ArchivesSolid Joys

3 August : तुमच्या शरीराचा हेतू

Alethia4India
Alethia4India
3 August : तुमच्या शरीराचा हेतू
Loading
/

कारण तुम्हीं मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. (1 करिंथ 6:20)

देवानें या भौतिक विश्वाची निर्मिती अविचाराने केलीं नाहीं. त्यामागे त्याचा उद्देश होता, तो म्हणजें, असे निरनिराळे निमित्त उदयांस आणणें जेणेंकरून त्याचा महिमा वाढावा आणि तो अधिक तेजस्वीपणें प्रकट केला जावा. “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते” (स्तोत्र 19:1).

देवानें याच कारणासाठीं निर्माण केलेंल्या इतर सर्व भौतिक गोष्टींच्या त्याच श्रेणीत आपली शरीरे देखील सुसंगतपणें बसतांत. मानव प्राणी व मानव शरीर यांद्वारे स्वतःचा गौरव करून घेण्याच्या मूळ आपल्या उद्देशापासून तो माघार घेणार नाहीं.

देव आपल्या कुजलेल्या, पापाने डागाळलेल्या शरीराला पुनरुत्थान पावलेले शरीर बनविण्यासाठीं, जेणेंकरून त्या शरीराने गौरव आणि अमरत्व धारण करावे, तो त्याचे हात घाण करणारे कष्ट का घेतो? उत्तर : कारण त्याच्या पुत्राने मृत्यूची खंडणी दिली जेणेंकरून या भौतिक विश्वासाठीं त्याच्या पित्याचा उद्देश पूर्णतेस जावा, तो म्हणजें, त्यां भौतिक वस्तूंमध्यें ज्यांत आपली शरीरेही आहेत, अनंतकाळासाठीं त्याचा महिमा व्हावा.

यास्तव आपला शास्त्रलेख असे म्हणतो : “कारण तुम्हीं मोलाने विकत घेतलेले आहात [म्हणजें, त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे]. म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.” देव त्याच्या पुत्राने जें केलें त्याकडें दुर्लक्ष करणार नाहीं वा अनादर करणार नाहीं. आपली शरीरे मेलेल्यांतून उठवून देव त्याच्या पुत्राच्या कार्याचा गौरव करेल आणि आपण आपल्या शरीराचा उपयोग सर्वकाळ त्याचे गौरव करण्यासाठीं करू.

म्हणूनच आता तुम्हांला शरीर आहे. आणि म्हणूनच ते ख्रिस्ताच्या गौरवी शरीराचे स्वरूप धारण करण्यासाठीं पुन्हा उठविले जाईल.

2 August : यापुढे मरणाचे भय नाहीं

Alethia4India
Alethia4India
2 August : यापुढे मरणाचे भय नाहीं
Loading
/

ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्री 2:14-15)

ख्रिस्त आपल्याला मृत्यूच्या भीतीपासून बंधमुक्त करून “धन-वैभव नाहींसे हो, कीं सोडून जावोत सर्व आप्तजन, कीं नश्वर जीवनहि लयास जावो” अशा प्रीतियुक्त त्यागाच्या मानसिकतेचे जीवन जगण्यांस कसे स्वतंत्र करतो?

ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती

“मुले” हा शब्द यापूर्वीच्या वचनातून घेतलेला आहे जो मुक्तिदाता ख्रिस्ताच्या आध्यात्मिक संततीचे सूचक आहे. ही “देवाची लेकरें” देखील आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झालें तर, देवानें ख्रिस्ताला पाठविले तेव्हां त्याचा मुख्य उद्देश्य आपल्या “मुलांचे” तारण करणें हाच होता. “ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती. . . “

त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला.

देवाचा पुत्र, जो देही होण्यापूर्वी सनातन शब्द म्हणून होता (योहान 1:1), तो रक्तमांसाचा झाला व त्याच्या देवपणाने मानवरूप परिधान केलें. तो पूर्ण मनुष्य बनला, त्याचवेळी पूर्णतः देव म्हणूनही कायम होता.

कीं मरणाने. . .

ख्रिस्त मानव झाला तो मरण्यासाठीं. देही होण्यापूर्वी, देव म्हणून पापी लोकांसाठीं मरणें त्याला शक्य नव्हतें. पण रक्तमांसाचा झाल्यावर, त्याला ते शक्य झालें. मरण हेच त्याचे ध्येय होते. त्यामुळें त्याला नश्वर मानव रूपांत जन्म घ्यावा लागला.

हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला…..शून्यवत करावे. . .

ख्रिस्त मेला तेव्हां त्यानें सैतानाचा पराभव केला. तो कसा? आपली सर्व पापें दूर करून (इब्री 10:12). याचा अर्थ असा कीं देवासमोर आपल्यावर दोषारोप ठेवण्यासाठीं सैतानाकडें कोणतीही कायदेशीर तर्कबुद्धी नाहीं. “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे” (रोमकरांस 8:33). तो कोणत्या आधारावर आम्हांला नीतिमान ठरवतो? येशूच्या रक्ताद्वारे (इब्री 9:14; रोमकरांस 5:9).

सैतान आपल्याविरुद्ध जें शेवटचे शस्त्र उपयोगांत आणतो तें म्हणजें आमची स्वतःची पापें. येशूच्या मृत्यूने जर ते दूर केलें गेलें आहे तर सैतानाचे मुख्य शस्त्र त्याच्या हातातून हिसकावून त्याला निशस्त्र करण्यांत आलें आहे. त्या अर्थाने, तो शून्यवत झाला आहे.

आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे.

तर मग, आता आपण मरणाच्या भयापासून मुक्त झालेंलें असें आहोत. देवानें आपल्याला नीतिमान ठरवले आहे. आपल्यासमोर आहे ती फक्त भावी कृपा. सैतान देवाचा हा विधिलेख रद्द करू शकत नाहीं. ही सार्वकालिक सुरक्षा लगेच आपल्या जीवनावर कार्यकारी व्हावी अशी देवाची इच्छा आहे. हेतू हा कीं, त्यानें वर्तमान समयी आपल्याला दास्याच्या व भीतीच्या बंधनातून मुक्त करावे व शेवट पूर्णानंदाने  व्हावा.

1 August : आमचा  अशक्तपणाच त्याची योग्यता प्रकट करतो

Alethia4India
Alethia4India
1 August : आमचा  अशक्तपणाच त्याची योग्यता प्रकट करतो
Loading
/

“माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” (2 करिंथ 12:9)

आमच्या जीवनांत देव दुःख आणतो त्यामागे त्याची योजना ही कीं त्याद्वारे ख्रिस्ताची योग्यता आणि सामर्थ्य ही पूर्णतेस यावीं. ही कृपा आहे, कारण ख्रिस्ती लोकांचा सर्वात मोठा आनंद म्हणजें आपल्या जीवनात ख्रिस्त उंचविला जावा यांत आहे.

जेव्हा पौलाला प्रभु येशूनें सांगितले कीं त्याचा “शरीरात असलेला काटा” दूर केला जाणार नाहीं, तेव्हा त्यानें यामागचे कारण स्पष्ट करून पौलाच्या विश्वासाला बळकटी दिलीं. प्रभुनें म्हटलें, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते” (2 करिंथ 12:9). पौलाने अशक्तच असावें हे देवानें नेमून ठेविलें यांत हेतू हा कीं पौलानें ख्रिस्तामध्येंच आपलें सामर्थ्य शोधावें.

जर आपण स्वतःला आत्मनिर्भर समजू लागलो आणि त्यां दृष्टिने आपण स्वतःकडें पाहू लागलो तर आपण फार चढून जाऊ, व ख्रिस्ताचे गौरव होणार नाहीं. म्हणून, ख्रिस्तानें जगातील जे हीनदीन, व जे शून्यवत अशांना निवडले “म्हणजें देवासमोर कोणाही मनुष्यानें अभिमान बाळगू नये” (1 करिंथ 1:29). आणि कधी कधी तो बाह्य रूपाने बलवान दिसणाऱ्या लोकांना अशक्त बनवतो जेणें करून देवाचे सामर्थ्य अधिक स्पष्टपणें प्रकट व्हावें.

आपल्याला ठाऊक आहे कीं पौलाने ही गोष्ट कृपा म्हणून अनुभवली, कारण तो आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीत असें : “म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठीं दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे” (2 करिंथ 12:9-10).

देवाच्या कृपेवर विश्वास ठेऊन जगणें म्हणजें येशूमध्यें देव आपल्यासाठीं जो काहीं आहे त्या सर्व गोष्टींत समाधानी असणें. म्हणून, देव येशूमध्यें आपल्यासाठीं जो काहीं आहे ते सर्व प्रकट होत असतांना आणि त्याद्वारे देवाचे गौरव होत असतांना विश्वास त्यापासून कधीच माघार घेणार नाहीं. आपला अशक्तपणा व आपलें दुःख यांचा हाच हेतू आहे.

31 July : संकटे जे विश्वासाला चिरडून टाकतांत

Alethia4India
Alethia4India
31 July : संकटे जे विश्वासाला चिरडून टाकतांत
Loading
/

“तथापि त्यांच्यामध्यें मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतांत; मग वचनामुळें संकट आलें किंवा छळ झाला म्हणजें ते लगेच अडखळतांत.” (मार्क 4:17)

दु:खें येतांत तेव्हां काहींचा विश्वास टिकाव धरण्याऐवजी तो अडखळतो. येशू हे जाणून होता; त्यानें पेरणी करणार्‍याचा जो दाखला दिला त्यांत त्यानें हे समजावून सांगितलें. काहीं लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतांत, परंतु संकटे येताच ते विश्वासापासून पतन पावतांत.

यास्तव, संकटे आणि दु:खें यांमुळें प्रत्येक प्रसंगी विश्वास मजबूतच होतो असें नाहीं. कधी कधी संकटे आणि दु:खें विश्वासाला चिरडून टाकतांत. आणि मग येशूचे गोंधळ उडवणारे हे शब्द खरे ठरतांत, “ज्या कोणाजवळ नाहीं त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल” (मार्क 4:25).

आपण भावी कृपेवर दृढ विश्वास ठेवून दु:ख सहन करावें याचे हे आव्हान आहे, जेणेंकरून आपला विश्वास अधिक दृढ व्हावा व तो व्यर्थ ठरू नये (1 करिंथ 15:2). “ज्याच्याजवळ आहे त्यास आणखी दिलें जाईल” (मार्क 4:25). आपल्यावर संकटे आणण्यामागे असलेला देवाचा हेतू जाणून घेणें हे संकटांद्वारे विश्वासात वाढण्याचे एक मुख्य साधन आहे.

जर तुम्हांला असं वाटत असेल कीं तुमच्यावर येणारे संकट व दुःख निरर्थक आहेत, किंवा तें देवाच्या नियंत्रणात नाहींत, किंवा तो लहरी किंवा क्रूर आहे, तर तुमचे संकट व दुःख हे तुम्हांला इतर सर्व गोष्टींपासून दूर पळ काढून देवाकडें धाव घेण्यांस प्रवृत्त करण्याऐवजी -कारण असेच व्हायला पाहिजें- ते तुम्हांला देवापासून दूर नेतील. म्हणून, आपण देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतो तेव्हां हा विश्वास ठेवणें देखील महत्वाचे असते कीं तो ह्या कृपेचा पुरवठा दु:खाद्वारे सुद्धा करतो.

30 July : विश्वास बळकट करणारे दुःख

Alethia4India
Alethia4India
30 July : विश्वास बळकट करणारे दुःख
Loading
/

माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्हीं आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे कीं, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो. (याकोब 1:2-3)

हे विचित्र वाटेल, पण आपण निरनिराळ्या दु:खांनी डळमळलें जातो यामागील मुख्य हेतू हा कीं त्याद्वारे आपला विश्वास अधिक खंबीर व्हावा.

विश्वास हा स्नायूंच्या ऊतीसारखा असतो : जर तुम्हीं त्यावर पुरेसा ताण दिला तर तो दुर्बळ होण्याऐवजी अधिक बळकट होतो. याकोबाला हेंच म्हणायचे आहे. तुमच्या विश्वासाला धमकाविण्यांत येते व त्याला नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते आणि तो तोडून टाकण्याच्या पराकाष्ठेपर्यंत ताणला जातो, तेव्हा परिणामी त्यांत खंबीरपणें टिकून राहणारे बळ उत्पन्न होते. याकोब ह्याला धीर म्हणतो.

देवाला विश्वासांत इतका संतोष वाटतो कीं त्यांस तो शुद्ध आणि मजबूत ठेवण्यासाठीं तोडून टाकण्याच्या पराकाष्ठेपर्यंत त्याची परीक्षा घेतो. उदाहरणार्थ, 2 करिंथ 1:8-9 नुसार त्यानें पौलाबरोबर असेच केलें.

बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेंल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाहीं; ते असे कीं, आम्हीं आमच्या शक्तीपलीकडें अतिशयच दडपले गेलो; इतके कीं आम्हीं जगतो कीं मरतो असे आम्हांला झालें. फार तर काय, आम्हीं मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्हीं स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झालें.

“म्हणून हे झालें” हे शब्द प्रकट करतांत कीं शक्तीपलीकडें असलेल्या या अतिशयच दुःखामागे देवाचा एक हेतू होता : तो हेतू हा कीं पौलाने स्वतःवर आणि त्याच्याकडें असलेल्या संसाधनांवर नव्हे तर देवावर भरवसा ठेवावा – विशेषतः मृतांना सजीव करणार्‍या देवाच्या वचनदत्त कृपेवर.

देव पूर्ण मनापासून ठेवलेल्या विश्वासाला इतके महत्त्व देतो कीं तो आवश्यक असल्यास आपल्यावर कृपा करून जगात असलेल्या त्या सर्व गोष्टीं आमच्यापासून दूर करू शकतो ज्यांवर आपण भरवसा ठेवण्याच्या परीक्षेंत पडू शकतो- अगदी जीवन देखील. यामागे त्याचा उद्देश्य हांच आहे कीं आपण आपल्या ह्या विश्वासात अधिक प्रगती करावी आणि त्यांत बळकट व्हावें कीं आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींत तो स्वतः सर्व काहीं असेल.

आपल्याविषयी त्याची इच्छा ही आहे कीं स्तोत्रकर्त्यासोबत आपणही असे म्हणावे, “स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाहीं. माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे (स्तोत्र 73:25-26).

29 July : विश्वासासाठीं हुतात्मे झालेंल्यांसाठीं देवाची योजना

Alethia4India
Alethia4India
29 July : विश्वासासाठीं हुतात्मे झालेंल्यांसाठीं देवाची योजना
Loading
/

तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आलें कीं, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्हीं आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. (प्रकटीकरण 6:11)

ख्रिस्ती धर्माची जवळजवळ तीनशे वर्षांची प्रारंभिक वाढ ही हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेल्या मातीतून झाली.

सम्राट ट्राजन (सन सुमारे 98), ह्याच्या कारकिर्दीचा आरंभ होईपर्यंत छळ जरी कायदेशीर नव्हता तरी त्याची मोकळीक होती. सम्राट ट्राजनच्या कारकिर्दीपासून ते सम्राट डेशियसच्या कारकिर्दीच्या आरंभापर्यन्त (सन सुमारे 250 AD), छळ कायदेशीर झालेंला होता. डेशियस, जो ख्रिस्ती लोकांचा द्वेष करत होता आणि ज्याला त्याच्याद्वारे करण्यांत येणाऱ्या बेकायदेशीर सुधारणांवर त्यांच्या प्रभावाची धास्ती होती, ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभापासून ते सन 311 मध्यें धार्मिक सहिष्णुतेचा प्रथम कायदा येईपर्यंत, ख्रिस्ती लोकांचा छळ केवळ कायदेशीरच नव्हता, तर सर्वत्र व्यापक आणि सामान्य झालेंला होता. 

एका लेखकाने या तिसऱ्या कालखंडातील परिस्थितीचे वर्णन पुढील शब्दांत केलें :

मंडळ्यांमध्यें सर्वत्र दहशत पसरली होती; आणि लॅप्सीची संख्या [ज्यांनी आपला जीव वाचविण्यासाठीं विश्वासापासून माघार घेतली होती] . . . फार मोठी होती. तरी, जे विश्वासांत खंबीरपणें टिकून राहिले आणि ज्यांनी शरण जाण्याऐवजी हौतात्म्य पत्करले, अशांची संख्या पण कमी नव्हती; आणि, छळ जसजसा व्यापक आणि तीव्र होत गेला, तसतसा ख्रिस्ती लोकांचा उत्साह आणि त्यांची प्रतिकार-शक्ती अधिकाधिक बळकट होत गेली.

या प्रमाणें, त्यां तीनशे वर्षांच्या काळांत ख्रिस्ती असणें हा जीवन आणि संपत्ती व कुटुंब यांसाठीं प्रचंड धोकादायक विश्वास होता. आपण कोणत्या गोष्टींवर अधिक प्रीति करतो याची ही परीक्षा होती. आणि या परीक्षेचा टोकाचा बिंदू म्हणजें हौतात्म्य पत्करणें.

आणि त्या हौतात्म्यपणावर एक अशा सार्वभौम देवाचे वर्चस्व होते ज्याने म्हटलें कीं त्यां हुतात्म्यांची संख्या ठराविक आहे. मंडळीरोपण करणें आणि तिला सुदृढ करणें यांत त्यांची विशेष भूमिका आहे. सैतानाचे तोंड बंद करण्यात त्यांची विशेष भूमिका आहे, जो सतत म्हणतो कीं देवाचे लोक त्याची सेवा केवळ यामुळें करतांत कारण त्यांचे जीवन सोयीस्कर आहे. ईयोब 1:9-11 चा हाच मुद्दा आहे.

हौतात्म्य ही काहीं अपघाती गोष्ट नाहीं. ही एखादी अशी गोष्ट नाहीं जी घडून आल्यावर स्वतः देव चक्रावून जातो. ती अनपेक्षित घटना नाहीं. आणि नक्कीच ही गोष्ट ख्रिस्ताचा प्रचार करण्यासाठीं तयार करण्यांत आलेंल्यां धोरणाचा पराभवहि नाहीं.

हौतात्म्य कदाचित पराभव वाटू शकतो. परंतु हा स्वर्गात आखलेल्या योजनेचाच भाग आहे ज्याची कल्पना कोणत्याही मानवी रणनीतीकाराने कधीहि केलीं नाहीं किंवा ज्याची रचना तो कधीहि करू शकणार नाहीं. आणि जे देवाच्या त्या कृपेवर विश्वास ठेवून शेवटपर्यंत टिकून राहतांत जी त्यांच्यासाठीं सर्व बाबतींत पुरेशी आहे ते सर्व ह्या योजनेंत विजयी होतांत.

28 July : आम्हींधैर्य का सोडत नाहीं

Alethia4India
Alethia4India
28 July : आम्हींधैर्य का सोडत नाहीं
Loading
/

म्हणून आम्हीं धैर्य सोडत नाहीं; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठीं अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; आम्हीं दृश्य गोष्टींकडें नाहीं तर अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. (2 करिंथ 4:16-18)

पौलाला जसा पूर्वी रस्ता दिसत होता तसा तो आता पाहू शकत नाहीं (कारण त्या काळी चष्मा नव्हता). जसे त्याला पूर्वी ऐकू येत असे तसे त्याला आता ऐकू येऊ शकत नाहीं (कारण त्या काळी श्रवणयंत्र नव्हते). मारहाणीपासून जसा तो पूर्वी बरा व्हायचा तसा तो आता लवकर बरा होऊ शकत नाहीं (कारण त्या काळी आजच्याप्रमाणें कोणतीही एंटीबायोटिक औषधे नव्हती). एका नगरातून दुसऱ्या नगरांकडें चालत जात असतांना त्याची शक्ती आता पूर्वीसारखी टिकत नाहीं. त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सुरकुत्या स्पष्ट दिसू लागल्या आहेत. त्याची स्मरणशक्ती आता पूर्वीसारखी तीक्ष्ण राहिलेली नाहीं. आणि तो कबूलहि करतो कीं ह्या सर्व दुर्बळपणामुळें त्याच्या विश्वासाला आणि आनंदाला आणि धैर्याला मोठा धोका होता.

तरी तो धैर्य सोडत नाहीं. का?

तो धैर्य सोडत नाहीं कारण कीं त्याचा अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कसा?

त्याच्या अंतरात्म्याचे नवीनीकरण एका अशा गोष्टीमुळें होत असे जी पूर्णपणें अद्भुत अशी होती : अंतरात्म्याचे ते नवीनीकरण अशा गोष्टींकडें लक्ष लावल्यामुळें होत असे ज्यांना तो पाहू शकत नव्हता, म्हणजें ज्यां अदृश्य अशा होत्यां.

आम्हीं दृश्य गोष्टींकडें नाहीं तर अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. (2 करिंथ 4:18)

ह्याच कारणामुळें पौल धैर्य सोडत नव्हता : म्हणजें जे तो पाहू शकत नव्हता त्यांकडें तो लक्ष लावत होता. तर मग, त्यानें ज्या अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावलें, तेव्हां त्याला काय दिसलें?

2 करिंथकर 5:7 मध्यें काहीं वचनांनंतर, तो म्हणतो, “आम्हीं विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणें चालत नाहीं.” याचा अर्थ असा नाहीं कीं तिथे काय आहे याचा काहीं पुरावा नसताना देखील तो जणू अंधारात झेप घेत होता. याचा अर्थ असा आहे कीं आपण वर्तमान समयी ह्या जगात राहत असतांना ज्यां गोष्टीं वास्तविकरीत्या अति मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण आहेंत त्यांची समज आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडें आहे.

आपण या अदृश्य गोष्टींकडें सुवार्तेच्या भिंगातून “पाहतो.” आम्हीं आमच्या धैर्याचे नूतनीकरण करतो—म्हणजें ज्यांनी ख्रिस्ताला देहरूपी साक्षात पाहिले त्यांनी दिलेंल्यां साक्षीमध्यें आपण पाहत असलेल्या अदृश्य, वस्तुनिष्ठ सत्याकडें आपली दृष्टि लावून आम्हीं आपली अंतःकरणें बळकट करतो.

 “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठीं आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे” (2 करिंथ 4:6). “येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश.” ज्या क्षणी सुवार्तेद्वारे आमच्या अंतःकरणात हा प्रकाश पडतो त्या क्षणी ते आमच्या दृष्टींस पडते. 

हा प्रसंग घडला त्या क्षणी आम्हीं ख्रिस्ती झालो – मग आम्हांला ते समजले असो वा नसो. आणि आपणही पौलाबरोबर आपल्या अंतःकरणाच्या डोळ्यांनी पाहणें गरजेचे आहे, जेणेंकरून आपणही धैर्य सोडून देऊं नये.

27 July : जर तुम्हीं वासनांशी युद्ध करत नाहीं

Alethia4India
Alethia4India
27 July : जर तुम्हीं वासनांशी युद्ध करत नाहीं
Loading
/

जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा. (1 पेत्र 2:11)

एकदा मी एका माणसाला त्याच्या व्यभिचाराच्या जीवनाविषयी हटकले; आधी मी त्याची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला; मी त्याला त्याच्या पत्नीकडें परत जाण्याची विनंती केलीं. मग मी म्हटलें, “कसं आहे, येशूनें म्हटलें कीं तुम्हीं या पापाशी जर इतक्या गंभीरपणें युद्ध करत नसाल कीं जणू ते जिंकण्यासाठीं तुम्हीं तुमचा स्वतःचा डोळाच उपटून टाकण्यास तयार आहांत, तर तुम्हीं नरकात जाल आणि तेथे सर्वकाळ यातना भोगाल.”

विश्वासाचा दावा करणारा एक ख्रिस्ती म्हणून, तो माझ्याकडें केविलवाण्या शंकेने असा पाहू लागला जणू त्यानें त्याच्या आयुष्यात असे पूर्वी काहींही ऐकलें नव्हते; त्यानें विचारलें, “म्हणजें तुम्हांला असं वाटतं कीं एखादी व्यक्ती आपलें तारण गमावू शकते?”

अशाप्रकारे, मी प्रत्यक्ष अनुभवातून वारंवार हें शिकलो कीं असेहि अनेक ख्रिस्ती लोक आहेत जें तारणाविषयीचा असा दृष्टिकोन घेऊन जगतांत जो त्यांना खऱ्या जीवनापासून अलिप्त ठेवतो, जो बायबलमध्यें देण्यांत आलेंल्या धमकावण्यांपासून त्यांचे लक्ष दूर घालवितो, व जो आपण ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या पापी व्यक्तीला बायबलमध्यें पापाविरुद्ध दिलेंल्यां इशाऱ्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवतो. माझ्या मतें, ख्रिस्ती जीवनाविषयीचा असा दृष्टिकोन त्यां हजारो लोकांना खोटा दिलासा देत आहे जे खरे पाहता त्यां रुंद व पसरट मार्गावर आहेत ज्याचा शेवट नाश आहे (मत्तय 7:13).

येशूनें म्हटलें, जर तुम्हीं वासनांशी लढा देत नाहीं तर स्वर्गात तुमचा प्रवेश होणार नाहीं. “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे” (मत्तय 5:29). मुद्दा हा नाहीं कीं खरे ख्रिस्ती लोक पापा विरुद्धच्या त्यांच्या युद्धांत प्रत्येक वेळी यशस्वी होतांतच. मुद्दा हा आहे कीं आपण लढण्याचा संकल्प करतो, आपण निष्कलंक असे यशस्वी होतो हा मुद्दा नाहीं. आम्हीं पापाबरोबर समेट करत नाहीं; आम्हीं त्याशी युद्ध पुकारतो.

या युद्धांत जे पणांस लागते ते या जागाला एक हजार क्षेपणास्त्रांनी जरी उडविले, किंवा दहशतवाद्यांनी तुमच्या शहरावर बॉम्ब जरी टाकला, किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळें बर्फाचे डोंगर जरी वितळले, किंवा एड्सने सर्व राष्ट्रांना ग्रासून टाकलें त्याहीपेक्षा कितीतरी जास्त आहे. ही सर्व संकटे केवळ शरीरालाच जिवें मारू शकतांत. पण जर आपण वासनेशी लढलो नाहीं तर आपण आपला जीव गमावतो तो कायमचा, सर्वकाळासाठीं.

पेत्र म्हणतो कीं दैहिक वासनां जिवात्म्याबरोबर लढतांत (1 पेत्र 2:11). महायुद्ध किंवा दहशतवाद यांत असलेल्या कोणत्याही धोक्यापेक्षा या युद्धात जे पणास लागते तें अमर्यादपणें खूप आहेत. प्रेषित पौलाने “जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ” यांची सूची दिल्यानंतर असे म्हटलें कीं “त्यामुळें देवाचा कोप होतो” (कलस्सै 3:5-6). आणि देवाचा कोप हा जगातील सर्व राष्ट्रांच्या कोपापेक्षा अति भयंकर आहे.

देव आम्हांला ती कृपा देवो कीं ज्याद्वारे आपण स्वतःच्या व प्रियजनांच्या जिवात्म्यांना गांभीर्याने घेऊं व त्यां विरुद्ध लढणाऱ्या वासनांशी आपलें युद्ध चालू ठेऊ.

26 July : द्रव्याचा लोभ धरणें म्हणजें काय

Alethia4India
Alethia4India
26 July : द्रव्याचा लोभ धरणें म्हणजें काय
Loading
/

कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे. (1 तीमथ्य 6:10)

पौलाने हे लिहिले तेव्हा त्याला काय म्हणायचे होते? तुम्हीं पाप करता तेव्हा पैसा तुमच्या मनात असतो असा त्याचा अर्थ असू शकत नाहीं. आपण अशावेळी देखील पुष्कळ पापें करीत असतो जेव्हा आपल्या डोक्यांत पैशांचा तिळमात्रहि विचार नसतो.

मी त्याचा असा अर्थ सुचवितो : त्याला असे म्हणायचे होते कीं जगात असलेल्यां सर्व वाईट गोष्टी एका विशिष्ट प्रकारच्या अंत:करणांतून येतांत, म्हणजें अशा अंत:करणांतून ज्याला द्रव्याचा लोभ असतो.

मग द्रव्याचा लोभ म्हणजें काय? हिरव्या कागदाची किंवा तांब्याची नाणी किंवा चांदीची नाणी यांची पूजा करणें असा त्याचा अर्थ होत नाहीं. द्रव्याचा लोभ म्हणजें काय हे जाणून घेण्यासाठीं तुम्हांला हा प्रश्न करावा लागेल, द्रव्य किंवा पैसा म्हणजें नेमके काय? मी या प्रश्नाचे उत्तर असे देईन : द्रव्य किंवा पैसा हे फक्त मानव तरतुदींचे एक साधन आहे. द्रव्य म्हणजें देवाकडून मिळविण्याऐवजी तुम्हीं माणसांकडून — इतर मानवांकडून — जे काहीं मिळवू शकता तें.

देव पैशाच्या नव्हे तर कृपेच्या चलनात व्यवहार करतो: “हो तान्हेल्यांनो, तुम्हीं सर्व जलाशयाकडें या, जवळ पैसा नसलेले तुम्हीं या; सौदा करा, खा!” (यशया 55:1). पैसा हे मानवी संसाधनांचे चलन आहे. म्हणून, जें अंत:करण पैशावर प्रीति करते ते असे अंत:करण आहे जे मानवी संसाधने आपल्याला काय देऊ शकतांत यांवर आपली सर्व आशा अडकवून ठेवते, आपल्या सर्व सुखांचा शोध त्यांत घेते व त्यावर भरवसा ठेवते.

अशाप्रकारे, द्रव्याचा लोभ हे अक्षरशः पैशावर असा विश्वास– भरवसा (विश्वास, खात्री) ठेवण्यासारखेच आहे कीं तुमच्या सर्व गरजा पैशानेच पूर्ण होतील आणि त्यातंच तुमचे सर्व सुख व समाधान आहे.

द्रव्याचा लोभ (किंवा पैशावर प्रीति करणें) हा देवाच्या भावी कृपेवरील विश्वासाची जागा घेतो. हे भविष्यासाठीं मानवी संसाधनांवर विश्वास ठेवणें आहे – म्हणजें अशी गोष्ट जी तुम्हीं पैशाने मिळवू शकता किंवा जी तुम्हीं राखून ठेऊ शकता. म्हणून पैशावर प्रेम करणें किंवा पैशावर विश्वास ठेवणें, हे देवाच्या वचनांवर अविश्वासाची खोली आहे. येशूनें मत्तय 6:24 मध्यें म्हटलें, “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाहीं……तुम्हीं देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाहीं.”

तुम्हीं एकाच वेळी देवावर आणि पैशावर भरवसा ठेवू शकत नाहीं. एकावर विश्वास म्हणजें दुसऱ्यावर अविश्वास. जे अंत:करण पैशावर प्रीति करते – जे आनंदासाठीं पैशावर अवलंबून राहते – ते अंत:करण आपल्या आत्म्याची तृप्ती म्हणून येशूमध्यें देव आपल्यासाठीं जो कांही आहे त्यावर अवलंबून राहत नाहीं.

25 July : सैतानाची रणनीती आणि तुमचा बचाव

Alethia4India
Alethia4India
25 July : सैतानाची रणनीती आणि तुमचा बचाव
Loading
/

सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. (1 पेत्र 5:8-9)

आपल्या जिवाचे दोन मोठे शत्रू पाप व सैतान हें आहेत. यांत सर्वात वाईट शत्रू पाप हा आहे, कारण सैतान ज्यां एकमेव रणनीतीने आपला नाश करू शकतो तो म्हणजें आपल्याला पाप करायला लावणें आणि आपल्याला पश्चात्ताप करण्यापासून रोखून ठेवणें. केवळ एकच गोष्ट जिचा परिणाम मरण आहे ती म्हणजें अक्षम्य पाप. सैतान नाहीं.

त्यानें आपल्याला पीडावे, कीं बहुंना आपल्याला जिवें देखील मारावें अशी देव स्वतः त्याला काहीं काळासाठीं परवानगी देऊं शकतो, जसे त्यानें इयोबाच्या बाबतींत केलें, किंवा जसें त्यानें स्मुर्णा येथील पवित्र जनांच्या बाबतींत केलें (प्रकटीकरण 2:10); पण सैतान आपला सार्वकालिक नाश करू शकणार  नाहीं वा आपलें सार्वकालिक जीवन हिरावून घेऊ शकत नाहीं. त्याची एकमेव रणनीती ज्याद्वारे तो आपल्याला अंतिम हानी पोहोचवू शकतो ती म्हणजें आपल्याला पापांत पाडणें आणि मग पश्चात्ताप करण्यापासून दूर ठेवणें; तोच त्याचा मुख्य हेतू आहे.

तर मग, आपल्याला पापांत पाडणें, त्याचे समर्थन करणें, त्यासाठीं उत्तेजन देणें, त्यांत सहाय्य करणें, त्यांत असलेल्या आनंदाकडें आकर्षित करणें आणि आपला कल पापाकडेंच असावा याची खात्री करून घेणें, आणि एवढेच काय तर आम्हांला विश्वास आणि पश्चात्ताप यांपासून दूर ठेवणें, हाच सैतानाचा मुख्य नित्यक्रम आहे.

आपण हे इफिसकरांस पत्र 2:1-2 मध्यें पाहू शकतो: “तुम्हीं आपलें अपराध व आपली पातके ह्यांमुळें मृत झालेंले होता; त्या पातकांमध्यें तुम्हीं पूर्वी चालत होता. . . अंतरिक्षातील राज्याचा अधिपती… ह्याच्या धोरणाप्रमाणें चालत होता.” ह्या जगात पाप करणें हे सैतानाच्या “धोरणाप्रमाणें” चालणें होय. जेव्हा तो नैतिकदृष्ट्या एखादी वाईट गोष्ठ घडवून आणत असतो, ती तो पापाद्वारे घडवून आणत असतो. आपण पाप करतो तेव्हा आपण त्याच्या क्षेत्रात वावरत असतो. आपण त्याच्या धोरणाशी सहमत होतो. आपण पाप करतो तेव्हा आपण सैतानाला वाव देतो (इफिस 4:27).

न्यायाच्या दिवशी आपल्याला दोषी ठरवणारी एकमेव गोष्ट म्हणजें क्षमा न झालेंलें पाप – आजारपण किंवा त्रास किंवा छळ किंवा भीती किंवा भयप्रद स्वप्ने ह्या गोष्टीं नव्हे. सैतानाला हे माहीत आहे. म्हणूनच, त्याचा प्राथमिक जोर ख्रिस्ती लोकांना विचित्र घटनांनी कसे घाबरवायचे यावर नसतो (जरी अशा घटना पुष्कळ होतांत ), तर ख्रिस्ती लोकांना व्यर्थ गोष्टींची मोहिनी घालून त्यांना वाईट विचारांनी कसे भ्रष्ट करावे यावर आहे.

सैतान अशा वेळी आपल्याला गिळून टाकण्याच्या शोधांत असतो ज्यावेळी आपला विश्वास दृढ नसतो, जेव्हा तो भेद्य असतो. ही गोष्ट समजण्यास सोपी आहे कीं सैतानाला ज्या गोष्टीचा नाश करायचा असतो नेमकीं तिच त्याच्या प्रयत्नांचा प्रतिकार करण्याचे शस्त्र आहे. म्हणूनच पेत्र म्हणतो, “त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा” (1 पेत्र 5:9). म्हणूनच पौल सुद्धा म्हणतो कीं “विश्वासाची ढाल” “त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवते” (इफिस 6:16).

सैतानाचा जर पराभव करायचा असेल तर त्यासाठीं एकमेव रणनीती म्हणजें ही कीं तो ज्या गोष्टीचा नाश करण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करीत असतो – तो म्हणजें तुमचा विश्वास- त्यांत दृढ असे उभे राहणें.