ArchivesSolid Joys

29 April : दिवस जवळ आला आहे

Alethia4India
Alethia4India
29 April : दिवस जवळ आला आहे
Loading
/

“रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे” (रोम 13:12)

दुःख भोगत असलेल्या ख्रिस्ती लोकांसाठीं ही आशा देणारी वचनें आहेंत. ज्या ख्रिस्ती लोकांना स्वतःच्या पापाचा तिटकारा वाटतो आणि पापापासून मुक्त होण्याची उत्कंठा बाळगत आहेत त्यांच्यासाठीं हे आशेचे अभिवचन आहे. जे इच्छा धरतात कीं अंतिम शत्रू, म्हणजें मृत्यूवर मात करून त्याला अग्नीच्या सरोवरात टाकले जावे त्या ख्रिस्ती लोकासाठीं हे आशेचे वचन आहे (प्रकटीकरण 20:14). वाह!

हें त्यां सर्वांसाठीं आशेचे अभिवचन कसे काय आहे?

“रात्र” अंधाराच्या या युगाचे आणि त्यातील सर्व पाप, दुःख आणि मरण यांचे प्रतीक आहे. आणि पौल याबद्दल काय म्हणतो? ”रात्र सरत आली आहे.” पापाचे आणि दुःखाचे आणि मृत्यूचे युग संपुष्टात येत आहे. नीतिमत्व आणि शांती आणि संपूर्ण आनंदाचा दिवस उदयास येत आहे.

तुम्हांला वाटेल कीं, “2,000 वर्षे दीर्घकालीक पहाटेसारखी वाटतात.” एका दृष्टिकोनातून हे तसेच आहे. आणि आम्हीं ओरडतो, हे परमेश्वरा, किती काळ हे असेच राहणार? परंतु पवित्र शास्त्राची विचारसरणी “किती काळ!” या विलापाच्या पलीकडें आहे. ती जगाच्या इतिहासाकडें वेगळ्या दृष्टीकोनाने पाहते.

मुख्य फरक हा आहे कीं “दिवस” – ख्रिस्ताचे नवीन युग – खरोखरच येशू ख्रिस्तामध्ये उदय पावले आहे. येशू हा या पतित युगाचा शेवट आहे. म्हणजें, या पतित युगाचा शेवट जसा त्यानें या जगात प्रवेश केला. येशू जेव्हां मेला आणि पुन्हा जिवंत झाला तेव्हां त्यानें पाप आणि वेदना आणि मृत्यू आणि सैतान यांचा पराभव केला. युगांची निर्णायक लढाई संपली आहे. राज्य आले आहे. सार्वकालिक जीवन आले आहे.

आणि जेव्हां दिवस उगवतो – जसे येशूच्या येण्याच्या वेळी होते – कोणीही दिवसाच्या येण्याबद्दल शंका करू नये. पहाटेने 2,000 वर्षे काढली तरीही नाहीं. 2 पेत्र 3:8 मध्ये पेत्राने म्हटल्याप्रमाणे, ”तरी प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्हीं विसरू नका कीं, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि ‘हजार वर्षे’ एका ‘दिवसासारखी’ आहेत.“ पहाट झालीं आहे. दिवस उगवला आहे.. सूर्य उगवून पूर्ण दिवस होण्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाहीं.

27 April : गाणाऱ्या देवाची मुलें

Alethia4India
Alethia4India
27 April : गाणाऱ्या देवाची मुलें
Loading
/

“मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडें निघून गेलें” (मार्क 14:26).

तुम्हीं येशूला स्तोत्र गातांना ऐकू शकता का?

तो खालच्या स्वरात गाऊ शकतो कीं उंच स्वरात? त्याच्या गाण्याची पद्धत ग्रामीण व्यक्ती सारखी दणकट होती का? कि तो एकदम सपष्ट सुरांत गात असें?

तो पित्याची स्तुति-गीतें गात असतांना आपले डोळे बंद करित असे का? किं तो आपल्या शिष्यांच्या डोळ्यांत पाहून आणि त्यांची खोल सौहार्द्राप्रत वाणी एकून स्मितहास्य करीत गात असे?

गीताची सुरूवात नेहमी तोंच करीत असे का? किं पेत्र वा याकोब, अथवा कदाचित मत्तय सुरूवात करीत असे?

ओह, येशूचे गाणे ऐकण्यासाठीं मी किती तळमळतोय! मला असे वाटते कीं जर त्यानें आमच्यां विश्वात त्याच्या मूळ आवाजात स्वर उंचविला असता तर ग्रह त्यांच्या कक्षेतून उसळी मारून बाहेर येतील. पण आपले एक राज्य आहे जे हलविता येत नाहीं; म्हणून, प्रभु, पुढे जा, आणि स्तोत्र गा!

ख्रिस्ती विश्वास हा स्तोत्रें गाणाराच विश्वास आहे. ख्रिस्ती विश्वासाच्या संस्थापकाने गायले. स्तोत्रें गाणे त्यानें आपल्या पित्याकडून शिकले. ते सनातन काळापासून एकत्र गात आहेत यांत शंका नाहीं. तुम्हांला असे वाटत नाहीं का? त्रिएक परमेश्वराची स्वतःमधील असलेली सहभागीता सार्वकालिक आनंदाचे स्तोत्र गाणार नाहीं का?

पवित्र शास्त्र म्हणते कीं जेव्हां आम्हीं स्तोत्रें गातो, आमचा उद्देश्य “आनंदाने उच्च स्वराने गायन करणे” हाच असतो (1 इतिहास 15:16). विश्वमंडळात परमेश्वरापेक्षा अधिक आनंद कोणालाही नाहीं. तो अतिशय आनंदित आहे. तो सनातन काळापासून त्याच्या स्वतःच्या परिपूर्णतेच्या विस्तीर्ण दृश्यात आनंदित आहे जी त्याच्या पुत्राच्या ईश्वरत्वात पूर्णपणे प्रतिबिंबित आहे.

देवाचा स्वतः मध्यें असलेला आनंद आमच्यां कल्पनेपलीकडें सामर्थ्यशाली आहे. तो परमेश्वर आहे. जेव्हां तो बोलतो, तेव्हां आकाशगंगा अस्तित्वात येतात. आणि जेव्हां तो आनंदाने गातो, तेव्हां विश्वाच्या सर्व पदार्थमात्रांत आणि गतीमध्ये अस्तित्वात असलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त उर्जा मुक्त होते.

जर त्यानें आपल्यासाठीं त्याच्याठायीं आपल्या हृदयाचा आनंद व्यक्त करण्यासाठीं स्तोत्रें गाणे नेमून दिलें आहे, तर त्याचे कारण हे नाहीं का कीं तो त्याच्या आत्म्याद्वारे त्याच्या पुत्रामध्ये त्याच्या स्वतःच्या स्वरूपात त्याच्या स्वतःच्या अंतःकरणाचा आनंद गाण्याद्वारे व्यक्त करणे जाणतो? आपण स्तोत्रें गाणारे लोक आहोत कारण आपण स्तोत्रें गाणाऱ्या देवाची लेकरें आहोत.

26 April : तुमची घडण ही देवासाठीं झालीं

Alethia4India
Alethia4India
26 April : तुमची घडण ही देवासाठीं झालीं
Loading
/

“परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाहीं, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केलें आहे.” (1 शमूवेल 12:22).

देवाचे नाव कित्येकदा त्याच्या प्रतिष्ठेचा, त्याच्या ख्यातीचा, त्याच्या नावलौकिकाचा, उल्लेख करते. आपण जेव्हां असे म्हणतो कीं एखादी व्यक्ती स्वतःचे नाव कमावित आहे तेव्हां आपण अशाच प्रकारे “नाव” या शब्दाचा उपयोग करतो. किंवा आम्हीं कधी कधी म्हणतो, ती “नावाची” एक प्रत किंवा ब्रँड आहे. आमच्यां म्हणण्याचा अर्थ एक मोठी प्रतिष्ठा असलेली प्रत किंवा ब्रँड. मला असें वाटते कीं जेव्हां शमूवेल म्हणतो कीं परमेश्वराने इस्राएली लोकांस “आपले” प्रजाजन केलें आहे आणि तो “आपल्या थोर नामास्तव” त्यांचा त्याग करणार नाहीं, तेव्हां 1 शमुवेल 12:22 मध्ये शमुवेलाच्या बोलण्याचा हाच अर्थ असावा.

देवाच्या नामाप्रीत्यर्थ त्याच्या उत्साहाविषयी विचार करण्याच्या या पद्धतीची इतर अनेक शास्त्रलेखांत पुष्टी झालीं आहे.

उदाहरणार्थ, यिर्मया 13:11 मध्ये देव इस्राएलाचे वर्णन कंबरेस लटकलेला पट्टा किंवा कमरबंद असे करतो, ज्याला देवानें आपले नाम, स्तुती व भूषण ह्यांस कारण व्हावे म्हणून निवडले, जरी अशी वेळ होती जेव्हां इस्राएल काहीं काळसाठीं अयोग्य ठरला होता.”इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केलें, तरी त्यांनी मानले नाहीं, असे परमेश्वर म्हणतो.“ इस्राएलास का निवडण्यात आले होते आणि देवाचे वस्त्र का ठरविण्यात आले होते? यासाठीं कीं त्यानें देवाचे “नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे.”

या संदर्भात “स्तुती” व “भूषण” हे शब्द आम्हांला सांगतात कीं “नावाचा” अर्थ “ख्याती” अथवा “नावलौकिकता” किंवा “प्रतिष्ठा” असा आहे. देवानें इस्राएलास निवडले यासाठीं कीं त्यांनी त्याचे गौरव (प्रतिष्ठा) प्रगट करावे. देव यशया 43:21 मध्ये म्हणतो कीं इस्राएल “मी आपल्यासाठीं निर्माण केलेंले लोक आहेत जे माझे स्तवन करतील.”

आणि जेव्हां नव्या करारात मंडळी स्वतःला खरे इस्राएल म्हणून पाहू लागली, तेव्हां पेत्राने आमच्यांसाठीं देवाच्या हेतूचे असे वर्णन केलें: “पण तुम्हीं तर ‘निवडलेला वंश… असे आहात; ह्यासाठीं कीं, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलें ‘त्याचे गुण तुम्हीं प्रसिद्ध करावेत’” (1 पेत्र 2:9).

दुसऱ्या शब्दात, इस्राएल आणि मंडळी देवानें यासाठीं निवडले कीं त्यांने जगात त्याचा नावलौकिक अथवा गौरव करावा. म्हणूनच आम्हीं सर्वप्रथम अशी प्रार्थना करतो, “तुझे नाव पवित्र मानले जावो” (मत्तय 6:9). याच कारणास्तव आम्हीं प्रार्थना करतो, “तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठीं मला नीतिमार्गांनी चालवतो” (स्तोत्र 23:3).

जेव्हां आम्हीं परमेश्वर-केंद्रिंत लोक असण्याविषयी बोलतो, तेव्हां लक्षात ठेवा, हे या कारणास्तव आहे कीं आम्हीं देवाच्या सहभागीतेत त्याच्या ‘परमेश्वर-केंद्रिंत’ उद्देशाने सहभागी होत आहोत. आणि वधस्तंभाच्या या बाजूला, याचा अर्थ आहे ख्रिस्तावर अवलंबिलेले, ख्रिस्ताला गौरव देणारे लोक असावे. “मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झालीं आहे” (1 योहान 2:12). “आणि बोलणे किंवा करणे जे काहीं तुम्हीं कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा” (कलस्सै 3:17)

25 April : पौलाचे तारण तुमच्यासाठीं होते

Alethia4India
Alethia4India
25 April : पौलाचे तारण तुमच्यासाठीं होते
Loading
/

कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्यानें विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केलें ते न समजून अविश्वासामुळे केलें, म्हणून माझ्यावर दया झालीं; आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीति ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झालीं. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झालीं“ (1 तीमथ्य 1:13-14,16).

पौलाचे परिवर्तन हे तुमच्यासाठीं होते. तुम्हीं ते ऐकले का? पुन्हा पहा: “जे युगानुयुगाच्या जीवनासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झालीं.” ते आम्हीं आहोत – म्हणजें, तुम्हीं आणि मी.

मला आशा आहे कीं तुम्हीं हे अगदी वैय्यक्तिकरित्या घ्याल. देवानें जेव्हां पौलाला निवडले आणि ज्याप्रकारे त्यानें आपल्या सार्वभौम कृपेद्वारे त्याला तारले तेव्हां हे सर्व त्यानें तुम्हांला लक्षात ठेऊन केलें.

जर तुम्हीं सार्वकालिक जीवनासाठीं येशूवर विश्वास ठेवता – अथवा जर तुम्हीं सार्वकालिक जीवनासाठीं त्याच्यावर आजही विश्वास ठेऊ शकता – तर पौलाचे परिवर्तन तुमच्यासाठीं आहे. ज्याप्रकारे त्याचे परिवर्तन घडून आले त्याचा मुद्दा तुम्हांला ख्रिस्ताचे अविश्वसनीय धैर्य हूबेहूब प्रगट करावे हा आहे.

लक्षात ठेवा कीं परिवर्तनापूर्वी पौलाचे जीवन येशूसाठीं एक दीर्घकालीक परीक्षा होती. “माझा छळ का करतोस?” दमिश्काच्या मार्गावर येशूनें विचारले (प्रेषितांची कृत्ये 9:4). “तुझे अविश्वासाचे आणि बंडखोरीचे जीवन हा माझा छळ आहे!” आणि तरीही पौल आम्हांला गलतीकरांस 1:15 मध्ये सांगतो कीं देवानें त्याला त्याच्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून त्याचा प्रेषित होण्यासाठीं वेगळे केलें. हे अद्भुत आहे. याचा अर्थ हा कीं त्याच्या परिवर्तनाच्या क्षणापर्यंत त्याचे संपूर्ण जीवन देवाशी एक दीर्घकालीक गैरवर्तन होते, येशूचा एक दीर्घकालीक अव्हेर आणि उपहास होता – ज्याने त्याला जन्मास येण्यापूर्वी प्रेषित होण्यासाठीं निवडले होते.

म्हणून पौल म्हणतो कीं त्याचे परिवर्तन येशूच्या धैर्याचे दैदित्यमान प्रदर्शन आहे. आणि तेच तो आज आम्हास देतो.

येशूनें पौलाला तारिले, व जेव्हां आणि ज्याप्रकारे त्यानें ते केलें, ते सर्व आम्हांला उदाहरण ठरावे यासाठींच. आम्हास “आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून” (1 तीमथ्य 1:16). अन्यथा आमचे धैर्य खचेल. अन्यथा आम्हीं असा विचार करू कीं तो खरोखर आम्हास तारू शकला नसता. कदाचित आम्हीं विचार करू कीं तो रागावू शकतो. कदाचित आम्हीं विचार करू कीं आम्हीं दूर निघून गेलो आहोत. कदाचित आम्हीं विचार करू कीं आमच्यां अतिप्रिय जणांचे परिवर्तन होऊ शकत नाहीं – येशूच्या सार्वभौम, ओसंडून वाहणाऱ्या कृपेद्वारे – अचानक, अनपेक्षितपणे.

24 April : क्षमेचे स्वतंत्र करणारे सामर्थ्य

Alethia4India
Alethia4India
24 April : क्षमेचे स्वतंत्र करणारे सामर्थ्य
Loading
/

“तुझ्या पापांची क्षमा झालीं आहे” (लूक 7:4).

परुश्याच्या घरी एक स्त्री रडत येशूजवळ येते आणि त्याचे पाय धूते. यात शंका नाहीं कीं जेव्हां शिमोनाने तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या डोळ्यांच्या खूणेने हे कळविले कीं ही स्त्री पापी आहे आणि येशूनें तिला त्यास स्पर्श करू देता कामा नये, तेव्हां तिला लाज वाटली असेल.

खरोखर, ती पापी होती. लज्जित होणे स्वाभाविक होते. पण जास्त काळ नाहीं.

येशूनें म्हटलें, “तुझ्या पापांची क्षमा झालीं आहे“ (लूक 7:48). आणि जेव्हां आमंत्रित लोक याविषयी कुरकुर करू लागले, तेव्हां त्यानें असे म्हणून तिच्या विश्वासास बळ दिलें, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा“ (लूक 7:50).

लज्जेच्या दुर्बळ प्रभावांशी लढा देण्यात येशूनें तिची कशी मदत केलीं? त्यानें तिला एक अभिवचन दिलें :  “तुझ्या पापांची क्षमा झालीं आहे! तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. तुझे भविष्य शांतीपूर्ण असेल.” त्यानें घोषणा केलीं कीं मागील पापांची क्षमा आता भावी शांती उत्पन्न करील.

म्हणून, तिच्यासाठीं मुद्दा होता देवाच्या भावी कृपेत विश्वास, जो येशूच्या क्षमा करण्याच्या कार्याच्या आणि स्वतंत्र करणाऱ्या शब्दाच्या अधिकारात मुळावलेला होता. आमच्यांपैकीं प्रत्येकाने योग्य क्षमेच्या प्रभावांशी याचप्रकारे लढा दिला पाहिजे – खोटी लज्जा नाहीं, पण अशी लज्जा ज्याची आम्हांला खरोखर जाणीव असली पाहिजे, पण अशी लज्जा जी फार काळ टिकून राहण्याची आणि आम्हास निर्बळ करण्यास कारणीभूत ठरते.

आम्हीं आम्हांला लज्जापूर्ण कृत्यांच्या प्राप्त झालेंल्या क्षमेद्वारे येणाऱ्या भावी कृपा आणि शांतीच्या अभिवचनांस धरून ठेऊन  दुर्बळ करणाऱ्या लज्जेच्या अविश्वासाला लढा दिला पाहिजे.

  • “तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायीं क्षमा आहे” (स्तोत्र 130:4)
  • “परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा; दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडें वळो म्हणजें तो त्याच्यावर दया करील; तो आमच्यां देवाकडें वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.” (यशया 55:6–7)
  • “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (1 योहान 1:9)
  • “त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात..” (प्रेषित 10:43)

आम्हा सर्वांना पाप-क्षमेची गरज आहे. आणि आम्हांला त्याची उद्या गरज भासेल. येशू ते आज आणि उद्या देण्यासाठीं मरण पावला. आज असो वा उद्या, वास्तविकता ही आहेर :  देवाची क्षमा आम्हांला आमच्यां भविष्यासाठीं स्वतंत्र करते. ती आम्हांला दुर्बळ करणाऱ्या लज्जेपासून मुक्त करते. क्षमा ही भावी कृपेने परिपूर्ण आहे.

जेव्हां आम्हीं भावी कृपेत, जी देवाच्या क्षमेत मुळावलेली आहे, विश्वासाद्वारे जगतो, तेव्हां आम्हीं त्या लज्जेच्या जी अनुभवण्यास आम्हीं पात्र आहोत, रेंगाळणाऱ्या, कमकूवत करणाऱ्या प्रभावापासून मुक्त होतो. क्षमेचा हाच अर्थ आहे.

23 April : आपल्या नगराचे हितचिंतन करा

Alethia4India
Alethia4India
23 April : आपल्या नगराचे हितचिंतन करा
Loading
/

सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेंल्यांना मी असे म्हणतो: तुम्हीं घरे बांधून त्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा; तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठीं परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित” (यिर्मया 29:4,5,7).)

जर बाबेल येथील देवाच्या बंदिवासातील लोकांसाठीं ते खरे होते, तर या “बाबेलसारख्या” जगातल्या ख्रिस्ती निर्वासितांसाठीं ते आणखी खरे ठरेल. मग आपण काय करावें?

ज्या सामान्य गोष्टी करण्याची गरज आहे त्या केल्या पाहिजेत: घरे बांधणे; त्यात राहणे; बाग लावणे. हे सर्व तुम्हीं खऱ्या राजासाठीं केलेंत आणि फक्त माणसांना खूश करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर हे तुम्हांला दूषित करत नाहीं.

देवानें तुम्हांला ज्या ठिकाणी पाठवले आहे त्या ठिकाणाचे हितचिंतन करा. देवानें तुम्हांला त्याच्या गौरवासाठीं पाठवले आहे असे आपणाविषयी माना. कारण तुम्हांला त्याच्या गौरवासाठींच पाठवले आहे.

तुमच्या शहराच्या वतीने देवाकडें प्रार्थना करा. शहरासाठीं मोठ्या आणि उत्तम गोष्टी घडाव्या म्हणून प्रार्थना करा. विनंती करा कीं ते देवाच्या सामर्थ्याने आणि त्याच्या गौरवाप्रीत्यर्थ घडावे. शहराला भौतिक समृद्धीची गरज आहे त्यापेक्षा हजारपटीने जास्त ज्या अंतिम चांगल्याची गरज आहे त्याकडें कधीही दुर्लक्ष करू नका. ख्रिस्ती लोक सर्व दुःखांची पर्वा करतात – विशेषतः शाश्वत दुःख. प्रत्येक शहराला भेडसावणारा या सर्वात मोठ्या संकटास सामोरे जावें लागेल.

परंतु देव किंवा त्याचे लोक शहराचे आरोग्य, सुरक्षा आणि समृद्धी आणि स्वातंत्र्य यांबाबत बेपर्वा नाहींत. आम्हा सर्वांना या गोष्टींची गरज आहे, आणि येशूनें म्हटलें, “तू तुझ्या शेजाऱ्यावर तुझ्यासारखी प्रीति कर” (मत्तय 22:39). खरे म्हणजें, प्रभु यिर्मयामध्ये म्हणतो कीं तुमच्या शहरावर प्रीति करणे हा स्वतःवर प्रीति करण्याचा एक मार्ग आहे: “त्या नगराचे हित ते तुमचे हित.”

याचा अर्थ असा नाहीं कीं आपण या जगांत प्रवासी म्हणून आपली दिशाभिमुखता सोडतो. पेत्र म्हणतो कीं ख्रिस्ती लोक “प्रवासी आणि परदेशवासी” आहेत (1 पेत्र 2:11) आणि पौल म्हणतो, “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे” (फिलिप्पै 3:20). वस्तुतः, या जगाच्या भुलविणाऱ्या आकर्षणांपासून स्थिरपणे दूर राहून आपण या जगाचे जास्तीत जास्त हित करू. “जे नगर पुढे येणार आहे” (इब्री 13:14) त्यातून आपली मूल्ये प्राप्त करण्याद्वारे आम्हीं आपल्या शहराची उत्तमप्रकारे सेवा करू. “वर असलेल्या यरूशलेम” चे नागरिक होण्यासाठीं आम्हीं आपल्या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना बोलावून आम्हीं आपल्या शहराचे सर्वात हितचिंतन करू (गलती 4:26).

तर, चला जगूया – शक्य तितके हितचिंतन करूया (1 पेत्र 2:12) – कीं स्थानिकांना आमच्यां राजाला भेटावेसे वाटेल-

22 April : निर्भय होण्याची पाच कारणे

Alethia4India
Alethia4India
22 April : निर्भय होण्याची पाच कारणे
Loading
/

“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.“ (लूक 12:32)

पैशाबद्दल किंवा जगाच्या इतर गोष्टींबद्दल आपण भिती धरता कामा नये अशी देवाची इच्छा आहे कारण ती निर्भयता – चिंतापासून मुक्ती – त्याच्याविषयी पाच महान गोष्टींत आपली वाढ करील.

प्रथम, भयभीत न होणे हे दाखवते कीं आपण देवाला आपला मेंढपाळ म्हणून मूल्यवान समझतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस.” आपण त्याचे कळप आहोत आणि तो आपला मेंढपाळ आहे. आणि जर तो आपला मेंढपाळ आहे, तर स्तोत्र 23:1 लागू होते: “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काहीं उणे पडणार नाहीं” – म्हणजें, मला खरोखर ज्या गोष्टीची गरज आहे त्यांची उणीव भासणार नाहीं.

दुसरे, न भिणे हे दाखवते कीं आम्हीं देवाला आपला पिता म्हणून मूल्यवान समजतो. “तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” आम्हीं फक्त त्याचे लहान कळप नाहीं; आम्हीं त्याची मुले सुद्धा आहोत आणि तो आमचा पिता आहे. त्याला खरोखर आमची काळजी आहे आणि आम्हांला काय हवे ते तो जाणतो आणि ज्याची तुम्हांला गरज आहे ते तुमच्याजवळ आहे याची खात्री करण्यासाठीं तो तुमच्यासाठीं कार्य करेल.

तिसरे, चिंता न करणे हे दाखवते कीं आपण देवाला राजा  म्हणून मूल्यवान समजतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” तो आम्हांला “राज्य” देऊ शकतो कारण तो राजा आहे. जो आमची तरतूद करतो त्यात हे सामर्थ्याचा एक प्रचंड घटक जोडते. “मेंढपाळ”  संरक्षण आणि तरतूद दर्शवितो. “पिता” प्रेम आणि सौम्यता आणि अधिकार आणि तरतूद आणि मार्गदर्शन. दर्शवितो. “राजा” सत्ता आणि सार्वभौमत्व आणि संपत्तीचा सूचक आहे.

चौथे, न भिणे हे दर्शविते कीं देव किती मोकळ्या स्वभावाचा आणि उदार आहे. लक्ष द्या, तो राज्य देतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.”  तो राज्य विकत नाहीं किंवा राज्य भाड्याने देत नाहीं किंवा राज्य भाडेपट्टीवर देत नाहीं. तो अतिशय श्रीमंत आहे आणि त्याला आमच्यांकडून मोबदला देण्याची गरज नाहीं. तर, देव उदार आहे आणि विपुलतेतून मुक्तहस्ते देतो. आणि जेव्हां आपण भीत नाहीं, तर आपल्या गरजांसाठीं त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हां आपण याविषयी त्याची वाखाणणी करतो.

शेवटी, न भिणे – काळजी न करणे – हे दर्शविते कीं देव ते खरोखर करू इच्छितो यावर आपण विश्वास ठेवतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” त्यामुळे त्याला आनद होतो. तो जळफळत नाहीं. आम्हांला राज्य देऊन तो आनंदित होतो. आमच्यां सर्वांचेच पिता असे नव्हते, ज्यांना प्राप्त करण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद वाटतो. पण ते दुःख आता मुख्य गोष्ट नाहीं, कारण आता तुम्हांला असा पिता, मेंढपाळ आणि राजा मिळू शकतो.

म्हणून, या वचनाचा मुद्दा असा आहे कीं आपण देवाला आपला मेंढपाळ आणि पिता आणि राजा म्हणून आपले धन समजले पाहिजे जो उदार होऊन आम्हास देवाचे राज्य देण्यात आनंद मानतो – आम्हांला स्वर्ग देण्यासाठीं, आम्हांला सार्वकालिक जीवन आणि आनंद देण्यासाठीं, आणि आम्हांला गरज असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठीं. तेथे जाण्यासाठीं जर आपण अशाप्रकारे देवाला आपले धन समजतो तर आपण निर्भय होऊ आणि देवाची उपासना केलीं जाईल.

21 April : आमुलाग्र प्रीतिची किल्ली

Alethia4India
Alethia4India
21 April : आमुलाग्र प्रीतिची किल्ली
Loading
/

”माझ्यामुळे जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.“ (मत्तय 5:11,12)

मत्तय 5:44 मधून आपल्या शत्रूंवर प्रीति करण्याविषयी संदेश देत असतांना जे प्रश्न मी विचारले त्यापैकीं एक होता, तुमचे अपहरण करणाऱ्या आणि मग तुमचा खून करणाऱ्या लोकांवर तुम्हीं कशी प्रीति कराल?

हे आम्हीं कसे करू शकतो? अशाप्रकारची प्रीति करण्याची सामर्थ्य कोठून येते? वास्तविक जगात जेव्हां ते प्रगट होते तेव्हां हे किती आश्चर्यकारक असते याचा विचार करा! ख्रिस्ताचे सत्य आणि सामर्थ्य आणि वास्तविकता प्रीतिपेक्षा इतर कुठल्या गोष्टीद्वारे दाखविली जाऊ शकतांत का?

माझा विश्वास आहे कीं येशू आम्हांला ह्या आमुलाग्र, आत्म-बलिदानात्मक प्रीतिची किल्ली देतो, जिचे वर्णन याच अध्यायात पूर्वी, मत्तय 5:44 मध्ये करण्यात आले आहे.

मत्तय 5:11 मध्ये, तो पुन्हा एकदा छळ होण्याविषयी बोलत आहे, जसा तो बोलत होता जेव्हां त्यानें मत्तय 5:44 मध्ये म्हटलें, “तुम्हीं आपल्या वैर्‍यांवर प्रीति करा,  आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात, त्यांच्यासाठीं प्रार्थना करा.“ या वचनांविषयी उल्लेखनीय हे आहे कीं येशू म्हणतो कीं तुम्हीं केवळ शत्रूचे गैरवर्तन सहन करण्यास समर्थच होऊ नका, तर तुम्हीं त्यात आनंदहि करा. “माझ्यामुळे जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करतील… तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा व उल्लास करा.”

आनंद करनें आपल्या वैर्‍यांसाठीं प्रार्थना करण्यापेक्षा किंवा त्यांचे कल्याण करण्यापेक्षा आमच्यां आटोक्याबाहेरचे वाटते. जर मी ही मानवीदृष्ट्या अशक्य गोष्ट करू शकलो – म्हणजें, छळ होत असतांना आनंद करणे – तर माझा छळ करणाऱ्यांवर प्रीति करणे शक्य होईल. जर अन्याय आणि यातना आणि हानीच्या दहशतीत आनंदाचा चमत्कार घडू शकला, तर गुन्हेगारांप्रीत्यर्थ प्रीतिचा चमत्कारही घडू शकतो.

येशू या वचनांमध्ये आम्हांला आनंदाची गुरुकिल्ली देतो. तो म्हणतो, “आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे” आनंदाची गुरुकिल्ली आहे देवाच्या भावी कृपेवर विश्वास ठेवणे –म्हणजें, देव तुमच्यासाठीं जे होण्याचे अभिवचन देतो त्यात समाधानी असणे. तो म्हणतो, “आनंद करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.” छळवनूक होत असतांना आपला आनंद म्हणजें दहशतीच्या या क्षणी परत येण्याचा आणि आम्हांला प्रीति करण्यासाठीं स्वतंत्र करण्याचा स्वर्गाचा आनंद. म्हणून, हा आनंद म्हणजें आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याचे मुक्त सामर्थ्य आहे जेव्हां ते आपला छळ मांडतात.

जर ते खरे असेल, तर प्रीति करण्याची आज्ञा म्हणजें स्वर्गातील गोष्टींवर आपले मन लावण्याची आज्ञा देखील आहे – देव आपल्यासाठीं जे बनण्याचे अभिवचन देतो – पृथ्वीवरील गोष्टींवर नाहीं (कलस्सै. 3:2).

आपल्या वैर्‍यांवर प्रेम करण्याची आज्ञा आमची आशा आणि आमच्यां जीवाचे सखोल समाधान आणि त्याचे सर्वात मोठे प्रतिफळ – त्याची भावी कृपा देवामध्ये शोधण्याची आज्ञा आहे. आमूलाग्र प्रेमाची किल्ली भावी कृपेत विश्वास आहे. आमच्यां वेदनेत आम्हास हे कळले पाहिजे कीं देवाची प्रीति “जीवनाहून उत्तम” आहे (स्तोत्र 63:3). आपल्या वैर्‍यांवर प्रीति केल्याने तुम्हांला स्वर्गात प्रतिफळ प्राप्त होत नाहीं. तर स्वर्गाचे प्रतिफळ जोपासल्याने वैर्‍यांवर प्रीति करण्याचे सामर्थ्य तुम्हास प्राप्त होते.

20 April : भटकून दूर जाण्याची भिती

Alethia4India
Alethia4India
20 April : भटकून दूर जाण्याची भिती
Loading
/

तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणाऱ्यांसाठीं मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केलें आहेस. (स्तोत्र 31:19).

स्तोत्र 31:19 मधील दोन महत्त्वपूर्ण सत्यांवर विचार करा.

1. देवाचा चांगुलपणा

देवाचे एक विशिष्ट चांगुलपण आहे. अर्थात, फक्त देवाचे ते सामान्य चांगुलपणच नव्हे जो तो सर्व लोकांवर प्रगट करतो, तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो (मत्तय 5:45), तर जसे स्तोत्र म्हणते, एक विशिष्ट चांगुलपण, “त्याचे भय धरणाऱ्यांसाठीं”.

हे चांगुलपण अमर्याद प्रमाणात थोर आहे. ते विपुल आहे. ते कायम टिकून राहते. ते सर्वसमावेशक आहे. जे त्याचे भय धरतात फक्त त्यांच्यासाठीं हे चांगुलपण आहे. सर्व काहीं त्यांच्या भल्याकरिता एकत्र मिळून कार्य करते (रोम 8:28) – रोम 5:3 आणि 5 नुसार त्यांच्या वेदना देखील सर्व-कल्याणकारक आहेत.

पण जे त्याचे भय धरत नाहींत त्यांना तात्पुरता चांगुलपणा लाभतो. रोमकरांस 2: 4 आणि 5 याचे असे वर्णन करते: ”किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडें नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? कीं, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठीं स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?” ममता. क्षमा. सहनशीलता. चांगुलपण. पण ते परमेश्वराचे भय धरतांत म्हणून नव्हे तर त्यांच्या हटवादीपणामुळें.

हे पहिले सत्य आहेः परमेश्वराचे चांगुलपण. 

2. परमेश्वराचे भय

परमेश्वराचे भय म्हणजें त्याच्यापासून भटकून दूर जाण्याचे भय आहे. त्यामुळे, ते देवाचा आश्रय घेण्यात व्यक्त होते. म्हणूनच स्तोत्र 31:19 मध्ये दोन अटींचा उल्लेख केलेंला आहे – परमेश्वराचे भय बाळगणे आणि त्याच्याठायीं आश्रय घेणे. “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणारयांकरता तू ते 1) साठवून ठेवले आहेस, 2) तुझा आश्रय करणणाऱ्यांसाठीं मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केलें आहेस.” ते विरुद्ध असल्यासारखे वाटतात. भय दूर सारत असल्यासारखे वाटते आणि आश्रय घेणे जवळ ओढल्यासारखे वाटते. परंतु जेव्हां आपण पाहतो कीं हे भय पळून जाण्याचे भय आहे – त्याजपासून दूर भटकून जाण्याचे भय आहे – तेव्हां ते एकत्र काम करतात.

पवित्र जणांच्या अंतःकरणात खरा थरकाप असतो. ”भीत व कापत आपले तारण साधून घ्या.“ (फिलिप्पै 2:12). पण हा थरकाप त्या पित्याच्या बाहूंत वाटणारा थरकाप आहे ज्याने नुकतेच आपल्या मुलाला समुद्राच्या पृष्ठभागाखालील प्रवाहातून बाहेर काढले आहे. आम्हांला पित्याची गरज नाहीं हा विचार करण्याच्या भयंकर संभावनेचा हा थरकाप आहे.

म्हणून, देवाच्या चांगुलपणाची जोपासणूक करा. त्याच्यापासून भटकून दूर जाण्याच्या विचाराने भयभीत व्हां. प्रत्येक पापापासून पळ काढा आणि त्याच्याठायीं आश्रय घ्या. “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणाऱ्यांसाठीं मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केलें आहेस!”

19 April : विफल झालेंल्यांचे भविष्य

Alethia4India
Alethia4India
19 April : विफल झालेंल्यांचे भविष्य
Loading
/

“भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्हीं केलें आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडें वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काहीं लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाहीं त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत. परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाहीं, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केलें आहे.” (1 शमुवेल 12:20-22).

जेव्हां इस्राएली लोकांना त्यांनी शमुवेलाला इतर राष्ट्रांप्रमाणे राजा मिळावा म्हणून अशी मागणी केल्याबद्दल भयभीत केलें केलें आणि त्यांनी केलेंल्या पापाबद्दल पश्चात्ताप करण्यास सांगितले, तेव्हां ही चांगली बातमी येतेः “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्हीं केलें आहे खरे.” ते किती उलट वाटते हे तुम्हीं ऐकता का – किती अद्भुतरित्या उलट? तुंम्हाला वाटेल त्यानें असे म्हणावयाला पाहिजे होते, “भीती बाळगा, कारण हे दुष्कर्म तुम्हीं केलें आहे.” हे घाबरण्याचे उत्तम कारण आहेः देवाशिवाय दुसरा राजा मागण्याचे मोठे दुष्कृत्य तुम्हीं केलें आहे! पण शमूवेलाने तसे म्हटलें नाहीं. “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्हीं केलें आहे खरे.”

पुढे तो असे म्हणतो, “पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडें वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काहीं लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाहीं त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत.”

ही ती सुवार्ता आहे: तुम्हीं महा पाप केलें खरे, आणि परमेश्वराचा भयंकर अनादर केला खरे, जरी तुम्हांला आता एक राजा मिळाला आहे ज्याची मागणी करण्याचे दुष्कर्म तुम्हीं केलें होते, जरी त्या पापास किंवा त्याचे दुःखदायक परिणाम जे अद्याप तुमच्यावर प्रगट झालें नाहींत, परत बदलता येत नाहीं, तरीही एक भविष्य आणि आशा आहे. तुम्हांवर दया केलीं जाईल.

भिऊ नका! भिऊ नका!

मग 1 शमुवेल 12:22 मध्ये सुवार्तेचा मोठा आधार येतो – सुवार्तेचा आधार आणि पाया. हे सर्व दुष्कर्म करूनही तुम्हांला भिण्याची गरज का नाहीं? “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाहीं, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केलें आहे.”

देवाची त्याच्या स्वतःच्या नामास्तव असलेली वचनबद्धता सुवार्तेचा आधार आहे. तुम्हांला हे कळलें का? तुम्हीं पाप केलें असले तरी भिऊ नका, “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाहीं.” याचा तुमच्यावर दोनप्रकारे परिणाम घडून यायला पाहिजे : अंतःकरण विदारून टाकणारी नम्रता आणि पायांनी नृत्य करावा इतका आनंद. नम्रता कारण तुमच्या तारणाचा पाया तुमची योग्यता नाहीं. आनंद कारण तुमचे तारण हे देवाच्या स्वतःच्या थोर नामास्तव असलेल्या निष्ठेइतकेच खात्रीलायक आहे. हि खात्री आमच्यां कल्पनेपलीकडें आहे.