
दैनिक सुभक्तिपर बोध
सत्याने दैनंदिन आपल्या मनाचे भरण-पुरण केल्याने, आपली अंतःकरणे देवाला समाधान देणारी संपत्ती म्हणून ओळखण्यासाठी विकसित होतील. वर्षातील प्रत्येक दिवसासाठी जॉन पायपर ह्यांनी लिहिलेला एक लघु, देव-केंद्रित भक्तीपर संदेश वाचा किंवा ऐका.
आपले आयुष्य वाया घालवू नका - आपले आयुष्य वाया न घालवणे म्हणजे इतरांना देवामध्ये आनंदित करण्यासाठी जगणे होय. जर तुम्ही असे केले तर तुमचे जीवन कठीण होईल, तुम्हाला मोठमोठे धोके जोखमी पत्करावे लागतील आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. मराठी पॉडकास्ट ऐका कारण ते तुम्हाला देवाच्या गौरवासाठी आत्मिक तृप्ती करणारे जीवन जगण्याचे आव्हान देईल.
सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे कीं, स्वर्गामध्यें राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडें बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्रस्थानाचा म्हणजें माणसानें नव्हे तर ‘प्रभूनें घातलेल्या’ खर्या ‘मंडपाचा’ सेवक आहे. . . “पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणें सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हां त्याला जशी मिळाली, तसे तेहि, जें स्वर्गीय वस्तूचें प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करितात.” (इब्री 8:1-2, 5)
आम्हीं ह्या शास्त्रपाठावर यापूर्वी मनन केलें आहें. पण त्यांत आणखी बरेच कांहीं आहे. नाताळ म्हणजें छायेच्या ऐवजी खरी आणि ठोंस अशी गोष्ट.
इब्री 8:1-2, 5 ही वचनें एक प्रकारचे सारांश रुपी मांडलेले कथन आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे कीं एक याजक जो आमच्या आणि देवाच्या मध्यें मध्यस्थी जातो, आणि देवाबरोबर आमचा समेट घडवून आणतो, आणि आपल्यासाठीं देवाजवळ विनवणी करतो तो जुन्या कराराच्या दिवसांत व्हायचे त्यांप्रमाणें सामान्य, दुर्बळ, पापाचे अडखळत असलेला, व शेवटी मरणानें नाश पावणारा असां याजक नाहीं. तो देवाचा पुत्र आहे – सामर्थ्यशाली, पापरहित, अविनाशी जीवन असलेला.
इतकेच नाहीं तर, तो पृथ्वीवरील अशा मंडपाचा सेवक नाहीं जो जीर्ण पावतो, ज्यांस कीड लागते, जो पावसाने भिजून नाहींसा होण्याच्या बेतांत असतो, जो अग्नीने जळतो, फाटतो आणि चोरीला जातो व ज्याच्या आपल्या सर्व मर्यादा आहेत आणि ज्याचे स्थान विनाशी आहे. नाहीं, इब्री 8:2 म्हणते कीं ख्रिस्त आपल्यासाठीं “माणसानें नव्हे तर ‘प्रभूनें घातलेल्या’ खर्या ‘मंडपाचा’ सेवक” झाला आहे.” ही छाया नाहीं. तो स्वर्गात घातलेला खरा मंडप आहे. हे ते वास्तव आहे ज्याचे प्रतिरूप व छाया मोशेला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणें देण्यांत आली होती.
इब्री 8:1 सांगते त्याप्रमाणें, छायेपेक्षा श्रेष्ठ असलेल्या ह्या ‘खर्या’ गोष्टीविषयी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजें ही कीं आपला महायाजक हा स्वर्गामध्यें राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडें बसलेला’ आहे. जुन्या कराराचा कोणताही याजक असां दावा करू शकला नाहीं.
येशू हा प्रत्यक्षांत देव पित्यासमोर आमचा मध्यस्थ आहे. देवाशेजारी त्याला मानाचे स्थान प्राप्त झालें आहे. त्याच्यावर देवाची अनन्य प्रीति आणि आदर आहे. तो सतत देवासोबत असतो. हे पडदे, वाट्या, मेज, मेणबत्त्या, झगे, मेंढ्या, शेळ्या आणि कबुतरांप्रमाणें छाया मात्र नाहीं. हे अंतिम, परम सत्य आहे : देव आणि त्याचा पुत्र आमच्या सार्वकालिक तारणासाठीं प्रीति आणि पवित्रतेमध्यें एकमेकांबरोबर एकत्र काम करतात.
अंतिम वास्तविकता म्हणजें देवत्वाच्या व्यक्तींमध्यें असलेले परस्पर नातेसंबंध, जें एकमेकांशी त्यांचे वैभव आणि पावित्र्य आणि प्रीति आणि न्याय आणि चांगुलपणा आणि सत्य तारण पावलेल्या लोकांमध्यें कसे प्रकट होईल याबद्दल एकमेकांबरोबर एकत्र काम करतात.

“तुम्हांला जीवनांत एकच संधी मिळते, बस एवढेच. फक्त एकच. आणि त्या जीवनाचा चिरकाळ टिकणारा मापदंड म्हणजे येशू ख्रिस्त.”
"तुमचे मन यासाठीच बनवले गेलें होते कीं तुम्हीं देवाला ओळखावे आणि त्याजवर प्रीति करावी."
“तुमच्या जीवनातून काहीं तरी पराक्रमी अशी गोष्ट घडून यावीं अशी अपेक्षा करा! तुमच्या आयुष्याला चिरकाळ टिकणारा अर्थ प्राप्त व्हावा अशी उत्कंठा बाळगा. त्यासाठी तहानलेले असां! जीवनाचा प्रवास आवेशविरहित पूर्ण करूं नकां."
"जेव्हां आपण देवामध्यें सर्वात जास्त आनंदी व समाधानी असतो तेव्हां तो आपल्यामध्यें सर्वात जास्त गौरवविला जातो."
“देवाचा देवाकरिता असणारा आवेश आमच्यासाठी असणार्या देवाच्या करुणेचा पाया आहे.”
"भारतातील मंडळीला सत्यात आणि
विश्वावासात वाढण्यास सुसज्ज
करण्यासाठी पवित्र शास्त्र केंद्रित
साहित्याचा अभ्यास करा."