“देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो. ( 2 करिंथकरास पत्र 1:20 )”
प्रार्थना ही अशी गोष्ट आहे जिथे आपल्यां जीवनातला भूतकाळ व आपला भविष्यकाळ सातत्यानें जुळत असतो. मी इथे ह्या गोष्टीचा उल्लेख करतो कारण पौल ह्या वचनात प्रार्थनेला, देवाच्या “होय” सोबत एका विलक्षण रीतीने जोडत आहे.
2 करिंथकरास पत्र 1:20 मध्यें तो म्हणतो, “देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो.” ह्याचा अर्थ सुलभपणे समजून घेऊया.
इथे तो म्हणत आहे कीं “यास्तव, ख्रिस्तामुळे, आपण प्रार्थनेमध्यें देवाला आमेन हे दाखवण्यासाठीं म्हणतो कीं आपण देवाच्या ज्यां भावी कृपेसाठीं प्रार्थना करितो व जिचसाठीं त्याच्यावर अवलंबून राहतो तेव्हां सर्व गौरव त्यालाच दिलें जाईल.”
जर तुम्हांला कधी हा प्रश्न पडत असेल कीं ख्रिस्ती लोक प्रार्थनेनंतर आमेन का म्हणतात किंवा ही प्रथा कुठून आली, तर त्याचें उत्तर हे आहे कीं. आमेन हा शब्द कोणते ही भाषांतर न करता हिब्रू मधून ग्रीक मध्यें घेतला गेला आहे, अगदी जसा तो कोणत्या ही भाषांतराशिवाय इंग्रजीमध्यें व इतर भाषांमध्यें घेतला गेला आहे.
हिब्रू मध्यें, हे एक खात्रीपूर्वक सांगितलेले अनुमोदन आहे ( नहेम्या 5:22, नहेम्या 5:13; 8:6) – हे एक औपचारिक, आस्थापूर्वक “मी मान्य करतो” किंवा “मी जे बोललो त्या बद्दल मला खात्री आहे” किंवा “हे सत्य आहे” असं म्हणणे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, “आमेन” म्हणजे देवा संदर्भात केलेंले विधान आस्थेने “होय’ असे मानणे.
आता 2 करिंथकरास पत्र 1:20 या वचनातील दोन भागामधील संबंध पाहूया. यातील पहिल्यां भागामध्यें लिहले आहे कीं “देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे” व दुसर्या भागामध्यें लिहिले आहे, “म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो.”
जेव्हां आपल्यांला हे समजते कीं “आमेन” आणी “होय” याचा अर्थ सारखाच आहे, तेव्हां हे वचन असे होईल : येशू ख्रिस्तामध्यें, त्याच्या अभिवचनांद्वारें देव आपल्यांला होय असे म्हणतो; आणि ख्रिस्ता मध्यें आपण प्रार्थनेद्वारें देवाला होय असे म्हणतो.