त्याच्या (येशूच्या) रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवानें त्याला पुढे ठेवले. ह्यासाठीं कीं, पूर्वी झालेंल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळें त्यानें आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजें आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे कीं, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्याला नीतिमान ठरवणारे असावे. (रोमकरांस 3:25-26)
आपण रोमकरांस 3:25-26 ला बायबलमधील सर्वात महत्त्वाची वचनें म्हणूं शकतो.
देव पूर्णपणें नीतिमान आहे! आणि तो अनीतिमानांना नीतिमान ठरवतो! खरंच? म्हणजें असा न्यायमूर्ती जो दोषींची निर्दोष मुक्तता करतो!
एकतर हे/किंवा ते असे नाहीं! तर दोन्ही! तो दोषींची निर्दोष मुक्तता करतो, परंतु असे करताना तो स्वतः मात्र दोषी ठरत नाहीं. ही आहे जगातील सर्वात मोठी बातमी!
- “ज्याला [येशूला] पाप ठाऊक नव्हते त्याला त्यानें [देवानें] तुमच्या-आमच्याकरता पाप असे केलें; ह्यासाठीं कीं, आपण त्याच्या ठायीं देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे” (2 करिंथ 5:21). तो आमचे पाप स्वतःवर घेतो. आम्हीं त्याचे नीतिमान घेतो.
- “देवानें आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्यें पापाला दंडाज्ञा ठरवली” (रोमकरांस 8:3). कोणाचा देह? ख्रिस्ताचा. त्या देहामध्यें कोणाच्या पापाला दंडाज्ञा ठरवली? आमच्या पापाला. मग आमच्यासाठीं काय? आता दंडाज्ञा नाहींच!
- “[ख्रिस्ताने] त्यानें स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली.” (1 पेत्र 2:24)
- “कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजें नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला.” (1 पेत्र 3:18)
- “कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ.” (रोमकरांस 6:5)
आम्हांवर आमच्या सृष्टीकर्त्याची दंडाज्ञा आहे आणि त्याच्या गौरवाचे मूल्य जपण्यासाठीं त्यानें आमच्या पापावर सार्वकालिक क्रोध ओतून आपला नाश करावा म्हणून तो स्वतःच्या नीतिमान चारित्र्यामुळें बाध्य आहे हे जर जगातील सर्वात अरिष्टकारक वर्तमान असेल . . .
. . . तर जगांत सर्वांत अद्भुत वर्तमान (शुभवर्तमान!) हे कीं देवानें तारणाच्या एका अशा मार्गाचे प्रयोजन केलें आहे आणि तो अंमलात आणला आहे जो त्याच्या सर्व निवडलेल्यांचे सार्वकालिक तारण तर साध्य करतोच पण त्याचबरोबर त्याच्या गौरवाचे मूल्य जपून, त्याच्या पुत्राची प्रतिष्ठा देखील राखतो. येशू ख्रिस्त पापी लोकांना तारावयांस ह्या जगात आला.