10 April : योग्य लाज म्हणजें काय?

Alethia4India
Alethia4India
10 April : योग्य लाज म्हणजें काय?
Loading
/

तुम्हीं पापाचे गुलाम होता तेव्हां नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. (रोम 6:20-21)

जेव्हां त्याच्या पूर्वीच्या देवाचा अनादर करणाऱ्या वर्तनाविषयी ख्रिस्ती व्यक्तीचे डोळे उघडतात, तेव्हां ख्रिस्ती व्यक्तीला लाज वाटणे योग्यच आहे. पौल रोमच्या मंडळीस म्हणतो, “तुम्हीं पापाचे गुलाम होता …तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे?”

एके काळी आम्हीं अशाप्रकारे जगत होतो ज्याने देवाचा तिरस्कार होत होता याकडें मागे वळून पाहण्याची आणि वेदना अनुभव करण्याची एक योग्य जागा आहे. निश्चितच, यावर मनन करण्याद्वारे आम्हीं कमकुवत होता कामा नये. पण एक संवेदनशील हृदयाने तरूणपणाच्या मूर्खपणाचा परत विचार करून लाजेच्या प्रतिध्वनींचा अनुभव येवू नये असे होऊ शकत नाहीं, जरी प्रभूसोबत त्याचा सोक्षमोक्ष लावण्यात आलेला असला तरीही.

योग्यप्रकारे लाज वाटणे अत्यंत आरोग्यदायक आणि मुक्तीदायक आहे. पौलाने थेस्सलनीका येथील लोकांस लिहिले,  ”ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका“ (2 थेस्सल 3:14). याचा अर्थ जीवन-परिवर्तन होत असतांना पूर्वीच्या गोष्टींची लाज वाटणे हे योग्य आणि मुक्तीदायक पाऊल आहे, आणि आध्यात्मिक थंडपणा व पापाच्या ऋतूपासून विश्वासणाऱ्याच्या पश्चातापातही. कोणत्याही किंमतीत लाज टाळू शकत नाहीं. देवाच्या आपल्या लोकांसोबत त्याच्या व्यवहारात त्याचे एक महत्वाचे स्थान आहे.

आपण असा निष्कर्ष काढू शकतो कीं चुकींच्या लाजेसाठीं आणि योग्य अशा लाजेसाठीं पवित्र शास्त्राची कसोटी मूलतः परमेश्वर-केन्द्रित आहे.

चुकींच्या ठिकाणी असलेल्या लाजेसाठीं पवित्रशास्त्राची कसोटी म्हणते, ज्या गोष्टीमुळे देवाला मान मिळतो त्यासाठीं लाज वाटता कामा नये, मग इतर लोकांच्या नजरेत त्यामुळे तुम्हीं कितीही दुर्बळ किंवा मूर्ख अथवा चुकींचे का दिसेना. किंवा चुकींच्या लाजेची ही परमेश्वर केन्द्रित कसोटी लागू करण्याची एक दुसरी पद्धत : जोपर्यंत तुम्हीं एक प्रकारे वाईटात सहभागी होत नाहीं तोपर्यंत खरोखर लाजरवाण्या परिस्थितीमुळे लाज वाटून घेऊ नये.

योग्य लाजेची पवित्रशास्त्राची कसोटी म्हणते, देवाचा अनादर करणाऱ्या कोणत्याही गोष्टीत हात असल्याबद्दल लाज वाटू द्या, मग ते तुम्हांला इतरांच्या नजरेत कितीही बळकट किंवा शहाणे किंवा योग्य असल्यासारखे का दाखवत असेना.

आपल्याला लाज वाटली पाहिजे याचे कारण म्हणजें देवाचा अनादर करणाऱ्या वागणूकींसाठीं नापसंती होय. आपल्याला लाज वाटू नये याचे कारण म्हणजें देवाचा आदर करणारे वर्तन, जरी लोकांनी त्यासाठीं तुम्हांला लज्जित करण्याचा प्रयत्न का केला असेना.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *