“धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काहीं शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्यां शिक्षणाकरिता लिहिले “ ( रोम 15:4)
आपण पवित्र आत्म्याने कसे भरले जाऊ शकतो? आपण आपल्यां मंडळीवर व स्वत:वर पवित्र आत्म्याचा वर्षाव कसा अनूभवू शकतो, कीं जेणेकरून तो आपल्यांला अदम्य अश्या आनंदाने भरून टाकींल आणि आपल्यांला स्वतंत्र करील, सामर्थ्य देईल ज्याच्या द्वारें आपण इतरांवर अश्याप्रकारे प्रीति करू शकू कीं त्यांना आपण ख्रिस्तासाठीं जिंकून घेऊं?
उत्तर : यासाठीं देवाच्या अतुलनीय, आशा देणार्या वचनांवर दिवस-रात्र मनन करा. जसे रोमकरास पत्र 15:4 सांगते, “धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काहीं शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्यां शिक्षणाकरिता लिहिले” ह्याच्याद्वारें पौल त्याचें अंत:करण आशा, आनंद आणि प्रीतिने भरत असे.
आपल्यांला आशेची संपूर्ण खात्री देवाच्या अभिवचनांवर मनन केल्यांने येते. आणि रोम 15:13 मध्यें सांगितल्यां प्रमाणे पवित्र आत्मा आशा देऊ करतो, या वचनाबरोबर विरोधाभास होत नाहीं. याचे कारण हे कीं, पवित्र आत्मा हा शास्त्राचा दैवी लेखक आहे. त्याचें कार्य हे त्याच्या शब्दाद्वारें होते. आपल्यांला त्याच्या अभिवचनांनी भरून तो आपल्यांला आशेने भरतो ह्या त्याच्या पद्धतीमध्यें कुठेच विरोधाभास नाहीं.
आशा ही एखादी संदिग्ध भावना नाहीं, जी पोटदुखी प्रमाणे अचानक उदभवेल. आशा हा एक प्रकारचा भरवसा आहे कीं पवित्र आत्म्याने त्याच्या वचनाद्वारें आपल्यां उज्ज्वल भविष्याबद्दल जे अभिवचन दिले आहे, ते खरे होईल. तर पवित्र आत्म्याने भरण्याचा मार्ग म्हणजे त्याच्या वचनाने भरणे. आणि आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे.
कारण देवाचे वचनच आहे जें आपल्यांला आशेने भरते, आणि आशा आपल्यांला आनंदाने भरते, आणि आनंद आपल्यां शेजार्यावर प्रीति करण्याच्या सामर्थ्याने आणि स्वातंत्र्याने ओसंडून वाहतो. आणि हेंच पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे आहे.