीव घेणार्‍या लाटांना शांत केलें, ‘‘तेव्हां त्यानें उठून वार्‍याच्या व पाण्याच्या कल्होळास धमकाविले आणि ती बंद होऊन निवांत झालें (लूक 8:24). दुसर्‍या शब्दांत, सैतानाने जरी समुद्रात भूकंप घडवून आणला, तरी देव त्या लाटा थांबवू शकला असता. पण त्यानें तसे केलें नाहीं.

धडा: 3. या जगातील विध्वंसक विपत्ती ह्या न्याय आणि दयेला एकत्र करतात.

देवाचे हेतु साधे नाहींत. ईयोब देवभिरू मनुष्य होता आणि त्याचे दुःख देवानें दिलेंला दंड नव्हते (ईयोब 1:1, 8). त्यांची रचना शुद्ध करणारी होती, दंडात्मक नव्हती (ईयोब 42:6). याकोब 5:11 मध्यें वचन म्हणते, ‘‘तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयीं ऐकलें आहे, आणि त्याच्याविषयींचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हें तुम्हांस दिसून आलें.’’

परंतु ईयोबाच्या मरण पावलेल्या मुलांची आध्यात्मिक स्थिती आपल्याला माहीत नाहीं. ईयोबाला त्यांच्याबद्दल नक्कीच कळकळ होती (ईयोब 1:5). देवानें न्यायामुळें त्यांचा जीव घेतला असावा. आपल्याला याविषयी माहीत नाहीं.

जर ते खरे असेल, तर तीच विपत्ती शेवटी ईयोबासाठीं दया आणि त्याच्या मुलांवर न्याय म्हणून सिद्ध झाली. हा दुहेरी हेतू सर्व विपत्ती संबंधी खरा आहे. ते न्याय आणि दया यांना एकत्र करतात. ते शिक्षा आणि शुद्धीकरण दोन्ही आहेत. दुःख आणि मृत्यूसुद्धा एकाच वेळी न्याय आणि दया दोन्ही असू शकतात.

याचे सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणजें येशूचा मृत्यू. तो न्याय आणि दया दोन्ही होता. तो येशूवर न्याय होता कारण त्यानें आमची पापे स्वतःवर घेतली होती (ती पापे त्याची स्वतःची नव्हती), आणि ज्या आम्हीं त्याच्यावर विश्वास ठेवला कीं तो आमच्या पापांची शिक्षा सहन करेल त्या आम्हाकरिता देवानें केलेंली ती दया होती (गलती 3:13; 1 पेत्र 2:24) आणि आपण त्याच्याद्वारे देवाचे नीतिमत्व असे व्हावे (2 करिंथ 5:21).

दुसरे उदाहरण म्हणजें आदाम आणि हव्वा यांच्या पतनामुळें या पृथ्वीवर आलेला शाप आणि दुःख. जे ख्रिस्तावर कधीच विश्वास ठेवीत नाहींत ते या शापाला व दुःखाला न्याय म्हणून अनुभवतात, परंतु विश्वासणारे त्याला दयाळूपणा म्हणतात, मग ते पीडा देणारे असले तरी त्याला ते गौरवाची तयारी असे अनुभवतात. ‘‘कारण सृष्टि व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यांत आली ती आपखुशीनें नव्हे, तर ती स्वाधीन करणार्‍यामुळें’’ (रोम 8:20). ही देवाची अधीनता आहे. त्यामुळेंच सुनामी आली. पण निरर्थकतेची ही अधीनता “आशेमध्यें” आहे.

धडा: 4. दुःखातून जात असलेल्या इतर लोकांचा विश्वास कसाही असला तरी, ख्रिस्त आपल्या लोकांना जे हृदय देतो त्या हृदयात दुःख सहन करणार्‍या त्या लोकांबद्दल सहानुभूती असते.

जेव्हां बायबल म्हणते, ‘‘शोक करणार्‍यांबरोबर शोक करा’’ (रोम 12:15), तेव्हां त्या वचनात असे शब्द जोडल्या गेलें नाहीं, ‘‘जर देव त्यांच्या रडण्याचे कारण नाहीं तर’’. ईयोबाचे सांत्वनकर्ते खूप जास्त बोलण्यापेक्षा ईयोबाबरोबर रडले असते तर ते बरे झालें असते. ईयोबाचे दुःख शेवटी देवाकडूनच होते हे जेव्हां आपल्याला कळते तेव्हां ते बदलत नाहीं. नाहीं, जे त्रास सहन करीत आहेत त्यांच्यासोबत रडणें योग्य आहे. वेदना ही वेदना असते, मग ती कोणाचीही असो. आपण सर्व पापी आहोत. सहानुभूती वेदनांच्या कारणातून नाहीं तर वेदनांच्या सहवासातून वाहते. आणि आम्हीं सर्व यात एकत्र आहोत.

धडा: 5. शेवटी, जे दुःख भोगत आहेत ते जरी पात्र नसले तरी देखील ख्रिस्त आपल्याला त्यांच्यावर दया दाखवण्यासाठीं पाचारण करतो.

हाच दयेचा अर्थ आहे – पात्र नसताना केलेलें सहाय्य. ‘‘वैर्‍यांवर प्रीति करा; जे तुमचा द्वेष करितात त्यांचें बरें करा’’ (लूक 6:27). ख्रिस्तहि आपल्यासोबत असेच वागला (रोमकरांस 5:10), जेव्हां आपण त्याचे वैरी होतो तेव्हां त्यानें आपल्यासाठीं स्वतःचा प्राण दिला. त्याच सामर्थ्याने, आणि त्याचाच आदर्श घेऊन, आपणहि तेच करावे.

25 December : नाताळाच्या तीन भेटवस्तूं

Alethia4India
Alethia4India
25 December : नाताळाच्या तीन भेटवस्तूं
Loading
/

मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला….. अहो माझ्या मुलांनो, तुम्हीं पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केलें, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. (1 योहान 3:7-8; 2:1-2)

माझ्यासोबत या लक्षवेधक परिस्थितीचा विचार करा. जर देवाचा पुत्र यासाठी प्रकट झाला कीं तुम्हीं पाप करून नये म्हणून तुमचे सहाय्य करावें  – सैतानाची कामे नष्ट करावयास आला – आणि तो मरावयास देखील आला यासाठीं कीं, जेव्हां तुम्हीं पाप करता, तेव्हां प्रायश्चित व्हावें, देवाचा क्रोध दूर करावा, तर मग तुमचे जीवन कसें असावे याविषयी हे काय सुचविते?

तीन गोष्टी. आणि त्यां आम्हीं कह्यात घेणें सुन्दर गोष्ट आहे. नाताळाच्या भेटवस्तू म्हणून मी त्यां तुम्हाला थोडक्यात देत आहे.

भेटवस्तूं  #1. जीवन जगण्याचा स्पष्ट हेतू

यानें हे सूचित होते कीं तुमच्याकडें जीवन जगण्याचा स्पष्ट हेतू आहे. नकारात्मकरित्या पाहता, हे फक्त असे आहे: पाप करू नका – ज्याने देवाचा अनादर होतो ते करू नका. “तुम्हीं पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो” (1 योहान 2:1).  “कारण सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला” (1 यूहन्ना 3:8). 

जर तुम्हीं विचारले, “तुम्हीं आम्हास ह्या भेटवस्तू नकारात्मकरित्या देण्याऐवजी, सकारात्मकरित्या देऊ शकता का.” उत्तर आहे: होय, त्याचा सारांश 1 योहान 3:23 मध्यें आहे. योहानाच्या संपूर्ण पत्र का लिहिण्यांत आलें याचा हा मोठा सारांश आहे. एकमेव “आज्ञेकडें” लक्ष द्या – “त्याची आज्ञा ही आहे कीं, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा; आणि त्यानें आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणें आपण एकमेकांवर प्रीती करावी.” या दोन गोष्टी परस्पर अगदी घनिष्ठपणें संबंधित आहेत कारण योहान त्यांस एक आज्ञा म्हणतो : येशूवर विश्वास ठेवा आणि इतरांवर प्रीति करा. हाच तुमचा हेतू आहे. हा ख्रिस्ती जीवनाचा सारांश आहे. येशूवर विश्वास ठेवणें, ज्याप्रकारे येशूनें प्रीति केली आणि त्याच्या शिष्यांनी आम्हास जशी प्रीति करावयास शिकविले तशी प्रीति करणें. येशूवर विश्वास ठेवा, लोकांवर प्रीति करा. ही पहिली भेटवस्तू आहे: जीवन जगण्याचा हेतू.

भेटवस्तूं #2. ही आशा कीं आमच्या अपराधांची क्षमा केली जाईल

या दुहेरी सत्याचा दुसरा अर्थ हा आहे कीं ख्रिस्त पाप करण्याचा आमच्या वृत्तीचा नाश करावयास व आमच्या पापांची क्षमा करावयास आला: आम्हीं आमच्या पापावर विजय मिळविण्यात प्रगती करतो जेव्हां आम्हास ही आशा असते कीं आमच्या चुकांची क्षमा प्राप्त होईल. पापाशी लढत असतांना जर तुम्हांला आशा नसेल कीं देव तुमच्या चुकांची क्षमा करील, तर तुम्हीं निराश होता.

तुमच्यापैकीं अनेक जण नवीन वर्षात काही बदल करण्याविषयी संकल्प करीत असतील, कारण तुम्हांला पापाची सवय लागली आहे आणि तुम्हीं त्यातून बाहेर पडू इच्छिता. तुम्हांला खाण्याच्या काही नवीन सवयी हव्या आहेत. मनोरंजनाच्या नवीन सवयी. देण्याच्या नवीन सवयी. तुमच्या जोडीदाराशी संबंध साधण्याच्या नवीन सवयी. कौटुंबिक भक्तीच्या नवीन सवयी. झोप आणि व्यायामाच्या नवीन सवयी. साक्ष देण्याच्या नवीन सवयी. धाडसाच्या नवीन सवयी. पण तुम्हीं आता संघर्ष करीत आहात, हा विचार करीत आहा कीं त्याचा काही उपयोग होईल का. बरे तर, येथे तुमचे दुसरे नाताळा बक्षीस आहे: ख्रिस्त केवळ सैतानाच्या कामांचा –  नाश करण्यासाठीं आला नाहीं – आमच्या लढ्यात अपयशाच्या अनुभवामुळें तो आमच्यासाठीं कैवारी किंवा वकील म्हणून आला आहे. 

म्हणून मी तुम्हास विनंती करतो, हे तथ्य कीं अपयश हा शेवट नाहीं, याने तुम्हास लढण्याची आशा प्राप्त व्हावी. पण सावध असां! जर तुम्हीं देवाच्या कृपेला पाप करण्याचा परवाना बनविता आणि म्हणतां, “जर मी अपयशी ठरत असेल, आणि त्यानें काहींच फरक पडत नाहीं, तर मग पापाशी लढण्याचा त्रास का घ्यावा? – जर तुम्हीं तसे म्हणत असाल, आणि तो तुमचा हेतू असेल, आणि त्यानुसार कार्य करीत असाल, तर कदाचित तुमचा नवा जन्म झालेंला नाहीं आणि तुम्हीं थरथरायला पाहिजे.

परंतु तुमच्यापैकीं बरेच जण असें नाहींत. तुमच्यामध्यें बरेच आहेत जे आपल्या जीवनातील पापमय सवयींशी लढू इच्छितात. आणि देव तुम्हास जे म्हणत आहे ते हे आहे : ख्रिस्त तुमची पापें झाकतो या गोष्टीने तुम्हास लढण्याची आशा दिली पाहिजे. “तुम्हीं पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केलें, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे.”

भेटवस्तूं #3. ख्रिस्त आमचे सहाय्य करील

शेवटी, या दुहेरी सत्याचा तिसरा अर्थ कीं ख्रिस्त आमच्या पाप करण्याच्या वृत्तीचा नाश करावयास आणि आमच्या पापांची क्षमा करावयास आला, हा आहे: ख्रिस्त खरोखर पापाशी आमच्या लढ्यात आमचे सहाय्य करील. तो खरोखर सहाय्य करील. तो तुमच्या पक्षास आहे. पाप करण्यांत खूप मज्जा आहे म्हणून तो पापाचा नाश करावयास आला नाहीं. तो पापाचा नाश करावयास आला कारण पाप प्राणघातक आहे. ते सैतानाचे फसवे कार्य आहे, आणि जर आम्हीं त्यास लढा दिला नाहीं तर ते आमचा नाश करील. तो आम्हास दु:ख देण्यासाठी नाहीं, तर आम्हास सहाय्य करावयास आला.

तर आता, तुमच्यासाठीं नाताळाची तीसरी भेटवस्तू ही आहे: पापावर विजय मिळविण्यासाठी ख्रिस्त तुमचे सहाय्य करील. 1 योहान 4:4 म्हणते, “जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे.” येशू जिवंत आहे, येशू सर्वसमर्थ आहे, येशू विश्वासाद्वारे तुमच्याठायीं राहतो. नवीन वर्षात तो पापासोबत तुमच्या लढ्यात तुमची मदत करील. त्याच्यावर आपला भाव ठेवा.

24 December : नाताळाचे दोन हेतू

Alethia4India
Alethia4India
24 December : नाताळाचे दोन हेतू
Loading
/

मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला. (1योहान 3:7-8)

1 योहान 3:8 जेव्हां म्हणते, “सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला.” तेव्हां त्याच्या मनात “सैतानाची कोणती कृत्ये” आहेत? संदर्भावरून उत्तर स्पष्ट आहे.

प्रथम, 1 योहान 3:5 हे स्पष्टपणें समानार्थी आहे: “तुम्हांला माहीत आहे कीं, आपली पापे हरण करण्यासाठीं तो प्रकट झाला; त्याच्या ठायीं पाप नाहीं.”  तो “प्रकट झाला” आला हा वाक्यप्रयोग वचन 5 आणि 8 मध्यें येतो. म्हणून जास्त शक्यता कीं “सैतानाची कामे ज्यांचा येशू नाश करावयास आला, ती पापे आहेत.” वचन 8 चा पहिला भाग यात अतिशय खात्रीलायक करतो: “पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे.”

या संदर्भात समस्या पाप करणें आहे, आजार नाहीं किंवा अपघातग्रस्त कार अथवा कार्यक्रमात गडबड नाहीं. आम्हास पाप करणें सोडता यावे म्हणून येशू जगात आला.

आपण हे सत्य जर 1 योहान 2:1 च्या सत्यासोबत मांडले तर आपणास ते आणखी स्पष्टपणें पाहता येईल, “अहो माझ्या मुलांनो, तुम्हीं पाप करू नये म्हणून हें मी तुम्हांला लिहितो.” नाताळाच्या थोर हेतूंपैकीं एक हेतू हा आहे – देहधारणाच्या मोठ्या हेतूंपैकीं एक (1 योहान 3:8).

पण आणखी एक हेतू आहे ज्याची योहान 1 योहान 2:1-2 मध्यें भर टाकतो, “जर कोणी पाप केलें, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.”

पण आता पाहा याचा काय अर्थ आहे: येशू दोन कारणांसाठीं जगात प्रगट झाला. तो यासाठीं आला कीं आपण पाप करीत राहू नये – म्हणजें, तो सैतानाची कृत्यें नाश करावयास आला (1 योहान 3:8); आणि तो यासाठीं आला कीं जर आम्हीं पाप केलें तर आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावें. जो ऐवजदार अर्थात प्रतिस्थापक बलिदान होण्यासाठीं आला जो आमच्या पापांसाठीं देवाचा क्रोध वाहून नेतो.

या दुसऱ्या हेतूचे अंतिम फळ पहिला हेतू नष्ट करणें नाहीं. पापांची क्षमा म्हणजें पापाची परवानगी देण्याच्या हेतूने नाहीं. आमच्या पापांसाठीं ख्रिस्ताच्या मृत्यूचा हेतू हा नाहीं कीं आम्हीं पापाविरुद्धच्या लढ्यापासून विसावा घ्यावा, उलट, नाताळाच्या या दोन हेतूंचा अंतिम परिणाम हा आहे कीं आमच्या सर्व पापांसाठीं एकदाच भरलेली खंडणी ते स्वातंत्र्य आणि सामर्थ्य आहे जे आम्हांला पापाशी लढण्याचे सामर्थ्य देते, कट्टरवादी म्हणून नव्हे, आपलें तारण विकत घेणारे आणि आपण तारण गमावून बसू अशी भीती बाळगणारे म्हणून नव्हे, तर धैर्याने आणि आनंदाने पापाविरुद्धच्या लढ्यात स्वतःला झोकून देतात, जरी त्यासाठीं आम्हांला स्वतःचा प्राण गमवावा लागला तरी.

23 December : देवाचे अवर्णनीय बक्षीस

Alethia4India
Alethia4India
23 December : देवाचे अवर्णनीय बक्षीस
Loading
/

कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत; इतकेच केवळ नाहीं, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो. (रोमकरांस 5:10-11)

आपण व्यवहारिकरित्या देवाबरोबर समेट प्राप्त करून देवाच्याठायीं कसा अभिमान बाळगतो? आम्हीं तो अभिमान येशू ख्रिस्ताद्वारे बाळगतो. ज्याचा अर्थ कमीत कमी, हा आहे कीं आम्हीं बायबलमधील येशूचे प्रतिरूप – म्हणजें, येशूचे कार्य आणि शब्द ज्यांचे नव्या करारात वर्णन करण्यात आले आहे – आम्हीं त्या प्रतिमेस देवाच्याठायीं आमच्या अभिमानाचा, जयजयकाराचा तात्विक विषयवस्तू बनवतो. ख्रिस्ताला आमचा विषय मानिल्यावाचून देवाच्याठायीं अभिमान बाळगल्याने ख्रिस्ताचा गौरव होत नाहीं. आणि जेथे ख्रिस्ताचा मान नाहीं, तेथे देवाचा मान नाहीं.  

2 करिंथ 4:4-6 मध्यें, पौल तारणाचे दोन प्रकारे वर्णन करतो. वचन 4 मध्यें, तो म्हणतो कीं ते “देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश” पाहणें होय. आणि 6 व्या वचनात तो म्हणतो कीं ते “येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश” पहाणें होय.

देवाच्याठायीं अभिमान बाळगण्यासाठीं आम्हीं येशूच्या प्रतिमेत जे काही पाहतो आणि त्याद्वारे देवाविषयी जें कांहीं जाणतो, त्यात आम्हीं अभिमान बाळगतो. आणि जेव्हां देवाची प्रीति पवित्र आत्म्याद्वारे आमच्या अंतःकरणात ओतली जाते तेव्हां रोमकरांस 5:5 मध्यें म्हटलें आहे त्याप्रमाणे हे त्याच्या पूर्ण अनुभवांत प्रगट होते. आणि वचन 6 च्या ऐतिहासिक वास्तविकतेवर जेव्हां आम्हीं मनन करतो, तेव्हां मधूर, देवाच्या प्रीतिचा आत्म्याने दिलेंला अनुभव मध्यस्थीद्वारे आम्हांला दिला जातो, ”आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठीं मरण पावला.”

तर मग, येथे नाताळाचा मुद्दा आहे. देवानें प्रभु येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे फक्त आमचा समेटच विकत घेतला नाहीं (रोमकरांस 5:10), आणि त्यानें फक्त आम्हांला प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तो समेट स्वीकार करावयास सक्षम केलें नाहीं, तर आता सुद्धा आम्हीं आत्म्याने, आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे स्वतः देवामध्यें आनंद करित त्याच्याठायी अभिमान बाळगतो (रोमकरांस 5:11).

येशूनें आमचा समेट विकत घेतला. येशूनें आम्हांला समेट स्वीकारावयास आणि बक्षीस उघडण्यास सक्षम केलें. आणि येशू स्वतः अवर्णनीय बक्षीस किंवा भेट म्हणून स्वतः प्रकाशमान होतो – देहधारी परमेश्वर – आणि देवाच्याठायीं आमचा सर्व अभिमान व आनंद यांस प्रेरित करतो.

या नाताळाच्या समयी येशूकडें पाहा. त्यानें विकत घेतलेला समेट स्वीकार करा. बक्षीस न उघडता शेल्फवर ठेवू नका. आणि जेव्हां तुम्हीं ते उघडाल तेव्हां लक्षात ठेवा कीं देव स्वतः देवाबरोबर समेटाचे बक्षीस आहे.

त्याच्याठायीं अभिमान बाळगून उल्हास करा. त्याला तुमचा आनंद म्हणून अनुभव करा. त्याला तुमची संपत्ती म्हणून जाणून घ्यां.

22 December : तुम्हीं विश्वास ठेवावा म्हणून

Alethia4India
Alethia4India
22 December : तुम्हीं विश्वास ठेवावा म्हणून
Loading
/

ह्या पुस्तकात लिहिली नाहींत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूनेंआपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्हींविश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत.  (योहान 20:30-31)

मला इतक्या प्रकर्षाने असें वाटते कीं आमच्यापैकीं जे लोक मंडळीत लहानाचे मोठे झालेंत आणि आपल्या झोपेतही आपल्या विश्वासाचे मोठमोठे सिद्धांत मुखपाठ म्हणूं शकतात, आणि तरीही जे प्रेषितांचा मतांगिकार म्हणतांना जांभई देतात – कीं आमच्यामध्यें असे कांहीं कार्य घडून आलें पाहिजे ज्यामुळें पुन्हा एकदा आम्हांला देवाच्या ह्या पुत्राचा, जो सनातन काळापासून पित्याचा एकुलता एक पुत्र आहे, देवाचे सर्व तेज प्रतिबिंबित करतो, त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे, ज्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्यात, आणि जो आपल्या सामर्थ्याच्या शब्दानें विश्वाधार आहे, त्याचा आदर, भिती, विस्मय आणि आश्चर्य वाटेल,  

तुम्हीं कोणतीही लिहिलेली प्रत्येक परिकथा वाचू शकता, प्रत्येक रहस्य-रोमांच, भुताच्या गोष्टी वाचू शकता, आणि तुम्हांला देवाच्या पुत्राच्या देह धारणेंच्या गाथेसारखे इतके विस्मयकारक, इतके विचित्र, इतके तऱ्हेवाईक, इतके मंत्रमुग्ध करणारे असे कधीहि काहीहि आढळणार नाहीं.

आम्हीं कसें मेलेलें आहोत! हे देवा! तुझें गौरव आणि तुझी महती याविषयी आम्हीं किती बेपर्वा आणि निष्ठूर आहोत! मला कितीदा तरी पश्चाताप करावा लागला आणि म्हणावे लागले, “देवा, मला दुःख वाटते कीं तुझ्या स्वतःच्या खऱ्यागोष्टीपेक्षा मनुष्यनिर्मित कथा माझ्या भावना उद्वेलित करतात, माझा विस्मय आणि आदर आणि प्रशंसा आणि आनंद प्रेरित यांस करतात.”

कदाचित आमच्या काळातील रोमांचक चित्रपट आमच्यासाठीं कमीत कमी हे चांगले करू शकतात : ते आम्हांस नम्र बनवू शकतात आणि आमच्यात पश्चातापभावना निर्माण करू शकतात, आम्हांस हे दाखवून कीं आम्हीं खरोखर काही विस्मय आणि भिती आणि आश्चर्य प्रगट करण्यास सक्षम आहोत जे आम्हांला अगदी क्वचितच अनुभवास येते जेव्हां आम्हीं सनातन देवावर आणि ख्रिस्ताच्या स्वर्गीय गौरवावर आणि त्यांच्यामधील आणि आमच्यामधील नासरेथच्या येशूसोबत खऱ्या जीवन संपर्कावर मनन करतो.

जेव्हां येशूनें म्हटलें, “मी ह्यासाठीं जगात आलो आहे” (योहान 18:37), तेव्हां त्यानें असे काही म्हटलें जे तुम्हीं कधी वाचलेल्या कोणत्याही काल्पनिक विज्ञान कथेतील विधानासारखे खुळचट आणि विचित्र आणि विक्षिप्त आणि भयावह आहे.

ओह, मी कितीतरी प्रार्थना करतो कीं देवाचा आत्मा मजवर आणि तुमच्यावर सामर्थ्यानें उतरून यावा; पवित्र आत्म्याने भयावह पद्धतीने माझ्या अनुभवात प्रगट व्हावे, आणि मला देवाच्या अकल्पनीय वास्तविकतेचे भान येण्यासाठीं जागृत करावे.

या दिवसांत कधीतरी उदयाचलापासून तो अस्ताचलापर्यंत वीज आकाशास व्यापून टाकील, आणि देवाचा पुत्र आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसह प्रकट होईल. आणि आम्हीं त्याला स्पष्टपणें पाहू. आणि भितीमुळें असो अथवा उत्साहमुळें, आम्हीं कंपायमान होऊ आणि विचार करू कीं आम्हीं अशा घरगूती, निरूपद्रवी ख्रिस्तासोबत इतका काळ कसे राहिलो.

या गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत – संपूर्ण बायबल लिहिण्यात आले आहे – कीं आम्हीं विश्वास ठेवावा – कीं आम्हीं या चमत्काराप्रत विस्मित आणि जागृत व्हावे – कीं येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे जो जगात आला.

21 December : पुराणपुरुषाचा जन्म

Alethia4India
Alethia4India
21 December : पुराणपुरुषाचा जन्म
Loading
/

”ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूनेंउत्तर दिलें, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठींजन्मलो आहे व ह्यासाठींजगात आलो आहे कीं, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” (योहान 18:37)

हा शास्त्रभाग जरी येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या सुरूवातीस नसून, तर शेवटास येतो, तरी नाताळासंदर्भांत एक उत्तम शास्त्रभाग.

लक्ष द्या : येशू म्हणतो कीं तो केवळ जन्मास आला नाहीं, तर तो “जगात आला आहे.” त्याच्या जन्माचा अद्वितीयपणा हा आहे कीं त्याचा आरंभ त्याच्या जन्माच्या वेळी झाला नाहीं. गव्हाणीत जन्म घेण्यापूर्वीहि तो होता. नासरेथच्या येशूचे व्यक्तिमत्व, चारित्र्य, व्यक्तित्व नासरेथचा पुरुष येशू जन्मास येण्यापूर्वी अस्तित्वात होते.

या रहस्याचे वर्णन करणारा धर्मशास्त्रीय शब्द उत्पत्ति नाहीं, पण देहधारण आहे. शरीर नव्हे, तर व्यक्ती, पण येशूचे हे तात्त्विकदृष्ट्या व्यक्तिमत्व मनुष्य म्हणून त्याच्या जन्मास येण्यापूर्वी अस्तित्वात होते. त्याचा जन्म कोणी नवा व्यक्ती म्हणून अस्तित्वात येणें नव्हते, तर एक सनातनकाळापासून असलेल्या जुन्या व्यक्तीचे जगात येणें होते.

मीखा 5:2 येशूच्या जन्मास येण्याच्या 700 वर्षे आधी, अशाप्रकारे मांडते :

हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्यें तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठीं इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.

येशूच्या जन्माचे रहस्य केवळ हे नाहीं कीं तो कुमारिकेद्वारे जन्मास आला. या अद्भुताचा हेतू देवानें त्याहिपेक्षा मोठ्या अद्भुताची साक्ष देण्यासाठीं ठरविला होता; म्हणजें, नाताळाच्या वेळी जन्मास येणारे बालक असा व्यक्ती होता ज्याचे अस्तित्व “प्राचीन काळापासून, अनादी काळापासून” होते.

आणि, म्हणून, त्याचा जन्म एका विशिष्ट हेतूनें झाला. त्याचा जन्म होण्यापूर्वी त्यानें जन्मास येण्याचा निर्धार केला. त्याच्या पित्यासह त्याची एक योजना होती. आणि त्या मोठ्या योजनेचा भाग तो पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटकेस बोलला: “मी ह्यासाठीं जन्मलो आहे व ह्यासाठीं जगात आलो आहे कीं, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” (योहान 18:37).

तो सनातन सत्य होता. तो केवळ सत्य बोलला. तो प्रीतिच्या सर्वात मोठ्या सत्यानें वागला. आणि तो त्याच्या सनातन कुटूंबात त्या सर्वांना एकत्र करीत आहे जे सत्याद्वारें जन्मास येतांत. ही योजना अनादीकाळापासून होती.