ArchivesSolid Joys

18 April : देवा, आमच्यां अंतःकरणांस स्फूर्ती दे

Alethia4India
Alethia4India
18 April : देवा, आमच्यां अंतःकरणांस स्फूर्ती दे
Loading
/

शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झालीं ते त्याच्याबरोबर गेले. (1 शमुवेल 10:26).

या वचनात काय म्हटलें आहे यावर काहीं क्षण विचार करा. देवानें  त्यांना स्फूर्ती दिलीं, किंवा देवानें  त्यांना स्पर्श केला. बायकोने नाहीं. मुलाने नाहीं. पालकाने नाहीं. सल्लाकाराने नाहीं. तर देवानें. देवानें त्यांना स्फूर्ती दिलीं/स्पर्श केला.

त्यानें जो जो विश्वात अपरिमित सामर्थ्याचा धनी आहे. अनंत अधिकार आणि अनंत ज्ञान आणि अमर्याद प्रेम आणि अमर्याद चांगुलपणा आणि अमर्याद पवित्रता आणि अपरिमित न्याय असलेला. त्या देवानें त्यांच्या मनांस स्फूर्ती दिलीं.

बृहस्पतिचा परिघ रेणूच्या काठास कसा स्पर्श करतो? त्याच्या नाभीत प्रवेश करणे तर दूर राहिले?

देवाचा स्पर्श किंवा त्याचे मनांस स्फूर्ती देणे अद्भुत आहे, केवळ यामुळे नाहीं कीं स्पर्श करणारा वा स्फूर्ती देणारा देव आहे, तर यामुळे देखील कीं तो स्पर्श  आहे. हा एक वास्तविक संबंध आहे. त्या स्पर्शाचा संबंध आमच्यां मनांशी असणें हे अद्भुत आहे. स्पर्शाचा संबंध देवाबरोंबर आहे हे अद्भुत आहे. आणि तो वास्तविक स्पर्श आहे हे अद्भुत आहे.

शूर पुरुषांना उद्देशून फक्त बोलले जात नव्हते. त्यांच्यावर केवळ दैवी प्रभाव टाकींला जात नव्हता. त्यांची केवळ भेंट घेऊन निवड केलीं गेलेली नव्हती. देवानें, आपल्या अमर्याद कृपाळूतेने, त्यांच्या मनांस स्फूर्ती दिलीं. देव इतका जवळ होता. तरी ते भस्म झालें नाहींत.

मला तो स्पर्श आवडतो. मला तो आणखी हवा आहे. माझ्यासाठीं आणि तुम्हा सर्वांसाठीं. मी प्रार्थना करतो कीं देवानें मला त्याच्या गौरवाने आणि या गौरवाप्रीत्यर्थ नव्याने स्पर्श करावा. मी प्रार्थना करतो कीं त्यानें आम्हा सर्वांच्या मनांस स्फूर्ती द्यावी.

ओहो, देवाचा तो स्पर्श मिळावा! जर तो स्पर्श अग्नीसह करण्यांत आला, तर तसेच व्हावे. जर तो पाण्याने केला जात असेल तर असेच व्हावे. तो वाऱ्याने केला जात असेल तर तो तसाच व्हावा. जर तो मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह होत असेल, तर आपण तो समर्पित अंतकरणाने घेऊं.

हे परमेश्वरा, ये. इतक्या जवळ ये. भस्म कर आणि भिजव आणि वार कर आणि चुरगळा कर. किंवा शांत आणि मंदपणे, ये. ये. आमच्यां अंतःकरणास स्पर्श कर.

17 April : येशूला कवटाळणें

Alethia4India
Alethia4India
17 April : येशूला कवटाळणें
Loading
/

देवावर प्रीति करणे म्हणजें त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहींत कारण जे काहीं देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें आपला विश्वास. (1 योहान 5:3-4).

लक्ष द्याः देवावर प्रीति करणे हे केवळ त्याच्या आज्ञांचे पालन करणे नव्हे. तर देवावर प्रीति करणे देवासाठीं एका विशिष्ट प्रकारचे अंतःकरण बाळगणे कीं जेणेकरून आज्ञा पाळणे कठीण असणार नाहीं. योहान हेच म्हणतो. पण मग तो हे सत्य प्रीतिच्या संदर्भात न मांडता तो ते नवा जन्म व विश्वास या संदर्भात मांडतो: “जे काहीं देवापासून जन्मलेले आहे ते जगावर विजय मिळवते. म्हणून, नवा जन्म म्हणजें देवाच्या आज्ञा त्याला बोजड वाटत नाहीं आणि आज्ञेचे पालन करतांना जगीक अडचणींवर मात करतो.

आणि शेवटी तो पुढे म्हणतो, “आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें आपला विश्वास“ म्हणून, नवा जन्म भारमुक्त आज्ञापालनाप्रत येणाऱ्या सर्व जगीक अडचणींवर मात करतो, कारण नवा जन्म विश्वासात वाढ करतो. म्हणून, नव्या जन्माचा चमत्कार विश्वास उत्पन्न करतो, अत्यंत संतोषकारक म्हणून ख्रिस्तामध्ये आपल्यासाठीं देव जो काहीं आहे ते स्वीकारतो, जे जगाच्या परीक्षांपेक्षा देवाप्रत आज्ञाधारकतेस अधिक इच्छिण्यायोग्य बनवते. आणि देवावर प्रीति करण्याचा हाच अर्थ आहे.

अठराव्या शतकातील पाळक आणि पवित्र शास्त्राचे विद्वान जोनाथन एडवर्ड्स यांनी या वचनाशी संघर्ष केला आणि असा निष्कर्ष काढला, “तारणदायक विश्वास . . . प्रेम अभिव्यक्त करतो. . . देवावरील आमचे प्रेम आम्हांला देवाच्या आज्ञा पाळण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य देते – जे दर्शविते कीं तारणदायक विश्वासात, त्याचे जीवन आणि सामर्थ्य यात प्रेम ही मुख्य गोष्ट आहे, ज्याद्वारे ते मोठे परिणाम घडवून आणतात.”

माझ्या मते एडवर्डचे बरोबर आहे आणि बायबलमधील असंख्य वचने तो जे काहीं म्हणतो त्याचे समर्थन करतात.

असे म्हणण्याची आणखी एक पद्धत ही कीं ख्रिस्तावरील विश्वास देव आमच्यांसाठीं काय आहे याची केवळ सहमती देणेच नाहीं तर तो ख्रिस्तामध्ये आमच्यांसाठीं जो काहीं आहे त्या सर्वांचा स्वीकार करणे देखील आहे. “खरा विश्वास ख्रिस्ताचा त्याप्रकारे स्वीकार करतो ज्या प्रकारे पवित्र शास्त्र दरिद्री पापी लोकांप्रत त्यास सादर करतो” – हे एडवर्ड्सचे दुसरे उद्धरण आहे. हे “कवटाळणे” ख्रिस्तावरील एक प्रकारचे प्रेम आहे – असे प्रेम जे त्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक मूल्यवान समजते.

म्हणून, एकींकडें 1 योहान 5:3, जे म्हणते देवासाठीं आमची प्रीति आम्हांला त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास समर्थ बनविते, आणि दुसरीकडें, 4थे वचन जे म्हणते कीं आमचा विश्वास देवाच्या आज्ञांचे पालन करण्यापासून आम्हास रोखणाऱ्या अडखळणांवर मात करतो, यांत विरोधाभास नाहींच. देव आणि ख्रिस्त ह्यांच्यावर प्रीति विश्वासात गर्भित आहे.

मग योहान आज्ञा पाळणाऱ्या विश्वासाची अशा प्रकारे व्याख्या करतो “येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो” (1 योहान 5:5). हा विश्वास वर्तमान येशूला गौरवी दैवी व्यक्ती जो तो आहे असे म्हणून “स्वीकार करतो.” हे फक्त या सत्यास सहमति देणे नव्हे कीं येशू हा देवाचा पुत्र आहे, कारण दुरात्मेसुद्धा हे मान्य करतात. “तेव्हां पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला आहेस काय?” (मत्तय 8:29). येशू हा देवाचा पुत्र आहे हा विश्वास करण्याचा अर्थ त्या सत्याचे महत्व – वास्तविकतेचे मूल्य “स्वीकार करणे” होय. याचा अर्थ देवाचा पुत्र म्हणून ख्रिस्तासोबत आणि त्याच्याठायीं देव आमच्यांसाठीं जे काहीं आहे त्यात संतुष्ट होणे होय.

“देवाचा पुत्र” म्हणजें येशू हा त्याच्या पित्याच्या उजवीकडें असलेला विश्वातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे. म्हणून, त्यानें जे काहीं शिकवले ते खरे आहे, आणि त्यानें जे काहीं अभिवचन दिलें ते स्थिर राहील आणि आत्म्यास संतुष्ट करणारी त्याची सर्व महानता कधीही बदलणार नाहीं.

म्हणून, तो देवाचा पुत्र आहे हा विश्वास धरणे, या सर्वांवर अवलंबून राहणे, आणि त्यात संतुष्ट होणे होय.

16 April : आजच्यासाठीं करुणा

Alethia4India
Alethia4India
16 April : आजच्यासाठीं करुणा
Loading
/

आम्हीं भस्म झालो नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाहीं.ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. (विलापगीत 3:22-23).

परमेश्वराची करुणा रोज सकाळी नवी होते कारण दररोज त्या दिवसासाठीं पुरेशी करुणा मुबलक प्रमाणांत उपलब्ध असते. देव प्रत्येक दिवसाचे दुःख ठरवितो. तसेंच देव प्रत्येक दिवसासाठीं करुणा देखील ठरवितो. त्याच्या मुलांच्या जीवनात, दु:ख व करुणा परिपूर्णपणे ठरविण्यात आलेलें आहेंत. येशूनें म्हटलें, ”ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.“ (मत्तय 6:34). ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रत्येक दिवशी त्याची दया किंवा करुणा ठरविली आहे. प्रत्येक दिवस दर सकाळी नवा होतो.

परंतु जेव्हां आपल्याला वाटते कीं आजच्या साधनसामुग्रीवर उद्याचा भार आपल्याला सहन करावा लागू शकतो तेव्हां आपण कित्येकदा निराश होतो. देवाला वाटते कीं आपण हे जाणावे कीं असे होणार नाहीं. आजची करुणा आजच्या दुःखांसाठीं आहे. उद्याची करुणा ही उद्याच्या दुःखांसाठीं असणार आहे.

कधीकधी आपण विचार करतो कीं भयंकर परीक्षेत स्थिर उभे राहण्यासाठीं आम्हांवर करुणा केलीं जाईल कीं नाहीं. होय, केलीं जाईल. पेत्र म्हणतो, ”ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्हीं धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजें ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो“ (1 पेत्र 4:14). जेव्हां निंदा होते, तेव्हां गौरवाचा आत्मा येतो. स्तेफनाला दगडमार होत असतांना असे घडले. तुमच्यासाठीं देखील असेंच घडेल. जेव्हां आत्म्याची आणि गौरवाची गरज भासेल, तेव्हां ते येतील.

रानात मान्ना एका दिवसाला एकदाच दिला जात असे. साठवणूक करायची नव्हती. देवाच्या दयेवर आपण अशाच प्रकारे अवलंबून राहिले पाहिजे. उद्याची ओझी उचलण्याचे बळ तुम्हांला आज प्राप्त होणार नाहीं. आजच्या दुःखांसाठीं तुम्हांला करुणा देण्यात आली आहे.

उद्या करुणा नवी होईल. ”ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.“ (1 करिंथ 1:9). 

15 April : खेचरासारखे होऊ नका

Alethia4India
Alethia4India
15 April : खेचरासारखे होऊ नका
Loading
/

निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठीं लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीं.” (स्तोत्र 32:9).

असे कल्पनाचित्र रंगवा कीं देवाचे लोक सर्व प्रकारच्या प्राण्यांचे खळे आहे. देव त्याच्या प्राण्यांची काळजी घेतो, त्यांना कोठे जायचे आहे ते दाखवतो, आणि त्यांच्या जीवनासाठीं धान्याचे कोठार बांधतो.

परंतु प्राण्यांच्या ह्या खळ्यांत एक जनावर आहे जे देवाला भयंकर त्रास देते, ते म्हणजें खेचर. ते मूर्ख आहे आणि ते हट्टी आहे आणि यांपैकीं कोणता अवगुण प्रथम आहे हे तुम्हीं ओळखू शकत नाहीं – हट्टीपणा कीं मूर्खपणा.

आता देव ज्या प्रकारे त्याच्या प्राण्यांना अन्न देण्यासाठीं आणि त्यांना निवारा देण्यासाठीं कोठारात नेतो ते हे शिकवून कीं त्यांना सर्वांना एक वैयक्तिक नाव आहे आणि नंतर त्यांना नावाने हाक मारणे.  ”मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन” (स्तोत्र 32:9).

पण खेचर त्या प्रकारच्या बोधाला किंवा मार्गदर्शनाला प्रतिसाद देणार नाहीं. त्याला समज नाहीं. म्हणून देव त्याच्या पिक-अप ट्रकमध्ये बसतो आणि शेतात जातो, खेचराच्या तोंडात ओठाळी आणि लगाम घालतो, त्याला ट्रकला जुंपतो आणि त्याला ओडत खळ्यात नेतो जेथे तो ताठ पायांनी आणि फुरफुरत जातो.

देवाची अशी पद्धत नाहीं कीं त्याच्या प्राण्यांनी त्याच्याकडें आशीर्वाद आणि संरक्षणासाठीं अशाप्रकारे यावे.

पण एक दिवस असा येईल जेव्हां त्या खेचराला खूप उशीर झालेंला असेल. त्याच्यावर गारांचा वार होणार आहे आणि विजेचा कडकडाट होणार आहे, आणि जेव्हां तो धावत येईल तेव्हां खळ्याचे दार बंद झालेंलें असेल.

म्हणून, खेचरांसारखे होऊ नका. “निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठीं लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहींत.”

त्याऐवजी, देव पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने त्याला प्रार्थना करावी (स्तोत्र 32:6).

खेचरासारखे न होणें म्हणजें स्वतःला नम्र करणे, प्रार्थनेत देवाकडें येणे, आपली पापे कबुल करणे आणि शेतातील गरजू लहान पिल्लांप्रमाणे त्याच्या संरक्षणाच्या आणि तरतूदीच्या खळ्यात जाण्यासाठीं देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे.

14 April : त्याच्या प्रसिद्धीसाठीं (गौरवासाठीं) प्रार्थना करा

Alethia4India
Alethia4India
14 April : त्याच्या प्रसिद्धीसाठीं (गौरवासाठीं) प्रार्थना करा
Loading
/

“ह्यास्तव तुम्हीं ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्यां स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” (मत्तय 6:9).

पवित्र शास्त्र अनेकदा म्हणते कीं देव “त्याच्या नावासाठीं” कार्य करतो.

  • तो आपल्या नावासाठीं मला नीतिमार्गांनी चालवतो. (स्तोत्र  23:3)
  • हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर. (स्तोत्र  25:11)
  • त्यानें आपल्या नावासाठीं त्यांचे तारण केलें. (स्तोत्र 106:8)
  • माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला. (यशया 48:9)
  • कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झालीं आहे. (1 योहान  2:12)

जर तुम्हीं विचाराल कीं त्या सर्व वाक्यांत कोणती गोष्ट परमेश्वराचे अंतःकरण द्रवित करीत आहेत (आणि अनेकांस ते आवडतात), तर उत्तर हे आहे कीं देव यांत प्रसन्न होतो कीं त्याचे नाव कळविले जावे आणि त्याचा आदर केला जावा.

पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रार्थना जी करता येऊ शकते ती आहे, “तुझे नाव पवित्र मानले जावो.” मला असे वाटत होते कीं ही एक प्रशंसा आहे. जसे, “हालेलुया! प्रभूचे नाव पवित्र आहे!” पण ती प्रशंसा नाहीं. ती एक विनंती आहे. वास्तविक एक प्रकारचा आदेश किंवा आज्ञा. प्रभु, असेंच होऊं दे! ते पवित्र मानिले जाऊं दे. तुझे नाव पवित्र मानले जावो. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. मी यासाठीं तुला आग्रह करीत आहे: लोकांना तुझे नाव पवित्र मानावयास प्रवृत्त कर. मला तुझे नाव पवित्र मानावयास उत्तेजन दे!

जास्तीत जास्त लोकांनी त्याचे नाव “पवित्र” मानावे हे देवाला आवडते. म्हणूनच त्याचा पुत्र ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांस त्यासाठीं प्रार्थना करावयास शिकवतो. वस्तुतः, येशू हिला सर्वात पहिली आणि सर्वश्रेष्ठ प्रार्थना ठरवतो. कारण हा पित्याचा प्रथम आणि सर्वांत मोठा आवेश आहे.

“प्रभु, अधिकाधिक लोकांना तुझे नाव पवित्र मानण्याची प्रेरणा दे,” अर्थात, तुझ्या नावाचा आदर, प्रशंसा, मान, विचार, सन्मान, भक्ती, आणि स्तुती होऊ दे. अधिकाधिक लोकांनी ते करावें! म्हणून, आपण पाहू शकता कीं मुळांत ही एक सुवार्तिक प्रार्थना आहे.

13 April : तुमच्या अश्रूंना बोला

Alethia4India
Alethia4India
13 April : तुमच्या अश्रूंना बोला
Loading
/

“जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठीं बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” (स्तोत्र 126:5-6).

बी पेरण्याविषयी दुःखद काहींही नाहीं. त्यासाठीं कापणीपेक्षा जास्त श्रम लागत नाहीं. दिवस सुंदर असू शकतात. कापणीसाठीं मोठी आशा असू शकते.

तरीही स्तोत्र “अश्रूपूर्ण नेत्रांनी” पेरणी करण्याविषयी सांगते. ते म्हणते कीं कोणीतरी “पेरणीसाठीं बी घेऊन रडत बाहेर पडतो.” तर, ते का रडत आहेत?

मला वाटते कीं त्याचे कारण हे नाहीं कीं पेरणी करणे दुःखाचे आहे किंवा पेरणी कठीण आहे. मला असे वाटते कीं रडण्याचा संबंध पेरणीशी मुळीच नाहीं. पेरणी हे फक्त काम आहे जे आपल्याला तेव्हांही केलें पाहिजे जेव्हां आमच्यां जीवनात रडवणाऱ्या गोष्टी असतांत.

आमचे दुःख करणे समाप्त होईपर्यंत किंवा आमच्यां सर्व समस्यांचे निवारण केलें जाईपर्यंत पिके थांबणार नाहींत. जर आम्हांला पुढच्या हिवाळ्यात खायचे असेल, तर आम्हांला शेतात जावे लागेल आणि बी पेरावे लागेल, आम्हीं रडत असू वा नसू.

जर तुम्हीं असे करता, तर स्तोत्राचे अभिवचन हे आहे कीं तुम्हीं “हर्षाने कापणी कराल.” तुम्हीं “आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन” घरी याल. यासाठीं नाहीं कीं पेरणीच्या आसवांमुळे कापणीचा आनंद उत्पन्न होतो, तर निव्वळ पेरणीमुळे कापणी होते, आणि जरी तुमचे अश्रू तुम्हांला पेरणी सोडून देण्यास मोहात पाडत असले, तरीही तुम्हांला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.

तर, धडा हा आहेः जेव्हां साधी, सरळ कामे करावयाची असतात, आणि तुमचे अंतःकरण दुःखाने भरलेले असेल, आणि तुमची आसवे सहज वाहत असतील, तेव्हां पुढे जा आणि अश्रूंसोबतच कामे करा. वास्तववादी बना. आपल्या अश्रूंना म्हणा, “अश्रूंनो, मला तुमची जाणीव आहे. तुम्हीं माझ्यात जीवनाचा त्याग करण्याची इच्छा उत्पन्न करता. पण शेतात पेरणी करावयाची आहे (भांडी धुवायची, गाडी दुरूस्त करावयाची, उपदेश लिहावयाचा आहे).”

मग, देवाच्या वचनाच्या आधारे म्हणा, “अश्रूंनो, मला माहित आहे कीं तुम्हीं सदाकाळ टिकणार नाहीं. मी माझे काम (अश्रू आणि सर्व) करतो फक्त ही वस्तुस्थिती शेवटी आशीर्वादाची कापणी आणील. म्हणून, पुढे जा आणि जरूरी असेल तर वाहत रहा. पण माझा विश्वास आहे – जरी मला ते अद्याप दिसत नसले किंवा ते पूर्णपणे जाणवत नसले – तरी माझा विश्वास आहे कीं माझ्या पेरणीचे साधे काम कापणीच्या पेढ्या घेऊन येईल. आणि माझे अश्रू आनंदात बदलतील.”

12 April : शेवटी तुम्हीं पराभूत होऊं शकत नाहीं

Alethia4India
Alethia4India
12 April : शेवटी तुम्हीं पराभूत होऊं शकत नाहीं
Loading
/

“तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” (मत्तय 27:65).

जेव्हां येशू मेला आणि त्याला पुरण्यात आले, व त्याच्या कबरेवर मोठी धोंड ठेवण्यात आली, तेव्हां परूशी लोक पिलाताजवळ येऊन ती धोंड मोहरबंद करण्याची व कबरेवर पहारा देण्याची परवानगी मागू लागले.

त्यांनी आटोकाट प्रयत्न केला – पण व्यर्थच.

त्या वेळी ते आशारहित होते, आजही ते आशारहित आहे, आणि ते नेहमीच आशारहित असेल. त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरीही, लोक येशूला दाबून ठेवू शकत नाहींत. ते त्याला पुरलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाहींत.

हे समजणे कठीण नाहीं: तो मार्ग फोडून बाहेर येऊ शकतो कारण त्याला बळजबरीने आत टाकण्यात आले नाहीं. त्यानें स्वतःची निंदा होऊ दिली आणि छळ होऊ दिला आणि बहिष्कृत होऊ दिलें आणि तिरस्कार होऊ दिला आणि ठार करू दिलें.

”मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाहीं, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे” (योहान 10:17-18).

कोणी त्याला दाबून ठेवू शकत नाहीं कारण कोणीही त्याला खाली पाडलेले नाहीं. जेव्हां तो तयार होता तेव्हां त्यानें स्वतःला दिलें.

जेव्हां असे दिसते कीं तो पुरला गेला ते चांगल्यासाठींच, तेव्हां येशू अंधारात काहींतरी अद्भुत करीत आहे. “परमेश्वराचे राज्य असे आहे कीं, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाहीं.” (मार्क 4:26-27).

जगास वाटते कीं येशूचा अंत झाला – तो मार्गातून दूर झाला – पण येशू अंधारलेल्या जागी कार्य करीत आहे. ”गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाहीं तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.” (योहान 12:24). त्यानें स्वतःला पुरले जाऊ दिलें – “कोणीही (माझा प्राण) माझ्यापासून घेत नाहीं” – आणि जेव्हां आणि जेथे त्याला वाटेल तेव्हां तो सामर्थ्यानिशी बाहेर येईल – “तो परत घेण्याचाही अधिकार आहे.”

”त्याला देवानें मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.“ (प्रेषितांची कृत्ये 2:24). ”अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने“ येशूचे याजकपद अद्याप आहे (इब्री 7:16).

मागील वीस शतके, जगाने खूप प्रयत्न केला आहे – पण व्यर्थ. ते त्याला पुरू शकत नाहींत. ते त्याला आत धरून ठेवू शकत नाहींत. ते त्याला शांत करू शकत नाहींत किंवा मर्यादित करू शकत नाहींत. येशू जिवंत आहे आणि जेथे कोठे तो जाऊ इच्छितो तेथे जाण्यास व येण्यास तो पूर्णपणे स्वतंत्र आहे.

त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यासोबत जा, मग काहींही का असेना. तुम्हीं शेवटी पराभूत होऊं शकत नाहीं.

11April : थोर राजाचा द्राक्षरस

Alethia4India
Alethia4India
11April : थोर राजाचा द्राक्षरस
Loading
/

“कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाहीं, असा आपला प्रमुख याजक नाहीं, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.” (इब्री 4:15).

मी कोणालाही कधीही असे म्हणतांना ऐकलेले नाहीं, ”माझ्या जीवनाचे खरोखर गंभीर धडे सुख आणि विश्रांतीच्या समयातून आले आहेत.“ तर मी सुदृढ पवित्र जणांस असे म्हणतांना ऐकले आहे, ”देवाच्या प्रीतिच्या खोलीचे आकलन करून घेण्यासाठीं आणि त्याजबरोबर खोलवर वाढत जाण्यासाठीं मी केलेंली प्रत्येक महत्त्वाची वाटचाल दुःखातून आली आहे.”

हे एक गंभीर बायबलसंबंधीत सत्य आहे. उदाहरणार्थ:”इतकेच नाहीं, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठीं कीं, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.” (फिलिप्पै 3:8). अर्थ: वेदना नाहीं, तर लाभ नाहीं.

किंवा: आता मला जर त्याद्वारे ख्रिस्ताचा अधिक लाभ होत असेल, तर मग सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे.

येथे आणखी एक उदाहरण आहे: अर्थ: ”तो पुत्र असूनही त्यानें जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;” (इब्री 5:8). याच पुस्तकात असे म्हटलेंले आहे कीं त्यानें कधी पाप केलें नाहीं (इब्री 4:15).

म्हणून आज्ञाधारकपणा शिकण्याचा अर्थ हा नाहीं कीं अवज्ञेकडून आज्ञाधारकपणाकडें येतो. याचा अर्थ आज्ञाधारकपणाच्या अनुभवात देवासोबत अधिक खोलवर वाढत जाणे. याचा अर्थ देवाप्रत समर्पणाचा अनुभव करणे जो अन्यथा प्राप्त झाला नसता. दुःखातून हेच प्राप्त होते. वेदना नाहीं, तर लाभ नाहीं.

सॅम्युएल रदरफोर्डने म्हटलें कीं जेव्हां त्यांना दुःखाच्या कालकोठीत टाकण्यात आले तेव्हां त्यांना आठवले कीं थोर राजा नेहमी तेथे त्याचा द्राक्षरस ठेवत असे. चार्ल्स स्पर्जन यांनी म्हटलें, “दुःखाच्या समुद्रात डुबकीं मारणारे दुर्लभ मोती आणतात.”

जेव्हां तुम्हांला काहीं अनोख्या वेदना होतात ज्यामुळे तुम्हांला असे वाटते कीं कर्करोग झाला आहे तेव्हां तुम्हीं तुमच्या प्रिय व्यक्तीवर अधिक प्रीति करीत नाहीं का? आम्हीं खरोखर विचित्र प्राणी आहोत. जर आपल्याजवळ आरोग्य आणि शांती आणि प्रेम करण्यास वेळ असेल तर ती एक पातळ आणि घाईघाईची गोष्ट ठरू शकते. परंतु जर आपण मरणाच्या लागास असू, तर प्रेम ही एक अव्यक्त आनंदाची खोल, संथ नदी बनते, आणि आपण क्वचितच तिचा त्याग करणे सहन करू शकतो.

म्हणून, माझ्या बंधूं आणि भगिनींनो, “नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हां तुम्हीं आनंदच माना.” (याकोब 1:2).

10 April : योग्य लाज म्हणजें काय?

Alethia4India
Alethia4India
10 April : योग्य लाज म्हणजें काय?
Loading
/

तुम्हीं पापाचे गुलाम होता तेव्हां नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. (रोम 6:20-21)

जेव्हां त्याच्या पूर्वीच्या देवाचा अनादर करणाऱ्या वर्तनाविषयी ख्रिस्ती व्यक्तीचे डोळे उघडतात, तेव्हां ख्रिस्ती व्यक्तीला लाज वाटणे योग्यच आहे. पौल रोमच्या मंडळीस म्हणतो, “तुम्हीं पापाचे गुलाम होता …तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे?”

एके काळी आम्हीं अशाप्रकारे जगत होतो ज्याने देवाचा तिरस्कार होत होता याकडें मागे वळून पाहण्याची आणि वेदना अनुभव करण्याची एक योग्य जागा आहे. निश्चितच, यावर मनन करण्याद्वारे आम्हीं कमकुवत होता कामा नये. पण एक संवेदनशील हृदयाने तरूणपणाच्या मूर्खपणाचा परत विचार करून लाजेच्या प्रतिध्वनींचा अनुभव येवू नये असे होऊ शकत नाहीं, जरी प्रभूसोबत त्याचा सोक्षमोक्ष लावण्यात आलेला असला तरीही.

योग्यप्रकारे लाज वाटणे अत्यंत आरोग्यदायक आणि मुक्तीदायक आहे. पौलाने थेस्सलनीका येथील लोकांस लिहिले,  ”ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका“ (2 थेस्सल 3:14). याचा अर्थ जीवन-परिवर्तन होत असतांना पूर्वीच्या गोष्टींची लाज वाटणे हे योग्य आणि मुक्तीदायक पाऊल आहे, आणि आध्यात्मिक थंडपणा व पापाच्या ऋतूपासून विश्वासणाऱ्याच्या पश्चातापातही. कोणत्याही किंमतीत लाज टाळू शकत नाहीं. देवाच्या आपल्या लोकांसोबत त्याच्या व्यवहारात त्याचे एक महत्वाचे स्थान आहे.

आपण असा निष्कर्ष काढू शकतो कीं चुकींच्या लाजेसाठीं आणि योग्य अशा लाजेसाठीं पवित्र शास्त्राची कसोटी मूलतः परमेश्वर-केन्द्रित आहे.

चुकींच्या ठिकाणी असलेल्या लाजेसाठीं पवित्रशास्त्राची कसोटी म्हणते, ज्या गोष्टीमुळे देवाला मान मिळतो त्यासाठीं लाज वाटता कामा नये, मग इतर लोकांच्या नजरेत त्यामुळे तुम्हीं कितीही दुर्बळ किंवा मूर्ख अथवा चुकींचे का दिसेना. किंवा चुकींच्या लाजेची ही परमेश्वर केन्द्रित कसोटी लागू करण्याची एक दुसरी पद्धत : जोपर्यंत तुम्हीं एक प्रकारे वाईटात सहभागी होत नाहीं तोपर्यंत खरोखर लाजरवाण्या परिस्थितीमुळे लाज वाटून घेऊ नये.

योग्य लाजेची पवित्रशास्त्राची कसोटी म्हणते, देवाचा अनादर करणाऱ्या कोणत्याही गोष्टीत हात असल्याबद्दल लाज वाटू द्या, मग ते तुम्हांला इतरांच्या नजरेत कितीही बळकट किंवा शहाणे किंवा योग्य असल्यासारखे का दाखवत असेना.

आपल्याला लाज वाटली पाहिजे याचे कारण म्हणजें देवाचा अनादर करणाऱ्या वागणूकींसाठीं नापसंती होय. आपल्याला लाज वाटू नये याचे कारण म्हणजें देवाचा आदर करणारे वर्तन, जरी लोकांनी त्यासाठीं तुम्हांला लज्जित करण्याचा प्रयत्न का केला असेना.

9 April : केवळ देवाविषयी नव्हे, तर देवाशी बोला

Alethia4India
Alethia4India
9 April : केवळ देवाविषयी नव्हे, तर देवाशी बोला
Loading
/

मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाहीं, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. (स्तोत्र 23:4)

23 व्या स्तोत्राचे स्वरूप उद्बोधक आहे.

स्तोत्र 23:1-3 मध्ये दावीद देवाचा उल्लेख “तो” म्हणून करतो :

परमेश्वर माझा मेंढपाळ आहे;

तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो;

तो मला संथ पाण्यावर नेतो.

तो माझा जीव ताजातवाना करतो;

मग वचन 4 आणि 5 मध्ये दावीद देवाला “तू“ म्हणून संबोधतोः

मी…कसल्याही अरिष्टाला भिणार नाहीं, कारण तू माझ्याबरोबर आहेस;

तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.

तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस;

तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस;

मग वचन 6 मध्ये तो परत बदल करतो :

परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.

या स्वरूपातून जो धडा आपण शिकू शकतो तो हा कीं देवाशी न बोलता देवाबद्दल फार वेळ न बोलणे चांगले आहे.

प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती कमीत कमी एक ईश्वरविज्ञानाचा हौशी पंडित आहे – म्हणजें, असा व्यक्ती जो देवाचे चारित्र्य आणि मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर ते शब्दात मांडतो. जर आपण अल्प प्रमाणांत ईश्वरविज्ञानांत पारंगत नसलो तर आम्हीं देवाबद्दल एकमेकांना, किंवा देवाला काहींही बोलणार नाहीं आणि एकमेकांच्या विश्वासाला फारच कमी अशी खरी मदत होऊ.

पण स्तोत्र 23 आणि इतर स्तोत्रांमध्ये मी दाविदाकडून जे शिकलो ते हे आहे कीं मी माझ्या ईश्वरविज्ञानास प्रार्थनेची जोड द्यावी. देवाशी बोलण्याद्वारे मी वारंवार देवाबद्दलच्या माझ्या बोलण्यात व्यत्यय आणला पाहिजे.

“देव उदार आहे” या ईश्वरविज्ञानाच्या वाक्यामागे नाहीं, तर “देवा, तुझ्या औदार्याबद्दल धन्यवाद” हे प्रार्थनापूर्ण वाक्य यायला हवे.

“देव गौरवशाली आहे“ च्या टाचेवर, “मी तुझ्या गौरवाची उपासना करतो” हे आलें पाहिजे.

जर आपण आपल्या हृदयात देवाची वास्तविकता अनुभवत आहोत तसेच आपल्या डोक्यांत त्याचा विचार करत आहोत आणि आपल्या ओठांनी त्याचे वर्णन करत आहोत तर हे असेच असायला पाहिजे.