ArchivesSolid Joys

20 March : येशू ह्या क्षणासाठींच मरण पावला

Alethia4India
Alethia4India
20 March : येशू ह्या क्षणासाठींच मरण पावला
Loading
/

मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि मी जगतो असे नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्राच्या विश्वासाच्या योगाने आहे, त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरिता दिले.” (गलतीकरास पत्र 2:20)

आज सकाळी 4:59 वाजता जेव्हां अलार्म वाजला, माझ्या मनात क्षणार्धात एक विचार आला, मला मरणाची वास्तविकता आणि पूर्णतः पवित्र देवासमोर उभे राहण्याचा विचार आला, जिथे माझ्या जीवनाशिवाय प्रशंसनीय माझ्याकडें काहींच नाहीं.

या गोष्टीचे भय केवळ एका वास्तविकतेच्या प्रकाशाने नाहींसे झाले : येशू ख्रिस्त याच क्षणासाठीं मरण पावला.

मग तो विचार निघून गेला.

याचा तत्काळ अर्थ मी अश्याप्रकारे घेतला : एखाद्याचे तारण होते तेव्हां जे होते त्याचें हे सार आहे. अश्या प्रकारेच येशू हा खरा आहे याचा शोध लागतो. अश्याच प्रकारे एखादा व्यक्ति ख्रिस्ताची प्रीति त्याच्या अंतकरणांत जतन करून ठेवतो. अचानक, पाहिल्यांदाच त्यांना विचार येतो आणि दोष-भावनेसह देवाला भेटायचे निर्विवाद सत्य, ते त्यांच्या हृदयाच्या नेत्राने पाहू व समजू शकतात.

त्या दृष्टांताचा दणका अंत:करणाला छिन्नभिन्न करणारा आहे. यामुळे आपल्यांला जाणीव होते कीं आपली एकमेव आशा केवळ एक मध्यस्थच आहे. आपण जर स्वतःच्या बळावर एकटे उभे राहतो, तेहि स्वतःची वाखाणी किंवा कौतुक करण्यासारखे आपल्यांत काहींही नसतांना, आहे ते केवळ पापी जीवन, तर आपण पूर्णपणे हरवलेलो आहोंत. जर या देवाच्या सान्निध्यात अनंतकाळाची काहीं आशा असेल, तर आपल्यांला एका उद्धारकर्त्याची, आपले स्थानापन्न म्हणून उभा राहानार्याची, तारणकर्त्याची गरज लागेल.

ह्या भयानक अडचणीच्या वेळी, ख्रिस्ताच्या सुवार्तेवांचून कोणतीच गोष्ट प्रकाशमान वाटत नाहीं- “त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरिता दिले” (गलती 2:20). एका क्षणार्धात तो तिथें प्रकट होण्यापूर्वी, मला न्यायाच्या वेळेचा सर्व गिळंकृत करणारा अंधकार आणि त्याची भयानकता दिसून आली- हा ईश्वरविज्ञानी निष्कर्ष नाहीं, एक तर्कशुद्ध निष्कर्ष नाहीं, किंवा एक विचार नाहीं, पण अंत:करणाच्या नजरेतून पाहिलेली एक झलक, एक भावना आणि खात्री आहे.

आपला देव हा भस्म करणारा अग्नि आहे. तो दुष्टता सहन करणार नाहीं. आपण पूर्णपणे हरवलेले आहों. माझे अपराध इतके मोठे, इतके खरे होते कीं क्षणार्धात मला जाणवले कीं यासाठीं मी कोणतीच सबब पण देऊ शकत नाहीं. सर्व काहीं अचानक, गुंतागुंतीचे आणि आशाहीन वाटू लागले.

अशा क्षणी, केवळ येशूच महत्वाचा आहे. हे ख्रिस्ता! हे ख्रिस्ता! ही उपकाराची लाट माझ्या हृदयात समावेल का? तू जो देवाचे दान, हीच माझी तातडीची आणि एकमेव गरज!

19 March : सहा मुद्दयात सुवार्तेचा  सारांश

Alethia4India
Alethia4India
19 March : सहा मुद्दयात सुवार्तेचा  सारांश
Loading
/

कारण आपल्यांला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेहि पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. (1 पेत्र 3:18)

इथे सुवार्तेचा सारांश नमूद केला आहे, जो तुम्हांला सुवार्ता समजण्याकरिता, त्याचा आनंद घेण्याकरिता व इतरांना सांगण्याकरिता उपयुक्त ठरील!

  1. देवानें आपल्यांला त्याच्या गौरवाकरिता निर्माण केलें आहे.

“माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या; ज्यांस माझे नाम ठेविले, ज्यांस माझ्या गौरवासाठीं उत्पन्न केलें, निर्माण केलें आणि घडिले त्या सर्वास घेऊन या.” (यशया 43:6-7) देवानें आपल्यां सर्वांना त्याच्या प्रतिमेमध्यें बनवले आहे यासाठीं कीं आपण त्याचें चरित्र व नैतिक सौंदर्य प्रतिबिंबीत करावे.

2. यासाठींच प्रत्येक मनुष्याने देवाच्या गौरवासाठीं जगावे

“म्हणून तुम्हीं खाता, पिता किंवा जे काहीं करता ते सर्व देवाच्या गौरवासाठीं करा” (1 करिंथ 10:31). देवाच्या गौरवाकरिता जगण्याचा मार्ग म्हणजे त्याच्यावर प्रीति करणे (मत्तय 22:37), त्याच्यावर विश्वास ठेवणे ( रोमंकरास पत्र 4:20), त्याचें उपकार मानणे (स्तोत्र 50:23), त्याच्या आज्ञा पाळणे (मत्तय 5:16) आणि त्याला प्रथम स्थान देणे व आपले धन मानणे ( फिलिप्पैकरास पत्र 3:8; मत्तय 10:37). आपण जेव्हां हे करतो तेव्हां आपण देवाचे गौरव प्रतिबिंबीत करतो.

3. तरीही, आपण सर्वांनी पाप केलें आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो.

कारण सर्वांनी पाप केलें आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत (रोमकरांस 3:23). देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाहीं किंवा त्याचें आभार मानले नाहींत….. आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केलीं (रोमकरांस 3:23 1:21–23). आपण कुणीच देवावर जशी करायला पाहिजे तशी प्रीति केलीं नाहीं, विश्वास ठेवला नाहीं, उपकार मानले नाहींत, आज्ञा पाळल्यां नाहींत किंवा त्याला धन मानले नाहीं.

4. त्यामुळेच आपण सर्वजण सार्वकालिक शिक्षेस पात्र आहों

“कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्यां प्रभू येशू ख्रिस्तामध्यें सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकरांस 6:23). ज्यांनी प्रभू येशूची आज्ञा पाळली नाहीं “त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल” (2 थेस्सल 1:9). “ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील” (मत्तय 25:46).

5. तरी, त्याच्या महान दयेनुसार, देवानें त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, याला जगात पापी लोकांसाठीं सार्वकालिक जीवनाचा मार्ग देऊ करण्याकरिता पाठवले.

“देवानें जगावर एवढी प्रीति केलीं कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठीं कीं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16). “आपल्यांबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्यानें आपल्यांला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले” (गलती 3:13). “कारण आपल्यांला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले” (1 पेत्र 3:18).

6. म्हणून सार्वकालिक जीवन ही त्या सर्वांसाठीं एक दान आहे जे येशूवर प्रभू व तारणारा म्हणून विश्वास ठेवतात व त्याला त्यांच्या जीवनातले सर्वोच्च धन मानतात.

“प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” (प्रेषित16:31). “कीं, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्यां मुखाने’ कबूल करशील आणि देवानें त्याला मेलेल्यांतून उठवलें असा ‘आपल्यां अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल” (रोमकरांस 10:9). कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारें तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्यांने हे झाले नाहीं. (इफिस 2:8–9). “मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरता दिले” (गलती 2:20). “इतकेच नाहीं, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठीं कीं, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा” (फिलिप्पै 3:8).

18 March : आपण आशेला घट्ट धरून का ठेवायचे आहे

Alethia4India
Alethia4India
18 March : आपण आशेला घट्ट धरून का ठेवायचे आहे
Loading
/

म्हणून आपल्यां संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारें मध्यें पडला, ह्यासाठीं कीं, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारें चांगले उत्तेजन मिळावे. (इब्री 6 : 17-18)

पौलाचा जीव घेतल्यांशिवाय आम्हीं काहीं खाणार किंवा पिणार नाहीं असा संकल्प  करून दबा धरून बसलेल्यां लोकांचे काय?

देवच्या ठायी विसंगतपणा नाहीं. तो अभिवचनें, शपथा व त्याच्या पुत्राचे रक्त यांद्वारें स्वत:चे सामर्थ्य यासाठीं प्रकट करत नाहीं कीं आपल्यां सुरक्षेची एक बाजू घट्ट धरून, दुसरी बाजू हवेत आधांतरी ठेवावी.

ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने मिळवलेले तारण, हे त्याच्या लोकांना केवळ अर्धवट नाहीं तर संपूर्णपणे वाचवते.

म्हणून आपण हा प्रश्न विचारावयांस उत्तेजित होतो कीं, इब्री 6:18 मध्यें लेखक आपल्यांला, आपल्यां आशेला हस्तगत करण्यास का सांगत आहे? जर आपले हस्तगत करणे येशूच्या रक्ताद्वारें मिळवलेले आहे व त्याची सुरक्षा अपरिवर्तनीय आहे (हाच जुना करार व नवीन करारातील फरक आहे ) – मग देव आपल्यांला का बरे आशा हस्तगत करण्यास सांगतो?

याचे उत्तर आहे :

  • जेव्हां ख्रिस्त मरण पावला तेव्हां त्यानें आपल्यां करिता आशेला हस्तगत करण्याची कृती घडवून आणण्याची सक्षमता मिळवली, ना कीं आपल्यांला त्यातून मुक्त केलें. 
  • जे त्यानें मिळवले ते आपली हस्तगत करण्याची इच्छा रद्द करत नाहीं, जसे कीं आपल्यांला आशेला धरून राहण्याची इच्छाच नाहीं, तर ते आपल्यां इच्छेला सक्षम करते ज्यामुळे आपल्यांला आशेला हस्तगत करण्याची इच्छा निर्माण होते.
  • त्यानें जे मिळवले त्याद्वारें हस्तगत करण्याची आज्ञा रद्द होत नाहीं, तर हस्तगत करण्याच्या आज्ञेची पूर्तता होते.
  • त्यानें जे मिळविले त्याद्वारें उत्तेजनाचा अंत होत नाहीं, तर त्याद्वारें उत्तेजनाचा विजय प्राप्त केला आहे.

तो मरण पावला यासाठींच कीं पौल जे फिलिपै 3:12 मध्यें करतो, आपणहि तेच करावे, “तर ज्यासाठीं ख्रिस्त येशूनें मला आपल्यां कह्यांत घेतले ते मी आपल्यां कह्यांत घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे.” आपण जे पापी जनांस सांगतो कीं देवानें दिलेली आशा हस्तगत करा, ज्याच्यासाठीं केवळ येशूच आपल्यांला सक्षम करू शकतो, तर हा मूर्खपणा नाहीं, तर शुभवर्तमान आहे. यासाठींच मी पूर्ण अंत:करणाने आपणास बोध करतो कीं : जे ख्रिस्ताने तुमच्या करिता हस्तगत केलें आहे, ते तुम्हीं हस्तगत करा, आणि त्याला घट्ट पकडून ठेवा – ती महान कृती तोच तुमच्यात करत आहे.

17  March : प्रार्थनेचा प्रमुख उद्गार

Alethia4India
Alethia4India
17  March : प्रार्थनेचा प्रमुख उद्गार
Loading
/

“देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो.” ( 2 करिंथकरास पत्र 1:20 )

प्रार्थना ही देवाच्या अभिवचनाला, म्हणजे भविष्यातील त्याच्या खात्रीदायक कृपेला दिलेला प्रतिसाद आहे.

प्रार्थना ही देवाच्या खात्यातून त्यानें आपल्यां करिता जमवलेली भविष्यातील कृपा काढून घेणे हे आहे.

प्रार्थना म्हणजे असा अंधविश्वास नाहीं कीं, कदाचित चांगले हेतु असलेला एक देव असू शकतो. प्रार्थना देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवते, आणि देवाच्या भविष्यातील कृपेच्या खात्याकडें दररोज जाते आणि गरजेच्या वेळी लागणारी कृपा काढून घेते.

ह्या महान वचनातील दोन भागांमध्यें जो दुवा आहे तो लक्ष्यांत घ्या. “म्हणून” या शब्दाकडें लक्ष द्या.

“देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे. म्हणून (यास्तव)  आपण देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो.”

आपल्यां ते लक्ष्यांत आले याची खात्री करण्याकरिता ह्या दोन भागांकडें पाहूया : आपण प्रार्थना करतो तेव्हां आपण देवाला ख्रिस्ता द्वारें आमेन म्हणतो, कारण देवानें ख्रिस्तामधील त्याच्या सर्व अभिवचनांना खात्रीपूर्वक आमेन  म्हंटले आहे. प्रार्थना ही देवाकडें केलेलीं भरवशाची विनवणी आहे कीं त्यानें ख्रिस्तामध्यें भविष्यासाठीं देऊ केलेल्यां अभिवचनांनी आपल्यांला आशीर्वादित करावे. प्रार्थना आपल्यां भविष्यातील कृपेवरील विश्वासाला सर्व गोष्टींच्या पायाशी जोडते, जो येशू ख्रिस्त आहे.   

हि गोष्ट आपल्यांला आपल्यां शेवटच्या मुद्दयाकडें आणते : “आमेन” हा प्रार्थनेतील एक संपूर्ण आणि मोलवान शब्द आहे. याचा अर्थ असा होत नाहीं कीं , “होय, मी ही प्रार्थना केलीं आहे.” याचा प्रामुख्याने अर्थ असा आहे कीं, “होय, देवानें ही सर्व अभिवचनें देऊ केलीं आहेत.”

आमेन म्हणजे, “होय, प्रभू तू हे करू शकतोस.” “होय, प्रभू तू सामर्थ्यशाली आहेस.  होय, प्रभू तू ज्ञानी आहेस. होय, प्रभू तू दयाळू आहेस. होय, प्रभू भविष्यातील सर्व कृपा तुझ्याकडून येते आणि त्याची खात्री ख्रिस्ता द्वारें आम्हांला प्राप्त झाली आहे.”

“आमेन” हा सादर केलेंल्यां प्रार्थनेच्या आशेचा उद्गार आहे, आणि साहाय्यासाठीं केलेंल्यां प्रार्थनेच्या भरवश्याची खात्री आहे.

16 March : येशू महान कामगिरी पूर्ण करणार

Alethia4India
Alethia4India
16 March : येशू महान कामगिरी पूर्ण करणार
Loading
/

“सर्व राष्ट्रांना साक्षीसाठीं म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हां शेवट होईल.” (मत्तय 24 : 14 )

मला सुवार्ताप्रसाराविषयीं येशूच्या ह्या अभिवचनापेक्षा इतर कोणतेच शब्द प्रेरणादायी वाटत नाहींत.

तो असे म्हणत नाहीं कीं : ही सुवार्ता गाजवली पाहिजे. 

असे म्हणत नाहीं कीं : ही सुवार्ता कदाचित गाजवली जाईल.

पण तो म्हणतो : ही सुवार्ता गाजवली जाईल.

ही महान कामगिरी नाहीं किंवा महान आज्ञा नाहीं. तर ही महान निश्चितता आहे, महान भरवसा आहे.

कोणी अश्याप्रकारे बोलायचे धाडस कसे काय करू शकते? त्याला कसे ठाऊक आहे कीं असेच होईल? त्याला कशी खात्री असू शकते कीं मंडळी सुवार्ता कार्यात अपयशी ठरणार नाहीं?

उत्तर : सुवार्ताप्रसार कार्याची कृपा ही पुनरुज्जीवनाच्या कृपेप्रमाणेच आहे, कोणी त्याचा प्रतिकार करू शकत नाहीं. ख्रिस्त वैश्विक घोषणेचे वचन देऊ शकतो कारण तो सार्वभौम आहे. त्याला भविष्यातील सुवार्ता कार्याच्या यशाबद्दल ठाऊक आहे कारण तोच भविष्य ठरवतो. सर्व राष्ट्रे ऐकतील!

“राष्ट्र” म्हणजे आधुनिक “देश” नव्हे. जुन्या करारात जेव्हां इतर राष्ट्रांचा उल्लेख केला जातो, तेव्हां तें वांशिक लोक गटांबद्दल बोलले गेले आहे, जसे कीं यबुसी, हित्ती, अमोरी, मवाबी, कनानी आणि पलिष्टी. “राष्ट्र” म्हणजे स्वत:ची विशिष्ट भाषा आणि संस्कृती असणारे विविध वंशाचे लोक. ( स्तोत्र 117:1 ) : “सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो, त्याचें स्तवन करा.” राष्ट्र म्हणजे लोक – विविध लोक गट, जसे कीं आपण त्यांना संबोधतो.

देवाचा सार्वभौम पुत्र आणि मंडळीचा प्रभू या नात्यानें, येशूनें हा दैवी उद्देश हाती घेतला आणि संपूर्ण खात्रीने तो बोलला कीं, “सर्व राष्ट्रांना साक्षीसाठीं म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हां शेवट होईल” ( मत्तय 24 : 14 ).

जगाच्या सुवार्ताप्रसाराचे कार्य यशस्वी होणार याबद्दल खात्री दिली गेली आहे. ते अपयशी ठरू शकत नाहीं. मग हे रास्त नाहीं का, कीं आपण मोठ्या विश्वासाने प्रार्थना करू व मोठ्या भरवश्याने गुंतवणूक करू आणि यशाच्या खात्रीने  पुढे वाटचाल करू ?

15 March : ख्रिस्ताकारिता विध्वंसक

Alethia4India
Alethia4India
15 March : ख्रिस्ताकारिता विध्वंसक
Loading
/

मग तो (येशू) पलीकडें गदरेकरांच्या देशात गेल्यांवर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले, तेव्हां पाहा, ते ओरडून म्हणाले, ” हे देवाच्या पुत्रा, तू मध्यें का पडतोस ? नेमलेल्यां समयापूर्वी तू आम्हांला पीडण्यास येथे आला आहेस काय ?” मत्तय 8:29

दुरात्मे इथे एक रहस्य शिकत आहेत. त्यांना ठाऊक आहे कीं त्यांचा नाश होणार आहे. त्यांना ठाऊक आहे कीं देवाचा पुत्र हा विजयी होईल. पण त्यांना हे ठाऊक नव्हते कीं त्यांच्या अंतिम पराभवाच्या आधीच ख्रिस्त प्रकट होणार होता.

ख्रिस्त लढाई करिता त्याच्या सैन्य दलाचे पुढारीपण करण्यासाठीं शेवटच्या युद्धा पर्येंत थांबणार नाहीं. त्यानें सैतानाच्या प्रदेशामध्यें विध्वंसक शक्तीला दाखल केलें आहे. त्यानें जीवन वाचवण्यासाठीं त्याच्या “बचाव पथकाला” प्रशिक्षण दिले आहे. ख्रिस्ताने शेवटच्या विजयापूर्वी, विजयी होण्याकारिता अनेक रणनीती आखल्यां आहेत.

त्यामुळे आता युद्धनीती अशी आहे कीं – ज्याअर्थी आता सैतानाचा नाश ठरलेलाच आहे, व हे त्याला पण ठाऊकहि आहे, त्याअर्थी जेव्हां पण तो आपल्यांला त्याचा मागे जाण्यासाठीं मोहात टाकू पाहतो तेव्हां आपण त्याला ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. आपण त्याचावर हसून म्हणायचे, “तुझे डोके ठिकाणावर आहे का, तू हरला आहेस आता तुला कोण साथ देणार?”

मंडळी ही “ ह्या युगाच्या दैवतापासून” मुक्त केलीं गेली आहे ( 2 करिंथ 4:4). आपण गनिमी काव्यातले सैनिक आणि योद्धे आहोंत. आपण आज्ञा मोडण्यार्‍या राज्याचा “अंतरिक्षातील अधिपतीच्या” विरुद्ध बंडखोरी करणारे असे सैनिक आहोंत (2 इफिस 2:2).

हे सुरक्षित नाहीं. पण हे थरारक आहे. खूप लोकांचा जीव यात गेला आहे. सैतानाचे दूत त्याच्या विरुद्ध कारवाया करणारांच्या सतत शोधात असतात. जे जीव जाईपर्यन्त लढा देतात ख्रिस्ताने त्यांना पुनरुत्थानाची खात्री दिली आहे. पण त्यानें शत्रूंच्या प्रदेशामध्यें शांती, जगाकडून स्विकृती किंवा समृद्धीची खात्री दिली नाहीं.

पुष्कळांनी आपल्यां सेनापतिच्या आज्ञा पाळत त्यांच्या जीवाचे बलिदान दिले आहे. आणि मी यापेक्षा चांगल्यां जीवनाचा विचार देखील करू शकत नाहीं – आणि मरणाचा देखील नाहीं!

14 March : विजय निश्चित आहे

Alethia4India
Alethia4India
14 March : विजय निश्चित आहे
Loading
/

“यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील.”  – (यशया 25:3)

यशया तो दिवस पाहत आहे जेव्हां सर्व राष्ट्रे – सर्व लोक गटांचे प्रतीनिधीं – इस्राएलचा देव याव्हे व त्याचा मसीहा, ज्याला आपण येशू म्हणून ओळखतो, यांच्या बरोबर त्यांचे शत्रुत्व असणार नाहीं.

ते या पुढे बआल किंवा निबो किंवा मोलेख किंवा अल्लाह किंवा बुद्ध किंवा काल्पनिक आदर्श जग निर्माण करण्या करिता असलेले सामाजिक कार्यक्रम किंवा आर्थिक विकास किंवा पूर्वजांची किंवा निसर्गाची भक्ति करणार नाहींत. या ऐवजी ते विश्वासाने देवाच्या पर्वतावर मेजवानीकरिता येतील.

आणि त्यांच्या दु:खाचा पडदा काढून टाकींलेला असेल आणि मरण नाहींसे झालेलें असेल आणि देवाच्या लोकांची निंदा काढून टाकली गेलेली असेल आणि त्यांचे अश्रु कायमचे पुसून टाकलेले असतील.

यशया 25:3 मधील द्रुष्टांत समजून घेण्याकरिता त्याची ही पार्श्वभूमी समजणे गरजेचे आहे. “यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील.” दुसर्‍या शब्दात, देव हा “आडदांड” लोकांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे, आणि तो इतका बलवान आणि कृपाळू आहे कीं शेवटी तो निर्दयी अशा राष्ट्रांना देखील त्याची भक्ति करायला भाग पाडील.

यशया जे चित्र दाखवत आहे त्यात, सर्व राष्ट्रे देवाची भक्ती करित त्याचाकडें वळाली आहेत, जे त्याचें लोक झाले आहेत त्या सर्व लोकांकरिता मोठी मेजवानी ठेवली आहे, राष्ट्रांमधून सर्व यातना, दु:ख आणि अपमान नाहींसा केला गेला आहे, आणि शेवटी मरण कायमचे नाहींसे केलें गेले आहे. 

हा विजय निश्चित आहे, कारण देवच  हे सर्व करीत आहे. त्यामुळे आपण याची खात्री बाळगू शकतो.

जगात सुवार्ता प्रसाराकरिता खर्च केलें गेलेले एकही जीवन व्यर्थ ठरणार नाहीं, देवाच्या राज्याच्यावाढीसाठीं केलेंली एकही प्रार्थना किंवा खर्च केलेंला एक रुपया किंवा एक संदेश किंवा उत्तेजनासाठीं लिहिलेले एक पत्र किंवा अंधारात प्रकाशणारा एक लहानसा दिवा देखील व्यर्थ ठरणार नाहीं. विजय हा निश्चत आहे.

13 March : येशू हा देवाचा आमेन आहे

Alethia4India
Alethia4India
13 March : येशू हा देवाचा आमेन आहे
Loading
/

“देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो. ( 2 करिंथकरास पत्र 1:20 )”

प्रार्थना ही अशी गोष्ट आहे जिथे आपल्यां जीवनातला भूतकाळ व आपला भविष्यकाळ सातत्यानें जुळत असतो. मी इथे ह्या गोष्टीचा उल्लेख करतो कारण पौल ह्या वचनात प्रार्थनेला, देवाच्या “होय” सोबत एका विलक्षण रीतीने जोडत आहे.

2 करिंथकरास पत्र 1:20 मध्यें तो म्हणतो, “देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो.” ह्याचा अर्थ सुलभपणे समजून घेऊया.

इथे तो म्हणत आहे कीं “यास्तव, ख्रिस्तामुळे, आपण प्रार्थनेमध्यें देवाला आमेन हे दाखवण्यासाठीं म्हणतो कीं आपण देवाच्या ज्यां भावी कृपेसाठीं प्रार्थना करितो व जिचसाठीं त्याच्यावर अवलंबून राहतो तेव्हां सर्व गौरव त्यालाच दिलें जाईल.”

जर तुम्हांला कधी हा प्रश्न पडत असेल कीं ख्रिस्ती लोक प्रार्थनेनंतर आमेन का म्हणतात किंवा ही प्रथा कुठून आली, तर त्याचें उत्तर हे आहे कीं. आमेन हा शब्द कोणते ही भाषांतर न करता हिब्रू मधून ग्रीक मध्यें घेतला गेला आहे, अगदी जसा तो कोणत्या ही भाषांतराशिवाय इंग्रजीमध्यें व इतर भाषांमध्यें घेतला गेला आहे.

हिब्रू मध्यें, हे एक खात्रीपूर्वक सांगितलेले अनुमोदन आहे ( नहेम्या 5:22, नहेम्या 5:13; 8:6) – हे एक औपचारिक, आस्थापूर्वक “मी मान्य करतो” किंवा “मी जे बोललो त्या बद्दल मला खात्री आहे” किंवा “हे सत्य आहे” असं म्हणणे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, “आमेन” म्हणजे देवा संदर्भात केलेंले विधान आस्थेने “होय’ असे मानणे.

आता 2 करिंथकरास पत्र 1:20 या वचनातील दोन भागामधील संबंध पाहूया. यातील पहिल्यां भागामध्यें लिहले आहे  कीं “देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे” व दुसर्‍या भागामध्यें लिहिले आहे, “म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो.”

जेव्हां आपल्यांला हे समजते कीं “आमेन” आणी “होय” याचा अर्थ सारखाच आहे, तेव्हां हे वचन असे होईल : येशू ख्रिस्तामध्यें, त्याच्या अभिवचनांद्वारें देव आपल्यांला होय असे म्हणतो; आणि ख्रिस्ता मध्यें आपण प्रार्थनेद्वारें देवाला होय असे म्हणतो.

March 12 : जेव्हां घडविणारा आपल्यां बाजूनें असतो

Alethia4India
Alethia4India
March 12 : जेव्हां घडविणारा आपल्यां बाजूनें असतो
Loading
/

“जो आपल्यां उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्यास धिक्कार असो! तो मातीच्या खापर्‍यापैकीं एक आहे. तू काय करतोस असे माती आपल्यां घडणा-याला म्हणेल काय? तुला हात नाहींत असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय?” ( यशया 45:9)

देवाचा प्रतापीपणा अधिक उंचविला जातो जेव्हां आपण त्याच्याकडें एक निर्माणकर्ता ज्यानें शून्यातून हे विश्व निर्माण केलें, या दृष्टीने पाहतो. देव शून्यतेला आज्ञा करतो, आणि ती त्याची आज्ञा पाळते आणि शून्यातून विश्व निर्माण होते.

शून्यातून त्यानें माती घडवली, व त्या मातीतून त्यानें आपल्यांला घडवले- देवाची कलाकृती (यशया 45:9) – त्याच्या मालकींचे लोक, त्याच्या  गौरवाकरिता नेमून ठेवलले व त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले. “परमेश्वर हाच देव आहे हे जाणा ; त्यानेंच आम्हांला उत्पन्न केलें; आम्हीं त्याचेंच आहों, आम्हीं त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहों” (स्तोत्र 100:3). दुसर्‍याच्या मालकींचे मेंढरू व पात्र असणे ही एक नम्र करणारी गोष्ट आहे.

आज सकाळी मी यशयाचे पुस्तक वाचत असताना मला देवाच्या प्रतापीपणाविषयीं आणखी एक वचन सापडले. जेव्हां मी ते वचन देवाच्या संपूर्ण सामर्थ्याशी व उत्पन्नकर्त्याच्या असलेल्यां अधिकाराशी एकत्र केलें, तेव्हां त्याचें एक ज्वलंत मिश्रण होऊन माझ्या मनात एक स्फोट झाला. धडाम!

यशया 33:21 म्हणते, “प्रतापी परमेश्वर आम्हांसाठीं असेल!”

आम्हांसाठीं! आम्हांसाठीं! निर्माणकर्ता आम्हांसाठीं आहे, आमच्या विरुद्ध नाहीं.   सर्व शक्तिनिशी आणि जे त्यानें घडवले आहे त्यावर संपूर्ण अधिकारासह – तो आम्हांसाठीं आहे!

“हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाहीं, त्याचें नाव आलेले नाहीं, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाहीं” (यशया 64:4). “देव आपल्यांला अनुकूल असल्यांस आपल्यांला प्रतिकूल कोण?” (रोम 8:31). 

तुम्हीं आणखी कोणत्या गोष्टीचा विचार करू शकता का, जी  इतकीं सांत्वन देणारी, खात्री देणारी व आनंद देणारी आहे कीं, हा प्रतापी परमेश्वर तुमच्यासाठीं आहे?

March 11 : दोन अमर्याद सबळ आणि मृदु सत्य

Alethia4India
Alethia4India
March 11 : दोन अमर्याद सबळ आणि मृदु सत्य
Loading
/

“मी आरंभीच शेवट कळवितो. होणार्‍या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे; माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन . ” ( यशया 46:10 )

“सार्वभौमता” हा शब्द (“ट्रिनिटी”- त्रेकय ह्या शब्दाप्रमाणेच) पवित्र शास्त्रात आढळत नाहीं. आपण त्याचा उपयोग हे सत्य सांगण्यास करतो कीं, देवच ह्या जगाचा सर्वोच्च नियंत्रक आहे, मोठ्यातल्यां मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी व जंगलातील लहानातील लहान पाखराचे झाडावरून पडणे, ह्या सर्व गोष्टींवर त्याचें सर्वोच्च नियंत्रण आहे.

बायबल हा सिद्धांत अशाप्रकारे मांडतो : …मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाहीं…… ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. (यशया 46:9–10.) आणि : तो (देव) आकाशातील आपल्यां सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाहीं” (दानीएल 4:35). आणि : “तो न बदलणारा आहे, त्याला त्यापासून कोण फिरवणार? आपल्यां मनास येते ते तो करतो; जे मला नेमले आहे ते तो घडवून आणत आहे; अशा पुष्कळ गोष्टी त्याच्याजवळ आहेत” (इयोब  23:13–14). आणि : “आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र 115:3).

ही शिकवण विश्वासणा-या करीत खूप मौल्यवान असण्याचे एक कारण हे आहे कीं, जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचावर दया व कृपा करणे हा देवाचा मनोरथ आहे (इफिस 2:7, स्तोत्र 37:3-7, नीति 29:25).  देवाच्या सार्वभौमतेचा अर्थ असा होतो कीं आपल्यांकरिता असलेली त्याची योजना कधीच विफल होत नाहीं ती अपयशी होऊंच शकत नाहीं.

“जे देवावर प्रीति करतात” व ” जे त्याच्या संकल्पा प्रमाणे बोलाविलेलें” आहेंत, त्यांच्या बरोबर अशी कोणतीच गोष्ट घडत नाहीं जी सखोलपणे, दीर्घपणे व त्यांच्या सर्वोच्च कल्यांणाकरिता कार्य करीत नाहीं ( रोम 8:28 ; स्तोत्र 84:11 ). 

यासाठींच मी म्हणतो कीं देवाची दया व त्याचें सार्वभौमत्व हे माझ्या जीवनाचे दोन स्तंभ आहेत. ते माझ्या भविष्याची आशा आहेत, माझ्या सेवाकार्याचे बळ आहेत, माझ्या ईश्वरविज्ञानाचा केंद्रबिंदू आहेत, माझ्या विवाहाचा बंध आहेत, माझ्या सर्व रोगांचे औषध आहेत आणि माझ्या सर्व निराशेचा उपाय आहेत.

आणि जेव्हां मी मृत्युच्या पायरीवर येईन ( आता किंवा कालांतराने ) तेव्हां ही दोन सत्य माझ्या मृत्यूशय्येच्या बाजूला उभी असतील आणि अमर्याद बळाने आणि कोमलतेने मला उंचावून देवाकडें नेतील.