ArchivesSolid Joys

8 April : सैतानास त्याचा पराजय जाणू द्या

Alethia4India
Alethia4India
8 April : सैतानास त्याचा पराजय जाणू द्या
Loading
/

सैतानाला अडवा, म्हणजें तो तुमच्यापासून पळून जाईल. (याकोब 4:7)

आपल्या दिवसात सैतान जितका वास्तविक दिसतो – अधिक प्रकटरित्या सक्रिय – ख्रिस्ताचा विजय त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीं अधिक मूल्यवान ठरेल.

नवा करार शिकवतो कीं जेव्हां ख्रिस्त मेला आणि पुन्हा जिवंत झाला तेव्हां सैतानाचा कायमचा निर्णायक पराभव करण्यात आला. त्याला मर्यादित स्वातंत्र्य देण्यात आले आहे, परंतु देवाच्या लोकांविरुद्ध त्याचे सामर्थ्य मोडकळीस आले आहे आणि त्याचा नाश निश्चित आहे.

  • सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला(1 योहान 3:8)
  • ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे. (इब्री 2:14)
  • त्यानें सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केलें. (कलसै 2:15)

दुसऱ्या शब्दांत, निर्णायक वार कल्वरी येथे करण्यात आला. आणि एक दिवस येईल, जेव्हां सैतानाचा मर्यादित स्वातंत्र्याचा काळ देखील समाप्त होईल, प्रकटीकरण 20:10 “त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; …तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.”

आपल्यापैकीं जे येशू ख्रिस्ताचे अनुसरण करतात त्यांच्यासाठीं याचा काय अर्थ आहे?

  • म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच. [ते देहाप्रमाणे नाहीं तर आत्म्याप्रमाणे चालतात.] (रोमकरांस 8:1)
  • देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. (रोमकरांस 8:33)
  • कारण माझी खातरी आहे कीं, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाहीं. (रोमकरांस 8:38–39)
  • जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. (1 योहान 4:4)
  • त्याला त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. (प्रकटीकरण 12:11)

म्हणून, “सैतानाचा प्रतिकार करा, आणि तो तुमच्यापासून पळून जाईल!“ त्याचा पराजय झाला आहे, आणि आम्हांला विजय देण्यात आला आहे. आता आमचे कार्य आहे त्या विजयात जगणे आणि सैतानाला त्याच्या पराभवाविषयी जाणीव करून देणें.

7 April : आपल्या वैऱ्यांसाठीं प्रार्थना करणें म्हणजें काय

Alethia4India
Alethia4India
7 April : आपल्या वैऱ्यांसाठीं प्रार्थना करणें म्हणजें काय
Loading
/

तुम्हीं आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा, आणि जे तुमचा छळ करतात (व तुमच्या पाठीस लागतात) त्यांच्यासाठीं प्रार्थना करा. (मत्तय 5:44)

आपल्या वैऱ्यांसाठीं प्रार्थना करणें ही प्रीतिच्या सर्वात गंभीर स्वरूपांपैकीं एक आहे, कारण याचा अर्थ असा आहे कीं त्यांच्यासोबत काहींतरी चांगले घडावे अशी तुम्हीं खरोखर इच्छा बाळगता.

तुमच्या वैऱ्याचे कल्याण व्हावे अशी वास्तविक इच्छा न बाळगता तुम्हीं आपल्या वैऱ्यांसाठीं चांगल्या गोष्टी करू शकता. परंतु त्यांच्यासाठीं प्रार्थना ही देवाच्या उपस्थितीत केलीं जाते जो तुमचे अंतःकरण जाणतो आणि प्रार्थना त्यांच्यासाठीं देवाजवळ मध्यस्थी करणे होय.

ती त्यांच्या परिवर्तनासाठीं असू शकते. ती त्यांच्या पश्चात्तापासाठीं असू शकते. कदाचित् त्यांना त्यांच्या मनातील वैरभावाची जाणीव होईल. असे असू शकते कीं त्यांची पापाची खालची घसरण थांबेल, जरी त्यासाठीं त्यांच्यावर रोग किंवा संकटे आली तरीही. परंतु येथे येशूच्या मनात असलेली प्रार्थना ही नेहमी त्यांच्या कल्याणासाठीं असते.

वधस्तंभावर टांगलेला असतांना येशूनें हेच केलें :

“तेव्हां येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाहीं.” (लूक 23:34)

आणि स्तेफनसाला दगडमार होत असताना त्यानें हेच केलेः

मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडें मोजू नकोस.” (प्रेषितांची कृत्ये 7:60)

येशू आम्हास पाचारण करीत आहे कीं आम्हीं फक्त आपल्या शत्रूंसाठीं सत्कृत्ये करू नयेत, जसे त्यांस अभिवादन करणे आणि त्यांच्या गरजा पुरविण्यात त्यांची मदत करणे (मत्तय 5:47); तो आम्हास यासाठीं देखील पाचारण करीत आहे कीं आम्हीं त्यांचे सर्वोच्च कल्याण व्हावें अशी इच्छा धरावी, आणि त्या इच्छा प्रार्थनेमध्ये व्यक्त कराव्यात, तो वैरी कुठेही जवळपास नसतो तेव्हांहि.

आमच्यां अंतःकरणांची इच्छा त्यांचे तारण असले पाहिजे आणि ते स्वर्गात आमच्यांसोबत असतील अशी इच्छा धरली पाहिजे आणि त्यांना सार्वकालिक सुख मिळावें अशी इच्छा धरली पाहिजे. यहूदी लोकांसाठीं प्रेषित पौलाने केलेंल्या प्रार्थनेप्रमाणे प्रार्थना करण्याची देवानें आम्हास कृपा द्यावी, ज्यांपैकीं अनेकांनी पौलासाठीं जीवन जगणे अतिशय कठीण केलें होते :

त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे कीं, त्यांचे तारण व्हावे. (रोम 10:1)

6 April : येशूची आठवण ठेवण्याचे दोन मार्ग

Alethia4India
Alethia4India
6 April : येशूची आठवण ठेवण्याचे दोन मार्ग
Loading
/

माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. (2 तीमथ्य 2:8)

पौल येशूची आठवण ठेवण्याच्या दोन विशिष्ट मार्गांचा उल्लेख करतो : मेलेल्यांतून जिवंत झालेंला म्हणून त्याची आठवण ठेवा. आणि दाविदाचे संतान म्हणून त्याची आठवण ठेवा. येशूविषयी या दोन गोष्टी का?

कारण तो मेलेल्यांतून उठला आहे म्हणून तो जिवंत आहे आणि मरणावर विजयी झाला आहे – यात आमच्यां मृत्यूचाही समावेश आहे! ”ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील“ (रोम 8:11).

याचा अर्थ हा आहे कीं दुःखसहन कितीही गंभीर का होईना, तरीही या पृथ्वीवर सर्वात वाईट गोष्ट जी होऊ शकते ती म्हणजें तुम्हास मारले जाणें. आणि येशूनें त्या शत्रूची नांगी काढून टाकली आहे. तो जिवंत आहे. आणि तुम्हीं जिवंत राहाल. ”जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहींत त्यांना भिऊ नका“ (मत्तय 10:28).

पण त्याहीपेक्षा अधिक म्हणजें, येशूचे पुनरुत्थान आकस्मिक पुनरुत्थान नव्हते. ते दाविदाच्या पुत्राचे पुनरुत्थान होते. “मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव.” पौल असे का म्हणतो?

कारण प्रत्येक यहूदी व्यक्तीला माहीत होते कीं त्याचा अर्थ काय आहे. त्याचा अर्थ हा आहे कीं येशू हा तो ख्रिस्त, म्हणजें मशीहा आहे (योहान 7:42). आणि याचा अर्थ हा होता कीं हे पुनरुत्थान एका सनातन राजाचे पुनरुत्थान होते. येशूची आई, मरीया हिला देवदूत काय बोलला तें ऐका :

”पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाहीं“ (लूक 1:31-33).

म्हणून, येशूची आठवण ठेवा, ज्याची तुम्हीं सेवा करता, आणि ज्याच्यासाठीं तुम्हीं दुःख सोसता. तो फक्त मेलेल्यांतून जिवंत झालेंला नाहीं, तर तो राजा म्हणून जिवंत आहे जो सर्वकाळ राज्य करील – त्याच्या राज्याचा अंत नाहीं. ते तुम्हांला काहींही करेनात, तुम्हांला भिण्याची गरज नाहीं. तुम्हीं पुन्हा जिवंत केलें जाल. आणि तुम्हीं त्याच्यासोबत राज्य कराल.

5 April : न्यायसमयाची पुस्तके

Alethia4India
Alethia4India
5 April : न्यायसमयाची पुस्तके
Loading
/

‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीं असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील. (प्रकटीकरण 13:8)

तारण त्या सर्वांसाठीं प्राप्त करून तें सुरक्षित ठेवण्यात आले आहे ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.

जीवनाच्या पुस्तकात नावे लिहिण्यात आल्यामुळे आमचे तारण सुरक्षित होते याचे कारण हे आहे कीं या पुस्तकास वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाचे पुस्तक असे म्हटलेंले आहे. या पुस्तकात ज्यांची नावे लिहिलेली आहेत ते त्यांच्या कृत्यांच्या आधारे तारण पावलेली नाहींत. ते तारण पावले ते ख्रिस्त वधिला गेला म्हणून.

पण प्रकटीकरण 20:12 या वचनात योहान म्हणतो, “मग मृत झालेंल्या लहानथोरांना मी (देवाच्या) राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हां दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला.” जर आमचे तारण ख्रिस्त वधिला गेल्यामुळे झालें आहे, तर मग, “पुस्तकात” समाविष्ट आमच्यां जीवनांचा लेख आमच्यां न्यायाचा भाग कसा आहे?

उत्तर हे आहे कीं, आमच्यां कृत्यांचा लेख नोंदविणाऱ्या पुस्तकांत आम्हीं ख्रिस्ताचे असल्याचा पुरेसे पुरावा आहेत कीं ते आमच्यां विश्वासाची आणि ख्रिस्तासोबत आमच्यां ऐक्याची सार्वजनिक पुष्टी म्हणून कार्य करतात.

प्रकटीकरण 21:27 चा विचार करा, “तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाहीं’ तर कोकऱ्याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.”  येथे “जीवनाच्या पुस्तकात” लिहिले जाण्याचा परिणाम फक्त नाश न पावणे हा नाहीं, तर घृणास्पद, पापमय वर्तन न करणे हा देखील आहे.

उदाहरणार्थ, वधस्तंभावरील चोराचा विचार करा. येशूनें म्हटलें कीं तो सुखलोकात प्रवेश करील (लूक 23:43). पण जेव्हां पुस्तके उघडली जातील तेव्हां त्याचा न्याय कसा होईल? त्याच्या जीवनाच्या 99.9 टक्केपेक्षा जास्त भाग पाप असेल.

त्याचे तारण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सुरक्षित केलें जाईल. त्याचे नाव वध केलेंल्या कोंकराच्या पुस्तकात लिहिलेले असेल.

मग देव पुस्तके उघडील. सर्वात आधी, तो त्याच्या पुत्राच्या श्रेष्ठ बलिदानाचा गौरव करण्यासाठीं पापाच्या आजीवन अभिलेखाचा उपयोग करील. दुसरे म्हणजें, देव शेवटचे पुस्तक वाचेल, जेथे वधस्तंभावर चोराचे नाट्यपूर्ण परिवर्तन नमूद करण्यात आले आहे. त्याच्या जीवनातील देवाचे हे कार्य, जे पुस्तकांत नमूद करण्यात आले आहे, त्या चोराच्या विश्वासाची आणि ख्रिस्तामधील ऐक्याची त्या शेवटल्या दिवशी सार्वजनिक पुष्टी ठरेल. आणि त्याच्या तारणाचा आधार ख्रिस्त असेल, त्याची कार्ये नाहींत.

म्हणून, जेव्हां मी म्हणतो कीं पुस्तकांत जे लिहिलेले आहे ते आमच्यां विश्वासाची आणि ख्रिस्तामधील ऐक्याची सार्वजनिक पुष्टी आहे, तेव्हां माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे नाहीं कीं त्या अभिलेखात दुष्कृत्यांपेक्षा सत्कृत्यांचा अधिक समावेश असेल.

तर माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे कीं तेथे विश्वासाची वास्तविकता दाखविणारे ख्रिस्तामधील जीवन नमूद केलें असेल – नवीन जीवनाची वास्तविकता आणि ख्रिस्तासोबत ऐक्य. ख्रिस्ती म्हणून प्रत्येक दिवस अशाच प्रकारे जगतो : या विश्वासाने कीं आमची दंडाज्ञा नाहींसी झालीं आहे (रोम 8:1), आणि आमचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, आणि ज्याने आमच्यांठायीं चांगले कार्य सुरू केलें ते तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यन्त पूर्णत्वास नेईल.

4 April : देव आम्हास इतरांद्वारे बळ देतो

Alethia4India
Alethia4India
4 April : देव आम्हास इतरांद्वारे बळ देतो
Loading
/

“शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केलीं; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठीं मी विनंती केलीं आहे; आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.” (लूक 22:31-32)

इतर दहा प्रेषितांविषयी काय (यात यहूदाचा समावेश नाहीं)?

सैतान त्यांनाहीं चाळणार होता. येशूनें त्यांच्यासाठीं प्रार्थना केलीं का?

होय, त्यानें प्रार्थना केलीं. परंतु जसे त्यानें पेत्राच्या विश्वासाचे रक्षण केलें तसे इतर शिष्यांच्या विश्वासाचे देखील रक्षण केलें जावें अशी विनंती त्यानें पित्याला केलीं नाहीं.

त्या रात्री सैतानाच्या चाळणीच्या वेदनेद्वारें देवानें पेत्राचा अहंकार आणि स्वतःवर भरवंसा करण्याचा स्वभाव हाणून पाडला. पण त्यानें त्याला असेच सोडले नाहीं. त्यानें त्याला मागे परत फिरवले आणि त्याला क्षमा केलीं आणि त्याला पुनर्स्थापित केलें आणि त्याचा विश्वास बळकट केला. आणि आता इतर दहा शिष्यांना बळकट करण्याचे कार्य पेत्राचे होते. “आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.”

येशूनें पेत्राची तरतूद करून दहा जणांची तरतूद केलीं. जो बळकट होतो तो बळकट करणारा बनतो.

आमच्यांसाठीं येथे एक मोठा धडा आहे. कधी कधी देव तुमच्याशी प्रत्यक्ष व्यवहार करेल, इतर सर्वजण गाढ निद्रेत असतांना पहाटेच्या पहिल्या प्रहरी तोच तुमचा विश्वास बळकट करेल. परंतु बहुतेकदा (आपण दहा-अकराव्या वेळेस म्हणू शकतो) देव दुसऱ्या व्यक्तीद्वारे आपला विश्वास बळकट करतो.

देव आपल्याजवळ काहीं शिमोन पेत्रांना पाठवतो जो आम्हांला विश्वासात टिकून राहण्यासाठीं आवश्यक असलेला कृपेचा शब्द घेऊन येतो : कसे याबद्दल काहीं साक्ष ”रात्री विलापाने बिर्‍हाड केलें, तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो“ (स्तोत्र 30:5).

सार्वकालिक सुरक्षा हा एक समुदायिक प्रकल्प आहे. जेव्हां जेव्हां देव तुमच्या अंतःकरणाला या अभिवचनाने उत्तेजन देतो कीं सैतानाच्या चाळणीत तुमचा विश्वास अपयशी होणार नाहीं, तेव्हां तेव्हां ते उत्तेजन घ्या आणि ख्रीस्तातील तुमच्या बंधु-भगिनींना बळकट करण्यासाठीं त्याचा उपयोग करून तुमचा आनंद द्विगुणित करा – ज्या सामर्थ्याने तुम्हांला बळ प्राप्त झालें आहे त्याच सामर्थ्यानिशी.

3 April : तुम्हीं अडखळता तेव्हां प्रतिसाद कसा द्यावा

Alethia4India
Alethia4India
3 April : तुम्हीं अडखळता तेव्हां प्रतिसाद कसा द्यावा
Loading
/

कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाहीं; तर करावेसे वाटत नाहीं असे जे वाईट ते मी करतो. (रोम 7:19)

ख्रिस्ती केवळ पराभवाचे जीवन जगत नाहींत. पण आपण फक्त पापावर पूर्ण विजय मिळवण्यासाठींहि जगत नाहीं. आणि अशा काळात जेव्हां आपण पापावर विजय मिळवण्यात अपयशी ठरतो, तेव्हां रोम 7:13-25 आम्हांला निरोगी खिस्ती व्यक्तीने कसा प्रतिसाद दिला पाहिजे याची सामान्य पद्धत दाखवते.

आपण असे म्हणावें :

1. मी देवाच्या नियमशास्त्रावर प्रीति करतो (वचन 22)

2. मी इतक्यात जे केलें त्याचा मला वीट आहे (वचन 15)

3. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? (वचन 24)

4. देवाचे आभार! आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे विजय येईल. (वचन 25)

दुसऱ्या शब्दांत, कोणताही ख्रिस्ती व्यक्ती पराभवाचं जीवन जगू इच्छित नाहीं. कोणताही ख्रिस्ती व्यक्ती पराभवाचं जीवन जगण्यात समाधान पावत नाहीं. परंतु जर आपण काहीं काळासाठीं पराभूत झालो, तर आपण त्याबाबत खोटे बोलता कामा नये.

ढोंग नाहीं. दिखावा नाहीं. अहंकारपूर्ण परिपूर्णतावाद नाहीं. कोणतीही धार्मिकतेचा बडेजाव करणारे, वरकरणी स्मितहास्य किंवा स्वस्त तकलादूपणा नको.

आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजें, देव आम्हांला आमच्यां स्वतःच्या अपयशाकडें कानाडोळा करण्यापासून आणि परिणामी इतरांवर त्वरित दोष लावण्यापासून वाचवतो.

हे परमेश्वरा, आम्हांला इतरांच्या अपयशापेक्षा आमच्यां स्वतःच्या उणीवांवर शोक करण्यासाठीं मदत कर. हे परमेश्वरा, आम्हांला या वचनातील प्रेषित पौलाची प्रामाणिकता आणि प्रांजळपणा आणि विनयशीलता दे!”किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.“ (रोम 7:24-25).

2 April : एव्हरेस्ट पर्वतापेक्षा उत्तम

Alethia4India
Alethia4India
2 April : एव्हरेस्ट पर्वतापेक्षा उत्तम
Loading
/

परंतु आपल्याला ठाऊक आहे कीं, देवावर प्रीति करणाऱ्यांना म्हणजें त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. (रोम 8:28)

जर तुम्हीं या भव्य अभिवचनात राहत असाल, तर तुमचे जीवन एव्हरेस्ट पर्वतापेक्षा अधिक मजबूत व स्थिर आहे.

जेव्हां तुम्हीं रोम 8:28 च्या तटबंदीच्या आत असता तेव्हां कोणतीहि गोष्ट तुम्हांला पराभूत करू शकत नाहीं. रोम 8:28 च्या बाहेर, सर्वकाहीं गोंधळ आणि चिंतांतुरता आणि भीती आणि अनिश्चितता आहे. देवाच्या सर्वसमावेशक भावी कृपेच्या या वचनाच्या बाहेर, ड्रग्ज आणि अश्लीलता आणि डझनभर व्यर्थ करमणूकीं आहेत. या जगांत ठिसूळ गुंतवणूक धोरणांच्या आणि क्षणभंगुर विमा संरक्षणाच्या आणि क्षुल्लक सेवानिवृत्ती योजनांच्या पातळ भिंती आणि टिनाची छप्परे आहेत. डेडबोल्ट कुलुप आणि अलार्म प्रणाली आणि अँटीबॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या निव्वळ पुठ्याने बनलेल्या तटबंदी आहेत. रोम 8:28 ची जागा घेणारे एक हजार उलट उपाय आहेत.

एकदा का तुम्हीं प्रीतिच्या दारातून प्रवेश करून रोम 8:28  च्या अफाट, अढळ इमारतीत गेलात कीं सर्वकाहीं बदलून जाते. तुमच्या जीवनात स्थैर्य आणि खोली आणि स्वातंत्र्य येते. तुम्हीं यापुढे पराभूत केलें जाऊ शकणार नाहीं. सार्वभौम परमेश्वर देव तुम्हीं कधी अनुभवाल अशा तुमच्या सर्व दुःखांवर आणि सर्व सुखांवर तुमच्या भल्याकरिता शासन करतो हा विश्वास हा तुमच्या जीवनातील एक अतुलनीय आश्रय आणि सुरक्षितता आणि आशा आणि बळ आहे.

जेव्हां देवाचे लोक रोम 8:28  च्या – गोवर ते शवागारापर्यंत – भावी कृपेच्या प्रकाशझोतांत जगतात तेव्हां ते जगातील सर्वाधिक स्वतंत्र आणि बलवान आणि सर्वात उदार लोक ठरतात.

त्यांचा प्रकाश चमकतो आणि लोक त्यांच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करतांत (मत्तय 5:16).

1 April : आमच्यां सखोल गरजांपैकीं दोन

Alethia4India
Alethia4India
1 April : आमच्यां सखोल गरजांपैकीं दोन
Loading
/

देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायीं असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून : (2 थिस्सल 1:1)

मंडळी या नात्यानें आपण पित्याच्या “ठायीं” आणि प्रभूच्या “ठायीं” आहोत. याचा अर्थ काय? “पिता” हा शब्द मूलतः निगा आणि सांभाळ आणि संरक्षण आणि प्रयोजन आणि शिस्त सूचवितो. म्हणून, पित्याच्या “ठायीं” असण्याचा अर्थ मुख्यतः आमचा स्वर्गीय पिता म्हणून देवाच्या संरक्षणात आणि निगेत असणे असा होईल.

दुसरी पदवी आहे प्रभू : आम्हीं प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायीं आहोत. “प्रभू” हा शब्द मुख्यत्वे करून अधिकार आणि नेतृत्व आणि स्वामित्व सूचित करतो. म्हणून, प्रभूच्या “ठायीं” असण्याचा अर्थ मुख्यत्वे करून जबाबदार असणे, अधिकाराधीन असणे, आणि आमचा परम श्रेष्ठ प्रभू म्हणून येशूच्या मालकींचे असणे असा आहे.

म्हणून, पौल थेस्सलोनिया येथील मंडळीस अशाप्रकारे अभिवादन करतो कीं त्यांस आठवण करून दिली जावी कीं ते एक कुटुंब (पित्याच्या निगेत) आहेत, आणि ते सेवक (प्रभूच्या आज्ञेत) आहेत. पिता आणि प्रभू म्हणून देवाची ही दोन वर्णने आणि अशाप्रकारे कुटुंब आणि सेवक म्हणून मंडळीचे असणे, आमच्यां दोन सखोल गरजानुरूप आहेत.

एकींकडें, आमच्यांपैकीं प्रत्येकाला सुटकेची आणि मदतीची गरज आहे, आणि दुसरीकडें जगण्याचा हेतू आणि जीवनाला अर्थाची गरज आहे.

  1. आमच्यांवर दया करण्यासाठीं आणि पाप आणि दुःखापासून आम्हास मुक्त करण्यासाठीं आपल्याला स्वर्गीय पित्याची गरज आहे. आपल्याला प्रत्येक पावलावर त्याच्या मदतीची गरज आहे, कारण आपण अतिशय दुर्बळ आणि संवेदनशील आहोत.
  • आम्हास जीवनात मार्गदर्शन करण्यासाठीं आणि काय बुद्धिनुरूप आहे हे सांगण्यासाठीं आणि आपल्याला एक थोर आणि अर्थपूर्ण जबाबदारी, आणि अस्तित्वाचे कारण, देवानें आम्हास जसे घडविले आहे त्यासाठीं काहीं उपयुक्तता देण्यासाठीं स्वर्गाच्या प्रभूची देखील गरज आहे. आम्हीं फक्त पित्याच्या काळजीत सुरक्षित राहू इच्छित नाहीं – अर्थातच, ते मूल्यवान आणि आवश्यक आहे. पण आम्हास जगण्यासाठीं एक गौरवी निमित्त देखील हवे आहे.

एक दयाळू पिता आमचा रक्षक असावा अशी आमची इच्छा आहे, आणि सर्वशक्तिमान प्रभूने एखाद्या मोठ्या उद्देशासाठीं आमचा विजेता आणि आमचा सेनापति आणि आमचा पुढारी असावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून पौल पहिल्या वचनात म्हणतो कीं तुम्हीं “पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या ठायीं” मंडळी आहात, म्हणून आपण त्याजपासून विसावा आणि मदत प्राप्त करू शकतो – देव आमचा पिता आहे! आणि आम्हीं दुसर्यापासून धैर्य आणि अर्थ प्राप्त करू शकतो – येशू आमचा प्रभू आहे!

31 March : प्रेमाचे हात बांधणारे काय आहे?

Alethia4India
Alethia4India
31 March : प्रेमाचे हात बांधणारे काय आहे?
Loading
/

ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीति, ह्यांविषयी ऐकून, आम्हीं तुमच्यासाठीं जेव्हां प्रार्थना करतो तेव्हां स्वर्गात तुमच्यासाठीं राखून ठेवलेल्यां आशेमुळे आम्हीं सर्वदा आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो. ह्या आशेविषयी तुम्हीं सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकलें. (कलस्सै 1:3-5)

आज मंडळीची समस्या ही नाहीं कीं स्वर्गावर आवेशाने प्रेम करणारे अनेक लोक आहेत. समस्या ही नाहीं कीं विश्वासाचा दावा करणारे ख्रिस्ती लोक जगापासून माघार घेत आहेत, म्हणजे त्यांचे अर्धे दिवस पवित्र शास्त्र वाचनात घालवीत आहेत आणि दुसरा अर्धा भाग जगाच्या गरजांची उपेक्षा करीत देवामधील त्यांच्या सुखांबद्दल गीत गाण्यात घालवतात. असे होत नाहींये! देवाचे लोक देवावर इतकीं प्रीति करत नाहींत कीं ते त्यांचे अर्धे दिवस त्याच्या वचनांत घालवितील.

समस्या ही आहे कीं विश्वासाचा दावा करणारे ख्रिस्ती लोक दहा मिनिटे पवित्र शास्त्र वाचनात खर्ची घालतात आणि नंतर त्यांचे अर्धे दिवस पैसे कमविण्यात आणि उरलेले अर्धे दिवस ते त्यांनी ज्यावर खर्ची केलें त्यावर प्रीति करण्यात आणि ते दुरुस्त करण्यात प्रेमळ आणि दुरुस्त करण्यात खर्ची घालतात.

स्वर्गीय मानसिकता नाहीं जी या जगातील हरवलेल्यां आणि दुःखी लोकांप्रत प्रेमात अडखळण आणते . ही जगिक मानसिकता आहे जी प्रेमात अडखळण आणते, आठवड्याच्या शेवटी धार्मिक नित्यक्रमाच्या कपटवेशात लपलेली असली तरीही.

ती व्यक्ती कोठे आहे जिच्या हृदयात स्वर्गाच्या प्रतिज्ञात गौरवाप्रत इतके उत्कट प्रेम आहे कीं त्याला पृथ्वीवर निर्वासित आणि यात्रेकरू असल्यांसारखे वाटते? तो व्यक्ती कोठे आहे ज्यानें येणाऱ्या युगाच्या सौंदर्याचा इतका आस्वाद घेतला आहे कीं या जगाचे हिरे त्याला डॉलरच्या दुकानातील कंच्यांसारखे दिसतात, आणि जगाची करमणूक व्यर्थ वाटते आणि जगाची नैतिक कारणे अतिशय लहान आहेत कारण तेथून अनंतकाळाकडें पाहता येत नाहीं? ही व्यक्ती कुठे आहे?

निश्चितच, तो इंटरनेटच्या किंवा खाण्याच्या किंवा झोपेच्या किंवा पिण्याच्या किंवा मेजवानी करण्याच्या किंवा मासेमारी अथवा नौकानयन करण्याच्या किंवा फेरफटका मारण्याच्या बंधनात नाहीं. तो विदेशात राहणारा स्वतंत्र मनुष्य आहे. आणि त्याचा एक प्रश्न असा आहे: मी या पृथ्वीवर निर्वासित असताना सर्व अनंतकाळासाठीं देवाचा आनंद जास्तीत जास्त कसा मिळवू शकतो? आणि त्याचें उत्तर नेहमी सारखेच असते: प्रेमाचा परिश्रम करून. देवामधील माझ्या आनंदाचा विस्तार करून, जर शक्य असेल तर मी इतरांना त्यात समाविष्ट करू शकेन, मग त्यासाठीं काहींही किंमत का मोजावी लागेना.

फक्त एकच गोष्ट त्यास संतुष्ट करते ज्याची संपत्ती स्वर्गात आहे: स्वर्गाची कामे करणे. आणि स्वर्ग हे प्रेमाने परिपूर्ण जग आहे!

स्वर्गाच्या दोऱ्या प्रेमाचे हात बांधून त्यांस निष्प्रभ करीत नाहींत. पैश्याचे आणि अवकाशाचे आणि आरामाचे आणि प्रशंसेचे प्रेम आहे – प्रेमाच्या हातांना बांधणाऱ्या स्वार्थाचे दोरखंड आहेत. आणि या दोरखंडांस तोडणारे सामर्थ्य आहे ख्रिस्ती आशा. “ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीति, ह्यांविषयी ऐकून, आम्हीं तुमच्यासाठीं जेव्हां प्रार्थना करतो तेव्हां स्वर्गात तुमच्यासाठीं राखून ठेवलेल्यां आशेमुळे आम्हीं सर्वदा आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो” (कलस्सै 1:4-5).

मला असलेल्यां पूर्ण खात्रीने मी ते पुन्हा म्हणतो: या पृथ्वीवरील प्रेमास अडखळण आणणारी स्वर्गीय मानसिकता नाहीं. ती सांसारिक चित्तवृत्ती आहे. आणि म्हणूनच प्रीतिचा महान झरा ख्रिस्ती आशेचा सामर्थ्यवान स्वतंत्र करणारा आत्मविश्वास आहे.

30 March : जर तो बोलावतो, तर तो राखतोहि

Alethia4India
Alethia4India
30 March : जर तो बोलावतो, तर तो राखतोहि
Loading
/

आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्हीं निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. ज्यानें स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. (1 करिंथ 1:8-9)

येशू येईपर्यंत तुमचा विश्वास टिकेल याची खात्री करण्यासाठीं तुम्हीं कशावर अवलंबून आहात? प्रश्न हा नाहीं कीं, तुम्हीं सार्वकालिक सुरक्षेवर विश्वास करता का? प्रश्न हा आहे कीं आम्हास कसे  सुरक्षित ठेवले जाते?

आपल्यां विश्वासाची चिकाटी आपल्यां स्वतःच्या संकल्पाच्या विश्वसनीयतेवर निर्णायकपणे अवलंबून असते का? कीं ती आम्हास “आमच्या विश्वासात टिकवून ठेवण्यासाठीं“ देवाच्या कार्यावर निर्णायकपणे अवलंबून आहे?

हे पवित्र शास्त्राचे एक थोर आणि अद्भुत सत्य आहे कीं देव विश्वासू आहे आणि ज्यांना त्यानें पाचारण केलें आहे त्यांना तो सदाकाळ सुरक्षित ठेवेल. आपण सार्वकालिकरित्या सुरक्षित आहोंत हा आपला विश्वास म्हणजे “आम्हांला विश्वासात टिकवून ठेवण्यासाठीं“ जे काहीं आवश्यक असेल ते देवच करेल हा विश्वास!

सार्वकालिकतेची खात्री ही या खात्रीपेक्षा मोठी नाहीं कीं देव आता आम्हास विश्वासात टिकवून ठेवेल. परंतु देवानें ज्यांना पाचारण केलें आहे त्यांच्यासाठीं ही खात्री फार मोठी आहे.

किमान तीन शास्त्र-संदर्भ अशा प्रकारे देवाचे पाचारण आणि देवाचे राखून ठेवणें अशाप्रकारे एकत्र मांडतांत.

1. आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्हीं निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. ज्यानें स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. (1 करिंथ 1:8-9)

2. “शांतीचा देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे; तो हे करीलच” (1 थेस्सल 5:23-24). 

3. “देवपित्यानें पवित्र केलेंले आणि येशू ख्रिस्तासाठीं राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून : दया, शांती व प्रीति ही तुम्हांला विपुल मिळोत” (यहूदा 1-2). (रोम 8:30, फिलिप्पै 1:6, 1 पेत्र 1:5 आणि यहूदा 24 मध्यें हीच वास्तविकता पहा.)

देवाचा “विश्वासूपणा” याची हमी देतो कीं त्यानें ज्यांना बोलाविले आहे त्या सर्वांस तो सर्वकाळ राखील.