ArchivesSolid Joys

13 October : चाकरमानीधनी

Alethia4India
Alethia4India
13 October : चाकरमानीधनी
Loading
/

. . . ह्यासाठीं कीं, ख्रिस्त येशूच्या ठायीं त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्‍या युगात त्यानें आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. (इफिस 2:7)

मला ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे बायबलमधील सर्वात अद्भुत मूर्त स्वरूप लूक 12:35-37 मध्यें दिसते, जे लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या धन्याचे ह्याप्रकारे चित्रण करते:

“तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या धन्याची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेंकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठीं त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. धनी परत आल्यावर जे दास त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठीं कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.”

आपल्याला सेवक म्हटलें आहें, यांत शंका नाहीं- आणि याचा अर्थ असा आहे कीं आपण आपल्याला सांगितल्याप्रमाणेंच वागायचे असते. पण या चित्रात असलेलें अद्भुत निरक्षण आगळे-वेगळे आहे. येथें “धनी” सेवा करण्यावर जोर देत आहे. येशू पृथ्वीवर सेवा करित होता त्यां काळांत आपण कदाचित या सेवेची अपेक्षा केलीं असती, कारण त्यानें म्हटलेंहि होते कीं, “मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाहीं, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45). पण लूक 12:35-37 हे त्याच्या दुसऱ्या आगमनाचे चित्र आहे, जेव्हा मनुष्याचा पुत्र 2 थेस्सलनीकाकरांस 1:7-8 मध्यें सांगितल्याप्रमाणें आपल्या पित्याच्या आंधळे करून सोडणाऱ्या “अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट” होईल. आता, त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी येशूला मेज्याजवळ सेवा करणारा सेवक म्हणून का चित्रित केलें गेलें असावें?

कारण आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी हाच त्याच्या गौरवाचा शिखर आहे जी गरजवंतांवर दयेचा सागर बनून विपुलपणें ओतली जाते. म्हणूनच इफिस 2:7 म्हणते कीं, “येणार्‍या युगात त्यानें आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी” हा त्याचा हेतू आहे.

आपल्या देवाचा महाप्रताप काय आहे? ह्या जगांत त्याचे वेगळेपण काय आहे? यशया याचे उत्तर देतो: “हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाहीं, त्याचे नाव आलेले नाहीं, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाहीं” (यशया 64:4). यासारखा दुसरा देव नाहीं. जी प्रजा पूर्णपणें त्याच्यावर अवलंबून आहे व जी त्याच्याठायीं आनंद करते अशा लोकांचे अक्षय इष्ट करण्याऱ्या परोपकारी देवाच्या भूमिकेपासून तो कधी सन्यास घेत नाहीं.

12 October : आपल्या हातून देवाची सेवा होते या मानसिकतेपासून सावध असां

Alethia4India
Alethia4India
12 October : आपल्या हातून देवाची सेवा होते या मानसिकतेपासून सावध असां
Loading
/

ज्या देवानें जग व त्यातले अवघे निर्माण केलें तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाहीं; आणि त्याला काही उणें आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाहीं; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.” (प्रेषितांची कृत्ये 17:24-25)

आपण देवाला त्याच्या गरजां पुरवून त्याचा गौरव करत नाहीं, तर तो आपल्या गरजां पुरवेल अशी प्रार्थना केल्याद्वारे — आणि तो प्रार्थनेचे उत्तर देईल यावर विश्वास ठेविल्याद्वारे, आणि आपण प्रीतिने इतर लोकांच्या सेवेसाठीं आपले जीवन अर्पण करत असताना जो सर्वकाही स्वतः सर्वांना देतो त्या काळजी घेणाऱ्या देवामध्यें असलेल्या आनंदात जीवन जगतो, त्याद्वारे आपण त्याचा गौरव करतो.

येथे आपण ख्रिस्ती पूर्णानंदाच्या सुवार्तेचे मर्म पाहतो. आपण साहाय्यासाठीं त्याच्याकडे धावा करावा जेणेंकरून त्याचा गौरव होईल यावर देवाचा जोर. “आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील” (स्तोत्र 50:15). हे सत्य आपल्याला या आश्चर्यकारक तथ्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते कीं त्याला आपली गरज आहे असा विचार करण्यापासून आपण सावध असले पाहिजे. आपल्या हातून देवाची सेवा होते या मानसिकतेपासून आपण सावध असले पाहिजे, याउलट त्याच्या हातून आपली सेवा व्हावीं अशी सावधगिरी आपणच बाळगली पाहिजे, जेणेंकरून आपल्या हातून त्याच्या गौरवाची चोरी होऊं नये. “त्याला काही उणें आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाहीं ” (प्रेषित 17:25).

हे एकूण खूप विचित्र वाटू शकते, कारण आपल्यांपैंकीं पुष्कळांना वाटते कीं देवाची सेवा करणें ही पूर्णपणें सर्वसमान्य गोष्ट आहे. देवाची सेवा केल्यानें त्याचा अपमान देखील होऊ शकतो यावर आपण कधी विचारच केला नाहीं. पण आपण प्रार्थनेच्या मूळ अर्थावरच जर लक्ष दिलें तर ही गोष्ट स्पष्ट होईल.

रॉबिन्सन क्रूसो शीर्षक असलेल्या कादंबरीमध्यें नायक जेव्हां बेटावर अडकतो तेव्हां तो स्तोत्र 50:12-15 ला आपला आवडता शास्त्रपाठ म्हणून स्मरण करतो आणि त्यावर आशा ठवतो : तेथे देव म्हणतो, “मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाहीं, कारण जग व जगातले सर्वकाही माझे आहे. . . . संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.”

याचा अर्थ असा : देवाची सेवा करण्याचा एक असा दृष्टीकोन आहे जो त्याला कमी लेखून त्याच्याकडे आपल्या सेवेचा गरजू व्यक्ती म्हणून पाहतो. ओह, ख्रिस्तामध्यें आम्हांवर प्रकट झालेंल्या देवाच्या पराक्रमी कृपेला आपण कमी लेखू नये याविषयी आपण किती सावध असले पाहिजे. येशूनें म्हटलें , “कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाहीं, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45). तो सेवक होण्यासाठीं आला. देणारा म्हणून आपला गौरव करून घ्यावा हे त्याचे ध्येय होते.

11 October : आम्हांला कांहीं करता येत नाहीं

Alethia4India
Alethia4India
11 October : आम्हांला कांहीं करता येत नाहीं
Loading
/

“मीच वेल आहें, तुम्हीं फाटे आहां; जो माझ्यामध्यें राहतो आणि मी ज्याच्यामध्यें राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला कांहीं करितां येत नाहीं.” (योहान 15:5)

कल्पना करा कीं तुम्हीं अर्धांगवायूमुळें पूर्णपणें अंथरूणाला खिळले गेलें आहां आणि फक्त बोलण्यावांचून तुम्हीं स्वतःहून इतर कांहीच करू शकत नाहीं. आणि समजा तुमच्या एका सशक्त आणि विश्वासपात्र मित्रानें तुमच्यासोबत राहून तुम्हाला जे कांहीं करायचे आहे ते सर्व तुमच्यासाठीं करण्याचे वचन दिलें आहे. आता, जर एखादा अनोळखी गृहस्थ तुम्हाला भेटायला आला तर तुम्हीं तुमच्या या मित्राची प्रशंसा-सुमने कशी कराल?

तुम्हीं अंथरुणातून उठून त्याला त्या व्यक्तीच्या समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करून त्याचे औदार्य आणि बळ यांची प्रशंसा-सुमने कराल का? नाहीं! उलट तुम्हीं असे म्हणाल, “मित्रा, तू मला हाथ लावून जरा वर उचलशील, आणि मी माझ्या पाहुण्याकडे पाहू शकेन म्हणून माझ्या मागे उशी ठेवशील का? आणि कृपा करून माझ्या डोळ्यांवर माझा चष्मा सुद्धा लावशील का?

आणि त्यामुळें तुम्हांला भेटायला आलेला गृहस्थ तुमच्या विनंतीवरून जाणेल कीं तुम्हीं असहाय्य आहां आणि तुमचा मित्र सशक्त आणि कनवाळू आहें. तुम्हीं तुमच्या मित्राला गरजेच्या वेळीं हाक मारतां, त्याच्याकडे मदतीसाठीं विनवणी करतां व स्वतःला त्याच्यावर अवलंबून असलेलें दाखवता तेव्हां तुम्हीं त्याची प्रशंसा-सुमने करतां किबहुंना त्याचा गौरवच करतां.

योहान 15:5 मध्यें, येशू म्हणतो, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला कांहीं करितां येत नाहीं.” त्यामुळें आपण खरोखरच अर्धांगवायूच्या व्याधीने ग्रस्त झालो आहोत. ख्रिस्तापासून वेगळे असल्यास आम्हीं ख्रिस्ताचा गौरव होईल असे चांगले ते करण्यास खरोखर सक्षम नाहीं. रोमकरांस 7:18 मध्यें पौल म्हणतो, “माझ्या ठायीं म्हणजें माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाहीं.”

पण योहान 15:5 असेहि म्हणते कीं, ख्रिस्ताचा गौरव होईल असे पुष्कळ जे चांगले ते आपण करावें अशी देवाची आपल्यासंबंधाने इच्छा आहे, म्हणजें हे कीं आपण पुष्कळ फळ द्यावे: “जो माझ्यामध्यें राहतो आणि मी ज्याच्यामध्यें राहतो तो पुष्कळ फळ देतो.” यास्तव आपला शक्तिशाली आणि विश्वासू मित्र या नात्यानें- “मी तुम्हांला मित्र म्हटलें आहें ” (योहान 15:15) – तो आपल्यासाठीं आणि आपल्याद्वारे ते सर्व करण्याचे अभिचचन देतो जे आपण स्वतःहून करूं शकत नाहीं.

मग आपण त्याचा गौरव कसा करतो? योहान 15:7 मध्यें येशू उत्तर देतो : “तुम्हीं माझ्यामध्यें राहिलात व माझी वचनें तुमच्यामध्यें राहिली तर जे कांहीं तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजें ते तुम्हांला प्राप्त होईल.” आम्हीं प्रार्थना करतो! आम्हीं स्वतःहून जे करूं शकत नाहीं -फळ देणें- ते देवानें ख्रिस्ताद्वारे आपल्याठायीं करावे अशी आपण त्याजकडे विनंती करतो.

योहान 15:8 याचे पर्यवसान आहे : “तुम्हीं विपुल फळ दिल्यानें माझ्या पित्याचा गौरव होतो.” आता, प्रार्थनेद्वारे देवाचा गौरव कसा होतो? प्रार्थना ही उघड-उघड कबुली आहे कीं ख्रिस्तापासून वेगळे असल्यास आम्हांला कांहीं करितां येत नाहीं. आणि प्रार्थना म्हणजें असा विश्वास ठेऊन स्वतःकडून देवाकडे वळणें कीं तो गरजेच्या वेळी आपले सहाय्य करील

10 October : उत्तम शास्त्रपाठ

Alethia4India
Alethia4India
10 October : उत्तम शास्त्रपाठ
Loading
/

त्याच्या (येशूच्या) रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवानें त्याला पुढे ठेवले. ह्यासाठीं कीं, पूर्वी झालेंल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळें त्यानें आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजें आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे कीं, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे. (रोमकरांस 3:25-26)

आपण रोमकरांस 3:25-26 ला बायबलमधील सर्वात महत्त्वाची वचनें म्हणूं शकतो.

देव पूर्णपणें नीतिमान आहे! आणि तो अनीतिमानांना नीतिमान ठरवतो! खरंच? म्हणजें असा न्यायमूर्ती जो दोषींची निर्दोष मुक्तता करतो!

एकतर हे/किंवा ते असे नाहीं! तर दोन्ही! तो दोषींची निर्दोष मुक्तता करतो, परंतु असे करताना तो स्वतः मात्र दोषी ठरत नाहीं. ही आहे जगातील सर्वात मोठी बातमी!

  • “ज्याला [येशूला] पाप ठाऊक नव्हते त्याला त्यानें [देवानें] तुमच्या-आमच्याकरता पाप असे केलें; ह्यासाठीं कीं, आपण त्याच्या ठायीं देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे” (2 करिंथ 5:21). तो आमचे पाप स्वतःवर घेतो. आम्हीं त्याचे नीतिमान घेतो.
  • “देवानें आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्यें पापाला दंडाज्ञा ठरवली” (रोमकरांस 8:3). कोणाचा देह? ख्रिस्ताचा. त्या देहामध्यें कोणाच्या पापाला दंडाज्ञा ठरवली? आमच्या पापाला. मग आमच्यासाठीं काय? आता दंडाज्ञा नाहींच!
  • “[ख्रिस्ताने] त्यानें स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली.” (1 पेत्र 2:24)
  • “कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजें नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला.” (1 पेत्र 3:18)
  • “कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ.” (रोमकरांस 6:5)

आम्हांवर आमच्या सृष्टीकर्त्याची दंडाज्ञा आहे आणि त्याच्या गौरवाचे मूल्य जपण्यासाठीं त्यानें आमच्या पापावर सार्वकालिक क्रोध ओतून आपला नाश करावा म्हणून तो स्वतःच्या नीतिमान चारित्र्यामुळें बाध्य आहे हे जर जगातील सर्वात अरिष्टकारक वर्तमान असेल . . .

. . . तर जगांत सर्वांत अद्भुत वर्तमान (शुभवर्तमान!) हे कीं देवानें तारणाच्या एका अशा मार्गाचे प्रयोजन केलें आहे आणि तो अंमलात आणला आहे जो त्याच्या सर्व निवडलेल्यांचे सार्वकालिक तारण तर साध्य करतोच पण त्याचबरोबर त्याच्या गौरवाचे मूल्य जपून, त्याच्या पुत्राची प्रतिष्ठा देखील राखतो. येशू ख्रिस्त पापी लोकांना तारावयांस ह्या जगात आला.

9 October : देवाचे कृपा-प्रदर्शक शहाणपण

Alethia4India
Alethia4India
9 October : देवाचे कृपा-प्रदर्शक शहाणपण
Loading
/

आम्हीं तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेंल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाहीं ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे शहाणपण आहे. (1 करिंथ 1:23-24)

आम्हांवर आमच्या सृष्टीकर्त्याची दंडाज्ञा आहे आणि त्याच्या गौरवाचे मूल्य जपण्यासाठीं त्यानें आमच्या पापावर सार्वकालिक क्रोध ओतून आपला नाश करावा म्हणून तो स्वतःच्या नीतिमान चारित्र्यामुळें बाध्य आहे या अरिष्टकारक वर्तमानाला घातक असे सुवार्तेचे एक अद्भुत वर्तमान आहे.

हे असे सत्य आहे जे कोणीहि निसर्गाकडून शिकू शकत नाहीं. सुवार्तेचे हे सत्य शेजाऱ्यांना कळवणें आवश्यक आहे आणि मंडळीमध्यें त्याची घोषणा केलीं गेली पाहिजे आणि सुवार्तीक हेच सत्य घेऊन जगांत गेलें पाहिजे.

उत्तम बातमी अशी कीं आपण संपूर्ण मानवजातीला दंडाज्ञा देऊ नये पण तरीही आपल्या न्यायीपणाच्या सर्व अटी पूर्ण व्हाव्यांत अशी व्यवस्था देवानें स्वतः केलीं आहे.

पापी लोकांचा हिशेब चुकता करण्याचा आणि आपले न्यायीपण कायमस्वरूपी जपण्याचा एक मार्ग म्हणजें नरक. पण आणखी एक मार्ग आहे. आणि देवानें त्या दुसऱ्या मार्गाचे प्रयोजन केलें. हेच ते शुभवृत्त.

देवाचे शहाणपण हे कीं देवानें देवाच्या न्यायाशी तडजोड न करता आम्हीं देवाच्या क्रोधापासून सोडविले जावे असा प्रीतिचा मार्ग देवानें स्वतः नियोजित केला आहे. हा तो मार्ग : शुभवर्तमान. मी ते पुन्हा सावकाशपणें सांगतो : देवाचा सुज्ञपणा हा कीं देवानें देवाच्या न्यायाशी तडजोड न करता आम्हीं देवाच्या क्रोधापासून सोडविले जावे असा प्रीतिचा मार्ग देवानें स्वतः नियोजित केला आहे.

आणि हे शहाणपण काय आहे? पापी लोकांसाठीं देवाच्या पुत्राचे मरणें! “आम्हीं तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. . . देवाचे सामर्थ्य व देवाचे शहाणपण” (1 करिंथ 1:23-24).

ख्रिस्ताचे मरण हे देवाचे शहाणपण आहे ज्याद्वारे देवाची प्रीति पापी लोकांना देवाच्या क्रोधापासून वाचवते, आणि त्याचवेळी ख्रिस्तामध्यें देवाचे नीतिमत्वहि टिकवून ठेवते आणि उघडपणें प्रदर्शित करते.

8 October : आमचे हित करण्यांत देवाचा आनंद

Alethia4India
Alethia4India
8 October : आमचे हित करण्यांत देवाचा आनंद
Loading
/

आणि मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा कीं मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाहीं; मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजें ते माझ्यापासून माघार घेणार नाहींत. मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.” (यिर्मया 32:40-41)

आपल्याकडून देवाचे गुणगान व्हावें हा त्याचा शोध आणि त्याच्यामध्यें आपल्या सर्व आनंदाचा शोध, हे दोन्हीं उद्यमांचा शेवट एकच आहेत. त्याचा गौरव व्हावा म्हणून देवाची मोहीम आणि आपण केवळ त्याच्यामध्यें संतुष्ट राहावे ही आमची मोहीम ह्या दोन्हीं गोष्टींचा कळस यांत आहे : देवामध्यें आमचा आनंद, जो स्तुतीने भरून वाहतो.

देवाच्या बाजूने, स्तुती ही त्याच्या लोकांच्या अंतःकरणात त्याच्या स्वतःच्या वैभवाची गोड प्रतिध्वनी आहे.

आमच्या बाजूने, स्तुती ही त्या संतुष्टीचा शिखर आहे जी देवाच्या सहवासात राहण्याने प्राप्त होते.

या शोधाचा मती गुंग करणारा निहीतार्थ हा आहे कीं देवाची ती सर्वसमर्थ शक्ती जी देवाच्या अंत:करणाला त्याचा स्वतःच्या गौरवाचा शोध घेण्यांस चालना देते तीच सर्वसमर्थ शक्ती जे त्याच्यामध्यें आपला आनंद शोधतात त्यांच्या अंतःकरणाला आपण संतुष्ट करावे म्हणून देखील त्याला चालना देते.

बायबलचे शुभवर्तमान हेच कीं देव त्याच्यावर आशा ठेवणाऱ्यांची अंतःकरणें संतुष्ट करण्यापासून कदापि माघार घेत नाहीं. अगदी उलट आहे : जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त आनंद देऊ शकते देव त्यांच गोष्टीमध्यें त्याच्या पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण जिवाने आनंद करतो. “मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन” (यिर्मया 32:41) हे शब्द अद्भुत आहेत.

देव आपल्या पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण जिवाने सार्वकालिक आनंदाच्या शोधाच्या आमच्या ह्या मोहीमेत सामील होतो कारण त्याच्यामध्यें असलेल्या त्या आनंदाचा सर्वोच्च शिखर त्याच्या अपरिमित महानतेचा गौरव आहे.

7 October : आम्हीं आशा धरून राहतो, तो कार्य करतो

Alethia4India
Alethia4India
7 October : आम्हीं आशा धरून राहतो, तो कार्य करतो
Loading
/

हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाहीं, त्याचे नाव आलेले नाहीं, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाहीं. (यशया 64:4)

माझ्यासाठीं काम करून देवाला त्याचे देवपण प्रदर्शित करणें आवडते हे सत्य, आणि हे कीं माझ्यासाठीं तो जे करतो ते सर्व मी त्याच्यासाठीं केलेंल्या कोणत्याही कामाअगोदर आहे, कीं बहुंना त्याच्याद्वारे साध्य केलेलीं कृति आहे, मला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक आनंद देणारं आहे.

तो आपल्यासाठीं काम करतो असे म्हणणें प्रथमदर्शनी स्वतःविषयी अभिमान बाळगण्यासारखे आणि देवाला कमी लेखण्यासारखे दिसू शकते. पण असे वाटण्याचे कारण म्हणजें मी एक नियोक्ता आहे आणि देवाला नोकरीची गरज आहे हा चुकीचा संभ्रम. देव हा आपल्यासाठीं काम करतो असें बायबल म्हणते तेव्हा त्याचा तो अर्थ होत नाहीं. देव त्याची “आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम” करतो असे यशया म्हणतो तेव्हा त्याच्या मनात असला अर्थ अजिबात नव्हतां (यशया 64:4).

देव माझ्यासाठीं काम करतो असे म्हणण्याचा योग्य अर्थ हा आहे कीं मी दीन-दरिद्री आहे आणि मला सुटकेची गरज आहे. मी दुर्बळ आहे म्हणून मला एका सामर्थी व्यक्तीची गरज आहे. माझ्या जिवाला धोका आहे म्हणून मला एका रक्षकाची गरज आहे. मी मूर्ख आहे म्हणून मला कोणीतरी शहाणा अशा व्यक्तीची गरज आहे. मी हरवलेला आहे म्हणून मला सोडविणाऱ्याची गरज आहे.

देव माझ्यासाठीं काम करतो असे म्हणणें म्हणजें मी काम करण्यांस असमर्थ आहे. मला मदतीची नितांत गरज आहे.

आणि ह्यामुळें माझे नव्हे तर देवाचे गौरव होते. गौरव हे देणाऱ्याला प्राप्त होते. स्तुती जो सामर्थ्यवान त्याची केलीं जाते.

देव तुमच्यासाठीं काम करतो याविषयी बायबल काय काय म्हणते ते ऐका आणि स्वतःचा भार उचलून चालण्याच्या ओझ्यातून मुक्त व्हा. ते काम त्याला करू द्या.

1. “हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाहीं.” (यशया 64:4).

2. आणि त्याला कांहीं उणें आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाहीं; कारण जीवन, प्राण व सर्वकांहीं तो स्वतः सर्वांना देतो” (प्रेषित 17:25).

3. “कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाहीं, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45).

4. “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो.” (2 इतिहास 16:9).

5. “मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाहीं. . . संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील” (स्तोत्र 50:12, 15).

6. “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन” (यशया 46:4).

7. “तरी जो कांहीं मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केलें” (1 करिंथ 15:10).

8. “परमेश्वर जर घर बांधत नाहीं तर ते बांधणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत” (स्तोत्र 127:1).

9. “सेवा करणार्‍याने, ती आपण देवानें दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा” (1 पेत्र 4:11).

10. “भीत व कापत आपले तारण साधून घ्या; कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे” (फिलिप्पै 2:12-13).

11. “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला” (1 करिंथ 3:6).

5 October : परतफेड केलीं जाईल व न्याय मिळेल

Alethia4India
Alethia4India
5 October : परतफेड केलीं जाईल व न्याय मिळेल
Loading
/

प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे कीं, “सूड घेणें मजकडे आहे, मी परतफेड करीन,” असे प्रभू म्हणतो.” (रोमकरांस 12:19)

तुमच्या सर्वांवर कधी ना कधी अन्याय किंवा अत्याचार झालाच आहे. शक्यता तुमच्यापैकीं बहुतेकांवर एखाद्या व्यक्तीनें गंभीर अत्याचार केला असेल आणि त्यानें आजपर्यंत क्षमा मागितली नाहीं किंवा त्याची योग्य परतफेड करण्यासाठीं समाधानकारक असे कांहींही केलें नाहीं.

आणि तुमच्या त्या दुखावलेल्या भावना विसरून उद्भवलेली कटुता सोडून देण्याच्या मार्गातील सर्वांत मोठे अडखळण म्हणजें हे ठराविक मत – जे योग्यच आहे – कीं परतफेड केलीं गेलीच पाहिजे, कीं ज्यांच्यावर भयंकर अत्याचार झाला आहे ते लोक अत्याचार करणाऱ्याला जर असेच सुटून जाऊ देतील तर ह्या विश्वाची नैतिक व्यवस्था कोलमडून जाईल आणि प्रत्येकावर अन्याय होईल.

हे ठराविक मत द्वेष सोडून क्षमा करण्यांत अडखळण आहे. परंतु हे एकमेव अडखळण नाहीं. आम्हाला सामोरे गेलें पाहिजे अशी आमची स्वतःची पापे देखील आहेतच. पण खरे अडखळण वर सांगितल्याप्रमाणेंच आहे.

आम्हाला असे वाटते कीं अपराध्यांना दंड न देता मोकळे सोडून देणें म्हणजें आपल्याला न्याय मिळणार नाहीं हे मान्य करणें होय. आणि आम्हांला ते मान्य नसते.

म्हणून आपण आपल्या मनांत राग धरून राहतो, आणि ती घटना किंवा ते शब्द यांची पुन्हा पुन्हा आठवण करून स्वतःच्या भावनांशी खेळतो : असे व्हायला नको होते; असे व्हायला नको होते; जे झालें ते खूप चुकीचे होते; जे झालें ते खूप चुकीचे होते. मी इथे इतका दुःखी आहे आणि तो (किंवा ती) मात्र आनंदी व सुखी आहे, हे कसे? हे खूप चुकीचे आहे. हे खूप चुकीचे आहे! आम्हीं घडलेल्या प्रकाराला असेच विसरू शकत नाहीं. आणि आपल्या अं:तकरणात भरण-पोषण केलेली ही कटुता प्रत्येक गोष्टीला विषाक्त करू लागते.

रोमकरांस 12:19 मधील हे अभिचचन आपल्याला देवानें आपल्यावरील सूडाचे हे ओझे उचलून घेण्यासाठीं दिलें आहे.

” सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या.” म्हणजें काय?

क्रोधाचे हे ओझे खाली टाकून देणें, आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेने दुःखाचे पोषण करण्याची जणू कांही एक प्रथाच, ती टाकून देणें, याचा अर्थ असा होत नाहीं कीं तुमच्यावर कोणताही मोठा अत्याचार झाला नव्हता. अत्याचार तर झालाच आहे.

पण याचा अर्थ असाही नाहीं कीं न्याय मिळत नाहीं. याचा अर्थ असा नाहीं कीं तुम्हांला निर्दोष सिद्ध केलें जाणार नाहीं. याचा अर्थ असा नाहीं कीं अपराधी असेच मोकळे सुटून गेलेंत. नाहीं, ते असेच मोकळे सुटून गेलें नाहीं.

याचा अर्थ असा कीं, जेव्हा तुम्हीं सूडाचे ओझे खाली टाकतां, तेव्हा परमेश्वर ते उचलतो.

सूड उगण्याचा हा धूर्त मार्ग नाहीं. तर  सूड घेणें ज्याच्याकडे आहे त्याला सूड घेण्यासाठीं वाट देणें. सूड घेणें मजकडे आहे, असे प्रभू म्हणतो. तू ते ओझे खाली टाक, मी ते उचलीन. मी परतफेड करीन व तुला न्याय मिळेल. किती अद्भुत सुटका. मला हे ओझे उचलण्याची गरज नाहीं. हे सत्य सुटकेचा नि:श्वास सोडण्यासारखे आहे, कदाचित आयुष्यांत पहिल्यांदाच, आणि असे वाटते कीं आता तुम्हीं आपल्या वैर्‍यांवर फक्त प्रीति करण्यास मोकळे आहात.

4 October : अखंड आनंद

Alethia4India
Alethia4India
4 October : अखंड आनंद
Loading
/

 “मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठीं कीं, जी प्रीति तू माझ्यावर केलीं ती त्यांच्यामध्यें असावी आणि मी त्यांच्यामध्यें असावे.” (योहान 17:26)

येशूनें त्याच्या मरणाच्या आदल्या रात्री हीच प्रार्थना केलीं होती. जे अति आनंददायक त्याचा तुम्हीं अफाट ऊर्जा आणि पूर्ण आवेशाने सर्वकाळ आनंद घ्यावयांस समर्थ व्हावें याची कल्पना करा. हा आमचा वर्तमान अनुभव नाहीं. या जगात आपण आणि आपली अंतिम आत्मतृप्ती यांमध्यें तीन गोष्टी आडकाठी बनून उभ्या आहेत.

एक आडकाठी म्हणजें ही कीं, या सृष्ट जगात आपल्या जिवाची अगम्य तहान तृप्त करू शकेल असे वैयक्तिक मूल्य असलेली एकही गोष्ट नाहीं.

दुसरी ही कीं, त्या अविनाशी धनाचे जे मूल्य आहे त्यामानाने त्याचा आनंद घेण्याची ताकद आपल्यात नाहीं.

आणि तिसरी आडकाठी जी आमच्या या अंतिम आत्मतृप्तीच्या मार्गात उभी आहे ती म्हणजें जो आनंद आपल्याला येथें मिळतो तो तात्पुरता आहे. येथें कांहींही टिकत नाहीं. पण जर योहान 17:26 मधील येशूचे ध्येय आणि प्रार्थना खरी ठरली तर हे सर्व बदलेल. त्यानें अशी प्रार्थना केलीं कीं “जी प्रीति तू माझ्यावर केलीं ती त्यांच्यामध्यें असावी.” ज्याच्याविषयी देव संतुष्ट आहे त्या आपल्या पुत्रावर असलेली त्याची असीम प्रीति, तीच आमच्यामध्येंही! 

जर पुत्रामध्यें असलेला देवाचा आनंद हा पुत्रामध्यें आपला आनंद झाला, तर आपल्या आनंदाचा गंतव्य, म्हणजें येशू, ह्याचे वैयक्तिक मूल्य अविनाशी असणार. तो कधीही कंटाळवाणा किंवा निराश करणारा किंवा आडकाठी होणार नाहीं.

देवाचा जो पुत्र ह्याच्यापेक्षा मोठ्या अशा कोणत्याही खजिन्याची कल्पना देखील केलीं जाऊ शकत नाहीं.

शिवाय, या अविनाशी खजिन्याचा आनंद घेण्याची आपली शक्ती मानवी दुर्बळतेमुळें मर्यादित राहणार नाहीं. आपण पुत्राचा आनंद त्याच्या पित्यामध्यें असलेल्या आनंदसह घेऊ. येशूनें यासाठींच प्रार्थना केलीं होती!

त्याच्या पुत्रामध्यें देवाचा आनंद हा आपल्यामध्यें त्याचा आनंद होईल आणि तोच आनंद आपला देखील होईल  – पुत्रामध्यें आपला आनंद. आणि या आनंदाचा अंत नाहीं, कारण पित्याचा किंवा पुत्राचा कधीही अंत होणार नाहीं.

त्यांची एकमेकांवरील प्रीति हीच त्यांच्यावरील आपली प्रीति होईल आणि म्हणूनच त्यांच्यावर आपली प्रीति कधीही विरणार नाहीं, कीं थंडावणारही नाहीं.

3 October : अंतिम, सार्वभौम, सर्वसमर्थ अशी प्रीति

Alethia4India
Alethia4India
3 October : अंतिम, सार्वभौम, सर्वसमर्थ अशी प्रीति
Loading
/

“परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, स्थिर प्रीति व विश्वासूपण यात उदंड.” (निर्गम 34:6)

देव प्रीति व विश्वासूपण यात उदंड आहे.

तुलना म्हणून माझ्या मनात दोन चित्र येतात:

1. देवाचे मन पाण्याच्या सतत वाहणाऱ्या एका अशा झऱ्यासारखे आहे जे पर्वताच्या शिखरावरून प्रीति आणि विश्वासूपण यांचे बुड-बुडे फुलवते. हा झरा शतकानुशतके अखंडपणें वाहत राहतो.

2. किंवा देवाचे मन जणू एखाद्या ज्वालामुखीसारखे आहे जे प्रीतिच्या उष्णतेने इतके तापते कीं तिचा पर्वताच्या शिखरावर स्फोट होतो आणि मग प्रीति आणि विश्वासूपण ही लाव्हा बनून वर्षानुवर्षे वाहतांत.

जेव्हा देव “उदंड” ह्या शब्दाचा उपयोग करतो — “स्थिर प्रीति व विश्वासूपण यात उदंड” — तेव्हा अर्थ हा आहे कीं त्याच्या प्रीतिच्या झऱ्याला सीमा नाहींत हे आपण समजून घ्यावे आणि अनुभवाने जाणून घ्यावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्हीं या डोंगराळ प्रदेशात वाहणाऱ्या झऱ्यातून दिवसभर, वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या पिऊ शकता, तरी तो कधीही कोरडा पडणार नाहीं.

तुम्हीं असे म्हणण्याचे देखील धाडस करू शकता कीं देव अशा सरकारसारखा आहे जो गरजेच्या प्रत्येक प्रसंगी अधिक पैसे छापतो. अविनाशी, नाहीं का? तरी, एक फरक आहे. देव जे सर्व पैसे छापतो त्याची बरोबरी करणारा असा सोनेरी प्रीतिचा उदंड खजिना देवाकडे आहे. सरकार स्वप्नांच्या दुनियेत जगते. परंतु देवाचे देवपणच या उदंड संसाधनांचा अत्यंत वास्तववादी उगम आहे.

देवाचे अंतिम देवपण, सार्वभौम स्वातंत्र्य आणि त्याचे सर्वसमर्थपण हे तो ज्वालामुखी आहे ज्यातून प्रीति उदंडपणें फुटून वाहते. देवाच्या ह्या परिपूर्ण थोरपणाचा असा अर्थ होतो कीं त्याला स्वतःमध्यें कोणतीही कमतरता भरून काढण्याची गरज नाहीं. उलट त्याचा हा उदंड स्वयंभूपणाचा (आत्मनिर्भरतेचा) गुण आपल्यावर त्याच्या प्रीतिचा वर्षाव करतो, म्हणजें आम्हां पापी लोकांवर – ज्यांना त्याची गरज आहे, आणि ज्याने येशूमध्यें स्वतःला उत्तम देणगी म्हणून दिलें.  

आपण त्याच्या प्रीतिवर डोळे झाकून अवलंबून राहू शकतो कारण आपण त्याच्या अंतिम देवपणावर, त्याच्या स्वतंत्र सार्वभौमत्वावर आणि त्याच्या अमर्याद सामर्थ्यावर विश्वास ठेवतो.