“देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो.” ( 2 करिंथकरास पत्र 1:20 )
प्रार्थना ही देवाच्या अभिवचनाला, म्हणजे भविष्यातील त्याच्या खात्रीदायक कृपेला दिलेला प्रतिसाद आहे.
प्रार्थना ही देवाच्या खात्यातून त्यानें आपल्यां करिता जमवलेली भविष्यातील कृपा काढून घेणे हे आहे.
प्रार्थना म्हणजे असा अंधविश्वास नाहीं कीं, कदाचित चांगले हेतु असलेला एक देव असू शकतो. प्रार्थना देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवते, आणि देवाच्या भविष्यातील कृपेच्या खात्याकडें दररोज जाते आणि गरजेच्या वेळी लागणारी कृपा काढून घेते.
ह्या महान वचनातील दोन भागांमध्यें जो दुवा आहे तो लक्ष्यांत घ्या. “म्हणून” या शब्दाकडें लक्ष द्या.
“देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे. म्हणून (यास्तव) आपण देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो.”
आपल्यां ते लक्ष्यांत आले याची खात्री करण्याकरिता ह्या दोन भागांकडें पाहूया : आपण प्रार्थना करतो तेव्हां आपण देवाला ख्रिस्ता द्वारें आमेन म्हणतो, कारण देवानें ख्रिस्तामधील त्याच्या सर्व अभिवचनांना खात्रीपूर्वक आमेन म्हंटले आहे. प्रार्थना ही देवाकडें केलेलीं भरवशाची विनवणी आहे कीं त्यानें ख्रिस्तामध्यें भविष्यासाठीं देऊ केलेल्यां अभिवचनांनी आपल्यांला आशीर्वादित करावे. प्रार्थना आपल्यां भविष्यातील कृपेवरील विश्वासाला सर्व गोष्टींच्या पायाशी जोडते, जो येशू ख्रिस्त आहे.
हि गोष्ट आपल्यांला आपल्यां शेवटच्या मुद्दयाकडें आणते : “आमेन” हा प्रार्थनेतील एक संपूर्ण आणि मोलवान शब्द आहे. याचा अर्थ असा होत नाहीं कीं , “होय, मी ही प्रार्थना केलीं आहे.” याचा प्रामुख्याने अर्थ असा आहे कीं, “होय, देवानें ही सर्व अभिवचनें देऊ केलीं आहेत.”
आमेन म्हणजे, “होय, प्रभू तू हे करू शकतोस.” “होय, प्रभू तू सामर्थ्यशाली आहेस. होय, प्रभू तू ज्ञानी आहेस. होय, प्रभू तू दयाळू आहेस. होय, प्रभू भविष्यातील सर्व कृपा तुझ्याकडून येते आणि त्याची खात्री ख्रिस्ता द्वारें आम्हांला प्राप्त झाली आहे.”
“आमेन” हा सादर केलेंल्यां प्रार्थनेच्या आशेचा उद्गार आहे, आणि साहाय्यासाठीं केलेंल्यां प्रार्थनेच्या भरवश्याची खात्री आहे.