ArchivesSolid Joys

22 June : आपण पावित्रीकरणासाठीं कसे लढावे?

Alethia4India
Alethia4India
22 June : आपण पावित्रीकरणासाठीं कसे लढावे?
Loading
/

सर्वांबरोबर ‘शांततेनें राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाहीं ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’. (इब्री 12:14)

एक व्यावहारिक पवित्रता आहे ज्यावाचून आम्हांला प्रभूला पाहता येत नाहीं. अनेक लोक असें जगतात जणू काहीं अशी काहीं गोष्ट नाहीं.

असें तथाकथित ख्रिस्ती आहेत जे असें अपवित्रतेचे जीवन जगतात कीं त्यांच्या कानी येशूचे हे भयानक शब्द पडतील, “मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.” (मत्तय 7:23). पौल अशा तथाकथित विश्वासणार्यांस म्हणतो, “कारण जर तुम्हीं देहस्वभावाप्रमाणें जगलात तर तुम्हीं मरणार आहात” (रोम 8:13).

तर अशाप्रकारची पवित्रता आहे जिच्यावाचून कोणीही देवाला पाहू शकणार नाहीं. आणि भविष्यातील कृपेत विश्वासानें पवित्रतेसाठीं लढा देण्यास शिकणें हे अत्यंत महत्वाचे आहे.

पवित्रतेचा पाठपुरावा करण्याचा आणखी एक मार्ग आहे ज्याचे परिणाम अप्रिय आहेत आणि तो मार्ग मृत्यूकडें घेऊन जातो. पौल आपल्यांला देवाच्या सामर्थ्य पुरविणाऱ्या कृपेवर विश्वास ठेवण्यावाचून दुसऱ्या कुठल्याही मार्गानें त्याची सेवा करण्याविरुद्ध ताकींद देतो. “माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेंही नाहीं; कारण जीवन, प्राण व सर्वकाहीं तो स्वतः सर्वांना देतो.” (प्रेषितांची कृत्ये 17:25). देवाची सेवा करण्याचा कोणताही असा प्रयत्न जो आमच्यां अंतःकरणाचे प्रतिफळ व आमच्यां सेवेचे सामर्थ्य म्हणून त्याच्यावर अवलंबून राहत नाहीं, तो प्रयत्न एक गरजवंत अन्यधर्मीय देव म्हणून त्याचा अनादर करेल.

पेत्र देवाच्या अशा स्वावलंबी सेवेच्या पर्यायाचे वर्णन करतो, “सेवा करणाऱ्यानें, ती आपण देवानें दिलेंल्या शक्तीनें करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारें व्हावा” (1 पेत्र 4:11). आणि पौल म्हणतो “ख्रिस्तानें माझ्या हातून न घडवलेलें काहीं सांगण्याचे धाडस मी करणार नाहीं” (रोम 15:18; 1 करिंथ 15:10 सुद्धा पहा).

क्षणोक्षणी, देवानें आमच्यांसाठीं ठरवलेलें, “प्रत्येक चांगलें काम” करण्यासाठीं आम्हांला सामर्थ्य पुरविण्याकरिता कृपा प्रगट होते. “सर्व प्रकारची कृपा तुमच्यांवर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठीं कीं, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेंहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठीं सर्वकाहीं तुमच्यांजवळ विपुल व्हावे” (2 करिंथ 9:8).

चांगल्या कार्यांसाठीं लढा हा भविष्यातील कृपेच्या अभिवचनांवर विश्वास ठेवण्याचा लढा आहे.

21 June : पापाचा पराजय करणारे समाधान

Alethia4India
Alethia4India
21 June : पापाचा पराजय करणारे समाधान
Loading
/

येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडें येतो त्याला कधीही भूक लागणार नाहीं आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाहीं. (योहान 6:35)

येथे आम्हास जे पाहण्याची गरज आहे ते हे कीं विश्वासाचा सार हाच कीं ख्रिस्ताठायी देव आमच्यांसाठीं जे काहीं आहे त्यांत संतुष्ट असणें.

अशाप्रकारे विश्वासाची व्याख्या केल्यांनें दोन गोष्टीं महत्वाच्या ठरतात. त्यांत पहिली गोष्ट ही कीं विश्वास हा देव-केंद्रित असतो. आम्हीं केवळ देवाच्या अभिवचनांत समाधानी राहत नाहीं, तर येशूमध्यें स्वतः देव आमच्यांसाठीं जो कोणी आहे त्यां सर्व गोष्टींत आम्हीं समाधानी राहतो. विश्वास मान्य करतो कीं ख्रिस्तामध्यें देवच आमचे वतन आहे – फक्त देवाची अभिवचन-दत्त कृपादानें नव्हे.

विश्वास आपली आशा फक्त येणाऱ्या युगाच्या स्थावर मालमत्तेवर ठेवत नाहीं, तर देव तेथे असेल या वस्तुस्थितीवर तो पोषण पावतो (प्रकटीकरण 21:3). “आणि मी राजासनातून आलेंली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’”

आणि आता सुद्धा विश्वास अत्यंत आवर्जून जी गोष्ट स्वीकार करतो ती म्हणजें क्षमा झालेंल्या पापांची केवळ वास्तविकता नव्हे (ते कितीही मौल्यवान असलें तरीही), तर आमच्यां अंतःकरणांमध्यें जिवंत ख्रिस्ताचे सान्निध्य आणि स्वतः देवाची पूर्णता होय. इफिस 3:17-19 मध्यें पौल प्रार्थना करतो कीं “ख्रिस्तानें तुमच्यां अंतःकरणामध्यें तुमच्यां विश्वासाच्या द्वारें वस्ती करावी… असें कीं तुम्हीं देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.”

विश्वासाची व्याख्या करतांना येशूठायी आमच्यांसाठीं देव जो काहीं आहे त्यात संतुष्ट म्हणून ज्या आणखी एका गोष्टीवर जोर दिला गेला आहे तो शब्द आहे “समाधान.” विश्वास म्हणजें देवाच्या झऱ्याजवळ येऊन आत्म्याची तहान भागवणें. योहान 6:35 मध्यें आपण पाहतो कीं “विश्वास ठेवण्याचा” अर्थ “जीवनाची भाकर” खाण्यासाठीं आणि “जिवंत पाणी” जो स्वतः येशू होय (योहान 4:10,14), पिण्यासाठीं येशूजवळ येणें होय.

पापमय आकर्षणांचे गुलाम बनविणारे सामर्थ्य तोडणाऱ्या विश्वासाच्या सामर्थ्याचे रहस्य येथे आहे. जर अंतःकरण येशूमध्यें देव आपल्यांसाठीं जे काहीं आहे त्या सर्व गोष्टींत समाधानी असेल, तर आपल्यांला ख्रिस्ताच्या बुद्धीपासून दूर मोहित करणारे पापाचे सामर्थ्य निशस्त्र झालें आहे. 

20 June : कृपा ही क्षमा आहे – आणि सामर्थ्य

Alethia4India
Alethia4India
20 June : कृपा ही क्षमा आहे - आणि सामर्थ्य
Loading
/

तरी जो काहीं मी आहे तो देवाच्या कृपेनें आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असें नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेनें केलें. (1 करिंथ 15:10)

कृपा ही आम्हीं पाप केल्यांनंतर मिळणारी केवळ दया नव्हे. कृपा पाप न करण्यासाठीं सामर्थ्य देणारे देवाचे कृपादान आणि सामर्थ्य आहे. कृपा ही सामर्थ्य आहे, केवळ पापक्षमा नव्हे.

हे स्पष्ट आहे, उदाहरणार्थ, 1 करिंथ 15:10 मध्यें पौल कृपेचे वर्णन त्याच्या कार्याचे समर्थ बनविणारे सामर्थ्य म्हणून वर्णन करतो. त्याच्या पापांची ती केवळ क्षमा नाहीं; आज्ञाधारकपणांत पुढे वाढत जाण्याचे ते सामर्थ्य आहे. “परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असें नाहीं, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेनें केलें.

म्हणून, देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठीं जी धडपड आपण करतो ती आम्हीं आपल्यां स्वतःच्या शक्तीनें केलेंला प्रयत्न नसतो, “देवानें दिलेंल्या शक्तीनें – ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारें व्हावा” (1 पेत्र 4:11). हे विश्वासाचे आज्ञापालन होय. आम्हीं जे केलें पाहिजे ते करण्यासाठीं आम्हांला सामर्थ्य पुरविणारी देवाची क्षणाक्षणाला प्रकट होणारी कृपापूर्ण शक्ती.

याची पुष्टी पौल 2 थेस्सल 1:11-12 मध्यें करतो आणि आमच्यां चांगुलपणाच्या सर्व कार्यांस तो “विश्वासाचे कार्य” म्हणतो, आणि तसे म्हणण्याद्वारें येशूला जे गौरव प्राप्त होते ते “आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेनें” आहे कारण हे त्याच्या “सामर्थ्यानें” घडते. खालील सर्व वाक्प्रचार ऐका :

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यांसाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्यां देवानें तुम्हांला झालेंल्या ह्या पाचारणाला योग्य असें मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्यानें पूर्ण करावे; ह्यासाठीं कीं, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेनें आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्यां ठायी व तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा.

ज्या आज्ञाधारकपणामुळें देवाला आनंद होतो तो विश्वासाद्वारें देवाच्या कृपेच्या सामर्थ्यानें उत्पन्न होतो. ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक पातळीवर हीच शक्ती कार्य करते. विश्वासाद्वारें तारणारे देवाच्या कृपेचे सामर्थ्य (इफिस 2:8) देवाच्या कृपेचे तेच सामर्थ्य आहे जे विश्वासाद्वारें पवित्रहि करते.

19 June : मनुष्याचे भय धरण्याचा अपराध

Alethia4India
Alethia4India
19 June : मनुष्याचे भय धरण्याचा अपराध
Loading
/

तेव्हां शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केलें आहे; मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्यां शब्दाचे उल्लंघन केलें आहे; कारण मी लोकांना भिऊन त्यांचे म्हणणें ऐकलें. (1 शमुवेल 15:24)

शौलानें देवाचे म्हणणें ऐकण्याऐवजी लोकांचे म्हणणें का ऐकलें? कारण त्याला देवाऐवजी लोकांची भीती होती. त्याला अवज्ञेच्या दैवीय परिणामांची जितकीं भीती होती त्यापेक्षा अधिक भीती आज्ञापालनानें पुढे मानवीय परिणाम काय होतील याची होती. देवाच्या नाराजीपेक्षा त्याला लोकांच्या नाराजीचे अधिक भय होते. आणि हा देवाचा फार मोठा अपमान आहे.

वस्तुतः, यशया म्हणतो कीं देवाच्या अभिवचनांकडें दुर्लक्ष करून मनुष्य काय करूं शकतो याची भीती धरणें एक प्रकारचा अहंकार आहे. तो ह्या मर्मभेदी प्रश्नानें देवाचे शब्द उद्धृत करतो: “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण? परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस?” (यशया 51:12-13).

मनुष्याचे भय गर्वासारखे वाटत नसेल, पण देव म्हणतो कीं ते आहे, “तू  मनुष्याला, मानवपुत्राला भितेस अशी तू कोण! परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस?”

मुद्दा हा आहे : जर तुम्हीं मनुष्याचे भय धरता, तर तुम्हीं देवाच्या आणि त्याचा पुत्र, येशू याच्या पवित्रतेचा, त्याच्या मूल्याचा नाकार करणें सुरू केलें आहे. देव मनुष्यापेक्षा अतिशय बलवान आहे. तो अत्यंत बुद्धीमान आणि प्रतिफळ आणि आनंद यांनी अमर्यादपणें परिपूर्ण आहे.

मनुष्य काय करूं शकतो या भीतीनें त्याजकडें पाठमोरे होण्याचा अर्थ देव जे त्याचे भय बाळगतात त्यांच्यासाठीं जे अभिवचन देतो ते सर्व फेटाळून लावणें होय. हा मोठा अपमान आहे. आणि अशा अपमानामुळें देव प्रसन्न होऊ शकत नाहीं.

दुसरीकडें, जेव्हां आपण देवाची अभिवचनें ऐकतो आणि आमच्यां अविश्वासामुळें देवाची निंदा होईल या भीतीनें त्याच्यावर धैर्यानें विश्वास ठेवतो, तेव्हां त्याला खूप आदर मिळतो. आणि त्यात त्याला खूप खूप आनंद होतो.

18 June : विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठीं विनंती कशी करावी?

Alethia4India
Alethia4India
18 June : विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठीं विनंती कशी करावी?
Loading
/

बंधुजनहो, त्यांच्याविषयीं माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे कीं, त्यांचे तारण व्हावे. (रोम 10:1)

पौल प्रार्थना करतो कीं देवानें इस्राएलाचे तारण करावे. तो त्यांच्या तारणासाठीं प्रार्थना करतो. तो अशी प्रार्थना करीत नाहीं जिचा प्रभावीपणा परिणामशून्य आहे, तर तो अशी प्रार्थना करतो जी प्रभावशाली आहे. आणि आम्हीं देखील अशीच प्रार्थना केली पाहिजे.

आपण देवाच्या नवीन कराराची अभिवचनें घेऊन देवाजवळ विनवणी केली पाहिजे कीं त्यानें ती विनंती आमच्यां मुलांमध्यें आणि आमच्यां शेजार्ंयामध्यें आणि जगाच्या सर्व मिशन क्षेत्रांत पूर्ण करावी.

  • परमेश्वरा, त्यांच्या शरीरातून पाषाणहृदय काढून त्यांस मांसाचे नवीन हृदय दे. (यहेज्केल 11:19)
  • त्यांच्या हृदयाची सुंता कर यासाठीं कीं त्यांनी तुजवर प्रीती करावी! (अनुवाद 30:6).
  • पित्या, त्यांच्याठायी तुझा आत्मा घाल आणि तुझ्या नियमांत त्यांस चालव. (यहेज्केल 36:27)  
  • त्यांस पश्चाताप आणि सत्याचे ज्ञान दे यासाठीं कीं त्यांनी सैतानाच्या पाशातून सुटावे (2 तीमथ्य 2:25-26)
  • त्यांची अंतःकरणें उघड यासाठीं कीं त्यांनी सुवार्तेवर विश्वास करावा! (प्रेषितांची कृत्ये 16:14)

जेव्हां आपण देवाच्या सर्वाभौमत्वावर विश्वास ठेवू – कठोर पातकीं लोकांस निवडण्याच्या आणि मग त्यांना विश्वास आणि तारणाप्रत आणण्याच्या देवाच्या अधिकारावर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवू – तेव्हां आपण विसंगतीवाचून, आणि हरविलेंल्यांच्या परिवर्तनासाठीं पवित्र शास्त्रातील थोर अभिवचनांच्या खात्रीनें  प्रार्थना करण्यात समर्थ होऊ.

अशाप्रकारे, देवाला या प्रकारच्या प्रार्थनेंत प्रसन्नता वाटते कारण त्याद्वारें त्याला स्वतंत्र आणि सार्वभौम परमेश्वर म्हणून, जो तो तारण आणि निवडीबाबत आहे, अधिकार व आदर प्राप्त होतो.

17 June : देवाला कशाप्रकारची प्रार्थना प्रसन्न करते

Alethia4India
Alethia4India
17 June : देवाला कशाप्रकारची प्रार्थना प्रसन्न करते
Loading
/

“पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचनें ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडें मी पाहतो.” (यशया 66:2)

दीन व भग्न अंत:करणाची प्रथम ओळख ही आहे कीं ते देवाचे वचन ऐकून कंपायमान होते.

यशया 66 अशा कांही लोकांना संबोधून आहे ज्यांपैकीं काहीं अशाप्रकारे उपासना करतात जी देवाला प्रसन्न करते, आणि काहीं जे अशाप्रकारे उपासना करतात ज्यानें तो प्रसन्न होत नाहीं. तिसरे वचन अशा दुष्ट मनुष्याचे वर्णन करते जो असें अर्पण घेऊन येतो : “जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय.” त्यांच्या यज्ञार्पणांचा देवाला तिटकारा आहे – जे मनुष्यवधासमान आहेत. का?

चौथ्या वचनात देव स्पष्ट करतो, “कारण मी हाक मारली तेव्हां कोणी उत्तर दिलें नाहीं, मी बोललो तेव्हां त्यांनी माझें ऐकलें नाहीं.” त्यांच्या यज्ञार्पणांचा देवाला तिटकारा होता कारण त्या लोकांनी त्याच्या वाणीकडें दुर्लक्ष केलें. पण त्या लोकांचे काय ज्यांच्या प्रार्थना देवानें ऐकल्या? देव दुसऱ्या वचनात असें म्हणतो, “पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचनें ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडें मी पाहतो.”

या वचनावरून मी असा निष्कर्ष काढतो कीं सरळ अंत:करण असलेंल्या मनुष्याची, ज्याच्या प्रार्थना देवाला प्रसन्न करणार्या असतांत, प्रथम ओळख ही आहे कीं तो वचन ऐकून कंपायमान होतो. हेंच ते लोग आहेत ज्यांच्याकडें परमेश्वर पाहतो.

म्हणून, सरळ मनुष्याची प्रार्थना जी देवाला प्रसन्न करते ती अशा अंतःकरणातून येते जे सर्वप्रथम परमेश्वराच्या सान्निध्यात कंपायमान होते. देवाचे वचन ऐकून ते कंपायमान होते, कारण त्याला देवाच्या आदर्शापासून दूर असल्यासारखे आणि त्याच्या निर्णयापुढे अत्यंत दुर्बळ असल्यासारखे आणि अतिशय लाचार असल्यासारखे वाटते आणि आपण अपयशी आहोत याची त्याला खंत जाणवते.

दावीदानें स्तोत्र 51:17 मध्यें अगदी हेच म्हटलें, “देवाचे यज्ञ म्हणजें भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहींस.” पहिली गोष्ट जिच्यामुळें प्रार्थना देवाला स्वीकारणीय होते ती म्हणजें प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचे भग्नहृदय आणि नम्रता. तो त्याचे वचन ऐकून कंपायमान होतो.

16  June : तहानलेल्यां अंत:करणानें देवाची सेवा करा

Alethia4India
Alethia4India
16  June : तहानलेल्यां अंत:करणानें देवाची सेवा करा
Loading
/

म्हणून आम्हीं गृहवासी असलो किंवा दूर आलेलें असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. (2 करिंथ 5:9)

काय होईल जर तुम्हांला असें आढळून आलें (जसे परूश्यांना आढळलें) कीं तुम्हीं तुमचे संपूर्ण जीवन देवाला प्रसन्न करण्यात  घालविलें होते, पण त्याचवेळी तुम्हीं अशा गोष्टी सुद्धा करत होता ज्या देवाच्या दृष्टीत किळसवाण्या आहेत (लूक 16:14-15)?

कोणी यावर आक्षेप घेऊन असें म्हणू शकतो, “मला नाहीं वाटत कीं हे शक्य आहे; जो मनुष्य आयुष्यभर देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करित होता तो त्या व्यक्तीचा अव्हेर करणार नाहीं.” पण असा आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीनें काय केलें आहे ते तुम्हीं पाहता का? देवाला काय प्रसन्न करेल या विषयींची त्याची खात्री देव कसा असावा या त्याच्या कल्पनेंवर आधारित आहे. अगदी याच कारणास्तव आपण सर्वप्रथम पवित्र शास्त्रात प्रगट झालेलें देवाचे चरित्र समजून घेतलें पाहिजें.

देव पर्वतावरील झरा आहे, पाण्याचे द्रोण नाहीं. पर्वतवरील झरा स्वतः भरणारा असतो. तो सतत ओसंडून वाहतो आणि इतरांस पाणी पुरवितो. पण पाण्याचे द्रोण एकतर पंपानें भरावे लागते किंवा बादलीनें भरावे लागते. म्हणून, मोठा प्रश्न हा आहे: तुम्हीं झऱ्याची सेवा कशी करता? आणि: तुम्हीं पाण्याच्या द्रोणाची सेवा कशी करता? देवानें स्वत:ला जसें वास्तविकपणें प्रकट केलें आहे त्या ज्ञानाला शोभेल तसे तुम्हीं त्याचे गौरव कसे कराल?

जर तुम्हांला पाण्याच्या द्रोणाच्या मोलाचे गौरव करायचे असेल, तर तुम्हीं ते परिपूर्ण आणि उपयोगी ठेवण्यासाठीं कठोर परिश्रम करता. पण जर तुम्हांला एखाद्या झऱ्याच्या मोलाचे गौरव करायचे असेल, तर तुम्हीं ते करण्यासाठीं हात टेकून आणि गुडघे टेकून आपल्यां मनाचे समाधान होईपर्यंत त्यांतून पिता, जोपर्यंत तुम्हांला ताजेतवानें वाटत नाहीं आणि परत खोर्यात जाऊन लोकांना हे सांगत नाहीं कीं तुम्हांला काय आढळलें आहे.

एक नाऊमेद पापी म्हणून माझी आशा पवित्र शास्त्रातील या सत्यावर टिकलेंली आहे : कीं परमेश्वर असा परमेश्वर आहे जो मी देऊ करायच्या असलेंल्या एका गोष्टीनें प्रसन्न होईल : माझी तहान. म्हणूनच देवाचे सार्वभौम स्वातंत्र्य आणि त्याचे स्वतःमध्यें परिपूर्ण असणें या गोष्टीं माझ्यासाठीं खूप मूल्यवान आहेत: ते माझ्या आशेचा आधार आहेत कीं देव बादली ब्रिगेडच्या साधनसंपत्तीनें नव्हे तर जेव्हां भग्नहृदयी पातकीं कृपेच्या झऱ्याजवळ पिण्यासाठीं खाली वाकतो, तेव्हां प्रसन्न होतो.

आम्हीं सर्व प्रकारे परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आज आणि सर्वकाळ. पण आपलें संपूर्ण जीवन देवाला कोणती गोष्ट प्रसन्न करते या विषयींच्या चुकींच्या दृष्टिकोनावर आधारित असल्याचे सिद्ध होत असेल तर आम्हास धिक्कार असो. परमेश्वर त्या लोकांवर प्रसन्न होत नाहीं जे त्याच्याशी गरजू पाण्याचे द्रोण म्हणून वर्तन करतांत, तर एक तो त्यांच्यावर प्रसन्न होतो जें त्याच्याकडें अक्षय, सर्वप्रकारे संतुष्ट करणारा झरा म्हणून त्याच्याशी वर्तन करतांत. स्तोत्र 147:11 म्हणते, “जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.”

15  June : कधीही न संपणारा मधुचंद्र

Alethia4India
Alethia4India
15  June : कधीही न संपणारा मधुचंद्र
Loading
/

नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. (यशया 62:5)

जेव्हां देव त्याच्या लोकांचे कल्याण करतो, तेव्हां ते असें नसते कीं एखादा न्यायाधीश नाखुशीनें त्याला घृणा वाटणार्‍या गुन्हेगाराला नाईलाजानें दया दाखवत आहे. ते असें असते जसे नवरा मुलगा त्याच्या नवरीला आपुलकीं दाखवत असतो.

कधी कधी आपण चेष्टा करत विवाहा बाबत म्हणतो कीं, “मधुचंद्र आता संपला आहे.” याचे कारण आपल्यांला मर्यादा आहेत. आपण मधुचंद्राचा अग्नी आणि जिव्हाळा टिकवून ठेवू शकत नाहीं. पण देव म्हणतो कीं त्याचा त्याच्या लोकांकरिताचा आनंद एखाद्या नवऱ्यामुलाचा  त्याच्या नवरी वरील आनंदा प्रमाणें आहे. याचा अर्थ असा नाहीं कीं ते त्या प्रकारे सुरू होते आणि कालांतरानें त्याच्यात घट होत जाते.

तो मधुचंद्रात असलेंला अग्नी, सुख, जोम, उत्साह आणि आनंद या बद्दल बोलत आहे. तो आपल्यां मनाला हे सांगू पाहतो कीं जेव्हां देव आपल्यांसाठीं पूर्ण मनानें हर्ष करतो तेव्हां त्याचा अर्थ काय आहे. यिर्मया 32:41 – “मी त्यांच्याविषयीं आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावानें त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.” सफन्या 3:17 – “परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयीं आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयीं त्याला उल्लास वाटून तो गाईल.”

देवाचा मधुचंद्र कधीच संपत नाहीं. त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान आणि कल्पकता अनंत आहे, त्यामुळें पुढच्या अनंतकाळच्या अब्जावधी वर्षामध्यें देखील आपल्यांला कंटाळ येणार नाहीं.

14  June : देव तुम्हांला कितीं आशीर्वादित करू इच्छितो

Alethia4India
Alethia4India
14  June : देव तुम्हांला कितीं आशीर्वादित करू इच्छितो
Loading
/

परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठीं तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल.” (अनुवाद 30:9)

देव आपल्यांला अनिच्छेनें आशीर्वादित करत नाहीं. देव आपल्यांवर उपकार करावयांस आवेशी असतो. आपण त्याच्याकडें जावें अशी तो वाट पहात नाहीं. तो आपला शोध करतो कारण त्याचा आनंद आपलें कल्याण करण्यात आहे. देव आपली वाट पाहत बसत नाहीं, तो आपल्यां पाठी येत असतो. स्तोत्र 23:6 चा खरे तर शब्दश: अनुवाद असा आहे कीं “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस कल्याण व दया माझा पिच्छा करतील.

देवाला दया करायला आवडते. मी हे परत सांगतो. देवाला दया करायला आवडते. त्याच्या लोकांचे कल्याण करण्याच्या त्याच्या इच्छे मध्यें संकोच, संदिग्धता किंवा संभावीतपणा नसतो. तो मंदक्रोध आहे आणि करुणा करण्याच्या बाबतींत तत्पर आहे. सिनाय पर्वतावर उतरल्या वर मोशेला तो हेच म्हणाला, “परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर आहे” (निर्गम 34:6). हेच तो यिर्मया 9:24 मध्यें म्हणतो, “मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्यात मला संतोष आहे, असें परमेश्वर म्हणतो.”

देव कधीच वैतागलेंला आणि तणावात नसतो. तो शीघ्रकोपी नाहीं. उलट त्याच्यात त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा अनंत, अमर्याद आणि न संपणारा उत्साह आहे.

याचे आकलन करणें आपल्यां करिता कठीण आहे, कारण प्रत्येक दिवसाला यशस्वी होणें तर सोडाच पण नुसते तोंड देण्याकरिता आपल्यांला विश्रांतीची गरज असते. आपल्यां भावना वर खाली होत असतात. आपल्यांला एक दिवस कंटाळा येतो आणि निराश वाटते, तर दुसर्‍या दिवशी आपल्यांला आशावादीपणा आणि उत्साह जाणवतो.

आपण त्या पाण्याच्या कारंज्या प्रमाणें आहोत, जो कधी कमी, कधी जास्त आणि अनियमित असतो. पण देव त्या विशाल नायग्राच्या धबधब्या प्रमाणें आहे – तुम्हीं प्रत्येक मिनिटाला 1,86,000 टन पाणी वरून खाली पडताना पाहता आणि विचार करता – नक्कीच हे पाणी ह्या जोरानें वर्षानूवर्षे खाली पडत नसणार. होय ते तसेच पडत आलेलें आहे.

अशाच प्रकारे देव आपलें कल्याण करण्याबाबत असतो. त्याला त्याचा कधी थकवा येत नाहीं. ते त्याला कधीच कंटाळवाणें वाटत नाहीं. त्याच्या नायग्राच्या कृपेच्या धबधब्याला अंत नाहीं.

13  June : येशूचा वध कोणी केला?

Alethia4India
Alethia4India
13  June : येशूचा वध कोणी केला?
Loading
/

ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला सर्वकाहीं कसे देणार नाहीं? (रोम 8:32).

माझा एलनोईस या ठिकाणी एक मित्र होता जो पाळक होता, तो खूप वर्षापूर्वी पवित्र आठवड्यात एका तुरुंगात कैद्यानां वचन सांगत होता. वचन सांगताना तो थांबला व त्यानें विचारलें कीं येशूचा वध कोणी केला हे त्यांना ठाऊक आहे का?

काहीं लोकं बोललें त्याला सैनिकांनें मारलें. काहीं म्हणालें यहुद्यांनी मारलें. तर काहीं म्हणालें पिलातानें. नंतर शांतता झाल्यावर, माझा मित्र सहजपणें म्हणाला, “त्याचा वध त्याच्या पित्यानें केला.”

रोमकरांस पत्र 8:32 चा पहिला भाग हेच सांगत आहे : देवानें त्याच्या पुत्राला सुद्धा राखून ठेवलें नाहीं तर मरणाच्या स्वाधीन केलें.” तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्यां स्वाधीन झाल्यावर तुम्हीं त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारलें.” (प्रेषित 2:23). यशया 53 हे जास्त ठळकपणें सांगते, “तरी त्याला ताडन केलेलें, देवानें त्याच्यावर प्रहार केलेलें व त्याला पिडलेलें असें आम्हीं त्याला लेंखलें…. त्याला ठेचावे असें परमेश्वराच्या (त्याच्या पित्याच्या!) मर्जीस आलें. त्यानें त्याला पिडलें” ( यशया 53:4, 10).

किंवा जसे रोम 3:25 म्हणते, “त्याच्या रक्तानें विश्वासाच्या द्वारें प्रायश्‍चित्त होण्यास देवानें त्याला पुढे ठेवलें.” ज्याप्रमाणें अब्राहामानें त्याचा पुत्र इसहाकाला मारायला चाकू उचलला, पण नंतर त्याच्या मुलाला सोडून दिलें कारण त्याला झुडपात एक कोकरा दिसला, अगदी त्याप्रमाणें देव जो पिता यानें त्याच्या स्वत:च्या पुत्राच्या – येशूच्या छातीवर चाकूनें वार केला, त्यानें त्याला राखून ठेवलें नाहीं कारण तो कोकरा होता, आमच्यां जागी मरणारा आमचा प्रतिनिधी होता.

देवानें आपल्यां स्वत:च्या पुत्राला देखील राखून ठेवलें नाहीं कारण तोच एक मार्ग होता ज्याद्वारें तो आपल्यांला वाचवू शकत होता आणि तरी देखील तो एक पवित्र आणि न्यायी देव म्हणून राहू शकणार होता. आपल्यां दुष्कर्माचा दोष, आपल्यां पापांची शिक्षा, आपल्यां पापांच्या शापामुळें आपल्यांला नरकाच्या नाशापासून सुटका मिळाली नसती. पण देवानें आपल्यां पुत्राला देखील राखून ठेवलें नाहीं; त्यानें त्याला आमच्यां अपराधांमुळें घायाळ केलें, आपल्यां दुष्कर्मामुळें ठेचलें आणि आपल्यां पापांमुळें क्रूसावर खिळलें.

रोम 8:32 – हे वचन माझ्यासाठीं पवित्र शास्त्रातील सर्वात मोलवान वचन आहे कारण ते देवाच्या भावी कृपेच्या सर्व-समावेशक अभिवचनांचा पाया आहे, कीं देवाच्या पुत्रानें माझी सर्व शिक्षा, माझा सर्व दोष, माझी सर्व दंडाज्ञा,  माझ्या सर्व चुका आणि माझी सर्व भ्रष्टता त्याच्या शरीरावर घेतली, जेणें करून मला त्या महान आणि पवित्र देवापुढे क्षमा पावलेंला, समेट झालेंला, नीतीमत्व प्राप्त झालेंला, स्वीकारलेंला असें उभें राहता यावे आणि त्याच्या उजव्या हाताशी असणार्‍या सर्वकाळाच्या आनंदाच्या अभिवचनाचा लाभार्थी होणें शक्य व्हावें.